21-06-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
15.11.2010 ओम शान्ति
मधुबन
स्व-परिवर्तनाच्या
गतीला तीव्र करून संस्कार-स्वभावाच्या समाप्तीचा सोहळा साजरा करा, प्रत्येक संकल्प,
बोल आणि कर्मामध्ये ब्रह्मा बाबांना कॉपी करा
आज बापदादा सर्वांच्या
मस्तकावर तीन भाग्याच्या चमकणाऱ्या खुणा पाहत आहेत. एक आहे - बाबांद्वारे पालनेचे
भाग्य, दुसरे आहे - शिक्षक रूपामध्ये शिक्षणाचे भाग्य, तिसरे आहे - सद्गुरू द्वारे
वरदानांचे भाग्य. तिन्ही भाग्य चमकत असलेले पाहत आहेत. प्रत्येकाचे मस्तक तिन्ही
भाग्याने चमकत आहे. असे भाग्य इतर कोणाच्याही मस्तकावर चमकताना दिसत नाही. परंतु
तुम्हा सर्वांचे मस्तक भाग्याने चमकत आहे. तुम्ही देखील सर्वजण आपल्या भाग्याला
पाहत आहात ना! बापदादांनी पाहिले, भाग्य तर सर्वांना मिळाले आहे परंतु भाग्याचे तेज
सर्वांचे एकसारखे नाहीये. कोणाची चमक खूप तेजस्वी आहे, कोणाची चमक थोडी कमी दिसून
येत आहे. तसे तर बापदादांनी सर्वांना एकाच वेळी एकसारखेच भाग्य दिले आहे. शिक्षणही
एक समान देत आहेत. पालना एक सारखीच दिली आहे आणि वरदाने देखील एक सारखीच दिली आहेत.
आदि रत्न आणि नंतर येणारे सर्वांना एकाच मुरली द्वारे पालना मिळते, शिकवण मिळते.
वरदाने देखील सर्वांना एकच मिळतात. आदि रत्नांची मुरली वेगळी नसते, एकच असते. परंतु
चमकत असणारे भाग्य नंबरवार दिसून येत आहे. बाबांच्या प्रेमाची पालना सर्वांना
एकसारखीच मिळत आहे. प्रत्येकाच्या मुखातून हेच निघते “माझे बाबा”, मग ते आधी येणारे
असो, अथवा नंतर येणारे असो, परंतु प्रत्येकजण आपल्या अधिकाराने म्हणतात “माझे बाबा”.
कोणालाही विचारा - बाबांचे प्रेम मिळाले आहे का? तर अभिमानाने म्हणतात - बाबांचे
सर्वात जास्त प्रेम मलाच मिळते. ‘माझे बाबा’ असे मनापासून म्हणणारे अभिमानाने काय
म्हणतात? म्हणतात की, माझे प्रेम सर्वात जास्त आहे. बाबांचे प्रेम आधी माझ्यावर आहे;
कारण प्रेमच बाबांची पालना आहे. ‘माझे बाबा’ असे मानल्याने तुम्ही बाबांचे बनलात आणि
बाबा तुमचे बनले.
आज तुम्ही सर्व आला
आहात तर प्रेमाच्या विमानातून आला आहात ना. सर्वांना प्रेमाच्या ओढीने इथे आणले आहे.
सर्वजण प्रेमाने आरामात पोहोचले. हे परमात्म प्रेम फक्त आता संगमावरच प्राप्त होते.
भविष्यामध्ये देव-आत्म्यांचे प्रेम प्राप्त होते, परंतु परमात्म प्रेम या एका
जन्मामध्येच प्राप्त होते. तर बापदादा देखील अशा पात्र आत्म्यांना पाहून काय
म्हणतात? वाह बच्चे वाह! तुम्हीच कोटींमध्ये कोणी पात्र बनला आहात आणि प्रत्येक
कल्पामध्ये तुम्हीच पात्र बनाल. असा नशा चालता-फिरता राहतो ना! तुमचे मन सुद्धा हेच
गाणे गाते - ‘वाह माझे भाग्य!’ हे गाणे गात राहता ना! बाबांना देखील आनंद होतो की
ही सर्व मुले अधिकारी आहेत. कोणीही स्वतःला परमात्म प्रेमामध्ये कमी समजत नाही.
