21-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - पास विद् ऑनर बनायचे असेल तर बुद्धियोग जरा देखील कुठेही भटकू नये, एका बाबांची आठवण रहावी, देहाची आठवण करणारे उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत”

प्रश्न:-
सर्वात उच्च ध्येय कोणते आहे?

उत्तर:-
आत्मा जिवंतपणी मरून एका बाबांची बनावी दुसरे काहीही आठवू नये, देह-अभिमान पूर्णतः निघून जावा - हेच आहे उच्च ध्येय. निरंतर देही-अभिमानी अवस्था बनावी - हेच आहे मोठे ध्येय. यानेच कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल.

गीत:-
तू प्यार का सागर है…

ओम शांती।
आता हे गाणे देखील रॉंग आहे. ‘प्रेमाचा सागर’ ऐवजी असायला हवे ‘ज्ञानाचा सागर’. प्रेम काही लोटा असत नाही. लोटा, गंगाजल इत्यादीचा असतो. तर ही आहे भक्तीमार्गाची महिमा. हे आहे रॉंग आणि ते आहे राईट. बाबा सर्वात प्रथम तर ज्ञानाचे सागर आहेत. मुलांमध्ये थोडे जरी ज्ञान असेल तर खूप उच्च पद प्राप्त करतात. मुले जाणतात की आता या वेळी आपण खरोखर चैतन्य दिलवाडा मंदिराचे सदस्य आहोत. ते आहे जड दिलवाडा मंदिर आणि हे आहे चैतन्य दिलवाडा. हे देखील वंडर आहे ना. जिथे जड यादगार आहे तिथे तुम्ही चैतन्य येऊन बसला आहात. परंतु मनुष्य काही समजतात थोडेच. पुढे जाऊन समजतील की, खरोखर ही गॉडफादरली युनिव्हर्सिटी आहे, इथे स्वयं भगवान शिकवतात. याहून मोठी युनिव्हर्सिटी दुसरी कोणती असू शकत नाही. आणि हेही समजतील की हे तर खरोखर चैतन्य दिलवाडा मंदिर आहे. हे दिलवाडा मंदिर तुमचे ॲक्यूरेट यादगार आहे. वरती छतावर सूर्यवंशी-चंद्रवंशी आहेत, खाली आदि देव, आदि देवी आणि मुले बसली आहेत. यांचे नाव आहे - ब्रह्मा, मग सरस्वती आहे ब्रह्माची मुलगी. प्रजापिता ब्रह्मा आहेत तर जरूर गोप-गोपी देखील असतील ना. ते आहे जड चित्र. जे होऊन गेले आहेत त्यांची मग चित्रे बनली आहेत. कोणाचा मृत्यू होतो तर त्वरित त्यांचे चित्र बनवतात, त्याची पोझीशन, बायोग्राफी विषयी तर पत्ताच नाहीये. ऑक्युपेशन (जीवन-चरित्र) लिहिले नाही तर ते चित्र काही कामाचे राहत नाही. त्यावरून समजते की अमक्याने हे-हे कर्तव्य केले आहे. आता ही जी देवतांची मंदिरे आहेत, त्यांचे ऑक्युपेशन, बायोग्राफी विषयी कोणालाच माहित नाही आहे. उच्च ते उच्च शिवबाबांना कोणीही जाणत नाही. यावेळी तुम्ही मुले सर्वांच्या बायोग्राफीला जाणता. मुख्य कोण-कोण होऊन गेले ज्यांचे पूजन होते? उच्च ते उच्च आहेत ईश्वर. शिवरात्री सुद्धा साजरी करतात तर जरूर त्यांचे अवतरण झाले आहे; परंतु कधी झाले, त्यांनी येऊन काय केले - हे कोणालाच माहित नाही. शिवाच्या सोबत आहेतच ब्रह्मा. आदि देव आणि आदि देवी कोण आहेत, त्यांना एवढ्या भुजा का दिल्या आहेत? कारण वृद्धी तर होते ना. प्रजापिता ब्रह्माद्वारे केवढी वृद्धी होते. ब्रह्मासाठीच म्हणतात - १०० भुजा, हजार भुजावाले. विष्णू अथवा शंकराला एवढ्या भुजा म्हणणार नाहीत. ब्रह्मासाठी का म्हणतात? ही प्रजापिता ब्रह्माचीच सगळी वंशावळी आहे ना. ही काही हातांची गोष्ट नाहीये. ते भले म्हणतात - हजार भुजांवाले ब्रह्मा, परंतु अर्थ थोडाच समजतात. आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये बघा ब्रह्माच्या किती भुजा आहेत. या आहेत बेहदच्या भुजा. प्रजापिता ब्रह्माला तर सर्वजण मानतात परंतु ऑक्युपेशनला जाणत नाहीत. आत्म्याला तर हात नसतात, हात शरीराला असतात. एवढे करोड ब्रदर्स आहेत तर त्यांच्या किती भुजा झाल्या? परंतु आधी जेव्हा कोणी पूर्णपणे ज्ञानाला समजून घेईल, त्या नंतर या गोष्टी ऐकवायच्या आहेत. सर्वात पहिली मुख्य गोष्ट एकच आहे, बाबा म्हणतात - माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा; आणि मग ज्ञानाचा सागर म्हणून देखील गायन आहे. किती अथाह पॉईंट्स ऐकवतात. एवढे सगळे पॉईंट्स लक्षात तर राहू शकणार नाहीत. तंत (सार) बुद्धीमध्ये राहते. नंतर तंत (सार) होते - मनमनाभव.

