21-07-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   16.12.20  ओम शान्ति   मधुबन


साक्षात ब्रह्मा बाप समान कर्मयोगी फरिश्ता बना तेव्हाच साक्षात्कार सुरु होतील


आज ब्राह्मण संसाराची रचना करणारे (रचता) बापदादा आपल्या ब्राह्मण संसाराला पाहून हर्षित होत आहेत. किती छोटासा सुंदर संसार आहे. प्रत्येक ब्राह्मणाच्या मस्तकावर भाग्याचा तारा चमकत आहे. नंबरवार असून देखील प्रत्येक ताऱ्यामध्ये भगवंताला ओळखण्याची आणि बनण्याच्या श्रेष्ठ भाग्याची चमक आहे. ज्या पित्याला ऋषी, मुनी, तपस्वी नेती-नेती (माहीत नाही) असे म्हणत निघून गेले, त्या पित्याला ब्राह्मण संसारातील भोळ्या-भाबड्या आत्म्यांनी ओळखले आणि प्राप्त केले. हे भाग्य कोणत्या आत्म्यांना प्राप्त होते? जे साधारण आत्मे आहेत. बाबा सुद्धा साधारण तनामध्ये येतात, तर मुलांमध्ये देखील साधारण आत्मेच ओळखतात. आजच्या या सभेमध्ये पहा, कोण बसले आहेत? कोणी अरब-खरबपती बसले आहेत का? साधारण आत्म्यांचेच गायन आहे. बाबा ‘गरीब-निवाज’ म्हणून गायले जातात. ‘अरब-खरबपती निवाज’ असे गायन झालेले नाहीये. बुद्धीवानांची बुद्धी काय कोणा अरब-खरबपतीच्या बुद्धीला बदलू शकत नाही? मोठी गोष्ट आहे काय! परंतु ड्रामाचा खूप चांगला कल्याणकारी नियम बनलेला आहे, परमात्म कार्यामध्ये फुरी-फुरी (थेंबे-थेंबे) तळे साचणार आहे. अनेक आत्म्यांचे भविष्य बनणार आहे. १०-२० जणांचे नाही, अनेक आत्म्यांचे सफल होणार आहे म्हणूनच गायन आहे - ‘थेंबे-थेंबे तळे साचे’. तुम्ही सर्व जितके तन-मन-धन सफल करता तितकेच सफलतेचे तारे बनले आहात. सगळे सफलतेचे तारे बनले आहात? बनले आहात का आता बनणार आहात, विचार करत आहात का? विचार करू नका. ‘करू, बघू, करायचे तर आहेच…’ असा विचार करणे हे सुद्धा वेळ घालवणे आहे. भविष्य आणि वर्तमानातील प्राप्ती गमावणे आहे.

