20-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“मीठे बच्चे - आता मूठभर चण्यांच्या मागे आपला वेळ वाया घालवू नका, आता बाबांचे मदतगार बनून बाबांचे नाव प्रसिद्ध करा”

प्रश्न:-
या ज्ञान मार्गामध्ये तुमचे पाऊल पुढे पडत आहे त्याचे लक्षण कोणते आहे?

उत्तर:-
ज्या मुलांना शांतीधाम आणि सुखधामची कायम आठवण असते. आठवण करताना बुद्धी कुठेही भटकत नाही, बुद्धीमध्ये व्यर्थ विचार येत नाहीत, बुद्धी एकाग्र आहे, डुलकी येत नाही, आनंदाचा पारा चढलेला असतो तर यावरून सिद्ध होते कि पाऊल पुढे पडत आहे.

ओम शांती।
मुले इतका वेळ इथे बसली आहेत. मनामध्ये देखील येते कि आपण जसे शिवालयामध्ये बसलो आहोत. शिवबाबांची देखील आठवण येते. स्वर्गाची सुद्धा आठवण येते. आठवण केल्यानेच सुख मिळते. हे देखील बुद्धीमध्ये लक्षात राहिले की, आपण शिवालयामध्ये बसलो आहोत तरी देखील आनंद होईल. शेवटी जायचे तर सर्वांना आहे शिवालयामध्ये. शांतीधाममध्ये काही कोणाला बसून रहायचे नाही आहे. खरे तर शांतीधामला देखील शिवालय म्हटले जाईल, सुखधामला देखील शिवालय म्हटले जाईल. दोन्ही स्थापन करतात. तुम्हा मुलांनी आठवण देखील दोघांचीही करायची आहे. ते शिवालय आहे शांतीसाठी आणि ते शिवालय आहे सुखासाठी. हे आहे दुःखधाम. आता तुम्ही संगमावर बसले आहात. शांतीधाम आणि सुखधामाशिवाय इतर कशाचीही आठवण राहता कामा नये. भले कुठेही बसले असाल, कामधंदा इत्यादीमध्ये जरी असाल तरीही बुद्धीमध्ये दोन्ही शिवालये आठवली पाहिजेत. दुःख-धामला विसरायचे आहे. मुले जाणतात कि, हे वेश्यालय, दुःखधाम आता नष्ट होणार आहे.

इथे बसून तुम्हा मुलांना डुलकी इत्यादी सुद्धा येता कामा नये. बऱ्याच जणांची बुद्धी इतरत्र कुठे-कुठे फिरत राहते. मायेची विघ्ने येतात. तुम्हा मुलांना बाबा वरचेवर सांगतात - मुलांनो, मनमनाभव. वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या देखील सांगतात. इथे बसलेले आहात तर बुद्धीमध्ये याची आठवण करा कि, आम्ही पहिले शांतीधाम शिवालयामध्ये जाणार नंतर मग सुखधाममध्ये येणार. अशी आठवण केल्याने पापे नष्ट होत जातील. जितकी तुम्ही आठवण करता तितके अजून पाऊल पुढे जाता. इथे दुसऱ्या कोणत्याही विचारांमध्ये बसायचे नाही. नाहीतर तुम्ही इतरांचे नुकसान करता. फायदा होण्याऐवजी अजूनच नुकसान करता. पूर्वी जेव्हा बसत होते तेव्हा समोर कोणालातरी चेक करण्यासाठी बसवले जात असे कि कोण डुलकी काढतात, कोण डोळे बंद करून बसतात, तर खूप सावध असायचे. बाबा देखील पहायचे कि, यांचा बुद्धियोग कुठे भटकत आहे का किंवा डुलकी काढतात का? असे देखील बरेच येतात कि जे काहीच समजत नाहीत. ब्राह्मणी घेऊन येतात. शिवबाबांसमोर खूप चांगली मुले पाहिजेत, तर गाफील राहू नये कारण हे कोणी ऑर्डीनरी टीचर नाहीत. बाबा बसून शिकवत आहेत. इथे अतिशय सावध होऊन बसले पाहिजे. बाबा १५ मिनटे शांतीमध्ये बसवतात. तुम्ही तर तास-दोन तास बसता. सर्वच काही महारथी नाही आहेत. जे कच्चे आहेत त्यांना सावधान करायचे आहे. सावध केल्याने जागृत होतात. जे आठवणीमध्ये राहत नाहीत, व्यर्थ विचार करत राहतात ते जसे काही विघ्न आणतात कारण त्यांची बुद्धी कुठे ना कुठे भटकत असते. महारथी, घोडेस्वार, प्यादे सर्व इथे बसले आहेत.

