21-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा कल्प-कल्प येऊन तुम्हा मुलांना आपला परिचय देतात, तुम्हाला देखील
सर्वांना बाबांचा यथार्थ परिचय द्यायचा आहे”
प्रश्न:-
मुलांचा असा
कोणता प्रश्न ऐकून बाबांना देखील आश्चर्य वाटते?
उत्तर:-
मुले म्हणतात - ‘बाबा तुमचा परिचय देणे खूप अवघड आहे. आम्ही तुमचा परिचय कसा द्यायचा?’
हा प्रश्न ऐकून बाबांना देखील आश्चर्य वाटते. जर बाबांनी तुम्हाला आपला परिचय दिला
आहे तर तुम्ही देखील दुसऱ्यांना देऊ शकता. यामध्ये अवघड वाटण्याचे कारण नाही. हे तर
अतिशय सोपे आहे. आपण सर्व आत्मे निराकार आहोत तर जरूर आपला पिता देखील निराकारच
असेल.
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुले हे समजतात की बेहदच्या बाबांजवळ बसलो आहोत. हे देखील जाणतात
बेहदचे बाबा याच रथावर (ब्रह्मा बाबांच्या तनामध्येच) येतात. जेव्हा ‘बापदादा’
म्हणता, तर तुम्ही हे जाणता की शिवबाबा आहेत आणि ते या रथावर बसले आहेत. आपला परिचय
देत आहेत. मुले जाणतात ते बाबा आहेत, बाबा मत देतात की रुहानी बाबांची आठवण करा तर
पापे भस्म होतील, ज्याला योग अग्नी म्हटले जाते. आता तुम्ही बाबांना तर ओळखता. मग
असे थोडेच म्हणाल की बाबांचा परिचय दुसऱ्यांना कसा देऊ. तुम्हाला देखील बेहदच्या
बाबांचा परिचय आहे तर नक्कीच देऊपण शकता. ‘परिचय कसा देऊ’, हा तर प्रश्नच येऊ शकत
नाही. जसे तुम्ही बाबांना जाणले आहे, तसेच तुम्ही इतरांना सांगू शकता की, आम्हा
आत्म्यांचा पिता तर एकच आहे, यामध्ये गोंधळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. काहीजण
म्हणतात - ‘बाबा, तुमचा परिचय देणे फार कठीण वाटते’. अरे, वडिलांचा परिचय देणे -
यामध्ये कोणती अडचण वाटण्याचा तर प्रश्नच नाही. प्राणी देखील इशाऱ्याने समजतात की
मी अमक्याचा मुलगा आहे. तुम्ही देखील जाणता की आम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत. मी
आत्मा आता या शरीरामध्ये प्रवेश आहे. जसे बाबांनी समजावून सांगितले आहे की, आत्मा
अकालमूर्त आहे. असे नाही की त्याचे कोणते रूप नाहीये. मुलांनी ओळखले आहे - एकदम सोपी
गोष्ट आहे. आत्म्यांचे एकच निराकार पिता आहेत. आपण सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहोत. बाबांची
संतान आहोत. बाबांकडून आम्हाला वारसा मिळतो. आपण हे देखील जाणतो, असा कोणी मुलगा या
जगात नसेल जो पित्याला आणि त्यांच्या रचनेला जाणत नसेल. बाबांकडे कोणती प्रॉपर्टी
आहे, ते सर्वजण जाणतात. हा आहेच आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळावा. हा कल्याणकारी
मेळावा आहे. बाबा आहेतच कल्याणकारी. खूप कल्याण करतात. बाबांना ओळखल्यामुळे तुम्ही
समजता - बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. ते जे संन्यासी, गुरू असतात,
त्यांच्या शिष्यांना गुरूच्या वारशा बद्दल माहित नसते. गुरूची किती संपत्ती आहे, हे
कोणा शिष्याला ठाऊक असणेच अवघड आहे. तुमच्या बुद्धीमध्ये तर आहे - ते शिवबाबा आहेत,
संपत्ती देखील बाबांकडेच असते. मुले जाणतात बेहदच्या बाबांची संपत्ती आहे - विश्वाचे
राज्य - स्वर्ग. या गोष्टी तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये
नाहीत. लौकिक पित्याकडे किती संपत्ती आहे, हे त्याची मुलेच जाणतात. आता तुम्ही
म्हणाल आम्ही जिवंतपणी पारलौकिक पित्याचे बनलो आहोत. त्यांच्याकडून काय मिळते ते
सुद्धा जाणतो. आम्ही आधी शूद्र कुळामध्ये होतो, आता ब्राह्मण कुळामध्ये आलो आहोत.
