22-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला जे बाबा ऐकवतात तेच ऐका, आसुरी गोष्टी ऐकू नका, बोलू नका, हिअर नो इविल, सी नो इविल”

प्रश्न:-
तुम्हा मुलांना कोणता निश्चय बाबांच्या द्वारेच झाला आहे?

उत्तर:-
बाबा तुम्हाला निश्चय करवतात की, मी तुमचा पिता देखील आहे, टीचर देखील आहे, सद्गुरु देखील आहे, या स्मृतीमध्ये राहण्याचा तुम्ही पुरुषार्थ करा. परंतु माया तुम्हाला हेच विसरायला लावते. अज्ञान काळामध्ये तर मायेचा प्रश्नच नाही.

प्रश्न:-
कोणता चार्ट ठेवण्यामध्ये विशाल-बुद्धी पाहिजे?

उत्तर:-
स्वत:ला आत्मा समजून बाबांची किती वेळ आठवण केली - हा चार्ट ठेवण्यामध्ये मोठी विशाल-बुद्धी पाहिजे. देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करा तेव्हा विकर्म विनाश होतील.

ओम शांती।
स्टुडंटना हे समजले की, टीचर आलेले आहेत. हे तर मुले जाणतात की, ते बाबा देखील आहेत, शिक्षक देखील आहेत आणि सुप्रीम सद्गुरु देखील आहेत. मुलांच्या स्मृतीमध्ये आहे परंतु नंबरवार पुरुषार्थानुसार. कायदा सांगतो - जर एकदा का कळले की हे टीचर आहेत अथवा हे पिता आहेत, गुरु आहेत तर मग कोणीही विसरू शकत नाही. परंतु इथे माया विसरायला लावते. अज्ञान काळामध्ये माया कधी विसरायला लावत नाही. मुलगा कधी विसरू शकत नाही की हे आपले बाबा आहेत, हा त्यांचा व्यवसाय आहे. मुलाला आनंद वाटत असतो की, मी पित्याच्या धनदौलतीचा मालक आहे. भले स्वत: देखील शिकतात परंतु पित्याची प्रॉपर्टी तर मिळते ना. इथे तुम्ही मुले देखील शिकता आणि बाबांची तुम्हाला प्रॉपर्टी सुद्धा मिळते. तुम्ही राजयोग शिकत आहात. बाबांद्वारे निश्चय होतो - आम्ही बाबांचे आहोत, बाबाच सद्गतीचा मार्ग सांगत आहेत म्हणून ते सद्गुरु देखील आहेत. या गोष्टी विसरता कामा नये. जे बाबा ऐकवतात तेच ऐकायचे आहे. हे जे माकडांचे खेळणे दाखवतात - हिअर नो ईविल, सी नो ईविल... ही आहे मनुष्याची गोष्ट. बाबा म्हणतात - आसुरी गोष्टी बोलू नका, ऐकू नका, बघू नका. ‘हियर नो ईविल…’ हे चित्र पूर्वी माकडांचे बनवत होते, आता तर मनुष्याचे बनवतात. तुमच्याकडे नलिनी दीदींचे बनवलेले चित्र आहे. तर तुम्ही बाबांची निंदा करणाऱ्या गोष्टी ऐकू नका. बाबा म्हणतात - माझी किती निंदा करतात. तुम्हाला माहिती आहे - श्रीकृष्णाच्या भक्तासमोर धूप लावतात तर रामाचे भक्त नाक बंद करतात. एकमेकांचा सुगंध देखील चांगला वाटत नाही. आपसामध्ये जसे शत्रू बनतात. आता तुम्ही आहात राम-वंशी. दुनिया सारी आहे रावण-वंशी. इथे धुपाची तर काही गोष्ट नाही. तुम्ही जाणता बाबांना सर्वव्यापी म्हटल्यामुळे काय गति झाली आहे! ठिक्कर-भित्तरमध्ये म्हटल्यामुळे ठिक्कर-बुद्धी