ज्ञानाचे सागर श्रीकृष्णाला म्हणता येणार नाही. ती आहे रचना. रचता एक बाबाच आहेत. बाबाच सर्वांना वारसा देणार, घरी घेऊन जाणार. बाबांचे आणि आत्म्यांचे घर आहेच सायलेन्स होम. विष्णुपुरीला बाबांचे घर म्हणता येणार नाही. घर आहे मूलवतन, जिथे आत्मे राहतात. या सर्व गोष्टी सेन्सिबल (हुशार) मुलेच धारण करू शकतात. एवढे सगळे ज्ञान कोणाच्या बुद्धीमध्ये लक्षात राहू शकणार नाही. ना एवढी पाने लिहू शकणार. या सर्व मुरल्या जरी सर्वांच्या एकत्र केल्या तरीही या पूर्ण हॉल पेक्षाही जास्त होतील. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये देखील किती भरमसाठ पुस्तके असतात. परीक्षा पास केली की मग सार बुद्धीमध्ये पक्के होते. बॅरिस्टरची परीक्षा पास केली की मग एका जन्मासाठी अल्पकाळाचे सुख मिळते. ती आहे विनाशी कमाई. तुम्हाला तर हे बाबा अविनाशी कमाई करवून देतात - भविष्याकरिता. बाकी जे कोणी गुरु-गोसावी इत्यादी आहेत ते सर्व विनाशी कमाई करवून देतात. विनाशाच्या जवळ येत जातात, कमाई कमी होत जाते. तुम्ही म्हणाल की कमाई वाढत जाते, परंतु नाही. हे तर सर्व नष्ट होणार आहे. या आधी राजे इत्यादींची कमाई वापरली जात होती. आता तर ते देखील राहिलेले नाहीत. तुमची कमाई तर किती काळ चालते. तुम्ही जाणता हा पूर्व नियोजित ड्रामा आहे, ज्याला दुनियेमध्ये कोणीच जाणत नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत, ज्यांना धारणा होते. बरेचजण तर अजिबात काहीच समजावून सांगू शकत नाहीत. काही म्हणतात आम्ही मित्र-नातेवाईक इत्यादींना समजावून सांगतो, ते देखील थोड्या वेळासाठी झाले ना. बाकीच्यांना प्रदर्शनी इत्यादी का नाही समजावून सांगत? पूर्ण धारणा नाही आहे. स्वत:ला मिया मिठ्ठू तर समजायचे नाही आहे ना. सेवेची आवड असेल तर जे चांगल्या रीतीने समजावून सांगतात, त्यांचे ऐकायला हवे. बाबा उच्च पद प्राप्त करून देण्याकरिता आले आहेत तर पुरुषार्थ केला पाहिजे ना. परंतु नशिबात नसेल तर श्रीमत देखील मानत नाहीत, आणि मग पद भ्रष्ट होते. ड्रामा प्लॅन नुसार राजधानी स्थापन होत आहे. त्यामध्ये तर सर्व प्रकारचे हवेत ना. मुले समजू शकतात - काही चांगली प्रजा बनणारे आहेत, काही कमी. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे’. दिलवाडा मंदिरामध्ये राजांची चित्रे आहेत ना. जे पूज्य बनतात तेच मग पुजारी बनतात. राजा-राणीचा मान तर उच्च आहे ना. नंतर जेव्हा वाममार्गामध्ये येतात तेव्हा देखील राजेशाही किंवा मोठ-मोठे श्रीमंत लोक तर आहेत. जगन्नाथच्या मंदिरामध्ये सर्वांना मुकुट दाखवला आहे. प्रजेला तर मुकुट असणार नाही. मुकुट असणारे राजासुद्धा विकारी असल्याचे दाखवतात. त्यांना सुख-संपत्ती तर नक्कीच भरपूर असेल. संपत्ती कमी-जास्त तर असते. हीर्यांचे महाल आणि चांदीचे महाल यामध्ये फरक तर असतो. तर बाबा मुलांना म्हणतील - चांगला पुरुषार्थ करून उच्च पद मिळवा. राजांना सुख जास्ती असते, तिथे सगळे सुखी असतात. जसे इथे सर्वांना दु:ख आहे, आजार इत्यादि तर सर्वांना असतातच. तिथे सुखच सुख आहे, तरीही पद-प्रतिष्ठा तर नंबरवार आहे. बाबा नेहमी सांगतात पुरुषार्थ करत रहा, आळशी बनू नका. पुरुषार्थावरून समजून येते की, ड्रामा अनुसार यांची सद्गती या प्रकारे इतकीच होणार आहे.