बाबा आज विचार सागर मंथन करून आले होते - म्युझीयममध्ये अथवा प्रदर्शनीमध्ये तुम्ही मुले जे शिवालय, वेश्यालय आणि पुरुषोत्तम संगमयुग तिन्ही विषयी सांगता, हे समजावून सांगण्यासाठी खूप चांगले आहे. हि चित्रे भली मोठी बनविली पाहिजेत. यासाठी सर्वात चांगला मोठा हॉल असायला हवा, जेणेकरून मनुष्यांच्या बुद्धीमध्ये पटकन बसेल. मुलांचे चिंतन चालले पाहिजे कि, आपण यामध्ये अजून काय सुधारणा करू शकतो. पुरुषोत्तम संगमयुग खूप छान बनवले पाहिजे. यामुळे मनुष्यांना खूप चांगले स्पष्टीकरण मिळू शकेल. तपस्येमध्येपण तुम्ही ५-६ जणांना बसवता परंतु नाही, १०-१५ जणांना तपस्येमध्ये बसवले पाहिजे. मोठ-मोठी चित्रे बनवून स्पष्ट शब्दांमध्ये लिहिले पाहिजे. तुम्ही इतके समजावून सांगता तरी देखील समजतात थोडेच. तुम्ही समजावून सांगण्यासाठी मेहनत करता, पत्थर बुद्धी आहेत ना. तर जितके होऊ शकेल तितके चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले पाहिजे. जे सेवेमध्ये असतात त्यांनी सेवा वाढविण्याचा विचार केला पाहिजे. प्रोजेक्टर, प्रदर्शनीमध्ये इतकी मजा येत नाही, जितकी म्युझियममध्ये आहे. प्रोजेक्टर वरून तर त्यांना काहीच कळत नाही. सर्वात चांगले आहे म्युझियम, भले छोटे असेल. एका रूममध्ये तर हे शिवालय, वेश्यालय आणि पुरुषोत्तम संगमयुगाचा सिन असला पाहिजे. समजावून सांगण्यासाठी खूप विशाल बुद्धी पाहिजे.

बेहदचे बाबा बेहदचे टीचर आलेले आहेत तर बसून थोडेच राहणार कि मुले एम.ए. बी.ए. पास होऊ दे. बाबा बसून थोडेच राहणार. थोड्या वेळाने निघूनही जातील. खूप कमी वेळ शिल्लक आहे तरीही मुले जागी होत नाहीत. चांगल्या-चांगल्या ज्या मुली असतील त्या म्हणतील कि या चार-पाचशे रुपयांसाठी आम्ही फुकट आमचा वेळ वाया का घालवावा. मग शिवालयामध्ये आम्हाला पद ते काय मिळणार! बाबा बघतात कि, कुमारी तर फ्री आहेत. भले कितीही मोठा पगार असेल, तरीही हे तर जसे मूठीमध्ये चणे आहेत, हे सगळे नष्ट होणार आहे. काहीही राहणार नाही. बाबा आता चण्याच्या मुठी सोडवायला आले आहेत परंतु सोडतच नाहीत. त्यामध्ये (जुन्या दुनियेमध्ये) आहे मूठभर चणे आणि यामध्ये आहे विश्वाची बादशाही. ते तर दीड-दमडीचे चणे आहेत त्याच्यामागे किती हैराण होत आहेत. कुमारी तर फ्री आहेत. ते शिक्षण तर दीड-दमडीचे आहे. ते सोडून हे नॉलेज घ्याल तर बुद्धी देखील चमकेल. छोट्या-छोट्या मुली बसून असे जर मोठ-मोठ्यांना शिकवू लागल्या कि, बाबा आलेले आहेत - शिवालयाची स्थापना करण्यासाठी. हे तर जाणता कि इथले सर्वकाही मातीमोल होणार आहे. हे चणे सुद्धा नशीबी येणार नाहीत. कोणाच्या मुठीमध्ये पाच चणे अर्थात पाच लाख असतील, ते देखील नष्ट होतील. आता वेळ फार कमी आहे. दिवसेंदिवस हालत खूप खराब होत जात आहे. अचानक संकटे येतात. मृत्यू देखील अचानक होत राहतात. मुठीमध्ये चणे असताना देखील (पैसा असताना देखील) प्राण शरीरातून निघून जातो. तर मनुष्यांना या मर्कटपणातून सोडवायचे आहे. फक्त म्युझीयम पाहून खुश व्हायचे नाही, कमाल (चमत्कार) करून दाखवायची आहे. मनुष्यांना सुधारायचे आहे. बाबा तुम्हा मुलांना विश्वाची बादशाही देत आहेत बाकी तर घुगरे (चणेसुद्धा) कोणाच्या नशिबी असणार नाहीत. सगळे नष्ट होणार, यापेक्षा मग का नाही बाबांकडून बादशाही घ्यावी? काही त्रासाची गोष्ट नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे, आणि स्वदर्शन चक्र फिरवायचे आहे. चण्यांची मूठ खाली करून हिरे-माणकांनी मूठ भरून जायचे आहे.

बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, या मूठभर चण्यामागे तुम्ही आपला वेळ वाया का घालवत आहात? हो, जर कोणी वृद्ध आहे, खूप मुले-बाळे आहेत तर त्यांना सांभाळावे लागते. कुमारींसाठी तर खूप सोपे आहे, कोणीही आले तर त्यांना समजावून सांगा कि, ‘बाबा आम्हाला ही बादशाही देत आहेत. तर बादशाही घेतली पाहिजे ना.’ आता तुमची मूठ हिऱ्यांनी भरत आहे. बाकी तर सर्व विनाश होणार आहे. बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुम्ही ६३ जन्म पापे केलेली आहेत. दुसरे पाप आहे बाबांची आणि देवतांची निंदा करणे. विकारी सुद्धा बनलात आणि शिव्या देखील दिल्या आहेत. बाबांची किती निंदा केली आहे. बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, वेळ वाया घालवू नका’. असे नाही, कि बाबा, आम्ही आठवण करू शकत नाही. असे बोला - बाबा, मी स्वत:ला आत्मा म्हणून आठवण करू शकत नाही. स्वतःला विसरून जातो. देह-अभिमानामध्ये येणे म्हणजे जणू स्वतःला विसरणे आहे. स्वतःला आत्मा म्हणून आठवण करू शकत नसाल तर बाबांची कशी आठवण कराल. खूप मोठे ध्येय आहे. खूप सहज देखील आहे. बाकी हो, मायेचा विरोध होतो.

