22-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला नशा पाहिजे की आपले पारलौकिक पिता वंडर ऑफ दी वर्ल्ड (स्वर्ग) बनवितात, ज्याचे आपण मालक बनतो”

प्रश्न:-
बाबांच्या संगाद्वारे तुम्हाला कोण-कोणत्या प्राप्ती होतात?

उत्तर:-
बाबांच्या संगाद्वारे आम्ही मुक्ती, जीवन-मुक्तीचे अधिकारी बनतो. बाबांचा संग तारून नेतो (पार घेऊन जातो). बाबा आम्हाला त्यांचे बनवून आस्तिक आणि त्रिकालदर्शी बनवितात. आपण रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणतो.

गीत:-
धीरज धर मनुआ…

ओम शांती।
हे कोण म्हणत आहेत? मुलांना बाबाच म्हणतात, सर्व मुलांना म्हणावे लागते कारण सर्व दुःखी आहेत, हताश झाले आहेत. बाबांची आठवण करतात की येऊन दुःखातून लिबरेट करा, सुखाचा रस्ता सांगा. आता मनुष्यांना त्यामधूनही खास भारतवासीयांना हे लक्षात नाही आहे की आपण भारतवासी अतिशय सुखी होतो. भारत एक अति प्राचीन अद्भुत भूमी होती. वंडर ऑफ द वर्ल्ड (जगातील आश्चर्य) म्हणतात ना. इथे मायेच्या राज्यामध्ये ७ वंडर्स गायले जातात. ते आहेत स्थूल वंडर्स. बाबा समजावून सांगत आहेत - ही आहेत मायेची वंडर्स, ज्यामध्ये दुःख आहे. राम, बाबांचे वंडर आहे - स्वर्ग. तोच वंडर ऑफ वर्ल्ड आहे. भारत स्वर्ग होता हिऱ्याप्रमाणे होता. तिथे देवी-देवतांचे राज्य होते. हे भारतवासी सर्व विसरले आहेत. भले देवतांपुढे माथा टेकवतात, पूजा करतात परंतु ज्यांची पूजा करतात, त्यांच्या बायोग्राफीला जाणून घेतले पाहिजे ना. हे बेहदचे बाबा बसून समजावून सांगतात, इथे तुम्ही आले आहात पारलौकिक बाबांपाशी. पारलौकिक बाबा आहेत स्वर्ग स्थापन करणारे; हे कार्य कोणी मनुष्य करू शकत नाही. यांना (ब्रह्माला) देखील बाबा म्हणतात - ‘हे श्रीकृष्णाची आत्मा तू तुझ्या जन्मांना जाणत नाहीस. तू जेव्हा श्रीकृष्ण होतास तेव्हा सतोप्रधान होतास मग ८४ जन्म घेत आता तू तमोप्रधान बनला आहेस, तुझी वेगवेगळी नावे आहेत. आता तुझे नाव ब्रह्मा ठेवले आहे. ब्रह्मा सो विष्णू अथवा श्रीकृष्ण बनशील’. गोष्ट एकच आहे - ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. ब्रह्मा मूख वंशावली ब्राह्मण सो मग देवता बनतात. मग तेच देवी-देवता पुन्हा शूद्र बनतात. आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात. आता बाबा बसून तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत, हे आहे भगवानुवाच. तुम्ही तर झालात विद्यार्थी. तर तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. परंतु तेवढा आनंद टिकत नाही. श्रीमंत लोक पैशाच्या नशेमध्ये खूप आनंदी असतात ना. इथे भगवंताची मुले बनला आहात तरी देखील इतके आनंदामध्ये राहत नाही. समजत नाहीत, पत्थर-बुद्धी आहेत ना. भाग्यामध्ये नाही त्यामुळे ज्ञानाची धारणा करू शकत नाहीत. आता तुम्हाला बाबा मंदिर लायक बनवत आहेत. परंतु मायेचा संग देखील काही कमी नाहीये. गायले गेले आहे - ‘संग तारे, कुसंग बोरे’. बाबांचा संग तुम्हाला मुक्ती-जीवनमुक्तीमध्ये घेऊन जातो आणि रावणाचा कुसंग तुम्हाला दुर्गतीमध्ये घेऊन जातो. ५ विकाराचा संग मिळतो ना. भक्तीमध्ये ‘सत्संग’ असे नाव बोलतात परंतु शिडी तर खालीच उतरत राहतात, शिडी वरून कोणाला धक्का दिला तर जरूर खालीच पडेल ना! सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. कोणीही असेल भगवंतासाठी इशारा तर वरच्या दिशेनेच करतील. आता मुलांना बाबांशिवाय परिचय कोण देणार? बाबाच मुलांना आपला परिचय देतात. त्यांना आपले बनवून सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. बाबा म्हणतात - मी येऊन तुम्हाला आस्तिक देखील बनवतो, त्रिकालदर्शी सुद्धा बनवतो. हा ड्रामा आहे, हे साधु-संत इत्यादी कोणीही जाणत नाहीत. ते (दुनियेतील) असतात हदचे ड्रामा, हा आहे बेहदचा. या बेहदच्या ड्रामामध्ये आपण सुख देखील खूप पाहतो तर दुःख देखील खूप पाहतो. या ड्रामामध्ये कृष्ण आणि ख्रिश्चन यांचा देखील कसा हिसाब-किताब आहे. त्यांनी भारतामध्ये आपसामध्ये भांडणे लावून राज्य घेतले. आता तुम्ही काही भांडत नाही. ते आपसामध्ये भांडतात आणि राज्य मात्र तुम्हाला मिळते. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. या गोष्टी कोणीही जाणत नाहीत. दान देणारे ज्ञानाचे सागर एक बाबाच आहेत, जे सर्वांची सद्गती करतात. भारतामध्ये देवी-देवतांचे राज्य होते तर सद्गती होती. बाकी सर्व आत्मे मुक्तिधाममध्ये होते. भारत सोन्याचा होता. तुम्हीच राज्य करत होते. सतयुगामध्ये सूर्यवंशी राज्य होते. आता तुम्ही सत्यनारायणाची कथा ऐकता. नरापासून नारायण बनण्याची ही कथा आहे. हे देखील मोठ्या अक्षरांमध्ये लिहा - खऱ्या गीतेद्वारे भारत सचखंड, वर्थ पाउंड (मौल्यवान) बनतो. बाबा येऊन खरी गीता ऐकवतात. सहज राजयोग शिकवतात तर तुम्ही वर्थ पाउंड बनता. बाबा टोटके (युक्त्या) तर खूप सांगतात, परंतु मुले देह-अभिमानामुळे विसरून जातात, देही-अभिमानी बनाल तर धारणा देखील होईल. देह-अभिमानामुळे धारणा होत नाही.

