22-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - इथे तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी आलेले आहात, तुम्हाला आसुरी गुणांना बदलून दैवी गुण धारण करायचे आहेत, हे देवता पद प्राप्त करण्याचे शिक्षण आहे”

प्रश्न:-
तुम्ही मुले बाबांकडून कोणते शिक्षण शिकता, जे इतर कोणीही शिकवू शकत नाही?

उत्तर:-
मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण, अपवित्र पासून पवित्र बनून नवीन दुनियेमध्ये जाण्याचे शिक्षण एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही शिकवू शकत नाही. बाबाच सहज ज्ञान आणि राजयोगाच्या शिक्षणाद्वारे पवित्र प्रवृत्ती मार्ग स्थापन करतात.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. खरे तर दोन्ही पिताच आहेत, एक हदचे, दुसरे बेहदचे. ते पिता आहेत तर हे देखील पिता आहेत. बेहदचे बाबा येऊन शिकवतात. मुले जाणतात आपण नवीन दुनिया सतयुगासाठी शिकत आहोत. असे शिक्षण अजून कुठे मिळणार नाही. तुम्ही मुलांनी सत्संग तर खूप केले आहेत. तुम्ही भक्त होता ना. जरूर गुरु केले आहेत, शास्त्रांचा अभ्यास केला आहे. परंतु आता बाबांनी येऊन जागे केले आहे. बाबा म्हणतात - ‘आता हि जुनी दुनिया बदलणार आहे. आता मी तुम्हाला नवीन दुनियेकरीता शिकवत आहे, तुमचा टीचर आहे’. गुरूला कोणीही टीचर म्हणणार नाही. शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, ज्यामुळे उच्च पद प्राप्त करतात. परंतु ते शिकवतात इथल्यासाठी. आता तुम्ही जाणता आम्ही जे शिक्षण शिकतो ते आहे नवीन दुनियेसाठी. गोल्डन एजड वर्ल्ड (सतयुगी दुनिया) म्हटले जाते. हे तर जाणता कि यावेळी आसुरी गुणांना बदलून दैवी गुण धारण करायचे आहेत. इथे तुम्ही बदलण्यासाठी आलेले आहात. कॅरॅक्टरची (चारित्र्याची) महिमा केली जाते. देवतांच्यासमोर जाऊन म्हणतात - तुम्ही असे आहात, आम्ही असे आहोत. तुम्हाला आता एम ऑब्जेक्ट मिळाले आहे. भविष्यासाठी बाबा नवीन दुनिया देखील स्थापन करत आहेत आणि तुम्हाला शिकवत देखील आहेत. तिथे तर विकाराची गोष्टच असत नाही. तुम्ही रावणावर विजय मिळवता, रावण राज्यामध्ये आहेतच सर्व विकारी. यथा राजा राणी तथा प्रजा. आता तर आहे पंचायती राज्य. त्यांच्या आधी राजा-राणीचे राज्य होते, परंतु ते देखील पतित होते. त्या पतित राजांकडे मंदिरे देखील असतात. निर्विकारी देवतांची पूजा करत होते. जाणतात ते देवता भूतकाळात होऊन गेले आहेत. आता त्यांचे राज्य नाही आहे. बाबा आत्म्यांना पावन बनवतात आणि आठवण देखील करून देतात कि तुम्ही देवता शरीरधारी होता. तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र होते. आता पुन्हा बाबा येऊन पतितापासून पावन बनवितात, म्हणूनच तुम्ही इथे आले आहात.

बाबा ऑर्डिनन्स (वटहुकूम) काढतात - ‘मुलांनो, काम महाशत्रू आहे’. तो तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःख देतो. आता तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पावन बनायचे आहे. असे नाही, देवी-देवता आपसामध्ये प्रेम करत नसतील; परंतु तिथे विकारी दृष्टी असत नाही, निर्विकारी होऊन राहतात. बाबा देखील म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान रहा. आपले भविष्य असे बनवायचे आहे जसे तुम्ही पवित्र जोडी होता. प्रत्येक आत्मा विभिन्न नाव-रूप घेऊन पार्ट बजावत आली आहे. आता तुमचा हा आहे अंतिम पार्ट. पवित्रतेसाठी खूप गोंधळून जातात की काय करावे, कसे कंपेनियन (जोडीदार) होऊन रहावे. जोडीदार होऊन राहण्याचा अर्थ काय आहे? परदेशामध्ये जेव्हा लोक वयोवृद्ध होतात तेव्हा मग सांभाळ करण्यासाठी कंपेनियन (जोडीदार) मिळण्यासाठी लग्न करतात. असे खूप आहेत जे ब्रह्मचारी होऊन राहणे पसंत करतात. संन्याशांची तर गोष्ट वेगळी आहे, गृहस्थीमध्ये राहणारे देखील खूप असतात जे लग्न करणे पसंत करत नाहीत. लग्न करा आणि मग मुलेबाळे इत्यादी सांभाळा, असे जाळे पसरवायचेच कशासाठी ज्यामध्ये स्वतःच अडकून पडावे. असे खूपजण इथे देखील येतात. ४० वर्षे झाली ब्रह्मचारी राहतात, त्यानंतर काय लग्न करणार. स्वतंत्र राहणे पसंत करतात. तर बाबा त्यांना पाहून खुश होतात. हे तर आहेतच बंधन मुक्त, बाकी राहिले शरीराचे बंधन, त्यामध्ये देहासहित सर्वांना विसरायचे आहे फक्त एका बाबांचीच आठवण करायची आहे. कोणत्याही देहधारी क्राईस्ट इत्यादीची आठवण करायची नाही. निराकार शिव काही देहधारी नाहीत. त्यांचे नाव ‘शिव’ आहे. शिवची मंदिरे देखील आहेत. आत्म्याला पार्ट मिळाला आहे ८४ जन्मांचा. हा अविनाशी ड्रामा आहे, यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही.

