20-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो , बेगर पासून प्रिन्स बनण्याचा आधार पवित्रता आहे, पवित्र बनल्यानेच पवित्र दुनियेची राजाई मिळते”

प्रश्न:-
या पाठशाळेचा कोणता धडा तुम्हाला मनुष्या पासून देवता बनवतो?

उत्तर:-
तुम्ही या पाठशाळेमध्ये रोज हाच धडा शिकता की आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आत्म-अभिमानी बनल्यानेच तुम्ही मनुष्या पासून देवता, नरापासून नारायण बनता. यावेळी सर्व मनुष्य मात्र पुजारी अर्थात पतित देह-अभिमानी आहेत, म्हणून पतित-पावन बाबांना बोलावत राहतात.

गीत:-
छोड़ भी दे आकाश सिंहासन...

ओम शांती।
मुले जाणतात की हे, ‘ओम् शांती’ कोणी म्हटले? कोणती मुले? आत्मे जाणतात की ‘ओम् शांती’ कोणाच्या आत्म्याने म्हटले? परमपिता परमात्म्याने म्हटले. मुले जाणतात, मनुष्याच्या आत्म्याने म्हटले नाही, हे परमपिता परमात्मा शिव यांनी म्हटले. ते सर्वांचे पिता उच्च ते उच्च आहेत. आता गाण्यामध्ये ऐकले, भारतावर मायेची सावली पडलेली आहे. खूपच पतित बनले आहेत, म्हणून बोलावत आहेत की, ‘हे पतित-पावन, पावन बनविण्याकरिता पुन्हा या’. आत्माच आपल्या पित्याला बोलावते, ज्यांना भगवान म्हटले आहे. म्हणतात, तेच पतित-पावन आहेत. एकाचीच महिमा होते. ते सर्व आत्म्यांचे बेहदचे पिता आहेत. इथे सर्व पतित बनले आहेत, म्हणूनच बोलावत आहेत - ‘हे परमपिता परमात्मा’. तेच ज्ञानाचा सागर देखील आहेत, पतित-पावन देखील आहेत. ते पिता देखील आहेत तर शिक्षक देखील आहेत, कारण ज्ञान सागर देखील आहेत, वर्ल्ड ऑथॉरिटी देखील आहेत. सर्व वेद, शास्त्रांना, ग्रंथांना जाणणारे आहेत. त्यांना म्हणतातच नॉलेजफुल. तर यावेळी सर्व पारलौकिक पित्याला बोलावतात, कारण सर्व दुःखी आहेत. म्हणतात - ‘गॉड फादर’. त्यांचे नाव देखील पाहिजे ना. त्यांचे नाव गायले गेले आहे - शिवबाबा. तेच उच्च ते उच्च, ज्ञानाचे सागर, सुखाचे सागर, शांतीचे सागर आहेत. मनुष्याची आत्मा आपल्या पित्याची ही महिमा करते. उच्च ते उच्च आत्मा कोणाची आहे? परमपिता परमात्म्याची. ते ‘परम’ आहेत, ‘पतित’ मनुष्य त्यांची आठवण करतात. सतयुगामध्ये जेव्हा भारत पावन होता, तर देवी-देवतांचे राज्य होते, तेव्हा कोणीही पतित नव्हते. ही आहे तमोप्रधान दुनिया अर्थात दुनियेमध्ये जे मनुष्य राहतात ते सर्व पाप आत्मे आहेत. हाच भारत पावन होता, हाच भारत पतित झाला आहे. इथे कलियुगामध्ये सर्व पतित आहेत. तुम्ही जाणता - ज्ञानाचे सागर, पतित-पावन परमपिता परमात्मा परमधाम हून येऊन आम्हाला ब्रह्मा द्वारे शिकवत आहेत. जरूर त्यांना शरीर तर पाहिजे ना. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. ज्ञानाचे सागर जे ऑथॉरिटी आहेत तेच सर्व काही जाणतात. भारतामध्ये असे एक चित्र देखील दाखवतात की, विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले, त्यांच्या हातामध्ये शास्त्रे देतात. आता विष्णू काही सर्व शास्त्रांचे सार ऐकवत नाहीत. परमपिता परमात्मा ज्ञानाचे सागर ब्रह्मा द्वारे सर्व शास्त्रांचे सार समजावून सांगतात. ब्रह्मा, विष्णू, शंकराचे देखील ते रचयिता आहेत. ब्रह्माला अथवा विष्णूला ज्ञानाचा सागर म्हटले जाणार नाही. शंकराची तर गोष्टच सोडा. आता ज्ञानाचा सागर कोण? निराकार उच्च ते उच्च परमात्माच पतित-पावन आहेत. ही महिमा त्या परमपिता परमात्म्याची आहे. इथे देखील आत्म्याचीच महिमा होते. आत्माच शरीरा द्वारे म्हणते - मी प्रेसिडेंट आहे, मी बॅरिस्टर आहे, मी अमुक मिनिस्टर आहे. आत्माच मर्तबा (पद) धारण करते. शरीराद्वारे आत्मा म्हणते - ‘मी एक शरीर सोडून दुसरे घेतो’. यावेळी जेव्हा बाबा आले आहेत, म्हणतात - ‘मुलांनो, आत्म-अभिमानी बना. मी तुमचा पिता, तुम्हाला हाच पाठ शिकविण्याकरिता आलेलो आहे’. ही पाठशाळा आहे - मनुष्या पासून देवता, नरा पासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनण्याची. सर्व आत्मे बाबांना बोलावतात की, ‘हे परमपिता परमात्मा… आता निराकारी दुनियेतून साकारी दुनियेमध्ये या. रूप बदला’. तुम्ही निराकारी आत्मे तर जेव्हा शरीरामध्ये येता तेव्हा गर्भामध्ये येता, पुनर्जन्म घेता. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही ८४ जन्म गर्भातून घेतले आहेत. एक शरीर सोडून मग पुन्हा दुसऱ्या गर्भामध्ये जाता, असे ८४ जन्म घेता. मी काही गर्भामध्ये येत नाही. भारतवासी मुळात देवी-देवता धर्माचे होते. मग शिडी खाली उतरत आले, क्षत्रिय वर्णामध्ये, मग वैश्य, शूद्र वर्णामध्ये कला कमी होत जातात. भारत १६ कला संपूर्ण होता, मग १४ कला बनला. भारतवासी आपल्या जन्मांना जाणत नाहीत. ८४ जन्म भारतवासीच घेतात. इतर कोणत्याही धर्माचे ८४ जन्म घेत नाहीत. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनला आहात, ही ज्ञानाची गोष्ट आहे. स्वदर्शन चक्रधारी बनल्याने तुम्ही स्वर्गाचे चक्रवर्ती महाराजा बनता. तुम्ही चांगल्या रितीने जाणता, आपण इथे पतित पासून पावन बनण्यासाठी आलो आहोत. ही आहेच पतित दुनिया. पतित-पावन, सर्वांचे सद्गती दाता तर एक बाबाच आहेत. सर्वजण त्यांनाच बोलावतात. पित्याची आठवण करतात, श्रीकृष्णाची नाही. गीता काही श्रीकृष्णाने ऐकवली नाहीये. गीता आहे सर्व शास्त्रमई शिरोमणी. भारताची गीता कोणत्या धर्माचे शास्त्र आहे? आदि सनातन देवी-देवता धर्माचे. गीता कोणी गायली? राजयोग कोणी शिकवला? परमपिता परमात्मा पतित-पावन शिवबाबांनी. तर तुमची आत्मा जी निराकार होती, तिने आता हे साकार शरीर धारण केले आहे. साकार मनुष्याला कधी भगवान म्हणता येणार नाही. भले सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायण आहेत तरी देखील त्यांना काही भगवान म्हणता येणार नाही. ती केवळ त्यांना दिलेली एक उपाधी (पदवी) आहे. नियमानुसार भगवान एकच आहेत. क्रिएटर इज वन. बाकी ते आहेत देवता. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, यांना महाराजा-महाराणी म्हटले जात होते. भगवान कधी महाराजा बनत नाहीत. ते तर पिताच आहेत, जे येऊन भारतवासीयांना असे देवी-देवता बनवतात. आता तर देवी-देवता धर्माचा कोणीही राहिलेला नाही. याला म्हटले जाते रावण संप्रदाय, कारण रावण राज्य आहे. रावणाला वर्षानुवर्षे जाळत राहतात कारण हा खूप जुना शत्रू आहे, परंतु याला भारतवासी जाणत नाहीत. शास्त्रांमध्ये देखील वर्णन नाहीये की रावण कोण आहे. रावणाला १० डोकी का दाखवली आहेत. या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. मनुष्य तर अगदीच पत्थर-बुद्धी आहेत. या लक्ष्मी-नारायण इत्यादींना पारस-बुद्धी म्हणणार. पारसनाथ, पारसनाथिनीचे राज्य होते. यथा राजा-राणी तथा प्रजा. भारतासारखा सुखधाम तर दुसरा कोणताही खंड नसतो. जेव्हा भारतामध्ये स्वर्ग होता तेव्हा कोणताही आजार, दुःख, रोगराई काहीही नव्हते. संपूर्ण सुख होते. गायले जाते - ईश्वराची महिमा अपरंपार आहे. तशी भारताची देखील महिमा अपरंपार आहे. सर्व काही पवित्रतेवर अवलंबून आहे. बोलावतात देखील असेच कारण सर्व पतित आहेत. शांती नाही, प्रोस्पेरिटी (समृद्धी) सुद्धा नाहीये. आता तुम्ही समजला आहात - आपण भारतवासी सूर्यवंशी देवी-देवता होतो, आणि मग हळूहळू पतित बनलो आहोत. याला म्हटले जाते - मृत्युलोक. याला आग लागणार आहे. हा आहे - ‘शिव ज्ञान यज्ञ’, ‘रुद्र ज्ञान यज्ञ’ देखील म्हणतात. मनुष्य नावे तर अनेक देतात. जिथेपण ‘शिव’ची मूर्ती पाहतात, तिथे अनेक गुणवाचक विविध नावे देतात. एकाचीच अनेक नावांनी मंदिरे बांधतात. तर बाबा बसून समजावून सांगत आहेत - ज्ञान, भक्ती, वैराग्य. आता भक्ती पूर्ण होत आहे, तुम्हाला भक्ती पासून वैराग्य येते अर्थात या जुन्या दुनियेपासून वैराग्य आहे. ही जुनी दुनिया विनाश होणार आहे.

