21-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“
गोड मुलांनो - तुम्हाला आपल्या योगबलाने साऱ्या सृष्टीला पावन बनवायचे आहे, तुम्ही
योगबलानेच मायेवर विजय मिळवून जगतजीत बनू शकता”
प्रश्न:-
बाबांचा पार्ट
कोणता आहे, त्या पार्टला तुम्हा मुलांनी कशाच्या आधारे ओळखले आहे?
उत्तर:-
बाबांचा पार्ट आहे सर्वांची दुःखे दूर करून सुख देणे, रावणाच्या कैदेतून सोडवणे.
जेव्हा बाबा येतात तेव्हा भक्तीची रात्र पूर्ण होते. बाबा स्वतः तुम्हाला आपला
स्वतःचा आणि आपल्या संपत्तीचा परिचय देतात. तुम्ही एका बाबांना जाणल्यामुळेच सर्व
काही जाणता.
गीत:-
तुम्हीं हो
माता, पिता तुम्हीं हो...
ओम शांती।
मुलांना ओम् शांतीचा अर्थ समजला आहे, बाबांनी समजावून सांगितले आहे - आपण आत्मा
आहोत, या सृष्टी ड्रामामध्ये आपला मुख्य पार्ट आहे. कोणाचा पार्ट आहे? आत्मा शरीर
धारण करून पार्ट बजावते. तर मुलांना आता आत्म-अभिमानी बनवत आहेत. इतका काळ
देह-अभिमानी होते. आता स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. ड्रामा प्लॅन
अनुसार आमचे बाबा आलेले आहेत. बाबा येतात देखील रात्रीला. केव्हा येतात - त्याची
तिथी-तारीख काहीच नाही आहे. तिथी-तारीख त्यांची असते जे लौकिक जन्म घेतात. हे तर
आहेत पारलौकिक बाबा. यांचा लौकिक जन्म होत नाही. श्रीकृष्णाची तिथी, तारीख, वेळ
सर्व देतात. यांचा तर म्हटला जातो दिव्य जन्म. बाबा यांच्यामध्ये प्रवेश करून
सांगतात की हा बेहदचा ड्रामा आहे. त्यामध्ये अर्धा कल्प आहे रात्र. जेव्हा रात्र
अर्थात घोर अंधःकार असतो तेव्हा मी येतो. तिथी-तारीख काही नाहीये. यावेळी भक्ती
देखील तमोप्रधान आहे. अर्धा कल्प आहे बेहदचा दिवस. बाबा स्वतः सांगतात - मी
यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. गीतेमध्ये आहे - भगवानुवाच, परंतु मनुष्य काही भगवान
होऊ शकत नाही. श्रीकृष्ण देखील दैवी गुणवाला आहे. हा मनुष्य लोक आहे. हा काही देव
लोक नाही आहे. गातात देखील ‘ब्रह्मा देवताय नमः…’ ते आहेत सूक्ष्मवतनवासी. मुले
जाणतात तिथे हड्डी-मांसाचा देह असत नाही. ती आहे सूक्ष्म सफेद सावली. जेव्हा
मूलवतनमध्ये असतो तेव्हा आत्म्याला ना सूक्ष्म सावलीचे शरीर आहे, ना हाडे असलेले
शरीर आहे. या गोष्टींना कोणीही मनुष्य मात्र जाणत नाहीत. बाबाच येऊन ऐकवतात,
ब्राह्मणच ऐकतात, बाकीचे कोणी ऐकत नाहीत. ब्राह्मण वर्ण असतोच भारतात, तो देखील
तेव्हाच असतो जेव्हा परमपिता परमात्मा, प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्राह्मण धर्माची
स्थापना करतात. आता यांना रचता देखील म्हणणार नाही. नवीन रचना काही रचत नाहीत. फक्त
रिज्युवनेट (पुनरुज्जीवित) करतात. बोलवतात देखील - ‘ओ बाबा, पतित दुनियेमध्ये येऊन
आम्हाला पावन बनवा’. आता तुम्हाला पावन बनवत आहेत. तुम्ही पुन्हा योगबलाने या
