20-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला अतिशय आवडीने शिकविण्याकरिता, तुम्ही देखील आवडीने शिका - नशा रहावा की आम्हाला शिकविणारे स्वयं भगवान आहेत”

प्रश्न:-
तुम्हा ब्रह्माकुमार-कुमारींचा उद्देश किंवा शुद्ध भावना कोणती आहे?

उत्तर:-
तुमचा उद्देश आहे - कल्प ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे पुन्हा श्रीमतावर विश्वामध्ये सुख आणि शांतीचे राज्य स्थापन करणे. तुमची शुद्ध भावना आहे की श्रीमतावर आपण साऱ्या विश्वाची सद्गती करणार. तुम्ही अभिमानाने सांगता की, आम्ही सर्वांना सद्गती देणारे आहोत. तुम्हाला बाबांकडून पीस प्राइज मिळते. नरकवासी पासून स्वर्गवासी बनणे हेच प्राइज घेणे आहे.

ओम शांती।
स्टुडंट जेव्हा शिकतात तर आनंदाने शिकतात. टीचर देखील खूप आनंदाने, आवडीने शिकवतात. रूहानी मुले हे जाणतात की बेहदचे पिता जे टीचर देखील आहेत, आपल्याला खूप आवडीने शिकवतात. त्या शिक्षणामध्ये तर पिता वेगळे असतात, टीचर वेगळे असतात, जे शिकवतात. कोणा-कोणाचे पिताच टीचर असतात जे शिकवतात ते खूप आवडीने शिकवतात कारण तरीही ब्लड कनेक्शन (रक्ताचे नाते) असते ना. आपले समजून खूप आवडीने शिकतात. हे बाबा तुम्हाला किती आवडीने शिकवत असतील तर मुलांनी देखील किती आवडीने शिकायला हवे. डायरेक्ट बाबा शिकवत आहेत आणि हे एकदाच येऊन शिकवतात. मुलांना खूप आवड पाहिजे. बाबा भगवान आम्हाला शिकवत आहेत आणि प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने समजावून सांगत राहतात. काही-काही मुलांना शिकता-शिकता विचार येतात की, हे काय आहे, ड्रामामध्ये हे अवागमनाचे चक्र आहे. परंतु हे नाटक रचलेच कशासाठी? याने फायदाच काय? बस्स, फक्त असे फेरेच मारत राहणार काय. यापेक्षा यातून सुटलो तर चांगले आहे? जेव्हा बघतात हे तर ८४ चे चक्र फिरतच रहायचे आहे तेव्हा अशा प्रकारचे विचार येतात. भगवंताने असा खेळ का रचला आहे, जे अवागमनाच्या चक्रातून सुटू शकत नाही, यापेक्षा तर मोक्ष मिळावा. अशा प्रकारचे विचार कितीतरी मुलांना येतात. या अवागमना पासून, सुख-दुःखा पासून सुटावे. बाबा म्हणतात - असे कधी होऊ शकत नाही. मोक्ष मिळविण्यासाठी प्रयत्न करणेच व्यर्थ आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे एकही आत्मा पार्ट पासून सुटू शकत नाही. आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. तो आहेच अनादि अविनाशी, एकदम ॲक्युरेट ॲक्टर्स आहेत. एकही कमी-जास्त होऊ शकत नाही. तुम्हा मुलांना सारे नॉलेज आहे. या ड्रामाच्या पार्ट मधून कोणीही सुटू शकत नाही. ना कोणी मोक्ष प्राप्त करू शकतात. सर्व धर्मवाल्यांना नंबरवार यायचेच आहे. बाबा समजावून सांगतात हा पूर्व नियोजित अविनाशी ड्रामा आहे. तुम्ही देखील म्हणता - ‘बाबा, आता आम्ही हे जाणले आहे, कसे आम्ही ८४ चे चक्र फिरतो. हे देखील समजता सर्वप्रथम जे येत असतील, ते ८४ जन्म घेत असतील. शेवटी येणाऱ्याचे जरूर कमी जन्म असतील. इथे तर पुरुषार्थ करायचा आहे. जुन्या दुनिये पासून नवीन दुनिया जरूर बनणार आहे. बाबा प्रत्येक गोष्ट वारंवार समजावून सांगत राहतात कारण की नवीन-नवीन मुले येत राहतात. मग त्यांना आधीच अभ्यास कोण शिकवणार. तर बाबा नवीन मुलांना पाहून जुने
पॉईंट्सच रिपीट करतात.