मुले विचारतात - ‘बाबा, आम्ही पतितापासून पावन कसे बनू शकतो?’ पुष्कळ अशी नवीन माणसे येतात तर त्यांना परवानगी दिली जात नाही. जसे कॉलेजमध्ये कोणी नवीन जाऊन बसला तर तो काहीही समजू शकणार नाही, आणि हे कोणालाच माहीत नाही की मनुष्या पासून देवता कसे बनत आहेत. मनुष्य जे पतित आहेत तेच पावन बनतात. यावेळी भारत देखील बेगर (गरीब) आहे. सतयुगामध्ये भारत प्रिन्स होता. श्रीकृष्ण सतयुगाचा पहिला प्रिन्स होता. त्याच्यामध्ये सर्व गुण आहेत. राज्य लक्ष्मी-नारायणाचे म्हणता येईल. श्रीकृष्ण तर प्रिन्स होता, राधे प्रिन्सेस होती. श्रीकृष्ण प्रिन्सचीच महिमा गायली जाते - ‘सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण…’ त्याने काही गीता ऐकवली नाही. तो तर सतयुगाचा प्रिन्स होता. तो पतित मनुष्यांना पावन बनविण्यासाठी गीता पाठ ऐकवेल - हे होऊ शकत नाही. ही सर्व शास्त्रे आहेत भक्तिमार्गाची. शास्त्रांची किती महिमा आहे. सतयुगामध्ये, भक्तिमार्गाची कोणतीही शास्त्रे, चित्रे इत्यादी असत सुद्धा नाहीत. तिथे तर ज्ञानाचे प्रारब्ध असते - २१ जन्मांसाठी. पुन्हा सतयुगाचे राज्यभाग्य घेत आहेत. भारतवासी सतयुगामध्ये ५ हजार वर्षांपूर्वी विश्वाचे मालक होते इतर कोणतेही पार्टीशन (विभाजन) इत्यादी नव्हते. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. आता कलियुगाचा अंत आहे ना. विनाश समोर उभा आहे. भगवंताने हा ज्ञान यज्ञ रचला आहे - पतित कलियुगाला पावन सतयुग बनविण्याकरिता; तर जरूर पतित दुनियेचा विनाश होणारच. गायन देखील आहे - ‘ब्रह्मा द्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना’, ती आता शिवबाबा ब्रह्मा द्वारा करवून घेत आहेत. तुम्ही आता मनुष्यापासून देवता बनत आहात. गातात देखील - ‘परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करतात’. ते तर झाले प्रजापिता आणि सर्वजण त्यांची संतान आहेत. खरोखर, ब्रह्मा द्वारेच स्वर्गाची स्थापना झाली होती. आज पासून ५ हजार वर्षांपूर्वी देखील तुम्हाला हा राजयोग शिकविण्याकरिता मी संगमावर आलो होतो. श्रीकृष्ण नाही, मी आलो होतो. श्रीकृष्ण पतित दुनियेमध्ये येऊ शकत नाही. बाबाच येतात. तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत. मनुष्य, मनुष्याला सद्गती देऊ शकत नाहीत. आठवण देखील सर्व त्या एकाचीच करतात. परमपिता परमात्मा कुठे राहतात? तुम्ही मुले जाणता, परमधामामध्ये राहतात. ते आहे ब्रह्म-मह्तत्त्व. तिथे आत्मे पवित्र, जणू महात्मे असतात. इथे देखील महान आत्मा, पतित आत्मा म्हणतात ना. वास्तविक इथे एकही महान आत्मा नाही. आत्म्यालाच पावन सतोप्रधान बनायचे आहे, ज्ञान आणि योगाद्वारे, पाण्याने (गंगास्नान करून) नाही. आत्माच पतित बनली आहे. आत्म्यामध्येच भेसळ पडते. आत्माच गोल्डन, सिल्व्हर, कॉपर, आयर्न बनते. आता आत्मे जे पतित आहेत त्यांना पावन कोण बनवणार! परमपिता परमात्म्याशिवाय इतर कोणीही बनवू शकत नाही. बाबाच बसून समजावून सांगत आहेत - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील. जितकी आठवण कराल तितके पतितापासून पावन बनाल. मेहनत यामध्ये आहे. ज्ञान तर सर्व बुद्धीमध्ये आहे. हे चक्र कसे फिरते, आपण ८४ जन्म कसे घेतो. सतयुगामध्ये किती काळ राज्य चालते, मग रावण कसा येतो! रावण कोण आहे! हे देखील कोणालाही माहीत नाहीये. कधी पासून रावणाला जाळत आले आहेत, हे देखील कोणालाही माहीत नाही. दरवर्षी जाळतात. सतयुगामध्ये तर जाळणार नाहीत. आता आहेच रावण राज्य. रामराज्य तर कोणी स्थापन करू शकत नाही. हे तर बाबांचेच कार्य आहे. पतित मनुष्य काही करू शकणार नाहीत. ते तर सर्व नष्ट होतील. पतित दुनियाच नष्ट होणार आहे. सतयुगामध्ये एकही असे म्हणणार नाही की, ‘हे पतित-पावन या’. ती तर पावन दुनिया आहे ना. तुम्ही आता जाणता की या लक्ष्मी-नारायणाला असे स्वर्गाचे मालक कोणी बनविले. आणि मग यांनी ८४ जन्म कसे घेतले. आदि सनातन देवी-देवता धर्मवाल्यांनीच ८४ जन्म घेतले आहेत. तेच यावेळी शूद्र वंशी बनले आहेत.

