21-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पहाटे उठून बाबांशी गोड रुहरिहान करा, बाबांनी जी शिकवण दिली आहे त्याची उजळणी करत रहा”

प्रश्न:-
पूर्ण दिवस आनंदात जावा यासाठी कोणती युक्ती रचली पाहिजे?

उत्तर:-
रोज अमृतवेलेला उठून ज्ञानाच्या गोष्टींमध्ये तल्लीन व्हा. आपणच आपल्याशी गोष्टी करा. सर्व ड्रामाच्या आदि-मध्य-अंताचे स्मरण करा, बाबांची आठवण करा तर संपूर्ण दिवस आनंदात जाईल. विद्यार्थी आपल्या अभ्यासाची उजळणी करतात. तुम्ही मुले देखील आपली उजळणी करा.

गीत:-
आज अन्धेरे में है इंसान…

ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या मुलांनी गाणे ऐकले. तुम्ही ईश्वराची मुले आहात ना. तुम्ही जाणता ईश्वर आम्हाला मार्ग दाखवत आहेत. ते (दुनियावाले) हाका मारत राहतात की, ‘आम्ही अंधारामध्ये आहोत’, कारण भक्तिमार्ग आहेच अंधाराचा मार्ग. भक्त म्हणतात आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी भटकत आहोत. कधी तीर्थक्षेत्रावर, कधी कुठे दान-पुण्य करतो, मंत्र जपतो. अनेक प्रकारचे मंत्र देतात तरीही कोणी समजतात थोडेच की आपण अंधारामध्ये आहोत. प्रकाश काय गोष्ट आहे - काहीही समजत नाहीत, कारण अंधारामध्ये आहेत. आता तुम्ही काही अंधारामध्ये नाही आहात. तुम्ही वृक्षामध्ये सुरुवातीला येता. नवीन दुनियेमध्ये जाऊन राज्य करता, मग शिडी खाली उतरता (पतन होते). याच्या दरम्यान इस्लामी, बौद्धि, ख्रिश्चन येतात. आता बाबा पुन्हा कलम लावत आहेत. पहाटे उठून अशा प्रकारे ज्ञानाच्या गोष्टींमध्ये तल्लीन झाले पाहिजे. किती हे वंडरफुल नाटक आहे, या ड्रामाच्या फिल्मच्या रिळाचा कालावधी ५००० वर्षे आहे. सतयुगाचा कालावधी इतका, त्रेताचा कालावधी इतका… बाबांमध्ये देखील हे सारे ज्ञान आहे ना. दुनियेमध्ये इतर कोणीही जाणत नाहीत. तर मुलांना पहाटे उठून एक तर बाबांची आठवण करायची आहे आणि आनंदामध्ये ज्ञानाचे चिंतन करायचे आहे. आता आपण साऱ्या ड्रामाच्या आदी-मध्य-अंताला जाणले आहे. बाबा म्हणतात कल्पाचा कालावधीच ५००० वर्षे आहे. मनुष्य म्हणतात लाखो वर्षे. किती वंडरफुल नाटक आहे. बाबा बसून जी शिकवण देतात त्यावर मग बसून मनन चिंतन केले पाहिजे, उजळणी केली पाहिजे. विद्यार्थी अभ्यासाची उजळणी करतात ना.

तुम्ही गोड-गोड मुलांनी साऱ्या ड्रामाला जाणले आहे. बाबांनी किती सोप्या पद्धतीने सांगितले आहे की हा अनादि, अविनाशी ड्रामा आहे. यामध्ये जिंकतात आणि मग हरतात. आता चक्र पूर्ण झाले, आपल्याला आता घरी जायचे आहे. बाबांचा आदेश मिळाला आहे - ‘मज पित्याची आठवण करा’. या ड्रामाचे नॉलेज एक बाबाच देतात. नाटक कधी लाखो वर्षांचे थोडेच असते. कोणाच्या लक्षातसुद्धा राहणार नाही. ५००० वर्षांचे चक्र आहे जे पूर्ण तुमच्या बुद्धीमध्ये आहे. किती सुंदर हार आणि जीतचा खेळ आहे. पहाटे उठून अशा प्रकारे विचार चालले पाहिजेत. आपल्याला बाबा रावणावर विजय प्राप्त करून देतात. पहाटे उठून अशा प्रकारच्या गोष्टी स्वतः सोबत केल्या पाहिजे तर सवय लागेल. या बेहदच्या नाटकाला कोणीही जाणत नाही. ॲक्टर असूनही आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. आता आपण बाबांद्वारे लायक बनत आहोत.

