22-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हा खूप अनादि पूर्वनियोजित ड्रामा आहे, हा खूप चांगला बनलेला आहे, याच्या भूतकाळाला, वर्तमानाला आणि भविष्यकाळाला तुम्ही मुले चांगल्या प्रकारे जाणता”

प्रश्न:-
कोणत्या आकर्षणाच्या आधारे सर्व आत्मे तुमच्याकडे ओढले जातील?

उत्तर:-
पवित्रता आणि योग यांच्या आकर्षणाच्या आधारे. याच्यामुळेच तुमची वृद्धी होत जाईल. पुढे जाऊन बाबांना ताबडतोब ओळखू लागतील. इतके सगळे वारसा घेत आहेत हे बघून तर अजून भरपूर येतील. जितका उशीर होईल तितके तुमच्यामधील आकर्षण वाढत जाईल.

ओम शांती।
रूहानी मुलांना हे तर माहीत आहे की आपण आत्मे परमधामहून येतो - लक्षात आहे ना. जेव्हा सर्व आत्मे येऊन जवळजवळ पूर्ण होतात, थोडेसे शिल्लक राहतात तेव्हा बाबा येतात. आता तुम्हा मुलांना कोणालाही समजावून सांगणे खूप सोपे आहे. दूरदेशामध्ये राहणारे सर्वात शेवटी येतात. थोडे शिल्लक राहतात. आत्ता पर्यंत सुद्धा वृद्धी होत आहे ना. हे देखील जाणता - बाबांना कोणीही ओळखत नाहीत तर मग रचनेच्या आदि-मध्य-अंताला कसे बरे जाणतील? हा बेहदचा ड्रामा आहे ना. तर ड्रामातील ॲक्टर्सना माहीत असले पाहिजे. जसे हदच्या ॲक्टर्सनासुद्धा माहीत असते - अमक्या-अमक्याला हा पार्ट मिळालेला आहे. जी गोष्ट भूतकाळात घडून जाते त्यांचाच मग छोटा ड्रामा बनवतात. भविष्यकाळातला तर बनवू शकत नाहीत. पूर्वी जे घडले आहे त्या घटनेला घेऊन आणखी काही कहाण्या बनवून ड्रामा तयार करतात, तोच सर्वांना दाखवतात. भविष्यकाळाला तर जाणतच नाहीत. आता तुम्ही समजता बाबा आले आहेत, स्थापना होत आहे, आम्ही वारसा प्राप्त करत आहोत. जे-जे येत राहतात, त्यांना आम्ही देवी-देवता पद प्राप्त करण्याचा मार्ग दाखवतो. हे देवता इतके श्रेष्ठ कसे बनले? हे देखील कोणाला ठाऊक नाही आहे. खरे तर आदि सनातन तर देवी-देवता धर्मच आहे. आपल्या धर्माला विसरतात तेव्हा म्हणतात - आमच्याकरिता तर सर्व धर्म एकच आहेत.

