21-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - एका बाबांच्या आठवणीद्वारे तुम्हाला सुप्रीम बनायचे असेल तर चुकून सुद्धा इतर कोणाचीही आठवण करायची नाही”

प्रश्न:-
बाबांकडे कोणती आशा न ठेवता, कृपा मागण्याच्या ऐवजी, आपली मेहनत करायची आहे?

उत्तर:-
जुन्या शरीराचा कोणताही कर्मभोग आहे, दिवाळे निघाले किंवा आजारी पडलात, तर बाबा म्हणतील - हा तर तुमचा हिशोब आहे, अशी आशा ठेवू नका की, यामध्ये बाबांनी काही कृपा करावी. आपली मेहनत करून योगबलाचा वापर करा, आठवणीनेच आयुष्य वाढेल. कर्मभोग चुकता होईल. बाबा जे प्राणापेक्षाही प्रिय आहेत, त्यांच्यावर जितके प्रेम असेल तितकी आठवण राहील आणि कल्याण होत जाईल.

ओम शांती।
बेहदचे बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा आणि आपल्या घराची आठवण करा. त्याला म्हटलेच जाते टॉवर ऑफ सायलेन्स. टॉवर ऑफ सुख. टॉवर खूप उंच असतो. तुम्ही तिथे जाण्याकरिता पुरुषार्थ करत आहात. उच्च ते उच्च टॉवर ऑफ सायलेन्समध्ये तुम्ही कसे जाऊ शकता, हे देखील टॉवरमध्ये राहणारे बाबा बसून शिकवत आहेत. मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. मी आत्मा शांतीधामची निवासी आहे. ते आहे बाबांचे घर. ही चालता-फिरता सवय लावायची आहे. स्वतःला आत्मा समजा आणि शांतीधाम सुखधामाची आठवण करा. बाबा जाणतात यामध्येच मेहनत आहे. जे आत्म-अभिमानी होऊन राहतात त्यांना म्हटले जाते महावीर. आठवणीद्वारेच तुम्ही महावीर, सुप्रीम बनता. सुप्रीम अर्थात शक्तिशाली.