बापदादांपाशी काही-काही मुलांचा एक संकल्प पोहोचतो. बाहेरचे तर ‘बिचारे’ आहेत परंतु ब्राह्मण आत्मे ‘बिचारे’ नाहीत, ‘विचारवंत’ आहेत, हुशार आहेत. परंतु कधी-कधी काही-काही मुलांमध्ये एक कमजोर संकल्प उत्पन्न होतो, सांगू. सांगू का? सगळे हात वर करत आहेत, खूप छान. कधी-कधी विचार करतात कि, विनाश होणार आहे कि नाही होणार! ९९ सालाचे चक्र सुद्धा पूर्ण झाले, २००० सुद्धा संपणारच आहे. आता कधी पर्यंत? बापदादा विचार करतात - हि तर हसण्यासारखी गोष्ट आहे कि विनाशाचा विचार करणे अर्थात बाबांना निरोप देणे कारण विनाश झाला की मग बाबा तर परमधाममध्ये निघून जाणार ना! तर संगमाला कंटाळले आहात का? ‘हिरेतुल्य’ म्हणता आणि ‘गोल्डन’ची (सतयुगाची) जास्त आठवण करता, होणार तर आहे परंतु प्रतीक्षा का करता? बरीच मुले विचार करतात सफल तर करू परंतु विनाश जर उद्या-परवा झाला तर, मग आमचे काहीच कामी येणार नाही. आमचे तर सेवेमध्ये लागलेच नाही. तर, ‘करू, विचार करून करू. हिशोबाने करू, थोडे-थोडे करून करू’. हे संकल्प बाबांकडे पोहोचतात. परंतु समजा आज तुम्ही मुलांनी आपले तन सेवेमध्ये समर्पण केले, मन विश्व परिवर्तनाच्या व्हायब्रेशनमध्ये निरंतर लावले, धन जे काही आहे, आहे तरी प्राप्तीच्या समोर काहीच नाही परंतु जे काही आहे, आज तुम्ही सफल केले आणि उद्या विनाश झाला तर काय तुमचे सफल झाले कि व्यर्थ गेले? विचार करा, सेवेमध्ये तर लागले नाही, तर काय सफल झाले? तुम्ही कोणाप्रती सफल केले? बापदादांप्रती सफल केले ना? तर बापदादा तर अविनाशी आहेत, त्यांचा तर विनाश होत नाही! अविनाशी खात्यामध्ये, अविनाशी बापदादांकडे तुम्ही आज जमा केले, एक तास अगोदर जमा केले, तर अविनाशी बाबांकडे तुमचे खाते एकाचे पद्मगुणा जमा झाले. बाबा बांधील आहेत, एकाचे पद्म गुणा देण्यासाठी. तर बाबा काही निघून जाणार नाहीत ना! जुन्या सृष्टीचा विनाश होणार ना! म्हणून तुमचे मनापासून सफल केलेले हवे. नाईलाजाने केलेले, दाखवण्यासाठी केलेले, त्याचे पूर्ण (रिटर्न) मिळत नाही. मिळते जरूर कारण दात्याला दिले आहे परंतु पूर्ण मिळत नाही त्यामुळे असा विचार करू नका - अच्छा अजून विनाश तर २००१ पर्यंत होईल असे दिसत तर नाही, अजून तर प्रोग्रॅम बनत आहेत, वास्तू बनत आहेत. मोठ-मोठे प्लॅन बनत आहेत, तर २००१ पर्यंत तरी दिसून येत नाही; विनाश काही असा दिसून येणार नाही. कधीही अशा गोष्टींना आपला आधार बनवून गाफील राहू नका. अचानक होणार आहे. आज इथे बसला आहात, एका तासानंतर सुद्धा होऊ शकतो. होणार नाही, घाबरू नका कि माहीत नाही एका तासानंतर काय होणार आहे! शक्यता आहे. इतके एव्हररेडी रहायचेच आहे. शिवरात्री पर्यंत सफल करायचे आहे, असा विचार करू नका. वेळेची प्रतीक्षा करू नका. वेळ तुमची रचना आहे, तुम्ही मास्टर रचता आहात. रचता रचनेच्या अधीन असत नाही. समय तुमची रचना तुमच्या ऑर्डरवर चालणारी आहे. तुम्ही समयाची प्रतीक्षा करू नका, परंतु आता समय तुमची प्रतीक्षा करत आहे. बरीच मुले विचार करतात, ६ महिन्यासाठी बापदादांनी सांगितले आहे तर ६ महिने तर होणारच. होणारच ना! परंतु बापदादा म्हणतात - या हदच्या गोष्टींचा आधार घेऊ नका, एव्हररेडी रहा’. निराधार, एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती. चॅलेंज करता एका सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा वारसा घ्या. तर तुम्ही स्वतःला एका सेकंदामध्ये जीवनमुक्त बनवू शकत नाही काय? म्हणून प्रतीक्षा नाही, संपन्न बनण्याची तयारी करा.