आता तुम्ही मुले जाणता बाबा आम्हाला शिकवत आहेत. बाबांच्या मार्गदर्शनानुसारच चित्रे इत्यादी बनविली जातात. बाबा दिव्य दृष्टीद्वारे चित्रे बनवून घेत होते. कोणी तर मग आपल्या बुद्धीने सुद्धा बनवतात. मुलांना हे देखील समजावून सांगितले आहे, हे नक्की लिहा पार्टधारी ॲक्टर्स तर आहेत परंतु क्रिएटर, डायरेक्टर (रचनाकार, दिग्दर्शक) वगैरेंना कोणी ओळखत नाहीत. बाबा आता नवीन धर्माची स्थापना करत आहेत. जुन्या पासून नवी दुनिया बनणार आहे हे देखील लक्षात राहिले पाहिजे. जुन्या दुनियेमध्येच बाबा येऊन तुम्हाला ब्राह्मण बनवतात. ब्राह्मणच मग देवता बनतील. युक्ती बघा कशी छान आहे. भले हा आहे अनादि, पूर्वनियोजित ड्रामा, परंतु बनला खूप सुंदर आहे. बाबा म्हणतात तुम्हाला गुह्य-गुह्य गोष्टी रोज सांगत रहातो. जेव्हा विनाश सुरू होईल तेव्हा तुम्हा मुलांना पूर्वीचा सर्व इतिहास माहिती होईल. मग सतयुगामध्ये जाल तेव्हा पूर्वीचा इतिहास काहीही आठवणार नाही. प्रत्यक्ष कृती करत राहता. भूतकाळ कोणाला सांगणार? हे लक्ष्मी-नारायण भूतकाळाला अजिबात जाणत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये तर भूत, वर्तमान, भविष्य सर्व आहे - विनाश कसा होणार, राजाई कशी असेल, महाल कसे बनवतील? बनणार तर नक्की ना. स्वर्गाची दृश्येच वेगळी आहेत. जस-जसा पार्ट बजावत रहाल तसे समजत जाईल. याला म्हटले जाते - खुने नाहेक खेळ (नाहक रक्तरंजित खेळ). विनाकारण नुकसान होत राहते ना. भूकंप होतात, किती नुकसान होते. बॉम्ब फेकतात हे विनाकारण आहे ना. कोणी काही करतात थोडेच. जे विशाल-बुद्धी आहेत ते समजतात - खरोखरच विनाश झाला होता. मारामारी जरूर झाली होती. असा खेळसुद्धा बनवतात. हे तर समजू देखील शकते. काही वेळा कोणाच्या बुद्धीला टच होते. तुम्ही तर प्रॅक्टिकलमध्ये आहात. तुम्ही त्या राज्याचे मालकसुद्धा बनता. तुम्ही जाणता आता त्या नव्या दुनियेमध्ये नक्की जायचे आहे. जे ब्राह्मण बनतात, ब्रह्मा द्वारे अथवा ब्रह्माकुमार-कुमारींद्वारे नॉलेज घेतात तर ते तिथे येतात. राहतात तर आपल्या संसारातच ना. बहुसंख्य जणांना तर जाणू सुद्धा शकणार नाही. सेंटर्सवर किती येतात. इतके सर्व लक्षात थोडेच राहू शकतात. किती ब्राह्मण आहेत, वृद्धी होत-होत अगणित होतील. अचूक हिशोब काढू शकणार नाही. आपली एकूण प्रजा किती आहे हे राजाला थोडेच अचूकपणे माहीत असते? भले जनगणना वगैरे करतात तरीही फरक पडतोच. आता तुम्ही देखील स्टुडंट, हे (ब्रह्मा) देखील स्टुडंट आहेत. सर्व भावांनी (आत्म्यांनी) एका बाबांची आठवण करायची आहे. छोट्या मुलांना देखील शिकवले जाते - ‘बाबा-बाबा’ म्हण. तुम्ही हे देखील जाणता की, पुढे जाऊन बाबांना लगेच ओळखतील. इतके सगळे वारसा घेत आहेत हे बघून खूप येतील. जितका उशीर होईल तितके तुमच्याबद्दल आकर्षण वाढत जाईल. पवित्र बनल्याने आकर्षण निर्माण होते, जितके योगामध्ये रहाल तितके आकर्षण वाटेल, इतरांना सुद्धा आकर्षित कराल. बाबा देखील आकर्षित करतात ना. खूप वृद्धी होत राहील. त्याकरिता युक्त्या देखील केल्या जात आहेत. गीतेचा भगवान कोण? श्रीकृष्णाची आठवण करणे तर खूप सोपे आहे. तो तर साकार रूपामध्ये आहे ना. निराकार बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा - या गोष्टीवरच सर्व काही अवलंबून आहे; म्हणून बाबांनी सांगितले होते याबद्दल सर्वांकडून लिहून घेत रहा. मोठ-मोठ्या याद्या बनवाल तर लोकांना माहीत होईल.

