20-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - माया रावणाच्या संगतीमध्ये येऊन तुम्ही भरकटले आहात, पवित्र रोपटी अपवित्र बनले आहात, आता पुन्हा पवित्र बना”

प्रश्न:-
प्रत्येक मुलाला आपल्या विषयी कोणते आश्चर्य वाटते? बाबांना मुलांच्या बाबतीत कोणते आश्चर्य वाटते?

उत्तर:-
मुलांना आश्चर्य वाटते की आपण कोण होतो, कोणाची मुले होतो, अशा बाबांकडून आम्हाला वारसा मिळाला होता, त्या बाबांनाच आम्ही विसरून गेलो. रावण आला आणि इतकी धुंदी आली की रचयिता आणि रचना सर्वकाही विसरून गेलो. बाबांना मुलांविषयी आश्चर्य वाटते की, ज्या मुलांना मी इतके उच्च बनविले, राज्य-भाग्य दिले, तीच मुले आता माझी निंदा करू लागले. रावणाच्या संगती मध्ये येऊन तुम्ही सर्व काही गमावलेत.

ओम शांती।
कसला विचार करत आहात? नंबरवार पुरुषार्था नुसार प्रत्येकाची जीव-आत्मा आता आपल्याच बाबतीत आश्चर्य करत आहे की आम्ही कोण होतो, कोणाची मुले होतो आणि खरोखर बाबांकडून वारसा मिळाला होता, परंतु आपण कसे काय विसरून गेलो! आम्ही सतोप्रधान दुनियेमध्ये संपूर्ण विश्वाचे मालक होतो, खूप सुखी होतो. मग आम्ही शिडी खाली उतरलो (अधोगतीला सुरुवात झाली). रावण आला त्यामुळे इतकी धुंदी आली की रचता आणि रचनेलाच आम्ही विसरून गेलो. धुंदीमध्ये मनुष्य रस्ता इत्यादी विसरून जातो ना. तर आम्ही सुद्धा विसरून गेलो - आमचे घर कुठे आहे, कुठले राहणारे होतो. आता बाबा बघत आहेत की माझी मुले, ज्यांना मी आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी राज्य-भाग्य देऊन गेलो होतो, खूप आनंदात, मजेमध्ये होती, आणि आता ही धरणी काय झाली आहे! कसे रावणाच्या राज्यामध्ये आले! परक्या राज्यामध्ये तर जरूर दुःखच मिळणार ना. तुम्ही किती भटकलात! अंधश्रद्धेने बाबांना शोधत राहिलात परंतु बाबा मिळाले का. ज्यांना दगड-धोंड्यामध्ये टाकून दिले ते मग मिळणार तरी कसे. अर्धा कल्प तुम्ही भटकून-भटकून जसे निराश झालात. स्वतःच्याच अज्ञान वश रावण राज्यामध्ये तुम्ही किती दुःख झेलले. भारत आता भक्तिमार्गामध्ये किती गरीब झाला आहे. बाबा मुलांकडे पाहतात तेव्हा विचार करतात की भक्ति मार्गामध्ये किती भटकले आहेत! अर्धा कल्प भक्ती केली आहे, कशासाठी? भगवंताला भेटण्यासाठी. भक्ती नंतरच भगवंत फळ देतात. काय फळ देतात? ते तर कोणीही जाणत नाही, अगदीच बुद्धू बनले आहेत. या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये आल्या पाहिजेत - आपण कोण होतो, मग कसे राज्य-भाग्य उपभोगले, मग कसे शिडी खाली उतरता-उतरता रावणाच्या बेड्यांमध्ये जखडले गेलो. अपरंपार दुःख होते. सर्व प्रथम तुम्ही अपरंपार सुखामध्ये होता. तर मनामध्ये आले पाहिजे की, आपल्या राज्यामध्ये किती सुख होते आणि मग परक्या राज्यामध्ये किती दुःख झेलले. जसे ते लोक (दुनियावाले) समजतात इंग्रजांच्या काळामध्ये आम्ही खूप दुःख झेलले आहे. आता तुम्ही बसले आहात, मनामध्ये हा विचार यायला हवा की, आपण कोण होतो, कोणाची मुले होतो? बाबांनी आम्हाला साऱ्या विश्वाचे राज्य दिले मग कसे आपण रावण राज्यामध्ये जखडले गेलो. किती दुःख पाहिले, किती घाणेरडी कर्म केली. सृष्टीची दिवसेंदिवस अधोगतीच झाली. मनुष्यांचे संस्कार दिवसेंदिवस क्रिमिनल (विकारी) होत गेले. तर मुलांना हे लक्षात आले पाहिजे. बाबा बघतात की ही पवित्र रोपटी होती, ज्यांना राज्य-भाग्य दिले होते ते मग माझ्या ऑक्युपेशनलाच (कार्य प्रणालीलाच) विसरून गेले. आता पुन्हा तुम्हाला तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनण्याची इच्छा आहे तर मज पित्याची आठवण करा तर सर्व पापे भस्म होतील. परंतु आठवण देखील करू शकत नाहीत, वारंवार म्हणतात - बाबा, आम्ही विसरून जातो. अरे, तुम्ही आठवण केली नाही तर पापे कशी भस्म होतील? एक तर तुम्ही विकारामध्ये जाऊन पतित बनलात आणि दुसरे मग बाबांना शिव्या देऊ लागलात. मायेच्या संगतीमुळे तुम्ही इतके खाली गेलात (पतन झाले) की ज्याने तुम्हाला आकाशात चढविले त्यालाच दगड-धोंड्यामध्ये घेऊन गेलात. मायेच्या संगतीमुळे तुम्ही असे काम केले आहे! लक्षात आले पाहिजे ना. अगदीच पत्थर-बुद्धी तर बनायचे नाहीये. बाबा रोज-रोज म्हणतात - ‘मी एकदम फर्स्टक्लास पॉईंट्स तुम्हाला ऐकवतो’.

