22-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, विशाल-बुद्धी बनून मोठ-मोठ्या व्यक्तींचे ओपिनियन घेऊन (अभिप्राय घेऊन) अनेक आत्म्यांचे कल्याण करा, त्यांच्याकडून हॉल इत्यादी घेऊन मोठ्या प्रमाणात प्रदर्शनीचे प्रोग्राम करा”

प्रश्न:-
आता तुम्हाला कोणती स्मृती आली आहे ज्याचे स्मरण कराल तर कधी दुःखी होणार नाही?

उत्तर:-
आता स्मृती आली की, आम्ही पूज्य राव होतो, मग रंक बनलो. आता पुन्हा बाबा आम्हाला राव (राजा) बनवत आहेत. बाबा आता आम्हाला साऱ्या विश्वाचा समाचार सांगत आहेत, आम्हाला जगाचा इतिहास-भूगोल समजला आहे. याच आठवणींचे स्मरण करत राहाल तर कधीही स्वतःला दुःखी समजणार नाही. सदैव खुश राहाल.

गीत:-
नयन हीन को राह दिखाओ प्रभू…

ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांनी गाणे ऐकले. मुले समजतात की, बाबांना भेटणे आणि बाबांकडून वारसा घेणे खूप सोपे आहे. गायले देखील जाते - बाबांकडून एका सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा वारसा मिळतो. जीवनमुक्ती अर्थात सुख-शांती-संपत्ती इत्यादींचा वारसा. आता ‘जीवनमुक्ती’ आणि ‘जीवनबंध’ दोन शब्द आहेत. मुले जाणतात यावेळी भक्तिमार्ग आणि रावण-राज्यामुळे सगळे जीवनबंध मध्ये आहेत. बाबा येऊन बंधनातून मुक्त करतात, वारसा देतात. जसे मुलगा जन्मतो तेव्हा आई-वडील मित्र-संबंधी इत्यादी समजतात की वारस जन्माला आला. जसे हे समजणे सोपे आहे तसे ते देखील सोपे आहे. मुले म्हणतात - ‘बाबा, कल्पापूर्वीप्रमाणे तुम्ही आम्हाला येऊन भेटला आहात. तुमच्याकडूनच सहज वारसा प्राप्त करण्याचा मार्ग मिळाला आहे’. हे तर प्रत्येकजण जाणतात की, नव्या सृष्टीचे रचयिता भगवानच आहेत. ते आम्हाला भटकण्यापासून वाचवतात. काल भक्ती करत होतो, आज बाबांकडून सहज ज्ञान आणि राजयोगाचा मार्ग मिळाला आहे. मुले स्वतःचा अनुभव ऐकवतात की, ‘आम्ही बी.कें.कडून ऐकले की, दोन पिता आहेत’. हे तुमच्या शिवाय दुसरे कोणीही मुखावाटे असे म्हणू शकत नाही की, दोन पिता आहेत. तुमची प्रत्येक गोष्ट आश्चर्यकारक आहे. आता स्मृतीमध्ये येते जे इथले असतील त्यांच्या ताबडतोब स्मृतीमध्ये येईल. हो, स्मृतीमध्ये आलेल्याला देखील माया काही वेळा जोरात थप्पड मारून विस्मृत करून टाकते. म्हणून यामध्ये मुलांनी खूप काळजी घ्यायची आहे. स्मृती तर बाबांनी करून दिली आहे. पवित्रतेचे कांकण देखील पूर्ण बांधायचे आहे. रक्षाबंधनाचे रहस्य काय आहे, ते तर आता तुम्ही जाणता. ही प्रतिज्ञा कोणी करवली आहे. काम-विकार तर महाशत्रू आहे. बाबा म्हणतात - माझ्याशी प्रतिज्ञा करा की, ‘कधीही पतित बनणार नाही’, आणि माझी आठवण करत रहा म्हणजे मग अर्ध्या कल्पाची पापे जळून नष्ट होतील. बाबा गॅरंटी देतात परंतु हे तर मुले समजतात देखील - बाबा गॅरंटी देतात ही गोष्ट तर ठीक आहे ना. सोनार गॅरंटी तरी काय देतील की आम्ही जुन्या दागिन्यांना नवे बनवू. त्यांचे तर हे कामच आहे. आगीमध्ये टाकल्यामुळे नक्की ते खरे सोने बनूनच जाईल. तर बाबा समजावून सांगत आहेत - आत्म्यामध्ये देखील भेसळ पडली आहे. सतो रजो तमो मध्ये कसे येता - हे समजून घेणे खूप सोपे आहे. चित्रे देखील याच्यासाठी बनवली आहेत की यावरून सहज समजावून सांगू शकाल. युनिव्हर्सिटी, कॉलेजेस इत्यादी ठिकाणी देखील अनेक प्रकारचे नकाशे असतात ना. तुमचे देखील हे नकाशे आहेत. तुम्ही कोणालाही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. ज्ञान-सागर पतित-पावन बाबाच येऊन हा मार्ग सांगतात. इतर कोणीही पतिताला पावन बनवू शकत नाही. मनुष्य नयन हीन, दुःखी आहेत. तुम्ही मुले जाणता पहिल्या दोन युगांमध्ये दुःख असत नाही, ना भक्ती असते. तो आहेच स्वर्ग. भारतातील या वेळेच्या मनुष्यांमध्ये आणि भारतातील प्राचीन मनुष्यांमध्ये कॉन्ट्रास्ट (तफावत) आहे ना. परंतु हे इतर कोणीही समजत नाहीत. किती पूजा चालते. जितके-जितके जे श्रीमंत असतात तितके देवी-देवतांना उत्तम दागिने घालतात. बाबा स्वतः अनुभवी आहेत. मुंबईमध्ये लक्ष्मी-नारायणाचे जे मंदिर आहे त्याच्या ट्रस्टीने लक्ष्मी-नारायणासाठी हिऱ्यांचा हार बनवून घेतला होता. बाबांना त्या ट्रस्टीचे नाव देखील लक्षात आहे. सर्वप्रथम शिवबाबाचे मंदिर बनवले तेव्हा त्याला खूप सजवले, त्यानंतर देवतांचे बनवले तर लक्ष्मी-नारायण इत्यादींना देखील किती दागिने घातले. त्यावेळी किती धन असेल. मोहम्मद गजनवी कित्येक उंट भरभरून धन घेऊन गेला. भारतामध्ये अगणित धन होते. आता तुम्ही यथार्थ रीती समजता. आपला भारत काय होता! आमच्या भारतामध्ये कुबेराचा खजिना होता. हिरे-माणकांची मंदिरे बनवत होते. आता त्या गोष्टी राहिलेल्या नाहीत, सर्व लुटून घेऊन गेले. आता तर काय हालत झाली आहे.

