21-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - श्रीमतावर कल्याणकारी बनायचे आहे, सर्वांना सुखाचा रस्ता सांगायचा आहे”

प्रश्न:-
कोणत्याही प्रकाराची चूक होण्याचे मुख्य कारण काय आहे?

उत्तर:-
देह-अभिमान. देह-अभिमानामुळेच मुलांकडून खूप चुका होतात. ते सेवा देखील करू शकत नाहीत. त्यांच्याकडून अशी कामे होतात ज्यामुळे सर्वजण त्यांचा तिरस्कार करतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आत्म-अभिमानी बना’. कोणतेही अकर्तव्य (वाईट कर्म) करू नका. क्षीरखंड होऊन सेवेचे चांगले-चांगले प्लॅन बनवा. मुरली ऐकून धारण करा, यामध्ये निष्काळजी बनू नका.

गीत:-
छोड भी दे आकाश सिंहासन…

ओम शांती।
रूहानी मुलांप्रती रुहानी बाबांचे श्रीमत. आता आम्हा सर्व सेंटर्सच्या मुलांसोबत बोलत आहेत. आता जे त्रिमूर्ती, गोळा, झाड, शिडी, लक्ष्मी-नारायणाचे चित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र ही सहा चित्रे मुख्य आहेत. ही जणू पूर्ण प्रदर्शनी आहे, यामध्ये संपूर्ण सार येते. जसे जाहिरातीसाठी नाटकाचे बॅनर बनवले जातात. ते पाऊस इत्यादी मध्ये कधी खराब होत नाहीत. तशी ही मुख्य चित्रे बनविली पाहिजेत. मुलांना श्रीमत मिळते रूहानी सेवा वाढविण्याकरिता, भारतवासी मनुष्यांचे कल्याण करण्याकरिता. गातात देखील - कल्याणकारी बेहदचे पिता आहेत तर जरूर कोणीतरी अकल्याणकारी देखील असेल. ज्या कारणामुळे बाबांना येऊन पुन्हा कल्याण करावे लागते. रूहानी मुले ज्यांचे कल्याण होत आहे, ते या गोष्टींना समजू शकतात. जसे आमचे कल्याण झाले आहे तर आपण इतरांचे देखील कल्याण करावे. जसे बाबांचे देखील चिंतन चालते की, कसे कल्याण करावे. युक्त्या सांगत आहेत. ६ बाय ९ साईझच्या शीटवर ही चित्रे बनविली पाहिजेत. जास्त करून दिल्ली सारख्या शहरांमध्ये अनेक मनुष्य येतात. जिथे गव्हर्नमेंटची असेंब्ली (विधानसभा) इत्यादी असते. पोर्ट्रेट (चित्रे) पाहण्यासाठी बरीच माणसे येतात, तिथे ही चित्रे ठेवली पाहिजेत. अनेकांचे कल्याण करण्याकरिता बाबा मत देतात. अशी टीनवर (पत्र्यावर) अनेक चित्रे बनू शकतात. देही-अभिमानी बनून बाबांच्या सेवेला लागले पाहिजे. बाबा मत देतात - ही चित्रे हिंदी आणि इंग्रजीमध्ये बनविली पाहिजेत. ही ६ चित्रे मुख्य ठिकाणी लावावीत. जर अशा मुख्य स्थानावर लावली तर तुमच्याकडे शेकडो माणसे हे ज्ञान समजून घेण्याकरिता येतील. परंतु मुलांमध्ये देह-अभिमान असल्या कारणाने अनेक चुका होतात. असे कोणी समजू नका की, मी पक्का देही-अभिमानी आहे. चुका तर अनेक होतात, सत्य सांगत नाहीत. समजावून सांगितले जाते - असे कोणतेही कर्म करू नका ज्यामुळे कोणाला तिरस्कार वाटेल की यांच्यामध्ये देह-अभिमान आहे. तुम्ही सदैव युद्धाच्या मैदानामध्ये आहात. इतर ठिकाणी तर १०-२० वर्षांपर्यंत युद्ध चालते. तुमचे मायेशी शेवटपर्यंत युद्ध चालणार आहे. परंतु आहे गुप्त, ज्याला कोणी समजू शकत नाहीत. गीतेमध्ये जी महाभारत लढाई आहे, ती देहधारींची दाखविली आहे. परंतु ही आहे रूहानी लढाई. रुहानी युद्ध पांडवांचे आहे. ते देहधारींचे युद्ध आहे ज्यांची परमपिता परमात्म्याशी विपरीत बुद्धी आहे. तुम्हा ब्राह्मण कुलभूषणांची आहे प्रीत-बुद्धी. तुम्ही इतर संगत सोडून एक बाबांशी संगत जोडली आहे. परंतु अनेकदा देह-अभिमान आल्याकारणाने विसरून जातात, आणि मग आपलेच पद भ्रष्ट करून घेतात. मग अखेरीला खूप पश्चाताप करावा लागेल. काहीच करू शकणार नाहीत. ही कल्प-कल्पाची बाजी आहे. यावेळी कोणतेही अकर्तव्य कार्य (वाईट काम) करतात तर कल्प-कल्पांतरासाठी पद भ्रष्ट होते. खूप मोठा तोटा होतो.

