21-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - खरी कमाई करण्याचा पुरुषार्थ पहिले स्वतः करा आणि मग आपल्या
मित्र-नातेवाईकांना देखील करवा, चॅरिटी बिगिन्स ॲट होम”
प्रश्न:-
सुख किंवा चैन
(शांती) प्राप्त करण्याची विधी काय आहे?
उत्तर:-
पवित्रता. जिथे पवित्रता आहे तिथे सुख-चैन आहे. बाबा पवित्र दुनिया सतयुगाची स्थापना
करतात. तिथे विकार नसतात. जे देवतांचे पुजारी आहेत ते कधी असा प्रश्न करू शकत नाहीत
की विकारा शिवाय दुनिया कशी चालेल? आता तुम्हाला शांतीच्या दुनियेमध्ये यायचे आहे
म्हणून या पतित दुनियेला विसरायचे आहे. शांतीधाम आणि सुखधामची आठवण करायची आहे.
ओम शांती।
ओम् शांतीचा अर्थ तर मुलांना समजावून सांगितलेला आहे. शिवबाबा देखील ‘ओम् शांती’
म्हणू शकतात तर शाळीग्राम मुले देखील म्हणू शकतात. आत्मा म्हणते, ‘ओम् शांती’. सन
ऑफ सायलेन्स फादर. शांतीसाठी जंगल इत्यादी ठिकाणी जाऊन काही उपाय केला जात नाही.
आत्मा तर आहेच सायलेन्स (शांत). मग उपाय तो कशासाठी करायचा? हे बाबा बसून समजावून
सांगतात. त्या बाबांनाच म्हणतात की, तिथे घेऊन चला जिथे सुख चैन मिळेल. चैन (शांती)
अथवा सुख सर्व मनुष्यांना हवेसे वाटते. परंतु सुख आणि शांतीच्या अगोदर पाहिजे
पवित्रता. पवित्र असणाऱ्याला पावन, अपवित्र असणाऱ्याला पतित म्हटले जाते. पतित
दुनियावाले बोलावत राहतात की, येऊन आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन चला. ते आहेतच
पतित दुनियेमधून मुक्त करून पावन दुनियेमध्ये घेऊन जाणारे. सतयुगामध्ये आहे पवित्रता,
कलियुगामध्ये आहे अपवित्रता. ते आहे व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया), हे आहे
विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). हे तर मुले जाणतात - दुनियेची वृद्धी तर होत राहते.
सतयुग व्हाईसलेस वर्ल्ड आहे तर जरूर थोडे मनुष्य असतील. ते थोडे कोण असतील? खरोखर
सतयुगामध्ये देवी-देवतांचेच राज्य आहे, त्यालाच चैनची (शांतीची) दुनिया किंवा
सुखधाम म्हटले जाते. हे आहे दुःखधाम. दुःखधामला बदलून सुखधाम बनविणारे एक परमपिता
परमात्माच आहेत. सुखाचा वारसा जरूर बाबाच देतील. आता ते बाबा सांगत आहेत -
दुःखधामाला विसरा, शांतीधाम आणि सुखधामाची आठवण करा यालाच मनमनाभव म्हटले जाते. बाबा
येऊन मुलांना सुखधामाचा साक्षात्कार घडवतात. दुःखधामचा विनाश करवून शांतीधाममध्ये
घेऊन जातात. या चक्राला समजून घ्यायचे आहे. ८४ जन्म घ्यावे लागतात. जे पहिले
सुखधाममध्ये येतात, त्यांचे आहेत ८४ जन्म, फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्याने
देखील मुले सुखधामचे मालक बनू शकतात.
बाबा म्हणतात -
‘मुलांनो, शांतीधामची आठवण करा आणि मग वारशाची अर्थात सुखधामची आठवण करा. सर्वप्रथम
तुम्ही शांतीधाममध्ये जाता तर स्वतःला शांतीधाम, ब्रह्मांडाचा मालक समजा.
चालता-फिरता स्वतःला तिथले वासी समजाल तर ही दुनिया विसरत जाईल. सतयुग आहे सुखधाम
परंतु सर्वच काही सतयुगामध्ये येऊ शकत नाहीत. या गोष्टी समजतीलही तेच जे देवतांचे
पुजारी आहेत. ही आहे सच्ची कमाई, जे सच्चे बाबा शिकवतात. बाकी सर्व आहे खोटी कमाई.