तुम्हीच पूज्य राव होता, मग तुम्हीच ८४ जन्म घेऊन पूर्ण रंक बनला आहात. अशा प्रकारच्या गोष्टींचे वारंवार स्मरण केले पाहिजे. म्हणजे मग तुम्ही कधीही स्वतःला दुःखी समजणार नाही. मनात स्मरण करत रहाल - बाबांकडून आम्ही काय घेत आहोत. बाबा येऊन आम्हाला साऱ्या विश्वाचा समाचार ऐकवतात. हा जगाचा इतिहास-भूगोल कोणीही जाणत नाही. तुम्ही जाणता सुरुवातीला एक धर्म, एक राज्य, एकच मत, एक भाषा होती. सर्व सुखी होते. नंतर हे आपसात भांडण-तंटे करू लागले आणि भारताचे तुकडे-तुकडे होऊ लागले. आधी असे नव्हते. तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते. आजाराचे नामोनिशाण नव्हते. त्याचे नावच आहे - स्वर्ग. तुम्हाला स्वतःची स्मृती आली आहे. खरोखर कल्प-कल्प आम्हाला विस्मृती होते आणि मग स्मृती येते. पहिली एकच चूक झाली आहे की, रचता आणि रचनेला विसरलो आहोत. आता तुम्ही आदि-मध्य-अंत जाणता. सतयुगामध्ये देखील हे नॉलेज नसेल, तर मग परंपरा कशी चालत येऊ शकेल. त्यावेळी मुख्य तर राजे लोकच असतात. ऋषी-मुनी थोडेच असतात! ते तर द्वापर पासून येतात. ऋषी-मुनी इत्यादींना खाणे-पिणे देखील राजांकडूनच मिळते. राजे सांभाळ करतात कारण तरीही संन्यास करतात ना. प्राचीन भारताचा ‘प्राचीन राजयोग’ गायला जातो. ‘प्राचीन ऋषी-मुनी’ म्हणत नाहीत. ते तर द्वापरमध्येच येतात. ते राजांच्या आधारे चालतात. म्हणतात - ‘आम्ही रचता आणि रचनेला जाणत नाही’. बाबा म्हणतात - हे स्वतः राजे लोक देखील जाणत नाहीत. या दुनियेमध्ये कोणीही हे नॉलेज जाणत नाहीत. आता तुम्ही मुले हुशार बनले आहात. लक्ष्मी-नारायणाची मंदिरे जे बनवतात त्यांना तुम्ही लिहू शकता - ‘इतके लाखो रुपये खर्च करून तुम्ही मंदिर बनवले आहे परंतु त्यांची जीवन कहाणी तुम्हाला माहीत आहे का? यांनी राज्य कसे मिळवले मग कुठे निघून गेले. आता कुठे आहेत, आम्ही तुम्हाला सर्व रहस्य सांगू शकतो’; असे त्यांना लिहू शकता. तुम्हां मुलांना तर प्रत्येकाची जीवन कहाणी माहीत झाली आहे तर का नाही लिहिले पाहिजे. आम्हाला वेळ द्याल तर आम्ही प्रत्येकाची जीवन कहाणी सांगू. शिवाची मंदिरे जे बनवतात त्यांना देखील तुम्ही लिहू शकता. बनारसमध्ये शिवाचे मंदिर किती भव्य बनवले आहे. तिथे देखील ट्रस्टी लोक असतील. मोठ-मोठ्या व्यक्तींना हे ज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोठ्या व्यक्तींना समजले तर त्याचा जास्त गाजावाजा होतो. गरीब लोक लगेच ऐकतात. मोठ्यांची मदत घ्यायची आहे. मोठ-मोठ्या व्यक्तींचे मत देखील लिहून घ्यायचे आहे कारण त्यांचा आवाज देखील मदत करतो. प्रत्यक्षात ते इतका गाजावाजा करत नाहीत जितका झाला पाहिजे. तुम्ही राष्ट्रपतींना देखील समजावून सांगता. ते ‘छान-छान’ असे देखील म्हणतात. मुख्यमंत्री, गव्हर्नर इत्यादी उद्घाटन करतात, लिहितात - ‘हे बी.के. तर ईश्वराला भेटण्याचा खूप चांगला, सोपा मार्ग सांगतात’. परंतु ईश्वर काय गोष्ट आहे, हे काहीही समजत नाहीत. फक्त त्यावेळी म्हणतात मार्ग खूप चांगला आहे. शांती मिळवण्याचा मार्ग छान आहे. परंतु स्वतः समजत नाहीत.

