21-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - देवता बनण्यापूर्वी तुम्हाला ब्राह्मण जरूर बनायचे आहे, ब्रह्मा मुखवंशावळी मुलेच खरे ब्राह्मण आहेत जे राजयोगाच्या अभ्यासाने देवता बनतात”

प्रश्न:-
इतर सर्व सत्संगांपेक्षा तुमचा हा सत्संग कोणत्या गोष्टीमध्ये वेगळा आहे?

उत्तर:-
इतर सत्संगामध्ये कोणताही एम ऑब्जेक्ट असत नाही, अजूनच धन-दौलत इत्यादी सर्व काही गमावून भटकत राहतात. या सत्संगामध्ये तुम्ही भटकत नाही. हे तर सत्संगा सोबतच स्कूल देखील आहे. स्कूलमध्ये शिकायचे असते, भटकायचे नसते. शिक्षण म्हणजे कमाई. जितके तुम्ही शिकून धारण करता आणि करविता तितकी कमाई आहे. या सत्संगामध्ये येणे अर्थात फायदाच फायदा.

ओम शांती।
आत्मिक बाबा बसून आत्मिक मुलांना समजावून सांगत आहेत. आत्मिक मुलेच या कानांनी ऐकतात. बेहदचे बाबा मुलांना म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजा’. हे वारंवार ऐकल्याने बुद्धीचे भटकणे बंद होऊन स्थिर होईल, स्वतःला आत्मा समजून बसाल. मुले समजतात - इथे आम्ही आलो आहोत देवता बनण्यासाठी. आम्ही दत्तक मुले आहोत. आम्ही ब्राह्मण आता शिकत आहोत. काय शिकत आहोत? ब्राह्मणापासून देवता बनतो. ज्याप्रमाणे काही मुले कॉलेजमध्ये जातात तर समजतात कि आम्ही आता शिकून इंजिनिअर, डॉक्टर इत्यादी बनणार. बसल्याबरोबर लगेच समजेल. तुम्ही देखील ब्रह्माची मुले ब्राह्मण बनता तर समजता आम्ही ब्राह्मण सो देवता बनणार. गायन आहे - ‘मनुष्य से देवता..’. परंतु कोण बनतात? सर्वच हिंदू काही देवता बनत नाहीत. वास्तविक हिंदू तर कोणता धर्मच नाही आहे. ‘आदि सनातन’ काही हिंदू धर्म नाही आहे. कोणालाही विचारा की हिंदू धर्म कोणी स्थापन केला? तर गोंधळून जातील. हे अज्ञानामुळे नाव ठेवले आहे. हिंदुस्थानमध्ये राहणारे स्वतःला हिंदू म्हणतात. वास्तविक याचे नाव ‘भारत’ आहे, ‘हिंदुस्थान’ नाही. ‘भारत खंड’ म्हटले जाते, ‘हिंदुस्थान खंड’ म्हटले जात नाही. आहेच मुळी भारत. तर त्यांना हे देखील माहित नाही आहे कि हा कोणता खंड आहे. अपवित्र असल्याकारणाने स्वतःला देवता तर समजू शकत नाहीत. देवी-देवता पवित्र होते. आता तो धर्मच नाहीये. इतर सर्व धर्मवाले येतात - बुद्धाचा बौद्ध धर्म, इब्राहिमचा इस्लाम धर्म, क्राईस्टचा ख्रिश्चन धर्म. बाकी हिंदू धर्माचा तर कुणीच नाही आहे. हे ‘हिंदुस्थान’ नाव तर फॉरेनर्सनी ठेवले आहे. पतित असल्याकारणाने स्वतःला देवता धर्माचे समजत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे आदि सनातन आहे देवी-देवता धर्म, जुन्यात जुना. सुरुवातीचा धर्म कोणता आहे? देवी-देवता धर्म. ‘हिंदू धर्म’ म्हणणार नाही. आता तुम्ही ब्रह्मा बाबांची दत्तक मुले ब्राह्मण झालात. ब्राह्मणापासून देवता बनण्यासाठी शिकता. असे नाही, हिंदूपासून देवता बनण्यासाठी शिकता. ब्राह्मणापासून देवता बनता. हे चांगल्या प्रकारे धारण करायचे आहे. आता तर बघा पुष्कळ धर्म आहेत. ॲड होतच जातात. जेव्हापण कुठे भाषण इत्यादी करता तर हे समजावून सांगणे चांगले आहे. आता आहे कलियुग, आता सर्व धर्म तमोप्रधान आहेत. चित्रावर तुम्ही समजावून सांगाल तर मग तो अहंकार नाहीसा होईल की, ‘मी अमका आहे, मी तमका आहे…’. समजतील की, आम्ही तर तमोप्रधान आहोत. सर्वात पहिला बाबांचा परिचय दिलात, नंतर मग दाखवायचे आहे हि जुनी दुनिया बदलणार आहे. दिवसेंदिवस चित्रे देखील आकर्षक बनत जात आहेत. जसे स्कुलमध्ये मुलांच्या बुद्धीमध्ये नकाशे असतात. तर तुमच्या बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे. नंबरवन नकाशा हा आहे, वरती त्रिमूर्ती देखील आहे, दोन्ही गोळे देखील आहेत सतयुग आणि कलियुग. आता आपण पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत. हि जुनी दुनिया विनाश होईल. एक आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन होत आहे. तुम्ही आहात आदि सनातन देवी-देवता धर्माचे. हिंदू धर्म तर नाहीच आहे. जसे संन्यासींनी ‘ब्रह्म’ला, रहाण्याच्या स्थानाला ईश्वर समजले आहेत, तसे हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्यांनी हिंदू धर्म समजले आहेत. त्यांच्यामध्ये देखील फरक आहे. तुमच्यामध्ये देखील फरक आहे. देवी-देवता नाव तर खूप श्रेष्ठ आहे. म्हणतात - हे तर जसे देवता आहेत. ज्यांच्यामध्ये चांगले गुण असतात तर असे म्हणतात - यांच्यामध्ये देवताई गुण आहेत.

