22-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - बाबा
आले आहेत तुम्हा मुलांची खिदमत (सेवा) करण्यासाठी, तुम्ही देखील पित्या समान बनून
सर्वांची सेवा करा”
प्रश्न:-
ब्रह्मा
बाबांचा कोणता एक विचार चालतो, ज्यावर शिवबाबा म्हणतात - ‘वेट अँड सी’, चिंता करू
नका?
उत्तर:-
बाबांचा विचार
चालतो की, वेळ अतिशय नाजूक होत चालला आहे, मुलांना अविनाशी ज्ञान-रत्न घेण्यासाठी
बाबांकडे यायचेच आहे, इतकी असंख्य मुले कुठे येऊन राहतील. किती घरे बनवावी लागतील.
शिवबाबा म्हणतात - ‘वेट अँड सी’. कल्पापूर्वी जसे येऊन राहिले होते तसेच राहतील.
तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त अभ्यास करत रहा, मनमनाभव. तुम्हाला कर्मातीत
बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
गीत:-
तुम्हें पाके
हमने जहां पा लिया…
ओम शांती।
बाबा देखील
म्हणतात - मुलांनो, ओम् शांती. आणखी काय म्हणतील! मुलांना म्हणतात - मुलांनो ओम्
शांती, तत्-त्वम. माझ्या मुलांनो, तुम्ही देखील शांत स्वरूप आहात. तुम्ही देखील
मास्टर पतित-पावन आहात. असे दुसरा कोणीही म्हणू शकणार नाही. म्हटले जाते - ‘जैसे
काग वैसे बच्चे (जसे पिता तशी मुले)’. तुम्ही मुले देखील जाणता - जसे बाबा तसे आम्ही.
बाबा म्हणतात - मी ज्ञानाचा सागर आहे. तुम्ही मुले देखील समजता की, आम्ही मास्टर
ज्ञान-सागर आहोत, म्हणजे जणू नद्या आहोत. सागराची मुले-बाळे देखील असतील ना.
मोठ्या-मोठ्या नद्या देखील आहेत. मोठ-मोठे तलाव, मोठ-मोठी सरोवरे देखील आहेत. ती
आहेत जड, तुम्ही आहात चैतन्य. सागरातूनच निघालेल्या आहात. बऱ्याच मुलांना देखील या
गोष्टी समजत नाहीत कारण मुली काही शिकल्या सवरलेल्या नाहीयेत. बाबांनी एकदा विचारले
- ‘साखर कशापासून बनते? गूळ कशापासून बनतो?’ तर म्हणाल्या - लाल उसापासून गूळ बनतो,
पांढऱ्या उसापासून साखर बनते. बिचाऱ्या शिकलेल्या तर नाही आहेत. आता तुम्हाला किती
मोठ्या गोष्टी समजावून सांगत आहेत. पाण्याच्या सागरातून पाण्याच्याच नद्या उगम
पावतात. लोकसंख्या वाढत जाते, तर पाणी देखील भरपूर प्रमाणात पाहिजे ना. किती कालवे
इत्यादी बनवत राहतात. तर तुम्हा मुलांना उठता-बसता, चालता-फिरता हीच गोष्ट लक्षात
ठेवायची आहे की, आम्ही या पतित दुनियेला पावन बनवत आहोत. गाण्यामध्ये देखील म्हणतात
- ‘बाबा, आम्ही तुमच्याकडून विश्वाच्या बादशाहीचा वारसा प्राप्त करतो. हा
आमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही’. २१ जन्म ही राजाई कायम राहील. बेहदचे
बाबा येऊन बेहदचे राज्य-भाग्य देतात. राज्य-पदाचा कारभार चालविण्यास लायक बनवतात,
पवित्र बनवतात. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या’. श्रीकृष्णाला काही कोणी असे
बोलावत नाहीत. निराकार भगवंतालाच बोलावतात. जेव्हा असे म्हणतात की, ‘हे पतित-पावन’,
तर श्रीकृष्ण बुद्धीमध्ये येत नाही, परमात्माच आठवतो. बाबा येऊन प्रत्येक गोष्ट
समजावून सांगतात. आता तुम्ही मुले सन्मुख बसले आहात. हे कोणी साधु-संत नाही आहेत.
