20-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हा जुन्या भक्तांना भक्तीचे फळ देण्याकरिता. भक्तीचे फळ आहे ज्ञान, ज्याद्वारेच तुमची सद्गती होते”

प्रश्न:-
बरीच मुले चालता-चालता भाग्याला स्वतःच शूट करतात (मारून टाकतात), ते कसे?

उत्तर:-
जर बाबांचे बनूनही सेवा करत नाहीत, स्वतःवर आणि दुसऱ्यांवर दया करत नाहीत तर ते आपल्या भाग्याला शूट करतात अर्थात पद भ्रष्ट होतात. चांगल्या रीतीने अभ्यास करतील, योगामध्ये राहतील तर पदही चांगले मिळेल. सेवाभावी मुलांना तर सेवेची खूप आवड असली पाहिजे.

गीत:-
कौन आया सवेरे-सवेरे…

ओम शांती।
रूहानी मुले समजतात आपण आत्मा आहोत, ना की शरीर. आणि हे ज्ञान आताच परमपिता परमात्म्याद्वारे मिळते. बाबा म्हणतात - जेव्हा की मी आलो आहे तर तुम्ही स्वतःला आत्मा निश्चय करा. आत्माच शरीरामध्ये प्रवेश करते. एक शरीर सोडून दुसरे घेत राहते. आत्मा बदलत नाही, शरीर बदलते. आत्मा तर अविनाशी आहे, तर स्वतःला आत्मा समजायचे आहे. हे ज्ञान कधीच कोणी देऊ शकत नाही. बाबा आले आहेत मुलांच्या बोलावण्यावरून. हे देखील कोणाला ठाऊक नाही की हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. बाबा येऊन समजावून सांगतात की, माझे येणे होते कल्पाच्या पुरुषोत्तम संगमयुगावर जेव्हा की सारे विश्व पुरुषोत्तम बनते. यावेळी तर सारे विश्व कनिष्ठ पतित आहे. त्याला म्हटले जाते अमरपुरी, हा आहे मृत्यूलोक. मृत्यूलोकमध्ये आसुरी गुणवाले मनुष्य असतात, अमरलोक मध्ये दैवी गुणवाले मनुष्य आहेत म्हणून त्यांना देवता म्हटले जाते. इथे देखील चांगला स्वभाव असणाऱ्याला म्हटले जाते - हे तर जसे देवता आहेत. काहीजण दैवी गुणवाले असतात, यावेळी सर्व आहेत आसुरी गुणवाले मनुष्य. ५ विकारांमध्ये अडकलेले आहेत. तेव्हाच तर गातात - येऊन या दुःखातून लिबरेट करा. काही एका सीतेला तर सोडवले नाहीये. बाबांनी सांगितले आहे - भक्तीला सीता म्हटले जाते, भगवंताला राम म्हटले जाते. जे भक्तांना फळ देण्याकरिता येतात. या बेहदच्या रावण राज्यामध्ये सारी दुनिया अडकून पडली आहे. त्यांना लिबरेट करून राम राज्यामध्ये घेऊन जातात. रघुपती राघव राजा रामची गोष्ट नाहीये. ते तर त्रेता मधले राजा होते. आता तर सर्व आत्मे तमोप्रधान जडजडीभूत अवस्थेमध्ये आहेत, शिडी उतरता-उतरता खाली आले आहेत. पुज्य पासून पुजारी बनले आहेत. देवता कोणाची पूजा करत नाहीत. ते तर आहेत पूज्य. मग ते जेव्हा वैश्य, शूद्र बनतात तेव्हा पूजा सुरू होते, वाममार्गामध्ये आल्याने पुजारी बनतात, पुजारी देवतांच्या चित्रांसमोर नमस्कार करतात, यावेळी एकही कोणी पूज्य असू शकत नाही. उच्च ते उच्च भगवान त्यानंतर मग आहेत सतयुगी देवता पूज्य. यावेळी तर सर्वजण पुजारी आहेत. सर्वप्रथम शिवाची पूजा होते, ती आहे अव्यभिचारी पूजा. ती सतोप्रधान, नंतर सतो, मग देवतांपेक्षाही अजून खाली येऊन पाण्याची, मनुष्यांची, पक्षांची इत्यादींची पूजा करु लागतात. दिवसें-दिवस अनेकांची पूजा होऊ लागते. आजकाल रिलीजस कॉन्फरन्स (धार्मिक परिषद) देखील अनेक होत असतात. कधी आदि सनातन धर्मवाल्यांची, कधी जैन लोकांची, कधी आर्य समाजवाल्यांची. अनेकांना बोलावतात कारण प्रत्येक जण आपल्या धर्माला श्रेष्ठ समजतात ना. प्रत्येक धर्मामध्ये कोणते ना कोणते विशेष गुण असल्या कारणाने ते स्वतःला मोठे समजतात. जैन धर्मीयांमध्ये देखील अनेक प्रकारचे असतात. ५-७ व्हरायटीचे असावेत. त्यांच्यामध्ये मग कोणी निर्वस्त्र देखील राहतात. निर्वस्त्र बनण्याचा अर्थ समजत नाहीत. भगवानुवाच आहे - नंगे अर्थात अशरीरी आला होता, पुन्हा अशरीरी बनून जायचे आहे. ते मग वस्त्र काढून निर्वस्त्र बनतात. भगवानुवाचच्या अर्थाला समजत नाहीत. