21-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला आता शिक्षक बनून सर्वांना मन वशीकरण मंत्र ऐकवायचा आहे, ही तुम्हा सर्व मुलांची ड्युटी आहे”

प्रश्न:-
बाबा कोणत्या मुलांचे काहीही स्वीकार करत नाहीत?

उत्तर:-
ज्यांना अहंकार आहे की, ‘मी इतके देतो, मी इतकी मदत करू शकतो’, बाबा त्यांचे काहीही स्वीकार करत नाहीत. बाबा म्हणतात - ‘माझ्या हातामध्ये चावी आहे. हवे असेल तर मी कोणालाही गरीब बनवू शकतो, वाटले तर कोणाला श्रीमंत बनवू शकतो’. हे देखील ड्रामामध्ये एक रहस्य आहे. ज्यांना आज आपल्या श्रीमंतीचा अहंकार आहे ते उद्या गरीब बनतात आणि गरीब मुले बाबांच्या कार्यामध्ये आपली पै-पै सफल करून श्रीमंत बनतात.

ओम शांती।
हे तर रुहानी मुले जाणतात की, बाबा आले आहेत आम्हाला नवीन दुनियेचा वारसा देण्याकरिता. हे तर मुलांना पक्के आहे ना की जितकी आम्ही बाबांची आठवण करू तितके पवित्र बनू. जितके आम्ही चांगले शिक्षक बनू तितके उच्च पद मिळवू. बाबा तुम्हाला शिक्षकाच्या रूपात शिकवायचे कसे ते शिकवतात. तुम्हाला मग इतरांना शिकवायचे आहे. तुम्ही शिकवणारे शिक्षक जरूर बनता परंतु तुम्ही कोणाचे गुरु बनू शकत नाही, फक्त शिक्षक बनू शकता. गुरु तर एक सद्गुरूच आहेत ते शिकवतात. सर्वांचा सद्गुरू एकच आहे. ते शिक्षक बनवतात. तुम्ही सर्वांना शिकवून मनमनाभवचा रस्ता सांगत राहता. बाबांनी तुम्हाला ही ड्युटी दिली आहे की, माझी आठवण करा आणि मग टीचर सुद्धा बना. तुम्ही कोणाला बाबांचा परिचय देता तर त्यांचे देखील कर्तव्य आहे बाबांची आठवण करणे. शिक्षक रूपामध्ये सृष्टी चक्राचे ज्ञान द्यावे लागते. बाबांची आठवण जरूर करावी लागेल. बाबांच्या आठवणीनेच पापे नष्ट होणार आहेत. मुले जाणतात आम्ही पाप आत्मा आहोत, म्हणून बाबा सर्वांना म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील’. बाबाच पतित-पावन आहेत. युक्ती सांगतात - ‘गोड मुलांनो, तुमची आत्मा पतित बनली आहे, ज्यामुळे शरीर देखील पतित बनले आहे. आधी तुम्ही पवित्र होता, आता तुम्ही अपवित्र बनले आहात’. आता पतितापासून पावन बनण्याची युक्ती तर अगदी सोपी सांगत आहेत. बाबांची आठवण करा तर तुम्ही पवित्र बनाल. उठता-बसता, चालता-फिरता बाबांची आठवण करा. ते लोक गंगा स्नान करतात, तर गंगेची आठवण करतात. समजतात ती पतित-पावनी आहे. गंगेची आठवण केल्याने पावन बनणार आहोत. परंतु बाबा म्हणतात, कोणीही पावन बनू शकत नाही. पाण्याने कसे पावन बनतील. बाबा म्हणतात - ‘मी पतित-पावन आहे. माझ्या मुलांनो, देहा सहित देहाचे सर्व धर्म सोडून माझी आठवण केल्याने तुम्ही पावन बनून पुन्हा आपल्या घरी मुक्तिधामला पोहोचाल. संपूर्ण कल्प घराला विसरले आहात’. संपूर्ण कल्प बाबांना कोणी जाणतच नाहीत. एकदाच बाबा स्वतः येऊन आपला परिचय देतात - या मुखाद्वारे (ब्रह्मा मुखाद्वारे). या मुखाची किती महिमा आहे. गोमुख म्हणतात ना. ती गाय तर प्राणी आहे, ही आहे मनुष्यांची गोष्ट.

