20-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - या जुन्या दुनियेमध्ये अल्पकाळ क्षण भंगुर सुख आहे, हे सोबत येऊ शकत
नाही, सोबत अविनाशी ज्ञान रत्न येतात, म्हणून अविनाशी कमाई जमा करा”
प्रश्न:-
बाबांच्या या
शिक्षणामध्ये तुम्हाला कोणती विद्या शिकविली जात नाही?
उत्तर:-
भूत विद्या. कोणाच्याही संकल्पांना रीड करणे (संकल्पांना ओळखणे), ही भूत विद्या आहे,
तुम्हाला ही विद्या शिकवली जात नाही. बाबा काही थॉट रीडर नाहीत (अंतर्मनातील विचार
ओळखणारे नाहीत). ते जानी जाननहार अर्थात नॉलेजफुल आहेत. बाबा येतात तुम्हाला रूहानी
शिक्षण देण्यासाठी, ज्या शिक्षणाद्वारे तुम्हाला २१ जन्मांसाठी विश्वाची राजाई मिळते.
ओम शांती।
भारतामध्ये भारतवासी गातात - ‘आत्मायें और परमात्मा अलग रहे बहुकाल…’ आता मुले
जाणतात आम्हा आत्म्यांचे पिता, परमपिता परमात्मा आपल्याला राजयोग शिकवत आहेत. आपला
परिचय देत आहेत आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा देखील परिचय देत आहेत. कोणीतर पक्के
निश्चय बुद्धी आहेत, कोणाला मग कमी समजते, नंबरवार तर आहेत ना. मुले जाणतात आपण जीव
आत्मे परमपिता परमात्म्याच्या सन्मुख बसलो आहोत. गायले जाते - ‘आत्मायें परमात्मा
अलग रहे बहुकाल’. आता आत्मे जेव्हा मूलवतनमध्ये आहेत तर वेगळे होण्याचा प्रश्नच उठत
नाही. इथे आल्यावर जेव्हा जीव आत्मा बनते तेव्हा परमात्मा पित्या पासून सर्व आत्मे
वेगळे होतात. परमपिता परमात्म्यापासून वेगळे होऊन इथे पार्ट बजावण्यासाठी येतात.
पूर्वी तर अर्था शिवाय असेच गात होता. आता तर बाबा बसून समजावून सांगत आहेत. मुले
जाणतात - आपण परमपिता परमात्म्या पासून वेगळे होऊन इथे पार्ट बजावण्याकरिता येतो.
सर्वात पहिले तुम्हीच बाबांपासून दुरावले आहात तर शिवबाबा देखील सर्वात पहिले
तुम्हालाच भेटतात. तुमच्यासाठी बाबांना यावे लागते. कल्पापूर्वी देखील या मुलांनाच
शिकवले होते जे मग स्वर्गाचे मालक बनले. त्यावेळी इतर कोणताही खंड नव्हता. मुले
जाणतात आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो ज्याला डीटी रिलीजन, डीटी डिनायस्टी
(दैवी धर्म, दैवी कुळ) असे देखील म्हणतात. प्रत्येकाला आपला धर्म असतो. ‘रिलीजन इज
माइट’ म्हटले जाते. धर्मामध्ये ताकत राहते. तुम्ही मुले जाणता हे लक्ष्मी-नारायण
किती ताकदवान होते. भारतवासी आपल्या धर्मालाच जाणत नाहीत. कोणाच्याही बुद्धीमध्ये
येत नाही की, खरोखर भारतामध्ये यांचाच धर्म होता. धर्माला न जाणल्या कारणामुळे
दुराचारी बनले आहेत. धर्मामध्ये आल्याने तुमच्यामध्ये किती ताकद येते. तुम्ही आयरन
एजेड पर्वताला उचलून गोल्डन एजेड बनविता. भारताला सोन्याचा पर्वत बनविता. तिथे तर
खाणींमध्ये भरमसाठ सोने भरलेले असते. सोन्याचे पर्वत असतील जे मग उघडे होतील.
सोन्याला वितळवून त्याच्या विटा बनविल्या जातात. घर तर मोठ्या विटांचेच बनवतील ना.
माया मच्छिंद्रचा खेळ देखील दाखवतात ना. त्या सर्व आहेत कथा. बाबा म्हणतात - या
सर्वांचे सार मी तुम्हाला ऐकवतो. दाखवतात - ध्यानामध्ये पाहिले की, आपण झोळी भरून
घेऊन जात आहोत आणि ध्यानातून जागे झाले, तर काहीच नव्हते. जसे तुमचे देखील होते.