बापदादांना मुलांचे खेळ पाहून हसू देखील येते. कोणत्या खेळावर हसू येते? सांगू का? आज मुरली चालवत नाही, समाचार ऐकवतो आहे. अजून पर्यंत बऱ्याच मुलांना खेळण्यां सोबत खेळायला खूप आवडते. छोट्या-छोट्या बाबींच्या खेळण्यासोबत खेळणे, छोट्या गोष्टीला स्वीकारणे, असा वेळ वाया घालवतात. हे तर साइड सीन आहेत. भिन्न-भिन्न संस्काराच्या गोष्टी किंवा वर्तणूक हे संपूर्ण ध्येय गाठण्याच्या मार्गामध्ये येणारे साइड सीन आहेत. याच्यासाठी थांबणे अर्थात विचार करणे, प्रभावामध्ये येणे, वेळ गमावणे, रुचीने ऐकणे, दुसऱ्यांना ऐकवणे, वायुमंडळ बनवणे... हे आहे थांबणे, यामुळे संपन्नतेच्या ध्येयापासून दूर होता. मेहनत खूप घेता, इच्छा खूप आहे - “बाप समान बनायचेच आहे”, शुभ संकल्प, शुभ इच्छा आहे परंतु मेहनत करत असताना सुद्धा व्यत्यय येतो. दोन कान आहेत, दोन डोळे आहेत, तोंड आहे तर नजरेस सुद्धा पडते, ऐकू सुद्धा येते, वाणीमध्ये सुद्धा येते; परंतु बाबांचे खूप जुने स्लोगन नेहमी लक्षात ठेवा - दिसत असले तरी पाहू नका, ऐकायला येत असले तरी ऐकू नका. ऐकू येत असले तरी विचार करू नका, ऐकत असूनही आत सामावून घ्या, पसरवू नका. हे जुने स्लोगन लक्षात ठेवणे जरुरी आहे; कारण दिवसेंदिवस जसे सर्वांचे जे काही जुन्या शरीराचे हिशोब चुकतू होत आहेत, तसेच जुने संस्कार देखील, जुने आजार सुद्धा सर्वांचे बाहेर पडून नष्ट होणार आहेत, त्यामुळे घाबरू नका कि आता तर माहीत नाही आणखीनच गोष्टी वाढत आहेत, अगोदर तर नव्हत्या. ज्या नव्हत्या, त्या सुद्धा आता निघत आहेत, निघणार आहेत. तुमच्या सामावण्याची शक्ती, सहन करण्याची शक्ती, समेटण्याची शक्ती, निर्णय घेण्याची शक्ती यांचा पेपर आहे. काय १० वर्षापूर्वीचे पेपर येणार का? बी.ए. चा पेपर एम.ए. ला येणार का? त्यामुळे घाबरू नका, काय होत आहे. हे होत आहे, असे होत आहे… खेळ बघा. पेपरात तर पास व्हा, पास विद ऑनर व्हा.

बापदादांनी या अगोदर सुद्धा सांगितले आहे कि पास होण्याचे सर्वात सोपे साधन आहे, बापदादांपाशी रहा, जे तुमच्या कामाचे दृश्य नाही, त्याला पास होऊ द्या, पास (सोबत) रहा, पास करा, पास व्हा. काही अवघड आहे का? टीचर्स तुम्ही सांगा, मधुबनवाले सांगा बरे. मधुबनवाले हात वर करा. हुशार आहेत मधुबनवाले सर्वात पुढे समोर बसतात, जरूर या. बापदादांना आनंद आहे. आपला हक्क घेता ना? चांगले आहे, बापदादा नाराज नाहीत, खुशाल समोर बसा. मधुबनमध्ये राहता तर ‘पास’ (जवळ) बसण्यासाठी काहीतरी खास व्यवस्था असली पाहिजे ना! परंतु ‘पास’ शब्द लक्षात ठेवा. मधुबनमध्ये नवीन-नवीन गोष्टी होतात ना, डाकू सुद्धा येतात. बऱ्याच नवीन-नवीन गोष्टी होतात, आता बाबा जनरलमध्ये (सर्वांसमोर) कसे ऐकवणार, थोडे गुप्त ठेवतात, परंतु मधुबनवाले जाणतात. स्वतःचे मनोरंजन करा, गोंधळून जाऊ नका. एक आहे गोंधळून जाणे किंवा दुसरे आहे मनोरंजन समजून मजेमध्ये पास करणे. तर गोंधळून जाणे चांगले आहे कि पास करून मजेमध्ये राहणे चांगले आहे? पास करायचे आहे ना! पास व्हायचे आहे ना! तर पास करा. काही मोठी गोष्ट आहे का? काही मोठी गोष्ट नाही. गोष्टीला मोठे करणे किंवा छोटे करणे, स्वतःच्या बुद्धीवर आहे. जे गोष्टीला मोठे करतात, त्यांच्यासाठी अज्ञानकाळामध्ये सुद्धा म्हणतात की, हा तर दोरीला साप बनवणारा आहे. सिंधी भाषेमध्ये म्हणतात कि “नोरी को नाग” बनवतात. असे खेळ करू नका. आता हा खेळ संपला.