प्रेमामध्ये सर्वजण पास आहेत. बापदादा विचारत आहेत की, सर्वात जास्त प्रेम कोणाचे
आहे? तर कोणाचे म्हणाल? सर्वजण जाणतात की आमचे प्रेम कमी नाहीये, बाबा देखील
म्हणतात की प्रेमाच्या सब्जेक्टमध्ये सर्वजण पास आहेत तेव्हाच तर ‘माझे बाबा’
म्हणतात. किती प्रेम आहे, ते प्रत्येकजण जाणतो. तर बापदादांनी पाहिले की प्रेमामध्ये
तर सर्व पास आहेत, परंतु आता समयानुसार स्व परिवर्तन, त्याची देखील आवश्यकता आहे.
फक्त स्व परिवर्तन, विशेष सांगितले देखील होते की, या वेळी स्व परिवर्तनामध्ये
विशेष करून संस्कार परिवर्तन, स्वभाव परिवर्तन, त्याची आवश्यकता आहे.
आता स्व परिवर्तनाची
गती फास्ट हवी. करतही आहात, अटेन्शन सुद्धा आहे, परंतु आता गती फास्ट हवी आहे.
बापदादांना लक्षात आहे की, यापूर्वी देखील तुम्ही बाबांसोबत वायदा केला होता की,
नवीन वर्षामध्ये स्व परिवर्तन, संस्कार परिवर्तन करायचेच आहे; परंतु बापदादांनी
पाहिले की संस्कार परिवर्तनामध्ये जेवढा फास्ट पुरुषार्थ पाहिजे, त्याची गती आणखी
फास्ट हवी आहे. तुम्ही सर्व काय समजता की समयानुसार जेवढी फास्ट गती पाहिजे
त्यानुसार प्रत्येकाचा तीव्र पुरुषार्थ आहे की अजून तीव्र असायला हवा? कारण
काळानुसार, समयामध्ये खूप वेगाने परिवर्तन होत आहे, तर तुमचे देखील वेगाने परिवर्तन
तेव्हा होईल जेव्हा संकल्प केला आणि झाला, अयथार्थ संकल्प असा समाप्त झाला पाहिजे
जसा एखाद्या कागदावर बिंदू लावावा. किती वेळात लागेल? अयथार्थ अर्थात फालतू संकल्प,
इतके फास्ट परिवर्तन झाले पाहिजे. तर अशी गती जी बापदादांना अपेक्षित आहे ती करू
शकता का? आहे हिंमत? जे समजतात की, आत्ता पासून इतक्या वेगाने बिंदू लावू शकतो,
‘हिम्मते बच्चे मददे बाप (मुलांची हिंमत तर बाबांची मदत)’, त्यांनी हात वर करा.
बापदादा मुलांचा दृढ संकल्प पाहून मुबारक देत आहेत. बापदादांनी यापूर्वी देखील
सांगितले आहे की दृढ संकल्पाचा संकल्प आहे - ‘करायचेच आहे’. तर आजच्या सभेमध्ये
सर्वांनी हा दृढ संकल्प केला आहे ना! तुम्ही पाहिले, दादींनी पाहिले, सर्वांनी,
मेजॉरिटींनी हात वर केला. पाहिले! तर उद्यापासून स्वभाव संस्कार समाप्तीची सेरीमनी
साजरी करायला हवी. साजरी करायची? ज्यांनी हात वर केला होता त्यांनी हात वर करा,
सेरीमनी साजरी करायची? याची सेरीमनी तर खूप धुमधडाक्यात साजरी करा. जसे हिंमतीचे
लक्ष्य ठेवले आहे तसे लक्षण देखील हिंमतीचे ठेवाल तर काही मोठी गोष्ट नाहीये. जेव्हा
लक्ष्यच आहे पित्यासमान बनण्याचे तर आता लक्ष्य आणि लक्षण एक समान करायचे आहे. फॉलो
ब्रह्मा बाबा. जे काही संकल्प, बोल, कर्म कराल आधी ब्रह्मा बाबांशी जुळवून पहा. कॉपी