झाली आहे. तर बेहदचे बाबा जे तुम्हाला वारसा देतात, त्यांची किती ग्लानी करतात. ज्ञान तर कोणामध्ये नाही आहे. ती ज्ञान रत्न नाहीत, परंतु दगड आहेत. आता तुम्हाला बाबांची आठवण करावी लागेल. बाबा म्हणतात मी जो आहे, जसा आहे, यथार्थ रितीने मला कोणीही जाणत नाहीत. मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत. बाबांची यथार्थ रितीने आठवण करायची आहे. ते देखील इतकी छोटी बिंदी आहेत, त्यांच्यामध्ये हा सर्व पार्ट भरलेला आहे. बाबांना यथार्थ रितीने जाणून आठवण करायची आहे, स्वत:ला आत्मा समजायचे आहे. भले आपण मुले आहोत परंतु असे नाही की, बाबांची आत्मा मोठी आणि आमची छोटी आत्मा आहे. नाही, भले बाबा नॉलेजफूल आहेत परंतु आत्मा काही मोठी असू शकत नाही. तुमच्या आत्म्यामध्ये देखील नॉलेज असते परंतु नंबरवार. स्कूलमध्ये देखील नंबरवार पास होतात ना. कोणाचे झिरो मार्क नसतात. काही ना काही मार्क्स घेतात. बाबा म्हणतात - ‘मी जे तुम्हाला हे ज्ञान ऐकवतो, ते प्राय: लोप होते’. तरी देखील चित्रे आहेत, शास्त्र सुद्धा बनवलेली आहेत. बाबा तुम्हा आत्म्यांना म्हणतात हियर नो ईविल.....या आसुरी दुनियेला काय बघायचे आहे. या छी-छी दुनियेपासून डोळे मिटून घ्यायचे आहेत. आता आत्म्याला स्मृति आली आहे, ही आहे जुनी दुनिया. हिच्याशी कसले कनेक्शन ठेवायचे आहे. आत्म्याला स्मृति आली आहे की, या दुनियेला बघत असताना देखील बघायचे नाही. आपल्या शांतीधाम आणि सुखधामाची आठवण करायची आहे. आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे तर हे लक्षात ठेवायचे आहे. भक्तिमार्गामध्ये देखील पहाटे उठून माळा जपतात. सकाळचा मुहूर्त चांगला समजतात. ब्राह्मणांचा मुहूर्त आहे. ब्रह्मा भोजनाची देखील महिमा आहे. ‘ब्रह्म भोजन’ नाही ‘ब्रह्मा भोजन’. तुम्हाला देखील ‘ब्रह्माकुमारी’ ऐवजी ‘ब्रह्मकुमारी’ म्हणतात, समजत नाहीत. ब्रह्माची मुले तर ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी असतील ना. ‘ब्रह्म’ तर तत्व आहे, राहण्याचे ठिकाण आहे, त्याची कसली महिमा असणार. बाबा मुलांकडे तक्रार करतात - मुलांनो, तुम्ही एकीकडे तर पूजा करता, दुसरीकडे मग सर्वांची ग्लानी करता. ग्लानी करता-करता तमोप्रधान बनला आहात. तमोप्रधान देखील बनायचेच आहे, चक्र रिपीट होईल. जेव्हा कोणी मोठ्या व्यक्ती येतात तर त्यांना चक्रावर जरूर समजावून सांगायचे आहे. हे चक्र ५ हजार वर्षांचेच आहे, यावरती खूप अटेंशन द्यायचे आहे. रात्री नंतर दिवस जरूर होणारच आहे. असे होऊ शकत नाही की रात्री नंतर दिवस होणार नाही. कलियुगाच्या नंतर सतयुग जरूर येणार आहे. हा जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होत आहे.

तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा, आत्माच सर्व काही करते, पार्ट बजावते. हे कोणालाच माहित नाही आहे की, जर आपण पार्टधारी आहोत तर नाटकाच्या आदि-मध्य-अंता विषयी जरूर आपल्याला माहित असले पाहिजे. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होतो तर तो ड्रामाच झाला ना. सेकंद बाय सेकंद तेच रिपीट होणार जे घडून गेले आहे. या गोष्टी दुसरे कोणीही समजू शकणार नाही. मंद बुद्धीवाले नेहमी नापासच होतात तर टिचर तरी काय करू शकणार! टिचरला सांगणार काय की, कृपा करा अथवा आशीर्वाद करा. हे देखील शिक्षण आहे. या गीता पाठशाळेमध्ये स्वतः भगवान राजयोग शिकवतात. कलियुगाला बदलून सतयुग जरूर बनणार आहे. ड्रामा अनुसार बाबांना देखील यायचे आहे. बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प संगमयुगावर येतो’; आणखी कोणी थोडेच म्हणू शकतात की, ‘मी सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवायला आलो आहे’. स्वत:ला शिवोहम् म्हणतात, त्याने काय होणार. शिवबाबा तर येतातच शिकवण्यासाठी, सहज राजयोग शिकविण्याकरिता. कोणत्याही साधू-संत इत्यादींना काही ‘शिव भगवान’ म्हटले जावू शकत नाही. असे तर बरेचजण म्हणतात - ‘मी श्रीकृष्ण आहे, मी लक्ष्मी-नारायण आहे’. आता कुठे तो श्रीकृष्ण सतयुगाचा प्रिन्स, कुठे हे कलियुगी पतित . असे थोडेच म्हणणार की, यांच्यामध्ये भगवान आहेत. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन विचारू शकता - हे तर सतयुगामध्ये राज्य करत होते मग गेले कुठे? सतयुगानंतर जरूर त्रेता, द्वापर, कलियुग झाले. सतयुगामध्ये सूर्यवंशी राज्य होते, त्रेतामध्ये चंद्रवंशी... हे सर्व नॉलेज तुम्हा मुलांच्या बुद्धिमध्ये आहे. इतके ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी आहेत तर जरूर प्रजापिता देखील असेल. मग ब्रह्माद्वारा मनुष्य सृष्टी रचतात. क्रियेटर, ब्रह्माला म्हटले जात नाही. क्रियेटर तर गॉड फादर आहेत. कसे रचतात, ते तर बाबा सन्मुख बसूनच समजावून सांगतात, ही शास्त्रे तर नंतर बनली आहेत. जसे क्राईस्टने जे काही सांगितले, त्याचे बायबल बनले. नंतर बसून गायन करतात (स्तुती करतात). सर्वांचा सद्गती दाता, सर्वांचा लिब्रेटर, पतित-पावन एक बाबाच गायले गेले आहेत, त्यांची आठवण करतात की, हे गॉड फादर दया करा. फादर एक असतो. हे आहेत सार्‍या वर्ल्डचे फादर (साऱ्या विश्वाचे पिता). लोकांना हे माहिती नाही आहे की सर्व दुःखांपासून लिबरेट करणारा कोण आहे? आता सृष्टी देखील जुनी, मनुष्य सुद्धा जुने तमोप्रधान आहेत. हे आहेच आइरन एजेड वर्ल्ड (कलियुगी दुनिया). गोल्डन एज होते ना, पुन्हा होणार जरूर. हा विनाश होईल, वर्ल्ड वॉर (विश्व युद्ध) होईल, अनेक नैसर्गिक आपदा सुद्धा येतात. वेळ तर हीच आहे. मनुष्य सृष्टीमध्ये किती वृद्धी झाली आहे.