तुम्ही जाणता सर्वात अगोदर आपला धर्म, कर्म जे श्रेष्ठ होते ते आता भ्रष्ट बनले आहे. असे नाही, देवता धर्मच संपलेला आहे. गातात देखील देवता सर्वगुणसंपन्न होते. लक्ष्मी-नारायण दोघेही पवित्र होते. पवित्र प्रवृत्ती मार्ग होता. आता अपवित्र प्रवृत्ती मार्ग आहे. ८४ जन्मांमध्ये भिन्नभिन्न नाव-रूप बदलत आले आहे. बाबांनी सांगितले आहे - गोड-गोड मुलांनो, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही, मी तुम्हाला ८४ जन्मांची कहाणी ऐकवतो. तर जरूर पहिल्या जन्मापासून समजावून सांगावे लागेल. तुम्ही पवित्र होता, आता विकारी बनले आहात तर देवतांच्या समोर जाऊन डोके टेकवता. ख्रिश्चन लोक क्राईस्टच्या समोर, बौद्ध लोक बुद्धाच्या समोर, शीख लोक गुरुनानकच्या दरबारामध्ये जाऊन डोके टेकवतात, यावरून समजते की हे कोणत्या पंथाचे आहेत. तुमच्यासाठी तर म्हणतात कि, हे हिंदू आहेत. आदि सनातन देवी-देवता धर्म कुठे गेला, हे कुणालाही माहित नाही. प्राय: लोप झाला आहे. भारतामध्ये चित्र तर पुष्कळ बनवलेली आहेत. मनुष्यांची देखील अनेक मते आहेत. शिवाची देखील अनेक नावे ठेवली आहेत. खरे तर त्यांचे नाव एकच ‘शिव’ आहे. असे देखील नाही, त्यांनी पुनर्जन्म घेतला आहे म्हणून त्यांचे नाव बदलत जाते. नाही. मनुष्यांची अनेक मते आहेत, त्यामुळे अनेक नावे ठेवली आहेत. श्रीनाथ द्वारे मध्ये जाल तर, तिथे देखील बसले तर तेच लक्ष्मी-नारायण आहेत, जगन्नाथाच्या मंदिरामध्ये देखील मुर्ती तीच आहे. नावे वेगवेगळी ठेवली आहेत. जेव्हा तुम्ही सूर्यवंशी होता तेव्हा पूजा इत्यादी करत नव्हता. तुम्ही साऱ्या विश्वावर राज्य करत होता, सुखी होता. श्रीमतावर श्रेष्ठ राज्य स्थापन केले होते. त्याला म्हटले जाते सुखधाम. बाकी इतर कोणी असे म्हणणार नाही की आम्हाला बाबा शिकवतात, मनुष्यापासून देवता बनवतात. निशाणी देखील आहे, जरूर त्यांचेच राज्य होते. तिथे किल्ले इत्यादी असत नाहीत. किल्ले इत्यादी बनवतात सुरक्षेसाठी. या देवी-देवतांच्या राज्यामध्ये किल्ले इत्यादी नव्हतेच मुळी. दुसरा कोणी चढाई करणारा असत नाही. आता तुम्ही जाणता आपण त्याच देवी-देवता धर्मामध्ये ट्रान्सफर होत आहोत. त्यासाठी तुम्ही राजयोगाचे शिक्षण घेत आहात. राजाई घ्यायची आहे. भगवानुवाच - मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. आता तर कोणीही राजा-राणी नाहीत. किती भांडण-तंटे इत्यादी होत राहतात. हे आहे कलियुग, आइरन एज़ (लोहयुग) जग आहे. तुम्ही गोल्डन एजड मध्ये (सुवर्णयुगामध्ये) होता. आता पुन्हा पुरुषोत्तम संगमयुगावर उभे आहात. बाबा तुम्हाला पहिल्या नंबरवर घेऊन जाण्यासाठी आले आहेत, सर्वांचे कल्याण करतात. तुम्ही जाणता आपले देखील कल्याण होते, आपण सर्वप्रथम जरूर सतयुगामध्ये येणार. बाकी जे-जे धर्म आहे ते सर्व शांतीधाममध्ये निघून जातील. बाबा म्हणतात सर्वांना पवित्र देखील बनायचे आहे. तुम्ही आहातच पवित्र देशाचे रहिवासी, ज्याला निर्वाणधाम म्हटले जाते. वाणी पासून परे फक्त अशरीरी आत्मे राहतात. बाबा तुम्हाला आता वाणी पासून परे (दूर) घेऊन जातात. असे तर कोणी म्हणू शकणार नाही की, मी तुम्हाला निर्वाणधाम, शांतीधाममध्ये घेऊन जातो. ते तर म्हणतात आम्ही ‘ब्रह्म’मध्ये लीन होणार. तुम्ही मुले जाणता आता ही तमोप्रधान दुनिया आहे, यात तुम्हाला मजा येणार नाही म्हणून नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश करण्यासाठी भगवंताला इथे यावे लागते. शिवजयंती देखील इथेच साजरी करतात. तर येऊन काय करतात? कुणी सांगावे तर खरे. जयंती साजरी करतात तर जरूर येतात ना. रथावर विराजमान होतात. त्यांनी मग तो घोडा-गाडीचा रथ दाखवला आहे. बाबा बसून सांगत आहेत, मी कोणत्या रथावर स्वार होतो. मुलांना सांगतो. हे ज्ञान मग प्राय: लोप होते. यांच्या ८४ जन्मांच्या अंतामध्ये बाबांनाच यावे लागते. हे ज्ञान इतर कोणीही देऊ शकत नाही. ज्ञान आहे - दिवस आणि भक्ती आहे - रात्र. खाली उतरतच राहतात. भक्तीचा केवढा शो (दिखावा) आहे, किती कुंभमेळे, अमके मेळे चालूच असतात. असे कोणीही सांगत नाही की, आता तुम्हाला पवित्र बनून नवीन दुनियेमध्ये जायचे आहे, बाबाच सांगतात आता संगमयुग आहे. तुम्हाला शिक्षण देखील तेच मिळते जे कल्पापूर्वी मिळाले होते, मनुष्यापासून देवता बनला होता. गायन देखील आहे - ‘मनुष्य से देवता किये…’ जरूर बाबाच बनवतील ना. तुम्ही जाणता आपण अपवित्र गृहस्थ धर्मवाले होतो, आता बाबा येऊन पुन्हा पवित्र प्रवृत्ती मार्गाचे बनवतात. तुम्ही खूप उच्च पद मिळवता. उच्च ते उच्च बाबा आपल्याला किती श्रेष्ठ बनवतात. बाबांचेच आहे श्री-श्री अर्थात श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत. आपण श्रेष्ठ बनतो. श्री-श्री च्या अर्था विषयी कोणालाच माहिती नाही आहे. एका शिवबाबांचेच हे टायटल आहे परंतु ते मग स्वतःलाच श्री-श्री म्हणतात. माळा जपली जाते. माळा आहे १०८ ची, त्यांनी १६,१०८ ची बनवली आहे. त्यातून आठ तर येणारच आहेत. चार जोड्या आणि एक बाबा. आठ रत्न आणि नववा आहे मी. त्यांना रत्न म्हणतात. त्यांना असे बनविणारे बाबा आहेत. तुम्ही बाबांद्वारे पारस-बुद्धी बनता. रंगूनमध्ये एक तलाव आहे, असे म्हणतात त्यामध्ये स्नान केल्याने पऱ्या बनतात. वास्तविक हे आहे ज्ञान स्नान, ज्यामुळे तुम्ही देवता बनता. बाकी त्या तर सर्व आहेत भक्ती मार्गातल्या गोष्टी. असे तर कधीही होऊ शकणार नाही की पाण्यामध्ये स्नान केल्याने परी बनतील. हा सर्व आहे भक्तिमार्ग. काय-काय गोष्टी तयार केल्या आहेत. काहीच समजत नाहीत. तुम्हाला आता समजले आहे, तुमचेच यादगार (स्मारक) दिलवाला मंदिर, गुरुशिखर इत्यादी उभे आहे. बाबा खूप उंचावर राहतात ना. तुम्ही जाणता बाबा आणि आपण आत्मे जिथे निवास करतो, ते आहे मूलवतन. सूक्ष्म वतन तर केवळ साक्षात्कारासाठी आहे. ती काही दुनिया नाही आहे. सूक्ष्म वतन किंवा मूल वतनसाठी असे म्हणणार नाही की वर्ल्ड हिस्ट्री रिपीट (जगाच्या इतिहासाची पुनरावृत्ती) होते. वर्ल्ड (दुनिया) तर एकच आहे. या दुनियेची हिस्ट्री रिपीट असे म्हटले जाते.