तुम्ही ब्राह्मण जेव्हा निश्चयबुद्धी व्हाल, झाड वृद्धीला प्राप्त होत राहील. मायेची वादळे देखील शेवटपर्यंत चालू राहतील. विजय प्राप्त केल्यावर मग ना पुरुषार्थ असेल, ना माया असेल. आठवण करण्यामध्येच जास्त करून हार खातात. जितके तुम्ही योगामध्ये पक्के रहाल, तितके हरणार नाही. ही राजधानी स्थापन होत आहे. मुलांना निश्चय आहे आपले राज्य असेल मग आम्ही हिरे-माणके कुठून आणणार! सर्व खाणी कुठून येतील! हे सर्व आधी होते तर खरे ना. यामध्ये गोंधळून जाण्याचा तर काही प्रश्नच नाही. जे होणार आहे ते प्रत्यक्षात बघाल. स्वर्ग तर नक्कीच बनणार आहे. जे चांगल्या प्रकारे शिकतात, त्यांना निश्चय असेल आपण जाऊन भविष्यामध्ये राजकुमार बनणार. हिरे-माणकांचे महाल असतील. हा निश्चय देखील सेवाभावी मुलांनाच असेल. जे कमी दर्जाचे पद प्राप्त करणारे असतील, त्यांना तर असे विचार कधी येणार सुद्धा नाहीत की, आपण महाल इत्यादि कसा बनवणार. जे खूप सेवा करतील तेच महालामध्ये जातील ना. दास-दासी तर तयार मिळतील. सेवाभावी मुलांनाच असे विचार येतील. मुले देखील समजतात, चांगली सेवा करणारे कोण-कोण आहेत. सेवा न करणारे समजतील की, आपण तर शिकलेल्यांची चाकरी करणार. जसे हे बाबा आहेत, बाबांचे विचार चालतात ना. वृद्ध व्यक्ती जणू छोट्या मुलाप्रमाणे असते त्यामुळे त्यांची कृती देखील लहान मुलासारखी असते. बाबांची तर एकच ऍक्ट (कर्म) आहे - मुलांना शिकवणे. विजयमाळेचा मणी बनायचे असेल तर पुरुषार्थ देखील खूप पाहिजे. खूप गोड बनायचे आहे. श्रीमतावर चालावे लागेल तरच श्रेष्ठ बनाल. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे ना. बाबा म्हणतात - मी जे सांगतो त्यावरून ठरवा. पुढे जाऊन तुम्हाला अजूनच साक्षात्कार होत राहतील. जवळ येत जाल तशी आठवण येत राहील. आपल्या राज्यामधून परत येऊन ५ हजार वर्षे झाली आहेत. ८४ जन्मांचे चक्र फिरून आलो आहोत. जसे वास्को-द-गामा साठी म्हणतात - पृथ्वी प्रदक्षिणा केली. तुम्ही या जगात ८४ चा फेरा पूर्ण केला आहे. तो एक वास्को-द-गामा गेला ना. हे देखील एक आहेत, जे तुम्हाला ८४ जन्मांचे रहस्य सांगतात. घराणे चालते. तर स्वतःला बघायचे आहे की, माझ्यामध्ये कोणता देह-अभिमान तर नाही ना? निराश तर होत नाही ना? कोणाचा राग तर येत नाही ना?

