20-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आठवणीमध्ये राहण्याची प्रॅक्टिस करा तर सदैव हर्षितमुख, पुलकित रहाल,
बाबांची मदत मिळत राहील, कधीही कोमेजणार नाही”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
हे गॉडली स्टुडंट लाईफ (ईश्वरीय विद्यार्थी जीवन) कोणत्या नशेमध्ये व्यतीत करायचे
आहे?
उत्तर:-
नेहमी नशा रहावा की आम्ही या शिक्षणाने प्रिन्स-प्रिन्सेस बनणार. जीवन हसत-खेळत,
ज्ञानाचा डान्स करत व्यतीत करायचे आहे. सदैव वारसदार बनून फूल बनण्याचा पुरुषार्थ
करत रहा. हे आहे प्रिन्स-प्रिन्सेस बनण्याचे कॉलेज. इथे शिकायचे देखील आहे तर
शिकवायचे देखील आहे, प्रजा सुद्धा बनवायची आहे तेव्हाच राजा बनू शकाल. बाबा तर
शिकलेलेच आहेत, त्यांना शिकण्याची आवश्यकता नाही.
गीत:-
बचपन के दिन
भुला न देना...
ओम शांती।
हे गाणे आहे खास मुलांसाठी. भले गाणे आहे फिल्मी परंतु काही गाणी आहेतच तुमच्यासाठी.
जी सपूत (लायक) मुले आहेत त्यांनी गाणे ऐकताना त्याचा अर्थ आपल्या मनामध्ये आणावा
लागतो. बाबा समजावून सांगतात - माझ्या लाडक्या मुलांनो, कारण तुम्ही संतान बनले
आहात. जेव्हा संतान बनाल तेव्हाच तर बाबांच्या वारशाची देखील आठवण राहील. जर संतानच
बनला नाहीत तर आठवण करावी लागेल. मुलांना लक्षात राहते आपण भविष्यामध्ये बाबांचा
वारसा घेणार. हा आहेच राजयोग, प्रजायोग नाही. आपण भविष्यामध्ये प्रिन्स-प्रिन्सेस
बनणार. आपण त्यांची मुले आहोत बाकी जे कोणी मित्र-नातेवाईक इत्यादी आहेत त्या
सर्वांना विसरावे लागते. केवळ एका व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचीही आठवण येऊ नये. देह
सुद्धा आठवता कामा नये. देह-अभिमानाला नाहीसे करून देही-अभिमानी बनायचे आहे.
देह-अभिमानामध्ये आल्यानेच अनेक प्रकारचे संकल्प-विकल्प उलटे खालीच कोसळवून घालतात.
आठवण करण्याची प्रॅक्टिस करत रहाल तर सदैव हर्षितमुख, उमललेल्या फूला प्रमाणे रहाल.
आठवण करायला विसरल्यामुळे फूल कोमेजून जाते. हिम्मते बच्चे मददे बाप. संतानच बनला
नाहीत तर बाबा मदत कोणत्या गोष्टीची करणार? कारण त्यांचा मग माय-बाप आहे रावण माया,
तर मग त्यांच्याकडून मदत मिळेल कोसळण्याची (पतन होण्याची). तर हे सारे गाणे तुम्हा
मुलांवर बनलेले आहे - ‘बचपन के दिन भुला न देना…’ बाबांची आठवण करायची आहे, आठवण
केली नाहीत तर जे आज हसले ते उद्या मग रडत राहतील. आठवण केल्याने सदैव हर्षितमुख
रहाल. तुम्ही मुले जाणता - एकच गीता शास्त्र असे आहे, ज्यामध्ये काही-काही शब्द
बरोबर आहेत. लिहिलेले आहे की, युद्धाच्या मैदानामध्ये मराल तर स्वर्गामध्ये जाल.