यालाच म्हटले जाते दिव्य दृष्टी. यामध्ये काही फायदा नाही. नवधा भक्ती खूप करतात.
ती भक्त माळाच वेगळी आहे, ही ज्ञान माळा वेगळी आहे. रुद्रमाळा आणि विष्णूची माळा आहे
ना. ती मग आहे भक्तीची माळा. आता तुम्ही शिकत आहात राजाईकरिता. तुमचा बुद्धीयोग आहे
टीचर सोबत आणि राजाई सोबत. जसे कॉलेजमध्ये शिकतात तर बुद्धीयोग टीचर सोबत असतो.
बॅरिस्टर स्वतः शिकून आप समान बनवितात. हे बाबा स्वतः काही बनत नाहीत. हे वंडर आहे
इथे. तुमचे हे आहे रूहानी शिक्षण. तुमचा बुद्धीयोग शिवबाबांसोबत आहे, त्यांनाच
नॉलेजफुल ज्ञानाचा सागर म्हटले जाते. जानी-जाननहारचा हा अर्थ नाहीये की, सर्वांच्या
अंतर्मनाला बसून वाचतील की यांच्या मनामध्ये काय सुरू आहे. ते जे थॉट रीडर असतात ते
सर्व ऐकवतात. त्याला ‘भूत विद्या’ म्हटले जाते. इथे तर बाबा शिकवतात, मनुष्यापासून
देवता बनविण्यासाठी. गायन देखील आहे - ‘मनुष्य से देवता…’ आता तुम्ही मुले समजता
आपण आता ब्राह्मण बनलो आहोत मग दुसऱ्या जन्मामध्ये देवता बनणार. आदि सनातन
देवी-देवताच गायले जातात. शास्त्रांमध्ये तर पुष्कळ कथा लिहिलेल्या आहेत. हे तर बाबा
डायरेक्ट बसून शिकवत आहेत.
भगवानुवाच - भगवंतच
ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, शांतीचा सागर आहेत. तुम्हा मुलांना वारसा देतात. हे
शिक्षण आहे तुमच्या २१ जन्मांकरिता. तर किती चांगल्या रीतीने शिकले पाहिजे. हे
रूहानी शिक्षण बाबा एकदाच येऊन शिकवतात, नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी. नवीन
दुनियेमध्ये या देवी-देवतांचे राज्य होते. बाबा म्हणतात - ‘मी ब्रह्माद्वारे आदि
सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहे. जेव्हा हा धर्म होता तेव्हा इतर कोणतेही
धर्म नव्हते. आता बाकीचे सर्व धर्म आहेत म्हणून त्रिमूर्तीच्या चित्रावर देखील
तुम्ही समजावून सांगता - ब्रह्माद्वारे स्थापना एका धर्माची. आता तो धर्म राहिलेला
नाही. गातात देखील - ‘मैं निर्गुण हारे में कोई गुण नाही, आपे ही तरस परोई…’
आमच्यामध्ये कोणतेच गुण नाहीत असे म्हणतात तर बुद्धी गॉडफादर कडे जाते, त्यांनाच
मर्सीफुल म्हटले जाते. बाबा येतातच मुळी मुलांच्या सर्व दुःखांना नष्ट करून १००
टक्के सुख देण्यासाठी. किती दया करतात. तुम्ही समजता बाबांकडे आपण आलो आहोत तर
बाबांकडून पूर्ण सुख घ्यायचे आहे. ते आहेच सुखधाम, हे आहे दुःखधाम. या चक्राला
देखील चांगल्या रीतीने समजून घ्यायचे आहे. शांतीधाम, सुखधामची आठवण करा तर अंत मती
सो गती होईल. शांतीधामची आठवण कराल तर जरूर शरीर सोडावे लागेल तेव्हाच आत्मे
शांतीधाम मध्ये जातील. एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणाचीही आठवण येता कामा नये. लाईन
एकदम क्लियर पाहिजे. एका बाबांचीच आठवण केल्याने आतून आनंदाचा पारा चढतो. या जुन्या
दुनियेमध्ये तर अल्पकाळ क्षणभंगुर सुख आहे. हे सोबत येऊ शकत नाही. सोबत ही अविनाशी
ज्ञान रत्नेच येतात. अर्थात ही ज्ञान रत्नांची कमाईच सोबत येते जी मग तुम्ही २१
जन्म प्रारब्धाच्या रूपात भोगाल. होय, विनाशी धन देखील त्यांचे सोबत जाते जे बाबांना
मदत करतात. बाबा, आमच्या देखील कवड्या घेऊन तिथे महल द्या. बाबा कवड्यांच्या
बदल्यात किती रत्ने देतात. जसे अमेरिकन लोक असतात, खूप पैसे खर्च करून पुरातन वस्तू
खरेदी करतात. लोक पुरातन वस्तूंचे खूप दाम घेतात. अमेरिकन लोकांकडून एका पैशाच्या
वस्तूचे हजार घेतील. बाबा देखील किती चांगले ग्राहक आहेत. भोलानाथ म्हणून गायले गेले
आहेत ना. लोकांना हे देखील माहित नाही आहे, ते तर शिव-शंकर हे एकच आहेत असे म्हणतात.
