22-07-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - देही-अभिमानी बना तर शितल व्हाल, विकारांची दुर्गंधी निघून जाईल,
अंतर्मुखी व्हाल, फूल बनाल’’
प्रश्न:-
बापदादा सर्व
मुलांना कोणती दोन वरदाने देतात? त्यांना स्वरूपामध्ये आणण्याची विधी काय आहे?
उत्तर:-
बाबा सर्व मुलांना शांती आणि सुखाचे वरदान देतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही
शांतीमध्ये राहण्याचा अभ्यास करा. कोणी उलटे-सुलटे बोलले तर तुम्ही प्रत्युत्तर देऊ
नका. तुम्हाला शांत रहायचे आहे. फालतू झरमुई, झगमुईच्या गोष्टी (व्यर्थ गोष्टी)
करायच्या नाहीत. कोणालाही दुःख द्यायचे नाही. मुखामध्ये शांतीची मोहर ठेवा तर हि
दोन्ही वरदाने स्वरूपामध्ये येतील.
ओम शांती।
गोड-गोड मुले कधी सन्मुख आहेत, कधी दूर जातात. सन्मुख मग तेच राहतात जे आठवण करतात
कारण आठवणीच्या यात्रेमध्येच सर्व काही सामावलेले आहे. गायले जाते ना- ‘नजर से
निहाल’. आत्म्याची नजर जाते परमपिता परमात्म्यामध्ये इतर काहीही त्यांना चांगले
वाटत नाही. त्यांना आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतात. तर स्वतःवर किती लक्ष ठेवले
पाहिजे. आठवण न केल्याने माया समजून जाते - यांचा योग तुटलेला आहे तर ती आपल्याकडे
खेचते. काही ना काही उलटे कर्म करायला लावते. अशा बाबांची निंदा करतात. भक्ती
मार्गामध्ये गातात - ‘बाबा, मेरे तो एक आप दूसरा न कोई’. म्हणूनच बाबा म्हणतात -
‘मुलांनो, ध्येय खूप उच्च आहे’. काम करताना बाबांची आठवण करणे हे आहे उच्च ते उच्च
ध्येय. यामध्ये खूप चांगली प्रॅक्टिस पाहिजे. नाही तर उलटे काम करणारे निंदक बनतात.
समजा कोणाला क्रोध आला, आपसामध्ये भांडण-तंटा करतात म्हणजे देखील निंदा केली ना,
यामध्ये खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना
बुद्धी बाबांवर केंद्रित करायची आहे. असे नाही की कोणी संपूर्ण बनले आहे. नाही.
प्रयत्न असा केला पाहिजे की आपण देही-अभिमानी बनावे. देह-अभिमानामध्ये आल्याने काही
ना काही उलटे काम करतात तर जणूकाही बाबांची निंदा करतात. बाबा म्हणतात अशा
सद्गुरूंची निंदा करणारे लक्ष्मी-नारायण बनण्याचे पद प्राप्त करू शकणार नाहीत
म्हणून पूर्ण पुरुषार्थ करत रहा, यामुळे तुम्ही अतिशय शितल बनाल. पाच विकारांच्या
सर्व गोष्टी निघून जातील. बाबांकडून खूप ताकद मिळेल. काम-धंदा देखील करायचा आहे.
बाबा असे म्हणत नाहीत की कर्म करू नका. तिथे (सतयुगामध्ये) तर तुमची कर्म, अकर्म
होतील. कलियुगामध्ये जी कर्म करतात, ती विकर्म होतात. आता संगमयुगावर तुम्हाला
शिकायचे असते. तिथे शिकण्याची गरज नाही. इथले शिक्षणच तिथे सोबत येईल. बाबा मुलांना
समजावून सांगतात - बाह्यमुखता चांगली नाही. अंतर्मुखी भव. ती देखील वेळ येईल जेव्हा
की तुम्ही मुले अंतर्मुखी बनाल. बाबांव्यतिरिक्त इतर दुसरे काहीही आठवणार नाही.