अविनाशी ज्ञान रत्नांची कमाई खरी कमाई म्हटली जाते, बाकी विनाशी धन-दौलत ती सर्व आहे
खोटी कमाई. द्वापर पासून ती खोटी कमाई करत आले आहात. या अविनाशी खऱ्या कमाईचे
प्रारब्ध सतयुगापासून सुरू होऊन त्रेतामध्ये पूर्ण होते अर्थात अर्धाकल्प भोगता.
त्या नंतर मग खोटी कमाई सुरू होते, ज्याद्वारे अल्पकाळ क्षणभंगुर सुख मिळते. ही
अविनाशी ज्ञान रत्ने, ज्ञान सागरच देतात. खरी कमाई खरे बाबाच करवून देतात. भारत
सचखंड होता, भारतच आता झूठ खंड बनला आहे. इतर खंडांना सच-खंड, झुठ-खंड म्हटले जात
नाही. सच-खंड बनविणारे खरे बादशहा तेच आहेत. खरे आहेत एक गॉड फादर, बाकी आहेत खोटे
पिता. सतयुगामध्ये देखील खरे पिता मिळतात कारण तिथे खोटे, पाप असतच नाही. ही आहेच
पाप आत्म्यांची दुनिया, ती आहे पुण्य आत्म्यांची दुनिया. तर आता या खऱ्या कमाईसाठी
किती पुरुषार्थ करायला हवा. ज्यांनी कल्पापूर्वी कमाई केली आहे, तेच करतील. पहिले
स्वतः खरी कमाई करून मग माहेरच्यांकडून आणि सासरच्यांकडून हीच खरी कमाई करवून
घ्यायची आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम.
सर्वव्यापीचे ज्ञान
असणारे भक्ति करू शकत नाहीत. जेव्हा सगळेच भगवंताचे रूप आहेत तर मग भक्ती कोणाची
करता? तर या दलदली मधून काढण्यासाठी मेहनत करावी लागते. संन्याशी लोक चॅरिटी
बिगिन्स ॲट होम काय करतील? पहिले तर ते आपल्या घरादाराचा समाचार ऐकवतच नाहीत. तुम्ही
विचारा, का ऐकवत नाही? माहित तर असायला पाहिजे ना. सांगायला काय हरकत आहे, अमक्या
घरचे होतो मग संन्यास धारण केला! तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही लगेच सांगू शकता.
संन्याशांचे फॉलोअर्स तर खूप आहेत. ते मग बसून जर म्हणतील की, भगवान एक आहेत तर
सर्व त्यांना विचारतील तुम्हाला हे ज्ञान कोणी सांगितले? म्हणतील बी. के. नी, मग तर
त्यांचा सारा धंदाच खलास होईल. अशी कोण आपली इज्जत घालवेल? मग तर कोणी जेवण सुद्धा
देणार नाहीत; म्हणूनच संन्याशांसाठी तर खूप अवघड आहे. पहिले तर आपल्या
मित्र-नातेवाईकांना ज्ञान देऊन खरी कमाई करवून घ्यावी लागेल ज्यामुळे ते २१ जन्म
सुख प्राप्त करतील. गोष्ट आहे तर खूप सोपी. परंतु ड्रामामध्ये इतकी शास्त्रे, मंदिरे
इत्यादी बनविण्याची देखील नोंद आहे.
पतित दुनियेमध्ये
राहणारे म्हणतात - ‘आता पावन दुनियेमध्ये घेऊन चला’. सतयुगाला ५ हजार वर्षे झाली.
त्यांनी तर कलियुगाचा कालावधी लाखो वर्षे म्हटलेला आहे तर मग मनुष्य कसे समजतील की
सुखधाम कुठे आहे? कधी होणार? ते तर म्हणतात महाप्रलय होतो तेव्हा मग सतयुग येते.