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मे इथे हे शरीर धारण करून पार्ट बजावण्याकरिता आला आहात, मग परत जायचे आहे, या गोष्टींना तुम्ही मुलेच समजता. आत्माच पार्ट बजावण्यासाठी येते, झाड वृद्धीला प्राप्त होत राहते. नवीन-नवीन प्रकारचे धर्म उदयास येत राहतात, म्हणून याला व्हराइटी नाटक म्हटले जाते. व्हरायटी धर्मांचे झाड आहे. प्रत्येकाच्या अनेक शाखा निघतात. मोहम्मद तर नंतर आले आहेत. पहिले आहेत इस्लामी. मुसलमानांची संख्या पुष्कळ आहे. आफ्रिकेमध्ये किती श्रीमंत आहेत, सोने-हिऱ्यांच्या खाणी आहेत. जिथे खूप धन बघतात तर त्यांच्यावर चढाई करून धनवान बनतात. ख्रिश्चन लोक देखील किती धनवान बनले आहेत. भारतामध्ये देखील धन आहे, परंतु गुप्त. सोने इत्यादी किती पकडत असतात. आता दिगंबर जैन सभावाले कॉन्फरन्स इत्यादी करत राहतात, कारण प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ समजतात ना. हे इतके सर्व धर्म वाढत राहतात, कधी विनाश देखील होणार आहे, काहीच समजत नाहीत. सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ तर तुमचा ब्राह्मण धर्मच आहे, ज्याच्याविषयी कोणालाच माहित नाही आहे. कलियुगी ब्राह्मण देखील भरपूर आहेत, परंतु ते आहेत कुख वंशावळी ब्राह्मण. प्रजापिता ब्रह्माचे आहेत मुख वंशावळी ब्राह्मण, ते तर सर्व भाऊ-बहीणी असले पाहिजेत. जर ते (कुख वंशावळी ब्राह्मण) स्वतःला ब्रह्माची संतान म्हणत असतील, तर ते भाऊ-बहीणच झाले, मग लग्न देखील करू शकत नाहीत. यावरून हे सिद्ध होते की ते ब्राह्मण ब्रह्माची मुख वंशावळी नाहीत, फक्त नाव देतात. वास्तविक देवतांपेक्षा देखील उच्च ब्राह्मणांना म्हणणार, शिखा आहेत ना. हे ब्राह्मणच मनुष्यांना देवता बनवतात. शिकवणारे आहेत परमपिता परमात्मा, स्वयं ज्ञानाचा सागर. हे कोणालाच माहित नाही आहे. बाबांकडे येऊन ब्राह्मण बनून तरी देखील उद्या शूद्र बनतात. जुने संस्कार बदलण्यामध्ये खूप मेहनत लागते. स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांकडून वारसा घ्यायचा आहे, रुहानी बाबांकडून रुहानी मुलेच वारसा घेतील. बाबांची आठवण करण्यामध्येच माया विघ्न आणते. बाबा म्हणतात - ‘हथ कार डे दिल यार डे’. हे आहे खूप सोपे. जसे आशिक-माशुक असतात जे एकमेकांना पाहिल्या शिवाय राहू शकत नाहीत. बाबा तर माशुकच आहेत. आशिक सर्व मुले आहेत जी बाबांची आठवण करत राहतात. एक बाबाच आहेत जे कधी कोणावर आशिक होत नाहीत कारण त्यांच्या पेक्षा उच्च कोणीच नाही. बाकी होय, मुलांची महिमा करतात, तुम्ही भक्तीमार्गापासून मज माशुकचे सर्व आशिक आहात. बोलावता देखील - ‘येऊन दुःखातून लिबरेट करून पावन बनवा’. तुम्ही सर्व आहात ब्राइड्स, मी आहे ब्राईडग्रुम. तुम्ही सर्व आसुरी जेलमध्ये अडकलेले आहात, मी येऊन सोडवतो. इथे मेहनत खूप आहे, क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) धोका देते, सिव्हील आय (पवित्र दृष्टी) बनण्यामध्ये मेहनत लागते. देवतांची किती चांगली कॅरॅक्टर्स आहेत, आता असे देवता बनविणारे देखील जरूर पाहिजेत ना.