करा. दुनियेमध्ये कॉपी करायला मनाई आहे, परंतु बापदादा म्हणतात ब्रह्मा बाबांना कॉपी
करा. निराकार बाबांसाठी तर म्हणाल - त्यांना देहच नाही, मग त्यांना देहभान कसे असू
शकेल! परंतु ब्रह्मा बाबा देहधारी होते. वास्तविक पहा - तुम्ही जे सरेंडर झाला आहात,
सरेंडर होणाऱ्यांनी हात वर करा, जे सरेंडर आहेत त्यांनी हात वर करा. जेव्हा तुम्ही
स्वतःला सरेंडर केले तेव्हा तुम्ही कोणता संकल्प केला होता? ‘बाबा, हे तन, मन, धन
सर्व तुमचे’. तर असे केले ना! केले? केले होते? यामध्ये हात वर करा. तर आता सरेंडर
केले - माझे नाही, तन देखील माझे नाही, धन देखील माझे नाही. जसे ब्रह्मा बाबांनी
बाबांना सेवार्थ शरीर दिले, तर ब्रह्मा बाबांना माहीत होते की हे शरीर माझे नाही,
सेवार्थ आहे. तर जेव्हा तुम्ही तन-मन-धन तिन्ही अर्पण केले तेव्हा तुमचे शरीर
बाबांच्या सेवार्थ निमित्त आहे. जसे ब्रह्मा बाबांचे शरीर सेवार्थ राहिले. तर तुमचे
शरीर तुमचे नाही आहे, सेवार्थ आहे. तर हा जो संस्कार आहे देह-अभिमानाचा किंवा
देहभानाचा, हा असायला हवा का? जर हे स्मृतीमध्ये ठेवाल की हे तन विश्व सेवार्थ आहे,
माझे नाही, बाबांनी तुम्हाला सेवार्थ दिले आहे. तर देहभान किंवा देह-अभिमान,
देह-अभिमान जास्त नुकसान करतो. देहभान त्यापेक्षा कमी नुकसानकारक आहे, परंतु जेव्हा
दोन्ही देऊन टाकले; फॉर्म भरता तेव्हा काय लिहिता? टीचर्स फॉर्म भरून घेता ना, तर
काय भरून घेता? की, हे माझे जीवन आता सेवेप्रती आहे. जे पण ब्राह्मण बनले आहेत त्या
सर्वांचा बाबांसोबत वायदा आहे - तन-मन-धन बाबांचे आहे, माझे नाही. तर हे संस्कार जे
निर्माण होतात ते देह-भान अथवा देह-अभिमानामध्ये आल्याने होतात; आणि म्हणूनच आजही
तुम्ही हा संस्कार समाप्तीचा वायदा केला आहे; कारण हे संस्कारच बाबांना प्रत्यक्ष
करण्यामध्ये विघ्न आणतात. सर्वांना हाच उमंग आहे, बापदादा ऐकत राहतात, म्हणत देखील
असता की, ‘बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे’. आतापर्यंत ब्रह्माकुमारी, ब्रह्माकुमार
प्रत्यक्ष झाले आहेत परंतु ‘ईश्वर पिता आलेले आहेत’, ही बाबांची प्रत्यक्षता गुप्त
आहे. पुरुषार्थ करत आहेत परंतु हा प्रत्यक्ष आवाज सर्वत्र पसरला पाहिजे की, ‘आमचे
बाबा आले’; ‘भगवानुवाच’ आहे, ना की ‘ब्रह्माकुमारींचे उवाच’ आहे. आता ही प्रत्यक्षता
होणारच आहे, हे स्वभाव संस्कार परिवर्तन झाल्याने तुमच्या प्रत्येकाच्या
चेहऱ्यावरून आणि वर्तनातून प्रत्यक्ष होईल. बाबांना प्रत्यक्ष करायचे आहे, करत आहात
परंतु सर्वांच्या कानामध्ये हा आवाज दुमदुमला पाहिजे - ‘भगवान आले, बाबा आले’,
होणार आहे ना! हात वर करा होणार आहे; होणार आहे? हात तर खूप छान वर केला.
