21-09-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   02.02.2007  ओम शान्ति   मधुबन


“परमात्म प्राप्तींनी संपन्न आत्म्याची निशाणी - होलीएस्ट, हायेस्ट आणि रिचेस्ट”


आज विश्व परिवर्तक बापदादा आपल्या सोबती मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये तीन परमात्म विशेष प्राप्ती बघत आहेत. एक आहे - होलीएस्ट, दुसरी आहे - हायेस्ट आणि तिसरी आहे - रिचेस्ट. या ज्ञानाचे फाऊंडेशनच आहे होली अर्थात पवित्र बनणे. तर प्रत्येक मुलगा होलीएस्ट आहे, पवित्रता केवळ ब्रह्मचर्य नाही परंतु मन-वाणी-कर्म, संबंध-संपर्कामध्ये पवित्रता. तुम्ही पहा, तुम्ही परमात्म ब्राह्मण आत्मे आदि-मध्य-अंत तीनही काळामध्ये होलीएस्ट (परम पवित्र) असता. सर्वप्रथम आत्मा जेव्हा परमधाममध्ये राहता तेव्हा तिथे देखील होलीएस्ट आहात, नंतर जेव्हा आदि (सुरुवातीला) येता तर आदिकाळामध्ये सुद्धा देवता रूपामध्ये होलीएस्ट आत्मा राहिलात. होलीएस्ट अर्थात पवित्र आत्म्याची विशेषता आहे - प्रवृत्तीमध्ये राहत असताना संपूर्ण पवित्र राहणे. इतर लोकसुद्धा पवित्र बनतात परंतु तुमच्या पवित्रतेची विशेषता आहे - स्वप्न-मात्र देखील अपवित्रता मन-बुद्धीला स्पर्श करु नये. सतयुगामध्ये आत्मा सुद्धा पवित्र बनते आणि शरीर देखील तुमचे पवित्र बनते. आत्मा आणि शरीर दोन्हीची पवित्रता जी देव-आत्मा रूपामध्ये राहते, ती श्रेष्ठ पवित्रता आहे. जसे होलीएस्ट बनता, तितकेच हायेस्ट (सर्वोच्च) देखील बनता. सर्वांत उच्च ते उच्च ब्राह्मण आत्मे आणि उच्च ते उच्च बाबांची मुले बनला आहात. आदि काळामध्ये परमधाम मध्ये सुद्धा हायेस्ट अर्थात बाबांच्या सोबतच राहता. मध्य काळामध्ये सुद्धा पूज्य आत्मे बनता. किती सुंदर मंदिरे बनतात आणि किती विधिपूर्वक पूजा होते. जितकी विधिपूर्वक तुम्हा देवतांच्या मंदिरामध्ये पूजा होते तितकी इतरांची मंदिरे बनतात परंतु विधिपूर्वक पूजा तुमच्या देवता रूपाची होते. तर होलीएस्ट सुद्धा आहात आणि हायेस्ट देखील आहात, त्याचसोबत रिचेस्ट सुद्धा आहात. दुनियेमध्ये म्हणतात - ‘रिचेस्ट इन द वर्ल्ड’ परंतु तुम्ही श्रेष्ठ आत्मे रिचेस्ट इन कल्प आहात. संपूर्ण कल्प रिचेस्ट (सर्वात श्रीमंत) आहात. आपले खजिने स्मृतीमध्ये येतात, किती खजिन्यांचे मालक आहात! अविनाशी खजिने जे या एका जन्मामध्ये प्राप्त करता ते अनेक जन्म चालतात. इतर कोणाचेही खजिने अनेक जन्म चालत नाहीत. परंतु तुमचे खजिने अध्यात्मिक आहेत. शक्तींचा खजिना, ज्ञानाचा खजिना, गुणांचा खजिना, श्रेष्ठ संकल्पांचा खजिना आणि वर्तमान समयाचा खजिना, हे सर्व खजिने जन्म-जन्म चालतात. एका जन्मामध्ये प्राप्त झालेले खजिने सोबत येतात कारण सर्व खजिन्यांचे दाता परमात्मा बाबांद्वारे प्राप्त होतात. तर हा नशा आहे का की आमचे खजिने अविनाशी आहेत?