तुम्ही जाणता - ही (ब्रह्मा बाबा) मोठी आई आहे. ज्या मातेद्वारे शिवबाबा तुम्हा सर्वांना ॲडॉप्ट करतात. तुम्ही आता ‘बाबा-बाबा’ म्हणू लागले आहात. बाबा देखील म्हणतात - ‘या आठवणीच्या यात्रेनेच तुमची पापे नष्ट होणार आहेत’. मुलाला पित्याची आठवण येते ना. त्यांचा चेहरा इत्यादी मनात कोरला जातो. तुम्ही मुले जाणता जसे आपण आत्मा आहोत तसे ते परम आत्मा आहेत, बाकी चेहऱ्यामध्ये कोणताही फरक नाही. शरीराच्या नात्याने तर फीचर्स इत्यादी वेग-वेगळी आहेत, बाकी आत्मा तर एकसारखीच आहे. जशी आमची आत्मा आहे तसे बाबा देखील परम आत्मा आहेत. तुम्ही मुले जाणता - बाबा परमधाममध्ये राहतात, आम्ही देखील परमधाममध्ये राहतो. बाबांची आत्मा आणि आमची आत्मा यामध्ये अजून कोणताही फरक नाही आहे. ते देखील बिंदू आहेत आपण देखील बिंदू आहोत. हे ज्ञान इतर कोणालाही नाही. हे तुम्हालाच बाबांनी सांगितले आहे. बाबांना देखील काय-काय म्हणत असतात. सर्वव्यापी आहे, दगडा-धोंड्यात आहे, ज्याला जे येते ते बोलतात. ड्रामा प्लॅन अनुसार भक्ती मार्गामध्ये बाबांचे नाव, रूप, देश, काळ विसरून जातात. तुम्ही देखील विसरून जाता. आत्मा आपल्या पित्याला विसरून जाते. मुलगा वडिलांनाच विसरून जातो तर मग बाकीचे तरी काय जाणणार. जसे अनाथ झाले आहेत. धन्याची (मालकाची) आठवणच करत नाहीत. धन्याच्या पार्टलाच जाणत नाहीत. स्वतःला देखील विसरून जातात. तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता - बरोबर आम्ही विसरून गेलो होतो. आपण आधी असे देवी-देवता होतो, आता पशूपेक्षाही वाईट बनलो आहोत. मुख्य म्हणजे आपण आपल्या आत्म्यालाच विसरून गेलो आहोत. आता रियलाईज करून (जाणीव करून) कोण देणार. कोणत्याही जीव आत्म्याला हे माहीत नसेल की, आपण आत्मे काय आहोत, कसा सारा पार्ट बजावतो? आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत - हे ज्ञान इतर कोणालाही नाही. यावेळी सारी सृष्टीच तमोप्रधान बनली आहे. ज्ञानच नाही आहे. तुम्हाला आता ज्ञान आहे, लक्षात आले आहे की, आपण आत्म्यांनी इतका वेळ आपल्या बाबांची निंदा करत आलो आहोत. ग्लानी केल्याने बाबांपासून दूर होत जातात. ड्रामा प्लॅन अनुसार शिडी खालीच उतरत गेले आहेत. मुख्य गोष्ट असते बाबांची आठवण करण्याची. बाबा अजून कोणताही त्रास देत नाहीत. मुलांना फक्त बाबांची आठवण करण्याचा त्रास आहे. वडील कधी मुलांना कोणता त्रास देऊ शकतील का! असा नियम नाही. बाबा म्हणतात - ‘मी कोणताही त्रास देत नाही’. काहीही प्रश्न इत्यादी विचारतात तर म्हणतो - ‘या गोष्टींमध्ये वेळ वाया का घालवता? बाबांची आठवण करा. मी आलोच आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी, म्हणून तुम्हा मुलांना आठवणीच्या यात्रेने पावन बनायचे आहे. बस्स, मीच पतित-पावन पिता आहे’. बाबा युक्ती सांगतात - कुठेही जा बाबांची आठवण करायची आहे. ८४ च्या चक्राचे रहस्य देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. आता स्वतःला तपासायचे आहे - आपण कितपत बाबांची आठवण करतो. बस्स, बाकी दुसरा कोणताही विचार करायचा नाही. हे तर अगदी सोपे आहे. बाबांची आठवण करायची आहे. मुलगा थोडा मोठा होतो तर आपोआप आई-वडिलांची आठवण करू लागतो. तुम्ही देखील समजा - आपण आत्मे बाबांची मुले आहोत, आठवण का करावी लागते! कारण आपल्यावर जी पापे चढलेली आहेत ती मग या आठवणीनेच नष्ट होतील; म्हणूनच गायन देखील आहे एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती. जीवनमुक्तीचा आधार अभ्यासावर आहे आणि मुक्तीचा आधार आठवणीवर आहे. जितकी तुम्ही बाबांची आठवण कराल आणि अभ्यासावर लक्ष द्याल तितके वरच्या नंबरचे पद प्राप्त कराल. धंदा इत्यादी तर भले करत रहा, बाबा काही मना करत नाहीत. धंदा इत्यादी जो तुम्ही करता तो देखील दिवस-रात्र लक्षात राहतो ना. तर आता बाबा हा रुहानी धंदा देत आहेत - स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा आणि ८४ च्या चक्राची आठवण करा. माझी आठवण केल्यानेच तुम्ही सतोप्रधान बनाल. हे देखील समजता, आता हे जुने वस्त्र (जुने शरीर) आहे मग सतोप्रधान नवीन वस्त्र मिळेल. आपल्या बुद्धीमध्ये सार ठेवायचे आहे, ज्याने खूप फायदा होणार आहे. जसे शाळेमध्ये विषय तर खूप असतात तरी देखील इंग्लिशमध्ये मार्क्स चांगले असतात कारण इंग्लिश आहे मुख्य भाषा. पूर्वी त्यांचेच राज्य होते म्हणून ती जास्त चालते. आजही भारतवासी कर्जबाजारी आहेत. भले कोणी कितीही श्रीमंत आहेत परंतु बुद्धीमध्ये तर हे आहे ना की, आमच्या राज्याचे जे प्रमुख आहेत, ते कर्जबाजारी आहेत. जणू आपण भारतवासी कर्जबाजारी आहोत. प्रजा जरूर म्हणेल ना आम्ही कर्जबाजारी आहोत. हे देखील समजून घेतले पाहिजे ना. आता जेव्हा तुम्ही राज्य स्थापन करत आहात तर तुम्ही जाणता आपण या सगळ्या कर्जातून मुक्त होऊन समृद्ध बनतो मग अर्धाकल्प आपण कोणाकडूनही कर्ज घेणार नाही. आपण कर्जबाजारी पतित दुनियेचे मालक आहोत. आता आम्ही कर्जबाजारी देखील आहोत, पतित दुनियेचे मालक सुद्धा आहोत. आमचा भारत असा आहे - असे गातात ना.