सृष्टीला पावन बनवत आहात. मायेवर विजय प्राप्त करून तुम्ही जगतजीत बनता. योगबळाला
विज्ञानाचे बळ असे देखील म्हटले जाते. ऋषी-मुनी इत्यादी सर्वांना शांती हवी आहे
परंतु शांतीचा अर्थ काही जाणत नाहीत. इथे पार्ट तर नक्की बजावायचा आहे ना. शांतीधाम
आहे स्वीट सायलेन्स होम. तुम्हा आत्म्यांना आता हे माहीत आहे की, आमचे घर शांतीधाम
आहे. इथे आम्ही पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत. बाबांना सुद्धा बोलावतात - ‘हे
पतित-पावन, दुःखहर्ता, सुखकर्ता या; आम्हाला या रावणाच्या कैदेतून सोडवा’. भक्ती आहे
रात्र, ज्ञान आहे दिवस. रात्र मुर्दाबाद होते आणि मग ज्ञान जिंदाबाद होते. हा सुख
आणि दुःखाचा खेळ आहे. तुम्ही जाणता पहिले आपण स्वर्गामध्ये होतो मग उतरता-उतरता
येऊन खाली नरकामध्ये पडलो आहोत. कलियुग कधी संपणार आणि सतयुग कधी येणार हे कोणीही
जाणत नाहीत. तुम्ही बाबांना जाणल्याने बाबांकडून सर्वकाही माहित झाले आहे. मनुष्य
भगवंताला शोधण्याकरिता किती त्रास सहन करतात. बाबांना जाणतच नाहीत. जाणतील तेव्हा
जेव्हा बाबा स्वतः येऊन आपला आणि मालमत्तेचा परिचय देतील. वारसा बाबांकडूनच मिळतो,
आईकडून नाही. यांना (ब्रह्माला) आई देखील म्हणतात, परंतु यांच्याकडून वारसा मिळत
नाही, यांची आठवणसुद्धा करायची नाहीये. ब्रह्मा, विष्णू, शंकर देखील शिवाची मुले
आहेत – हे सुद्धा कोणीही जाणत नाहीत. बेहदच्या साऱ्या दुनियेचा रचयिता एकच बाबा
आहेत. बाकी सर्व आहे त्यांची रचना किंवा हदचे रचयिता. आता तुम्हा मुलांना बाबा
म्हणतात - माझी आठवण करा तर तुमची विकर्मे नष्ट होतील. मनुष्य बाबांना जाणत नाहीत
त्यामुळे आठवण तरी कोणाची करणार? म्हणून बाबा म्हणतात - किती अनाथ बनले आहात. हे
देखील ड्रामामध्ये नोंदलेलेच आहे.
भक्ती आणि ज्ञान
दोन्हीमध्ये सर्वात श्रेष्ठ कर्म आहे - दान करणे. भक्तीमार्गामध्ये ईश्वराच्या
नावाने दान करतात. कशासाठी? कोणती इच्छा तर नक्की असते. समजतात जसे कर्म करू तसे फळ
दुसऱ्या जन्मामध्ये मिळणार, या जन्मामध्ये जे कराल त्याचे फळ दुसऱ्या जन्मामध्ये
मिळेल. जन्म-जन्मांतर मिळणार नाही. एका जन्मासाठी फळ मिळते. सर्वात चांगल्यात चांगले
कर्म असते - दान. दानीला पुण्यात्मा म्हटले जाते. भारताला महादानी म्हटले जाते.
भारतामध्ये जितके दान होते तितके दुसऱ्या कोणत्याही खंडामध्ये होत नाही. बाबा देखील
येऊन मुलांना दान करतात, मुले मग बाबांना दान करतात. म्हणतात - ‘बाबा, तुम्ही याल
तेव्हा आम्ही आमचे तन-मन-धन सर्व तुमच्या स्वाधीन करू. तुमच्या शिवाय आमचे कोणीच
नाही. बाबा देखील म्हणतात माझ्यासाठी तुम्ही मुलेच आहात. मला म्हणतातच - हेवनली
गॉडफादर अर्थात स्वर्गाची स्थापना करणारे. मी येऊन तुम्हाला स्वर्गाची बादशाही देतो.