आज विशेष समाचार तर ऐकवला ना, बापदादा आता एक सोपा पुरुषार्थ सांगत आहेत, अवघड नाहीये. सर्वांचा हा संकल्प तर आहेच की, ‘बाप समान बनायचेच आहे’. बनायचेच आहे, पक्के आहे ना! फॉरेनर्स बनायचेच आहे ना? टीचर्स बनायचे आहे ना? किती टीचर्स आल्या आहेत! वाह! कमाल आहे टीचर्सची. बापदादांनी आज टीचर्सची एक खुशखबर ऐकली. कोणती खुशखबर आहे, सांगा. टीचर्स ना आज गोल्डन मेडल (बॅज) मिळाला आहे. ज्यांना गोल्डन मेडल मिळाले आहे, हात वर करा. पांडवांना सुद्धा मिळाले आहे? बाबांचे हमजीन्स तर राहून जायला नकोत. पांडव ब्रह्मा बाबांचे हमजीन्स आहेत. (त्यांना वेगळ्या प्रकारचा गोल्डन मिळाला आहे) पांडवांना रॉयल गोल्ड मेडल आहे. गोल्डन मेडलवाल्यांना बापदादांची अरब-खरब वेळा मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो.

बापदादा, जे देश-विदेशामध्ये बसून ऐकत आहेत, आणि गोल्डन मेडल मिळाले आहे, त्या सर्वांनी देखील असे समजा की आम्हाला सुद्धा बापदादांनी मुबारक दिली आहे, मग पांडव असोत, किंवा शक्ती असोत, कोणत्याही कार्याच्या निमित्त बनणाऱ्यांना खास या दादी, परिवारामध्ये राहणाऱ्यांना सुद्धा काही विशेषतेच्या आधारावर गोल्डन मेडल देतात. तर ज्याला सुद्धा ज्या विशेषतेच्या आधारावर मग समर्पित होण्याच्या आधारावर, किंवा कोणत्याही सेवेमध्ये विशेष पुढे जाणाऱ्यांना दादींकडून सुद्धा गोल्डन मेडल मिळाले आहे, तर दूर बसून ऐकणाऱ्यांना सुद्धा खूप-खूप मुबारक असो. तुम्हा सर्व दूर बसून मुरली ऐकणाऱ्यांसाठी, गोल्डन मेडलवाल्यांसाठी एक हाताची टाळी वाजवा, ते तुमची टाळी पाहत आहेत. ते सुद्धा हसत आहेत, खुश होत आहेत.