या अध्यात्मिक खजिन्यांना प्राप्त करण्यासाठी सहज-योगी बनला आहात. आठवणीच्या शक्तीने (योगाच्या शक्तीने) खजिने जमा करता. यावेळी सुद्धा या सर्व खजिन्यांनी संपन्न बेफिक्र बादशाह (निश्चिंत बादशहा) आहात, कोणती चिंता आहे? आहे का चिंता? कारण हे खजिने जे आहेत याला ना चोर लुटू शकतो, ना राजा खाऊ शकतो, ना पाणी बुडवू शकते, म्हणून निश्चिंत बादशहा आहात. तर हे खजिने सदैव स्मृतीमध्ये राहतात ना! आणि आठवण देखील सहज का आहे? कारण सर्वात जास्त आठवणीचा आधार असतो एक - नाते आणि दुसरा - प्राप्ती. जितके सुंदर नाते असते तितकी आठवण आपोआप येते कारण नात्यामध्ये प्रेम असते आणि जिथे प्रेम असते तिथे प्रिय असणाऱ्याची आठवण करणे अवघड नसते, परंतु विसरणे अवघड असते. तर बाबांनी सर्व नात्यांचा आधार बनवले आहे. सर्वजण स्वतःला सहजयोगी अनुभव करता का? का अवघड योगी आहात? सहज आहे? का कधी सहज आहे, कधी अवघड आहे? जेव्हा बाबांची नात्याने आणि प्रेमाने आठवण करता तेव्हा आठवण करणे अवघड वाटत नाही आणि प्राप्तींची आठवण करा. सर्व प्राप्तींच्या दात्याने सर्व प्राप्ती करवून दिल्या आहेत. तर स्वतःला सर्व खजिन्यांनी संपन्न अनुभव करता का? खजिन्यांना जमा करण्याची सहज विधी देखील बापदादांनी सांगितली आहे - जे काही अविनाशी खजिने आहेत त्या सर्व खजिन्यांना प्राप्त करण्याची विधी आहे - बिंदू. जसे विनाशी खजिन्यांमध्ये सुद्धा बिंदू लावत जाल तर वाढत जातो ना. तर अविनाशी खजिन्यांना जमा करण्याची विधी आहे - बिंदू लावणे. तीन बिंदू आहेत - एक मी आत्मा बिंदू, बाबा सुद्धा बिंदू आणि ड्रामामध्ये जे काही होऊन गेले त्याला फुलस्टॉप अर्थात बिंदू. तर बिंदू लावता येतो ना? सर्वात जास्त सोपी मात्रा कोणती आहे? बिंदू लावणे ना! तर आत्मा बिंदू आहे, बाबा सुद्धा बिंदू आहेत, या स्मृतीने आपोआपच खजिने जमा होतात. तर बिंदूला सेकंदामध्ये आठवण केल्याने किती आनंद होतो! हे सर्व खजिने तुमच्या ब्राह्मण जीवनाचा अधिकार आहेत कारण संतान बनणे अर्थात अधिकारी बनणे. आणि विशेष तीन नात्यांचा अधिकार प्राप्त होतो - परमात्म्याला पिता देखील बनविले आहे, शिक्षक देखील बनविले आहे आणि सद्गुरू सुद्धा बनविले आहे. या तिन्ही नात्यांद्वारे पालना, शिक्षणाद्वारे सोर्स ऑफ इन्कम आणि सद्गुरू द्वारे वरदान मिळते. किती सहज वरदान मिळते? कारण मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे बाबांकडून वरदान प्राप्त करण्याचा.

बापदादा प्रत्येक मुलाचे जमेचे खाते चेक करतात. तुम्ही सर्व देखील आपल्या सर्व वेळेचे जमेचे खाते चेक करा. जमा झाले की नाही झाले, त्याची विधी आहे - जे पण कर्म केले, त्या कर्मामध्ये स्वतः देखील संतुष्ट आणि ज्याच्या सोबत कर्म केले तो देखील संतुष्ट. जर दोघांनाही संतुष्टता असेल तर समजा कर्माचे खाते जमा झाले. जर स्वतःला किंवा ज्याच्याशी संबंध आहे, त्याला संतुष्टता आली नाही तर जमा होत नाही.