बाबा आपल्या मुलांना आप समान बनवतात. आपसमानच काय परंतु बाबा तर मुलांना आपल्या खांद्यावर उचलून घेतात. बाबांचे मुलांवर किती प्रेम आहे. किती चांगल्या प्रकारे समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. मी बनत नाही, तुम्हा मुलांना बनवतो. तुम्हा मुलांना गुल-गुल (फूल) बनवून मग टीचर बनून शिकवतो. मग सद्गतीकरिता ज्ञान देऊन तुम्हाला शांतिधाम-सुखधामचा मालक बनवतो. मी तर निर्वाणधाममध्ये जाऊन बसतो. लौकिक पिता देखील मेहनत करून, धन कमावून सर्वकाही मुलांना देऊन आपण वानप्रस्थमध्ये जाऊन भजन इत्यादी करतात. परंतु इथे तर बाबा म्हणतात जर वानप्रस्थ अवस्था आहे तर मुलांना समजावून सांगून तुम्हाला या सेवेमध्ये रुजू व्हायचे आहे. मग गृहस्थ व्यवहारामध्ये अडकून पडायचे नाही. तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत रहा. आता तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे तुम्हाला वाणी पासून दूर घेऊन जाण्याकरिता. अपवित्र आत्मे काही जाऊ शकत नाहीत. हे बाबा सन्मुख समजावून सांगत आहेत. मजा देखील सन्मुख असण्यामध्येच आहे. तिथे (सेंटरवर) तर मग मुले बसून ऐकवतात. इथे बाबा सन्मुख आहेत तेव्हाच तर मधुबनची महिमा आहे ना. तर बाबा म्हणतात, पहाटे उठण्याची सवय लावा. मनुष्य भक्ती देखील पहाटे उठून करतात परंतु त्यामुळे वारसा तर मिळत नाही, वारसा मिळतो रचता बाबांकडून. कधी रचने कडून वारसा मिळू शकत नाही; म्हणूनच म्हणतात आम्ही रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाही. जर ते जाणत असते तर परंपरेने चालत आले असते. मुलांनी हे देखील समजावून सांगायचे आहे की, आपण किती श्रेष्ठ धर्माचे होतो आणि मग कसे धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट बनलो आहोत. माया बुद्धीला गोदरेजचे कुलूप लावते म्हणून भगवंताला म्हणतात - तुम्ही बुद्धिवानांची बुद्धी आहात, यांच्या बुद्धीचे कुलूप उघडा. आता तर बाबा सन्मुख समजावून सांगत आहेत - ‘मी ज्ञानाचा सागर आहे, तुम्हाला यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) समजावून सांगतो’. कोणते ज्ञान? हे सृष्टी चक्राचे आदि, मध्य, अंताचे ज्ञान जे कोणताही मनुष्य देऊ शकत नाही.

