22-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - चॅरिटी बिगिन्स ॲट होम अर्थात जे देवी-देवता धर्माचे आहेत, ‘शिव’चे अथवा देवतांचे पुजारी आहेत, त्यांना सर्वात आधी ज्ञान द्या”

प्रश्न:-
बाबांचे कोणते कर्तव्य कोणताही मनुष्य करू शकत नाही आणि का?

उत्तर:-
संपूर्ण विश्वामध्ये शांती स्थापन करण्याचे कर्तव्य एका बाबांचेच आहे. मनुष्य, विश्वामध्ये शांती स्थापन करू शकत नाहीत कारण सर्व विकारी आहेत. शांतीची स्थापना तेव्हाच होईल जेव्हा बाबांना जाणतील आणि पवित्र बनतील. बाबांना न जाणल्या कारणाने निधनके (अनाथ) बनले आहेत.

गीत:-
मरना तेरी गली में…

ओम शांती।
‘ओम् शांती’चा अर्थ देखील वेळोवेळी सांगावा लागतो कारण ‘ओम् शांती’चा अर्थ कोणालाही माहित नाही. जसे वारंवार सांगावे लागते - मनमनाभव अर्थात बेहदच्या बाबांची आठवण करा. दुनियावाले ‘ओम्’चा अर्थ सांगतात - ‘ओम्’ म्हणजेच भगवान. बाबा म्हणतात - ‘ओम्’ अर्थात मी आत्मा, हे माझे शरीर. परमपिता परमात्मा देखील म्हणतात - ‘ओम्’. मी देखील आत्मा आहे, परमधाममध्ये राहणारा आहे. तुम्ही आत्मे जन्म-मरणाच्या फेऱ्यामध्ये येता, मी येत नाही. हो, तुम्हा मुलांना सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे सार समजावून सांगण्याकरिता मी साकारमध्ये जरूर येतो. इतर कोणीही हे समजावून सांगू शकत नाही. जर निश्चय नसेल तर संपूर्ण दुनियेमध्ये भटकत राहिले पाहिजे, शोध घेतला पाहिजे की, असे आणखी कोणी आहे का की, जो स्वतःचे आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज देईल. परमपिता परमात्म्याशिवाय सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य कोणीही सांगू शकणार नाही, कोणीही राजयोग शिकवू शकणार नाही. पतितांना पावन बनवू शकणार नाही. सर्वात पहिले जे पण देवी-देवतांचे पुजारी आहेत, त्यांना समजावून सांगण्याचा पुरुषार्थ करा. आदि सनातन देवी-देवता धर्माच्या लोकांनीच पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत, तेच चांगल्या प्रकारे समजू शकतील. त्यांच्या नंतर येणारे ८४ जन्म घेऊ शकणार नाहीत. हे ऐकतील देखील तेच जे देवतांचे पुजारी असतील आणि जे गीता वाचणारे असतील. गीतेमध्ये फक्त हीच एक चूक केली आहे की, भगवंताच्या नावा ऐवजी श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. तर गीता वाचणाऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे. विचारले पाहिजे - ‘परमपिता परमात्मा शिव यांच्याशी तुमचे काय नाते आहे? त्यांना भगवान म्हणतील. श्रीकृष्ण तर दैवी गुण असणारे आहेत, त्यांची दैवी राजधानी होती तिथे सर्व दैवी गुणवाले होते. आता तेच पूज्य पासून पुजारी बनले आहेत. तर प्रयत्न करून सर्वात पहिले आदि सनातन देवी-देवता धर्मियांना जागृत केले पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. जे शिवाचे पुजारी असतील त्यांना देखील समजावून सांगावे लागेल. शिव येतात जरूर, म्हणूनच त्यांची जयंती साजरी करतात, ते परमपिता परमात्मा आहेत. जरूर येऊन राजयोग शिकवत असणार इतर कोणताही मनुष्यमात्र शिकवू शकत नाही. श्रीकृष्णाला अथवा ब्रह्माला भगवान म्हटले जाऊ शकत नाही. कारण की, सर्वांचे सद्गती दाता बाबा एकच आहेत, ते ज्ञानाचा सागर असल्यामुळे सर्वांचे शिक्षक देखील आहेत. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताची हिस्ट्री-जिओग्राफी दुसरा कोणीही जाणत नाही.