तुम्ही मुले जाणता आम्ही खूप श्रीमंत होतो, राजकुमार-राजकुमारी होतो. हे लक्षात राहते की, अशा विश्वाचे आपण मालक होतो. आता एकदम कर्जबाजारी आणि पतित बनलो आहोत. हा खेळाचा रिझल्ट बाबा सांगत आहेत. रिझल्ट काय मिळाला. तुम्हा मुलांना स्मृती आली आहे. सतयुगामध्ये आपण किती श्रीमंत होतो, तुम्हाला श्रीमंत कोणी बनवले? मुले म्हणतील - ‘बाबा, तुम्ही आम्हाला किती श्रीमंत बनवले होते’. एक बाबाच श्रीमंत बनवणारे आहेत. दुनिया या गोष्टींना जाणत नाही. लाखो वर्षे म्हटल्याने सर्व विसरून गेले आहेत, काहीही जाणत नाहीत. तुम्ही आता सर्व काही जाणले आहे. आम्ही पद्मा-पदम श्रीमंत होतो. अतिशय पवित्र होतो, खूप सुखी होतो. तिथे असत्य, पाप इत्यादी काहीही नसते. साऱ्या विश्वावर तुम्ही विजय मिळवला होता. गायन देखील आहे - ‘शिवबाबा, तुम्ही जे देता ते इतर कोणीही देऊ शकत नाही’. कोणाची ताकद नाही जे अर्ध्याकल्पाचे सुख देऊ शकेल. बाबा म्हणतात - भक्ती मार्गामध्ये देखील तुम्हाला खूप सुख असते, तुमच्याकडे अथाह धन असते. किती हिरे-माणके होती जी मग मागाहून आलेल्यांच्या हाती लागतात. आता तर ती वस्तूच पाहण्यात येत नाही. तुम्ही फरक बघता ना. तुम्हीच पूज्य देवी-देवता होता मग तुम्हीच पुजारी बनले आहात. आपे ही पूज्य, आपे ही पुजारी. बाबा काही पुजारी बनत नाहीत परंतु पुजारी दुनियेमध्ये तर येतात ना. बाबा तर एव्हर पूज्य (सदा पूजनीय) आहेत. ते कधीही पुजारी बनत नाहीत, त्यांचा धंदा आहे तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनविणे. रावणाचे काम आहे तुम्हाला पुजारी बनविणे. हे दुनियेमध्ये कोणालाच माहिती नाही आहे. तुम्ही देखील विसरून जाता. बाबा, रोज-रोज समजावून सांगत राहतात. हे बाबांच्या हातामध्ये आहे - कोणाला श्रीमंत बनवायचे, कोणाला गरीब बनवायचे. बाबा म्हणतात जे श्रीमंत आहेत त्यांना गरीब जरूर बनायचे आहे, बनतीलच. त्यांचा पार्टच असा आहे. ते कधीही या ज्ञानमार्गामध्ये टिकू शकणार नाहीत. श्रीमंताला अहंकार देखील खूप असतो ना - मी अमका आहे, आमच्याकडे हे-हे आहे. घमेंड उतरवण्यासाठी बाबा म्हणतात - हे जेव्हा देण्यासाठी येतील तेव्हा बाबा म्हणतील - गरज नाही. हे तुमच्याकडेच ठेवा. जेव्हा गरज असेल तेव्हा घेऊ; कारण बाबा बघतात - काहीच कामाचा नाही आहे स्वतःची घमेंड आहे. तर हे सर्व बाबांच्या हातात आहे ना - घ्यायचे की नाही घ्यायचे. बाबा या पैशाचे काय करतील, गरजच नाही. ही तर तुम्हा मुलांसाठी घरे बनत आहेत, येऊन बाबांना फक्त भेटून जायचे आहे. कायम तर रहायचे नाही आहे. पैशांची काय गरज लागणार. काही सैन्य किंवा तोफ-गोळे तर नको आहेत. तुम्ही विश्वाचे मालक बनता. आता युद्धाच्या मैदानामध्ये आहात, तुम्ही बाबांची आठवण करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करत नाही. बाबांनी आज्ञा दिली आहे - ‘माझी आठवण करा तर खूप शक्ती मिळेल’. हा तुमचा धर्म खूप सुख देणारा आहे. बाबा आहेत सर्वशक्तिमान. तुम्ही त्यांचे बनता. संपूर्ण आधार आठवणीच्या यात्रेवर आहे. इथे तुम्ही ऐकता त्यावर मग चिंतन चालते. जसे गाय चारा खाऊन मग रवंथ करते, तोंड चालतच राहते. तुम्हा मुलांना देखील सांगतात ज्ञानाच्या गोष्टींवर खूप विचार करा. बाबांना आपण काय विचारायचे. बाबा तर म्हणतात - मनमनाभव. ज्याद्वारेच तुम्ही सतोप्रधान बनता. हे एम ऑब्जेक्ट समोर आहे.