मुले माझ्यासाठी सर्वकाही देऊन टाकतात - बाबा सर्व काही तुमचे आहे. भक्तीमार्गामध्ये
देखील म्हणत होता - ‘बाबा, हे सर्व काही तुम्हीच दिलेले आहे’. आणि ते नष्ट होते
तेव्हा मग दुःखी होतात. ते आहे भक्तीचे अल्पकालीन सुख. बाबा समजावून सांगत आहेत -
भक्तीमार्गामध्ये तुम्ही मला दान-पुण्य करता इनडायरेक्ट (अप्रत्यक्षरित्या). त्याचे
फळ तर तुम्हाला मिळत राहते. आता या वेळी मी तुम्हाला कर्म-अकर्म-विकर्माचे रहस्य
बसून समजावून सांगतो. भक्तीमार्गामध्ये तुम्ही जसे कर्म करता त्याचे अल्पकाळासाठी
सुख देखील माझ्याद्वारे तुम्हाला मिळते. या गोष्टींविषयी दुनियेमध्ये कोणालाच माहिती
नाही आहे. बाबाच येऊन कर्मांची गती समजावून सांगतात. सतयुगामध्ये कधी कोणी वाईट
कर्म करतच नाहीत. कायम सुखच सुख आहे. आठवण देखील सुखधाम, स्वर्गाची करतात. आता बसले
आहेत नरकामध्ये. तरीसुद्धा म्हणतात - अमका-अमका स्वर्गामध्ये गेला. आत्म्याला
स्वर्ग किती छान वाटतो. आत्माच म्हणते ना अमका-अमका स्वर्गात गेला. परंतु तमोप्रधान
असल्याकारणाने त्यांना काहीच कळत नाही की स्वर्ग काय आहे, नरक काय आहे? बेहदचे बाबा
म्हणतात - तुम्ही सर्व किती तमोप्रधान बनले आहात. ड्रामाला तर जाणत नाहीत. समजतात
सुद्धा की सृष्टीचे चक्र फिरते तर जरूर हुबेहूब तसेच फिरेल ना. ते फक्त म्हणायचे
म्हणून म्हणतात. आता हे संगमयुग आहे. या एका संगमयुगाचेच गायन आहे. अर्धे कल्प
देवतांचे राज्य चालते मग ते राज्य कुठे जाते, कोण जिंकून घेते? हे देखील कोणाला
माहीत नाही आहे. बाबा म्हणतात - रावण जिंकून घेतो. त्यांनी मग बसून देवतांचे आणि
असुरांचे युद्ध दाखवले आहे.
आता बाबा समजावून
सांगतात - ५ विकाररूपी रावणाकडून हरतात मग रावणावर विजय सुद्धा मिळवतात. तुम्ही तर
पूज्य होतात मग पुजारी पतित बनता तर रावणाकडून हरलात ना. तो तुमचा शत्रू असल्यामुळे
तुम्ही सदैव त्याला जाळत आला आहात, परंतु तुम्हाला माहीत नाही आहे. आता बाबा
समजावून सांगतात की, रावणामुळे तुम्ही पतित बनले आहात. या विकारांनाच माया म्हटले
जाते. माया जीत, जगत जीत. हा रावण सर्वात जुना शत्रू आहे. आता श्रीमताने तुम्ही या
५ विकारांवर विजय प्राप्त करता. बाबा आले आहेत विजय मिळवून देण्यासाठी. हा खेळ आहे
ना. मायेशी हरला तर हार, मायेशी जिंकला तर विजय. विजय बाबाच मिळवून देतात म्हणून
यांना सर्वशक्तीमान म्हटले जाते. रावण सुद्धा काही कमी शक्तीशाली नाहीये. परंतु तो
दुःख देतो म्हणून त्याचे गायन केले जात नाही. रावण अतिशय वाईट आहे. तुमचे राज्यच
हिसकावून घेतो. आता तुम्ही समजला आहात - आपण कसे हरतो आणि मग कसे जिंकतो? आत्म्याची
इच्छा सुद्धा आहे की आपल्याला शांती हवी आहे. आपण आपल्या घरी जावे. भक्त भगवंताची
आठवण करतात परंतु पत्थर-बुद्धी असल्याकारणाने समजत नाहीत. भगवान बाबा आहेत, तर
बाबांकडून जरूर वारसा मिळत असेल. वारसा जरूर मिळतो सुद्धा परंतु केव्हा मिळतो आणि
कसा गमावतो हे जाणत नाहीत. बाबा म्हणतात - मी बसून या ब्रह्मातनाद्वारे तुम्हाला
समजावून सांगतो. मला देखील कर्मेंद्रिये पाहिजेत ना. मला माझी काही कर्मेंद्रिये
नाही आहेत. सूक्ष्म वतनमध्ये सुद्धा कर्मेंद्रिये आहेत; जसा चालता-फिरता मूकपट असतो;
हे चलतचित्रपट निघाले आहेत तर बाबांना देखील समजावून सांगायला सोपे होते. त्यांचे
बाहुबल आहे, तुमचे योगबल आहे. ते दोघे भाऊ (अमेरिका, रशिया) हे जरी आपसात एकत्र आले