आता पुन्हा ब्राह्मण वंशी बनता. आता तुम्ही ब्राह्मण चोटी (सर्वोच्च) आहात. हे सर्वोच्च शिखर आहे. ब्रह्मामुखवंशावळी ब्राह्मण कुलभूषण. आता तुम्ही शिवबाबांची मुले देखील आहात, तर नातवंडे देखील आहात. शिव-वंशी, आणि मग ब्रह्माकुमार-कुमारी आहात. वारसा मिळतो आजोबांकडून. बाबा म्हणतात - माझी निरंतर आठवण करा. पावन बना तर तुम्ही माझ्याकडे मुक्तिधामामध्ये याल. या गोष्टी त्यांनाच समजतील ज्यांना कल्पापूर्वी समजल्या आहेत. ते तर हजारो आहेत. जर कोणी विचारले, किती बी.के. आहेत? सांगा, हजारोंच्या अंदाजामध्ये आहेत. या दैवी झाडाची वृद्धी होत जाते. आता पुन्हा कलम लागत आहे - आदि सनातन देवी-देवता धर्माचे, कारण देवता धर्मच अस्तित्वात राहिलेला नाही. सर्वजण स्वतःला हिंदू म्हणूनच संबोधत असतात. इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत. आता पुन्हा सर्व निघून येतील, येऊन बाबांकडून वारसा घेतील. तुम्ही बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा प्राप्त करण्यासाठी अर्थात मनुष्यापासून देवता बनण्यासाठी आला आहात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पतितापासून पावन बनण्यासाठी ज्ञान आणि योगामध्ये मजबूत (शक्तिशाली) बनायचे आहे. आत्म्यामध्ये जी भेसळ पडली आहे, ती आठवणीच्या मेहनतीने काढून टाकायची आहे.