तुमच्यामध्ये योगबळ असेल, बाबांची आठवण करत रहाल तर तुम्हाला कोणीही थप्पड इत्यादी मारू शकणार नाही. योगबलच ढाल आहे. कोणी काही करू सुद्धा शकणार नाही. जर काही फटका बसत असेल तर नक्कीच देह-अभिमान आहे. देही-अभिमानी असणाऱ्याला कोणीही फटका मारू शकत नाही. चूक आपलीच असते. विवेक असे सांगतो - देही-अभिमानीला कोणी काहीही करू शकणार नाही म्हणून देही-अभिमानी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांना संदेश सुद्धा द्यायचा आहे. भगवानुवाच, मनमनाभव. कोणता भगवान? हे देखील तुम्ही मुलांनी समजावून सांगायचे आहे. बस्स, या एकाच गोष्टीमध्ये तुम्हाला विजयी व्हायचे आहे. दुनियेतील सर्व लोकांच्या बुद्धीमध्ये ‘श्रीकृष्ण भगवानुवाच’ आहे. जेव्हा तुम्ही समजावून सांगता तेव्हा म्हणतात - ही गोष्ट तर बरोबर आहे. परंतु जेव्हा तुमच्यासारखे समजतील तेव्हा म्हणतील, बाबा जे शिकवतात ते बरोबर आहे. श्रीकृष्ण थोडेच म्हणेल - ‘मी असा आहे, मला कोणी समजू शकत नाही’. श्रीकृष्णाला तर सर्वांनी जाणून घ्यावे. असेही नाही की श्रीकृष्णाच्या तनाद्वारे भगवान सांगतात. श्रीकृष्ण तर असतोच मुळी सतयुगामध्ये. तिथे भगवान कसे येतील? भगवान तर येतातच पुरुषोत्तम संगमयुगामध्ये. तर तुम्ही मुलांनी जास्तीत-जास्त लोकांकडून लिहून घेत जा. तुमचे असे जाडजूड ओपिनियन बुक छापलेले असले पाहिजे, ज्यामध्ये सर्वांनी आपले मत लिहिलेले असेल. जेव्हा बघतील हे तर इतक्या सर्वांनी लिहिले आहे तर ते पाहून आपण देखील लिहितील. मग तुमच्याकडे खूप जणांचे लिहिलेले मत असेल - गीतेचा भगवान कोण? पुस्तकावर देखील लिहिलेले असावे की बाबाच सर्वश्रेष्ठ आहेत, श्रीकृष्ण काही सर्वश्रेष्ठ नाही. तो म्हणू शकत नाही की, ‘मामेकम् याद करो’. ब्रह्मा पेक्षाही भगवान सर्वश्रेष्ठ आहे ना. मुख्य गोष्टच ही आहे ज्यामध्ये सर्वांचे दिवाळे निघेल.

बाबा काही असे म्हणत नाहीत की इथे बसायचे आहे. नाही, सद्गुरुला आपले बनवून मग आपल्या घरी जाऊन रहा. सुरुवातीला तर तुमची भट्टी होती. शास्त्रांमध्ये देखील भट्टीचा उल्लेख आहे, परंतु भट्टी कशाला म्हटले जाते हे कोणीही जाणत नाहीत. भट्टी असते विटांची. त्यातून काही पक्क्या, काही कच्च्या निघतात. इथे देखील पहा सोने तर नाहीच बाकी दगड-माती आहे. जुन्या वस्तूंचा खूप मान असतो. शिवबाबांचा, देवतांचा सुद्धा मान आहे ना, सतयुगामध्ये तर मानाचा प्रश्नच नाही. तिथे असे थोडेच पुरातन वस्तूंचा शोध घेत बसतील? तिथे पोट भरलेले असते. शोधण्याची गरजच राहत नाही. तुम्हाला उत्खनन करावे लागत नाही, द्वापर नंतर उत्खनन करणे सुरू कराल. घरे बांधताना काही सापडते तर समजतात खाली काहीतरी आहे. सतयुगामध्ये तुम्हाला कसलीच फिकीर नाही. तिथे तर सोनेच-सोने असते. विटाच सोन्याच्या असतात. कल्पापूर्वी जे झाले आहे, जे नोंदलेले आहे त्याचाच साक्षात्कार होतो. आत्म्यांना बोलावले जाते, ते देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. यामध्ये गोंधळून जाण्याचा प्रश्नच नाही. सेकंदा-सेकंदाला पार्ट बजावला जातो, मग गायब होतो. हे शिक्षण आहे. भक्तीमार्गामध्ये तर अनेक चित्रे आहेत. तुमची ही चित्रे सर्व अर्थासहित आहेत. कोणतेही चित्र अर्थाशिवाय नाही. जोपर्यंत तुम्ही कोणाला समजावून सांगत नाही तोपर्यंत कोणाला समजू शकत नाही. समजावून सांगणारे बुद्धीवान नॉलेजफुल एक बाबाच आहेत. आता तुम्हाला ईश्वरीय मत मिळत आहे. ईश्वरीय घराण्यातील किंवा कुळातील तुम्ही आहात. ईश्वर येऊन घराणेच स्थापन करतात. आता काही तुमचे राज्य नाही आहे. राजधानी होती, आता नाही आहे. देवी-देवतांचा धर्मसुद्धा जरूर आहे. सूर्यवंशी-चंद्रवंशी राज्य आहेत ना. गीतेद्वारे ब्राह्मण कुळ सुद्धा बनते, सूर्यवंशी-चंद्रवंशी कुळ सुद्धा बनते. बाकी इतर कोणीही असू शकत नाहीत. तुम्हा मुलांना सृष्टीचा आदि-मध्य-अंत समजला आहे. पूर्वी तर समजत होता - महाप्रलय होतो. नंतर दाखवतात - सागरामध्ये पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण येतो. सर्वात पहिला तर श्रीकृष्णच येतो ना. बाकी सागराची गोष्टच नाही आहे, आता तुम्हा मुलांना खूप चांगले समजू लागले आहे. आनंद देखील त्यांना होईल जे रूहानी अभ्यास चांगल्या प्रकारे करत असतील. जे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात ते पास विथ ऑनर होतात. जर कोणावर मन जडले असेल तर अभ्यासाच्या वेळी सुद्धा त्याचीच आठवण येत राहील. बुद्धी त्याच्याकडे जाईल म्हणून शिक्षण नेहमी ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये घेतले जाते. इथे तुम्हा मुलांना सांगितले जाते - एका बाबांव्यतिरिक्त इतर कुठेही बुद्धी जाता कामा नये. परंतु जाणतात - बऱ्याच जणांना जुन्या दुनियेची आठवण येते. मग इथे बसून सुद्धा ऐकतच नाहीत. भक्तीमार्गामध्ये देखील असेच होते. सत्संगामध्ये बसल्यावरही बुद्धी कुठे-कुठे पळत राहील. ही तर खूप मोठी जबरदस्त परीक्षा आहे. कोणी तर जसे बसलेले असून देखील ऐकत नाहीत. खूप मुलांना तर आनंद होतो. समोर आनंदाने डोलत राहतात. बुद्धी बाबांसोबत असेल तर मग अंत मती सो गती होईल. याकरिता खूप चांगला पुरुषार्थ करायचा आहे. इथे तर तुम्हाला खूप धन मिळते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) विजयमाळेतला मणी बनण्यासाठी खूप चांगला पुरुषार्थ करायचा आहे, खूप गोड बनायचे आहे, श्रीमतावर चालायचे आहे.