कॉन्फरन्समध्ये टॉपिक ठेवला आहे “मानव जीवनामध्ये धर्माची आवश्यकता”. ड्रामाला न जाणल्यामुळे गोंधळून गेले आहेत. तुमच्याशिवाय कुणीही समजावून सांगू शकणार नाही. ख्रिश्चन अथवा बौद्धी इत्यादींना हे थोडेच माहीत आहे की क्राइस्ट, बुद्ध इत्यादी पुन्हा केव्हा येतील! तुम्ही लगेच हिशोब सांगू शकता. तर समजावून सांगितले पाहिजे - धर्माची तर गरज आहे ना. सर्वप्रथम कोणता धर्म होता, नंतर मग कोणते धर्म आले आहेत! आपल्या धर्माचे देखील पूर्ण समजत नाहीत. योग लावत नाहीत. योगा शिवाय ताकद येत नाही, जौहर (शक्ती) भरत नाही. बाबांनाच ऑलमाइटी ऑथॉरिटी म्हटले जाते. तुम्ही किती ऑलमाइटी (सर्वशक्तीमान) बनता, विश्वाचे मालक बनता. तुमच्या राज्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यावेळी इतर कोणतेही खंड नसतात. आता तर किती खंड आहेत. हे सृष्टी चक्र कसे फिरते. ५ हजार वर्षांचे हे चक्र आहे, मग बाकी सृष्टीचा विस्तार किती मोठा आहे, तिला थोडेच कोणी मोजू शकतात. फारफार तर धरणीला मोजू शकतात. सागराला तर मोजू शकत नाहीत. आकाश आणि सागराचा अंत कोणीही मिळवू शकत नाही. तर समजावून सांगायचे आहे - धर्माची आवश्यकता का आहे! सारे चक्र बनलेच आहे धर्मांवर. हे आहेच व्हरायटी धर्मांचे झाड, हे झाड आहे आंधळ्यांसमोर आरसा.

तुम्ही आता बाहेर सेवा करण्यासाठी निघाला आहात, हळू-हळू तुमची वृद्धी होत जाईल. वादळे आल्याने खूप पाने गळतात देखील ना. इतर धर्मांमध्ये वादळे येण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना तर वरून यायचेच आहे, इथे तुमची स्थापना खूप वंडरफुल आहे. सर्वात पहिले येणारे भगत जे आहेत त्यांनाच येऊन भगवंताला फळ द्यायचे आहे, आपल्या घरी घेऊन जाण्याचे. बोलावतात देखील - ‘आम्हा आत्म्यांना आपल्या घरी घेऊन जा’. हे कोणाला माहित नाही आहे की बाबा स्वर्गाचे देखील राज्य-भाग्य देतात. संन्याशी लोक तर सुखाला मानतच नाहीत. त्यांना वाटते मोक्ष मिळावा. मोक्षाला वारसा म्हटले जात नाही. स्वतः शिवबाबांना देखील पार्ट बजावावा लागतो तर मग कोणाला मोक्षामध्ये कसे ठेवू शकतात. तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आपल्या धर्माला आणि इतरांच्या धर्माला जाणता. तुम्हाला दया आली पाहिजे. चक्राचे रहस्य समजावून सांगितले पाहिजे. बोला, तुमचे धर्म स्थापक पुन्हा आपल्या वेळेनुसार येतील. समजावून सांगणारा देखील हुशार पाहिजे. तुम्ही समजावून सांगू शकता की, प्रत्येकाला सतोप्रधानापासून सतो-रजो-तमोमध्ये यायचेच आहे. आता आहे रावण राज्य. तुमची आहे खरी गीता, जे बाबा ऐकवतात. भगवान निराकारालाच म्हटले जाते. आत्मा निराकार गॉडफादरला बोलावते. तिथे तुम्ही आत्मे राहता. तुम्हाला परमात्मा थोडेच म्हणणार. परमात्मा तर एकच आहेत उच्च ते उच्च भगवान, बाकी सर्व आहेत आत्मे संतान. सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत मग आहेत देवता. त्यामध्ये देखील नंबरवन आहे श्रीकृष्ण कारण आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहे. तुम्ही आहात संगमयुगी. तुमचे जीवन अमूल्य आहे. देवतांचे नाही, ब्राह्मणांचे अमूल्य जीवन आहे. बाबा तुम्हाला आपली संतान बनवून मग तुमच्यावर किती मेहनत करतात, देवता थोडीच इतकी मेहनत करतील. ते मुलांना शिकविण्याकरिता शाळेमध्ये पाठवतील. इथे बाबा बसून तुम्हा मुलांना शिकवत आहेत. ते पिता, टीचर, गुरु तिन्ही आहेत. तर किती रिगार्ड (आदर) वाटला पाहिजे. सेवाभावी मुलांना सेवेची खूप आवड असली पाहिजे. फार थोडे आहेत जे चांगले हुशार आहेत ते तर सेवेला लागले आहेत. हँड्स तर पाहिजेत ना. ज्यांना युद्धाच्या मैदानामध्ये जाण्यासाठी शिकवतात त्यांना नोकरी इत्यादी सर्व सोडायला लावतात. त्यांच्याकडे लिस्ट असते. म्हणजे मग मिलेट्रीला कोणी रिफ्युज करू शकत नाहीत (नकार देऊ शकत नाहीत) की आम्ही मैदानावर जाणार नाही. ड्रिल शिकवतात की गरज पडल्यास बोलावून घेऊ. रिफ्युज करणाऱ्यावर (नकार देणाऱ्यावर) केस चालवतात. इथे तर ती गोष्टच नाही. इथे मग जे चांगल्या रीतीने सेवा करत नाहीत तर पद भ्रष्ट होते. सेवा करत नाहीत अर्थात आपणच आपल्याला शूट करतात (संपवतात). पद भ्रष्ट होते. आपल्या भाग्याला शूट करतात. चांगल्या रीतीने शिकाल, योगामध्ये रहाल तर चांगले पद मिळेल. स्वतःवर दया करायची असते. स्वतःवर कराल तर इतरांवर देखील कराल. बाबा सर्व प्रकारचे स्पष्टीकरण देत राहतात. हे दुनियेचे नाटक कसे चालते, तर राजधानी देखील स्थापन होते. या गोष्टींना दुनिया जाणत नाही. आता निमंत्रण तर मिळतात. ५-१० मिनिटांमध्ये काय सांगू शकाल. एक-दोन तास देतील तर समजावून देखील सांगू शकाल. ड्रामाला तर अजिबातच जाणत नाहीत. चांगले-चांगले पॉईंट जिथे-तिथे लिहून ठेवले पाहिजेत. परंतु मुले विसरतात. बाबा क्रियेटर देखील आहेत, तुम्हा मुलांना क्रियेट करतात. आपले बनवले आहे, डायरेक्टर बनून डायरेक्शन सुद्धा देतात. श्रीमत देतात आणि मग ॲक्ट देखील करतात, ज्ञान ऐकवतात. ही देखील त्यांची उच्च ते उच्च ॲक्ट आहे ना. ड्रामाच्या क्रियेटर, डायरेक्टर आणि मुख्य ॲक्टरलाच जाणले नाहीत तर मग अर्थच काय? अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या अमूल्य जीवनामध्ये शिकवणाऱ्या टीचरचा खूप-खूप रिगार्ड (आदर) ठेवायचा आहे, अभ्यासामध्ये चांगले हुशार बनून सेवेला लागायचे आहे आपणच आपल्यावर दया करायची आहे.

