21-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, बाबा
अतिशय गोड सॅकरिन आहेत त्यामुळे इतर सर्व गोष्टी सोडून त्या बाबांची आठवण करा तर
गोड सॅकरिन बनाल”
प्रश्न:-
तुम्ही
बाबांकडून श्रीमत घेऊन आपल्यामध्ये कोणते संस्कार भरत आहात?
उत्तर:-
भविष्यामध्ये
वजिराशिवाय संपूर्ण विश्वावर राज्य करण्याचे संस्कार भरत आहात. तुम्ही इथे येताच
मुळी भविष्य राजधानी चालविण्याची श्रीमत घेण्यासाठी. बाबा तुम्हाला असे श्रीमत
देतात जेणेकरून अर्ध्या कल्पापर्यंत कोणाचाही सल्ला घेण्याची गरज भासत नाही. सल्ला
त्यांना घ्यावा लागतो ज्यांची बुद्धी कमजोर असते.
गीत:-
तुम्हीं हो
माता…
ओम शांती।
गोड-गोड रूहानी
मुलांनी गाणे ऐकले. हे कोणी म्हटले की, गोड-गोड रूहानी मुलांनो? जरूर रुहानी बाबाच
म्हणू शकतात. गोड-गोड रूहानी मुले आता सन्मुख बसली आहेत आणि अतिशय प्रेमाने बाबा
त्यांना समजावून सांगत आहेत. आता तुम्ही जाणता रूहानी बाबांव्यतिरिक्त सर्वांना
सुख-शांती देणारा अथवा सर्वांना दुःखातून लिबरेट करणारा साऱ्या दुनियेमध्ये अजून
कोणीच नाहीये म्हणून दुःखामध्ये बाबांची आठवण करत राहतात. तुम्ही मुले सन्मुख बसला
आहात. तुम्ही जाणता बाबा आम्हाला सुखधामच्या लायक बनवत आहेत. कायमचे सुखधामचा मालक
बनविणाऱ्या बाबांच्या सन्मुख आलो आहोत. आता समजतो आहोत सन्मुख ऐकणे आणि दूर राहून
ऐकण्यामध्ये खूप फरक आहे. मधुबन मध्ये सन्मुख येता, मधुबन प्रसिद्ध आहे. मधुबन,
वृंदावन मध्ये त्यांनी श्रीकृष्णाचे चित्र दाखवले आहे. परंतु कृष्ण तर नाही आहे. इथे
तर निराकार बाबा तुम्हा मुलांना भेटतात. तुम्हाला स्वतःला वारंवार आत्मा निश्चय
करायचे आहे. मी आत्मा बाबांकडून वारसा घेत आहे. साऱ्या कल्पामध्ये ही एकच वेळ आता
आहे. हे कल्पातील अतिशय मनोहारी असे संगमयुग आहे. याचे नाव ठेवले आहे - पुरुषोत्तम.
हेच संगमयुग आहे, ज्यामध्ये सर्व मनुष्यमात्र उत्तम बनतात. आता तर सर्व
मनुष्यमात्रांची आत्मा तमोप्रधान आहे जी मग सतोप्रधान बनते. सतोप्रधान आहेत तर
मनुष्य उत्तम असतात. तमोप्रधान बनल्याने मनुष्य देखील कनिष्ठ बनतात. तर आत्म्यांना
बाबा सन्मुख बसून समजावून सांगत आहेत. सारा पार्ट आत्माच बजावते, शरीर नाही. आत्मा
आणि शरीर जेव्हा दोन्हींचा संयोग होतो तेव्हा पार्ट बजावला जातो. तुमच्या
बुद्धीमध्ये आले आहे की, आपण आत्मा मूळ निराकारी दुनिया अथवा शांतीधाम मध्ये राहणारी
आहोत, मात्र हे कुणालाच ठाऊक नाहीये. ना स्वतः समजत, ना इतरांना समजावून सांगू शकत.