तुम्ही जाणता - सर्वगुणसंपन्न १६ कला संपूर्ण बनायचे आहे. हे आपोआप आतून वाटले पाहिजे. कोणाची निंदा अथवा पाप कर्म इत्यादी काहीही आपल्याकडून होऊ नये. तुम्हाला कोणतेही उलटे कर्म करायचे नाही आहे. नंबर वन आहेत हे देवी-देवता. पुरुषार्थाने उच्च पद मिळवले आहे ना. त्यांच्यासाठी गायले जाते - ‘अहिंसा परमो देवी-देवता धर्म’. कोणाला मारणे ही हिंसा झाली ना. बाबा समजावून सांगतात तर मग मुलांना अंतर्मुख होऊन स्वतःला पहायचे आहे - मी कसा बनलो आहे? बाबांची मी आठवण करतो का? किती वेळ मी आठवण करतो? इतके मन लागावे की ही आठवण कधी विसरूच नये. आता बेहदचे बाबा म्हणतात - ‘तुम्ही आत्मे माझी संतान आहात. तेही तुम्ही अनादि संतान आहात. ते जे आशिक-माशुक असतात त्यांची आहे दैहिक आठवण. जसे साक्षात्कार होतो त्यातच मग हरवून जातात तसे ते देखील समोर येतात. त्या आनंदातच खात-पित आठवण करत राहतात. तुमच्या या आठवणीमध्ये तर खूप शक्ती आहे. एका बाबांचीच आठवण करत रहाल. आणि तुम्हाला मग आपले भविष्य आठवेल. विनाशाचा साक्षात्कार देखील होईल. पुढे जाऊन लवकर -लवकर विनाशाचा साक्षात्कार होईल. मग तुम्ही म्हणू शकाल की आता विनाश होणार आहे. बाबांची आठवण करा. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) हे सर्व काही सोडून दिले ना. शेवटी काहीही आठवू नये. आता तर आपण आपल्या राजधानीमध्ये जाऊया. नव्या दुनियेमध्ये जरूर यायचे आहे. योगबळाने सर्व पापांना भस्म करायचे आहे, यासाठीच खूप मेहनत करायची आहे. क्षणोक्षणी बाबांना विसरून जाता कारण ही अतिसूक्ष्म गोष्ट आहे. सापाचे, भुंग्याचे जी उदाहरणे देतात ती सर्व आहेत या वेळची. भुंगा चमत्कार करतो ना. त्याही पेक्षा तुमचा चमत्कार जास्त आहे. बाबा लिहितात ना - ज्ञानाची भू-भू करत रहा. शेवटी जागे होतील. जातील कुठे. तुमच्याकडेच येत राहतील. वाढत जातील. तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल. आता तर तुम्ही फार थोडे आहात ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञानाचे खूप विचार सागर मंथन करायचे आहे. जे ऐकले आहे त्याचे मनन करायचे आहे. अंतर्मुखी होऊन पहायचे आहे की बाबांवर इतके मन जडले आहे का जे त्यांना कधीच विसरणार नाही.