मनुष्य म्हणतात - विश्वामध्ये शांती व्हावी. हे जाणत नाहीत की आत्म्याचा स्वधर्मच शांत आहे. बाकी जंगलामध्ये थोडीच शांती मिळू शकते. तुम्हा मुलांना सुख आणि बाकी सर्वांना शांती मिळते. जे कोणी येतात आधी शांतीधाममध्ये जाऊन सुखधाममध्ये येतील. अनेकजण म्हणतील आम्ही ज्ञान घेणार नाही, मागाहून नंतर आलो तर बराच काळ मुक्तिधाममध्ये राहू. हे तर चांगले आहे, खूप वेळ मुक्तीमध्ये राहतील. इथे फार-फार तर एक-दोन जन्मांसाठी पद मिळेल. हे काय झाले? जसे मच्छर जन्माला येतात आणि मरून जातात. तर एका जन्मामध्ये इथे कसले सुख ठेवले आहे? तो तर काहीच कामाचा राहणार नाही जसा काही पार्टच नाही आहे. तुमचा पार्ट तर खूप उच्च आहे. तुमच्या इतके सुख तर कोणी बघू शकत नाही त्यामुळे पुरुषार्थ केला पाहिजे. करत देखील असतात. कल्पा पूर्वी देखील तुम्ही पुरुषार्थ केला होता. आपल्या पुरुषार्थानुसार प्रारब्ध मिळवले आहे. पुरुषार्था शिवाय तर प्रारब्ध मिळू शकत नाही. पुरुषार्थ तर जरूर करायचा आहे. बाबा म्हणतात - हा देखील ड्रामा पूर्वनियोजित आहे. तुमचा देखील पुरुषार्थ होऊन जाईल; असे तर चालणार नाही. तुम्हाला तर पुरुषार्थ जरूर करावा लागेल. पुरुषार्था शिवाय थोडेच काही होणार आहे. खोकला आपणच कसा बरा होणार? औषध घेण्याचा पुरुषार्थ करावा लागेल. काहीजण असेही ड्रामावर अवलंबून राहतात, जे ड्रामामध्ये असेल. असे उलटे ज्ञान बुद्धीमध्ये पक्के करायचे नाही. हे देखील माया विघ्न आणते. मुले शिक्षणच सोडून देतात. याला म्हटले जाते - मायेकडून हार. युद्ध आहे ना. ती देखील जबरदस्त आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) श्रेष्ठ राज्य स्थापन करण्यासाठी श्रीमतावर चालून बाबांचे मदतगार बनायचे आहे. जसे देवता निर्विकारी आहेत, तसे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून निर्विकारी बनायचे आहे. पवित्र प्रवृत्ती बनवायची आहे.