हे ज्ञान आहे की बाबा या ब्रह्माच्या तनामध्ये येतात, यांना ‘प्रजापिता ब्रह्मा’
म्हटले जाते. ते (शिव) तर आहेत सर्व आत्म्यांचे पिता. यांना (प्रजापिता ब्रह्माला)
ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हणतात. आता आम्ही यांची संतान बनलो आहोत. शिवबाबांकरिता
तर म्हणतात, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे. आता हे देखील तुम्ही जाणता की ते रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे ज्ञान कसे देतात. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत, त्यांना
नावा-रूपापासून वेगळा म्हणणे हे तर चुकीचे आहे. त्यांचे नाव-रूप सुद्धा लक्षात आहे.
शिवरात्रीसुद्धा साजरी करतात, ‘जयंती’ तर मनुष्यांची असते. शिवबाबांची ‘रात्र’
म्हणता येईल. मुले समजतात की, रात्र कशाला म्हटले जाते. रात्रीचा तर पूर्ण अंधार
होतो. अज्ञान अंधःकार आहे ना. ‘ज्ञान सूर्य प्रगटा अज्ञान अन्धेर विनाश’ - आजही
गातात परंतु अर्थ काहीच समजत नाहीत. सूर्य कोण आहे, केव्हा प्रकटला, काहीच समजत
नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत ज्ञानसूर्याला ज्ञानसागर देखील म्हटले जाते. बेहदचे
बाबा ज्ञानाचा सागर आहेत. संन्यासी, गुरू-गोसावी इत्यादी स्वतःला शास्त्रांची
ऑथॉरिटी (अधिसत्ता) समजतात, ती सर्व आहे भक्ती. बरीच वेद-शास्त्रे वाचून विद्वान
होतात. तर बाबा रुहानी मुलांना बसून समजावून सांगतात, याला म्हटले जाते आत्मा आणि
परमात्मा यांचा मेळावा. तुम्ही समजता बाबा या रथामध्ये आलेले आहेत. या भेटीलाच
मेळावा म्हणतात. जेव्हा आपण घरी जातो तर तो सुद्धा मेळावा आहे. इथे बाबा स्वतः बसून
शिकवतात. ते पिता देखील आहेत, टिचर देखील आहेत. हा एकच मुद्दा चांगल्या प्रकारे
धारण करा, विसरू नका. आता बाबा तर आहेत निराकार, त्यांना स्वतःचे शरीर नाही तर जरूर
घ्यावे लागेल. ते स्वतः म्हणतात - ‘मी प्रकृतीचा (शरीराचा) आधार घेतो’. नाही तर
बोलणार कसा? शरीराशिवाय तर बोलता येत नाही. तर बाबा या तनामध्ये येतात, यांचे नाव
‘ब्रह्मा’ ठेवले आहे. आपण देखील शूद्रापासून ब्राह्मण बनलो तर नाव बदलले पाहिजे.
तुमची नावे तर ठेवली होती. परंतु आता बघाल तर त्यातले बरेच राहिले सुद्धा नाहीत
त्यामुळे ब्राह्मणांची माळा बनत नाही. भक्तमाळा आणि रुद्रमाळा यांचे गायन आहे.
ब्राह्मणांची माळा असत नाही. विष्णूची माळा तर चालत आलेली आहे. सूक्ष्मवतनमध्ये
विष्णूला ४ भुजावाला दाखवला आहे. दोन भुजा लक्ष्मीच्या, दोन नारायणाच्या.