तुम्ही जाणता निराकार शिवबाबा या ब्रह्मातनामध्ये प्रवेश करून आपल्याला शिकवत आहेत.
गायन देखील आहे - परमपिता परमात्मा, ब्रह्मा तनाद्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची
स्थापना करतात. विनाश हा स्थापनेच्या नंतरच झाला आहे. यावरून हे सिद्ध होते की ते
जुन्या दुनियेमध्ये येतात. ब्रह्मा द्वारे स्थापना नवीन दुनियेची, शंकरा द्वारे
अनेक धर्मांचा विनाश. सतयुगामध्ये एक धर्म होता, आता तर अनेक धर्म आहेत. एक धर्म
असणाऱ्या देवी-देवतांची निशाणी चक्र इत्यादी आहे. या लक्ष्मी-नारायणाला म्हणतातच
मुळी विश्वाचा मालक. स्वर्गाचा मालक सो विश्वाचा मालक झाला. या गोष्टी आता तुम्हा
मुलांच्या बुद्धीमध्ये पक्क्या झाल्या आहेत. बाबा म्हणतात - मुलांनो, मनमनाभव.
मुलांना वारंवार आठवणीसाठी हा इशारा दिला जातो. बाबांची आणि वारशाची आठवण करा. हे
विसरू नका, बाकीचे पॉईंट्स विसरता, हे तर मुख्य आहे ना. बाबाच पतित-पावन आहेत. ही
पावन बनण्याची युक्ती सांगतात. बाबा म्हणतात, तुम्ही सतोप्रधान होता. आता तमोप्रधान
पतित बनले आहात. पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत. आता पुन्हा तुम्हाला सतोप्रधान बनायचे
आहे. सतोप्रधान बनाल तेव्हाच तुम्ही पवित्र दुनियेमध्ये येऊ शकाल. निराकारी दुनिया
देखील पवित्र आहे, साकारी दुनिया देखील पवित्र आहे. अपवित्र, पतित दुनिया तर ही आहे.
आत्मा देखील तमोप्रधान तर शरीर देखील तमोप्रधान आहे. हे तर सृष्टीचे नाटक आहे,
यामध्ये ब्रह्मांड आणि सूक्ष्मवतन देखील येते. सृष्टीचे चक्र इथेच फिरते. सतयुग,
त्रेता इथेच आहे, हे काही सूक्ष्म-वतन अथवा मूल-वतन मध्ये नसतात, हे इथेच आहेत. याला
मनुष्य सृष्टी म्हटले जाते. ती आहे आत्म्यांची निराकारी दुनिया. ती आहे ब्रह्मा,
विष्णू, शंकर यांची आकारी दुनिया. ही साकारी सृष्टी किती मोठी आहे. सतयुगामध्ये किती
छोटी सृष्टी असते. तिथे आहेच एक धर्म. बाकी मनुष्य जे म्हणतात की तिथे देखील दैत्य
इत्यादी होते, हे सर्व खोटे आहे.
तुम्ही समजता की नवीन
दुनियेची स्थापना, जुन्या दुनियेचा विनाश याचे गायन आहे. सर्वांचा विनाश होईल आणि
सतयुग हेवनची स्थापना होईल. तुम्ही देखील बाबांसोबत खिदमत (सेवा) करत आहात. बाबा
देखील येतातच मुळी मुलांची सेवा करण्यासाठी. हे आहेतच बेहदचे पिता. जेव्हा बघतात,
माझी मुले खूप दुःखी आहेत तर जरूर दया येईल ना. ते आहेतच दयाळू बाबा. आता तर पूर्ण
दुनियेमध्ये अशांती आहे. एका बाबांशिवाय इतर कोणीही शांती देऊ शकत नाही. हठयोगी
देखील अथाह आहेत. आत्म्यासाठी म्हणतात की, ती निर्लेप आहे. लोकांना उलट्या गोष्टी
ऐकवतात. वास्तविक आत्म्याची सफाई झाली पाहिजे. आत्म्यामध्येच भेसळ पडली आहे आणि हे
कोणाला ठाऊक सुद्धा नाहीये. म्हणतात देखील ही पाप-आत्मा आहे. खूप पाप करतात. हे
महात्मा आहेत, पुण्यात्मा आहेत. असे म्हणणार नाहीत की, महान-परमात्मा आहेत.