परंतु यामध्ये हिंसक युद्धाची तर गोष्टच नाही. तुम्हा मुलांना बाबांकडून शक्ती घेऊन
मायेवर विजय प्राप्त करायचा आहे. तर जरूर बाबांची आठवण करावी लागेल तेव्हाच तुम्ही
स्वर्गाचे मालक बनाल. त्यांनी मग स्थूल शस्त्रे इत्यादी दाखवली आहेत. ज्ञान कटारी,
ज्ञान बाण हे शब्द ऐकले आहेत त्यामुळे स्थूल रूपामध्ये शस्त्रे दिली आहेत. वास्तविक
या आहेत ज्ञानाच्या गोष्टी. बाकी इतक्या भुजा इत्यादी काही कोणाच्या असत नाहीत. तर
हे आहे युद्धाचे मैदान. योगामध्ये राहून शक्ती घेऊन विकारांवर विजय प्राप्त करायचा
आहे. बाबांची आठवण केल्याने वारशाची आठवण येईल. वारसदारच वारसा घेतात. वारसदार बनत
नाही तर मग प्रजा बनतात. हा आहेच राजयोग, प्रजा योग नाही. हे स्पष्टीकरण
बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही.
बाबा म्हणतात - ‘मला
या साधारण तनाचा आधार घेऊन यावे लागते. प्रकृतीचा आधार घेतल्याशिवाय तुम्हा मुलांना
राजयोग कसा शिकवणार? आत्मा शरीराला सोडून देते तेव्हा मग काही संभाषण करू शकत नाही.
मग जेव्हा शरीर धारण करेल, मूल थोडेसे मोठे होईल तेव्हा बाहेर पडेल आणि मग बुद्धी
खुलेल (काम करू लागेल). लहान मुले असतातच पवित्र, त्यांच्यामध्ये विकार असत नाहीत.
संन्यासी लोक शिडी चढून मग खाली उतरतात. स्वतःच्या जीवनाला समजू शकतात. मुले तर
असतातच पवित्र, म्हणूनच मुले आणि महात्मा एकसमान गायले जातात. तर तुम्ही मुले जाणता
हे शरीर सोडून आपण प्रिन्स-प्रिन्सेस बनणार. आधी देखील आपण बनलो होतो, आता परत बनत
आहेत. अशा प्रकारचे विचार विद्यार्थ्यांमध्ये असतात. हे देखील त्यांच्याच
बुद्धीमध्ये येईल जी मुले बनतील आणि मग प्रामाणिक, आज्ञाधारक बनून श्रीमतावर चालत
राहतील. नाहीतर श्रेष्ठ पद प्राप्त करू शकणार नाही. टीचर तर शिकलेलेच आहेत. असे नाही
की ते शिकतात आणि नंतर मग शिकवतात. नाही, टीचर तर शिकलेलेच आहेत. त्यांना नॉलेजफुल
म्हटले जाते. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज इतर कोणीही जाणत नाहीत. सर्वात आधी
तर निश्चय पाहिजे की, ते पिता आहेत. जर कोणाच्या नशिबात नसेल तर मग आतमध्ये संघर्ष
चालत राहील. समजू सुद्धा शकणार नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे जेव्हा तुम्ही
बाबांच्या गोदीमध्ये याल तेव्हा मग हा विकारांचा आजार अजूनच जोरात बाहेर पडेल.
वैद्य लोक देखील म्हणतात - रोग उफाळून येईल. बाबा देखील म्हणतात तुम्ही मुले बनता
तेव्हा मग देह-अभिमानाचा आणि काम-क्रोध इत्यादीचा आजार वाढेल. नाहीतर परीक्षा कशी
होईल? कुठेही गोंधळून जाल तर विचारत रहा. जेव्हा तुम्ही रुस्तम (पैलवान) बनता तेव्हा
माया खूप त्रास देते. तुम्ही बॉक्सिंग मध्ये आहात. संतान बनला नाहीत तर बॉक्सिंगचा
प्रश्नच नाही. ते तर आपल्याच संकल्प-विकल्पांमध्ये गटांगळ्या खात राहतात, आणि कोणती
मदतही मिळत नाही. बाबा समजावून सांगतात - मम्मा-बाबा म्हणता तर मग बाबांची संतान
बनावे लागेल, म्हणजे मग ते मनामध्ये पक्के होऊन जाते की हे आपले रुहानी पिता आहेत.
बाकी हे युद्धाचे मैदान आहे, यामध्ये घाबरायचे नाही की, माहित नाही या वादळामध्ये
आपण टिकू शकू कि नाही? याला कमजोर म्हटले जाते. यामध्ये वाघ बनावे लागते.
