20-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - पुण्य आत्मा बनायचे असेल तर एका बाबांची आठवण करा, आठवणीनेच आत्म्यातील
भेसळ निघून जाईल, आत्मा पावन बनेल”
प्रश्न:-
कोणती स्मृती
राहिल ी तर कधीही कोणत्याही गोष्टी मध्ये गोंधळून जाणार नाहीत?
उत्तर:-
ड्रामाची स्मृती. ‘बनी बनाई बन रही, अब कुछ बननी नाहि…’ हा अनादि ड्रामा चालतच राहतो.
यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही. बरीच मुले म्हणतात -
‘माहित नाही हा आमचा अंतिम ८४ वा जन्म आहे की नाही’, गोंधळून जातात. बाबा म्हणतात -
गोंधळून जाऊ नका, मनुष्यापासून देवता बनण्याचा पुरुषार्थ करा.
ओम शांती।
मुलांना ओम् शांतीचा अर्थ तर माहित आहे की, ‘मी आत्मा आहे आणि मज आत्म्याचा स्वधर्म
आहे - शांती. मी आत्मा शांत स्वरूप, शांतीधामची राहणारी आहे. हा धडा पक्का करत रहा.
हे कोण समजावून सांगत आहेत? शिवबाबा. आठवण देखील करायची आहे शिवबाबांची. त्यांना
स्वतःचा रथ (शरीर) नाही आहे म्हणून त्यांच्या करिता बैल (नंदी) दाखविला जातो.
मंदिरामध्ये देखील नंदी ठेवलेला आहे. याला म्हटले जाते संपूर्ण अज्ञान. बाबा
समजावून सांगतात मुलांना अथवा आत्म्यांना. हे आहेत आत्म्यांचे पिता शिवबाबा, यांची
नावे तर अनेक आहेत. परंतु अनेक नावे असल्या कारणामुळे गोंधळलेले आहेत. वास्तविक
यांचे नाव आहे - ‘शिव’. शिव जयंती देखील भारतामध्ये साजरी केली जाते. ते निराकार
बाबा आहेत, येऊन पतितांना पावन बनवितात. कोणी ‘भागीरथ’ तर कोणी ‘नंदिगण’ म्हटले आहे.
मी कोणत्या भाग्यशाली रथामध्ये येतो ते स्वतः बाबाच सांगतात. मी ब्रह्माच्या
तनामध्ये प्रवेश करतो. ब्रह्मा द्वारे भारताला स्वर्ग बनवतो. तुम्ही सर्व भारतवासी
जाणता ना की लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. तुम्ही सर्व भारतवासी मुले आदि सनातन
देवी-देवता धर्माचे होता. स्वर्गवासी होता. ५ हजार वर्षांपूर्वी जेव्हा मी आलो होतो
तर सर्वांना सतोप्रधान स्वर्गाचा मालक बनविले होते. मग पुनर्जन्म जरूर घ्यावे
लागतील. बाबा किती सोप्या पद्धतीने सांगतात. आता शिव जयंती साजरी करता. (या २०२६
मध्ये लिहाल ९० वी शिवजयंती), बाबांचे अवतरण होऊन आता ९० वर्षे झाली आहेत. मग त्याच
सोबत ब्रह्मा, विष्णू, शंकराची देखील पधरामणी आहे. त्रिमूर्ती ब्रह्माची जयंती
कोणीच दाखवत नाहीत, दाखविणे जरुरी आहे कारण बाबा म्हणतात - मी ब्रह्मा द्वारेच
पुन्हा स्थापना करतो. ब्राह्मण बनवत जातो. तर ब्रह्मा आणि ब्राह्मण वंशियांचा देखील
जन्म झाला. मग दाखवतो की, तुम्ही सो विष्णुपुरीचे मालक बनाल. बाबांच्या आठवणीनेच
तुमच्यातील भेसळ निघून जाईल. भले भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे; परंतु तो कोणी
शिकवला होता, ते कोणीच जाणत नाहीत. बाबा स्वतः म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, तुम्ही
आपल्या पित्याची आठवण करा’. तुम्हाला वारसा माझ्याकडून मिळतो. मी तुमचा पिता आहे.