आपल्या सद्गती साठी श्रीमतावर चालायचे आहे. टिचराच्या मतावर स्टुडंट चालले नाहीत तर काही कामाचे नाहीत. नंबरवार पुरुषार्थानुसार तर सर्व आहेत. जर कोणी म्हणत असतील की आम्ही हे करू शकणार नाही; तर मग बाकी शिकणार तरी काय! शिकून हुशार झाले पाहिजे, जेणेकरून कोणीही म्हणेल की हे समजावून तर खूप छान सांगतात; परंतु आत्मा जिवंतपणी मरून बाबांची बनेल, अन्य कोणाचीही आठवण येऊ नये, देह-अभिमान सुटावा - हे आहे उच्च ध्येय. सर्व काही विसरायचे आहे. संपूर्ण देही-अभिमानी अवस्था बनावी - हे मोठे ध्येय आहे. तिथे (परमधाममध्ये) आत्मे आहेतच अशरीरी मग इथे येऊन देह धारण करतात. आता पुन्हा इथे या देहामध्ये असूनही स्वत:ला अशरीरी समजायचे आहे. ही मेहनत खूप कठीण आहे. स्वत:ला आत्मा समजून कर्मातीत अवस्थेमध्ये रहायचे आहे. सर्पाला सुद्धा अक्कल आहे - जुनी कात टाकून देतात. तर तुम्हाला देह-अभिमानातून किती बाहेर पडायचे आहे. मूलवतनमध्ये तर तुम्ही आहातच देही-अभिमानी. इथे देहामध्ये असताना स्वत:ला आत्मा समजायचे आहे. देह-अभिमान नष्ट झाला पाहिजे. किती मोठी परीक्षा आहे. भगवंताला स्वत: येऊन शिकवावे लागते. दुसरे कोणीही असे म्हणू शकणार नाही की, देहाचे सर्व संबंध सोडून माझे बना, स्वत:ला निराकार आत्मा समजा. कोणत्याही वस्तूचे भान राहू नये. माया एकमेकांच्या देहामध्ये खूप अडकवते; म्हणून बाबा म्हणतात या साकारची (ब्रह्मा बाबांची) देखील आठवण करायची नाही. बाबा म्हणतात - तुम्हाला तर स्वत:च्या देहाला सुद्धा विसरायचे आहे, एका बाबांची आठवण करायची आहे. यामध्ये खूप मेहनत आहे. माया चांगल्या-चांगल्या मुलांना सुद्धा नावा-रूपामध्ये लटकवते. ही सवय खूपच वाईट आहे. शरीराची आठवण करणे - ही तर भुतांची आठवण झाली. मी म्हणतो एक शिवबाबांची आठवण करा. आणि तुम्ही मग ५ भूतांची आठवण करत राहता. देहामध्ये अजिबात मोह असता कामा नये. ब्राह्मणी कडून देखील शिकायचे आहे, ना त्यांच्या नावा-रूपामध्ये अडकायचे आहे. देही-अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे. बाबांकडे बरीच मुले भले चार्ट पाठवतात परंतु बाबा त्याच्यावर विश्वास करत नाहीत. काहीजण तर म्हणतात आम्ही शिवबाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण करत नाही, परंतु बाबा जाणतात - पैशाची सुद्धा आठवण करत नाहीत. आठवण करण्याची तर मोठी मेहनत आहे. कुठे ना कुठे अडकून पडतात. देहधारीची आठवण करणे, ही तर ५ भूतांची आठवण आहे. याला भूत पूजा म्हटले जाते. भुताची आठवण करतात. इथे तर तुम्हाला एका शिवबाबांचीच आठवण करायची आहे. पुजा करण्याची काही गोष्ट नाही. भक्तीचे नामोनिशाण सुद्धा नाहीसे होते तर मग चित्रांची (मूर्तींची) कशाला आठवण करायची. त्या देखील मातीच्या बनलेल्या आहेत. बाबा म्हणतात हे सर्व देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आता पुन्हा तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनवतो. एका बाबांशिवाय इतर कोणत्याही शरीराची आठवण करायची नाही. आत्मा जेव्हा पावन बनेल तेव्हा मग शरीर देखील पावन मिळेल. आता तर हे शरीर काही पावन नाहीये. सुरुवातीला आत्मा जेव्हा सतोप्रधानापासून सतो, रजो, तमोमध्ये येते तर शरीर देखील त्या अनुसार मिळते. आता तुमची आत्मा पावन बनत जाईल परंतु शरीर आता पावन होणार नाही. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हे पॉईंट्स देखील त्यांच्या बुद्धीमध्ये राहतील जे चांगल्या रीतीने समजून घेऊन इतरांना समजावून सांगत राहतात. सतोप्रधान आत्म्याला बनायचे आहे. बाबांची आठवण करण्यातच खूप मेहनत आहे. कितीतरी जणांना तर जरा सुद्धा आठवण राहत नाही. पास विद ऑनर बनण्यासाठी बुद्धियोग जरा सुद्धा कुठेही भटकू नये. एका बाबांचीच आठवण रहावी. परंतु मुलांचा बुद्धियोग भटकत राहतो. जितके अनेकांना आप समान बनवाल तितकेच पद मिळेल. देहाची आठवण करणारे कधीही उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. इथे तर पास विद ऑनर व्हायचे आहे. मेहनत केल्याशिवाय पद कसे मिळणार! देहाची आठवण करणारे कोणताही पुरुषार्थ करू शकणार नाहीत. बाबा म्हणतात पुरुषार्थ करणार्यांना फॉलो करा. हे (ब्रह्मा बाबा) देखील पुरुषार्थी आहेत ना.