बापदादा सर्व मुलांना वेळेची सूचना देखील देत राहतात. हा वर्तमान संगमाचा काळ साऱ्या कल्पामध्ये श्रेष्ठ ते श्रेष्ठ काळ आहे कारण हा संगमच श्रेष्ठ कर्मांचे बीज पेरण्याचा काळ आहे. प्रत्यक्ष फळ प्राप्त करण्याचा काळ आहे. या संगमाच्या काळामध्ये एक-एक सेकंद श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे. सर्वजण एका सेकंदामध्ये अशरीरी स्थितीमध्ये स्थित होऊ शकता का? बापदादांनी सहज विधी सांगितली आहे की, निरंतर आठवण करण्यासाठी एक विधी बनवा - संपूर्ण दिवसभरामध्ये दोन शब्द सर्वजण बोलता आणि अनेकदा बोलता ते दोन शब्द आहेत - “मी” आणि “माझे”. तर जेव्हा ‘मी’ शब्द बोलता तर बाबांनी परिचय दिला आहे की ‘मी’ आत्मा आहे. तर जेव्हा पण मी शब्द बोलता तर ही आठवण करा की, ‘मी आत्मा आहे’. एकट्या ‘मी’ चा विचार करू नका, ‘मी आत्मा आहे’, असा एकत्र विचार करा कारण तुम्ही तर जाणता ना की, मी श्रेष्ठ आत्मा आहे, परमात्म पालनेमध्ये राहणारी आत्मा आहे; आणि जेव्हा ‘माझे’ शब्द बोलता तर ‘माझे’ कोण? ‘माझे बाबा’ अर्थात पिता परमात्मा. तर जेव्हापण ‘मी’ आणि ‘माझे’ शब्द बोलता त्यावेळी हे ॲडिशन करा, ‘मी आत्मा’ आणि ‘माझे बाबा’. जितका बाबांमध्ये माझेपणा (आपलेपणा) आणाल, तितकी आठवण सहज होत जाईल कारण ‘माझे’ कधीच विसरले जात नाही. पूर्ण दिवसामध्ये पहा ‘माझे’ एवढेच आठवते. तर या विधी ने सहजच निरंतर योगी बनू शकता. बापदादांनी प्रत्येक मुलाला स्वमानाच्या सीटवर बसवले आहे. स्वमानाची लिस्ट जर स्मृतीमध्ये आणाल तर किती मोठी आहे! कारण स्वमानामध्ये स्थित असाल तर देह-अभिमान येऊ शकत नाही. एक तर देह-अभिमान असेल नाहीतर स्वमान असेल. स्वमानाचा अर्थच आहे - स्व अर्थात आत्म्याचे श्रेष्ठ स्मृतीचे स्थान. तर सगळे आपल्या स्वमानामध्ये स्थित आहात? जितके स्वमानामध्ये स्थित व्हाल तितका दुसऱ्याला सन्मान देणे आपोआप होतेच होते. तर स्वमानामध्ये स्थित राहणे किती सोपे आहे!

तर सर्वजण खुशनुमा (आनंदी) राहता का? कारण खुश राहणारा दुसऱ्याला सुद्धा आनंदी बनवतो. बापदादा नेहमी म्हणतात की पूर्ण दिवसभर खुशीला गमावू नका. का? कारण खुशी एक अशी चीज आहे ज्या एकाच खुशीमध्ये हेल्थ सुद्धा आहे, वेल्थ सुद्धा आहे आणि हॅप्पी सुद्धा आहे. खुशी नसेल तर जीवन निरस बनते. खुशीलाच म्हटले जाते - “खुशी जैसा कोई खजाना नहीं”. कितीही खजिने असतील परंतु खुशी नसेल तर असलेल्या खजिन्यातून देखील खुशी प्राप्त करू शकणार नाही. खुशीकरिता म्हटले जाते - “खुशी जैसी कोई खुराक नहीं”. तर वेल्थ देखील खुशीच आहे आणि खुशी हेल्थ देखील आहे आणि नावच खुशी आहे तर हॅप्पी तर आहेच आहे. तर खुशीमध्ये तिन्ही गोष्टी आहेत. आणि बाबांनी अविनाशी खुशीचा खजिना दिला आहे, बाबांचा खजिना गमवायचा नाही. तर सदैव खुश राहता का?

बापदादांनी होमवर्क दिले तर खुश रहायचे आहे आणि खुशी वाटायची आहे कारण खुशी अशी चीज आहे जी जितकी वाटाल तितकी वाढेल. अनुभव घेऊन पाहिला आहे! केला आहे ना अनुभव? जर खुशी वाटता तर वाटण्याच्या अगोदर आपल्या जवळ वाढते. खुश करणाऱ्यांच्या आधी स्वतः खुश होतात. तर सर्वांनी होमवर्क केला आहे? केला आहे का? ज्यांनी केला आहे त्यांनी हात वर करा. ज्यांनी केला आहे - खुश रहायचे आहे, ‘कारण’ नको ‘निवारण’ करायचे आहे, समाधान स्वरूप बनायचे आहे. हात वर करा. आता असे तर म्हणणार नाही ना - असे झाले! बापदादांपाशी अनेक मुलांनी आपला रिझल्ट देखील लिहून दिला आहे की आम्ही किती परसेंट ओ.के. राहिलो. आणि लक्ष्य ठेवाल तर लक्ष्य ठेवल्याने लक्षण आपोआपच येतात. अच्छा.