त्यांच्यासाठी म्हणतात - ‘भर दो झोली’. आता तुम्ही मुले समजता आपल्याला ज्ञान रत्न
मिळतात, ज्याद्वारे आपली झोळी भरते. हे आहेत बेहदचे पिता. ते मग शंकरासाठी म्हणतात
आणि मग दाखवतात की, धोत्रा खात होते. भांग पीत होते. काय-काय गोष्टी बसून बनवल्या
आहेत! तुम्ही मुले आता सद्गतीकरिता शिक्षण घेत आहात. हे शिक्षण आहेच एकदम शांतीमध्ये
राहण्याचे. या पणत्या-दिवे इत्यादी जे पेटवता, शो करता, तो देखील यासाठी की लोकांनी
येऊन विचारावे की, तुम्ही एवढी शिवजयंती का साजरी करता? शिवच भारताला श्रीमंत
बनवतात ना. या लक्ष्मी-नारायणाला स्वर्गाचा मालक कोणी बनवले - हे तुम्ही जाणता. हे
लक्ष्मी-नारायण पूर्वीच्या जन्मामध्ये कोण होते? ही पूर्वीच्या जन्मामध्ये जगत अंबा
ज्ञान-ज्ञानेश्वरी होती जी मग राज-राजेश्वरी बनते. आता पद कोणाचे मोठे आहे?
पाहण्यामध्ये तर हे स्वर्गाचे मालक आहेत. जगत अंबा कुठली मालक होती? यांच्याकडे
कशाकरता जातात? ब्रह्माला देखील १०० भुजावाला २०० भुजा वाला १००० भुजा वाला दाखवतात
ना. जितकी मुले बनत जातात, भुजा वाढत जातात. जगदंबाला देखील लक्ष्मीपेक्षा जास्त
भुजा दिलेल्या आहेत, त्यांच्याकडेच जाऊन सर्वकाही मागतात. खूप आशा घेऊन जातात -
संतान पाहिजे, हे पाहिजे… लक्ष्मीकडे कधी अशा इच्छा घेऊन जात नाहीत. ती तर केवळ
धनवान आहे. जगत अंबेद्वारे तर स्वर्गाची बादशाही मिळते. हे देखील कोणाला माहित नाही
आहे की, जगत अंबेकडे काय मागितले पाहिजे! हे तर शिक्षण आहे ना. जगत अंबा काय शिकवते?
राजयोग. यालाच म्हटले जाते बुद्धीयोग. तुमची बुद्धी इतर सगळ्या बाजुंनी निघून एका
बाबांमध्ये लागते. बुद्धी तर अनेक ठिकाणी धावत असते ना. आता बाबा म्हणतात - माझ्याशी
बुद्धीयोग लावा, नाही तर विकर्म विनाश होणार नाहीत म्हणून बाबा फोटो काढण्यासाठी
देखील मनाई करतात. हा तर यांचा (ब्रह्माचा) देह आहे ना.