तरी विश्वावर राज्य करू शकतात. परंतु आता तर फूट पडलेली आहे. तुम्हा मुलांना
सायलेन्सचा (शांतीचा) शुद्ध अभिमान वाटला पाहिजे. तुम्ही मनमनाभवच्या आधारे
सायलेन्सद्वारे जगतजीत बनता. ते आहेत सायन्स अभिमानी. तुम्ही सायलेन्सचे अभिमानी
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करता. आठवणीद्वारे तुम्ही सतोप्रधान बनाल. खूप
सोपा उपाय सांगतात. तुम्ही जाणता शिवबाबा आले आहेत आम्हा मुलांना पुन्हा स्वर्गाचा
वारसा देण्याकरिता. बाबा म्हणतात - तुमची जी काही कलियुगी कर्मबंधने आहेत, त्यांना
विसरून जा. ५ विकारसुद्धा मला दान देऊन टाका. तुम्ही जे माझे-माझे करत आला आहात,
माझा नवरा, माझा अमका, हे सर्व विसरत जा. सर्व काही बघत असूनसुद्धा त्यातून मोह
काढून टाका. ही गोष्ट मुलांनाच समजावून सांगतात. जे बाबांना जाणतसुद्धा नाहीत, ते
तर या भाषेलाही समजू शकणार नाहीत. बाबा येऊन मनुष्यांना देवता बनवतात. देवता असतातच
सतयुगामध्ये. कलियुगामध्ये असतात मनुष्य. आत्तापर्यंत त्यांच्या खुणा आहेत अर्थात
चित्रे (मूर्त्या) आहेत. मला म्हणतातच पतित-पावन. मी तर कधी डिग्रेड (पतन) होत नाही.
तुम्ही म्हणता - ‘आम्ही पावन होतो मग डिग्रेड होऊन पतित बनलो आहोत. आता तुम्ही येऊन
पावन बनवा तर आम्ही आमच्या घरी जाऊ. हे आहे स्पिरिच्युअल नॉलेज (आत्मिक ज्ञान).
अविनाशी ज्ञानरत्न आहेत ना. हे आहे नवीन नॉलेज. आता तुम्हाला हे नॉलेज शिकवतो.
रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य सांगतो. आता ही तर आहे जुनी दुनिया.
यामध्ये तुमचे जे कोणी मित्र-नातलग इत्यादी आहेत, देहा सहित सर्वांमधून मोह काढून
टाका.
आता तुम्ही मुले आपले
सर्व काही बाबांच्या हवाली करता. मग बाबा स्वर्गाची बादशाही २१ जन्मांसाठी तुमच्या
हवाली करतात. देवाण-घेवाण तर होते ना. बाबा तुम्हाला २१ जन्मांसाठी राज्यभाग्य
देतात. २१ जन्म, २१ पिढी गायल्या जातात ना अर्थात २१ जन्म पूर्ण आयुष्य असते. कधीही
मध्येच शरीर सुटू शकत नाही. अकाली मृत्यू होत नाही. तुम्ही अमर बनून अमरपुरीचे मालक
बनता. तुम्हाला काळ कधीही खाऊ शकत नाही. आता तुम्ही मरण्याकरिता पुरुषार्थ करत आहात.
बाबा म्हणतात - देहा सहित देहाची सर्व नाती सोडून एका बाबांशी नाते ठेवायचे आहेत.
आता जायचेच आहे सुखाच्या नात्यामध्ये. दुःखाच्या बंधनांना विसरत जाल. गृहस्थ
व्यवहारामध्ये राहून पवित्र बनायचे आहे. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा,
त्याचबरोबर दैवी गुणसुद्धा धारण करा. या देवतांसारखे बनायचे आहे. हे आहे एम
ऑब्जेक्ट. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते, त्यांनी राज्य कसे मिळवले, मग
कुठे गेले हे कोणालाच माहिती नाही आहे. आता तुम्हा मुलांना दैवी गुण धारण करायचे
आहेत. कोणालाही दुःख द्यायचे नाही. बाबा आहेतच दुःख हर्ता, सुख कर्ता. तर तुम्हालाही
सर्वांना सुखाचा मार्ग दाखवायचा आहे अर्थात आंधळ्यांची काठी बनायचे आहे. आता बाबांनी
तुम्हांला ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे. तुम्ही जाणता बाबा कसा पार्ट बजावतात. आता
बाबा तुम्हाला जे शिकवत आहेत ते शिक्षण नंतर प्राय: लोप होईल. देवतांमध्ये हे ज्ञान
असत नाही. तुम्ही ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मणच रचता आणि रचनेच्या ज्ञानाला जाणता.