बाबा समजावून सांगत
आहेत - ‘मी धोबी आहे. मी योगबलाने तुम्हा आत्म्यांना शुद्ध बनवतो आणि मग तुम्ही
विकारामध्ये जाऊन आपला श्रृंगारच गमावून बसता’. बाबा येतात सर्वांना शुद्ध
बनविण्यासाठी. आत्म्यांना येऊन शिकवतात तर शिकविणारा जरूर इथेच पाहिजे ना. बोलावतात
देखील - ‘येऊन पावन बनवा’. कपडा मळला तर तो धुवून स्वच्छ केला जातो. तुम्ही देखील
बोलावता - ‘हे पतित-पावन बाबा, येऊन पावन बनवा’. आत्मा पावन बनली तर शरीरही पावन
मिळते. तर सर्वात पहिली मूळ गोष्ट आहे - बाबांचा परिचय देणे. बाबांचा परिचय कसा देऊ,
हा प्रश्न तुम्ही विचारूच शकत नाही. तुम्हाला देखील बाबांनी परिचय दिला आहे तेव्हाच
तर तुम्ही आला आहात ना. बाबांकडे येता, बाबा कुठे आहेत? या रथामध्ये (ब्रह्मा
तनामध्ये). हे आहे अकाल तख्त. तुम्ही आत्मे देखील अकाल मूर्त आहात. ही सर्व तुमची
तख्त आहेत, ज्यावर तुम्ही विराजमान झाले आहात. ते अकाल तख्त तर स्थूल आहे ना. तुम्ही
जाणता - मी अकालमूर्त अर्थात निराकार आहे, ज्याचे साकार रूप नाहीये. मी आत्मा
अविनाशी आहे, कधीही विनाश होऊ शकत नाही. एक शरीर सोडून दुसरे घेतो. मज आत्म्याचा
अविनाशी पार्ट पूर्वनियोजीत आहे. आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी देखील आमचा असाच
पार्ट सुरू झाला होता. ०१-०१ संवतपासून आम्ही घरून इथे पार्ट बजावण्यासाठी येतो. हे
आहेच ५ हजार वर्षांचे चक्र. ते (दुनियावाले) तर लाखो वर्षे म्हणतात त्यामुळे हे
चक्र इतक्या थोड्यावर्षांचे आहे हा विचारही करत नाहीत. तर मुले असे कधी म्हणू शकत
नाहीत की, आम्ही बाबांचा परिचय कोणाला कसा द्यावा. मुले असे काही प्रश्न विचारतात
की आश्चर्य वाटते. अरे, तुम्ही तर बाबांचे बनले आहात, मग बाबांचा परिचय का देऊ शकत
नाही! आपण सर्व आत्मे आहोत, ते आमचे बाबा आहेत. सर्वांची सद्गती करतात. सद्गती
केव्हा करतील हे देखील तुम्हाला आता माहिती झाले आहे. कल्प-कल्प, कल्पाच्या
संगमयुगावर येऊन सर्वांची सद्गती करतील. ते (दुनियावाले) तर समजतात - अजून ४० हजार
वर्षे बाकी आहेत आणि सुरुवातीपासूनच म्हणतात की, नावा-रूपापासून न्यारे आहेत. आता
नावा-रूपापासून न्यारी कोणती गोष्ट थोडीच असते. दगड-धोंड्याचे देखील नाव तर आहे ना.
तर बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्ही बेहदच्या बाबांकडे आला आहात. बाबा
सुद्धा जाणतात, किती भरपूर मुले आहेत. मुलांना आता हद आणि बेहदच्यादेखील पार पलिकडे
जायचे आहे’. बाबा सर्व मुलांना बघतात, जाणतात की या सर्वांना मी नेण्याकरिता आलो आहे.