तुम्ही समजता - हे राधे-कृष्णच स्वयंवरा नंतर लक्ष्मी-नारायण बनतात, त्यांना विष्णु म्हटले जाते. चित्रे सर्वांची आहेत परंतु कोणीही जाणत नाही. तुम्हा मुलांना आता बाबा बसून समजावून सांगतात, सर्वजण बाबांचीच आठवण करतात. असा कोणी मनुष्य नसेल ज्याच्या मुखामध्ये भगवंताचे नाव नसेल. आता भगवंताला तर म्हटले जाते - निराकार. ‘निराकार’चा अर्थ देखील समजत नाहीत. आता तुम्ही सर्व काही जाणता. पत्थर बुद्धि पासून पारस बुद्धी बनता. हे नॉलेज भारतवासीयांसाठीच आहे, इतर धर्मवाल्यांसाठी नाही. बाकी हे समजावून सांगू शकता कि एवढी वृद्धी कशी होते आणि नंतर इतर खंड येत गेले आहेत. तिथे तर भारत खंडाशिवाय बाकी कोणताही खंड राहणार नाही. आता तो एकच धर्म नाही आहे, बाकी सर्व उपस्थित आहेत. वडाच्या झाडाचे उदाहरण ॲक्यूरेट आहे. आदि सनातन देवी-देवता धर्माचे फाउंडेशन राहिलेले नाही, बाकी सर्व झाड उभे आहे. तर म्हणतील आदि सनातन देवी-देवता धर्म होता, हिंदू धर्म नाही. तुम्ही आता ब्राह्मण बनला आहात; देवता बनण्यासाठी पहिले जरूर ब्राह्मण बनावे लागेल. ‘शूद्र वर्ण’ आणि ‘ब्राह्मण वर्ण’ म्हटले जाते. शूद्र डिनायस्टी (शूद्र घराणे) म्हणणार नाही. राजा-राणी आहेत. आधी देवी-देवता महाराजा-महाराणी होते. इथे हिंदू महाराजा-महाराणी आहेत. भारत तर एकच आहे मग ते वेग-वेगळे कसे झाले? त्यांचे नामो-निशाणसुद्धा नाहीसे केले आहे, फक्त चित्रे आहेत. नंबरवन आहेत सूर्यवंशी. आता तुम्ही आला आहात सूर्यवंशी बनण्यासाठी. हा राजयोग आहे ना. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आता आपण हे लक्ष्मी-नारायण बनणार. मनाला आनंद वाटतो - बाबा आम्हाला शिकवत आहेत, महाराजा-महाराणी बनण्यासाठी. सत्य नारायणाची खरी-खरी कथा हि आहे. अगोदर जन्म-जन्मांतर तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकता. परंतु ती काही खरी कथा नाहीये. भक्ति मार्गामध्ये कधी मनुष्यापासून देवता बनू शकणार नाही. मुक्ती-जीवनमुक्तीला प्राप्त करू शकत नाही. सर्व मनुष्य मुक्ती-जीवनमुक्ती मिळवतात नक्की. आता सर्व बंधनामध्ये आहेत. वरून आज देखील आत्मा आली तर जीवनमुक्तीमध्ये येईल, जीवनबंधामध्ये नाही. अर्धा वेळ जीवनमुक्ती, अर्धा वेळ जीवनबंधामध्ये जातील. हा खेळ बनलेला आहे. या बेहदच्या खेळाचे आपण सर्व ॲक्टर्स आहोत, इथे येतोच पार्ट बजावण्यासाठी. आपण आत्मे इथले निवासी नाही आहोत. कसे येतो - या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या जातात. बरेच आत्मे इथेच पुनर्जन्म घेत राहतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी आहे. बेहदचे बाबा वरती बसून काय करतात, काही जाणत नाहीत म्हणून त्यांना म्हटले जाते ‘तुच्छ-बुद्धी’. तुम्ही देखील तुच्छ-बुद्धी होता. आता बाबांनी तुम्हाला रचयिता आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताचे रहस्य सांगितले आहे. तुम्ही गरीब, साधारण असलेलेच सर्वकाही जाणता. तुम्ही आहात स्वच्छ-बुद्धी. ‘स्वच्छ’ पवित्र असणाऱ्याला म्हटले जाते. तुच्छ-बुद्धी अपवित्रला म्हटले जाते. तुम्ही आता बघा काय बनत आहात! स्कुलमध्ये देखील तुम्ही शिक्षणाने उच्च पद प्राप्त करू शकता. तुमचे शिक्षण आहे उच्च ते उच्च, ज्याद्वारे तुम्ही राजाई पद प्राप्त करता. ते तर दान-पुण्य केल्याने राजाकडे जन्म घेतात, मग राजा बनतात. परंतु तुम्ही या शिक्षणाने राजा बनता. बाबाच म्हणतात मी तुम्हा मुलांना राजयोग शिकवतो. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही राजयोग शिकवू शकत नाहीत. बाबाच तुम्हाला राजयोगाचे शिक्षण देतात. तुम्ही मग दुसऱ्यांना समजावून सांगता. बाबा राजयोग शिकवतात कि, तुम्ही पतिता पासून पावन बना. स्वतःला आत्मा समजून निराकार बाबांची आठवण करा तर तुम्ही पवित्र बनाल आणि चक्राला जाणल्यामुळे चक्रवर्ती राजा सतयुगामध्ये बनाल. हे तर समजावून सांगणे खूप सोपे आहे. आता देवता धर्माचे कोणीही नाहीत. सर्वजण बाकीच्या इतर धर्मांमध्ये कनव्हर्ट झाले आहेत. तुम्ही कोणालाही समजावून सांगाल तर सर्वात पहिला बाबांचा परिचय द्या. बाबा सांगत आहेत की, इतर धर्मांमध्ये किती निघून गेले आहेत. बौद्धि, मुसलमान इत्यादी पुष्कळ झाले आहेत. तलवारीच्या जोरावर देखील मुसलमान बनले आहेत. बौध्दि देखील खूप बनले आहेत. एकदाच भाषण केले तर हजारो बौद्धि बनले. ख्रिश्चन लोक देखील असे येऊन भाषण करतात. सर्वात जास्त लोकसंख्या या वेळेला त्यांची आहे. तर आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सारे सृष्टी चक्र फिरत राहते, तेव्हाच तर बाबा म्हणतात - ‘तुम्ही स्वदर्शन चक्रधारी आहात’. स्वदर्शन चक्र विष्णूला दाखवतात. मनुष्य हे जाणत नाहीत की, स्वदर्शन चक्र विष्णूला का दिले आहे? स्वदर्शन चक्रधारी कृष्ण अथवा नारायणाला म्हणतात. हे देखील समजावून सांगितले पाहिजे कि त्यांचे काय कनेक्शन आहे. हे तिघेही एक आहेत. वास्तविक हे स्वदर्शन चक्र तर तुम्हा ब्राह्मणां करीता आहे. स्वदर्शन चक्रधारी ज्ञानाद्वारे बनता. बाकी स्वदर्शन चक्र काही मारण्या-काटण्यासाठी नाहीये. या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. जितके तुमचे हे ज्ञानाचे चक्र फिरेल, तितकी तुमची पापे भस्म होतील. बाकी मुंडके कापण्याची काही गोष्टच नाही. चक्र काही हिंसाचाराचे नाहीये. हे चक्र तर तुम्हाला अहिंसक बनवते. कुठली गोष्ट कुठे घेऊन गेले आहेत. हे बाबांव्यतिरिक्त दुसरे कोणीही समजावून सांगू शकत नाही.