बाबा समजावून सांगत आहेत की, “मी थोडेच असे म्हणतो की मी सर्वव्यापी आहे. मला तर म्हणता देखील - ‘तुम मात-पिता…’ तर याचा अर्थ काय आहे? ‘तुम्हरी कृपा से सुख घनेरे’. आता तर दुःख आहे. हे गायन कोणत्या काळातील आहे - हे देखील समजत नाहीत”. जसे पक्षी चिव-चिव करत राहतात, अर्थ काहीच नाही. तसे हे देखील चिव-चिव करत राहतात, अर्थ काहीच नाही. बाबा बसून समजावून सांगतात, म्हणतात - हे सर्व आहेत अनराइटियस (असत्य). असत्य कोणी बनवले आहे? रावणाने. भारत सचखंड होता तर सगळे खरे बोलत होते, चोरी, ठगी इत्यादी काहीच नव्हते. इथे किती चोरी इत्यादी करतात. दुनियेमध्ये तर ठगीच ठगी आहे. यालाच म्हटले जाते - पापाची दुनिया, दुःखाची दुनिया. सतयुगाला म्हटले जाते सुखाची दुनिया. हे आहे विकारी वेश्यालय, सतयुग आहे शिवालय. बाबा बसून किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. नाव देखील किती सुंदर आहे - ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व-विद्यालय. आता बाबा येऊन बुद्धिवान बनवितात. म्हणतात - या विकारांना जिंका म्हणजे तुम्ही जगतजीत बनाल. हा कामविकारच महाशत्रू आहे. मुले बोलावतात देखील यासाठी की येऊन आम्हाला गॉड-गॉडेज (देवी-देवता) बनवा.