बाबा स्वतः दलाल बनून
म्हणतात आता तुमची ती लग्न गाठ कॅन्सल झाली आहे. काम चितेवरून उतरून आता ज्ञान
चितेवर बसा. काम चितेवरून उतरा. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर
विकर्म विनाश होतील. इतर कोणी मनुष्य असे म्हणू शकत नाहीत. मनुष्याला भगवान देखील
म्हटले जाऊ शकत नाही. तुम्ही मुले जाणता बाबाच पतित-पावन आहेत. तेच येऊन काम
चितेवरून उतरवून ज्ञान चितेवर बसवतात. ते आहेत रूहानी पिता. ते यांच्यामध्ये बसून
म्हणतात - तुम्ही देखील आत्मा आहात, इतरांना देखील हे समजावून सांगत रहा. बाबा
म्हणतात - मनमनाभव. मनमनाभव म्हटल्यानेच स्मृती जागृत होईल. या जुन्या दुनियेचा
विनाश देखील समोर उभा आहे. बाबा समजावून सांगत आहेत - ही आहे महाभारी महाभारत लढाई.
म्हणतील लढाई तर परदेशामध्ये देखील होते मग याला महाभारत लढाई का म्हणतात?
भारतामध्येच यज्ञ रचलेला आहे, याच्यातूनच विनाश ज्वाळा निघाली आहे. तुमच्यासाठी
नवीन दुनिया पाहिजे तर गोड मुलांनो, जुन्या दुनियेचा जरूर विनाश झाला पाहिजे. तर या
लढाईचे मूळ इथूनच निघते. या रुद्र ज्ञान यज्ञामधून महाभारी लढाई, विनाश ज्वाळा
प्रज्वलित झाली आहे. भले शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे परंतु कोणी म्हटले हे जाणत
नाहीत. आता बाबा समजावून सांगत आहेत नवीन दुनियेसाठी. आता तुम्ही राजाई घेता, तुम्ही
देवी-देवता बनता. तुमच्या राज्यामध्ये दुसरा कोणीही असता कामा नये. डेव्हिल वर्ल्डचा
(आसुरी दुनियेचा) विनाश होतो. बुद्धीमध्ये लक्षात राहिले पाहिजे - काल आम्ही राज्य
केले होते. बाबांनी राज्य दिले होते मग ८४ जन्म घेत आलो. आता पुन्हा बाबा आलेले
आहेत. तुम्हा मुलांमध्ये तर हे ज्ञान आहे ना. बाबांनी हे ज्ञान दिले आहे. जेव्हा
देवता धर्माची स्थापना होते तेव्हा बाकी सर्व डेव्हिल वर्ल्डचा विनाश होतो. या सर्व
गोष्टी हे बाबा ब्रह्माद्वारे बसून समजावून सांगतात. ब्रह्मा देखील शिवबाबांचा मुलगा
आहे, विष्णूचे देखील रहस्य समजावून सांगितले आहे की ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो
ब्रह्मा बनतात. आता तुम्हाला समजले आहे आपण ब्राह्मण आहोत नंतर देवता बनणार आणि
पुन्हा ८४ जन्म घेणार. हे ज्ञान देणारे एकच बाबा आहेत तर मग कोणत्या मनुष्या द्वारे
हे ज्ञान कसे मिळू शकेल? यामध्ये संपूर्ण बुद्धीची गोष्ट आहे. बाबा म्हणतात की, इतर
सर्व बाजूंनी बुद्धी तोडून टाका. बुद्धीच बिघडते. बाबा म्हणतात की माझी आठवण करा तर
विकर्म विनाश होतील. गृहस्थ व्यवहारांमध्ये भले रहा. एम ऑब्जेक्ट तर समोर उभे आहे.
जाणता आपण शिकून हे बनणार. तुमचे शिक्षण आहेच संगम युगाचे. आता तुम्ही ना इकडे, ना
तिकडे. तुम्ही बाहेर आहात. बाबांना खिवैया (नावाडी) देखील म्हणतात, गातात देखील -
‘हमारी नैया पार ले जाओ’. यावर एक कहाणी देखील बनलेली आहे. कोणी चालू लागतात, कोणी
थांबतात. आता बाबा म्हणतात - मी बसून या ब्रह्माच्या मुखाद्वारे ऐकवतो. ब्रह्मा
कुठून आले? प्रजापिता तर जरूर इथे पाहिजे ना. मी यांना ॲडॉप्ट करतो, यांचे नाव
देखील ठेवतो. तुम्ही देखील ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहात, जे कलियुगाच्या शेवटी
आहेत, तेच मग सतयुगाच्या सुरवातीला जातील. सर्वप्रथम तुम्हीच बाबांपासून वेगळे होऊन
पार्ट बजावण्यासाठी आला आहात. आपल्यामध्ये देखील सर्वच तर म्हणता येणार नाही ना. हे
देखील माहित होईल की, कोण पूर्ण ८४ जन्म घेतात! या लक्ष्मी-नारायणाची तर गॅरंटी आहे
ना. यांच्यासाठीच गायन आहे शाम-सुंदर. देवी-देवता सुंदर होते, सावळ्यापासून सुंदर
बनले आहेत. खेडवळ मुलापासून बदलून सुंदर बनतात, यावेळी सर्व अनाथ मुले आहेत. या
बेहदच्या गोष्टी आहेत, याला कोणीही जाणत नाही. किती चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण
दिले जाते. प्रत्येकासाठी सर्जन एकच आहे. हे आहेत अविनाशी सर्जन.