तुम्ही आले देखील असे होता, कोणाचीही आठवण नव्हती. गर्भातून जेव्हा बाहेर पडलात
तेव्हा माहीत झाले की हे माझे आई-वडील आहेत, हा अमका आहे. तर मग आता जायचे देखील
असेच आहे. मी एका बाबांचा आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचीही आठवण बुद्धीमध्ये
येऊ नये. भले वेळ भरपूर आहे परंतु पुरुषार्थ तर पूर्ण रीतीने करायचा आहे. शरीरावर
तर काही भरवसा नाही. प्रयत्न करत राहिले पाहिजे, घरामध्ये देखील खूप शांती असावी,
क्लेश नको. नाही तर सर्व म्हणतील यांच्यामध्ये किती अशांती आहे. तुम्हा मुलांना तर
एकदम शांत रहायचे आहे. तुम्ही शांतीचा वारसा घेत आहात ना. आता तुम्ही राहत आहात
काट्यांमध्ये, फुलांमध्ये नाही. काट्यांमध्ये राहून फूल बनायचे आहे. काट्यांचा काटा
बनायचे नाही. जितके तुम्ही बाबांची आठवण कराल तितके शांत रहाल. कोणी उलट-सुलट बोलले
तरी तुम्ही शांतीमध्ये रहा. आत्मा आहेच शांत. आत्म्याचा स्वधर्म आहे शांत. तुम्ही
जाणता आता आपल्याला त्या घरी जायचे आहे. बाबा देखील आहेत शांतीचा सागर. म्हणतात
तुम्हाला देखील शांतीचा सागर बनायचे आहे. फालतू झरमुई-झगमुई खूप नुकसान करते. बाबा
डायरेक्शन देतात - अशा गोष्टी करता कामा नयेत, यामुळे तुम्ही बाबांची निंदा करता.
शांतीमध्ये कोणती निंदा अथवा विकर्म होत नाही. बाबांना आठवण करत राहिल्याने अजूनच
विकर्म विनाश होतील. ना स्वतः अशांत व्हायचे, ना इतरांना करायचे. कोणाला दुःख
दिल्याने आत्मा नाराज होते. असे बरेच आहेत जे रिपोर्ट लिहितात - ‘बाबा, हे घरामध्ये
येतात तर गोंधळ माजवतात’. बाबा लिहितात - ‘तुम्ही आपल्या शांती स्वधर्मामध्ये रहा.
हातमताईची कहाणी देखील आहे ना, त्याला म्हटले तू तोंडामध्ये मोहर टाक तर आवाज
निघणारच नाही. बोलू शकणार नाही.
तुम्हा मुलांना शांतीमध्ये रहायचे आहे. मनुष्य शांतीसाठी खूप खस्ता खातात. तुम्ही
मुले जाणता, आमचे गोड बाबा शांतीचा सागर आहेत. शांती स्थापन करत-करत विश्वामध्ये
शांती प्रस्थापित करतात. आपल्या भविष्य पदाला देखील आठवत रहा. तिथे असतोच एक धर्म,
इतर कोणता धर्म असत नाही. त्यालाच विश्वामध्ये शांती म्हटले जाते. मग जेव्हा इतर
धर्म येतात तेव्हा मग गदारोळ होतो. आता किती शांती असते. समजता आपले घर तेच आहे,
आपला स्वधर्म आहे शांत. असे तर म्हणणार नाही की, शरीराचा स्वधर्म शांत आहे. शरीर
विनाशी चीज आहे, आत्मा अविनाशी चीज आहे. जितका वेळ आत्मे तिथे राहतात तर किती शांतता
असते. इथे तर संपूर्ण दुनियेमध्ये अशांती आहे म्हणून शांती मागत राहतात. परंतु कोणी
नेहमी शांतीमध्ये राहील, असे तर होऊ शकत नाही. भले ६३ जन्म तिथे (द्वापर,
कलियुगामध्ये) राहतात तरी देखील यावे जरूर लागेल. आपला सुख-दुःखाचा पार्ट बजावून मग
निघून जातील. ड्रामाला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागते.