२) योगच सुरक्षिततेची ढाल आहे म्हणून योगबल जमा करायचे आहे. देही-अभिमानी बनण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे.

वरदान:-
‘विशेष’ शब्दाच्या स्मृतीद्वारे संपूर्णतेच्या ध्येयाला प्राप्त करणारे स्व परिवर्तक भव

सदैव हे लक्षात रहावे की आम्ही विशेष आत्मा आहोत, विशेष कार्यासाठी निमित्त आहोत आणि विशेषता दाखविणारे आहोत. हा ‘विशेष’ शब्द विशेष लक्षात ठेवा - बोलणे देखील विशेष, बघणे देखील विशेष, करणे देखील विशेष, विचार करणे देखील विशेष… प्रत्येक गोष्टीमध्ये हा ‘विशेष’ शब्द वापरल्याने सहजच स्व-परिवर्तक सो विश्वपरिवर्तक बनाल आणि संपूर्णता प्राप्त करण्याचे जे ध्येय आहे, ते लक्ष्य देखील सहज साध्य होईल.

बोधवाक्य:-
अडचणींना घाबरण्यापेक्षा पेपर समजून त्याला पार करा.

आपल्या शक्तीशाली मन्साद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

आता मनसाची क्वालिटी वाढवा तर क्वालिटीवाले आत्मे जवळ येतील. यामध्ये डबल सेवा आहे - स्वतःची सुद्धा आणि दुसऱ्यांची सुद्धा. स्वतःसाठी वेगळी मेहनत करावी लागणार नाही. प्रारब्ध मिळालेलेच आहे अशा स्थितीचा अनुभव होईल. या वेळेचे श्रेष्ठ प्रारब्ध आहे - “सदैव स्वतः सर्व प्राप्तींनी संपन्न रहाणे आणि सर्वांना संपन्न बनविणे”.