तुमच्या बुद्धीचे कुलूप आता उघडले आहे, तुम्हाला समजते आहे - खरोखर, आत्मे परमधाम
मध्ये राहतात. ते आहे इनकार्पोरियल वर्ल्ड (निराकारी दुनिया). हे आहे कार्पोरियल
वर्ल्ड (साकारी दुनिया). इथे आपण सर्व आत्मे ॲक्टर्स पार्टधारी आहोत. सर्वप्रथम
आपणच पार्ट बजावण्यासाठी येतो. आणि मग नंबरवार येत जातात. सर्व ॲक्टर्स एकत्र येत
नाहीत. विविध प्रकारचे ॲक्टर्स येत जातात. सर्व जण एकत्रित तेव्हा होतात जेव्हा
नाटक पूर्ण होते. आता तुम्हाला ओळख मिळाली आहे, आत्मा मूळ शांतीधामची रहिवासी आहे -
इथे पार्ट बजावण्यासाठी येते. बाबा काही पूर्ण वेळ पार्ट बजावण्यासाठी येत नाहीत.
आपणच पार्ट बजावता-बजावता तमोप्रधान बनतो. आता तुम्हा मुलांना सन्मुख ऐकल्याने खूप
मजा येते. इतकी मजा मुरली वाचल्याने येत नाही. इथे सन्मुख आहात ना. तर पहिले सतयुगी
आदि सनातन देवी-देवता धर्माचेच येतात. तुम्ही जाणता की भारत गॉड-गॉडेजचे स्थान होते,
आता नाहीये. चित्र बघता याचा अर्थ होते जरूर. सर्वप्रथम आपण देवी-देवता होतो, आपल्या
पार्टला तरी आठवाल की विसरून जाल? बाबा म्हणतात - तुम्ही हा पार्ट बजावला आहे, हा
ड्रामा आहे. नवीन दुनिया हीच मग जुनी होते. सर्वप्रथम वरून जे आत्मे येतात ते
गोल्डन एज्डमध्ये येतात. या सर्व गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. सतयुग आदि
काळामध्ये पार्ट बजावण्याकरिता तुम्हीच आला होता. तुम्ही विश्वाचे मालक
महाराजा-महाराणी होता. तुमची राजधानी होती. आता काही राजधानी नाहीये. आता तुम्ही
शिकत आहात की, आपण राज्य कसे चालवायचे, तिथे वजीर (मंत्री) असत नाहीत. सल्ला
देणाऱ्याची गरजच नाही. ते तर श्रीमताद्वारे श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनतात मग त्यांना
दुसऱ्या कोणाकडून सल्ला घेण्याची गरजच राहत नाही. जर कोणाकडून सल्ला घेतील तर समजले
जाईल की यांची बुद्धी कमजोर आहे. आता तर श्रीमत मिळत आहे ते मग सतयुगामध्ये देखील
कायम राहते. आता तुमची आत्मा फ्रेश होत आहे. आता तुम्हा मुलांना देही-अभिमानी बनायचे
आहे. शांतीधाम मधून येऊन इथे तुम्ही टॉकी बनला आहात. टॉकी बनल्याशिवाय कर्म करू शकत
नाही. या व्यवस्थित समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जसे बाबांमध्ये संपूर्ण ज्ञान आहे,
तसे तुमच्या आत्म्यामध्ये देखील आता ज्ञान आहे. आत्मा म्हणते - ‘मी एक शरीर सोडून,
संस्कारानुसार मग दुसरे घेतो’. पुनर्जन्म देखील जरूर असतो. आत्म्याला जो काही पार्ट
मिळाला आहे, तो बजावत राहते आणि संस्कारांनुसार दुसरा जन्म घेत राहते. आत्म्याची
पवित्रतेची डिग्री दिवसेंदिवस कमी होत जाते. ‘पतित’ शब्द द्वापरच्या नंतर उपयोगात
आणतात, तरी देखील थोडासा फरक जरूर पडतोच. तुम्ही नवीन घर बांधा आणि एका महिन्यानंतर
थोडा तरी फरक नक्कीच पडेल.