डबल विदेशी भाऊ-बहिणींसोबत संवाद:- विदेशींना आपला ओरिजीनल विदेश तर विसरायला होत नसेल. ओरिजीनल (मूळचे) तुम्ही कोणत्या देशाचे आहात, ते तर लक्षात राहते ना म्हणून सगळे तुम्हाला म्हणतात - डबल विदेशी. केवळ विदेशी नाही आहात, डबल विदेशी. तर तुम्हाला आपले स्वीट होम कधी विसरायला होत नसेल. तर कुठे राहता? बापदादांचे दिलतख्तनशीन आहात ना. बापदादा म्हणतात जेव्हा कोणतीही छोटी-मोठी समस्या आली, समस्या नाहीये परंतु पेपर आहे पुढे जाण्यासाठी. तर बापदादांचे दिल-तख्त तर तुमचा अधिकार आहे. दिलतख्तनशीन बना तर समस्या खेळणे बनेल. समस्येला घाबरणार नाही, तर खेळाल. खेळणे आहे. सर्व उडती कलावाले आहात ना? उडती कला आहे? का चालणारे आहात? उडणारे आहात की चालणारे आहात? जे उडणारे आहेत त्यांनी हात वर करा. उडणारे. अर्धवट हात वर करत आहेत. उडणारे आहात? अच्छा. कधी-कधी उडणे सोडून देता का? चालत आहोत, नाही, बरेच जण बापदादांना म्हणतात - ‘बाबा, आम्ही तर खूप चांगले चालत आहोत’. तर बापदादा विचारत आहेत - ‘चालत आहात की उडत आहात?’ आता चालण्याची वेळ नाहीये, उडण्याची वेळ आहे. उमंग-उत्साहाचे, हिंमतीचे पंख प्रत्येकाला मिळालेले आहेत. तर पंखानी उडायचे असते. तर रोज चेक करा, उडत्या कलेमध्ये उडत आहात? चांगले आहे, रिजल्टमध्ये बापदादांनी पाहिले की विदेशामध्ये देखील सेंटर्स वाढत आहेत. आणि ती वाढत जाणारच आहेत. जसे डबल विदेशी आहेत तशी डबल सेवा मनसा सुद्धा, वाचा सुद्धा एकत्र करत चला. मनसा शक्तीद्वारे आत्म्यांची आत्मिक वृत्ती बनवा. वायुमंडळ बनवा. आता दुःख वाढताना पाहून दया येत नाही काय? तुमच्या जड चित्रासमोर (मूर्तीसमोर) आळवत राहतात, दया करा, दया करा, आता दयाळू, कृपाळू, रहमदिल बना. स्वतःवर सुद्धा दया करा आणि आत्म्यांवर देखील दया करा. चांगले आहे - प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक टर्नमध्ये येतात. याचा सर्वांना आनंद होतो. तर उडत रहा आणि उडवत रहा. छान आहे, रिजल्टमध्ये पाहिले आहे की आता स्वतःला परिवर्तन करण्यामध्ये देखील फास्ट जात आहेत. तर स्वतःच्या परिवर्तनाचा वेग विश्व परिवर्तनाच्या वेगाला वाढवतो. अच्छा.

जे पहिल्यांदा आले आहेत त्यांनी उभे रहा:- तुम्हा सर्वांना ब्राह्मण जन्माची मुबारक असो. अच्छा, मिठाई तर मिळेल परंतु बापदादा दिलखुष मिठाई खाऊ घालत आहेत. पहिल्यांदाच मधुबनला येण्याची ही दिलखुष मिठाई नेहमी लक्षात ठेवा. ती मिठाई तर तोंडात टाकली आणि संपून जाईल परंतु ही दिलखुष मिठाई नेहमीच सोबत राहील. आलात चांगले झाले, बापदादा आणि संपूर्ण परिवार देश-विदेशमध्ये तुम्ही तुमच्या भाऊ-बहिणींना पाहून आनंदित होत आहात. सगळे बघत आहेत, अमेरिका सुद्धा बघत आहे तर आफ्रिका देखील बघत आहे, रशियावाले सुद्धा बघत आहेत, लंडनवाले सुद्धा बघत आहेत, पाचही खंड पाहत आहेत. तर जन्मदिनाची तुम्हा सर्वांना तिथे बसल्या-बसल्या मुबारक देत आहेत. अच्छा.