बाबा म्हणतात - पूर्वी तुम्ही १०० टक्के घाट्यामध्ये होता. आता बाबा १०० टक्के फायद्यामध्ये घेऊन जातात. तर श्रीमतावर चालायचे आहे. प्रत्येक मुलाला कल्याणकारी बनायचे आहे. सर्वांना सुखाचा रस्ता सांगायचा आहे. सुख आहेच स्वर्गामध्ये, नरकामध्ये आहे दुःख. असे का? ही आहे विशश दुनिया (विकारी दुनिया), ती व्हाईसलेस (निर्विकारी) होती, आता विशश (विकारी) दुनिया बनली आहे, आता पुन्हा बाबा वाईसलेस (निर्विकारी) बनवत आहेत. या गोष्टींना दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. तर ही मुख्य चित्रे पर्मनंट ठिकाणी लागली पाहिजेत. दिल्ली आहे मुख्य पहिल्या नंबरवर, सेकंड नंबर बॉम्बे आणि कलकत्ता, कोणालाही ऑर्डर दिल्याने पत्र्याच्या शीटवर बनवू शकतात. आग्र्यामध्ये देखील फिरण्यासाठी अनेक जण जातात. मुले सेवा तर खूप चांगली करत आहेत आणखीन काही कर्तव्य करून दाखवावे. ही चित्रे बनविण्यासाठी काहीच त्रास नाही आहे. फक्त अनुभव पाहिजे. चांगली मोठी चित्रे असावीत जी कोणीही दुरून सुद्धा वाचू शकतील. गोळ्याचे चित्र देखील मोठे बनवू शकतो. सुरक्षित रितीने ठेवावे लागेल, जेणेकरून कोणी खराब करू शकणार नाही. यज्ञामध्ये असुरांची विघ्ने पडतात कारण या आहेत नवीन गोष्टी. समजतील हे दुकान काढून बसले आहेत. सरते शेवटी सर्व जण समजतील की आपण उतरत आलो आहोत, जरूर काही दोष आहे. बाबा आहेतच कल्याणकारी. ते सांगू शकतात की भारताचे कल्याण कसे आणि कधी झाले आहे. भारताला तमोप्रधान कोण बनवतो, आणि मग सतोप्रधान कोण बनवितो, हे चक्र कसे फिरते, हे कोणीही जाणत नाही. संगमयुगाला देखील जाणत नाहीत. समजतात की, भगवान युगे-युगे येतात. कधी म्हणतात - भगवान तर नावा-रूपापासून न्यारे आहेत प्राचीन भारत स्वर्ग होता. असे देखील म्हणतात की, क्राइस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी देवतांचे राज्य होते, आणि मग कल्पाचा कालावधी प्रदीर्घ दाखवला आहे; तर मुलांना देही-अभिमानी बनण्याची खूप मेहनत करायची आहे. अर्धे कल्प सतयुग आणि त्रेतामध्ये तुम्ही आत्म-अभिमानी होता. परंतु परमात्म-अभिमानी नव्हता. इथे तर मग तुम्ही देह-अभिमानी बनला आहात. आता पुन्हा देही-अभिमानी बनावे लागेल. ‘यात्रा’ शब्द देखील आहे. परंतु अर्थ समजत नाहीत. मनमनाभवचा अर्थ आहे रूहानी यात्रेवर राहा. माझ्या आत्म्यांनो मज पित्याची आठवण करा. श्रीकृष्ण काही असे म्हणू शकत नाही. त्यांच्यावर कोणताच कलंक लावू शकत नाही. हे देखील बाबांनी सांगितले आहे - जेव्हा शिडी उतरले आहेत तेव्हा पासून अर्धा कल्प काम चितेवर बसून काळे होतात. आता आहे आइरन एज्ड. त्यांचा संप्रदाय काळाच असेल (विकारीच असेल). परंतु सर्वांचे रूप सावळे कसे बनवणार? चित्रे इत्यादी जी काही बनविली आहेत ती सर्व अर्थशून्य बनविली आहेत. त्यालाच श्याम आणि मग त्यालाच सुंदर म्हणणे… असे कसे होऊ शकते. त्याला म्हटले जाते अंधश्रद्धेने बाहुल्यांची पूजा करणारे. बाहुल्यांचे नाव-रूप, जीवन-चरित्र इत्यादी असू शकत नाही. तुम्ही देखील अगोदर बाहुल्यांची पूजा करत होता ना. तुम्हाला काहीच अर्थ समजत नव्हता. तर बाबांनी समजावून सांगितले आहे - प्रदर्शनीची मुख्य चित्रे बनली पाहिजेत. कमिटी बनवावी जी एकामागोमाग प्रदर्शनीवर प्रदर्शनी करत राहील. बंधनमुक्त तर भरपूर आहेत. कन्या देखील