२) आपण ब्रह्मामुखवंशावळी ब्राह्मण सर्वोच्च आहोत, या नशेमध्ये राहायचे आहे. ब्राह्मणच वारशाचे अधिकारी आहेत कारण शिवबाबांची नातवंडे आहेत.

वरदान:-
आपल्या पॉवरफुल वृत्ती द्वारे पतित वायुमंडळाला परिवर्तित करणारे मास्टर पतित-पावनी भव

कसेही वायुमंडळ असो, परंतु स्वतःची शक्तिशाली वृत्ती वायुमंडळाला बदलू शकते. वायुमंडळ विकारी असेल, परंतु स्वतःची वृत्ती निर्विकारी असावी. जे पतितांना पावन बनविणारे आहेत, ते पतित वायुमंडळाच्या वशीभूत होऊ शकत नाहीत. मास्टर पतित-पावनी बनून स्वतःच्या पॉवरफुल वृत्तीद्वारे अपवित्र अथवा कमजोरीचे वायुमंडळ नाहीसे करा, त्याचे वर्णन करून तसे वायुमंडळ बनवू नका. कमजोर अथवा पतित वायुमंडळाचे वर्णन करणे हे देखील पाप आहे.

बोधवाक्य:-
आता धरणीमध्ये परमात्म्याला ओळखण्याचे बीज पेरा, तेव्हाच प्रत्यक्षता होईल.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

योग अर्थातच शांतीची शक्ती. ही शांतीची शक्ती अतिशय सहज स्वतःला आणि इतरांना परिवर्तित करते, याद्वारे व्यक्ती देखील बदलतील तर प्रकृती देखील बदलेल. व्यक्तींना तर मुखावाटे बोलून कोर्स करवून घेता, परंतु प्रकृतीला बदलण्याकरिता शांतीची शक्ती अर्थात योगबलच पाहिजे. ‘योग’मध्ये जेव्हा बाकीचे सर्व संकल्प शांत होतात, केवळ “बाबा आणि मी” - हा एकच संकल्प उरतो, यालाच पॉवरफुल योग म्हटले जाते. बाबांच्या भेटीच्या अनुभूती व्यतिरिक्त इतर सर्व संकल्प विलीन व्हावेत, तेव्हाच म्हटले जाईल - ज्वाला रूपातील आठवण, ज्याद्वारे परिवर्तन होते.