मुलांना आनंद झाला पाहिजे - स्वर्गाचा मालक बनवणारे बाबा, विश्वाचा मालक बनवणारे बाबा आम्हाला शिकवत आहेत. आत्म्याची बुद्धी बाबांकडे निघून जाते. हे आहे - आत्म्याचे प्रेम एका बाबांवर. पहाटे लवकर उठून बाबांशी गोड-गोड गोष्टी करा. बाबा तुमची तर कमाल आहे, स्वप्नामध्ये देखील नव्हते तुम्ही आम्हाला स्वर्गाचा मालक बनवाल. बाबा आम्ही तुमच्या शिकवणीप्रमाणे जरूर चालणार. कोणतेही पाप कर्म करणार नाही. बाबा (ब्रह्मा बाबा) जसा पुरुषार्थ करतात, मुलांना देखील ऐकवतात. शिवबाबांना इतकी असंख्य मुले आहेत, काळजी तर वाटेलच ना. किती मुलांचे पालनपोषण होत आहे. इथे तुम्ही ईश्वरीय परिवारामध्ये बसला आहात. बाबा सन्मुख बसले आहेत. ‘तुम्हीं से खाऊं, तुम्हीं से बैठूँ…’ तुम्ही जाणता शिवबाबा यांच्यामध्ये येऊन सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. देहा सहित देहाच्या सर्व नात्यांना विसरून जा. हा अंतिम जन्म आहे. ही जुनी दुनिया, जुना देह नष्ट होणार आहे. एक म्हण देखील आहे - ‘आप मुये मर गई दुनिया’. पुरुषार्थासाठी संगमाचा हा थोडासा काळ आहे. मुले विचारतात - ‘बाबा, हे शिक्षण किती वेळ चालेल?’ जोपर्यंत दैवी राजधानी स्थापन होत नाही तोपर्यंत सांगत राहतील. नंतर मग नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर होतील. हे जुने शरीर आहे, काही ना काही कर्मभोग चालूच असतो, यामध्ये बाबा मदत करतील - ही आशा ठेवायची नाही. दिवाळे निघाले, आजारी पडला - बाबा म्हणतील - ‘हा सर्व तुमचा हिशोब आहे. होय, तरीही योगबळाने आयुष्य वाढेल. आपली मेहनत करा. कृपा मागू नका. बाबांची जितकी आठवण कराल; यामध्येच कल्याण आहे, जितके शक्य होईल योगबलाचा वापर करा. गातात देखील ना - ‘मुझे पलकों में छिपा लो…’ आवडत्या वस्तूला ‘नुरे रत्न’, ‘प्राण प्रिय’ म्हटले जाते. हे बाबा तर खूप प्रिय आहेत, परंतु आहेत गुप्त. त्यांच्यावर असे प्रेम असले पाहिजे काही विचारू नका. बाबांना तर मुलांनी आपल्या डोळ्यांच्या पापण्यांमध्ये लपवून ठेवायचे आहे. पापण्या म्हणजे काही हे डोळे नाहीत. हे तर बुद्धीमध्ये लक्षात ठेवायचे आहे. मोस्ट बिलवेड निराकार बाबा आपल्याला शिकवत आहेत. ते ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, प्रेमाचा सागर आहेत. अशा मोस्ट बिलवेड (अति प्रिय) बाबांवर किती प्रेम असले पाहिजे. मुलांची किती निष्काम सेवा करतात. पतित शरीरामध्ये येऊन तुम्हा मुलांना हिऱ्या समान बनवतात. किती गोड बाबा आहेत. तर मुलांनी देखील असे गोड बनायचे आहे. किती निरहंकारीपणे बाबा तुम्हा मुलांची सेवा करत आहेत, तर तुम्हा मुलांना देखील एवढी सेवा केली पाहिजे. श्रीमतावर चालले पाहिजे. कुठे आपले मत दाखवलेत तर भाग्याला लकीर लागेल. तुम्ही ब्राह्मण ईश्वरीय संतान आहात. ब्रह्माची संतान भाऊ-बहीणी आहात. ईश्वरीय नातवंडे आहात. त्यांच्याकडून वारसा घेत आहात. जितका पुरुषार्थ कराल तितके पद प्राप्त कराल. यामध्ये साक्षी होऊन राहण्याचा देखील खूप अभ्यास पाहिजे. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, हे आत्म्यांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा, चुकूनही बाबांव्यतिरिक्त इतर कोणाचीही आठवण करायची नाही. तुम्ही प्रतिज्ञा केली आहे - ‘बाबा, माझे तर एक तुम्हीच आहात. मी आत्मा आहे, तुम्ही परमात्मा आहात. तुमच्याकडूनच वारसा घ्यायचा आहे. तुमच्याकडूनच राजयोग शिकत आहोत, ज्याद्वारे राज्य भाग्य प्राप्त करतो.

गोड मुलांनो, तुम्ही जाणता हा अनादि ड्रामा आहे, यामध्ये हार आणि जीतचा खेळ चालतो. जे होते ते योग्यच आहे. क्रियेटरला ड्रामा जरूर पसंत असेल ना, तर क्रियेटरच्या मुलांना देखील पसंत असेल. या ड्रामामध्ये बाबा एकदाच मुलांकडे मुलांची अंतःकरणापासून, उत्कट प्रेमाने सेवा करण्याकरिता येतात. बाबांना तर सर्व मुले प्रिय आहेत. तुम्ही जाणता सतयुगामध्ये देखील सर्वजण एकमेकांवर खूप प्रेम करतात. जनावरांवर देखील प्रेम राहते. असे कोणते प्राणी नसतील जे प्रेमाने राहत नसतील. तर तुम्हा मुलांना इथे मास्टर प्रेमाचा सागर बनायचे आहे. इथे बनाल तर ते संस्कार अविनाशी बनतील. बाबा म्हणतात - कल्पापूर्वी प्रमाणे हुबेहूब पुन्हा तुम्हाला प्रेमळ बनवण्याकरिता आलो आहे. कधी कोणत्या मुलाचा चिडलेला आवाज ऐकतात तर बाबा शिकवण देतात - मुलांनो, क्रोध करणे उचित नाही, यामुळे तुम्ही सुद्धा दुःखी व्हाल आणि दुसऱ्यांना देखील दुःखी कराल. बाबा कायमसाठी सुख देणारे आहेत तर मुलांना देखील बाप समान बनायचे आहे. एकमेकांना कधीही दुःख द्यायचे नाही.