बापदादा सोपा पुरुषार्थ सांगत होते - आता वेळ तर अचानक होण्याची आहे, बापदादा एक तास सुद्धा अगोदर अनाऊन्स करणार नाहीत; नाही करणार, नाही करणार, नाही करणार. नंबर कसे बनतील? जर अचानक झाले नाही तर पेपर कसा झाला? पास विद ऑनरचे सर्टिफिकेट, फायनल सर्टिफिकेट तर अचानकमध्येच होणार आहे म्हणून दादींचा एक संकल्प बापदादांपाशी पोहोचला आहे. दादींची अशी इच्छा आहे कि आता बापदादा साक्षात्काराची चावी उघडू देत, हा यांचा संकल्प आहे. तुम्हा सर्वांची सुद्धा अशी इच्छा आहे? बापदादा चावी उघडतील कि तुम्ही निमित्त बनणार? अच्छा बापदादा चावी उघडू देत, ठीक आहे. बापदादा ‘हां जी’ करत आहेत, (टाळ्या वाजवल्या गेल्या) अगोदर पूर्ण ऐका. बापदादांना चावी उघडायला कितीसा वेळ लागेल, परंतु करतील कोणा द्वारे? प्रत्यक्ष कोणाला करायचे आहे? मुलांना कि बाबांना? बाबांना सुद्धा मुलांद्वारे करायचे आहे कारण ज्योतीबिंदूचा साक्षात्कार जरी झाला तर बरेच जण तर बिचारे…, बिचारे आहेत ना! तर बिचारे समजणार देखील नाहीत कि हे काय आहे. शेवटी शक्ती आणि पांडव मुलांद्वारे बाबांना प्रत्यक्ष व्हायचे आहे. तर बापदादा हेच म्हणत आहेत कि जर सर्व मुलांचा एकच संकल्प आहे कि, ‘बाप समान बनायचेच आहे’, यामध्ये तर दोन विचार नाही आहेत ना! एकच विचार आहे ना. तर ब्रह्मा बाबांना फॉलो करा. तर आपोआप अशरीरी, बिंदू व्हाल. ब्रह्मा बाबांवर तर सर्वांचे प्रेम आहे ना! सर्वात जास्त पाहिले गेले आहे, तसे तर सर्वांचे आहे परंतु फॉरेनर्सचे ब्रह्मा बाबांवर खूप प्रेम आहे. या डोळ्यांनी पाहिले नाही परंतु अनुभवाच्या डोळ्यांद्वारे फॉरेनर्सनी मेजॉरिटी ब्रह्मा बाबांना पाहिले आहे आणि खूप प्रेम आहे. असे तर भारताच्या गोप-गोपिका सुद्धा आहेत तरीही बापदादा कधी-कधी फॉरेनर्सच्या अनुभवाच्या गोष्टी ऐकतात, भारतवासी थोडे गुप्त ठेवतात, ते ब्रह्मा बाबांप्रती ऐकवतात तर त्यांच्या गोष्टी बापदादा सुद्धा ऐकतात आणि इतरांना सुद्धा ऐकवतात, मुबारक असो फॉरेनर्सना. लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, एशिया, रशिया, जर्मनी… म्हणजे चोहो बाजूच्या फॉरेनर्सना जे दूर बसून सुद्धा ऐकत आहेत, त्यांना सुद्धा बापदादा मुबारक देत आहेत, खास ब्रह्मा बाबा मुबारक देत आहेत. भारतवाल्यांचे थोडे गुप्त आहे, इतके प्रसिद्ध करू शकत नाहीत, गुप्त ठेवतात. आता प्रत्यक्ष करा. बाकी भारतामध्ये सुद्धा खूप छान-छान गोपिका आहेत. अशा गोपिका आहेत, जर त्यांचे अनुभव आजकालचे प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट सुद्धा ऐकतील तर त्यांच्याही डोळ्यातून पाणी येईल. असे अनुभव आहेत परंतु गुप्त ठेवतात फारसे सांगत नाहीत, चान्स सुद्धा कमी मिळतो. तर बापदादा हे म्हणत आहेत कि ब्रह्मा बाबांवर सर्वांचे प्रेम तर आहे, म्हणून तर स्वतःला काय म्हणता? ब्रह्माकुमारी कि शिवकुमारी? स्वतःला ‘ब्रह्माकुमारी’ म्हणता ना, मग ब्रह्मा बाबांवर प्रेम तर आहेच ना. ठीक आहे अशरीरी बनण्यामध्ये थोडी मेहनत करावी सुद्धा लागते परंतु ब्रह्मा बाबा आता कोणत्या रूपामध्ये आहेत? कोणत्या रूपामध्ये आहेत? बोला? (फरिश्ता रूपामध्ये आहेत) तर ब्रह्मा बाबांवर प्रेम अर्थात फरिश्ता रूपावर प्रेम. चला बिंदू बनणे कठीण वाटते, फरिश्ता बनणे तर त्याही पेक्षा सोपे आहे ना! सांगा बरे, बिंदू रूपापेक्षा तर फरिश्ता रूप सोपे आहे ना! तुम्ही अकाउंटचे काम करत असताना बिंदू बनू शकता? फरिश्ता तर बनू शकता ना! बिंदू रूपामध्ये कर्म करताना कधी-कधी व्यक्त शरीरामधे यावे लागते परंतु बापदादांनी पाहिले आहे कि वैज्ञानिकांनी एक लाईटच्या आधारावर रोबोट (यंत्रमानव) बनवला आहे, ऐकले आहे ना! चला बघितला नाहीये परंतु ऐकले तर आहे! मातांनी ऐकले आहे? तुम्हाला चित्र दाखवू. त्या लाईटच्या आधारावर रोबोट बनवला आहे आणि तो सर्व काम करतो. आणि फास्ट गतीने करतो, लाईटच्या आधाराने. आणि विज्ञानाचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. तर बापदादा म्हणत आहेत काय सायलेन्सच्या शक्तीने, सायलेन्सच्या लाईट ने तुम्ही कर्म करू शकत नाही का? नाही करू शकत? इंजिनिअर आणि विज्ञानवाले बसले आहेत ना! तर तुम्ही देखील एक रुहानी (आत्मिक) रोबोटची स्थिती तयार करा. ज्याला म्हटले जाईल रुहानी कर्मयोगी, फरिश्ता कर्मयोगी. आधी तुम्ही तयार व्हा. इंजिनिअर आहेत, वैज्ञानिक आहेत तर अगोदर तुम्ही अनुभव करा. करणार ना? करू शकता का? अच्छा, असे प्लॅन बनवा. बापदादा असे रुहानी चालते-फिरते कर्मयोगी फरिश्ते पाहू इच्छितात. अमृतवेलेला उठा, बापदादांच्या भेटीचा आनंद घ्या, रुहरिहान करा, वरदान घ्या. जे करायचे आहे ते करा. परंतु बापदादांकडून रोज अमृतवेलेला ‘कर्मयोगी फरिश्ता भव’चे वरदान घेऊन मग कार्यव्यवहारामध्ये या. हे होऊ शकते का?