मी कल्प-कल्प येतो, येऊन तुम्हाला मनुष्या पासून देवता बनवतो कारण तुम्ही देवी-देवता
होता, आणि मग ८४ जन्म घेत-घेत येऊन पतित बनला आहात. रावणाच्या मतावर चालत आहात.
ईश्वरीय मताद्वारे तुम्ही स्वर्गाचे मालक बनता.
बाबा म्हणतात - ‘मी
कल्पापूर्वी देखील आलो होतो. जे काही घडून जाते, ते कल्प-कल्प होतच राहील. बाबा
तरीही येऊन यांच्यामध्ये प्रवेश करतील, या दादांना सोडवतील. मग या सर्वांची परवरिश
(संगोपन) करवतील. तुम्ही जाणता की, आपणच सतयुगामध्ये होतो. आम्हा भारतवासीयांनाच ८४
जन्म घ्यावे लागतील. सर्वात पहिले तुम्ही सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण होता. यथा
राजा-राणी तथा प्रजा नंबरवार. सगळेच काही राजा-राणी बनू शकत नाहीत. तर बाबा समजावून
सांगत आहेत - सतयुगामध्ये तुमचे ८ जन्म, त्रेतामध्ये १२ जन्म… स्वतःला असेच समजा की
हा पार्ट आपण बजावलेला आहे. पहिला सूर्यवंशी राजधानीमध्ये पार्ट बजावला, नंतर मग
चंद्रवंशीमध्ये आणि मग उतरत वाममार्गामध्ये आलो. त्यानंतर मग आम्ही ६३ जन्म घेतले.
भारतवासीयांनीच पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत; इतर कोणत्याही धर्माचे इतके जन्म घेत
नाहीत. गुरुनानक यांना ५०० वर्षे झाली, त्यांचे जवळ-जवळ १२-१४ जन्म असतील. हा हिशोब
काढला जातो. ख्रिश्चनांनी २ हजार वर्षांमध्ये ६० पुनर्जन्म घेतले असतील; वृद्धी होत
जाते, पुनर्जन्म घेत जातात. बुद्धीमध्ये हा विचार करा की आपणच ८४ जन्म भोगले आहेत,
आता सतोप्रधान बनायचे आहे. जे काही घडून गेले तो ड्रामा. जो ड्रामा बनलेला आहे तो
पुन्हा रिपीट होईल. बेहदच्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही पुनर्जन्म
घेत आले आहात. आता तुम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता पुन्हा बाबांनी आठवण करून
दिली आहे की, शांतीधाम तुमचे घर आहे. आत्म्याचे रूप कसे आहे? बिंदू. तिथे जणू काही
बिंदूंचे झाड आहे. आत्म्यांचे देखील नंबरवार झाड आहे. नंबरवार खाली यावे लागते.
परमात्मा देखील बिंदू आहेत. असे नाही की एवढे मोठे लिंग आहे. बाबा म्हणतात की तुम्ही
माझी मुले बनता, तर मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो, पहिले तुम्ही माझे बनता आणि
मग मी तुम्हाला शिकवतो. तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्ही तुमचे आहोत’. त्याच सोबत
शिकायचे देखील आहे. माझे बनलात आणि तुमचे शिक्षण सुरू झाले.
बाबा म्हणतात की, ‘हा
तुमचा अंतिम जन्म आहे, कमलपुष्प समान पवित्र बना’. मुले वायदा करतात - ‘बाबा, आम्ही
तुमच्याकडून वारसा घेण्यासाठी आता कधीही पतित बनणार नाही’. ६३ जन्म तर पतित बनले
आहात. ही ८४ जन्मांची कहाणी आहे. बाबा येऊन सोपे करून सांगतात. जसे लौकिक पिता
सांगतात ना. तर हे आहेत बेहदचे पिता. ते येऊन आत्म्यांशी बाळांनो-बाळांनो म्हणत
बोलतात. शिवरात्री देखील साजरी करतात ना. हा आहे अर्ध्या कल्पाचा दिवस आणि अर्ध्या
कल्पाची रात्र. आता आहे रात्रीचा शेवट आणि दिवसाच्या सुरुवातीचा संगम. भारत सतयुग
होता तर दिवस होता. सतयुग, त्रेताला ब्रह्माचा दिवस म्हटले जाते. तुम्ही ब्राह्मण
आहात ना. तुम्ही ब्राह्मण जाणता की आता आपली रात्र आहे. तमोप्रधान भक्ती आहे.