तुम्ही मुले जाणता शिवबाबा आहेत - ‘सुबह का सांई…’ रात्रीचा दिवस किंवा सकाळ बनवणारे आहेत. सांई म्हटले जाते बेहदच्या पित्याला. ते एकच सांई बाबा, भोलेनाथ शिवबाबा आहेत. नावच आहे - भोलानाथ. भोळ्याभाबड्या कन्या आणि मातांवर ज्ञानाचा कलश ठेवतात. त्यांनाच विश्वाचा मालक बनवतात. किती सोपा उपाय सांगतात. किती प्रेमाने तुमची ज्ञानाची पालना करतात. आत्म्याला पावन बनविण्याकरिता आठवणीच्या यात्रेमध्ये रहा. योगाचे स्नान करायचे आहे. ज्ञान आहे अभ्यास. योग-स्नानाद्वारे पापे भस्म होतात. स्वतःला आत्मा समजण्याचा अभ्यास करत रहा, तर हा देहाचा अहंकार एकदम नष्ट होईल. योगाद्वारेच पवित्र सतोप्रधान बनून बाबांकडे जायचे आहे. बरीच मुले या गोष्टींना चांगल्या रीतीने समजत नाहीत. आपला खरा-खरा चार्ट सांगत नाहीत. अर्धाकल्प खोट्या दुनियेमध्ये राहिले आहेत तर खोटेपणा जणू काही आत मध्ये पक्का झाला आहे. बाबांना सच्चाईने आपला चार्ट सांगितला पाहिजे. चेक करायचे आहे - मी पाऊण तास बसलो, यामध्ये किती वेळ स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केली! कित्येकांना खरे सांगण्याची लाज वाटते. हे तर लगेच ऐकवतील की, एवढी सेवा केली, इतक्या जणांना ज्ञान समजावून सांगितले, परंतु आठवणीचा चार्ट किती राहिला, ते खरे सांगत नाहीत. आठवणीमध्ये न राहिल्या कारणानेच तुमचा कोणाला तीर लागत नाही (ज्ञान काळजाला भिडत नाही). ज्ञान तलवार धारदार (शक्तिशाली) होत नाही. कोणी म्हणतात - आम्ही तर निरंतर आठवणीमध्ये राहतो, बाबा म्हणतात - ती अवस्था नाहीये. निरंतर आठवण राहीली मग तर कर्मातीत अवस्था होईल. ज्ञानाची पराकाष्ठा दिसून यावी, यामध्ये खूप मेहनत आहे. विश्वाचा मालक असेच थोडेच बनाल. एका बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण राहू नये. या देहाची सुद्धा आठवण येऊ नये. अशी अवस्था तुमची अंताला होईल. आठवणीच्या यात्रेद्वारेच तुमची कमाई होत राहील. जर शरीर सुटले तर मग कमाई करू शकणार नाही. भले आत्मा संस्कार घेऊन जाईल परंतु टीचर तर पाहिजेत ना जी मग आठवण करून देईल. बाबा वारंवार आठवण करून देत राहतात. अशी अनेक मुले आहेत जी गृहस्थ व्यवहारामध्ये राहून, नोकरी इत्यादी करत असूनही उच्च पद प्राप्त करण्यासाठी श्रीमतावर चालून आपले भविष्य देखील जमा करत राहतात. बाबांकडून सल्ला घेत राहतात. पैसे असतील तर त्याला सफल कसे करावे. बाबा म्हणतात - सेंटर उघडा, ज्याद्वारे अनेकांचे कल्याण होईल. मनुष्य दान-पुण्य इत्यादी करतात आणि दुसऱ्या जन्मामध्ये त्याचे फळ मिळते. तुम्हाला देखील भविष्य २१ जन्मांकरिता राज्य-भाग्य मिळते. तुमची ही नंबर वन बँक आहे, यामध्ये चार आणे टाकाल तर भविष्यामध्ये हजार बनतील. दगडाचे सोने बनेल. तुमची प्रत्येक वस्तू पारस बनेल. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, उच्च पद प्राप्त करायचे असेल तर माता-पित्याला पूर्ण फॉलो करा आणि आपल्या कर्मेंद्रियांवर कंट्रोल ठेवा. जर कर्मेंद्रिया वश नसतील, वर्तन ठीक नसेल तर उच्च पदापासून वंचित रहाल. आपल्या वर्तनाला सुधारायचे आहे. जास्त इच्छा ठेवायच्या नाहीत.