सतयुगामध्ये तर फार थोडे असतील. किती स्पष्ट आहे म्हणून चित्रांवरून समजावून
सांगितले जाते. ज्ञान तर फार सोपे आहे. बाकी आठवणीच्या यात्रेला वेळ लागतो. अशा
बाबांना तर कधी विसरता कामा नये. बाबा म्हणतात - ‘मामेकम (मज एकाची) आठवण करा तर
पावन बनाल’. मी येतोच मुळी पतितांना पावन बनविण्यासाठी. तुम्ही अकालमूर्त आत्मे
सर्व आपल्या-आपल्या तख्तावर (शरीरामध्ये) विराजमान आहात. बाबांनीसुद्धा हे तख्त (ब्रह्मा
बाबांचे तन) लोन म्हणून घेतले आहे. या भाग्यशाली रथामध्ये बाबा प्रवेश करतात. कोणी
म्हणतात परमात्म्याला नाव-रूप नाही. असे तर होऊच शकत नाही. त्यांना बोलावतात, महिमा
गातात, तर नक्की काही तरी चीज आहे ना. तमोप्रधान असल्याकारणाने काहीच समजत नाहीत.
बाबा समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, इतक्या ८४ लाख योनी तर काही असत नाहीत.
आहेतच ८४ जन्म. सर्वांचा पुनर्जन्म सुद्धा होणार. असे थोडेच जाऊन ब्रह्ममधे लीन
होतील किंवा मोक्ष प्राप्त करतील’. हा तर पूर्वनियोजित ड्रामा आहे. एकही गोष्ट
कमी-जास्त होऊ शकत नाही. या अनादि अविनाशी ड्रामावरूनच मग छोटे-छोटे ड्रामा किंवा
नाटके बनतात. ती आहेत विनाशी. आता तुम्ही मुले बेहदमध्ये उभे आहात. तुम्हा मुलांना
हे ज्ञान मिळाले आहे की आपण कसे ८४ जन्म घेतले आहेत. आता बाबांनी सांगितले आहे, या
आधी कोणालाच माहीत नव्हते. ऋषी-मुनी देखील म्हणत होते - आम्हाला माहीत नाही. बाबा
येतातच संगमयुगावर, या जुन्या दुनियेचे परिवर्तन करण्यासाठी. ब्रह्मा द्वारा पुन्हा
नवीन दुनियेची स्थापना करतात. ते (दुनियावाले) तर लाखो वर्षे म्हणतात. मग तर कोणती
गोष्ट आठवणार देखील नाही. महाप्रलय सुद्धा काही होत नाही. बाबा राजयोग शिकवतात मग
राज्य तुम्हाला मिळते. यामध्ये संशयाची तर काही गोष्टच नाही. तुम्ही मुले जाणता,
पहिल्या क्रमांकावर आहेत सर्वात प्रिय बाबा नंतर मग प्रिय आहे श्रीकृष्ण. तुम्ही
जाणता श्रीकृष्ण आहे स्वर्गाचा नंबर वन पहिला राजकुमार. तोच मग ८४ जन्म घेतो.
त्याच्याच शेवटच्या जन्मामध्ये मी प्रवेश करतो. आता तुम्हाला पतिता पासून पावन
बनायचे आहे. पतित-पावन बाबाच आहेत, पाण्याच्या नद्या थोड्याच पावन बनवू शकतील. या
नद्या तर सतयुगामध्ये सुद्धा असतात. तिथे तर पाणी अतिशय शुद्ध असते. कचरा इत्यादी
काहीच असत नाही. इथे तर किती कचरा पडत असतो. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) हे सर्व
बघितलेले आहे, त्या वेळी तर ज्ञान नव्हते. आता आश्चर्य वाटते की पाणी मनुष्याला कसे
पावन बनवू शकणार.
तर बाबा समजावून
सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, कधीही गोंधळून जाऊ नका की, बाबांची आठवण कशी करू’. अरे,
तुम्ही पित्याची आठवण करू शकत नाही! ती आहेत गर्भातून जन्मलेली मुले, तुम्ही आहात
दत्तक मुले. दत्तक मुलांना ज्या पित्याकडून संपत्ती मिळते, त्याला विसरू शकतात का?
बेहदच्या बाबांकडून बेहदची संपत्ती मिळते तर त्यांना असे थोडेच विसरायचे असते!