तुमच्या बुद्धीमध्ये सारे नॉलेज आहे. तुम्ही जाणता सुरुवातीपासून आपण कसे पार्ट बजावत आलो आहोत. तुम्ही यथार्थ रीत्या जाणता, कसे नंबरवार येतो, किती जन्म घेतो. या वेळीच बाबा येऊन ज्ञानाच्या गोष्टी ऐकवतात. सतयुगामध्ये तर आहेच प्रारब्ध. हे यावेळी तुम्हालाच समजावून सांगितले जाते. गीतेमध्ये देखील सुरुवातीला आणि मग शेवटी ही गोष्ट येते - मनमनाभव. शिकवले जाते पद प्राप्त करण्यासाठी. तुम्ही राजा बनण्यासाठी आता पुरुषार्थ करत आहात. इतर धर्मवाल्यांविषयी तर सांगितले आहे - की ते नंबरवार येतात, धर्म स्थापकांच्या मागे सर्वांना यावेच लागते. राजाईची गोष्ट नाही. एकच गीता शास्त्र आहे ज्याची खूप महिमा आहे. भारतामध्येच बाबा येऊन ऐकवतात बाकी सर्वांची सद्गती करतात. ते धर्म स्थापक जे येतात, त्यांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांची मोठी-मोठी तीर्थस्थाने बनवतात, वास्तविक सर्वांचे तीर्थस्थान हा भारतच आहे, जिथे बेहदचे बाबा येतात. बाबांनी भारतामध्येच येऊन सर्वांची सद्गती केली आहे. बाबा म्हणतात - मला लिबरेटर, गाईड म्हणता ना. मी तुम्हाला या जुन्या दुनियेमधून, दुःखाच्या दुनियेमधून मुक्त करून शांतीधाम, सुखधाममध्ये घेऊन जातो. मुले जाणतात बाबा आम्हाला शांतीधाम, सुखधाम मध्ये घेऊन जातील. बाकीचे सगळे शांतीधाममध्ये जातील. बाबा येऊन दुःखातून लिबरेट करतात (मुक्त करतात). त्यांचा काही जन्म-मृत्यू होत नाही. बाबा आले आणि मग निघून जातील. त्यांच्यासाठी असे थोडेच म्हणणार की मृत्यू झाला. जसे शिवानंद साठी म्हणतात - शरीर सोडले तर आता क्रिया-कर्म (अंतिम संस्कार) करतो. हे बाबा निघून जातील तर तेव्हा त्यांचे क्रिया-कर्म, समारंभ इत्यादी काहीच करावे लागत नाही. ते तर आल्याचे देखील समजून येत नाही. क्रिया-कर्म इत्यादी करण्याचा तर प्रश्नच नाही. बाकी सर्व मनुष्यांचे क्रिया-कर्म करतात. बाबांचे क्रिया-कर्म केले जात नाही, त्यांना शरीरच नाही. सतयुगामध्ये या ज्ञान आणि भक्तीच्या गोष्टी असत नाहीत. ह्या आताच चालतात; बाकीचे सगळे भक्तीच शिकवतात. अर्धा कल्प आहे भक्ती, मग अर्ध्या कल्पानंतर बाबा येऊन ज्ञानाचा वारसा देतात. ज्ञान काही तिथे सोबत येत नाही. तिथे बाबांची आठवण करण्याची गरजच राहत नाही. मुक्तीमध्ये आहेत. तिथे आठवण करावी लागते का? तिथे दुःखाची तक्रार केलीच जात नाही. भक्ती देखील पहिली अव्यभिचारी आणि मग व्यभिचारी होते. यावेळी तर अती व्यभिचारी भक्ती आहे, यालाच रौरव नरक म्हटले जाते. एकदम भयानक ते भयानक नरक आहे मग बाबा येऊन सुंदर स्वर्ग बनवतात. यावेळी आहे १०० टक्के दुःख, मग १०० टक्के सुख-शांती असेल. आत्मा जाऊन आपल्या घरी विश्राम करेल. समजावून सांगण्यासाठी खूप सोपे आहे. बाबा म्हणतात - मी येतोच तेव्हा, जेव्हा नवीन दुनियेची स्थापना करून जुन्या दुनियेचा विनाश करायचा असतो. एवढे कार्य काही फक्त एकटेच तर करणार नाहीत. खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) पुष्कळ पाहिजेत. यावेळी तुम्ही बाबांची खिदमतगार मुले बनला आहात. भारताची खरी सेवा करता. सच्चे बाबा खरी सेवा शिकवतात. आपले देखील, भारताचे देखील आणि विश्वाचे देखील कल्याण करता. तर किती आवडीने केली पाहिजे. बाबा किती आवडीने सर्वांची सद्गती करतात. आता देखील सर्वांची सद्गती जरूर होणार आहे. हा आहे शुद्ध अहंकार, शुद्ध भावना.