बाबा तुम्हा मुलांचा ज्ञानाने किती शृंगार करून सतयुगाचे महाराजा-महाराणी बनवत आहेत, यामध्ये सहनशीलतेचा गुण खूप चांगला पाहिजे. देहावर टू मच मोह असता कामा नये. योगबलाचा देखील वापर करायचा आहे. बाबांना कितीही खोकला इत्यादी येतो तरी देखील नेहमी सेवेमध्ये तत्पर राहतात. ज्ञान योगाद्वारे शृंगार करून मुलांना लायक बनवतात. तुम्ही आता ईश्वरीय गोदमध्ये, माता-पित्याच्या गोदमध्ये बसले आहात. बाबा ब्रह्मा मुखाद्वारे तुम्हा मुलांना जन्म देतात तर ही माता झाली. परंतु तुमची बुद्धी तरी देखील शिवबाबांकडे जाते. ‘तुम मात-पिता हम बालक तेरे…’ तुम्हाला सर्वगुण संपन्न इथेच बनायचे आहे. वारंवार मायेकडून हार खायची नाही. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा’. असे स्वतःला समजणे किती गोड वाटते. आपण कोण होतो, आता काय बनत आहोत.

हा ड्रामा कसा वंडरफुल बनलेला आहे हे देखील आता तुम्हाला समजले आहे. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे फक्त एवढे जरी आठवणीत राहिले तरी देखील निश्चय होतो की आपण सतयुगामध्ये जाणार आहोत, आता संगमावर आहोत. आपल्या घरी परत जायचे आहे त्यामुळे पावन तर जरूर बनायचे आहे. मनातून खूप आनंद झाला पाहिजे. ओहो! बेहदचे बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो माझी आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल. विश्वाचे मालक बनाल’. बाबा मुलांवर किती प्रेम करतात. असे नाही की फक्त टीचरच्या रूपामध्ये शिकवून मग निघून जातात. हे तर पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत. तुम्हाला शिकवतात देखील. आठवणीची यात्रा देखील शिकवतात.