पुरुषार्थासाठी चांगले मत घेतले पाहिजे. बाबांना विचारले पाहिजे. बरीच मुले आपली
अवस्था लिहून पाठवतात. बाबांनाच सर्टिफिकेट द्यायचे आहे. यांच्यापासून (ब्रह्मा
बाबांपासून) भले लपवा परंतु शिवबाबांपासून लपू शकत नाही. खूप जण आहेत जे लपवतात
परंतु बाबांपासून काहीही लपू शकत नाही. चांगल्याचे फळ चांगले, वाईटाचे फळ वाईट असते.
सतयुग-त्रेतामध्ये तर सर्वकाही चांगलेच चांगले असते. चांगले-वाईट, पाप-पुण्य इथे
होते. तिथे (सतयुगामध्ये) दान-पुण्य देखील केले जात नाही. आहेच प्रारब्ध. इथे आपण
पूर्णतः सरेंडर होतो तर बाबा २१ जन्मांसाठी रिटर्नमध्ये देतात. फॉलो फादर करायचे आहे.
जर उलटे काम कराल तर नाव देखील बाबांचेच बदनाम कराल म्हणून दंड देखील द्यावा लागतो.
सर्वांना रूप-बसंत देखील बनायचे आहे. आम्हा आत्म्यांना बाबांनी शिकवले आहे तर
आपल्याला मग दुसऱ्यांना शिकवायचे देखील आहे. खऱ्या ब्राह्मणांना खरी गीता ऐकवायची
आहे. आणखी कोणत्या शास्त्रांची गोष्ट नाही. मुख्य आहे गीता. बाकी आहे तिची मुले-बाळे.
त्याने कोणाचे कल्याण होत नाही. मला कुणीही येऊन भेटत नाही. मीच येऊन पुन्हा सहज
ज्ञान, सहज योग शिकवतो. सर्व शास्त्रमई शिरोमणी गीता आहे, त्या खऱ्या गीते द्वारा
वारसा मिळतो. श्रीकृष्णाला देखील गीते द्वारा वारसा मिळाला, गीतेचा देखील पिता जे
रचयिता आहेत, ते बसून वारसा देतात. बाकी गीता धर्मग्रंथाद्वारे काही वारसा मिळत नाही.
रचयिता आहेत एक, बाकी आहे त्यांची रचना. पहिल्या नंबरचा धर्मग्रंथ आहे गीता तर त्या
नंतर जे धर्मग्रंथ बनतात त्यांच्या द्वारे देखील वारसा मिळू शकणार नाही. वारसा
मिळतोच सन्मुख. मुक्तीचा वारसा तर सर्वांनाच मिळणार आहे, सर्वांना परत जायचे आहे.
बाकी स्वर्गाचा वारसा मिळतो शिक्षणाने. मग जो जितका शिकेल. बाबा सन्मुख शिकवत आहेत.
जोपर्यंत निश्चय नाही की कोण शिकवत आहेत तर मग समजणार तरी काय? प्राप्ती काय करू
शकतील? तरीही बाबांकडून ऐकत राहतात तर त्या ज्ञानाचा विनाश होत नाही. जितके सुख
मिळेल मग दुसऱ्यांना देखील सुख द्याल. प्रजा बनवाल तर मग स्वतः राजा बनाल.
आपले आहे स्टुडंट
लाईफ. हसत-खेळत, ज्ञानाचा डान्स करत आपण जाऊन प्रिन्स बनणार. स्टुडंट्स जाणतात -
आपल्याला प्रिन्स बनायचे आहे तर आनंदाचा पारा चढेल. हे तर प्रिन्स-प्रिन्सेसचे
कॉलेज आहे. तिथे (सतयुगामध्ये) प्रिंस-प्रिन्सेसचे वेगळे कॉलेज असते. विमानामध्ये
बसून जातात. तिथली विमाने देखील फुल प्रूफ असतात, कधीही तुटू शकत नाहीत. कधीही
कोणत्याही प्रकारचा ॲक्सीडेंट होणारच नाही. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
एक तर बाबांसोबत पूर्ण बुद्धियोग ठेवावा लागेल, दुसरे, बाबांना सर्व समाचार द्यावा
लागेल की कोण-कोण काट्यांपासून कळ्या बनले आहेत? बाबांसोबत पूर्ण कनेक्शन ठेवावे
लागेल, ज्यामुळे मग टीचर देखील डायरेक्शन देत राहतील. कोण वारसदार बनवून फूल
बनवण्याचा पुरुषार्थ करत आहे? काट्यांपासून कळी तर बनली पाहिजे मग फूल तेव्हा बनेल
जेव्हा संतान बनेल. नाहीतर कळी ती कळीच राहणार अर्थात प्रजेमध्ये येणार. आता जो जसा
पुरुषार्थ करेल, तसे पद प्राप्त करेल. असे नाही, एकाने धाव घेतली तर आपण त्याचे
शेपूट पकडू. भारतवासी असे समजतात. परंतु शेपूट पकडण्याची गोष्टच नाही, जो करेल तो
मिळवेल. जो पुरुषार्थ करेल, २१ पिढी त्याचे प्रारब्ध बनेल. वृद्ध तर जरूर होणार.