बाबा मोठ-मोठ्या व्यक्तींना हे ज्ञान समजावून सांगण्यासाठी देखील सांगतात. मोठ्या व्यक्तींकडून मोठ-मोठे जे नावाजलेले हॉल आहेत ते घ्या. सांगा - आम्ही सर्व मनुष्यांच्या कल्याणासाठी ही प्रदर्शनी कायमची इथे ठेवू इच्छितो, फक्त जाहिरात करायची आहे. असे ५० अथवा १०० हॉल घेतले पाहिजेत. भारत तर खूप मोठा आहे ना. एका-एका शहरामध्ये दहा-बारा हॉल घ्या. वर्तमानपत्रामध्ये छापा की, इतक्या-इतक्या हॉल मध्ये प्रदर्शनी होत आहे, ज्यांना समजून घ्यायचे आहे त्यांनी येऊन समजून घ्या. तर किती लोकांचे कल्याण होईल. मुलांनी खूप विशाल-बुद्धी बनले पाहिजे. मुलांनी सेवा केली पाहिजे ना. बाबा सर्व मुलांना सांगतात प्रदर्शनी खूप वाजत-गाजत करा. बाबा तयारी करून घेत आहेत. मुलांनी प्रयत्न केले पाहिजेत, या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. भगवान येऊन प्रजापिता ब्रह्मा द्वारा प्रजेची रचना रचतात. तर जरूर किती ब्राह्मण रचले असतील. आता पुन्हा रचत आहेत. किती ब्राह्मण-ब्राह्मणी आहेत. बाबा हा ब्राह्मण धर्म संगमावर रचतात. तुम्ही प्रत्यक्षात बघत आहात आणि समजत आहात. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. तुम्ही मुले समजता - बाबा येतातच तेव्हा, जेव्हा पतित दुनियेला पावन बनवायचे असते. हे देखील जाणता परमात्मा प्रजापिता ब्रह्माद्वारेच रचना रचतात. परंतु केव्हा रचतात - हे समजत नाहीत. त्यांना वाटते की, कोणती नवीन रचना रचत असतील. ब्रह्माला तर सूक्ष्मवतन मध्ये आहेत असे समजतात. आता तुम्ही समजता - प्रजापिता ब्रह्मा तर इथे आहेत. तुम्ही सूक्ष्मवतन मध्ये जाता. पवित्र बनून मग फरिश्ते बनता, साक्षात्कार करता. मुले येऊन ऐकतात. तिथे मूव्ही चालते (मूक संवाद चालतो). ते आहेच मूव्ही वर्ल्ड, तुम्ही (मूक चित्रपट) देखील बघितला होता. आता प्रॅक्टिकलमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत. मूलवतन आहे सायलेन्स वर्ल्ड, तिथे आत्मे राहतात. सूक्ष्मवतनमध्ये सूक्ष्म शरीर देखील आहे. तर जरूर कोणती भाषा देखील असेल. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आम्हा आत्म्यांचे स्थान शांतीधाम आहे. त्यानंतर आहे - सूक्ष्मवतन. तिथे ब्रह्मा-विष्णू-शंकर राहतात. आणि हा आहे कलियुग आणि सतयुगाचा संगम. इथे बाबा येतात, इथून तुम्ही ब्राह्मण जाता. माहेर आणि सासर आहे ना. इथे दोन्ही तुमची माहेर आहेत. मुलांना फूल बनविण्याकरिता बापदादा दोघेही मेहनत करतात. मुसलमान देखील म्हणतात - गार्डन ऑफ अल्लाह. कराची मध्ये एक पठाण होता - तो समोर उभा रहायचा. बघता-बघता खाली कोसळायचा. विचारल्यावर म्हणायचा - ‘मी खुदाच्या बागेमध्ये गेलो, खुदाने फूल दिले’. आता त्याला ज्ञान तर काही नव्हते. आत्ता तुम्ही समजता बगीचा कशाला म्हटले जाते. हे आहे काट्यांचे जंगल आणि तो आहे फुलांचा बगीचा. तुमच्या बुद्धीत सर्व रहस्य आहे. सतयुग काय आहे, कलियुग काय आहे. तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे. संपूर्ण चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आहे. याचा विस्तार तर खूप आहे. तुमच्या बुद्धीमध्ये किती थोडक्यात पक्के झाले आहे.