बाबांची यथार्थ महिमा तुम्ही मुलेच जाणता. मनुष्य तर ना बाबांना जाणत, ना बाबांच्या महिमेला जाणत. तुम्ही जाणता ते प्रेमाचे सागर आहेत. बाबा तुम्हा मुलांना इतके ज्ञान सांगतात, हेच त्यांचे प्रेम आहे. टीचर जेव्हा स्टुडंटला शिकवतात तर स्टुडंट शिकून कोणा पासून कोण बनतात. तुम्हा मुलांना देखील बाबांप्रमाणे प्रेमाचा सागर बनायचे आहे, कोणालाही प्रेमाने समजावून सांगायचे आहे. बाबा म्हणतात - तुम्ही देखील एकमेकांवर प्रेम करा. नंबर वन प्रेम आहे - बाबांचा परिचय द्या. तुम्ही गुप्त दान करता. एकमेकांबद्दल द्वेष सुद्धा वाटता कामा नये. नाहीतर तुम्हाला देखील दांडके खावे लागतील. कोणाचा अपमान कराल तर दांडके खाल. कधीही कोणाविषयी तिरस्कार बाळगू नका, अपमान करू नका. देह-अभिमानामध्ये आल्यानेच पतित बनले आहात. बाबा देही-अभिमानी बनवितात तर तुम्ही पावन बनता. सर्वांना हेच समजावून सांगा की, आता ८४ चे चक्र पूर्ण झाले आहे. जे सूर्यवंशी महाराजा-महाराणी होते तेच मग ८४ जन्म घेत उतरत-उतरत आता जमिनीवर येऊन पडले आहेत. आता बाबा पुन्हा महाराजा-महाराणी बनवत आहेत. बाबा फक्त एवढेच म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पावन बनाल’. तुम्हा मुलांनी तर दयाळू बनून दिवसभर सेवेचे विचार केले पाहिजेत. बाबा डायरेक्शन देत राहतात - गोड मुलांनो, दयाळू बनून जे बिचारे दुःखी आत्मे आहेत, त्या दुःखी आत्म्यांना सुखी बनवा. त्यांना खूप शॉर्टमध्ये पत्र लिहिले पाहिजे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा’. एका शिवबाबांचीच महिमा आहे. लोकांना बाबांच्या महिमे विषयी देखील माहीत नाही आहे. हिंदीमध्ये सुद्धा चिठ्ठी लिहू शकता. सेवा करण्यासाठी देखील मुलांमध्ये धाडस पाहिजे. असे बरेच आहेत जे आप-घात (आत्महत्या) करण्यासाठी तयार असतात, त्यांना देखील तुम्ही समजावून सांगू शकता की, जीव-घात महापाप आहे. आता तुम्हा मुलांना श्रीमत देणारे आहेत - शिवबाबा. ते आहेत - श्री श्री शिवबाबा. तुम्हाला श्री लक्ष्मी, श्री नारायण बनवितात. ‘श्री श्री’ तर ते एकच आहेत. ते कधी फेऱ्यामध्ये येत नाहीत. बाकी तुम्हाला ‘श्री’ची उपाधी मिळते. आजकाल तर सगळ्यांनाच ‘श्री’ची उपाधी देत राहतात. कुठे ते निर्विकारी, कुठे हे विकारी - रात्रं-दिवसाचा फरक आहे. बाबा दररोज समजावून सांगत राहतात - एक तर देही-अभिमानी बना आणि सर्वांना संदेश पोहोचवा. तुम्ही देखील पैगंबराची मुले आहात. सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत. बाकी धर्म स्थापकाला गुरु थोडेच म्हणता येईल. सद्गती करणारे आहेतच मुळी एक. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणाचाही द्वेष किंवा तिरस्कार करायचा नाही. दयाळू बनून दुःखी आत्म्यांना सुखी बनविण्याची सेवा करायची आहे. बाप समान मास्टर प्रेमाचा सागर बनायचे आहे.

२) “आपण भगवंताची मुले आहोत” या नशेमध्ये किंवा खुशीमध्ये रहायचे आहे. कधी मायेच्या उलट्या संगतीमध्ये जायचे नाही. देही-अभिमानी बनून ज्ञानाची धारणा करायची आहे.

वरदान:-
बाप समान वरदानी बनून प्रत्येकाच्या हृदयाला आराम देणारे मास्टर दिलाराम भव

जे बाप समान वरदानी मूर्त मुले आहेत ते कधी कोणाच्या कमजोरीला बघणार नाहीत, ते सर्वांप्रती दयाळू असतात. ज्याप्रमाणे बाबा कोणाची कमजोरी मनामध्ये ठेवत नाहीत तसे वरदानी मुले देखील कोणाची कमजोरी मनामध्ये धारण करत नाहीत, ते प्रत्येकाच्या हृदयाला आराम देणारे मास्टर दिलाराम असतात त्यामुळे साथी असोत किंवा प्रजा सर्वजण त्यांचे गुणगान करतात. सर्वांच्या अंतःकरणापासून हाच आशीर्वाद निघतो की, हे आमचे सदैव स्नेही, सहयोगी आहेत.

