22-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आता तुम्हाला नवीन दुनियेमध्ये जायचे आहे, हे दुःखाचे दिवस आता संपणार आहेत, त्यामुळे जुन्या घडून गेलेल्या गोष्टींना विसरून जा”

प्रश्न:-
तुम्हा कर्मयोगी मुलांनी कोणता अभ्यास निरंतर केला पाहिजे?

उत्तर:-
आता-आता शरीर निर्वाहासाठी देहामध्ये यावे आणि आता-आता देही-अभिमानी व्हावे. देहाच्या स्मृती शिवाय कर्म तर होऊ शकत नाही, म्हणून हा अभ्यास करायचा आहे की देह-अभिमानी बनलो, कर्म केले आणि मग देही-अभिमानी बना; असा अभ्यास तुम्हा मुलांव्यतिरिक्त या दुनियेमध्ये इतर कोणीही करू शकत नाही.

गीत:-
जाग सजनियां जाग...

ओम शांती।
रुहानी बाबा म्हणतात - गोड-गोड आत्म्यांनी अथवा मुलांनी हे गाणे ऐकले. याला म्हटले जाते - ज्ञानाचे गाणे. हे गाणे तर खूप सुंदर आहे. तुम्ही आत्मे आता जागे झाले आहात. ड्रामाच्या रहस्याला देखील आता तुम्ही जाणले आहे. भक्तिमार्गाचे तर कौतुक पाहिले आहे ना - जे काही घडून गेले ते तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही आपल्या घडून गेलेल्या ८४ जन्मांच्या इतिहासाला जाणता. बाबांनी ८४ जन्मांची कहाणी सांगितली आहे. या आहेत नवीन दुनियेसाठी नवीन गोष्टी. बाबांकडून तुम्ही नवीन गोष्टी ऐकता. बाबा मुलांना धीर देतात. मुलांनो, आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे तर जुन्या गोष्टी विसरून जा. ही वेद-शास्त्रे, जी काही भक्तिमार्गाची सामग्री आहे, हे सर्व नष्ट होणार आहे. तिथे भक्तिमार्गाचा मागमूस सुद्धा उरत नाही. तिथे तर भक्तीचे फळ मिळते. बाबा येऊन भक्तांना फळ देतात. मुलांनी जाणले आहे की, बाबा कसे येऊन भक्तीचे फळ देतात. ज्याने सर्वात जास्त भक्ती केली आहे, त्याला जरूर जास्त फळ मिळेल. ज्ञानाचा पुरुषार्थ देखील तो जास्त करेल. तुम्ही जाणता, आपण आत्म्यांनी जास्त भक्ती केली आहे. जरूर ज्ञानामध्ये देखील ते तीव्र गतीने पुढे जातील; तेव्हा कुठे या लक्ष्मी-नारायणा सारखे उच्च पद प्राप्त करतील. आता ज्ञान आणि योगासाठी तुमचा पुरुषार्थ चालू आहे. देही-अभिमानी होऊन रहायचे आहे आणि मग देहधारी देखील व्हायचे आहे. कर्म करत असताना बाबांची आठवण करायची आहे. देहा शिवाय तर आपण कर्म करू शकत नाही. हे तर ठीक आहे - बाबांची आठवण करायची आहे, परंतु स्वतःला आत्मा समजावे, देहाला विसरून काम होणार नाही, कर्म तर करायचेच आहे. बाबांच्या आठवणीमध्ये खूप मजा आहे. उठता-बसता, चालता-फिरता बाबांची आठवण करा, परंतु तरीही पोटाला भोजन तर पाहिजे. देही-अभिमानी होऊन राहायचे आहे. यावेळी तुम्हा मुलांशिवाय कोणीही देही-अभिमानी नाही. भले स्वतःला आत्मा देखील समजतील, परंतु परमात्म्याचा परिचय नाहीये. भले समजतील आपण आत्मा अविनाशी आहोत, हे शरीर विनाशी आहे. परंतु असे समजल्याने विकर्म विनाश होणार नाहीत. म्हणतात देखील पुण्य-आत्मा, पतित-आत्मा. मी आत्मा आहे, हे माझे शरीर आहे. ही तर कॉमन गोष्ट आहे. मुख्य गोष्ट बाबा समजावून सांगतात की माझी आठवण करा. शरीर निर्वाहासाठी देह-अभिमानामध्ये तर यायचे आहे. देहाला खाऊ घालायचे देखील आहे, देहा शिवाय तर काही करू शकत नाही. प्रत्येक जन्मामध्ये आपला शरीर निर्वाह करत आला आहात, कर्म करत असताना सुद्धा आपल्या माशूकची आठवण ठेवायची आहे. त्या माशूक विषयी कोणालाच पूर्ण माहिती नाहीये. त्या माशूक अथवा बाबांकडून आपल्याला वारसा मिळणार आहे आणि त्यांच्या आठवणीद्वारे विकर्म विनाश होतील, हे कोणीही सांगत नाहीत.