संन्याशांसाठी देखील म्हणतील - पवित्र-आत्मा आहे कारण संन्यास घेतलेला आहे. आता बाबा
समजावून सांगत आहेत - आत्म्याला पवित्र बनविणारा एका परमात्मा पित्याशिवाय दुसरा
कोणीही असू शकत नाही. पतित दुनियेमध्ये पावन-आत्मा कोणी असू शकत नाही. आता कलम लागत
आहे. हळूहळू वृद्धी होत जाईल. हे तर छोटे-छोटे मठ, पंथ इत्यादी शाखा-उपशाखा आहेत.
त्यासाठी कोणती मेहनत थोडीच करावी लागते. अनेक प्रकारचे मंत्र देतात. वेगवेगळ्या
प्रकारचे मंत्र देतात. हा देखील वशीकरण मंत्र आहे, ज्याद्वारे तुम्ही ५ विकारांवर
विजय प्राप्त करता. राम-रामचा मंत्र जपतात, याने फायदा तर काहीच होत नाही. इथे तर
बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. तुम्ही पवित्र आत्मा बनाल.
आठवणीलाच योग म्हणतात. भारताचा प्राचीन योग खूप प्रसिद्ध आहे. या योगाद्वारेच तुम्ही
विश्वावर विजय प्राप्त करता. भारताचा राजयोग खूप प्रसिद्ध आहे. हा बाबांशिवाय इतर
कोणीही शिकवू शकणार नाही. तुम्ही आहात ब्रह्माकुमार, कुमारी. बी.के. तर इथेच असतील
ना. प्रजापिता ब्रह्माची मुले तर जरूर ब्रह्माच्या सोबतच असणार. ब्राह्मण कुळ देखील
जरूर पाहिजे. याला म्हटले जाते - सर्वोत्तम उच्च ते उच्च ब्राह्मण कुळ. आता तुम्ही
ब्राह्मण आहात आणि मग उलट फिराल. बाजोली (कोलांट्या उड्यांचा खेळ) खेळतात ना.
शूद्रापासून ब्राह्मण बनले आहात, मग देवता, क्षत्रिय… तर आता बाबा समजावून सांगत
आहेत - गोड-गोड मुलांनो, खूप छोटीशी गोष्ट आहे, बाबांच्या आठवणीमध्ये राहा. हे
देखील बुद्धीमध्ये आहे - बाबा आम्हाला ८४ जन्मांचे रहस्य सांगत आहेत. ८४ लाख अथवा
८४ जन्म पूर्ण हिशोब तर पाहिजे ना. कोणालाच ठाऊक नाही. ८४ लाखाचा हिशोब तर कोणीही
सांगू शकणार नाही. मनुष्य ८४ जन्मांचे चक्र फिरतात. आत्मे वरून येतात पार्ट
बजावण्याकरिता. सतयुगापासून कलियुग अंतापर्यंत येतच राहतात. प्रत्येक जण आपला-आपला
पार्ट बजावत राहतात. या गोष्टींना मनुष्य मात्र जाणत नाहीत. फक्त एक बाबाच जाणू
शकतात. मनुष्याला कधीही परमपिता, गॉड फादर म्हटले जात नाही. गॉडफादर म्हटल्याने
बुद्धी निराकार शिव कडेच जाते. जीव आत्म्याचा तर पिता असेल ना. आत्मा एक शरीर सोडून
दुसरे घेते. निराकार पित्याचे नाव शिव आहे. तुमचे देखील एकच नाव आहे, आत्मा. मग
शरीरासाठी विविध नावे दिली जातात. परमपिता परमात्मा देखील शरीरामध्ये येऊन ज्ञान
ऐकवतात. शरीराशिवाय थोडेच ऐकवतील. तर बाबा समजावून सांगतात की, यांचे (ब्रह्मा
बाबांचे) तर स्वतःचे नाव आहे, माझ्या शरीराचे तर कोणतेही नाव नाही, ना मी
पुनर्जन्मामध्ये येतो. मी यांच्यामध्ये प्रवेश करतो, यांना देखील समजून येत नाही.