या नवीन वर्षामध्ये लक्ष्य ठेवा - संस्कार परिवर्तन, स्वतःचे देखील आणि सहयोगाद्वारे इतरांचे देखील. कोणी कमजोर असेल तर सहयोग द्या, वर्णन करू नका आणि वातावरणही बनवू नका. सहयोग द्या. या वर्षाचा टॉपिक आहे “संस्कार परिवर्तन”. फरिश्ता संस्कार, ब्रह्मा बाप समान संस्कार. तर पुरुषार्थ सोपा आहे कि कठीण आहे? थोडा-थोडा कठीण आहे? कधीही कोणती गोष्ट कठीण असत नाही, आपली कमजोरी त्याला कठीण बनवते, म्हणून बापदादा म्हणतात “हे मास्टर सर्वशक्तिवान मुलांनो, आता शक्तींचे वायुमंडल पसरवा.” आता वायुमंडळाला तुमची खूप-खूप-खूप आवश्यकता आहे. जसे आजकाल विश्वामध्ये प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे, तसे विश्वामध्ये एक क्षण मनामध्ये सुख-शांतीच्या वायुमंडळाची आवश्यकता आहे कारण मनाचे प्रदूषण खूप आहे, हवेच्या प्रदूषणा पेक्षाही जास्त आहे. अच्छा.

चोहो बाजूच्या बापदादांसमान बनायचेच आहे असे लक्ष्य ठेवणाऱ्या, निश्चय बुद्धी विजयी आत्म्यांना, सदैव जुना संसार आणि जुन्या संस्कारांना दृढ संकल्पाद्वारे परिवर्तन करणाऱ्या मास्टर सर्वशक्तिवान आत्म्यांना, सदैव कोणत्याही कारणामुळे, परिस्थितीमुळे, स्वभाव-संस्कारामुळे कमजोर साथीदारांना, आत्म्यांना सहयोग देणारे, कारण पाहणारे नाहीत, निवारण करणाऱ्या अशा हिम्मतवान आत्म्यांना, सदैव ब्रह्मा बाबांच्या स्नेहाचे रिटर्न देणाऱ्या कर्मयोगी फरिश्ता आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
शुभचिंतक स्थितीद्वारे सर्वांचा सहयोग प्राप्त करणारे सर्वांचे स्नेही भव

शुभचिंतक आत्म्यांच्या प्रति प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्नेह उत्पन्न होतो आणि तो स्नेहच सहयोगी बनवितो. जिथे स्नेह असतो, तिथे वेळ, संपत्ती, सहयोग समर्पण करण्यासाठी सदैव तयार असतात. तर शुभचिंतक, स्नेही बनवेल आणि स्नेह सर्व प्रकारच्या सहयोगामध्ये समर्पित बनवेल म्हणून सदैव शुभचिंतनाने संपन्न रहा आणि शुभचिंतक बनून सर्वांना स्नेही, सहयोगी बनवा.

सुविचार:-
यावेळी दाता बना तर तुमच्या राज्यामध्ये जन्मो-जन्मी प्रत्येक आत्मा भरपूर राहील.


सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, सर्व ब्रह्मा वत्स संघटीत रूपामध्ये सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजे पर्यंत विशेष आपल्या मास्टर सर्वशक्तीवान स्वरूपामध्ये स्थित होऊन, सर्व निर्बल, कमजोर आत्म्यांना शुभ भावनेची किरणे द्या. परमात्म शक्तींचा अनुभव करत चोहो बाजूला शक्तिशाली वायुमंडल बनविण्याची सेवा करा.