तुम्ही मुले आता नवीन गोष्टी ऐकता. तुम्ही जाणता, आता आपल्याला घरी जाण्याचा रस्ता सापडला आहे. आपल्या घरी जाऊन मग राजधानीमध्ये येऊ. बाबा नवीन घर बनवत आहेत तर जरूर मन होईल ना की तिथे जाऊन रहावे. आता तुम्हाला रस्ता सापडला आहे, ज्याला इतर कोणीही जाणत नाही. कितीही यज्ञ, तप इत्यादी करतात, डोके आपटत राहतात (डोके घासून नमस्कार करत असतात) तरीही सद्गतीला प्राप्त करू शकत नाहीत. या दुनियेमधून त्या दुनियेमध्ये जाऊ शकत नाहीत. हे देखील नीट समजून घेतले पाहिजे. शास्त्रांमध्ये लाखो वर्षे लिहून ठेवली आहेत आणि त्यामुळे मनुष्यांची बुद्धी काम करत नाही. तुम्ही मात्र हे अगदी व्यवस्थित समजू शकता - कालचीच तर गोष्ट आहे. भारत तर स्वर्ग होता, आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो. देवी-देवता धर्म खूप सुख देणारा आहे. भारता सारखे सुख कोणालाही मिळू शकत नाही. इतर कोणत्याही धर्माचा स्वर्गामध्ये तर जाऊच शकत नाही. तुमच्या सारखे सुख इतर कोणालाही मिळू शकणार नाही. कितीही प्रयत्न करो! पैसा खर्च करो, तरीही स्वर्गामध्ये जे सुख आहे ते मिळू शकत नाही. कोणाला हेल्थ असेल तर वेल्थ नसेल. कोणाला वेल्थ असेल तर हेल्थ नसेल. ही आहेच दुःखाची दुनिया, तर आता बाबा म्हणतात - ‘हे आत्म्यांनो, जागे व्हा…’ तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. किती जागरूकता आली आहे. तुम्ही साऱ्या दुनियेचा इतिहास-भूगोल जाणता. बाबा जानी-जाननहार आहेत ना. याचा अर्थ असा नाही की सर्वांच्या मनातले जाणतात. हे कोण आहेत, इतरांना हे ज्ञान किती समजावून सांगतात. हे कितपत पवित्र राहतात, कितपत बाबांची आठवण करतात. प्रत्येका बद्दल हा विचार मी कशाला करत बसू... मी तर मार्ग सांगतो की, तुम्हा आत्म्यांना आपल्या परमपिता परमात्म्याची आठवण करायची आहे. या सृष्टी चक्राला लक्षात ठेवायचे आहे. देही-अभिमानी तर जरूर बनायचे आहे. देह-अभिमानी बनल्यामुळे तुमची ही दुर्गती झाली आहे. आता तुम्हाला बाबांची आठवण करायची आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमल पुष्प समान बनायचे आहे. स्वदर्शन चक्रधारी देखील तुम्ही आहात, शंख इत्यादी काही देवतांकडे नाहीये. हे ज्ञान, शंख इत्यादी तुम्हा ब्राह्मणांकडे आहे. शीख लोक शंख वाजवतात, खूप मोठा ध्वनी करतात. तुम्ही देखील हे ज्ञान बसून ऐकवता तर मोठ्या सभेमध्ये लाऊड-स्पीकर लावता. तुम्हाला इथे लाऊड-स्पीकर लावण्याची गरज नाही. टीचर शिकवताना लाऊड-स्पीकर लावतील काय? इथे तर फक्त शिवबाबांची आठवण करायची आहे तर विकर्म विनाश होतील. मी सर्वशक्तिमान आहे ना. तुम्ही लाऊड-स्पीकर लावता यासाठी की आवाज दूर-दूरपर्यंत ऐकू यावा. ते देखील पुढे चालून कामाला येईल. तुम्हाला हे ऐकवायचे आहे की, ‘मृत्यू समोर आहे’. आता सर्वांना परत जायचे आहे. महाभारत लढाई देखील समोर उभी आहे. गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे की, महाभारत लढाई लागली, विनाश झाला. अच्छा, मग पुढे काय झाले? पांडव देखील वितळून मेले. बाबा समजावून सांगतात, अगोदरच जर विनाश झाला तर मग भारत खंड सुद्धा रिकामा होईल. भारत तर अविनाशी खंड आहे, रिकामा काही होत नाही. तुम्ही जाणता - प्रलय तर होत नाही. बाबा अविनाशी आहेत तर त्यांची बर्थ प्लेस देखील अविनाशी आहे. मुलांना आनंद झाला पाहिजे - बाबा सर्वांचे सद्गतीदाता, सुख-शांती देणारे आहेत. जे पण येतात, म्हणतात - शांती पाहिजे. आत्म्याला शांतीची इतकी आठवण का येते! शांतिधाम आत्म्यांचे घर आहे ना. घर कोणाला लक्षात राहणार नाही? एखाद्या व्यक्तीचा परदेशामध्ये मृत्यू झाला तर डेड-बॉडी आपल्या जन्म भूमीमध्ये घेऊन जाण्याची इच्छा असते. हे जर सर्वांना माहीत असते की भारत हा सर्वांचे सद्गती दाता, दुःखातून मुक्ती देणाऱ्या शिवबाबांची बर्थ प्लेस आहे तर त्यांना खूप मान-सन्मान दिला असता. एकाच शिवावर येऊन फुले अर्पण केली असती. आता तर कित्येक देवतांवर फुले अर्पण करत असतात. जे सर्वांना सुख-शांती देणारे आहेत, त्यांचे नामो-निशाणच नाहीसे करून टाकले आहे. जे बाबांना चांगल्या रीतीने जाणतात तेच वारसा घेण्याचा पुरुषार्थ करतात. माझे नावच आहे - दुःख हर्ता, सुख कर्ता. दुःखातून लिबरेट करून काय करतील! तुम्ही जाणता, शांतिधाम मध्ये शांत असतात, सुखधाम मध्ये सुख आहे. शांतिधामची जागा वेगळी, सुखधामची जागा वेगळी, हे तर आहेच दुःखधाम. सर्वांना यावेळी दुःखच दुःख आहे. आता तुम्ही जाणता, आपण अशा सुखामध्ये जातो, जिथे २१ जन्म कोणत्याही प्रकारचे दुःख असणार नाही. नावच आहे सुखधाम. किती गोड नाव आहे. बाबा म्हणतात - तुम्हाला कोणताही त्रास देत नाही. फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. स्वतःला आत्मा समजायचे आहे. हे ज्ञान तुम्हाला बाबा शिकवत आहेत. सतयुगामध्ये आत्म्याचे ज्ञान असते, ‘मी आत्मा, हे शरीर सोडून दुसरा जन्म घेणार’, याला आत्म-अभिमानी म्हटले जाते. हे आहे रुहानी नॉलेज, जे इतर कोणीही देऊ शकत नाही. आत्म्याला, रुहानी बाबा येऊन नॉलेज देतात. दर ५ हजार वर्षानंतर देतात. मनुष्य तर पूर्णपणे घोर अंधारामध्ये आहेत. आता तुम्हाला प्रकाश मिळाला आहे, तुम्ही अज्ञान निद्रेतून जागे झाला आहात. सर्व सजणींचा साजन आहे - एक बाबा. बाबा म्हणतात - मी तुमचा पिता देखील आहे, साजन देखील आहे, गुरूंचा गुरू देखील आहे. सुप्रीम टीचर आहे. सर्व गुरूंचा सद्गती दाता एकच सद्गुरू आहे. म्हणतात - ‘मुलांनो, मी सर्वांची सद्गती करतो’. गति नंतर सद्गती होते.