मनुष्य गीता इत्यादी वाचतात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. भारताची मुख्य आहेच गीता. प्रत्येक धर्माचे आपापले शास्त्र आहे. जे धर्म स्थापन करणारे आहेत त्यांना सद्गुरू म्हणू शकत नाही. हि मोठी चूक आहे. सद्गुरू तर एकच आहे, बाकी गुरु म्हणवून घेणारे तर भरपूर आहेत. कोणी सुताराचे काम शिकवले कोणी इंजिनिअरचे काम शिकवले तर तो देखील गुरु झाला. शिकविणारा प्रत्येकजण गुरु असतो, सद्गुरू एकच आहे. आता तुम्हाला सद्गुरू मिळाला आहे, तो सत्य पिता देखील आहे, तर सत्य शिक्षक सुद्धा आहे म्हणून मुलांनी जास्त चुका करता कामा नयेत. इथून चांगले रिफ्रेश होऊन जातात (चार्ज होऊन जातात) आणि मग घरी गेल्यानंतर इथले सगळे विसरून जातात. गर्भ-जेलमध्ये खूप सजा भोगाव्या लागतात. तिथे तर गर्भ-महाल असतो. कोणतेही विकर्म होत नाही ज्यामुळे सजा भोगावी लागेल. इथे तुम्ही मुले समजता कि आपण बाबांकडून सन्मुख शिकत आहोत. बाहेर आपल्या घरी तर असे म्हणणार नाही. तिथे समजतील कि भाऊ शिकवतात. इथे तर डायरेक्ट बाबांकडे आलो आहोत. बाबा मुलांना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. बाबांच्या आणि मुलांच्या स्पष्टीकरणामध्ये फरक पडतो. बाबा मुलांना सावध करतात. ‘बाळांनो-बाळांनो’ असे म्हणून समजावून सांगतात. तुम्ही शिवालय आणि वेश्यालयाला समजता, हि तर बेहदची गोष्ट आहे. हे स्पष्ट करून दाखवा तर लोकांना थोडी मजा येईल. तिथे तर असे गमतीजमती मध्ये समजावून सांगता, गांभीर्याने समजावून सांगाल तर चांगल्या प्रकारे समजतील. स्वतःवर दया करा, कि या वेश्यालयामधेच रहायचे आहे! बाबांचे विचार तर चालतात ना - कि कशाप्रकारे सांगायचे. मुले किती मेहनत करतात तरीही जसे डब्यात माती (डोक्यात काहीही गेलेले नाही). हा-हा करत राहतात, खूप छान आहे, गावामध्ये सांगितले पाहिजे. त्यांना स्वतःलाच समजलेले नसते. श्रीमंत पैसेवाले लोक तर समजणार देखील नाहीत. अजिबात लक्षच देणार नाहीत. ते शेवटीच येतील. मग तर टू लेट होणार. ना त्यांचे धन कामी येणार. ना योगामध्ये राहू शकणार. बाकी हो, ऐकतील तर प्रजेमध्ये जरूर येतील. गरीब खूप उच्च पद मिळवू शकतात. तुम्हा कन्यांकडे काय आहे. कन्येला गरीब म्हटले जाते कारण पित्याचा वारसा तर मुलाला मिळतो. बाकी कन्या-दान दिले जाते, तेव्हा ती विकारामध्ये जाते. तिला म्हणतील - ‘लग्न कर तर पैसे देऊ. पवित्र रहायचे असेल तर एक पैसा सुद्धा देणार नाही’. मनोवृत्ती पहा कशी आहे. तुम्ही कोणालाही घाबरू नका. उघडपणे समजावून सांगितले पाहिजे. तत्पर असले पाहिजे. तुम्ही तर एकदम सत्य सांगत आहात. हे आहे संगमयुग. त्या बाजूला आहे मुठभर चणे, या बाजूला आहे हिऱ्यांनी भरलेली मुठ. आता तुम्ही बंदर पासून मंदिर लायक बनत आहात. पुरुषार्थ करुन हिऱ्यासमान जन्म घेतला पाहिजे ना. चेहरा देखील बहाद्दूर वाघिणी सारखा असायला हवा. काहींचा चेहरा तर एकदम मेंढी-बकरी सारखा असते. थोड्याशा आवाजाने घाबरून जातील. तर बाबा सर्व मुलांना सावध करतात. कन्यांनी तर बंधनामध्ये अडकायचे सुद्धा नाही. अजूनच बंधनामध्ये अडकलात तर विकारासाठी मार खाल. ज्ञान चांगल्या रीतीने धारण कराल तर विश्वाची महाराणी बनाल. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला विश्वाची बादशाही देण्यासाठी आलो आहे’. परंतु काहींच्या नशिबात नाही आहे. बाबा आहेत गरीब निवाज (गरिबांचा कैवारी). गरीब आहेत कन्या. आई-वडील लग्न लावून देऊ शकत नसतील तर ते देऊन टाकतात. तर त्यांना नशा चढला पाहिजे कि आपण चांगल्या प्रकारे शिकून पद तर मिळवूया. चांगले विद्यार्थी जे असतात ते अभ्यासावर लक्ष देतात की आपण पास विद ऑनर व्हावे. त्यांनाच मग शिष्यवृत्ती मिळते. जितका पुरुषार्थ कराल तितके उच्च पद प्राप्त कराल, ते देखील २१ जन्मांसाठी. इथे आहे अल्पकाळाचे सुख. आज काही चांगले पद आहे आणि उद्या मृत्यू आला, संपले. ‘योगी’ आणि ‘भोगी’मध्ये फरक तर आहे ना. तर बाबा म्हणतात - गरिबांकडे विशेष लक्ष द्या. श्रीमंत फार मुश्कीलीने ज्ञान घेतील. केवळ म्हणतात - खूप छान आहे. हि संस्था खूप चांगली आहे, अनेकांचे कल्याण करेल. आपले काहीच कल्याण करत नाहीत. खूप छान म्हटले, बाहेर गेले आणि खल्लास. माया दांडका घेऊनच बसली आहे, जी हिम्मतच नाहीशी करते. एकच थप्पड लावल्याने, बुद्धीच भ्रष्ट करते. बाबा समजावून सांगत आहेत - भारताचे काय हाल झाले आहेत पहा. मुलांनी ड्रामाला तर चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. अच्छा !

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. या दुःखधामला विसरून शिवालय अर्थात शांतीधाम, सुखधामची आठवण करायची आहे. मायेच्या विघ्नांना ओळखून त्यापासून सावध रहायचे आहे.

वरदान:-
गीतेचा पाठ शिकणारे आणि इतरांना शिकविणारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप भव गीता ज्ञानाचा पहिला पाठ आहे - ‘अशरीरी आत्मा बना’ आणि अंतिम पाठ आहे - ‘नष्टोमोहा स्मृती स्वरूप बना’. पहिला पाठ आहे - विधी आणि अंतिम पाठ आहे - विधी द्वारे सिद्धी. तर प्रत्येक वेळेला पहिले स्वतः हा पाठ वाचा आणि मग इतरांना शिकवा. असे श्रेठ कर्म करून दाखवा जेणे करून तुमच्या श्रेष्ठ कर्मांना पाहून अनेक आत्मे श्रेष्ठ कर्म करून आपल्या भाग्याची रेषा श्रेष्ठ बनवू शकतील.

बोधवाक्य:-
परमात्म स्नेहामध्ये सामावून रहा तर मेहनती पासून मुक्त व्हाल.