बंधनमुक्त आहेत. वानप्रस्थी देखील बंधनमुक्त आहेत. तर मुलांनी सूचना आचरणामध्ये आणल्या पाहिजेत. हे आहेत गुप्त पांडव. कोणालाही ओळखता येऊ शकणार नाहीत. बाबा देखील गुप्त, ज्ञान देखील गुप्त. तिथे मनुष्य, मनुष्याला ज्ञान देतात. इथे परमात्मा पिता ज्ञान देतात आत्म्यांना. परंतु हे समजत नाहीत की आत्मा ज्ञान घेते कारण ते आत्म्याला निर्लेप म्हणतात. वास्तविक आत्माच सर्व काही करते. कर्मा नुसार पुनर्जन्म आत्माच घेते. बाबा हे सर्व पॉईंट्स चांगल्या रीतीने बुद्धी मध्ये घालतात. सर्व सेंटर्सवर नंबरवार देही-अभिमानी आहेत. जे चांगल्या रीतीने समजतात आणि समजावून सांगतात. देह-अभिमानी ना स्वतः काही समजू शकत ना इतरांना समजावून सांगू शकतात. मला काहीच समजत नाही, हा देखील देह-अभिमान आहे. अरे तुम्ही तर आत्मा आहात. बाबा आत्म्यांना बसून समजावून सांगतात. बुद्धीच तल्लख झाली पाहिजे. भाग्यामध्ये नसेल तर तल्लख होतच नाही. तर बाबा पुरुषार्थ करवून घेतात परंतु भाग्यामध्ये नसेल तर पुरुषार्थ देखील करत नाहीत. आहे खूप सोपे, अल्फ आणि बे समजून घ्यायचे आहे. बेहदच्या बाबांकडून वारसा मिळतो. तुम्ही सर्व भारतवासी गॉड-गॉडेज होता. प्रजा देखील अशीच होती. यावेळी पतित बनले आहेत. किती समजावून सांगितले जाते. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबा म्हणतात - मुलांनो, मी तुम्हाला गॉड-गॉडेज बनविले होते आणि आता तुम्ही काय बनले आहात. हा आहे कुंभी-पाक नरक. विषय वैतरणी नदीमध्ये मनुष्य, पशु-पक्षी इत्यादी सर्व एक समान दाखवतात. इथे तर मनुष्य जास्तच खराब झालेले आहेत. मनुष्यांमध्ये क्रोध देखील किती आहे. लाखों लोकांना मारून टाकतात. भारत जो वेश्यालय बनला आहे, आता पुन्हा याला शिवालय शिवबाबाच बनवतात. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगत आहेत. डायरेक्शन देतात असे-असे करा. चित्रे बनवा. मग जे मोठ-मोठ्या व्यक्ती आहेत त्यांना समजावून सांगा. हा प्राचीन योग, प्राचीन नॉलेज सर्वांना ऐकविले पाहिजे. हॉल घेऊन प्रदर्शनी लावायची आहे. तसे तर त्यांनी पैसे इत्यादी काही घेता कामा नये. परंतु तरी देखील जर योग्य वाटत असेल तर भाडे घ्या, चित्रे तरी तुम्ही बघा; चित्रे बघतील तर लगेच पैसे परत करतील. फक्त युक्तीने समजावून सांगितले पाहिजे. ऑथॉरिटी तर हातात असते ना. म्हटले तर सर्व काही करू शकता. त्यांना थोडेच समजते, विनाशकाले विपरीत बुद्धी आहेत तर विनाशाला प्राप्त झाले आहेत. पांडवांनी तर भविष्यामध्ये पद प्राप्त केले. ते देखील राज्य नंतर भविष्यामध्ये असेल. आता थोडेच असेल. ही घरे इत्यादी सर्व तुटून जातील. आता बाबांनी सांगितले आहे की, प्रदर्शनी देखील केली पाहिजे. अतिशय चांगल्या प्रकारे कार्डावर छापून निमंत्रण द्यायचे आहे. तुम्ही पहिले मोठ्यांना समजावून सांगा म्हणजे मग मदत देखील करतील. बाकी झोपून राहायचे नाही. बरीच मुले देह-अभिमानामध्ये झोपून राहतात. कमिटी बनवून क्षीरखंड होऊन प्लॅन बनविला पाहिजे. बाकी मुरली वाचली नाहीत तर धारणा कशी होईल. इतके निष्काळजी आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) देही-अभिमानी बनून सेवेच्या विविध युक्त्या शोधून काढायच्या आहेत. आपसामध्ये क्षीरखंड होऊन सेवा करायची आहे. जसे बाबा कल्याणकारी आहेत तसे कल्याणकारी बनायचे आहे.