जसे मुंबईमध्ये एखादा ग्रुप आला तर त्यामध्ये सांगू शकता की बाबा म्हणतात - ‘हे भारतवासींनो, तुम्हाला मी राज्य-भाग्य दिले होते. तुम्ही देवता स्वर्गामध्ये होता मग तुम्ही रावण राज्यांमध्ये कसे आलात, हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. तुम्ही रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंतला समजून घ्या तेव्हाच उच्च पद प्राप्त करू शकाल; आणि माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. भले इथे सर्व बसले आहेत तरी देखील कोणाची बुद्धी कुठे, तर कोणाची बुद्धी कुठे आहे. बुद्धीमध्ये आले पाहिजे - आम्ही कुठे होतो, आता आम्ही परक्या रावण राज्यामध्ये येऊन पडलो आहोत, तर किती दुःखी झालो आहोत. आपण शिवालयामध्ये तर खूप सुखी होतो. आता बाबा आले आहेत वेश्यालयामधून बाहेर काढण्यासाठी, तरी सुद्धा निघतच नाहीत. बाबा म्हणतात तुम्ही शिवालयामध्ये जाल मग तिथे हे विष (विकार) मिळणार नाही. इथले घाणेरडे खाणे-पिणे मिळणार नाही. हे तर विश्वाचे मालक होते ना. मग कुठे गेले? पुन्हा आपले राज्य-भाग्य घेत आहेत. किती सोपे आहे. हे तर बाबा समजावून सांगत आहेत - सगळेच काही सेवाभावी असणार नाहीत. नंबरवार राजधानी स्थापन करायची आहे, जशी ५००० वर्षांपूर्वी केली होती. सतोप्रधान बनायचे आहे; बाबा म्हणतात - ही आहे तमोप्रधान जुनी दुनिया. जेव्हा पूर्णतः जुनी होईल तेव्हाच तर बाबा येतील ना. बाबांशिवाय तर इतर कोणीही हे समजावून सांगू शकणार नाही. भगवंत या रथाद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) आम्हाला शिकवत आहेत, ही जरी आठवण राहिली तरी देखील बुद्धीमध्ये ज्ञान राहील. आणि मग इतरांना सांगून आप समान सुद्धा बनवतील. बाबा समजावून सांगत आहेत - ‘आधी तर तुमचे क्रिमिनल कॅरेक्टर्स (विकारी स्वभाव) होते, जे मुश्किलीने सुधारतात’. दृष्टीतील विकारीपणा जातच नाही. एकतर काम वासनेचा विकारीपणा तो तर मुश्किलीनेच सुटतो आणि मग सोबत पाच विकार तर आहेतच. क्रोधाचा विकार सुद्धा किती आहे. बसल्या-बसल्या भूत चढते. हा देखील विकारीपणा झाला. सिव्हिलाइज् (सभ्यपणा) तर झाला नाही. परिणाम काय होणार! १०० पटीने पाप चढेल. घडोघडी क्रोध येत राहील. बाबा समजावून सांगत आहेत तुम्ही आता रावण राज्यामध्ये तर नाही आहात ना. तुम्ही तर ईश्वरा सोबत बसलेले आहात. तर या विकारांमधून मुक्त होण्याची प्रतिज्ञा करायची आहे. बाबा म्हणतात - ‘आता माझी आठवण करा. क्रोध करू नका. अर्धा कल्प ५ विकार तुम्हाला खाली आणत आले आहेत. सर्वात उच्च देखील तुम्हीच होता. सर्वात जास्त खाली आलेले (पतन झालेले) देखील तुम्हीच आहात. या ५ भुतांनी (विकारांनी) तुम्हाला खाली पाडले आहे. आता शिवालयामध्ये जाण्यासाठी या विकारांना काढून टाकायचे आहे. या वेश्यालयामधून आपल्या मनाला विरक्त करत जा. बाबांची आठवण करा तर अंत मती सो गती होईल. तुम्ही घरी (शांतीधामला) पोहोचाल दुसरे कोणी हा मार्ग सांगू शकणार नाही. भगवानुवाच, मी तर कधीच सांगितले नाही की मी सर्वव्यापी आहे. मी तर राजयोग शिकवला आणि म्हटले तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो मग तिथे (सतयुगामध्ये) तर या ज्ञानाची गरजच राहत नाही. मनुष्यापासून देवता बनता, तुम्ही वारसा प्राप्त करता. यामध्ये हठयोग इत्यादीची काही गोष्टच नाही. स्वतःला आत्मा समजा, स्वतःला शरीर का समजता. शरीर समजल्यामुळे मग ज्ञान आत्मसात करू शकत नाही. ही देखील भावी आहे. तुम्ही समजता, आम्ही रावण राज्यामध्ये होतो, आता राम राज्यामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. आता आम्ही पुरुषोत्तम संगमयुगवासी आहोत.