सर्वात पहिले श्रीकृष्ण सागरामध्ये पिंपळाच्या पानावर अंगठा चोखत येतो. आता कुठली
गोष्ट कुठे घेऊन गेले आहेत! आता बाबा म्हणतात - ब्रह्माद्वारे मी सर्व
वेद-शास्त्रांचे सार ऐकवतो म्हणून विष्णूच्या नाभी-कमळात ब्रह्माला दाखवतात आणि मग
हातामध्ये शास्त्र दिली आहेत. आता ब्रह्मा तर जरूर इथे असेल. सूक्ष्म वतनमध्ये तर
काही शास्त्र असणार नाहीत ना. ब्रह्मा इथे असायला पाहिजे. विष्णू, लक्ष्मी-नारायणाची
रूपे देखील इथेच तर असतात. ब्रह्मा सो विष्णू बनतो मग विष्णू सो ब्रह्मा बनतो. आता
ब्रह्मा पासून विष्णू निघतो कि विष्णूपासून ब्रह्मा निघतो? या सर्व समजून घेण्याच्या
गोष्टी आहेत. परंतु या गोष्टींना समजतील तेच जे चांगल्या प्रकारे अभ्यास करतील. बाबा
म्हणतात - ‘जोपर्यंत तुमचे शरीर सुटेल तोपर्यंत समजून घेतच रहाल. तुम्ही एकदम १००
टक्के अज्ञानी, गरीब बनले आहात. तुम्हीच हुशार देवी-देवता होता, आता पुन्हा तुम्ही
देवी-देवता बनत आहात. मनुष्य तर बनवू शकणार नाही. तुम्ही सो देवता होता मग ८४ जन्म
घेत-घेत एकदम कला हीन झाले आहात. तुम्ही सुखधाममध्ये खूप चैनमध्ये (शांतीमध्ये) होता,
आता बेचैन आहात. तुम्ही ८४ जन्मांचा हिशोब सांगू शकता. इस्लामी, बौद्धी, शिख, ईसाई,
मठ-पंथ हे सर्व किती जन्म घेतील? हा हिशोब काढणे तर सोपे आहे. स्वर्गाचे मालक तर
भारतवासीच बनतील. कलम लागते ना. हे आहे स्पष्टीकरण. स्वतः समजतील तर मग सर्वात
अगोदर आपल्या आई-वडिलांना, बहिण-भावांना ज्ञान द्यावे लागेल. गृहस्थ व्यवहारामध्ये
रहात असताना कमलपुष्प समान रहायचे आहे मग चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपल्या माहेरी,
सासरी नॉलेज ऐकवावे लागेल. धंद्यामध्ये देखील पहिले आपल्या भावांनाच भागीदार बनवतात.
इथे देखील असेच आहे. गायन देखील आहे - ‘कन्या ती जी माहेरचा आणि सासरचा उद्धार करेल’.
अपवित्र उद्धार करू शकत नाही. तर कोणती कन्या? या ब्रह्माची कन्या, ब्रह्माकुमारी
आहे ना. इथे अधर कन्या, कुमारी कन्येचे मंदिर देखील बांधलेले आहे ना. इथे तुमची
यादगार (स्मारके) बनलेली आहेत. आपण पुन्हा आलो आहोत भारताला स्वर्ग बनविण्यासाठी.
हे दिलवाडा मंदिर एकदम अचूक आहे, वरती स्वर्ग दाखविला आहे. स्वर्ग आहे तर इथेच.
राजयोगाची तपस्या देखील इथेच होते. ज्यांचे मंदिर आहे त्यांनी तर हे जाणून घेतली
पाहिजे ना! आता आतमध्ये जगतपिता, जगत अंबा, आदि देव, आदि देवी बसले आहेत. अच्छा, आदि
देव कोणाचा मुलगा आहे? शिवबाबांचा. अधर कुमारी, कुमारी कन्या सर्व राजयोगामध्ये
बसलेले आहेत. बाबा म्हणतात - ‘मनमनाभव’; तर तुम्ही वैकुंठाचे मालक बनाल. मुक्ती,
जीवनमुक्ती धामची आठवण करा. तुमचा हा संन्यास आहे, जैन लोकांचा संन्यास किती अवघड
आहे. केशवपन करण्याचा रिवाज किती कडक आहे. इथे तर आहेच सहज राजयोग. हा आहे देखील
प्रवृत्ती मार्गाचा. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. कोणी जैन मुनीने बसून आपला नवीन
धर्म स्थापन केला परंतु त्याला आदि सनातन देवी-देवता धर्म तर म्हणणार नाही ना. तो
तर आता प्राय:लोप झाला आहे. कोणी जैन धर्म सुरु केला आणि चालत राहिला. हे देखील
ड्रामामध्ये आहे. आदि देवाला पिता आणि जगत अंबेला माता म्हणणार. हे तर सर्वजण
जाणतात की, आदि देव ब्रह्मा आहेत. आदम-बीबी, ॲडम-ईव्ह देखील म्हणतात. ख्रिश्चन
लोकांना थोडेच माहित आहे की ॲडम-ईव्ह आता तपस्या करत आहेत. मनुष्य सृष्टीच्या
वंशावळीचे हे मुख्य आहेत. हे रहस्य देखील बाबा बसून समजावून सांगतात. शिवाची किंवा
लक्ष्मी-नारायणाची इतकी मंदिरे बांधली आहेत तर त्यांची बायोग्राफी (जीवन चरित्र)
जाणून घेतले पाहिजे ना! हे देखील ज्ञान सागर बाबाच बसून समजावून सांगतात. परमपिता
परमात्म्यालाच नॉलेजफुल, ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर म्हटले जाते. ही परमात्म्याची
महिमा कोणीही साधु-संत इत्यादी जाणत नाहीत. ते तर म्हणतात - ‘परमात्मा सर्वव्यापी
आहे मग महिमा कोणाची करतील? परमात्म्याला न जाणल्या कारणानेच मग स्वतःला शिवोहम्
म्हणतात. नाही तर परमात्म्याची महिमा किती मोठी आहे. ते तर मनुष्य सृष्टीचे बीजरूप
आहेत. मुसलमान लोक देखील म्हणतात - आम्हाला खुदाने निर्माण केले, तर आपण रचना झालो.