तुम्हा मुलांना देखील लक्षात ठेवायचे आहे की, बाबा आपल्याला वरदान देत आहेत - सुख
आणि शांतीचे. ब्रह्माची आत्मा देखील सर्व ऐकते. सर्वात जवळ तर यांचे कान ऐकतात.
यांचे मुख कानाच्या जवळ आहे. तुमचे मग इतके दूर आहे. हे लगेच ऐकतात. सर्व गोष्टी
समजू शकतात. बाबा म्हणतात ‘गोड-गोड मुलांनो’! ‘गोड-गोड’ तर सर्वांनाच म्हणतात कारण
मुले तर सर्वच आहेत. जे काही जीव आत्मे आहेत ते सर्व बाबांची मुले अविनाशी आहेत.
शरीर तर विनाशी आहे. बाबा अविनाशी आहेत. मुले आत्मे देखील अविनाशी आहेत. बाबा
मुलांशी वार्तालाप करतात - याला म्हटले जाते रूहानी नॉलेज. सुप्रीम रूह बसून
आत्म्यांना समजावून सांगतात. बाबांचे प्रेम तर आहेच. जे पण सर्व आत्मे आहेत, भले
तमोप्रधान आहेत. जाणतात हे सर्व जेव्हा घरी (परमधाममध्ये) होते तर सतोप्रधान होते.
सर्वांना कल्प-कल्प येऊन मी शांतीचा रस्ता सांगतो. वर देण्याची गोष्ट नाहीये. असे
म्हणत नाहीत - ‘धनवान भव’, ‘आयुष्यमान भव’. नाही. सतयुगामध्ये तुम्ही असे होता परंतु
आशीर्वाद देत नाहीत. कृपा अथवा आशीर्वाद मागायचे नाहीत. बाबा, पिता देखील आहेत,
टीचर देखील आहेत, याच गोष्टी आठवण करायच्या आहेत. ओहो! शिवबाबा पिता देखील आहेत,
टीचर देखील आहेत, ज्ञानाचा सागर देखील आहेत. बाबाच बसून आपले आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवतात, ज्याद्वारे तुम्ही चक्रवर्ती महाराजा बनता. हे सारे
ऑलराऊंड चक्र आहे ना. बाबा समजावून सांगतात यावेळी सारी दुनिया रावण राज्यामध्ये आहे.
रावण केवळ लंकेमध्येच नाहीये. ही आहे बेहदची लंका. चारी बाजूंनी पाणी आहे. सारी लंका
रावणाची होती, आता मग रामाची बनते. लंका तर सोन्याची होती. तिथे सोने पुष्कळ असते.
एक उदाहरण देखील सांगतात - ध्यानामध्ये गेला, तिथे एक सोन्याची विट पाहिली. जशी इथे
मातीची आहे, तिथे सोन्याची असेल. तर विचार केला सोने घेऊन जावे. कसली-कसली नाटकं
बनवली आहेत. भारत तर नामीग्रामी आहे, इतर खंडांमध्ये इतके हिरे-माणके नसतात. बाबा
म्हणतात - ‘मी गाईड बनून सर्वांना परत घेऊन जातो. चला मुलांनो, आता घरी जायचे आहे’.
आत्मे पतित आहेत, पावन बनल्याशिवाय घरी जाऊ शकत नाहीत. पतितांना पावन बनविणारे एक
बाबाच आहेत म्हणून सर्व इथेच आहेत. परत कोणीही जाऊ शकत नाही. कायदा सांगत नाही. बाबा
म्हणतात - ‘मुलांनो, माया तुम्हाला आणखीनच जोरात देह-अभिमानामध्ये आणेल. बाबांची
आठवण करू देणार नाही’. तुम्हाला सावध रहायचे आहे. यासाठीच युद्ध आहे. डोळे खूप धोका
देतात. या डोळ्यांना आपल्या कब्जा मध्ये (अधिकारामध्ये) ठेवायचे आहे. दिसून आले आहे
भाऊ-बहिणीमध्ये देखील दृष्टी ठीक राहत नाही; तर आता समजावून सांगितले जाते की,
भाऊ-भाऊ समजा. हे तर सगळेच म्हणतात आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. परंतु समजत काहीच नाहीत.