तुम्हा मुलांनी, रचता बाबांद्वारे रचता आणि रचनेला जाणले आहे. ब्रह्माला रचता म्हणता येणार नाही. रचता एक आहेत - बलिहारी देखील एकाचीच आहे. सर्वप्रथम ब्रह्माची रचना आहे, नंतर मग श्रीकृष्णाची म्हणू. ब्रह्मा तर आहे, ब्राह्मण देखील जरूर पाहिजेत. पांडवांना काही ब्राह्मण समजणार नाही. ब्रह्मा द्वारा ब्राह्मण पाहिजेत. हा आहे रूहानी यज्ञ, याला स्पिरिच्युअल नॉलेज म्हटले जाते. आत्म्यांना तेच बाबा ज्ञान देतील. तुम्ही जाणता आम्हाला मनुष्य शिकवत नाही. सर्व आत्म्यांना बाबा शिकवतात. म्हणतात देखील - ब्रह्माद्वारे स्थापना. श्रीकृष्णासाठी थोडेच म्हणणार, तो तर असू देखील शकत नाही. ब्रह्मा द्वारे स्थापना कोण करवून घेतात? श्रीकृष्ण करवून घेतात का? नाही, परमपिता परमात्मा. विष्णू द्वारा पालना. ब्रह्मा आणि विष्णूचा किती पार्ट आहे. ब्रह्मामुखवंशावलीच मग जाऊन विष्णुपुरीचे देवता बनतात. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे. ब्रह्मा सो विष्णू बनण्यासाठी एक सेकंद, विष्णू सो ब्रह्मा बनण्यासाठी ८४ जन्म. किती आश्चर्यकारक गोष्टी आहेत. कोणीही समजू शकणार नाहीत. या आहेत बेहदच्या गोष्टी. बेहदच्या बाबांकडून बेहदचे शिक्षण शिकून बेहदचे राज्य घ्यायचे आहे. सृष्टीचक्राला जाणून घ्यायचे आहे. आत्माच शरीराद्वारे जाणते. असे नाही की शरीर आत्म्याद्वारे नॉलेज घेते. नाही, आत्मा नॉलेज घेते. तुम्हाला किती आनंद होतो. हा आंतरिक गुप्त आनंद झाला पाहिजे. शिक्षणाचे संस्कार आत्म्यामध्ये आहेत. दुःख देखील आत्म्याला होते. म्हणतात - आमच्या आत्म्याला दुःखी करू नका. मुलांना आता ज्ञानरुपी किती प्रकाश मिळत आहे. तुम्हाला आनंद होतो. सागराकडून रिफ्रेश होऊन ढगांना एकत्र मिळून वर्षा करायची आहे. आपसामध्ये मिळून प्रदर्शनी इत्यादी तयार करण्यासाठी मदत करा. आवड असली पाहिजे. सेवा, सेवा आणि सेवा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांकडून मिळालेल्या नॉलेजचे स्मरण करून अपार खुशीत राहायचे आहे. विशाल-बुद्धी बनून जोमाने, उत्साहात सेवा करायची आहे.