बापदादांची रुहानी ड्रिल लक्षात आहे ना! आता बापदादा प्रत्येक मुलाकडून भले मग नवीन आहेत किंवा जुने आहेत, किंवा छोटे आहेत नाहीतर मोठे आहेत, छोटे आणखीनच बाप समान लवकर बनू शकतात. तर आता एका सेकंदामध्ये जिथे मनाला एकाग्र करू इच्छिता तिथे मन एकाग्र व्हावे. ही एकाग्रतेची ड्रिल सदैव करत चाला. आता एका सेकंदामध्ये मनाचे मालक बनून मी आणि माझे बाबा संसार आहेत, दुसरे कोणीही नाही, या स्मृतीमध्ये एकाग्रतेने स्थित व्हा. अच्छा.

चोहो बाजूच्या सर्व तीव्र पुरुषार्थी मुलांना सदैव उमंग-उत्साहाच्या पंखानी उडत्या कलेच्या अनुभवी मूर्त मुलांना, सदैव आपल्या स्वमानाच्या सीटवर सेट राहणाऱ्या मुलांना, सदैव दयाळू बनून विश्वातील आत्म्यांना मनसा शक्तीद्वारे काहीना काही सुख-शांतीची ओंजळ देणाऱ्या दयाळू, कृपाळू मुलांना, सदैव बाबांच्या स्नेहा मध्ये सामावलेल्या दिल-तख्तनशीन मुलांना, बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

अच्छा - सगळे खूप-खूप-खूप खुश आहेत, खुश आहेत! खूप खुश आहेत? किती खूप? तर नेहमी असेच रहा. काहीही होवो होऊ दे, आता खुश रहायचे आहे. आपल्याला उडायचे आहे, कोणी खाली आणू शकत नाही. पक्के! पक्का वायदा आहे? किती पक्का? बस, खुश रहा सर्वांना खुशी द्या. कोणतीही गोष्ट आवडली नाही तरी देखील खुशी गमावू नका. येणाऱ्या परिस्थितीला चालवून घ्या, परंतु खुशी जाऊ नये. परिस्थिती तर संपणारच आहे परंतु खुशी तर सोबत येणार आहे ना! तर जी सोबत येणार आहे तिला सोडून देता आणि जी सोडून जाणार आहे त्या सोडून जाणारीला सोबत ठेवून घेता. असे करू नका. अमृतवेलेला दररोज पहिल्यांदा स्वतःला खुशीची खुराक खाऊ घाला. अच्छा.

वरदान:-
स्वीट सायलेन्सच्या लवलीन स्थितीद्वारे नष्टोमोहा समर्थ स्वरूप भव

देह, देहाची नाती, देहाचे संस्कार, व्यक्ती किंवा वैभव, वायुमंडळ, व्हायब्रेशन सर्वकाही असताना देखील स्वतःकडे आकर्षित करू नये. लोक आक्रोश करत राहतील आणि तुम्ही अचल रहाल. प्रकृती, माया सगळे शेवटचा डाव लावायला आपल्याकडे कितीही खेचतील परंतु तुम्ही न्यारे आणि बाबांचे प्रिय बनण्याच्या स्थितीमध्ये लवलीन रहा - यालाच म्हटले जाते दिसत असून देखील पाहू नका, ऐकू येत असून देखील ऐकू नका. हीच स्वीट सायलेन्स स्वरूपाची लवलीन स्थिती आहे, जेव्हा अशी स्थिती बनेल तेव्हा म्हटले जाईल नष्टोमोहा समर्थ स्वरूपाची वरदानी आत्मा.

सुविचार:-
होली हंस बनून अवगुण रुपी दगडांना सोडून सद्गुण रुपी मोती टिपत रहा.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

ज्वाला-रूप बनण्यासाठी नेहमी हीच धून लागून रहावी की आता परत घरी जायचे आहे. जायचे आहे अर्थात उपराम. जर आपल्या निराकारी घरी जायचे आहे तर तसा आपला वेष बनवायचा आहे. तर जायचे आहे आणि सर्वांना परत घेऊन जायचे आहे - या स्मृतीने आपोआपच सर्व नाती, सर्व प्रकृतीच्या आकर्षणांपासून उपराम अर्थात साक्षी बनाल. साक्षी बनल्याने सहजच बाबांचे सोबती आणि बाप-समान बनाल.

सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी भाऊ-बहिणींनी सायंकाळी ६:३० ते ७:३० वाजे पर्यंत, विशेष योग अभ्यासाच्या वेळी आपल्या आकारी फरिश्ता स्वरूपामध्ये स्थित होऊन, भक्तांचा आवाज ऐका आणि उपकार करा. मास्टर दयाळू, कृपाळू बनून सर्वांवर दयेची दृष्टी टाका. मुक्ती-जीवनमुक्तीचे वरदान द्या.