२) प्रीत-बुद्धी बनून इतर संगत सोडून एक संगत धरायची आहे. कोणतेही असे अकर्तव्य (वाईट कर्म) करायचे नाही ज्यामुळे कल्प-कल्पांतरासाठी नुकसान होईल.

वरदान:-
बेहदच्या वैराग्य वृत्ती द्वारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनणारे अचल-अडोल भव

जे नेहमी बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये राहतात ते कधी कोणत्याही दृश्याला पाहून घाबरत नाहीत किंवा डगमगत नाहीत, नेहमी अचल-अडोल राहतात. कारण बेहदच्या वैराग्य वृत्ती द्वारे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनतात. जर थोडेफार असे काही पाहून अंश मात्र जरी डगमगायला होत असेल किंवा मोह उत्पन्न होत असेल तर अंगद समान अचल-अडोल म्हणता येणार नाही. बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये गंभीरते सोबतच रमणीकता देखील सामावलेली आहे.

बोधवाक्य:-
राज्य अधिकारी असण्या सोबतच बेहदचे वैरागी बनून राहणे हीच राजऋषीची निशाणी आहे.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-

“आत्मा कधीही परमात्म्याचा अंश असू शकत नाही”

बरेच लोक असे समजतात की, आपण आत्मे परमात्म्याचे अंश आहोत; आता अंश तर म्हटले जाते तुकड्याला. एकीकडे म्हणतात - परमात्मा अनादि आणि अविनाशी आहे, तर अशा अविनाशी परमात्म्याला तुकड्यांमध्ये कसे आणतात! आता परमात्म्याचा तुकडा कसा होऊ शकतो, आत्माच अजर-अमर आहे, तर अवश्य आत्म्याला जन्म देणारा देखील अमरच असेल. अशा अमर परमात्म्याला तुकड्यांमध्ये घेऊन येणे म्हणजे जणू परमात्म्याला देखील विनाशी म्हटले आहे; परंतु आम्ही तर जाणतो की, आम्ही आत्मे परमात्म्याची संतान आहोत, तर आम्ही त्यांचे वंशज झालो अर्थात मुले झालो, तर मग अंश कसे असू शकतो? म्हणून परमात्म्याचे महावाक्य आहे की, ‘मुलांनो, मी स्वतः तर इमॉर्टल आहे (अमर आहे), जागती ज्योत आहे, मी दिवा आहे, मी कधीही विझत नाही; आणि सर्व मनुष्य आत्म्यांचा दीपक जागृत देखील होतो तर विझून देखील जातो. आता त्या सर्वांना जागे करणारा मीच आहे