अशा विश्वाचे मालक बनविणाऱ्या, पतितापासून पावन बनविणाऱ्या बाबांवर किती प्रेम असले पाहिजे. पहाटे लवकर उठताच सर्वात पहिले शिवबाबांना गुड मॉर्निंग केले पाहिजे. गुड मॉर्निंग अर्थात आठवण कराल तर खूप आनंदात रहाल. मुलांना आपल्या मनाला विचारायचे आहे की, आपण पहाटे उठून बेहदच्या बाबांची किती आठवण करतो. लोकं भक्ती देखील पहाटे करतात ना. भक्ती किती प्रेमाने करतात. परंतु बाबा जाणतात बरीच मुले अंतःकरणापासून, उत्कट प्रेमाने आठवण करत नाहीत. पहाटे उठून बाबांना गुड मॉर्निंग कराल, ज्ञानाच्या चिंतनामध्ये रहाल तर आनंदाचा पारा चढेल. बाबांना गुड मॉर्निंग केले नाहीत तर पापाचे ओझे कसे उतरेल. मुख्य आहेच आठवण, याद्वारे तुमची भविष्यासाठी खूप भारी कमाई होते. कल्प-कल्पांतर ही कमाई उपयोगाला येईल. अतिशय धैर्याने, गंभीरतापूर्वक, समजून घेऊन आठवण करायची असते. स्थूल रूपामध्ये निदान एवढे तरी म्हणतात की, आम्ही बाबांची खूप आठवण करतो परंतु अचूक आठवण करण्यामध्ये मेहनत आहे. जे बाबांची जास्त आठवण करतात त्यांना जास्त करंट मिळतो कारण आठवणीला आठवण जुळते. योग आणि ज्ञान या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. योगाचा सब्जेक्ट वेगळा आहे. खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. योगानेच आत्मा सतोप्रधान बनते. आठवणी शिवाय सतोप्रधान होणे, असंभव आहे. चांगल्या रीतीने प्रेमाने बाबांची आठवण कराल तर ऑटोमॅटिकली करंट मिळेल, हेल्दी बनाल. करंटने आयुष्य देखील वाढते. मुले आठवण करतात तर बाबा देखील सर्चलाईट देतात. बाबा किती जबरदस्त खजिना तुम्हा मुलांना देत आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या, अति प्रिय मुलांप्रती मात-पिता बापदादांची अंतःकरणापासून, उत्कट प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांची अतिशय धैर्यतेने, गंभीरतापूर्वक आणि समजून घेऊन आठवण करायची आहे. आठवण अचूक असेल तर बाबांचा करंट (शक्ती) मिळेल, आयुष्य वाढेल, हेल्दी बनाल.

२) उच्च पद प्राप्त करायचे असेल तर आपल्या वर्तनाला सुधारायचे आहे, जास्त इच्छा ठेवायच्या नाहीत. कर्मेंद्रियांवर पूर्ण कंट्रोल ठेवायचा आहे, माता-पित्याला पूर्णपणे फॉलो करायचे आहे.

वरदान:-
‘फॉलो फादर आणि सी फादर’ (बाबांचेच अनुसरण करा आणि बाबांनाच पहा) या महामंत्रा द्वारे एकरस स्थिती बनविणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव “सी फादर, फॉलो फादर” या मंत्राला नेहमी समोर ठेवून चढत्या कलेमध्ये पुढे जात रहा, उडत रहा. कधीही इतर आत्म्यांना पाहू नका कारण सर्व आत्मे आता पुरुषार्थी आहेत, पुरुषार्थीमध्ये काही चांगले गुण देखील असतात आणि काही दोषही असतात, संपन्न नाहीत, म्हणून फॉलो फादर करा; ब्रदर-सिस्टर्सना फॉलो करू नका. तर जसे फादर एकरस आहेत असे फॉलो करणारे एकरस स्वतः व्हाल.

बोधवाक्य:-
परचिंतनाच्या प्रभावामध्ये न येता शुभ चिंतन करणारे शुभचिंतक मणी बना.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. जसे स्थूल वस्तूंना जेव्हा पाहिजे तेव्हा घेता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा सोडून देता. तसेच देहाच्या भानाला जेव्हा पाहिजे तेव्हा सोडून देही-अभिमानी बना - ही प्रॅक्टिस इतकी सहज असावी, जितकी एखाद्या स्थूल वस्तूच्या बाबतीत सहज असते. रचयिता जेव्हा पाहिजे तेव्हा रचनेचा आधार घेईल, जेव्हा पाहिजे तेव्हा रचनेच्या आधाराला सोडून देईल, जेव्हा पाहिजे तेव्हा न्यारा बनेल, जेव्हा पाहिजे तेव्हा प्रिय बनेल - इतके बंधनमुक्त बना.