बाबा म्हणतात - मला ज्ञानाचा सागर, चैतन्य बीजरूप देखील म्हणतात. हे जे उलटे झाड आहे, त्याच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान त्या बीजाकडेच असेल, म्हणून मला ज्ञानाचा सागर, ऑलमाइटी ऑथॉरिटी म्हणतात. ऑथॉरिटी कोणती आहे? सर्व वेद, शास्त्रे, ग्रंथ इत्यादी सर्वांना जाणतात. तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत. ते शास्त्र ऐकविणारे म्हणतात की, कल्पाचे आयुष्य लाखो वर्षांचे आहे. परंतु असे तर असू शकत नाही. हे व्हरायटी धर्मांचे मनुष्यसृष्टी रूपी झाड आहे, त्याचे आयुष्य भागवता मध्ये प्रदीर्घ लिहून ठेवले आहे. आता भागवत काही धर्मशास्त्र नाहीये. गीता धर्मशास्त्र आहे, त्याच्या द्वारे देवी-देवता धर्म स्थापन झाला. बाकी भागवत, महाभारत इत्यादींमधून कोणताही धर्म स्थापन होत नाही. त्यामध्ये तर श्रीकृष्णाचा इतिहास लिहिला आहे. बाबा समजावून सांगतात - मुलांनो, तुम्ही देवी-देवता धर्मियांना समजावून सांगा की, तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत. सतयुगामध्ये केवळ भारतच होता इतर कोणताही धर्म नव्हता. भारतच स्वर्ग होता. भारतच सर्व श्रेष्ठ म्हणून गायला जातो आणि शिवाय परमपिता परमात्मा शिव यांचे जन्मस्थान आहे, जे येऊन पतितांना पावन बनवतात. शिवाची पूजा देखील इथेच होते, जयंती देखील इथेच साजरी केली जाते. जरूर पतित दुनियेमध्येच आले असतील. सर्वजण बोलावतात देखील - पतित-पावन या. भारत पावन होता. तर मग ८४ जन्मांचे चक्र फिरले आहेत. जे पावन स्वर्गवासी होते, तेच आता नरकवासी, पतित बनले आहेत. पावन बनवले आहे - शिवबाबांनी, पतित बनवले आहे - रावणाने. यावेळी आहेच रावणाचे राज्य. प्रत्येक नर-नारीमध्ये ५ विकार आहेत. सतयुगामध्ये विकार नव्हतेच मुळी. निर्विकारी होते. आता पतित आहेत तेव्हाच तर बोलावतात - ‘या, येऊन आम्हाला पुन्हा पावन बनवा’. सतयुगामध्ये आम्ही सो पावन होतो, २१ जन्म राम-राज्यामध्ये होतो. आता तर आहे रावण राज्य, सर्व विकारी आहेत. बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे. हे सर्व विकार आदि-मध्य-अंत दुःख देतात. आता यांच्यावर विजय मिळवून पावन बना. तुम्ही जन्म-जन्मांतर पापे केली आहेत. सर्वात तमोप्रधान बनला आहात, आत्म्यामध्ये भेसळ पडत गेली. आधी तर गोल्डन एज्ड होता, मग सिल्वर एज्ड, मग कॉपर... भेसळ पडत-पडत शिडी उतरत आलात. भारताचीच गोष्ट आहे. सतयुगामध्ये ८ जन्म, मग त्रेतायुगामध्ये १२ जन्म, आणि मग तेच चंद्रवंशी भारतवासी, वैश्य वंशी... बनतात. आत्मा अपवित्र बनते.