ज्याप्रमाणे बेडूक डराव-डराव करत राहतात, अर्थ काहीच समजत नाही. आता तुम्हाला
प्रत्येक गोष्टीचा यथार्थ अर्थ समजला आहे.
बाबा बसून गोड-गोड मुलांना समजावून सांगतात की, तुम्ही भक्ती मार्गामध्ये देखील
आशिक होते, माशुकची आठवण करत होते. दुःखामध्ये लगेच त्यांची आठवण करतात - हाय राम!
हे भगवान दया करा! स्वर्गामध्ये तर असे कधी म्हणणार नाही. तिथे रावण राज्यच नसते.
तुम्हाला राम राज्यामध्ये घेऊन जातात तर त्यांच्या मतावर चालले पाहिजे. आता तुम्हाला
मिळते ईश्वरीय मत, नंतर मग मिळेल दैवी मत. या कल्याणकारी संगमयुगाला कोणीही जाणत
नाहीत कारण सर्वांना सांगितले गेले आहे की, कलियुग अजून छोटे बाळ आहे. लाखो वर्षे
बाकी आहेत. बाबा म्हणतात - ‘हा आहे भक्तीचा घोर अंध:कार. ज्ञान आहे प्रकाश’.
ड्रामानुसार भक्तीची देखील नोंद आहे, ती तरी देखील पुन्हा होणारच. आता तुम्ही समजता
भगवान भेटले आहेत तर भटकण्याची गरज वाटत नाही. तुम्ही म्हणता - ‘आम्ही जातो बाबांकडे
अथवा बाप-दादांकडे. या गोष्टींना मनुष्य तर समजू शकणार नाही. तुमच्यामध्ये देखील
ज्यांना पूर्ण निश्चय राहत नाही तर माया एकदम गिळंकृत करते. ‘एकदम गज को ग्राह हप
कर लेता है (महारथीला विकार रुपी माया एकदम गिळंकृत करून टाकते)’. आश्चर्यवत्
सुनन्ती… जुने तर निघून गेले, त्यांचे देखील गायन आहे, चांगल्या-चांगल्या महारथींना
माया पराभूत करते. बाबांना लिहितात - ‘बाबा, तुम्ही तुमच्या मायेला पाठवू नका’. अरे,
ही माझी थोडीच आहे. रावण त्याचे राज्य स्थापन करतो, आपण आपले राज्य स्थापन करत आहोत.
हे परंपरेने चालत आले आहे. रावणच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. जाणतात रावण शत्रू
आहे, म्हणून त्याला दरवर्षी जाळतात. म्हैसूरमध्ये तर दसरा खूप साजरा करतात, समजत
काहीच नाहीत. तुमचे नाव आहे - ‘शिव शक्ती सेना’. त्यांनी मग नाव - ‘वानर सेना’ असे
घातले आहे. तुम्ही जाणता, खरोखर आपण वानरा प्रमाणे होतो, आता रावणावर विजय प्राप्त
करण्यासाठी शिवबाबांकडून शक्ती घेत आहोत. बाबाच येऊन राजयोग शिकवतात. यावर अनेक कथा
देखील बनविल्या आहेत. अमरकथा देखील म्हणतात. तुम्ही जाणता बाबा आम्हाला अमर कथा
ऐकवतात. बाकी पर्वतावर काही ऐकवत नाहीत. असे म्हणतात की, शंकराने पार्वतीला अमरकथा
ऐकवली. शिव-शंकराचे चित्र देखील ठेवतात. दोघांना एकत्र केले आहे. हा सर्व आहे
भक्तिमार्ग. दिवसें-दिवस सर्व तमोप्रधान होत गेले आहेत. सतोप्रधाना पासून सतो होतात
तेव्हा दोन कला कमी होतात. त्रेताला देखील खरे पाहता स्वर्ग म्हटले जात नाही. बाबा
येतात तुम्हा मुलांना स्वर्गवासी बनविण्यासाठी. बाबा जाणतात ब्राह्मण कुळ आणि
सूर्यवंशी-चंद्रवंशी कुळ दोन्ही स्थापन होत आहेत. रामचंद्राला क्षत्रियाची निशाणी