तुम्हा गोड-गोड मुलांना अतिशय आनंद होतो. आता तुम्ही समजता - आम्ही आत्मा आहोत. आधी तुम्ही, आपण आत्मा आहोत हे देखील विसरलात आणि घर देखील विसरलात. आत्म्याला तरीही आत्माच म्हणतात. परमात्म्याला तर दगड-मातीमध्ये आहे असे म्हटले आहे. आत्म्यांच्या बाबांची किती निंदा केली आहे. बाबा मग येऊन आत्म्यांना ज्ञान देतात. आत्म्यासाठी कधी म्हणणार नाहीत की दगड-मातीमध्ये, कणा-कणामध्ये आहे. जनावराची तर गोष्टच वेगळी आहे. शिक्षण इत्यादी मनुष्यांसाठीच असते. आता तुम्ही समजता, आपण इतके जन्म हे-हे बनलो आहोत. ८४ जन्म पूर्ण केले. बाकी ८४ लाख तर नाहीत. मनुष्य किती अज्ञान अंधःकारामध्ये आहेत म्हणून म्हटले जाते - ‘ज्ञान सूर्य प्रगटा…’ अर्धा कल्प द्वापर-कलियुगामध्ये अंधार, अर्धा कल्प सतयुग-त्रेतामध्ये प्रकाश. दिवस आणि रात्र, प्रकाश आणि अंधाराचे हे ज्ञान आहे. हि बेहदची गोष्ट आहे. अर्धा कल्प अंधारामध्ये किती ठोकरा खाल्ल्या, खूप भटकावे लागते. स्कूलमध्ये जे शिकतात, त्याला भटकणे म्हटले जात नाही. सत्संगांमध्ये मनुष्य किती भटकतात. कमाई काहीच होत नाही, अजूनच घाटा, म्हणून त्याला भटकणे म्हटले जाते. भटकता-भटकता धन-दौलत इत्यादी सर्व गमावून गरीब बनले आहेत. आता या शिक्षणामध्ये जे जितके चांगल्या रीतीने धारण करतील आणि करवून घेतील तितका फायदाच फायदा आहे. ब्राह्मण बनला तर फायदाच फायदा. तुम्ही जाणता आपण ब्राह्मणच स्वर्गवासी बनतो. स्वर्गवासी तर सर्वच बनणार. परंतु त्यामध्ये तुम्ही उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करता.