बापदादा खुश आहेत की
सर्वांच्या मनामध्ये हा ध्यास आहे आणि होणारच आहे. यासाठी जसे उद्यापासून
संस्कार-स्वभावाला परिवर्तन कराल तसेच त्याचे साधन आहे की, प्रत्येकाने जे पण
ब्राह्मण आहेत, प्रत्येक ब्राह्मणाला आपल्या चार्टमध्ये ‘शुभ भावना, शुभ कामना’
ठेवण्याबाबत विशेष लक्ष द्यावे लागेल. जसे तुम्ही दुनियेतील लोकांना काम दिलेत की,
एखाद्या विषयी किती काळ शुभ भावना, कामना टिकवून ठेवू शकता; तर त्यांना सांगितले की
हे करणे शक्य आहे, तर तुम्ही देखील हे नक्कीच करू शकता. कधीही कोणाचाही
स्वभाव-संस्कार तेव्हाच सामना करतो जेव्हा त्या वेळी त्या आत्म्याप्रती शुभ भावना,
शुभ कामना नसते. तर तुम्ही देखील जर अमृतवेलेपासून हा संकल्प कराल की, ‘मला
प्रत्येक आत्म्याप्रती शुभ भावना, शुभ कामना ठेवायचीच आहे’; तर जो संकल्प केला आहे
की, परिवर्तन करायचेच आहे, तो पूर्ण करू शकाल. गोष्टी येतील, गोष्टींचे काम आहे येणे,
माया आहे ना! आणि तुमचे काम आहे विजय प्राप्त करणे. तर उद्या आपापसात ग्रुप बनवून
जे निमित्त आहेत त्यांनी आपापसात रूहरिहान करून जो संकल्प केला आहे, त्याला पुढे
प्रॅक्टिकलमध्ये कसा आणायचा, यावर रूहरिहान करा. फिनिश, बिंदू लावा. हात तर वर केला
आहे ना! पुढच्यांनी हात वर केला. तर तुम्हाला निमित्त बनावे लागेल. जसे ब्रह्मा
बाबांसमोर अगदी सुरुवातीला किती वेगवेगळे संस्कारवाले आले, आदि काळामध्ये ब्रह्मा
बाबांनी संस्कारांचा किती खेळ पाहिला. परंतु बाबांच्या सहयोगाने पुढे जात राहिले आणि
इतरांनाही पुढे नेत राहिले; ज्याचा रिझल्ट म्हणून आज ब्राह्मणांची किती संख्या झाली
आहे. हादरवून टाकणाऱ्या गोष्टी येऊन देखील अचल राहिले (दृढ राहिले). त्याचा परिणाम
म्हणून आज किती सेंटर्स उघडली आहेत, किती प्रोग्राम्स होत आहेत.
आजकाल किती
प्रोग्राम्स होत आहेत? झाले आहेत ना! हा सर्व रिझल्ट ब्रह्मा बाबांची हिंमत; आधी
एकटे ब्रह्मा बाबा होते, तुम्ही सर्वजण नंतर आला आहात, परंतु हिंमत ठेवून एकटे पुढे
चालत राहिले. तर रिझल्टमध्ये प्रत्यक्ष प्रमाण हेच आहे की आज तुम्ही सर्व त्यांचे
साथीदार बनला आहात. तर आहे ना हिंमत! ब्रह्मा बाबांनी एकट्याने हिंमत ठेवली, तुम्ही
तर भरपूर जण साथीदार आहात. तर फॉलो फादर. तुम्ही सर्वजण स्वतःला ब्रह्मा बाबांची
मुले, साथीदार मुले समजता ना; सोबत आहोत, सोबत जाणार आणि ब्रह्मा बाबांसोबत
राज्यामध्ये येणार. तर आता वेळ आहे, जशी ब्रह्मा बाबांनी हिंमत ठेवली, आणि रिझल्ट
बघत आहात. तर इतक्या संघटनमध्ये हिंमतीने पाऊल उचलाल, तर काय होऊ शकणार नाही!
कल्प-कल्प झाले आहे, होणारच आहे.