२) स्वतःला सुधारण्यासाठी सिविलाइज्ड (सुसंस्कृत) बनायचे आहे. आपले कॅरॅक्टर (चारित्र्य) सुधारायचे आहेत. मनुष्यांना देवता बनविण्याची सेवा करायची आहे.

वरदान:-
रुहानी ड्रिलच्या अभ्यासा द्वारे फायनल पेपर मध्ये पास होणारे सदा शक्तीशाली भव

जसे वर्तमान समयानुसार शरीरासाठी सर्व आजारांचा इलाज म्हणून एक्सरसाइज शिकवतात. असेच आत्म्याला नेहमी शक्तिशाली बनविण्याकरिता रूहानी एक्सरसाइजचा अभ्यास पाहिजे. सर्वत्र कितीही खळबळ माजविणारे वातावरण असो परंतु आवाजामध्ये राहून आवाजापासून परे स्थितीचा अभ्यास करा. मनाला जिथे आणि जितका वेळ स्थिर करू इच्छिता तितका वेळ तिथे स्थिर करा - तेव्हाच शक्तिशाली बनून फायनल पेपर मध्ये पास होऊ शकाल.

बोधवाक्य:-
आपल्या विकारी स्वभाव-संस्काराला आणि कर्माला समर्पण करणे हेच समर्पित होणे आहे.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

जोपर्यंत तुमची आठवण ज्वाला-रुप बनत नाही तोपर्यंत ही विनाशाची ज्वाळा देखील संपूर्ण ज्वाळा रूप धारण करत नाही. ही भडकते, आणि मग पुन्हा शांत होते कारण ज्वाला मुर्त आणि प्रेरक आधार-मूर्त आत्मे अजून स्वतःच सदा ज्वाला रूप बनलेले नाहीत. आता ज्वाला-रूप बनण्याचा दृढ संकल्प घ्या आणि संघटित रूपामध्ये मन-बुद्धीच्या एकाग्रते द्वारा पावरफुल योगाची व्हायब्रेशन्स चोहो बाजूंना पसरवा.