बाबा म्हणतात, मी येऊन कल्प-कल्प भारताला स्वर्ग बनवतो, आणि पुन्हा मग रावण नरक बनवतो, हा ड्रामा बनलेला आहे. आता बाबा समजावून सांगतात, ज्ञान-सागर तर शिवबाबा आहेत ना. उच्च ते उच्च शिवबाबा सर्वांचे पूज्य आहेत. सर्वप्रथम तर त्यांचीच पूजा करणे सुरु होते. ते आहेत बेहदचे बाबा. जरूर त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो. भारतवासी विसरले आहेत, भगवान एका निराकारालाच म्हटले जाते. त्यांची मनुष्य आठवणही करतात. असे नाही की सर्व भगवानच भगवान आहेत. एका बाजूला भगवंताची आठवण देखील करतात आणि मग निंदा देखील करतात. एका बाजूला म्हणतात - सर्वव्यापी आहेत, आणि पुन्हा मग म्हणतात - पतित-पावन या. बाबा येऊन ब्रह्मा तनाद्वारे ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मणांनाच समजावून सांगतात. आता तुम्ही ब्राह्मण शिखा (उच्च) आहात. ब्राह्मणांच्या वर आहेत शिव. विराट रूपामध्ये देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र दाखवतात. ब्राह्मणांचे नावच नाही; कारण बघतात की, ब्राह्मण तर विकारी आहेत, मग त्यांना देवतांपेक्षा उत्तम कसे म्हणायचे. बाबा समजावून सांगत आहेत की, ते देखील गातात - ‘ब्राह्मण देवी-देवताय नमः’. ॲक्युरेट कोणालाच माहीत नाही की, यांचे राज्य केव्हा होते? स्वर्ग कुठून आला? आता तुम्ही समजता बाबा येऊन ब्रह्मा द्वारे स्वर्गाची स्थापना करत आहेत, शंकराद्वारे नरकाचा विनाश करवून घेतात. महाभारताची लढाई देखील लागली होती ना, ज्यातून स्वर्गाचे द्वार उघडले होते. गातात परंतु काहीच समजत नाहीत. हे देखील दाखवतात की, या रुद्र ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाला प्रज्वलित झाली. बरोबर आता तोच पार्ट चालू आहे. ५ हजार वर्षांपूर्वी देखील लढाई लागली होती तेव्हा पतित दुनियेचा विनाश झाला होता. गीतेचे ज्ञान जेव्हा ऐकवतात तेव्हा म्हणतात की, ३ सेना होत्या - युरोपवासी यादव सेना ज्यांनी विज्ञानाने मूसळ (मिसाईल्स) चा शोध लावला. गीतेला पूर्ण ५ हजार वर्षे झाली. बाबा समजावून सांगत आहेत की, या ३ सेना आजही आहेत. गायले गेले आहे - ‘विनाश काले विपरीत बुद्धी अर्थात परमपिता परमात्म्याशी विपरीत बुद्धी आहे’. जाणत नाहीत, तुमच्याशिवाय इतर कोणाचीही प्रीती नाहीये. सर्वांची विनाश काले विपरीत बुद्धी आहे. बाकी तुम्हा पांडवांची आहे प्रीत-बुद्धी. तुम्ही शिवबाबांचीच आठवण करता. तुम्ही जाणता - शिवबाबा आम्हाला २१ जन्मांचा वारसा देण्यासाठी आले आहेत. तुमची प्रीत बुद्धी आहे शिवबाबांसोबत. बाकीचे तर कोणीही बाबांना जाणतच नाहीत, तर ३ सेना झाल्या ना. तुम्ही आहात पांडव सेना. विनाश काळ तर आहेच. तुम्ही जाणता मृत्यू समोर उभा आहे. शिवबाबा म्हणतात - तुम्ही पवित्र बनाल तर नवीन दुनियेचे मालक बनाल. सतयुगामध्ये एकच देवी-देवता धर्म होता दुसरा कोणताही धर्म नव्हता. आता बाकीचे सर्व धर्म आहेत, एक आदि सनातन देवी-देवता धर्म नाहीये. स्वतःला देवी-देवता समजतच नाहीत. म्हणतात की, आम्ही तर पतित आहोत. देवतांच्या समोर महिमा गातात - तुम्ही सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण आहात. स्वतःला म्हणतात की, आम्ही विकारी आहोत. ‘मैं निर्गुण हारे में कोई गुण नाही’. बाबांची आठवण करतात. तुम्हाला देखील एका बाबांची आठवण करायची आहे. बाबांची आठवण केल्या शिवाय तुम्ही पावन बनणार नाही आणि उच्च पदही मिळणार नाही. अपवित्र दुनियेचा जेव्हा विनाश होईल तेव्हाच दुनियेमध्ये शांती प्रस्थापित होईल. मनुष्य प्रयत्न करतात की, भारतामध्ये आणि दुनियेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी. परंतु ते तर एका बाबांचेच काम आहे. मनुष्य तर आहेतच विकारी. ते (दुनियावाले) शांती कशी स्थापन करू शकतील. घरा-घरातच एवढी भांडणे आहेत. बाबांना न जाणल्याकारणाने अगदीच निधनके (अनाथ) बनले आहेत. सतयुगामध्ये पूर्णपणे पवित्रता, सुख, शांती होती. आता पुन्हा बाबा ती पवित्रता, सुख-शांती स्थापन करत आहेत, इतर कोणीही करू शकणार नाही. भारतवासी आता नरकवासी आहेत. स्वर्गामध्ये जेव्हा होते तेव्हा पुनर्जन्म देखील स्वर्गातच घेत होते. आता पतित आहेत, म्हणून पतित-पावन बाबांची आठवण करतात. आता तर मुले जाणतात - पारलौकिक बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. लौकिक पित्याकडून तर हदचा वारसा मिळतो. पारलौकिक बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेत आहात. ह्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हा काही सत्संग नाहीये. तो आहे भक्तिमार्ग, हा आहे ज्ञान मार्ग.