आता तुम्हा सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. तुम्ही स्वतः म्हणता - ‘बाबा, आम्हाला वानप्रस्थ अथवा पवित्र दुनियेमध्ये घेऊन जा’; ती आहे आत्म्यांची दुनिया. निराकारी दुनिया किती छोटी आहे. इथे तर हिंडण्या-फिरण्यासाठी किती मोठी जमीन लागते. तिथे हि गोष्ट नाही, शरीर नाही, पार्ट नाही. ताऱ्याप्रमाणे आत्मे उभे आहेत. हा प्रकृतीचा चमत्कार आहे ना. सूर्य, चंद्र, तारे कसे उभे आहेत. आत्मे देखील ब्रह्म तत्वामध्ये आपल्या आधारावर नॅचरल उभे आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानाचे चिंतन करून स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. स्वदर्शन चक्र फिरवत पापांना भस्म करायचे आहे. डबल अहिंसक बनायचे आहे.

२) आपल्या बुद्धीला स्वच्छ पवित्र बनवून राजयोगाचा अभ्यास करायचा आहे आणि उच्च पद मिळवायचे आहे. हृदयामध्ये सदैव हाच आनंद रहावा कि आम्ही सत्य नारायणाची सत्य कथा ऐकून मनुष्यापासून देवता बनतो.

वरदान:-
मन-बुद्धीला ऑर्डर प्रमाणे विधिपूर्वक कार्यामध्ये लावणारे निरंतर योगी भव

निरंतर योगी अर्थात स्वराज्य अधिकारी बनण्याचे विशेष साधन आहे - मन आणि बुद्धी. मंत्रच मनमनाभवचा आहे. योगाला बुद्धियोग म्हणतात. तर जर हा विशेष आधार स्तंभ आपल्या अधिकारामध्ये आहे अर्थात ऑर्डर प्रमाणे विधी-पूर्वक कार्य करत आहे, तर जो संकल्प जेव्हा करू इच्छिता तसा संकल्प करू शकाल, जिथे बुद्धीला लावू इच्छिता तिथे लावू शकाल; बुद्धीने तुम्हा राजाला भटकवू नये. विधिपूर्वक कार्य करेल तेव्हा म्हणणार निरंतर योगी.

बोधवाक्य:-
मास्टर विश्व शिक्षक बना, समयाला शिक्षक बनवू नका.