बाबांनी समजावून सांगितले आहे - प्रत्येकाच्या आत्म्याला परत घरी जायचे आहे. आत्माच सतोप्रधान, सतो-रजो-तमो बनते. काहीजणांचा खूप कमी पार्ट आहे. आले आणि गेले. जणू डासांसारखे जन्मले आणि मेले. असे आत्मे काही बाबांकडून वारसा घेत नाहीत. बाबांकडून वारसा घेतला जातो - पवित्रता, सुख-शांतीचा. बाबा तुम्हा आत्म्यांना समजावून सांगतात, बाबा तर आहेत निराकार. तरीही ते येऊन या मुखाद्वारे (ब्रह्मा मुखाद्वारे) समजावून सांगतात. शिवबाबांची मंदिरे देखील खूप उंचावर बांधतात. तीर्थ क्षेत्रांवर, जत्रांसाठी किती दूर-दूर जातात. वरती काही पिण्यासाठी ज्ञान अमृत ठेवले आहे काय! किती खर्च करतात. गव्हर्मेंटला देखील त्यांच्यासाठी अनेक व्यवस्था इत्यादी कराव्या लागतात. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. अशा तीर्थक्षेत्रांवर लहान मुलांना कसे घेऊन जायचे? तर मग मुले इत्यादींना कोणाकडे तरी सांभाळण्यासाठी देऊन जातात, सोबत घेऊन जात नाहीत. दोन-तीन महिने यात्रा करतात. इथे तुम्ही येता, तुम्हाला बसून ऐकायचे आहे, अभ्यास करायचा आहे. लहान मुले तर ऐकणार नाहीत. इथे तुम्ही आलाच आहात - योग आणि ज्ञान शिकण्यासाठी. बाबा बसून ज्ञान ऐकवत असतात तर कोणताही आवाज इत्यादी होता कामा नये. नाहीतर लक्ष विचलित होते. शांतपणे बसून लक्षपूर्वक ऐकायचे आहे. योग तर खूप सोपा आहे. काहीही काम करत रहा, बुद्धीचा योग तिथे लागलेला असावा. बाबांची आठवण राहिल्याने कमाई खूप जबरदस्त होते. तुम्ही जाणता, आपण एव्हर हेल्दी बनणार. स्वतःशीच गोष्टी करायच्या असतात. बाबांच्या आठवणीमध्ये राहून भोजन सुद्धा आपल्या हाताने बनवायचे आहे. हातांनी काम देखील करा, बाकी आठवण आपल्या बाबांची करा. तुमचे देखील कल्याण होईल आणि आठवणीमध्ये राहिल्याने पदार्थ देखील चांगले बनतील. तुम्हाला विश्वाची बादशाही मिळते. तुम्ही इथे आलाच आहात - लक्ष्मी-नारायण बनण्याकरिता. सर्वजण म्हणतात, आम्ही सूर्यवंशी बनणार.