तर आता बाबांना काय
हवे आहे, ते सांगितले. फक्त तुम्ही सर्वांनी एक गोष्ट करा, ती एक गोष्ट आहे -
साधारण पुरुषार्थाला तीव्र पुरुषार्थामध्ये परिवर्तित करा. बापदादांनी पाहिले की,
कुठे-कुठे बेफिकीर वृत्ती दिसून येते, ‘हे तर होणारच आहे, विजय तर आमचा जन्मसिद्ध
अधिकार आहे’, असे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर हे निश्चितच आहे, परंतु
बेफिकीरपणातही हेच शब्द येतात की, ‘आमचा विजय तर आहेच, झालेलाच आहे. कोणतेच काम
थांबलेले नाही आहे, होणारच आहे’. एक आहेत पुरुषार्थाचे हे शब्द, दुसरे बेफिकीरपणाचे
देखील हेच शब्द आहेत. ‘कोणतेही काम थांबणार नाहीये, होणारच आहे...;’ तर हा
बेफिकीरपणा आहे, हा देखील संस्कार चेक करा. बेफिकीरपणाची निशाणी आहे की त्यांच्या
जीवनामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये थकवा दिसून येईल. चेहऱ्यावर ती आनंदाची झलक
दिसणार नाही, सेवेतून पुण्य बनत आहे, तर चेहऱ्यावर आनंद असायला हवा. कोणत्या ना
कोणत्या प्रकारच्या थकव्याचे कारण कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या बाबतीत बेफिकीरपणा
आहे. जर का करायचेच आहे तर आनंदाने करा. चेहरा तुमची सेवा करो, चलन तुमची सेवा करो.
तर आज मेजॉरिटींचा संस्कार समाप्तीकरिता हात उठलेला पाहून बापदादा पुन्हा-पुन्हा
मुबारक देत आहेत.
अच्छा, या ग्रुपमध्ये
जे पहिल्यांदा आले आहेत त्यांनी उभे राहा. पाहिलेत किती आहेत? पुष्कळ आहेत. हात हलवा.
जे पहिल्यांदा आले आहेत, त्यांना आपल्या बाबांना भेटल्याबद्दल मुबारक असो. तर विशेष
समयानुसार आता तुम्हाला तीव्र पुरुषार्थ करावा लागेल; आणि बापदादांचे असे सांगणे आहे
की जो तीव्र पुरुषार्थ करेल, ढिला-ढाला नाही, तो लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो
फर्स्ट येईल. असा चमत्कार करा. चान्स आहे. असे समजू नका आम्ही तर लास्ट आलो आहोत,
नाही, फास्ट जाऊ शकता. परंतु सतत तीव्र पुरुषार्थ करायचाच आहे. बदलायचेच आहे.
‘गे-गे’ करायचे नाही; पाहू, विचार करू... असे ‘गे-गे’ करायचे नाही. आपले घर छान आहे,
दात्याचे घर आवडले ना! तर सर्व भाऊ-बहिणी देखील तुमचे स्वागत करत आहेत. अच्छा.
सर्व चोहो बाजूंच्या
ब्राह्मण मुलांना बापदादांची स्नेहभरी प्रेमपूर्वक आठवण स्वीकार असो, बापदादा
जाणतात की, दूर बसूनही बरीच मुले बाबा-मिलन पाहत देखील आहेत, आणि मिलन साजरे देखील
करत आहेत, त्या चोहोबाजूंच्या मुलांना बापदादा हेच सांगत आहेत की, जसे आता सर्व
मेजॉरिटींनी हात वर केला, संस्कार समाप्त, आता तुम्ही सर्वजण मिळून एकच संकल्परूपी
हात वर करतच आहात की आम्ही सर्व मिळून समाप्तीची वेळ समीप आणण्यासाठी हा संकल्प करत
आहोत आणि समय संपूर्ण झाल्यावर चोहो बाजूला ब्रह्मा-बाबा आणि शिव-बाबा दोघांनाही
प्रत्यक्ष करू की, “आमचे बाबा आले आहेत”! सर्वांच्या मुखातून बाबांची प्रत्यक्षता
होऊ दे. आता या वर्षामध्ये हाच दृढ संकल्प ठेवा की बाबांना प्रत्यक्ष करायचेच आहे.
अर्धे काम तर केले आहे, मुलांना बाबांनी विश्वाच्या समोर प्रत्यक्ष केले आहे, आता
मुलांचे कार्य आहे की, ‘भगवान आले आहेत’, हा आवाज विश्वातील एका-एका मुलापर्यंत
पोहोचावा. तर बापदादा सर्वांना पाहून प्रत्येकाला अंतःकरणातून स्नेह, हृदयातील
प्रेम, मनातील उमंग-उत्साहासहित प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. अच्छा.