रचना, रचनेला वारसा देऊ शकत नाही. क्रिएशनला क्रियेटर कडून वारसा मिळतो, या गोष्टीला
कोणीही समजू शकत नाहीत. ते बीजरूप सत् आहेत, चैतन्य आहेत, सृष्टीच्या
आदि-मध्य-अंताचे त्यांना ज्ञान आहे. बीजा व्यतिरिक्त आदि-मध्य-अंताचे ज्ञान
कोणत्याही मनुष्यमात्राला असू शकत नाही. बीज चैतन्य आहे तर जरूर नॉलेज
त्यांच्यामध्येच असेल. तेच येऊन तुम्हाला संपूर्ण सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज
देतात. असा देखील बोर्ड लावला पाहिजे की, या चक्राला जाणल्याने तुम्ही सतयुगाचे
चक्रवर्ती राजा अथवा स्वर्गाचे राजा बनाल. किती सोपी गोष्ट आहे. बाबा म्हणतात -
जोपर्यंत जगायचे आहे, माझी आठवण करायची आहे. मी स्वतः तुम्हाला हा वशीकरण मंत्र देतो.
आता तुम्हाला आठवण करायची आहे बाबांची. आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. हे
स्वदर्शन चक्र फिरत राहीले तर मायेचे डोके कापले जाईल. मी तुमच्या आत्म्याला पवित्र
बनवून घेऊन जाणार मग तुम्ही सतोप्रधान शरीर घ्याल. तिथे विकार असत नाहीत. म्हणतात -
विकारा शिवाय सृष्टी कशी चालेल? बोला, तुम्ही कदाचित देवतांचे पुजारी नाही आहात.
लक्ष्मी-नारायणाची तर महिमा गातात - संपूर्ण निर्विकारी. जगदंबा, जगतपिता निर्विकारी
आहेत, राजयोगाची तपस्या करून पतिता पासून पावन, स्वर्गाचे मालक बनले आहेत. तपस्या
करतातच मुळी पुण्य आत्मा बनण्यासाठी. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या जुन्या
दुनियेला बुद्धीने विसरण्यासाठी चालता-फिरता स्वतःला शांतीधामचा वासी समजायचे आहे.
शांतीधाम आणि सुखधामची आठवण करून खरी कमाई करायची आहे आणि इतरांकडून देखील करून
घ्यायची आहे.
२) राजयोगाची तपस्या
करून स्वतःला पुण्य आत्मा बनवायचे आहे. मायेचे डोके कापण्यासाठी नेहमी स्वदर्शन
चक्र फिरत रहावे.
वरदान:-
संपन्नते
द्वारे नेहमी संतुष्टतेचा अनुभव करणारे संपत्तीवान भव
स्वराज्याची संपत्ती
आहे ज्ञान, गुण आणि शक्ती. जे या सर्व संपत्तीने संपन्न स्वराज्य अधिकारी आहेत ते
नेहमी संतुष्ट आहेत. त्यांच्याकडे अप्राप्तीचे नामो-निशाणही नसते. हदच्या इच्छांची
अविद्या - यालाच म्हटले जाते संपत्तीवान. ते नेहमी दाता असतील, मागणारे नाहीत. ते
अखंड सुख-शांतीमय स्वराज्याचे अधिकारी असतात. कोणत्याही प्रकारची परिस्थिती
त्यांच्या अखंड शांतीला खंडित करू शकत नाही.
बोधवाक्य:-
ज्ञान
नेत्राद्वारे तिन्ही काळांना आणि तिन्ही लोकांना जाणणारे मास्टर नॉलेजफुल आहेत.