दारोदार धक्के खात राहतात, सर्वांची पूजा करत राहतात. तिवाट्याची देखील पूजा करतात.
मनुष्याच्या देहाची देखील पूजा करतात. संन्याशी लोक स्वतःला शिवोहम् म्हणत मांडी
घालून बसतात, तर मग माता जाऊन त्यांची पूजा करतात. बाबा (ब्रह्मा बाबा) खूप अनुभवी
आहेत. बाबा म्हणतात - ‘मी देखील खूप पूजा केली आहे. परंतु त्यावेळी ज्ञान तर नव्हते.
मनुष्यावर फळे अर्पण करत होतो, जल अर्पण करत होतो’. हा देखील धोका झाला ना. परंतु
हे सर्व तरीही होणार. भक्तांचा रक्षक भगवान कारण सर्वजण दुखी आहेत ना. बाबा समजावून
सांगत आहेत की, द्वापरपासून तुम्ही गुरु करत आला आहात आणि भक्तिमार्गामध्ये उतरतच
आला आहात. आजपर्यंत सुद्धा साधू लोक तर साधना करतच आहेत. बाबा म्हणतात की, त्यांचा
देखील मीच उद्धार करतो. संगमावर तुमची सद्गती होते; आणि पुन्हा मग तुम्ही ८४ जन्म
घेता. बाबांना म्हटले जाते ज्ञानाचा सागर, मनुष्य सृष्टीचे बीजरूप. सत् चित् आनंद
स्वरूप आहे. त्यांचा कधीही विनाश होत नाही, त्यांच्यामध्ये ज्ञान आहे. ज्ञानाचा
सागर, प्रेमाचा सागर आहेत, जरूर त्यांच्याकडून वारसा मिळाला पाहिजे. आता तुम्हा
मुलांना वारसा मिळत आहे. शिवबाबा आहेत ना. ते देखील बाबा आहेत, हा (ब्रह्मा) देखील
तुमचा पिता आहे; मग शिवबाबा ब्रह्मा द्वारे तुम्हाला शिकवितात. म्हणून प्रजापिता
ब्रह्मा कुमार-कुमारी म्हटले जाते. किती असंख्य बी.के. आहेत. म्हणतात की, आम्हाला
डाडेकडून (आजोबांकडून) वारसा मिळतो. मुले म्हणतात - बाबा आम्हाला नरकवासी पासून
स्वर्गवासी बनवत आहेत. म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर
तुमच्या डोक्यावर जे पापांचे ओझे आहे ते भस्म होईल. आणि मग तुम्ही सतोप्रधान बनाल.
तुम्ही खरे सोने, खरे दागिने होता’. आत्मा आणि शरीर दोन्ही सतोप्रधान होते. आत्मा
मग सतो, रजो, तमो होते तेव्हा मग शरीर देखील असे तमोगुणी मिळते. बाबा तुम्हा मुलांना
मत देतात की, मुलांनो, माझी आठवण करा. मला बोलावता ना की, ‘हे पतित-पावन या’. या
भारताचा प्राचीन राजयोग प्रसिद्ध आहे. तो आता तुम्हाला शिकवत आहेत की, माझ्याशी योग
ठेवा तर याने तुमच्यातील भेसळ भस्म होईल. जितकी आठवण कराल तितकी भेसळ निघत जाईल.