परंतु अकाली मृत्यू होत नाही. किती मोठे पद आहे. बाबा समजून जातात की यांचे भाग्य
उघडले आहे, वारसदार बनला आहे. आता पुरुषार्थी आहे मग रिपोर्ट देखील देतात, बाबा,
अशी-अशी विघ्न येतात, असे होते. प्रत्येकाने पोतामेल द्यायचा असतो. इतकी मेहनत आणखी
कोणत्या सत्संगामध्ये असत नाही. बाबा तर छोट्या-छोट्या मुलींना देखील संदेशी बनवतात.
युद्धामध्ये मेसेज घेऊन जाणारे देखील पाहिजेत ना. लढाईचे हे मैदान आहे. इथे तुम्ही
सन्मुख ऐकता तर खूप चांगले वाटते, मन खुश होते. बाहेर गेलात आणि बगळ्यांची संगत
मिळाली तर खुशी उडून जाते. तिथे (बाहेरच्या दुनियेमध्ये) मायेची धूळ आहे ना त्यामुळे
मजबूत बनावे लागेल.
बाबा किती प्रेमाने
शिकवतात, किती सुविधा देतात. असे देखील बरेच आहेत जे चांगले आहे-चांगले आहे असे
म्हणून मग नाहीसे होतात, कोणी विरळाच उभा राहू शकतो. इथे तर ज्ञानाचा नशा पाहिजे.
दारूचा देखील नशा असतो ना. दिवाळे निघालेले असेल आणि दारू पिलेला असेल, आणि जोरात
नशा चढला तर समजेल मी तर महाराजाच आहे. इथे तुम्हा मुलांना रोज ज्ञान अमृताचा प्याला
मिळतो. धारणा करण्यासाठी दररोज असे काही पॉईंट्स मिळत राहतात ज्यामुळे बुद्धीचे
कुलूपच उघडत जाते त्यामुळे कसेही करून मुरली तर वाचायचीच आहे. जसा रोज गीतापाठ
करतात ना. इथे देखील रोज बाबांकडून शिकावे लागेल. बाबांना विचारले पाहिजे - माझी
उन्नती होत नाही, काय कारण आहे? येऊन समजून घेतले पाहिजे. येतील देखील तेच ज्यांना
पूर्ण निश्चय आहे की ते आपले पिता आहेत. असे नाही की, निश्चय बुद्धी होण्यासाठी
पुरुषार्थ करत आहे. निश्चय तर एकच असतो, त्यामध्ये परसेंटेज (कमी-जास्त) असे काही
असत नाही. बाबा एकच आहेत, त्यांच्याकडून वारसा मिळतो. इथे हजारोंनी शिकतात तरी
देखील म्हणतील निश्चय कसा करू? त्यांना तर दुर्दैवी म्हटले जाते. सौभाग्यशाली तो जो
बाबांना ओळखेल आणि मानेल. एखाद्या राजाने म्हटले - येऊन माझा दत्तक मुलगा बन, तर
त्यांच्याकडे दत्तक जाताच क्षणी निश्चय होतो ना. असे म्हणणार नाहीत की, विश्वास कसा
ठेवावा? हा आहेच राजयोग. बाबा तर स्वर्गाचे रचयिता आहेत तर स्वर्गाचे मालक बनवतात.
निश्चय होत नसेल तर तुमच्या भाग्यामध्ये नाही आहे, दुसरा कोणी काय करू शकतो? मानत
नसेल तर मग पुरुषार्थ तरी कसा करू शकेल? तो लंगडतच चालेल. बेहदच्या बाबांकडून
भारतवासीयांना कल्प-कल्प स्वर्गाचा वारसा मिळतो. देवता असतातच स्वर्गामध्ये.