तुम्ही तर म्हणत राहता - भगवंत आलेले आहेत. तुम्ही मुले सर्वांना चॅलेंज करता की ब्रह्माद्वारा एक आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. ड्रामानुसार सगळे ऐकत राहतात. दैवी गुण देखील धारण करतात. तुम्ही जाणता आपल्यामध्ये कोणताही गुण नव्हता. एक नंबरचा अवगुण आहे - काम विकार, जो इतका हैराण करतो. मायेशी कुस्ती चालते. इच्छा नसतानाही मायेचे वादळ खाली पाडते. आइरन एज तर आहे ना. काळे तोंड करतात. सावळे तोंड म्हणत नाहीत. श्रीकृष्णासाठी दाखवतात साप डसला म्हणून सावळा झाला. लाज राखण्यासाठी सावळा म्हटले आहे. काळे तोंड दाखवले तर अब्रू जाईल. तर दूरदेश, निराकार देशामधून प्रवासी येतात. आयरन एजेड दुनिया, काळ्या शरीरामध्ये येऊन यांना सुद्धा गोरे बनवतात. आता बाबा म्हणत आहेत - तुम्हाला पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही विष्णूपुरीचे मालक बनाल. या ज्ञानाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बाबा ‘रूप’ सुद्धा आहेत तर ‘बसंत’ सुद्धा आहेत. तेजोमय बिंदू रूप आहेत. त्यांच्यामध्ये ज्ञान देखील आहे. नावा-रूपा पासून न्यारे तर नाही आहेत. त्यांचे रूप कसे आहे ते दुनिया जाणत नाही. बाबा तुम्हाला समजावून सांगत आहेत - ‘मला सुद्धा आत्मा म्हणतात फक्त सुप्रीम आत्मा’. ‘परम-आत्मा’ एकत्र मिळून होते ‘परमात्मा’. पिता देखील आहेत, टीचर सुद्धा आहेत. म्हणतात देखील नॉलेजफूल. ते समजतात नॉलेजफूल अर्थात सर्वांच्या मनातील जाणणारे आहेत. जर परमात्मा सर्वव्यापी आहे तर मग सर्वजण नॉलेजफूल झाले. मग त्या एकाला का म्हणतात? मनुष्यांची किती तुच्छ-बुद्धी आहे. ज्ञानाच्या गोष्टींना अजिबात समजत नाहीत. बाबा ज्ञान आणि भक्तीमधील फरक बसून सांगतात - अगोदर आहे ज्ञान दिवस - सतयुग-त्रेता, नंतर आहे - द्वापर-कलियुग रात्र. ज्ञानाने सद्गती होते. हे राजयोगाचे ज्ञान हठयोगी समजावून सांगू शकणार नाहीत. ना गृहस्थी समजावून सांगू शकणार कारण अपवित्र आहेत. आता राजयोग कोण शिकवणार? जे म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील. निवृत्ती मार्गाचा धर्मच वेगळा आहे, ते प्रवृत्ती मार्गाचे ज्ञान कसे ऐकवणार. इथे सर्वजण म्हणतात - गॉड फादर इज ट्रुथ. बाबाच सत्य ऐकवणारे आहेत. आत्म्याला बाबांची स्मृती आली आहे म्हणून आम्ही बाबांची आठवण करतो की, येऊन नरापासून नारायण बनण्याची सत्य कथा ऐकवा. ही तुम्हाला सत्यनारायणाची कथा ऐकवतो ना. या अगोदर तुम्ही खोट्या कथा ऐकत होता. आता तुम्ही खरी ऐकता. खोट्या कथा ऐकून-ऐकून कोणी नारायण तर बनू शकणार नाही मग ती सत्य नारायणाची कथा कशी होऊ शकते? मनुष्य कोणाला नरापासून नारायण बनवू शकणार नाही. बाबाच येऊन स्वर्गाचे मालक बनवतात. बाबा येतात देखील भारतामध्येच. परंतु ते केव्हा येतात, हे मात्र समजत नाहीत. शिव-शंकराला एकत्र करून कहाण्या रचल्या आहेत. शिव पुराण सुद्धा आहे. म्हणतात गीता श्रीकृष्णाची आहे, मग तर शिव पुराण मोठे झाले. वास्तविक नॉलेज तर गीतेमध्ये आहे. भगवानुवाच - मनमनाभव. ही अक्षरे गीतेशिवाय दुसऱ्या कोणत्याही शास्त्रांमध्ये असू शकत नाहीत. गायले देखील जाते सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता. श्रेष्ठ मत आहेच भगवंताचे. सर्व प्रथम हे सांगितले पाहिजे की, आम्ही म्हणतो थोड्याच वर्षांमध्ये नवीन श्रेष्ठाचारी दुनिया स्थापन होईल. आता आहे भ्रष्टाचारी दुनिया. श्रेष्ठाचारी दुनियेमध्ये फार थोडे मनुष्य असणार. आता तर किती खंडीभर मनुष्य आहेत. त्यासाठी विनाश समोर उभा आहे. बाबा राजयोग शिकवत आहेत. वारसा बाबांकडून मिळतो. मागतात देखील बाबांकडे. कोणाकडे धन जास्ती असेल, मुलगा होईल, म्हणतील भगवंताने दिला. तर भगवान एक झाले ना मग सर्वांमध्ये भगवान कसे असू शकतात? आता आत्म्यांना बाबा म्हणतात - माझी आठवण करा. आत्मा म्हणते - आम्हाला परमात्म्याने ज्ञान दिले आहे जे आम्ही मग भावंडांना देतो. स्वतःला आत्मा समजून बाबांची किती वेळ आठवण केली, हा चार्ट ठेवण्यासाठी मोठी विशाल-बुद्धी पाहिजे. देही-अभिमानी होऊन बाबांची आठवण करावी लागेल तेव्हा विकर्म विनाश होतील. नॉलेज तर खूप सोपे आहे, बाकी आत्मा समजून बाबांची आठवण करत स्वतःची उन्नती करायची आहे. असा चार्ट कोणी विरळेच ठेवतात. देही-अभिमानी होऊन बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने कधी कोणाला दुःख देणार नाहीत. बाबा येतातच सुख देण्यासाठी तर मुलांनी सुद्धा सर्वांना सुख द्यायचे आहे. कधीही कोणाला दुःख द्यायचे नाही. बाबांची आठवण केल्याने सर्व भुते पळून जातील, खूप गुप्त मेहनत आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या आसुरी छी-छी दुनियेपासून (विकारी दुनियेपासून) आपले डोळे बंद करायचे आहेत. ही जुनी दुनिया आहे, याच्याशी काहीही कनेक्शन ठेवायचे नाही, याला बघत असताना सुद्धा बघायचे नाही.