आता तुम्ही समजता बाबा
आम्हाला वारसा देत आहेत. बाबा म्हणतात - मी आलो आहे तुम्हा मुलांना वारसा
देण्याकरिता. जितका जे पुरुषार्थ करतील तितके उच्च पद प्राप्त करतील. बाबांकडे
कोणताही भेदभाव नाही. बाबा जाणतात की, मी आत्म्यांना शिकवत आहे. प्रत्येक आत्मा
स्वतःसाठी पुरुषार्थ करते. स्त्री-पुरुष अशी दृष्टी इथे राहत नाही. तुम्ही सर्व मुले
बेहदच्या बाबांकडून वारसा घेत आहात. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत ज्यांना बाबा शिकवत
आहेत, वारसा देत आहेत. बाबाच रुहानी मुलांसोबत बोलत आहेत की, माझ्या लाडक्या गोड
सिकीलध्या मुलांनो, तुम्ही बराच काळ पार्ट बजावता-बजावता आता पुन्हा येऊन भेटला
आहात - आपला वारसा घेण्याकरिता. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सुरुवातीपासून
पार्ट नोंदलेला आहे. तुम्ही ॲक्टर्स पार्ट बजावत, ॲक्ट करत राहता. आत्मा अविनाशी आहे,
यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. शरीर तर बदलत राहते. बाकी आत्मा फक्त पवित्र
पासून अपवित्र बनते. सतयुगामध्ये आहेत पावन. याला म्हटले जाते - पतित दुनिया. आता
सुखधाम स्थापन होत आहे. बाकी सर्व आत्मे मुक्तिधाम मध्ये राहतील. आता हे बेहदचे
नाटक पूर्ण झाले आहे. सर्व आत्मे मच्छरांसदृश्य जातील. यावेळी कोणतीही आत्मा जरी आली
तरीही पतित दुनियेमध्ये तिची काय किंमत असेल. खरेतर किंमत त्यांची आहे जे सर्वप्रथम
नवीन दुनियेमध्ये येतात. नवीन दुनिया होती, ती आता जुनी बनली आहे. नवीन दुनियेमध्ये
देवता होते, तिथे दुःखाचे नावही नव्हते. इथे तर अपार दुःख आहे. बाबा येऊन दुःखाच्या
जुन्या दुनियेमधून लिबरेट करतात. ही जुनी दुनिया बदलणार आहे जरूर. ज्याप्रमाणे
दिवसानंतर रात्र, रात्री नंतर दिवस होतो. तुम्ही समजता - खरोखर, आपण सतयुगाचे मालक
बनणार, तर आपण का नाही आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करावी. काहीतरी मेहनत करावी
लागेल. राजाई प्राप्त करणे काही सोपे थोडेच आहे, बाबांची आठवण करायची आहे. हे मायेचे
आश्चर्य आहे जी वारंवार तुम्हाला विसरायला लावते. यासाठी काही उपाय केला पाहिजे. असे
नाही माझे बनल्याने आठवण टिकून राहील. मग पुरुषार्थ तरी कसला कराल. नाही, जोपर्यंत
जगायचे आहे, पुरुषार्थ करायचा आहे. ज्ञान अमृत पित राहायचे आहे. तुम्ही हे देखील
समजता की, आपला हा अंतिम जन्म आहे. या शरीराचे भान सोडून देही-अभिमानी बनायचे आहे.
गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे, पुरुषार्थ जरूर करायचा आहे. फक्त स्वतःला
आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करा. ‘त्वमेव माता च पिता…’ ही सर्व आहे
भक्तिमार्गाची महिमा. तुम्हाला तर फक्त एका अल्फची (बाबांची) आठवण करायची आहे. मी
एकच सॅकरिन आहे, तुम्ही देखील इतर सर्व गोष्टी सोडून अतिशय गोड सॅकरिन बना. आता
तुमची आत्मा तमोप्रधान बनली आहे, तिला सतोप्रधान बनविण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये
राहा. सर्वांना हेच सांगा की, बाबांकडून सुखाचा वारसा घ्या. सुख असतेच मुळी
सतयुगामध्ये. सुखधाम स्थापन करणारे बाबा आहेत, बाबांची आठवण करणे खूप सोपे आहे,
परंतु मायेचा विरोध खूप आहे त्यामुळे प्रयत्न करून माझी आठवण करा म्हणजे मग गंज
निघून जाईल. सेकंदामध्ये जीवनमुक्ती गायली जाते.