भले गृहस्थीमध्ये रहा. इतके सगळे इथे (सेंटरवर) कुठे राहणार. ब्राह्मण बनून सर्व इथे ब्रह्माजवळ (मधुबनमध्ये) सुद्धा राहू शकत नाहीत. रहायचे सुद्धा आपल्या घरीच आहे आणि बुद्धीने समजायचे आहे - आम्ही शूद्र नाही, आम्ही ब्राह्मण आहोत. ब्राह्मणांची शिखा किती छोटी आहे. तर गृहस्थ व्यवहारामध्ये राहताना, शरीर निर्वाहासाठी कामधंदा इत्यादी करत असताना फक्त बाबांची आठवण करा. आपण कोण होतो, आता आम्ही परक्या राज्यामध्ये बसलो आहोत. आम्ही किती दुःखी होतो. आता बाबा आम्हाला पुन्हा घेऊन जात आहेत तर गृहस्थ व्यवहारामध्ये राहून ती अवस्था प्राप्त करायची आहे. सुरुवातीला किती मोठी-मोठी झाडे (महारथी) आली, मग त्यांच्यामधील कोणी राहिली, बाकीची निघून गेली. तुमच्या बुद्धीमध्ये आहे आम्ही आमच्या राज्यामध्ये होतो आणि आता कुठे येऊन पडलो आहोत. पुन्हा आपल्या राज्यामध्ये जाणार. तुम्ही लिहिता, म्हणता ‘बाबा, अमका खूप चांगला नियमित होता पण आता येत नाही’. येत नाही म्हणजे जणू विकारामध्ये पडला. मग ज्ञानाची धारणा होऊ शकत नाही. उन्नती होण्याऐवजी अधोगती होऊन दीड-दमडीचे पद प्राप्त करतील. कुठे राजा, कुठे नीच पद! भले सुख तर तिथे (सतयुगामध्ये) आहेच परंतु पुरुषार्थ केला जातो उच्च पद प्राप्त करण्यासाठी. उच्च पद कोण प्राप्त करू शकतात? हे तर सर्व समजू शकतात, आता सर्व पुरुषार्थ करत आहेत. भोपाळचे राजा महेंद्र सुद्धा पुरुषार्थ करत आहेत. ते राजा तर दीड-दमडीचे आहेत, हे तर सूर्यवंशी राजधानीमध्ये जाणारे आहेत. पुरुषार्थ असा असावा जेणेकरून विजयी माळेमध्ये येऊ शकेल. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - ‘स्वतःला आतून चेक करत रहायचे आहे - माझी दृष्टी कुठे क्रिमिनल (विकारी) तर होत नाही ना? जर सिविलाईज (पवित्र) होईल तर आणखी काय पाहिजे?’ भले विकारामध्ये जाणार नाहीत परंतु डोळे काही ना काही धोका देत राहतात. नंबरवन आहे काम विकार, क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) अतिशय खराब आहे म्हणूनच नाव सुद्धा आहे क्रिमिनल आईज्, सिव्हिल-आईज् (विकारी दृष्टी, पवित्र दृष्टी). बेहदचे बाबा मुलांना जाणतात तर खरे ना - हे काय कर्म करतात, किती सेवा करतात? अमक्याची विकारी दृष्टी अजून पर्यंत गेलेली नाही, अजून पर्यंत असे गुप्त समाचार