२) या बेहद ड्रामामध्ये आपण पार्टधारी आहोत, हा सेकंद बाय सेकंद रिपीट होत राहतो, जे पास्ट झाले ते परत रिपीट होणार… हे स्मृतीमध्ये ठेऊन प्रत्येक गोष्टीमध्ये पास व्हायचे आहे. विशाल-बुद्धी बनायचे आहे.

वरदान:-
रियल्टी द्वारे रॉयल्टीचे प्रत्यक्ष रूप दाखवणारे साक्षात्कार मूर्त भव आता अशी वेळ येईल जेव्हा प्रत्येक आत्मा प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्या रियल्टीद्वारे रॉयल्टीचा साक्षात्कार घडवेल. प्रत्यक्षतेच्या वेळी माळेच्या मण्याचा नंबर आणि भविष्य राज्याचे स्वरूप दोन्हीही प्रत्यक्ष होतील. आता जो रेस करता-करता (स्पर्धा करता-करता) थोड्याशा इर्षेच्या धुळीचा पडदा चमकणाऱ्या हिऱ्यांना लपवून टाकतो, शेवटी हा पडदा दूर होईल आणि मग लपलेले हिरे आपल्या प्रत्यक्ष संपन्न स्वरूपामध्ये येतील, रॉयल फॅमिली आतापासून आपली रॉयल्टी दाखवेल अर्थात आपल्या भविष्य पदाला स्पष्ट करेल त्यामुळे रियल्टीद्वारे रॉयल्टीचा साक्षात्कार करवा.

बोधवाक्य:-
कोणत्याही विधीने व्यर्थला समाप्त करून समर्थला इमर्ज करा.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- स्वतःचे कल्याण करण्यासाठी अथवा स्वतःचे परिवर्तन करण्यासाठी विशेष एकांतवासी, अंतर्मुखी बना. नॉलेजफुल आहात परंतु पॉवरफुल बना. प्रत्येक गोष्टीच्या अनुभवामध्ये स्वतःला संपन्न बनवा. कोणाचा मुलगा आहे? काय प्राप्ती आहे? या पहिल्या धड्याचे अनुभवी मूर्त बना, एकता आणि एकाग्रतेला धारण करा तर सहजच मायाजीत बनाल.