२) ड्रामाच्या पॉईंटचा उलट्या रीतीने उपयोग करायचा नाही. ड्रामा, असे म्हणून बसून रहायचे नाही. अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे. पुरुषार्थाने आपले श्रेष्ठ प्रारब्ध बनवायचे आहे.

वरदान:-
कमळ फुलाचे चिन्ह बुद्धीमध्ये ठेवून, स्वतःला एक्झाम्पल (उदाहरण) समजणारे न्यारे आणि प्यारे भव

प्रवृत्तीमध्ये राहणाऱ्यांचे चिन्ह आहे ‘कमळ फूल’. तर कमळ बना आणि अमलात आणा (कृतीमध्ये आणा). जर कृतीमध्ये आणले नाहीत तर कमळ बनू शकणार नाही. तर कमळ फुलाचे चिन्ह लक्षात ठेवून स्वतःला सॅम्पल समजून चाला. सेवा करताना न्यारे आणि प्यारे (अलिप्त आणि प्रेमळ) बना. फक्त प्रेमळ बनायचे नाही परंतु अलिप्त बनून प्रेमळ बनायचे आहे कारण प्रेम कधी-कधी लगावाच्या (आकर्षणाच्या) रूपामध्ये बदलते, म्हणून कोणतीही सेवा करताना न्यारे आणि प्यारे (अलिप्त आणि प्रेमळ) बना.

बोधवाक्य:-
स्नेहाच्या छत्रछायेच्या आत कधीही माया येऊ शकत नाही.