सेवेचा टर्न कर्नाटक
झोनचा आहे:-
सेवेचा चान्स घेणे अर्थात बाबांच्या जवळ येण्याची संधी मिळणे. पहा, सेवेमुळे किती
लोकांना येण्याचा चान्स मिळतो. सर्वांचे आशीर्वाद तुम्हा निमित्त टीचर्सना मिळतात,
कारण सेवेची हिंमत ठेवलीत आणि चान्स इतक्या जणांना मिळाला. बापदादांनी पाहिले की
नवीन असणारे देखील भरपूरजण पहिल्यांदाच आले आहेत; जे पहिल्यांदाच आले आहेत
कर्नाटकवाले, त्यांनी मोठा हात करा. पहिल्यांदा असूनही भरपूर आले आहेत. छान आहे.
कर्नाटकची वृद्धी चांगली आहे, आता जशी वृद्धी झाली आहे तशी तीव्र पुरुषार्थाची विधी,
त्याची देखील लाट चोहोबाजूला पसरवा. नंबर मिळवा. संस्कार समाप्तीचा नंबर मिळवा.
मिळवू शकता? जे समजतात आम्ही पहिला नंबर मिळवू शकतो, त्यांनी हात वर करा. छान आहे.
असे आपापसात संघटन करून प्रोग्राम बनवा, सर्वजण एक आहेत. स्थाने वेगवेगळी आहेत परंतु
आहेत एक. हा चमत्कार करून दाखवा. आहे ना हिंमत? हिंमत आहे? बापदादांकडे समाचार तर
येतच राहतो; तर मधुबनमध्ये दर महिन्याला आपल्या परिवर्तनाचा समाचार लिहा. लिहिणार
ना! दर महिन्याचा. जे झाले ते झाले, आता नंबर वन होऊन दाखवा. छान आहे. बापदादांनी
पाहिले सेवा चांगली आहे, आता संघटन पाहू इच्छित आहेत. उदाहरण बना. रेडी. रेडी आहात?
हात वर करा. तुम्ही पहा, तुम्हाला एका महिन्यातच याचा रिझल्ट मिळेल. अच्छा, खूप-खूप
विशेष प्रेमपूर्वक आठवण.
वरदान:-
संपूर्ण
समर्पणाच्या विधीद्वारे ‘माझे’पणाचा अधिकार समाप्त करणारे समान साथी भव
जो वायदा आहे की सोबत
राहणार, सोबत येणार आणि सोबत राज्य करणार - हा वायदा तेव्हाच निभावू शकाल जेव्हा
साथीदारा समान बनाल. समानता येईल समर्पणाने. जेव्हा सर्व काही समर्पण केले आहे तर
आपला किंवा दुसऱ्याचा अधिकारच समाप्त होतो. जोपर्यंत कोणाचातरी अधिकार आहे, तर सर्व
समर्पणामध्ये काही कमतरता आहे, म्हणून समान बनू शकत नाहीत. तर सोबत राहण्यासाठी,
सोबत उडण्यासाठी लवकरात-लवकर समान बना.
सुविचार:-
आपल्या समय, श्वास आणि
संकल्पाला सफल करणे हाच सफलतेचा आधार आहे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
जे सरळ स्वभावाचे
असतील त्यांच्यामध्ये समेटण्याची शक्ती स्वतःहूनच असेल. सरळ स्वभाव असणारा सर्वांचा
सहयोगी आणि स्नेही देखील असेल आणि जितका सरळ स्वभावाचा असेल तितकी माया कमी सामना
करेल. सरळ स्वभाव असणाऱ्याचा कधी व्यर्थ संकल्प चालत नाही. त्यांचा वेळ सुद्धा
व्यर्थ जात नाही. त्यांची बुद्धी विशाल आणि दूरांदेशी (दूरदर्शी) असते, त्यामुळे
त्याच्यासमोर कोणतीही समस्या सामना करू शकत नाही.
विशेष सूचना:-
महिन्याच्या तिसऱ्या रविवारचा योग अभ्यास -
आज महिन्याचा तिसरा
रविवार आहे, सर्व भाऊ-बहिणींनी संघटित रूपामध्ये एकत्र येऊन सायंकाळी ६.३० ते ७.३०
वाजेपर्यंत आपल्या फरिश्ता स्वरूपा द्वारे भटकणाऱ्या, दुःखी, अशांत आत्म्यांना
सुख-शांतीची पवित्र किरणे देऊन त्यांना सहारे दाता परमात्मा बाबांची स्मृती देण्याची
सेवा करा.