तुम्ही जाणता, आपले मम्मा-बाबा यावेळी ब्रह्मा-सरस्वती आहेत. दुसऱ्या जन्मामध्ये लक्ष्मी-नारायण बनतील. पुढच्या जन्मात कोण काय बनेल, हे सांगता येत नाही. नेहरू जाऊन पुढच्या जन्मात कोण बनला, हे कोणालाच ठाऊक नाही. अच्छा, काही दान केले असेल तर इथे चांगल्या कुळामध्ये जन्म घेतील. आता तुम्हाला सर्व काही माहीत आहे. आता यांचे नाव आहे - आदि देव ब्रह्मा, आदि देवी सरस्वती. तेच मग स्वर्गाचे मालक बनतील. अच्छा, यांची मुले देखील सोबत आहेत. ती देखील म्हणतील, आम्ही स्वर्गाचे मालक बनणार. हे तर पक्के आहे. सूक्ष्मवतनमध्ये देखील तुम्ही पाहता - देवींच्या मंदिरामध्ये देखील खूप जत्रा भरतात. आता जगदंबा तर एकच आहे. तिची फीचर्स (रूप-वैशिष्ट्ये) देखील एकच असली पाहिजेत. मम्माला देखील तुम्ही पाहता. तुम्हा मुलांची फीचर्स आहेत मग नावे दिली आहेत - कन्या-कुमारी, अधर-कुमारी. तुम्ही जाणता, आम्हीच बनतो. आपण सर्व आहोत ब्रह्माकुमार-कुमारी. युगल देखील म्हणतात - आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आहोत, एका पित्याची मुले आहोत. तुमचेच यादगार आहे. बरोबर, तुम्ही बसून हे नॉलेज देत आहात, हे दिलवाडा मंदिर अर्थासहित आहे. परंतु हे तुम्हीच समजावून सांगू शकता. तुम्ही जाणता, आपण स्थापना करत आहोत, राजयोगा द्वारे श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवत आहोत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञान आणि योग यावर व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे. ऐकताना अतिशय शांत, एकाग्रचित्त होऊन बसायचे आहे. कर्मयोगी देखील बनायचे आहे.