कारण लाईट आणि माईट देणारा मीच आहे, बाकी इतके जरूर आहे मज परमात्म्याची लाईट आणि आत्म्याची लाईट दोन्हीमध्ये फरक अवश्य आहे’. जसा बल्ब असतो कोणता जास्त पॉवर वाला, कोणता कमी पॉवर वाला असतो, अगदी तसेच आत्मा देखील कोणती जास्त पॉवरवाली कोणती कमी पॉवरवाली आहे. बाकी परमात्म्याची पॉवर कोणापेक्षा कमी-जास्त होत नाही; तेव्हाच तर परमात्म्यासाठी म्हणतात - परमात्मा सर्वशक्तीवान अर्थात सर्व आत्म्यांपेक्षा त्यांच्यामध्ये जास्त शक्ती आहे. तेच सृष्टीच्या अंतामध्ये येतात; जर कोणी असे समजत असेल की, परमात्मा सृष्टीच्या मधल्या काळामध्ये येतात अर्थात युगे-युगे येतात तर मानावे लागेल की, परमात्मा मध्य काळामध्ये आले, तर मग परमात्मा सर्वात श्रेष्ठ कसे झाले. जर कोणी म्हटले परमात्मा युगे-युगे येतात, तर असे समजावे का की परमात्मा घडोघडी आपल्या शक्ती वापरतात. अशा सर्व शक्तीवानची शक्ती इतकी मर्यादित आहे, जर मध्येच आपल्या शक्तीद्वारे सर्वांना शक्ती अर्थात सद्गती देतील तर मग त्यांनी दिलेली शक्ती कायम राहिली पाहिजे, तर मग तुम्ही दुर्गतीला का प्राप्त करता? तर यावरून हे सिद्ध होते की परमात्मा युगे-युगे येत नाहीत, अर्थात प्रत्येक युगाच्या मध्य काळामध्ये येत नाहीत. ते येतात कल्पाच्या अंतीम समयी आणि एकदाच आपल्या शक्तीद्वारे सर्वांची सद्गती करतात. जेव्हा परमात्म्याने इतकी मोठी सेवा केली आहे तेव्हाच तर त्यांचे यादगार मोठे शिवलिंग बनविले आहे, आणि इतकी पूजा करतात, तर अवश्य परमात्मा सत्य देखील आहेत, चैतन्य देखील आहेत आणि आनंद स्वरूप देखील आहेत. अच्छा, ओम् शांती.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

व्यर्थ संकल्प किंवा संशयाला जागा असताना देखील समर्थ संकल्प चालावेत की, ‘बाबा नेहमी रक्षक आहेत, कल्याणकारी आहेत’. अशा निश्चयाचा विजय अवश्य होतो. तर क्वेश्चन मार्कचा वाकडा रस्ता न घेता नेहमी कल्याणाचा बिंदू लावा. फुलस्टॉप. याच विधीद्वारे प्रत्येक गोष्ट सोपी देखील होईल आणि सिद्धी देखील प्राप्त होईल.