तुम्ही सच्ची-सच्ची सेवा करता - परंतु गुप्त. आत्मा करते शरीरा द्वारे. तुम्हाला अनेक जण विचारतात - बी. के. चा उद्देश काय आहे? बोला बी.के. चा उद्देश आहे विश्वामध्ये सतयुगी सुख-शांतीचे स्वराज्य स्थापन करणे. आम्ही दर ५ हजार वर्षानंतर श्रीमतावर विश्वामध्ये शांती स्थापन करून विश्वशांतीचे प्राईज घेतो. यथा राजा-राणी तथा प्रजा प्राईज घेतात. नरकवासी पासून स्वर्गवासी बनणे काही कमी प्राईज आहे का! ते पीस प्राईज घेऊन खुश होत असतात, मिळत तर काहीच नाही. खरे-खरे प्राईज तर आता आपण बाबांकडून घेत आहोत, विश्वाच्या बादशाहीचे. म्हणतात ना - आमचा भारत महान देश आहे. किती महिमा करतात. सर्वजण समजतात आपण भारताचे मालक आहोत, परंतु मालक आहोत कुठे. आता तुम्ही मुले बाबांच्या श्रीमताने राज्य स्थापन करत आहात. शस्त्रास्त्रांची ताकद तर काहीच नाही आहे. दैवी गुण धारण करता म्हणून तुमचेच गायन-पूजन आहे. अंबेची पहा किती पूजा होते. परंतु अंबा कोण आहे, ब्राह्मण आहे की देवता… हे देखील ठाऊक नाही आहे. अंबा, काली, दुर्गा, सरस्वती इत्यादी… अशी अनेक नावे आहेत. इथे देखील खाली अंबेचे छोटेसे मंदिर आहे. अंबेला अनेक भुजा दाखवतात. असे तर काही नाही आहे. याला म्हटले जाते ब्लाइंड फेथ (अंधश्रद्धा). क्राईस्ट बुद्ध इत्यादी आले, त्यांनी आपापला धर्म स्थापन केला, तिथी-तारीख सर्व सांगतात. तिथे ब्लाइंड फेथची तर गोष्टच नाही. इथे भारतवासीयांना काहीच माहित नाही आहे आपला धर्म कधी आणि कोणी स्थापन केला? म्हणून म्हटले जाते ब्लाइंड फेथ. आता तुम्ही पुजारी आहात मग पूज्य बनता. तुमची आत्मा देखील पूज्य तर शरीर देखील पूज्य बनते. तुमच्या आत्म्याची देखील पूजा होते. मग देवता बनता तेव्हा देखील पूजा होते. बाबा तर आहेतच निराकार. ते सदैव पुज्य आहेत. ते कधी पुजारी बनत नाहीत. तुम्हा मुलांसाठी म्हटले जाते - ‘आपेही पूज्य, आपेही पुजारी’. बाबा तर एव्हर पुज्य आहेत, इथे येऊन बाबा खरी सेवा करतात. सर्वांना सद्गती देतात. बाबा म्हणतात - ‘आता मामेकम् (मज एकाची) आठवण करा. इतर कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. इथे तर मोठ-मोठे लखपती, करोडपती जाऊन ‘अल्लाह-अल्लाह’ म्हणतात. किती अंधश्रद्धा आहे. बाबांनी तुम्हाला ‘हम सो’चा अर्थ देखील समजावून सांगितला आहे. ते तर म्हणतात शिवोहम्, आत्मा सो परमात्मा. आता बाबांनी करेक्ट करून सांगितले आहे. आता ठरवा की, भक्ति मार्गामध्ये राईट ऐकले आहे की मी राईट सांगतो? ‘हम सो’ चा अर्थ खूप लांबलचक आहे. हम सो ब्राह्मण, देवता, क्षत्रिय. आता ‘हम सो’ चा कोणता अर्थ राईट आहे? आपण आत्मे चक्रामध्ये असे येतो. विराट रूपाचे चित्र देखील आहे, यामध्ये शिखा ब्राह्मण आणि बाबांना दाखविलेले नाहीये. देवता कुठून आले? उत्पत्ती कुठून झाली? कलियुगामध्ये तर आहे शूद्र वर्ण. सतयुगामध्ये अचानक देवता वर्ण कसा उदयास आला? काहीच समजत नाहीत. भक्ति मार्गामध्ये मनुष्य किती अडकून राहतात. कोणी ग्रंथ वाचला, विचार आला, मंदिर बनवले बस्स, ग्रंथ ऐकवत बसतील. पुष्कळ लोक येतात, अनेक फॉलोअर्स बनतात. फायदा तर काहीच होत नाही. पुष्कळ दुकाने उघडली आहेत. आता ही सर्व दुकाने नष्ट होतील. ही सगळी दुकानदारी भक्ती मार्गामध्ये आहे, याद्वारे खूप धन कमावतात. संन्यासी म्हणतात - आम्ही ब्रह्म योगी, तत्व योगी आहोत. जसे भारतवासी वास्तवामध्ये आहेत देवी-देवता धर्माचे परंतु हिंदू धर्म म्हणतात. तसे ब्रह्म तर तत्व आहे, जिथे आत्मे राहतात. त्यांनी मग ब्रह्म ज्ञानी, तत्त्व ज्ञानी नाव दिले आहे. नाहीतर ब्रह्म तत्व आहे राहण्याचे ठिकाण. तर बाबा म्हणतात किती मोठी चूक केली आहे. हे सगळे आहेत भ्रम. मी येऊन सगळे भ्रम दूर करतो. भक्ती मार्गामध्ये म्हणतात देखील - ‘हे प्रभू तेरी गति मत न्यारी है’. गती तर कोणी करू शकत नाही. मते तर अनेकांची मिळतात. इथले मत किती कमाल करते. साऱ्या विश्वाला चेंज करते.

आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, इतके सर्व धर्म कसे येतात? आणि मग पुन्हा आत्मे कसे आपल्या-आपल्या सेक्शनमध्ये जाऊन राहतात. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. हे देखील मुले जाणतात - दिव्य दृष्टी दाता एक बाबाच आहेत. ब्रह्माबाबा शिवबाबांना म्हणाले - ‘ही दिव्य दृष्टीची चावी मला द्या तर मीही कोणाला साक्षात्कार घडवेन’. तर शिवबाबा म्हणाले - ‘नाही, ही चावी कोणालाही मिळू शकत नाही. त्या बदल्यात मी तुम्हाला विश्वाची बादशाही देतो, मी घेत नाही. साक्षात्कार घडविण्याचा पार्ट माझाच आहे’. साक्षात्कार झाल्यावर किती आनंदीत होतात. मिळत तर काहीच नाही. असे नाही की साक्षात्काराने कोणी निरोगी बनतात किंवा धन मिळते. नाही, मीराला साक्षात्कार झाला परंतु तिला मुक्ती थोडीच मिळाली. लोक समजतात ती तर राहतच होती वैकुंठा मध्ये. परंतु वैकुंठ कृष्णपुरी आहे कुठे. हा सर्व आहे साक्षात्कार. बाबा बसून सर्व गोष्टी समजावून सांगतात. याला (ब्रह्मा बाबांना) देखील अगदी सुरुवातीला विष्णूचा साक्षात्कार झाला तर खूप खुश झाला. हे देखील जेव्हा पाहिले की मी महाराजा बनतो. विनाशही बघितला मग राजाईचा देखील सिन पाहिला. तेव्हा निश्चय बसला - ‘ओहो! मी तर विश्वाचा मालक बनतो. बाबांची प्रवेशता झाली. बस्स, बाबा हे सर्व काही तुम्ही घ्या, मला तर विश्वाची बादशाही पाहिजे’. तुम्ही देखील हाच सौदा करण्याकरिता आला आहात ना. जे ज्ञान घेतात त्यांची मग भक्ती सुटते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) दैवी गुण धारण करून श्रीमतावर भारताची खरी सेवा करायची आहे. आपले, भारताचे आणि साऱ्या विश्वाचे कल्याण अतिशय आवडीने करायचे आहे.