हे अतिशय विचित्र ज्ञान आहे. दुनियेमध्ये कोणालाच माहिती नाही आहे. कोणाच्याही बुद्धिमध्ये येणारही नाही की आत्म्याचे परिवर्तन कसे होते. ही सर्व गुप्त मेहनत आहे. बाबा देखील गुप्त आहेत. तुम्ही राजेशाही कशी प्राप्त करता, भांडण-तंटे काहीही नसतात. ज्ञान आणि योगाचीच गोष्ट आहे. आम्ही कोणाशी युद्ध करत नाही. ही तर आत्म्याला पवित्र बनविण्यासाठी मेहनत करायची आहे. आत्मा जशी-जशी पतित बनत जाते तर शरीर देखील पतित घेते आता पुन्हा आत्म्याला पावन बनून जायचे आहे, खूप मेहनत आहे. बाबा समजू शकतात - कोण-कोण पुरुषार्थ करतात! हा आहे शिवबाबांचा भंडारा. शिवबाबांच्या भंडार्यामध्ये तुम्ही सेवा करता. सेवा केली नाहीत तर जाऊन पाई-पैशाचे पद मिळेल. बाबांकडे सेवेसाठी याल आणि सेवाच केली नाहीत तर पद ते काय मिळणार! ही राजधानी स्थापन होत आहे, यामध्ये नोकर-चाकर इत्यादी सर्व बनणार ना. आता तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता, बाकी दुसरे कोणते युद्ध नाही आहे. हे सांगितले जाते की, किती गुप्त गोष्ट आहे. योगबलाने विश्वाची बादशाही तुम्ही घेता. तुम्ही जाणता आम्ही आपल्या शांतिधाममध्ये राहणारे आहोत. तुम्हा मुलांना बेहदचे घरच लक्षात आहे. इथे आपण पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत मग पुन्हा आपल्या घरी जातो. आत्मा कशी जाते हे देखील कोणी समजत नाहीत. ड्रामा प्लॅन अनुसार आत्म्यांना यायचेच आहे. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणत्याही देहधारीमध्ये मोह ठेवायचा नाही. शरीराची आठवण करणे हे देखील भूतांची आठवण करणे आहे, त्यामुळे कोणाच्याही नावा-रूपामध्ये अडकायचे नाहीये. आपल्या शरीराला सुद्धा विसरायचे आहे.