नेमकी तिथी-तारीख नाहीये. हो, मी कल्पाच्या अंताला अर्थात रात्रीमध्ये येतो. आता
रात्र आहे ना. ही आहेच पतितांची दुनिया. मी येतो पावन दुनिया अर्थात दिवस
बनविण्यासाठी. यांना (ब्रह्मा बाबांना) देखील ठाऊक नाही की बाबांनी केव्हा प्रवेश
केला. हो, विनाशाचा साक्षात्कार झाला. खूप ध्यानामध्ये जात होते, त्याची नेमकी
तिथी-तारीख, वेळ काढू शकत नाही. श्रीकृष्णाची देखील पूजा करत होते, त्याचा रात्रीचा
जन्म दाखवतात. कोणत्या वेळी, किती मिनिटे इत्यादी सर्व काही काढतात. बाबा म्हणतात -
मी तर आहेच निराकार. जसे इतर मनुष्य जन्म घेतात, तसा माझा जन्म थोडाच होतो. माझा तर
दिव्य अलौकिक जन्म आहे. मी यांच्यामध्ये प्रवेश करतो आणि मग निघून जातो. पूर्ण
दिवसभर थोडाच नंदीवर स्वार होऊन राहतो. माझी जेव्हा मुले आठवण करतात, तेव्हा मी तिथे
हजर असतो. बाबा येऊन मुलांना भेटतात, गुडमॉर्निंग करतात. जसे मनुष्य एकमेकांना
भेटतात, राम-राम किंवा नमस्ते म्हणतात. हे तर रूहानी बेहदचे बाबा समजावून सांगत
आहेत. मी तुम्हा सर्व मुलांचा पिता आहे. तर शिवबाबांची संतान तुम्ही सर्व आत्मे
भाऊ-भाऊ आहात. तर हा आनंदाचा पारा चढला पाहिजे. बेहदचे बाबा आलेले आहेत, आम्हाला
बेहदचा वारसा देत आहेत. मुलांना पाहून बाबांना देखील आनंद होतो, असंख्य मुले आहेत.
मुले जाणतात - बाबा आपल्याला स्वर्गाचा मालक बनवत आहेत, राजाई देत आहेत. प्रजा
देखील तर म्हणेल - आमचे राज्य आहे. जसे भारतवासी म्हणतात - हा आमचा भारत देश आहे.
राजा प्रजा दोघेही म्हणतात - आमचा देश आहे. तुम्ही मुले नरकवासी आहात नंतर मग
स्वर्गवासी बनाल. बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे अजून कोणताच त्रास बाबा देत
नाहीत. राहायचे देखील गृहस्थ व्यवहारामध्ये आहे. इथे येऊन थोडेच राहायचे आहे. सगळेच
जर इथे पळून आले तर इतक्या सर्वांची बाबा कशी काय सोय करू शकतील. इतकी सर्व मुले
एकाचवेळी कशी काय एकत्र येऊ शकतील. सर्व सेंटर्सची मुले एकाच वेळी एकत्र कशी काय
भेटू शकतील. इथे कशी राहू शकतील. अवघड आहे ना. दिवसेंदिवस मुलांची वृद्धी होत जाते,
यासाठी देखील काही युक्ती रचावी लागेल. ही सर्व आजूबाजूची घरे घ्यावी लागतील.
घरमालकांना विचारून पाहू, किती सांगतात ते. वेळ आली तर घरे भाड्याने घ्यावी लागतील
ना. पैशांचा काही प्रश्न नाहीये. वेळ खूप नाजूक होत चालला आहे. बाबा आणि मुले दोघेही
अविनाशी आहेत. अविनाशी खजिना मुलांना देतात. मोठ्या संख्येने मुले येणार आहेत. बाबा
(ब्रह्मा बाबा) विचार करतात की, ‘इतक्या मोठ्या संख्येने आले तर राहतील कुठे?’
शिवबाबा म्हणतात, ‘तू चिंता का करतोस - वेट अँड सी. तू फक्त अभ्यास करत राहा,
मनमनाभव’.
तुम्हा मुलांनी हा
विचार केला पाहिजे की आता आपल्याला कर्मातीत अवस्थेमध्ये जायचे आहे, सतोप्रधान
बनायचे आहे. आठवणीद्वारेच पावन बनणार. बाबा गोष्टी तर खूप सोप्या सांगतात. खूप सोपे
आहे, फक्त बाबांची आठवण करायची आहे. बघा, वासराला जेव्हा आईची आठवण येते तर ते
हंबरते ना. ते तर एक जनावर आहे. तुम्ही मुलांनी देखील टाहो फोडून हाका मारल्या आहेत.