या ड्रामामध्ये
प्रत्येकाला आपला पार्ट रिपीट करायचा आहे. या ड्रामामध्ये सर्वात जास्त पार्ट आमचा
आहे. सुख देखील सर्वात जास्त आम्हालाच मिळेल. बाबा म्हणतात - तुमचा देवी-देवता धर्म
खूप सुख देणारा आहे. बाकीचे सर्व आपल्या कर्मांचा हिशोब चुकता करून शांतीधाम मध्ये
निघून जातील. जास्त विस्तारामध्ये आपण का जायचे. बाबा येतातच सर्वांना परत घेऊन
जाण्यासाठी. मच्छरांसदृश्य सर्वांना घेऊन जातात. शरीरे नष्ट होतील. बाकी आत्मा जी
अविनाशी आहे ती आपला कर्मांचा हिशोब चुकता करून निघून जाईल. असे नाही की आत्मा
आगीमध्ये पडल्याने पवित्र होईल. आत्म्याला आठवण रुपी योग द्वारेच पवित्र बनायचे आहे.
‘योग’ची अग्नी ही आहे. त्यांनी मग नाटकं बसून बनवली आहेत की, ‘सीता आगीतून पार झाली’.
आगीतून काही एकालाच थोडेच पार व्हायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही सर्व
सीता यावेळी पतित आहात, रावणाच्या राज्यामध्ये आहात. आता एका बाबांच्या आठवणी द्वारे
तुम्हाला पावन बनायचे आहे. राम एकच आहेत. ‘अग्नि’ शब्द ऐकल्याने असे समजतात की,
आगीतून पार झाली. कुठे योग-अग्नी आणि कुठे ते. आत्म्याने परमात्म्याशी योग ठेवल्याने
पतितापासून पावन बनेल. दिवस-रात्री इतका फरक आहे. सर्व आत्मे सीता आहेत. रावणाच्या
जेलमध्ये शोक-वाटिकेमध्ये आहेत. इथले सुख तर कागविष्ठे समान आहे. स्वर्गामध्ये सुख
तर अथाह आहे. तर मुलांनी ज्ञान रत्नांनी झोळी भरली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा संशय
येता कामा नये. देह-अभिमान आल्याने मग अनेक प्रकारचे प्रश्न इत्यादी उत्पन्न होतात.
मग बाबा जो धंदा देतात (सेवा देतात) तो करतच नाहीत. मुख्य गोष्ट आहे आपल्याला
पतितापासून पावन बनायचे आहे. दुसरा कोणताही संकल्प उत्पन्न करण्याची गरजच नाही. ही
आहे पतित दुनिया, ती आहे पावन दुनिया. मुख्य गोष्ट आहेच मुळी पावन बनण्याची. पावन
कोण बनवणार, हे काहीही माहित नाही. बोला - ‘तुम्ही पतित आहात’, तर चिडतील. कोणीही
स्वतःला विकारी समजत नाहीत; म्हणतात - गृहस्थी तर सगळेच होते - राम-सीता,
लक्ष्मी-नारायण यांना देखील मुले होती ना. तिथे देखील मुले जन्माला येतात; परंतु ते
हे विसरले आहेत की त्याला वाइसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया) म्हटले जाते. ते आहे
- शिवालय.
बाबा तुम्हा मुलांना
किती युक्त्या सांगत राहतात. हे तर पिता, टीचर, गुरु आहेत, जे सर्वांना सद्गती
देतात. इथे तर एका गुरुचा मृत्यू झाला तर त्याची गादी (अधिकारपद) मग मुलाला देतील.