इतर कोणीही जाणू शकत नाही. या लक्ष्मी-नारायण इत्यादींमध्ये जर हे ज्ञान असते तर मग
परंपराच चालत आली असती. तिथे ज्ञानाची आवश्यकताच असत नाही कारण तिथे आहेच सद्गती.
आता तुम्ही सर्वकाही बाबांना दान देता तर मग बाबा तुम्हाला २१ जन्मांसाठी सर्व काही
देतात. असे दान कधी केले जात नाही. तुम्ही जाणता आम्ही सर्वकाही देतो - बाबा, हे
सर्वकाही तुमचे आहे, तुम्हीच आमचे सर्व काही आहात. त्वमेव माताश्च पिता... पार्ट तर
बजावतात ना. मुलांना दत्तक सुद्धा घेतात आणि मग स्वतःच शिकवतात. मग स्वतःच गुरू
बनून सर्वांना घेऊन जातात. म्हणतात - तुम्ही माझी आठवण करा तर पावन बनाल म्हणजे मग
तुम्हाला सोबत घेऊन जाईन. हा यज्ञ रचलेला आहे. हा आहे - ‘शिव ज्ञान यज्ञ’. यामध्ये
तुम्ही तन-मन-धन सर्व स्वाहा करता. आनंदाने सर्व अर्पण होते. बाकी आत्मा शिल्लक
राहते. बाबा, बस्स आता आम्ही तुमच्या श्रीमताप्रमाणेच चालू. बाबा म्हणतात - गृहस्थ
व्यवहारामध्ये राहून पवित्र बनायचे आहे. जेव्हा साठी गाठतात तेव्हा वानप्रस्थ
अवस्थेमध्ये जाण्याची तयारी करतात परंतु ते काही परत जाण्यासाठी थोडेच तयारी करतात?
आता तुम्ही सद्गुरूचा मंत्र घेता - मनमनाभव. भगवानुवाच - तुम्ही माझी आठवण करा तर
तुमची विकर्म विनाश होतील. सर्वांना सांगा तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे.
शिवबाबांची आठवण करा, आता आपल्या घरी जायचे आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कलियुगी
सर्व कर्मबंधनांना बुद्धीद्वारे विसरून ५ विकारांचे दान करून आत्म्याला सतोप्रधान
बनवायचे आहे. एकाच सायलेन्सच्या शुद्ध अभिमानामध्ये रहायचे आहे.
२) या रुद्र
यज्ञामध्ये आनंदाने आपले तन-मन-धन सर्व अर्पण करून सफल करायचे आहे. यावेळी सर्वकाही
बाबांच्या हवाली करून बाबांकडून २१ जन्मांची बादशाही घ्यायची आहे.
वरदान:-
‘रोब’च्या (त्वेषाच्या)
अंशाचासुद्धा त्याग करणारे स्वमानधारी पुण्य-आत्मा भव
बोधवाक्य:- धारी मुले
सर्वांना मान देणारी दाता असतात. दाता अर्थात दयाळू. त्यांच्यामध्ये कधी कोणत्याही
आत्म्याप्रती संकल्पमात्र सुद्धा त्वेष असत नाही. ‘हे असे का? असे करता कामा नये,
होता कामा नये, ज्ञान हे सांगते का…’ हा देखील सूक्ष्म त्वेषाचा अंश आहे. परंतु
स्वमानधारी पुण्य-आत्मे पतन झालेल्यांना आधार देतील, सहयोगी बनवतील. ते कधी असा
संकल्पसुद्धा करू शकत नाहीत की, ‘हे तर आपल्या कर्मांची फळे भोगत आहेत, करतील तर
जरूर भोगतील... यांचे पतन झालेच पाहिजे…’. असे संकल्प तुम्हा मुलांचे असू शकत नाहीत.
स्लोगन:-
संतुष्टतेची
आणि प्रसन्नतेची विशेषताच उडत्या कलेचा अनुभव करवितात.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रूपी कल्चरला (संस्कृतीला) धारण करा:-
सत्यतेच्या शक्तीची
निशाणी आहे - ‘निर्भयता’. म्हटले जाते ‘सच तो बिठो नच’ अर्थात सत्यतेची शक्ती असणारा
सदैव बेफिकीर, निश्चिंत असल्याकारणाने, निर्भय असल्यामुळे आनंदाने नाचत राहील. जर
आपले संस्कार किंवा संकल्प कमजोर असतील तर ती कमजोरीच मनाच्या स्थितीला अशांतीमध्ये
आणते त्यामुळे पहिले आपल्या या सूक्ष्म कमजोरींना अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञामध्ये
स्वाहा करा.