२) कोणताही प्रश्न इत्यादी विचारण्यामध्ये आपला वेळ वाया न घालवता आठवणीच्या यात्रेने स्वतःला पावन बनवायचे आहे. अंतिम समयी एका बाबांच्या आठवणी शिवाय इतर कोणताही विचार येऊ नये - हा अभ्यास आतापासूनच करायचा आहे.

वरदान:-
दृढ संकल्प रुपी व्रताद्वारे वृत्तींचे परिवर्तन करणारे महान आत्मा भव

महान बनण्याचा मुख्य आधार आहे - ‘पवित्रता’. या पवित्रतेच्या व्रताला प्रतिज्ञेच्या रूपामध्ये धारण करणे अर्थात महान आत्मा बनणे. कोणतेही दृढ संकल्प रुपी व्रत वृत्तीला बदलू शकते. पवित्रतेचे व्रत घेणे अर्थात आपल्या वृत्तीला श्रेष्ठ बनविणे. व्रत ठेवणे अर्थात स्थूल रीतीने पथ्य पाळणे, मनामध्ये पक्का संकल्प घेणे. तर पावन बनण्याचे व्रत घेतले आणि आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत - ही बंधुत्वाची वृत्ती बनवली. या वृत्ती द्वारे ब्राह्मण महान आत्मा बनलात.

बोधवाक्य:-
व्यर्थ पासून वाचायचे असेल तर मुखावर दृढ संकल्पाचे बटन लावा.