बाबा म्हणतात, सत्संग इत्यादीमध्ये जाण्यापेक्षा देखील शाळेमध्ये शिकणे चांगले. शिक्षण सोर्स ऑफ इन्कम आहे. सत्संगामध्ये तर काहीच मिळत नाही. दान-पुण्य करा, असे करा, दक्षिणा ठेवा, खर्चच खर्च आहे. पैसे देखील ठेवा, डोके सुद्धा टेकवा, माथाच झिजून जातो. आता तुम्हा मुलांना जे ज्ञान मिळत आहे, त्याचे चिंतन करण्याची सवय लावा आणि दुसऱ्यांना देखील समजावून सांगा. बाबा म्हणतात आता तुमच्या आत्म्यावर बृहस्पतीची दशा आहे. वृक्षपती भगवान तुम्हाला शिकवत आहेत, तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. भगवान शिकवून आम्हाला भगवान भगवती बनवतात, ओहो! अशा बाबांची जितकी आठवण कराल तितकी विकर्म विनाश होतील. अशा प्रकारे विचार सागर मंथन करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आजोबा आपल्याला या बाबांद्वारे (ब्रह्मा द्वारे) वारसा देत आहेत. स्वतः म्हणतात - मी या रथाचा आधार घेतो. तुम्हाला ज्ञान मिळत आहे ना. ज्ञानगंगा ज्ञान ऐकवून पवित्र बनवतात की गंगेचे पाणी? आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही खऱ्या अर्थाने भारताची सेवा करता’. ते सोशल वर्कर्स तर हदची सेवा करतात. ही आहे रूहानी खरी सेवा. भगवानुवाच समजावून सांगतात - भगवान पुनर्जन्म रहीत आहेत. श्रीकृष्ण तर पूर्ण ८४ जन्म घेतात. गीतेमध्ये त्यांचे नाव घातले आहे. नारायणाचे नाव का नाही वापरत? ते देखील कोणाला माहिती नाही आहे की श्रीकृष्णच श्रीनारायण बनतात. श्रीकृष्ण प्रिन्स होता मग राधा सोबत स्वयंवर झाले. आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे. समजता, शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत. ते बाबा देखील आहेत, टिचर, सद्गुरु देखील आहेत. सद्गती देतात. उच्च ते उच्च भगवान शिवच आहेत. ते म्हणतात - ‘माझी निंदा करणारे उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. मुले जर नीट अभ्यास करत नसतील तर गुरुजींविषयीचा आदर नष्ट होतो. बाबा म्हणतात तुम्ही माझी इज्जत घालवू नका. अभ्यास करत रहा. एम ऑब्जेक्ट तर समोर उभे आहे. ते गुरु लोक मग स्वतःसाठी म्हणतात, ज्यामुळे लोक घाबरतात. असे समजतात कोणता शाप मिळू नये. गुरु कडून मिळालेले मंत्रच ऐकवत राहतात. संन्याशांना विचारले जाते की तुम्ही घरदार कसे सोडले? तर म्हणतात या व्यक्त गोष्टी (स्थूल गोष्टी) विचारू नका. अरे, का नाही सांगत? आम्हाला काय माहिती तुम्ही कोण आहात? शुरुड बुद्धिवाले (हुशार असणारे) अशा गोष्टी करतात. अज्ञान काळामध्ये कोणा-कोणाला नशा असतो. स्वामी रामतीर्थांचा अनन्य शिष्य स्वामी नारायण होता. त्यांची पुस्तके इत्यादी बाबांनी वाचलेली आहेत. बाबांना हे सर्व वाचण्याची आवड होती. लहानपणीच वैराग्य येत असे. मग एकदा सिनेमा बघितला, बस वृत्ती खराब झाली. साधूपणा निघून गेला. तर आता बाबा समजावून सांगत आहेत - ते सर्व गुरु इत्यादी आहेत भक्ती मार्गाचे. सर्वांचा सद्गती दाता तर एकच आहे, ज्याची सर्वजण आठवण करतात. गातात देखील - ‘मेरा तो एक गिरधर गोपाल दुसरा न कोई’. ‘गिरिधर’, श्रीकृष्णाला म्हणतात. खरेतर शिव्या हे ब्रह्मा खातात. श्रीकृष्णाची आत्मा शेवटच्या जन्मात जेव्हा गावातील मुलगा तमोप्रधान आहे तेव्हा शिव्या खाल्ल्या आहेत. वास्तविक श्रीकृष्णाची आत्मा तर हीच आहे ना. गावामध्ये लहानाचा मोठा झाला आहे. रस्त्यात चालता-चालता ब्राह्मण फसला अर्थात बाबांनी प्रवेश केला, किती शिव्या खाल्ल्या. अमेरिकेपर्यंत आवाज गेला होता. वंडरफुल ड्रामा आहे. आता तुम्ही जाणता तर आनंद होतो. आता बाबा समजावून सांगतात हे चक्र कसे फिरते? आपण कसे ब्राह्मण होतो मग देवता, क्षत्रिय… बनलो. हे ८४ चे चक्र आहे. हे सर्व लक्षात ठेवायचे आहे. रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणून घ्यायचे आहे, जे कोणीही जाणत नाहीत. तुम्ही मुले समजता आपण विश्वाचे मालक बनत आहोत, यामध्ये कोणता त्रास तर नाही. असे थोडेच म्हणतात की, पद्मासन इत्यादी घालून बसा. हठयोग असा काही शिकवतात की काही विचारू नका. काहींचे तर डोकेच खराब होते. बाबा किती सहज कमाई करवून देतात. ही आहे २१ जन्मांसाठी खरी कमाई. तुमच्या तळहातावर स्वर्ग आहे. बाबा मुलांसाठी स्वर्गाची सौगात घेऊन येतात. असे दुसरा कोणता मनुष्य म्हणू शकत नाही. बाबाच म्हणतात, याची (ब्रह्माची) आत्मा देखील ऐकते. तर मुलांनी पहाटे उठून अशा प्रकारे विचार केले पाहिजेत. भक्त लोक देखील पहाटे गुप्तपणे माळा जपतात. त्याला गऊमुख म्हणतात. त्यामध्ये हात घालून माळ जपतात. राम-राम… जणूकाही वाद्य वाजत आहे. खरे पाहता बाबांची आठवण करणे हे गुप्त आहे, अजपाजप याला म्हटले जाते. आनंद होतो, किती वंडरफुल ड्रामा आहे. हे बेहदचे नाटक आहे जे तुमच्या शिवाय इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे. तुमच्यातही नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत. आहे खूप सोपे. आम्हाला तर आता ईश्वर शिकवतात. बस्स, त्यांचीच आठवण करायची आहे. वारसा देखील त्यांच्याकडूनच मिळतो. या बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) तर झटक्यात सर्वकाही सोडून दिले कारण मधेच बाबांची प्रवेशता झाली ना. सर्व काही या मातांना अर्पण केले. बाबांनी सांगितले - इतकी मोठी स्थापना करायची आहे, सर्व काही या सेवेमध्ये लाव. एक पैसा देखील कोणाला द्यायचा नाही. इतके नष्टोमोहा असायला हवे. ध्येय मोठे आहे. संत मीराबाईने लोकलाज विकारी कुळाची मर्यादा सोडली तर तिचे किती मोठे नाव आहे. या मुली सुद्धा म्हणतात आम्ही लग्न करणार नाही. लखपती असो, कोणीही असो, आम्ही तर बेहदच्या बाबांकडून वारसा घेणार. तर असा नशा चढला पाहिजे. बेहदचे बाबा बसून मुलांचा शृंगार करतात. यामध्ये पैसे इत्यादीची गरजच नाही. लग्नाच्या दिवशी वनवासात बसवतात, जुने फाटलेले कपडे इत्यादी घालायला देतात. मग लग्नानंतर नवीन कपडे, दागिने इत्यादी घालतात. हे बाबा म्हणतात मी तुम्हाला ज्ञान रत्नांनी शृंगारतो, मग तुम्ही हे लक्ष्मी-नारायण बनाल. असे इतर कोणी म्हणू शकत नाही.