स्लोगन:-
संगम युगावर श्रेष्ठ आत्मा ती आहे जी सदैव बेफिक्र बादशहा (निश्चिंत बादशहा) आहे.

मातेश्वरींजींची अनमोल महावाक्ये -

“ज्ञानी तू आत्मा मुलांची चूक झाल्याने १०० पटीने दंड’’

१) या अविनाशी ज्ञान यज्ञामध्ये आलेले साक्षात् परमात्म्याचा हात हातामध्ये घेऊन कारणे-अकारणे जर त्यांच्याकडून विकर्म होते तर त्याची सजा खूप मोठी आहे. जसे ज्ञान घेतल्याने त्याचा १०० पटीने फायदा आहे, तसे ज्ञान घेऊन कोणती चूक होते तर मग १०० पटीने दंड देखील आहे म्हणून खूप खबरदारी ठेवायची आहे. चूक करत रहाल तर कमजोर होत रहाल त्यामुळे छोट्या-मोठ्या चुका लक्षात घेत रहा, इथून पुढच्यासाठी परीक्षण करत चाला. आता बघा, जसे हुशार मोठी व्यक्ती वाईट काम करते तर तिच्यासाठी खूप मोठी सजा असते आणि अधोगती झालेली व्यक्ती जर असेल आणि ती काही वाईट काम करत असेल तर तिच्यासाठी मात्र इतकी सजा नसते. आता तुम्ही देखील परमात्म्याची मुले म्हणून ओळखले जाता तर तेवढेच तुम्हाला दैवी गुण धारण करायचे आहेत, सच्च्या बाबांकडे आला आहात तर सच्चे होऊन रहायचे आहे.

२) लोक म्हणतात परमात्मा जानी-जाननहार आहेत, आता जानी-जाननहारचा अर्थ असा नाही की, सर्वांच्या अंतर्मनाला जाणतात. परंतु सृष्टी रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणणारे आहेत. बाकी असे नाही की, परमात्मा रचता पालन कर्ता आणि संहार कर्ता आहेत तर याचा अर्थ हा आहे की परमात्मा जन्म देतात, खाऊ घालतात आणि मारतात; परंतु असे काही नाही आहे. मनुष्य आपल्या कर्मांच्या हिशोबानुसार जन्म घेतात, याचा अर्थ हा नाही की परमात्मा बसून त्यांच्या वाईट संकल्पांना आणि चांगल्या संकल्पांना ओळखतील. ते तर अज्ञानींच्या मनामध्ये काय चालत असेल ते जाणतात? पूर्ण दिवसभर मायावी संकल्प चालत असतील आणि ज्ञानीमध्ये शुद्ध संकल्प चालत असतील, परंतु एक-एक संकल्पाला थोडेच वाचत बसतील? बाकी परमात्मा जाणतात, आता तर सर्वांची आत्मा दुर्गतीला पोहोचलेली आहे, त्यांची सद्गती कशी होणार आहे, याची सर्व माहिती जानी-जाननहारला आहे. आता मनुष्य जे कर्मभ्रष्ट बनले आहेत, त्यांच्याकडून श्रेष्ठ कर्म करवून घेणे, शिकविणे आणि त्यांना कर्म बंधनापासून सोडविणे, हे परमात्मा जाणतात. परमात्मा म्हणतात - ‘माझे रचताचे आणि माझ्या रचनेच्या आदि-मध्य-अंताचे संपूर्ण नॉलेज त्याला मी जाणतो, तो परिचय तर तुम्हा मुलांना देत आहे. आता तुम्हा मुलांना त्या बाबांच्या निरंतर आठवणीमध्ये रहायचे आहे तेव्हाच सर्व पापांमधून मुक्त व्हाल अर्थात अमरलोकमध्ये जाल, आता हे जाणणे यालाच जानी-जाननहार म्हणतात. अच्छा. ओम् शांती.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

कधीही सभ्यतेला सोडून सत्यतेला सिद्ध करायचे नाही. सत्यतेची निशाणी आहे निर्मानता. ही निर्मानता निर्माण करण्याचे कार्य सहजच करते. जोपर्यंत निर्मान बनत नाहीत तोपर्यंत निर्माण करू शकत नाही. ज्ञानाची शक्ती शांती आणि प्रेम आहे. अज्ञानाची शक्ती क्रोधाला खूप चांगल्या रीतीने संस्कार बनवला आहे आणि युज देखील करता मग माफी देखील मागत राहता. असे आता प्रत्येक गुणाला, प्रत्येक ज्ञानाच्या गोष्टीला संस्कार रूपामध्ये बनवा तर सभ्यता येत जाईल.