येतात. पुढे जाऊन आणखी अचूक लिहितील. स्वतः सुद्धा अनुभव करतील आम्ही तर इतका वेळ खोटे बोलत आलो, पतन होत राहिले. ज्ञान व्यवस्थित बुद्धीमध्ये पक्के बसले नव्हते. हेच कारण होते ज्यामुळे माझी अवस्था बनली नाही. बाबांपासून मी लपवत होतो. असे बरेचजण लपवतात. सर्जन पासून ५ विकारांचा आजार लपवायचा नाही, खरे सांगायला हवे की, ‘माझी बुद्धी या बाजूला जाते, शिवबाबांकडे जात नाही’. सांगत नाहीत त्यामुळे तो (विकार) वाढत जातो. आता बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, देही-अभिमानी बना, स्वतःला आत्मा समजा. आत्मा भाऊ-भाऊ आहे. तुम्ही किती सुखी होता जेव्हा पूज्य होता. आता तुम्ही पुजारी दुःखी बनले आहात. तुम्हाला काय झाले आहे!’ सर्वजण म्हणतात हा गृहस्थ आश्रम तर परंपरेने चालत आला आहे. राम-सीतेला मुले नव्हती का! परंतु तिथे (सतयुग-त्रेतामध्ये) मुले विकारातून होत नाहीत. अरे, ती तर आहेच संपूर्ण निर्विकारी दुनिया. तिथे भ्रष्टाचारातून जन्म होत नाही, विकारच नव्हता. तिथे हे रावण राज्य असतच नाही, ते तर रामराज्य आहे. तिथे रावण कुठून येणार. मनुष्यांची बुद्धी एकदमच रिकाम्या खात्यामध्ये गेली आहे. कोणी केली? मी तर तुम्हाला सतोप्रधान बनवले होते, तुमचा बेडा (जीवन रुपी नाव) पार केला होता; मग तुम्हाला तमोप्रधान कोणी बनवले? रावणाने. हे देखील तुम्ही विसरले आहात. म्हणतात की हे तर परंपरेनेच चालत आले आहे; अरे, परंपरा कधी पासून? काही हिशोब तर सांगा. काहीही समजत नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुम्हाला किती राज्य-भाग्य देऊन गेलो. तुम्ही भारतवासी अतिशय आनंदामध्ये होता, दुसरे कोणीही नव्हते. ख्रिश्चन सुद्धा म्हणतात पॅराडाईज होता, देवतांची चित्रे सुद्धा आहेत, त्यांच्यापेक्षा जुनी चीज तर कुठली नाहीये. सर्वात जुने हे लक्ष्मी-नारायण असतील किंवा यांची कुठली वस्तू असेल. सर्वात जास्त जुना आहे श्रीकृष्ण. सर्वात नवीन सुद्धा श्रीकृष्णच होता. जुना का म्हणतो? कारण होऊन गेला आहे ना. तुम्हीच गोरे होता मग सावळे बनलात. सावळ्या कृष्णाला पाहून देखील खूप आनंदीत होतात. झोपाळ्यावर सुद्धा सावळ्या कृष्णाला झुलवतात. त्यांना (भक्ति वाल्यांना) काय माहित की गोरा केव्हा होता. कृष्णावर किती प्रेम करतात! राधेने काय केले?