बाबाच येऊन पवित्र प्रवृत्ती मार्गाची स्थापना करतात म्हणून विष्णूला देखील ४ भुजा दाखवतात. शंकरासोबत पार्वती, आणि ब्रह्मा सोबत सरस्वती दाखवली आहे. आता ब्रह्माची काही कोणती पत्नी नाही आहे. हे तर बाबांचे बनले. कशा अद्भुत गोष्टी आहेत. माता-पिता तर हे आहेत ना. हे प्रजापिता देखील आहेत, मग यांच्याद्वारे पिता रचतात तर माता देखील झाले. सरस्वती ब्रह्माची मुलगी गायली जाते. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. जसे बाबा सकाळी उठून विचार सागर मंथन करतात, मुलांना देखील फॉलो करायचे आहे. तुम्ही मुले जाणता की हा जय-पराजयाचा अद्भुत खेळ बनलेला आहे, याला पाहून आनंद होतो, द्वेष वाटत नाही. आपण असे समजतो की, आम्ही साऱ्या ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे, त्यामुळे द्वेष करण्याची तर गोष्टच नाही. तुम्हा मुलांना मेहनत देखील करायची आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये रहायचे आहे, पावन बनण्याचा विडा उचलायचा आहे. आम्ही युगल एकत्र राहून पवित्र दुनियेचे मालक बनणार. मग कोणी-कोणी तर फेल सुद्धा होतात. बाबांच्या हातामध्ये कोणते शास्त्र इत्यादी नाही आहे. हे तर शिवबाबा म्हणतात - ‘मी ब्रह्माद्वारे तुम्हाला सर्व वेद-शास्त्रांचे सार ऐकवतो, श्रीकृष्ण नाही. किती फरक आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पूर्णतः अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे. असे कोणते कर्म होऊ नये ज्यामुळे पिता, टिचर आणि सद्गुरूची निंदा होईल. आदर गमावणारे कोणतेही कर्म करायचे नाही.

२) विचार सागर मंथन करण्याची सवय लावायची आहे. बाबांकडून जे ज्ञान मिळाले आहे त्याचे चिंतन करत अपार खुशीमध्ये रहायचे आहे. कोणाचाही द्वेष करायचा नाही.

वरदान:-
संपूर्णतेच्या प्रकाशाद्वारे अज्ञानाचा पडदा दूर करणारे सर्च लाईट भव

आता प्रत्यक्षतेची वेळ जवळ येत आहे त्यामुळे अंतर्मुखी बनून गूढ अनुभवांच्या रत्नांनी स्वतःला भरपूर करा, अशी सर्च लाईट बना जी तुमच्या संपूर्णतेच्या प्रकाशाने अज्ञानाचा पडदा दूर होईल कारण तुम्ही धरतीवरील तारे या विश्वाला अशांततेपासून वाचविणारे आणि सुखी संसार, स्वर्णिम संसार बनविणारे आहात. तुम्ही पुरुषोत्तम आत्मे विश्वाला सुख-शांतीचा श्र्वास देण्यासाठी निमित्त आहात.

बोधवाक्य:-
माया आणि प्रकृतीच्या आकर्षणापासून दूर रहा तेव्हाच सदैव हर्षित रहाल.

आपल्या शक्तिशाली मनसा द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

जेव्हा मनसामध्ये नेहमी शुभ भावना आणि शुभ आशीर्वाद देण्याचा अभ्यास नैसर्गिक होईल तेव्हा तुमची मनसा बिझी होईल. मनामध्ये जी अशांतता निर्माण होते, त्यापासून आपोआपच दूर जाल. कधी-कधी आपल्या पुरुषार्थामध्ये जे निराश होता ते होणार नाही. जादुई मंत्र होईल.