योगाला अग्नी म्हटले
जाते कारण योगाद्वारेच आत्म्यातील अशुद्धता निघून जाते. योग अग्नीद्वारे तमोप्रधान
आत्मा सतोप्रधान बनते. जर अग्नी थंड असेल तर अशुद्धता निघणार नाही. आठवणीला
योग-अग्नी म्हटले जाते, ज्याद्वारे विकर्म विनाश होतात. तर बाबा म्हणतात - तुम्हाला
किती समजावून सांगत राहतो. धारणा देखील व्हावी ना. अच्छा मनमनाभव. यामध्ये तरी थकून
जाता कामा नये ना. बाबांची आठवण करणे सुद्धा विसरून जातात. हे पतींचेही पती तुमचा
ज्ञानाने किती शृंगार करतात. निराकार बाबा म्हणतात इतर सर्वांमधून बुद्धीयोग तोडून
मज पित्याची आठवण करा. सर्वांचा पिता एकच आहे. तुमची आता चढती कला होत आहे. म्हणतात
ना - ‘तेरे भाने सर्व का भला’. बाबा आले आहेत सर्वांचे भले करण्यासाठी. रावण तर
सर्वांना दुर्गतीमध्ये घेऊन जातो, राम सर्वांना सद्गतीमध्ये घेऊन जातात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांच्या
आठवणीद्वारे अपार सुखांचा अनुभव करण्यासाठी बुद्धीची लाईन क्लिअर पाहिजे. आठवण
जेव्हा अग्नीचे रूप घेईल तेव्हा आत्मा सतोप्रधान बनेल.
२) बाबा कवड्यांच्या
बदल्यात रत्ने देतात. अशा भोलेनाथ बाबांकडून आपली झोळी भरायची आहे. शांतीमध्ये
राहण्याचा अभ्यास करून सद्गतीला प्राप्त करायचे आहे.
वरदान:-
मायेच्या
बंधनांपासून नेहमी निर्बंधन राहणारे योगयुक्त बंधनमुक्त भव
बंधन मुक्तची निशाणी
आहे नेहमी योगयुक्त. योगयुक्त मुले जबाबदाऱ्यांचे बंधन किंवा मायेच्या बंधनापासून
मुक्त असतील. मनाचे देखील बंधन नसावे. लौकिक जबाबदाऱ्या तर खेळ आहे, त्यामुळे
डायरेक्शन अनुसार खेळाच्या दृष्टिकोनातून हसत खेळा म्हणजे मग कधीही छोट्या-छोट्या
गोष्टींमध्ये थकायला होणार नाही. जर बंधन समजत असाल तर मग हैराण होता. काय, कशाला
असे प्रश्न उत्पन्न होतात. परंतु जबाबदार बाबा आहेत आपण निमित्त आहोत. या स्मृतीने
बंधनमुक्त बना तेव्हाच योगयुक्त बनाल.
बोधवाक्य:-
करनकरावनहारच्या स्मृतीद्वारे भान आणि अभिमानाला समाप्त करा.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-
अपवित्रता अर्थात
केवळ कोणाला दुःख देणे किंवा पाप कर्म करणे नाही आहे परंतु स्वतःमध्ये सत्यता,
स्वच्छता विधीपूर्वक जर अनुभव करत असाल तर पवित्र आहात. जशी म्हण आहे - ‘सत्याची
नाव डगमगेल परंतु बुडणार नाही’. तर विश्वासाची नाव - सत्यता आहे, ऑनेस्टी आहे, जी
डगमगेल परंतु बुडणार नाही त्यामुळे सत्यतेच्या हिंमतीद्वारे परमात्म प्रत्यक्षतेच्या
निमित्त बना.