आठवणीचीच मुख्य गोष्ट आहे. नॉलेज तर बाबांनी दिले आहे - सतयुगामध्ये यथा राजा-राणी
तथा प्रजा सर्व पवित्र होते, आता सर्व पतित आहेत. बाबा म्हणतात की, यांच्या (ब्रह्मा
बाबांच्या) अनेक जन्मांतील अंतीम जन्मामध्ये मी प्रवेश करतो. याला म्हटले जाते
भाग्यशाली रथ. हे शिकून मग पहिल्या क्रमांकामध्ये जातात. नंबरवार तर बनतात ना. एक
नाव मुख्य असते. बाबांनी मुलांना ८४ जन्मांचे रहस्य चांगल्या रीतीने समजावून
सांगितले आहे. तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहात, ना की हिंदू धर्माचे.
तुमचे कर्म श्रेष्ठ, धर्म श्रेष्ठ होता. मग रावणाचा प्रवेश झाल्याने धर्म-कर्म
भ्रष्ट झाला आहात. स्वतःला देवी-देवता म्हणवून घेण्यात लाज वाटते म्हणून हिंदू नाव
ठेवले आहे. वास्तविक आदि सनातन देवी-देवता धर्माचे होता. तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत
मग पतित बनले आहात. ८४ चे चक्र भारतवासीयांसाठीच आहे. घरी परत जायचे तर सर्वांनाच
आहे. अगोदर तुम्ही जाल. जशी वरात जाते ना. शिवबाबांना साजन देखील म्हणतात. तुम्ही
सजणी यावेळी छी-छी तमोप्रधान आहात, त्यांना गुल-गुल (फूल) बनवून घेऊन जातील.
आत्म्यांना पावन बनवून घेऊन जातील. त्यांना लिबरेटर, गाईड म्हटले गेले आहे. बेहदचे
बाबा घेऊन जातात. त्यांचे नाव काय आहे? शिवबाबा. नाव शरीराला दिले जाते, परंतु
परमात्म्याचे नाव ‘शिव’ हेच आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकराचे तर सूक्ष्म शरीर आहे.
शिवबाबांना काही आपले शरीरच नाहीये. त्यांना शिवबाबाच म्हणतात. मुले म्हणतात - ‘ओ
मात-पिता आम्ही तुमची संतान बनलो आहोत’. बाकीचे तर बोलावत राहतात कारण त्यांना तर
माहीतच नाहीये. जर सर्वांना माहित झाले तर ठाऊक नाही काय होईल. दैवी झाडाचे आता कलम
लागत आहे. हिऱ्यापासून कवडी बनण्यासाठी ८४ जन्म लागतात. मग पुन्हा नव्याने सुरूवात
होईल. दुनियेचा इतिहास-भूगोल रिपीट होईल. बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्ही पूर्ण
८४ जन्म घेतले आहेत. ८४ लाख काही असू शकत नाहीत. ही खूप मोठी चूक आहे. ८४ लाख जन्म
समजल्या कारणाने कल्पाचा कालावधी लाखो वर्षे सांगितला आहे. भारत आता झूठ खंड आहे,
सचखंडामध्ये तुम्ही कायमचे सुखी होता. यावेळी तुम्ही २१ जन्मांचा वारसा घेत आहात.
सर्व आधार तुमच्या पुरुषार्थावर आहे. राजधानीमध्ये जे पाहिजे ते पद घ्या, यामध्ये
जादू इत्यादीचा काही प्रश्नच नाही. होय, मनुष्या पासून देवता जरूर बनतात. ही तर
चांगली जादू आहे ना. तुम्ही सेकंदामध्ये ओळखता की आपण बाबांची संतान बनलो आहोत.