बाबा म्हणतात - तुम्ही इथे सत् च्या संगामध्ये बसलेले आहात, बाहेर कुसंगतीमध्ये गेल्यावर मग विसरून जाता. माया अतिशय प्रबळ आहे. हत्तीला मगर गिळंकृत करून टाकते. असे देखील आहेत - आता पळाले की पळाले. थोडा जरी स्वतःचा अहंकार आला तर आणखीनच सत्यानाश करून घेतात. बेहदचे बाबा तर समजावून सांगत राहतील. यामध्ये निराश होता कामा नये की, बाबांनी असे का म्हटले, आमची इज्जत गेली! अरे इज्जत तर रावण राज्यामध्ये कधीच गेलेली आहे. देह-अभिमानामध्ये आल्याने आपलेच नुकसान करून घेतील. पद भ्रष्ट होईल. क्रोध, लोभ हे सुद्धा क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) आहे. डोळ्यांनी वस्तू बघतात, तेव्हाच तर लोभ उत्पन्न होतो.

बाबा येऊन आपला बगीचा पाहतात (आपल्या मुलांना पाहतात) - विविध प्रकारची फुले आहेत. इथून जाऊन मग त्या बगीच्यामध्ये फुलांना पाहतात. खरोखर शिवबाबांवर फुले सुद्धा वाहतात. ते तर आहेत निराकार, चैतन्य फूल. तुम्ही आता पुरुषार्थ करून असे फूल बनता. बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, जे काही झाले, त्याला ड्रामा समजा. विचार करू नका’. किती मेहनत करतात, होत तर काहीच नाही, टिकत नाहीत. अरे, प्रजा देखील पाहिजे ना. थोडे जरी ऐकले तरी ती प्रजा झाली. प्रजा तर पुष्कळ बनणार आहे. ज्ञानाचा कधीही नाश होत नाही. एकदा जरी ऐकले कि, शिवबाबा आहेत, तरीसुद्धा खूप झाले, प्रजेमध्ये येतीलच. आतून तुम्हाला हि स्मृती आली पाहिजे की, आम्ही ज्या राज्यामध्ये होतो, ते आता पुन्हा प्राप्त करत आहोत. त्यासाठी पूर्णपणे पुरुषार्थ केला पाहिजे. एकदम अचूक सेवा चालू आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) शिवालयामध्ये जाण्यासाठी या विकारांना काढून टाकायचे आहे. या वेश्यालयामधून आपले मन अलिप्त करत जायचे आहे. शुद्रांच्या संगतीपासून दूर रहायचे आहे.

२) जे काही होऊन गेले त्याला ड्रामा समजून कोणताही विचार करायचा नाही. कधीही अहंकारामध्ये यायचे नाही. जर कधी शिक्षा मिळाली तर निराश व्हायचे नाही.

वरदान:-
खुशीच्या खजिन्याने संपन्न बनून दुःखी आत्म्यांना खुशीचे दान देणारे पुण्य आत्मा भव

या समयी दुनियेमध्ये प्रत्येक क्षणाला दुःख आहे आणि तुमच्याकडे प्रत्येक क्षणाला खुशी आहे. तर दुःखी आत्म्यांना खुशी देणे - हे सर्वात मोठ्यात-मोठे पुण्य आहे. दुनियावाले खुशीसाठी आपला किती वेळ, संपत्ती खर्च करतात आणि तुम्हाला सहजच अविनाशी खुशीचा खजिना मिळाला आहे. आता फक्त जे मिळाले आहे ते वाटत जा. वाटणे अर्थात वाढणे. जे कोणी संपर्कामध्ये येतील त्यांना अनुभव व्हावा की यांना कोणती तरी श्रेष्ठ प्राप्ती झाली आहे ज्याची खुशी आहे.

बोधवाक्य:-
अनुभवी आत्मा कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये धोका खाऊ शकत नाही. ती सदैव विजयी असते.