पुढे चालून खूप टाहो फोडून हाका मारतील, खूप आठवण करतील. तुम्ही मुले तर आता जाणता
की बाबा आलेले आहेत, विनाश तर होणारच आहे. नॅचरल नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. सर्व
आपसामध्ये भांडण-तंटे करत राहतात. किती खर्च करून बॉम्ब्स बनवतात, प्रचंड प्रमाणात
पैसा खर्च होतो. खर्च तर होतोच ना, इतका पैसा कुठून आणणार. मृत्यूला घाबरतात देखील.
तरी देखील बॉम्ब्स बनवणे काही बंद करत नाहीत. अणुबॉम्ब्सनी युद्ध होईल. आता तर
बॉम्ब्स बनवतातच असे की बॉम्ब टाकताच क्षणी मनुष्य मरतील. कुठलीही वस्तू तयार
करण्यासाठी आधी वेळ लागतो आणि मग तर मिनिटमोटर (एका मिनिटात तयार). पटापट तयार करत
जातात. बॉम्ब देखील थोडे-थोडके बनवतील काय? तुम्ही मुले जाणता या जुन्या सृष्टीचा
विनाश होणार आहे. आता बेहदच्या बाबांकडून वारसा घ्यायचा आहे.
गीता आहे तुम्हा
भारतवासीयांची, देवी-देवता धर्माचे शास्त्र. बाकीचे तर छोटे-छोटे धर्मग्रंथ आहेत,
त्यांचे कोणते गायन नाही. ब्राह्मण धर्म आहे सर्वात श्रेष्ठ. ब्राह्मणांचे काम आहे
कथा ऐकवणे. तुम्ही म्हणू शकता - आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी ब्रह्माची मुले आहोत,
आम्हाला आजोबांकडून वारसा मिळत आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ड्रामाच्या
प्रत्येक रहस्याला जाणत असताना देखील कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. अभ्यास
करत राहायचा आहे. मनमनाभव होऊन कर्मातीत बनण्याचा विचार करायचा आहे. स्वतःला
सतोप्रधान बनवायचे आहे.
२) आपण आत्मे,
शिवबाबांची संतान आपसामध्ये भाऊ-भाऊ आहोत. शिवबाबांकडून वारसा घेत आहोत. याच
आनंदामध्ये राहायचे आहे.
वरदान:-
आंतरिक
स्वरूपामध्ये स्थित राहून आपल्या अथवा बाबांच्या गुप्त रूपाला प्रत्यक्ष करणारे
सच्चे स्नेही भव
जी मुले सदैव आंतरिक
स्थितीमध्ये अथवा आंतरिक स्वरूपामध्ये स्थित राहून अंतर्मुखी राहतात, ते कधीही
कोणत्याही गोष्टीमध्ये गुरफटून राहू शकत नाहीत. जुनी दुनिया, नाती, संपत्ती, पदार्थ
जे अल्पकाळाचे आणि दिखावा मात्र आहेत त्यांच्यापासून धोका खाऊ शकत नाहीत. आंतरिक
स्वरूपाच्या स्थितीमध्ये राहिल्याने स्वतःचे शक्तीस्वरूप जे गुप्त आहे ते प्रत्यक्ष
होते आणि याच स्वरूपा द्वारे बाबांची प्रत्यक्षता होते. तर असे श्रेष्ठ कर्तव्य
करणारेच खरे स्नेही आहेत.
बोधवाक्य:-
निश्चय आणि
जन्मसिद्ध अधिकाराच्या शानमध्ये रहा म्हणजे तुम्ही निराश होणार नाही.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
स्वच्छता ही देखील
सरळतेची (साधेपणाची) निशाणी आहे. जितकी सरळता असेल तितकीच स्वच्छता असेल, त्यामुळे
सर्वांना स्वतःकडे आकर्षित कराल. सच्चाई आणि सफाई देखील तेव्हाच असेल जेव्हा आपल्या
स्वभावाला सरळ बनवाल. सरळ स्वभाव असणारा बहुरूपी देखील बनू शकतो. असे सरळ स्वभावाचे
सदैव हर्षित राहतात आणि सर्वांना आकर्षित करतात.