२) ड्रामाच्या अनादि अविनाशी नोंदीला यथार्थपणे समजून टाइम वेस्ट करणारा कोणताही पुरुषार्थ करायचा नाही. व्यर्थ विचार देखील करायचे नाहीत.

वरदान:-
दीपराजबाबां द्वारे अमर ज्योतीचे अभिनंदन स्वीकारणारे सदा अमर भव

भक्त लोक तुम्हा दीपकांचे यादगार जड दीपकांची दीपमाळा साजरी करतात. तुम्ही जागृत झालेले चैतन्य दीपक, बालक बनून दीपकांच्या मालकाशी मंगल मिलन साजरे करता. बापदादा तुम्हा मुलांच्या मस्तकामध्ये जागृत झालेला दीपक पाहत आहेत. तुम्ही अविनाशी, अमर ज्योती स्वरूप मुले दीपराज बाबांद्वारे अभिनंदन स्वीकारत नेहमी अमर भवचे वरदान प्राप्त करत आहात. हे दीपराज बाबा आणि दीपराणींच्या भेटीचीच यादगार ही दीपावली आहे.

बोधवाक्य:-
“आप आणि बाप” दोघे असे कंबाइंड रहा जेणेकरून तिसरा कोणी वेगळे करु शकणार नाही.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.

वर्तमान वेळे प्रमाणे सर्व आत्मे प्रत्यक्ष फळ अर्थात प्रॅक्टिकल प्रूफ पाहू इच्छित आहेत. ते तन, मन, कर्म आणि संपर्क-संबंधामध्ये सायलेन्सच्या शक्तीचा प्रयोग करून पहा. शांतीच्या शक्तीने तुमचा संकल्प वायरलेस पेक्षाही वेगाने कोणत्याही आत्म्याप्रति पोहोचू शकतो. या शक्तीचे विशेष यंत्र आहे ‘शुभ संकल्प’ या संकल्पाच्या यंत्रा द्वारे जे पाहिजे ते सिद्धी स्वरूपामध्ये पाहू शकता.