तुम्हाला आनंद होतो की, बाबा आम्हाला स्वर्गवासी बनवत आहेत. जे कल्पापूर्वी स्वर्गवासी बनले होते, तेच आता बनतील. ब्राह्मण बनल्याशिवाय कधीही देवता बनू शकणार नाही. ह्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. आता तर भारतामध्ये कोणतीही कला राहिलेली नाही. हे कोणाला कळतही नाही. सर्वजण कुंभकर्णासारखे झोपी गेले आहेत, तुम्हाला बाबांनी आता जागे केले आहे. तुम्ही इथे आला आहात स्वर्गवासी बनण्याकरिता. हे बाबांशिवाय इतर कोणीही बनवू शकत नाही. स्वर्ग म्हटले जाते - सतयुगाला. नरक म्हटले जाते - कलियुगाला. यथा राजा राणी तथा प्रजा. आता सर्वजण विकारातून जन्माला येतात, देवता कधीही विकारातून पुनर्जन्म घेत नाहीत. मुले आता बाबांशी पवित्र राहण्याची प्रतिज्ञा करतात परंतु चालता-चालता हार खातात आणि मग केलेली सर्व कमाई नष्ट होते. खूप मोठा फटका बसतो. आश्चर्यवत सुनन्ती, कथन्ती आणि मग भागन्ती होतात. भले साक्षात्कार देखील करतात परंतु साक्षात्कारामध्ये मायेचा प्रवेश खूप होतो. जसे रेडिओमध्ये एकमेकांचे बोलणे ऐकू येऊ नये म्हणून मध्येच आवाजाचा डिस्टर्बन्स केला जातो. हे देखील तसेच आहे. योगामध्ये माया विघ्न आणते. मेहनत सर्व योगामध्येच आहे. भारताचा प्राचीन योग गायला गेला आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांशी खरी प्रीत ठेवून खरा-खरा पांडव बनायचे आहे. मृत्यू समोर उभा आहे त्यामुळे पवित्र बनून पवित्र दुनियेचा मालक बनायचे आहे.

२) काम महाशत्रू आहे जो आदि-मध्य-अंत दुःख देतो, त्यावर विजय प्राप्त करून पावन बनायचे आहे. आठवणीद्वारे विकारांची भेसळ काढून टाकून आत्म्याला गोल्डन एज्ड बनवायचे आहे.

वरदान:-
मरजीवा जन्माच्या स्मृती द्वारे कर्मबंधनाला संबंधांमध्ये परिवर्तन करणारे परोपकारी भव

लौकिक कर्मबंधनाचा संबंध आता मरजीवा जन्मामुळे श्रीमताच्या आधारावर सेवेच्या संबंधाचा आधार आहे. कर्मबंधन नाही परंतु सेवेचा संबंध आहे. सेवेच्या संबंधामध्ये व्हरायटी प्रकारच्या आत्म्यांचे ज्ञान धारण करून चालाल तर बंधनामध्ये हैराण होणार नाही. परंतु अति पाप-आत्मा, अपकारी आत्म्याविषयी देखील तिरस्कार अथवा घृणा वाटण्याऐवजी, दयाळू बनून दयेची भावना ठेवून, सेवेचा संबंध समजून सेवा कराल तर नामवंत विश्व कल्याणी अथवा परोपकारी म्हणून गायले जाल.

बोधवाक्य:-
समयानुसार अथवा परिस्थितीनुसार वैराग्य आले तर ते देखील अल्पकाळाचे वैराग्य आहे, सदाकाळाचे वैरागी बना.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

कोणत्याही प्रकारचे विघ्न आणि समस्या अथवा मायेचा वार, वार नाही परंतु खेळाप्रमाणे अनुभव व्हावा; तर खेळ समजल्यामुळे आनंदाने पार कराल आणि अवस्था एकरस राहील. परंतु याला जर वार समजलात तर घाबरून देखील जाल आणि डगमग सुद्धा व्हाल. मायेचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे विजयी बनणे.