कलियुगामध्ये काही राजाई नाही आहे. प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. पतित दुनिया आहे तर
मग त्याला पावन दुनिया बाबा बनवणार नाहीत तर मग कोण बनवणार? भाग्यामध्ये नसेल तर मग
समजत नाहीत. ही तर समजण्यासाठी एकदम सोपी गोष्ट आहे. लक्ष्मी-नारायणाने या राजाईचे
प्रारब्ध केव्हा मिळवले? जरूर आधीच्या जन्मातील कर्म आहेत तेव्हाच प्रारब्ध मिळवले
आहे. लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते, आता नरकामध्ये आहेत, तर असे श्रेष्ठ कर्म
अथवा राजयोग बाबांशिवाय इतर कोणीही शिकवू शकत नाही. आता सर्वांचा अंतिम जन्म आहे.
बाबा राजयोग शिकवत आहेत. द्वापरमध्ये थोडेच राजयोग शिकवतील. द्वापर नंतर थोडेच
सतयुग येणार. इथे तर खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि जातात. तर बाहेर
गेल्यावरच रिकामे होतात जसे काही डब्बीमध्ये दगड राहतो, रत्न निघून जातात. ज्ञान
ऐकत-ऐकत मग विकारामध्ये गेला तर खल्लास. बुद्धीद्वारे ज्ञान रत्नांची सफाई होते. असे
देखील खूप लिहितात - बाबा, मेहनत करता-करता शेवटी आज घसरलो (पतित झालो). घसरले जणू
आपल्याला आणि कुळाला कलंक लावला, भाग्याला गमावून बसला. घरामध्ये देखील मुले जर असे
कोणते वाईट कर्म करतात तेव्हा असे म्हणतात - असा मुलगा मेलेला बरा. तर हे बेहदचे
बाबा म्हणतात कुलकलंकीत बनू नका. जर विकारांचे दान देऊन मग परत घेतलेत तर पद भ्रष्ट
होईल. पुरुषार्थ करायचा आहे, विजय प्राप्त करायचा आहे. मायेचा वार लागला तरी पुन्हा
उभे राहा. पुन्हा-पुन्हा मार खात राहिलात तर मग हार खाऊन बेशुद्ध पडाल. बाप समजावून
तर खूप सांगतात परंतु कोणी टिकावे तरी. माया खूप शक्तिशाली आहे. पवित्रतेचा प्रण
केला, आणि तरीही कोसळतात (विकारामध्ये जातात) तर खूप जोराने मार लागतो. बेडा (जीवनाची
नाव) पार होतोच मुळी पवित्रतेमुळे. पवित्रता होती तर भारताचा तारा चमकत होता. आता
तर घोर अंधार आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या
युद्धाच्या मैदानामध्ये मायेला घाबरायचे नाही. बाबांकडून पुरुषार्थाकरिता चांगले मत
घ्यायचे आहे. प्रामाणिक, आज्ञाधारक बनून श्रीमतावर चालत रहायचे आहे.
२) रूहानी नशेमध्ये
राहण्यासाठी ज्ञान अमृताचा प्याला रोज प्यायचा आहे. मुरली दररोज वाचायची आहे.
भाग्यवान बनण्याकरिता बाबांविषयी कधीही शंका येता कामा नये.
वरदान:-
ब्रह्मा बाप
समान जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करणारे कर्माच्या बंधनांपासून मुक्त भव
ब्रह्मा बाबा कर्म
करत असताना देखील कर्माच्या बंधनांमध्ये अडकले नाहीत. नाती निभावत असताना देखील
नात्यांच्या बंधनामध्ये बांधले गेले नाहीत. ते धन आणि साधनांच्या बंधनामधून देखील
मुक्त राहिले, जबाबदाऱ्या सांभाळत असताना देखील जीवनमुक्त स्थितीचा अनुभव केला. असे
फॉलो फादर करा. कोणत्याही मागील हिशोबाच्या बंधनामध्ये बांधून घ्यायचे नाही.
संस्कार, स्वभाव, प्रभाव आणि दबावाच्या बंधनामध्ये देखील यायचे नाही तेव्हा म्हणणार
कर्मबंधन मुक्त, जीवन मुक्त.
बोधवाक्य:-
तमोगुणी
वायुमंडळामध्ये स्वतःला सेफ ठेवायचे असेल तर साक्षी होऊन खेळ बघण्याचा अभ्यास करा.