दिली आहे. तुम्ही सर्व क्षत्रिय आहात ना, जे मायेवर विजय प्राप्त करता. कमी
मार्कांनी पास होणाऱ्याला चंद्रवंशी म्हटले जाते, आणि म्हणूनच रामाला बाण इत्यादी
दिला आहे. हिंसा तर त्रेतामध्ये सुद्धा होत नाही. गायन देखील आहे - ‘राम राजा, राम
प्रजा…’ परंतु ही क्षत्रियपणाची निशाणी दिली आहे त्यामुळे लोक गोंधळून जातात. ही
शस्त्रास्त्रे इत्यादी असत नाहीत. शक्तींना देखील कट्यार इत्यादी दाखवतात. समजत
काहीच नाहीत. तुम्ही मुले आता समजले आहात की बाबा ज्ञानाचा सागर आहेत म्हणून बाबाच
आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. बेहदच्या बाबांचे मुलांवर जेवढे प्रेम आहे,
तेवढे हदच्या पित्याचे असू शकत नाही. २१ जन्मांसाठी मुलांना सुखदाई बनवतात. तर
प्रेमळ बाबा झाले ना! बाबा किती प्रेमळ आहेत, जे तुमची सर्व दुःखे दूर करतात. सुखाचा
वारसा मिळतो. तिथे दुःखाचे नामोनिशाण सुद्धा नसते. आता हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे
ना. हे विसरता कामा नये. किती सोपे आहे, फक्त मुरली वाचून ऐकवायची आहे, तरी देखील
म्हणतात ब्राह्मणी पाहिजे. ब्राह्मणी शिवाय धारणा होत नाही. अरे, सत्य नारायणाची कथा
तर छोटी मुले देखील तोंडपाठ करून ऐकवतात. मी तुम्हाला रोज-रोज समजावून सांगतो -
फक्त अल्फची (बाबांची) आठवण करा. हे ज्ञान तर ७ दिवसांमध्ये बुद्धीमध्ये पक्के झाले
पाहिजे. परंतु मुले विसरून जातात, बाबांना तर आश्चर्य वाटते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांकडे
आशीर्वाद अथवा कृपा मागायची नाहीये. बाबा, टीचर, गुरुची आठवण करून आपणच आपल्यावर
कृपा करायची आहे. माये पासून सावध रहायचे आहे, डोळे धोका देतात, यांना आपल्या
ताब्यात ठेवायचे आहे.
२) फालतू
झरमुई-झगमुईच्या गोष्टी (व्यर्थ गोष्टी) खूप नुकसान करतात म्हणून जितके होऊ शकेल
तितके शांत रहायचे आहे, तोंडामध्ये मोहर ठेवायची आहे. कधीही उलटे-सुलटे बोलायचे नाही.
ना स्वतः अशांत व्हायचे आहे, ना कोणाला अशांत करायचे आहे.
वरदान:-
बाबांच्या
मदतीद्वारे सुळाला काटा बनविणारे सदा निश्चिंत आणि ट्रस्टी भव
मागचा हिशोब आहे सूळ
(मोठी परिस्थिती), परंतु बाबांच्या मदतीमुळे तो काटा बनतो. परिस्थिती जरूर येणार
आहेत कारण सर्व काही इथेच चुकते करायचे आहे; परंतु बाबांची मदत त्यांना काटा बनवते,
मोठ्या गोष्टीला छोटे बनवते कारण मोठे बाबा सोबत आहेत. याच निश्चयाच्या आधारावर
नेहमी निश्चिंत रहा आणि ट्रस्टी बनून ‘माझे’ला ‘तुझे’मध्ये बदलून हलके व्हा तर सर्व
ओझे एका सेकंदामध्ये नाहीसे होईल.
बोधवाक्य:-
शुभ भावनेच्या
स्टॉक द्वारे निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करा.