कल्प-कल्प बाबा आम्हाला स्वर्गाचे मालक बनवतात. अर्धाकल्प भटकत आला आहात, स्वर्गवासी
तर कोणीही झाला नाही. बाबा येऊन तुम्हा मुलांना लायक बनवत आहेत. बरोबर इथे महाभारत
लढाई लागली होती आणि राजयोग शिकवला होता. शिवबाबा म्हणतात की, मीच येऊन तुम्हाला
राजयोग शिकवतो, क्राइस्ट नाही. आता तुमचा अनेक जन्मांतील अंतिम जन्म आहे, गोंधळून
जाऊ नका. तुम्ही भारतवासी आहात. तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे; इतर धर्माचे काही
वैकुंठामध्ये येऊ शकत नाहीत. हा देखील ड्रामा अनादि चालत राहतो. कधी बनला, हे सांगू
शकत नाहीत. याचा अंत नाही. दुनियेचा इतिहास-भूगोल रिपीट होतो. हे आहे संगमयुग, छोटे
युग. शिखा आहे ब्राह्मणांची. बाबा तुम्हा ब्राह्मणांना देवता बनवत आहेत. तर
ब्रह्माची मुले जरूर बनावे लागेल. तुम्हाला वारसा मिळतो डाडेकडून (आजोबांकडून).
जोपर्यंत स्वतःला बी.के. समजत नाही तोपर्यंत वारसा कसा काय मिळणार. तरी देखील कोणी
थोडेफार ज्ञान ऐकतात तर साधारण प्रजेमध्ये येतील. यायचे तर जरूर आहे. शिवबाबा
ब्रह्मा द्वारे ब्राह्मण, देवता, क्षत्रिय धर्माची स्थापना करतात. गीता सोडून इतर
कोणतेही शास्त्र अर्थात धर्म ग्रंथ नाही. गीता आहेच सर्वोत्तम दैवी धर्माचे शास्त्र
ज्याद्वारे तीन धर्म स्थापन होतात. ब्राह्मण देखील इथेच बनायचे आहे. देवता देखील
इथेच बनणार आहेत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
प्रत्येकाच्या निश्चित ठरलेल्या पार्टला लक्षात घेऊन सदैव निश्चिंत राहायचे आहे. बनी
बनाई बन रही… ड्रामावर अडोल राहायचे आहे.
२) या छोट्याशा
संगमयुगावर बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. आठवणीच्या बळाद्वारे भेसळ काढून
स्वतःला कवडी पासून हिऱ्या समान बनवायचे आहे. गोड झाडाच्या सैपलिंगमध्ये जाण्याकरिता
लायक बनायचे आहे.
वरदान:-
एका बाबांच्या
आठवणीमध्ये सदैव मग्न राहून एकरस अवस्था बनविणारे साक्षी दृष्टा भव
आता असे पेपर येणार
आहेत जे संकल्प, स्वप्नामध्ये देखील नसतील. परंतु तुमची प्रॅक्टिस अशी असायला हवी
जसा हदचा ड्रामा साक्षी होऊन पाहिला जातो; मग तो वेदनादायक असेल नाहीतर हसविणारा
असेल, काहीच फरक पडत नाही. तसाच भले कोणाचा रमणिक पार्ट असेल, किंवा स्नेही
आत्म्याचा गंभीर पार्ट असेल… प्रत्येक पार्ट साक्षी दृष्टा होऊन पहा, एकच अवस्था
असावी. परंतु अशी अवस्था तेव्हा राहील जेव्हा सदैव एका बाबांच्या आठवणीमध्ये मग्न
असाल.
बोधवाक्य:-
दृढ निश्चयाने
आपल्या भाग्याला निश्चित करा तेव्हाच नेहमी निश्चिंत रहाल.
हे अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
कर्म करण्यापूर्वी हा
निश्चय ठेवा की विजय तर आपला झालेलाच आहे. अनेक कल्प आपण विजयी बनलो आहोत. जेव्हा
अनेक कल्प, अनेक वेळा विजयी बनून विजयी माळेमध्ये ओवले जाणारे, पूजनीय बनलो आहोत,
तर आता पुन्हा तेच फक्त रिपीट करायचे आहे. पूर्वी केलेले कर्म पुन्हा रिपीट करायचे
आहे; म्हणून म्हटले जाते की, ‘बना बनाया…’ पूर्वी केलेले आहे परंतु त्याला आता
पुन्हा रिपीट करून ‘बना बनाया’ ही जी म्हण आहे त्याला पूर्ण करायचे आहे.