२) बाबांनी जो घराचा मार्ग सांगितला आहे, तो सर्वांना सांगायचा आहे. स्वदर्शन चक्रधारी बनण्यासोबतच ज्ञान-शंख सुद्धा वाजवायचा आहे.

वरदान:-
‘महान’ आणि ‘मेहमान’ - या दोन स्मृतीं द्वारे सर्व आकर्षणां पासून मुक्त बनणारे उपराम आणि साक्षी भव

उपराम अथवा साक्षीपणाची अवस्था बनविण्याकरिता या दोन गोष्टी लक्षात राहाव्यात - एक तर ‘मी आत्मा महान आत्मा आहे’, दुसरे ‘मी आत्मा आता या जुन्या सृष्टीवर अथवा या जुन्या शरीरामध्ये मेहमान (पाहुणा) आहे’. या स्मृतीमध्ये राहिल्याने, सर्व कमजोरी अथवा आसक्तीची आकर्षणे स्वतःच आणि सहजच नाहीशी होतील. महान समजल्याने साधारण कर्म अथवा संकल्प जे संस्कारांच्या वश चालतात, ते परिवर्तित होतील. ‘महान’ आणि ‘मेहमान’ समजून चालल्याने ‘महिमा’ योग्य देखील बनाल.

बोधवाक्य:-
सर्वांच्या शुभ भावना आणि सहयोगाच्या थेंबाने मोठे कार्य देखील सोपे होते.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

पॉवरफुल (शक्तिशाली) मनाची निशाणी आहे - सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचणे. जेव्हा की मनाला उडणे आले, प्रॅक्टिस झाली, तर सेकंदामध्ये जिथे पाहिजे तिथे पोहोचू शकते. आता-आता साकार वतनमध्ये, आता-आता परमधाममध्ये, सेकंदाची गती आहे. आता याच अभ्यासाला वाढवा, तर आठवण शक्तिशाली बनेल.