लौकिक मुले आपल्या पित्याला विसरतात का. परंतु इथे मायेचा विरोध होतो. मायेशी युद्ध
चालू असते, सारी दुनिया कर्मक्षेत्र आहे. आत्मा या शरीरामध्ये प्रवेश करून इथे कर्म
करते. बाबा कर्म-अकर्म-विकर्माचे रहस्य समजावून सांगतात. इथे रावण राज्यामध्ये कर्म
विकर्म बनतात. तिथे रावणराज्यच नाहीये त्यामुळे कर्म अकर्म होतात, कोणतेही विकर्म
होत नाही. ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. इथे रावण राज्यामध्ये कर्म विकर्म होतात
त्यामुळे विकर्मांची शिक्षा भोगावी लागते. असे थोडेच म्हणणार की रावण अनादि आहे.
नाही, अर्धा कल्प आहे रावणराज्य, अर्धा कल्प आहे रामराज्य. जेव्हा तुम्ही देवता होता
तेव्हा तुमची कर्म अकर्म होत होती. आता हे आहे ज्ञान. संतान बनले आहात तर अभ्यास
देखील करायचा आहे. बस्स, मग इतर कोणता कामधंदा इत्यादीचा विचारही येता कामा नये.
परंतु गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कामधंदा इत्यादी करणारे सुद्धा असतील तर बाबा
म्हणतात कमलपुष्प समान रहा. तुम्ही असे देवता बनणार आहात, त्याची निशाणी विष्णूला
दिली आहे कारण तुम्हाला शोभणार नाही. त्यांना शोभते. तीच विष्णूची दोन रूपे
लक्ष्मी-नारायण बनणार आहात. तो आहेच अहिंसा परमो देवी-देवता धर्म. ना कोणती विकाराची
काम कटारी असणार, ना काही भांडण-तंटा वगैरे होणार. तुम्ही डबल अहिंसक बनता. सतयुगाचे
मालक होता. नावच आहे - गोल्डन एज (सुवर्णयुग). सोनेरी दुनिया. आत्मा आणि शरीर दोन्ही
कांचन बनतात. कांचन काया कोण बनवतात? बाबा. आता तर आइरन एज (लोहयुग) आहे ना. आता
तुम्ही म्हणता सतयुग होऊन गेले आहे. काल सतयुग होते ना. तुम्ही राज्य करत होता.
तुम्ही नॉलेजफुल बनता. सर्वच काही एकसारखे बनणार नाहीत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) मी आत्मा
अकाल तख्त नशीन आहे, या स्मृतीमध्ये रहायचे आहे, हद आणि बेहदच्या पलिकडे जायचे आहे
त्यामुळे हदच्या गोष्टींमध्ये बुद्धीला अडकवायचे नाही.
२) बेहदच्या
बाबांकडून बेहदची संपत्ती मिळते, या नशेमध्ये रहायचे आहे. कर्म-अकर्म-विकर्माची गती
समजून घेऊन विकर्मांपासून स्वतःला वाचवायचे आहे. अभ्यासाच्या वेळी कामधंदा इत्यादी
मधून बुद्धी काढून घ्यायची आहे.
वरदान:-
श्रीमताचा
लगाम घट्ट करून मनाला वश करणारे बालक सो मालक भव
दुनियावाले म्हणतात
मन असा घोडा आहे जो खूप वेगाने पळतो, परंतु तुमचे मन इकडे-तिकडे पळू शकत नाही कारण
श्रीमताचा लगाम मजबूत आहे. जेव्हा मन-बुद्धी साईड सिन (आजूबाजूच्या गोष्टींकडे) बघू
लागते तेव्हा लगाम सैल झाल्यामुळे मन चंचल होते त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट झाली,
मन चंचल झाले तर श्रीमताचा लगाम घट्ट करा तरच लक्ष्यापर्यंत पोहोचाल. ‘बालक सो मालक’
आहे - या स्मृतीद्वारे अधिकारी बनून मनाला आपल्या ताब्यात ठेवा.
बोधवाक्य:-
कायम हा
निश्चय असावा की, जे होत आहे ते देखील चांगले आणि जे होणार आहे ते देखील अजूनच
चांगले; तर तुम्ही अचल-अडोल रहाल.