२) भविष्यासाठी अविनाशी कमाई जमा करायची आहे. हुशार बनून ज्ञानाच्या पॉइंट्सना बुद्धीमध्ये धारण करायचे आहे. जे बाबांनी समजावून सांगितले आहे ते समजून घेऊन इतरांना ऐकवायचे आहे.

वरदान:-
कल्प-कल्पाच्या विजयाच्या स्मृतीच्या आधारे माया शत्रूचे आव्हान करणारे महावीर विजयी भव

महावीर विजयी मुले पेपराला पाहून घाबरत नाहीत कारण की त्रिकालदर्शी असल्यामुळे जाणतात की, आम्ही कल्प-कल्पाचे विजयी आहोत. महावीर कधी असे म्हणू शकत नाहीत की, ‘बाबा, आमच्याकडे मायेला पाठवू नका - कृपा करा, आशीर्वाद द्या, शक्ति द्या, काय करू काही मार्ग दाखवा…’ ही देखील कमजोरी आहे. महावीर तर शत्रूला आव्हान करतात की या आणि आम्ही विजयी बनू.

बोधवाक्य:-
काळाची सूचना आहे - समान बना, संपन्न बना.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-

कोणत्याही सिद्धीकरिता एक तर एकांत आणि दुसरे एकाग्रता दोन्हीच्या विधीद्वारे सिद्धीला प्राप्त करतात. जसे तुमच्या यादगार चित्रांद्वारे सिद्धी प्राप्त करणार्यांच्या विशेष दोन गोष्टींची विधी धारण करतात - एकांतवासी आणि एकाग्रता. हीच विधी तुम्ही देखील साकारमध्ये धारण करा. एकाग्रता कमी असल्याकारणानेच दृढ निश्चयाचा अभाव होतो. एकांतवासी कमी असल्याकारणानेच साधारण संकल्प बीजाला कमजोर बनवतात त्यामुळे या विधीद्वारे सिद्धी-स्वरूप बना.