आता ते कसे काय सद्गतीमध्ये घेऊन जातील. सर्वांचे सद्गती दाता आहेतच मुळी एक. रावण
राज्यामध्ये आहे - दुर्गती, राम-राज्यामध्ये आहे - सद्गती. बाबा सर्वांना पावन
बनवून घेऊन जातात त्यानंतर लगेचच कोणी पतित बनत नाहीत, नंबरवार उतरतात.
सतोप्रधानापासून सतो, रजो, तमो… तुमच्या बुद्धीमध्ये ८४ चे चक्र पक्के झाले आहे.
तुम्ही आता जणू काही लाईट हाऊस आहात. ज्ञानाद्वारे या चक्राला तुम्ही जाणले आहे की,
हे चक्र कसे फिरते. आता तुम्हा मुलांना इतर सर्वांना मार्ग सांगायचा आहे. तुम्ही
सर्व सेना आहात. मार्ग सांगणारे तुम्ही पायलट आहात. सर्वांना सांगा - ‘आता शांतीधाम,
सुखधामची आठवण करा’. कलियुग दुःखधामला विसरा. आम्ही तुम्हाला अतिशय चांगला मार्ग
सांगतो, पतित-पावन एकच निराकार बाबा आहेत. त्यांची आठवण केल्याने तुम्ही पावन बनाल.
तुमच्या आत्म्यावर जो गंज चढला आहे तो उतरत जाईल. भगवानुवाच - मनमनाभव. शिव
भगवानुवाच - विनाशकाले विपरीत-बुद्धी विनशन्ती आणि विनाशकाले परमपिता परमात्मा सोबत
प्रीत-बुद्धी विजयन्ती. जितकी तुमची प्रीत-बुद्धी असेल तितके उच्चपद प्राप्त कराल.
देह-अभिमानामध्ये आल्याने इतके उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपली झोळी
ज्ञान-रत्नांनी भरायची आहे. कोणत्याही प्रकारचा संशय उत्पन्न करायचा नाही. जितके
शक्य आहे बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करून पावन बनायचे आहे. अवांतर
प्रश्नांमध्ये जायचे नाही.
२) एका बाबांवर खरी
प्रीत ठेऊन पित्या समान गोड सॅकरिन बनायचे आहे.
वरदान:-
सदैव
ज्ञान-सूर्याच्या सन्मुख राहणारे अंतर्मुखी, स्वमानधारी भव
ज्याप्रमाणे सूर्याकडे पाहिल्याने
सूर्याची किरणे जरूर
येतात, असेच जी मुले ज्ञान-सूर्य बाबांच्या सदैव सन्मुख राहतात ती ज्ञान-सुर्याच्या
सर्व गुणांची किरणे स्वतःमध्ये अनुभव करतात. त्यांच्या चेहऱ्यावर अंतर्मुखतेची झलक
आणि संगमयुगातील अथवा भविष्यातील सर्व स्वमानाची फलक दिसून येते. यासाठी सदैव हे
स्मृतीमध्ये राहावे की, ही अंतिम घडी आहे. कोणत्याही क्षणी हे शरीर नष्ट होऊ शकते
त्यामुळे सदैव प्रीत-बुद्धी बनून ज्ञान-सूर्याच्या सन्मुख राहून अंतर्मुखता अथवा
स्वमानाच्या अनुभूतीमध्ये राहायचे आहे.
बोधवाक्य:-
सदैव उडत्या
कलेमध्ये उडणे म्हणजेच जंजाळाच्या पहाडाला क्रॉस करणे आहे.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
पवित्रताच महानता आहे,
हाच योगी जीवनाचा आधार आहे. जरा देखील अंश मात्र संकल्पामध्ये जरी कोणत्याही
प्रकारची अपवित्रता आहे, तर जिथे अपवित्रतेचा अंश आहे तिथे पवित्र बाबांची आठवण जी
आहे, ते जसे आहेत, तशी येऊ शकत नाही; त्यामुळे मनसा मधून देखील अपवित्रतेच्या अंशाला
नष्ट करून संपूर्ण स्वच्छ बना. सदैव हेच स्मृतीमध्ये राहावे की, ‘मी पूज्य आत्मा या
शरीर रुपी मंदिरामध्ये विराजमान आहे’.