२) बाबांकडून जी स्मृती मिळाली आहे तिला विस्मृतीमध्ये जाऊ द्यायचे नाही. बाबांकडे पवित्र राहण्याची जी प्रतिज्ञा केली आहे त्याला पूर्णपणे निभावायचे आहे.

वरदान:-
न्यारेपणाच्या अभ्यासाद्वारे फरिश्ता स्वरूपाचा साक्षात्कार करणारे निरंतर सहजयोगी भव

जसे कोणतेही वस्त्र धारण करणे अथवा न करणे आपल्या हातात असते, तसा अनुभव या शरीररूपी वस्त्राच्या बाबतीत असावा. जसे वस्त्राला धारण करून कार्य केले आणि कार्य पूर्ण होताच वस्त्रापासून न्यारे झाले. शरीर आणि आत्मा दोन्हींचा न्यारेपणा चालता-फिरता अनुभव व्हावा, तेव्हा म्हणणार - निरंतर सहजयोगी. अशा डिटॅच (अलिप्त) राहणाऱ्या मुलांद्वारे अनेक आत्म्यांना फरिश्ता रूप आणि भविष्य राज्य पदाचे साक्षात्कार होतील. शेवटी या सेवेद्वारेच प्रभाव निर्माण होईल.
 

बोधवाक्य:-
संगमातला एक सेकंद देखील व्यर्थ घालवणे अर्थात एक वर्ष गमावणे आहे.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

ब्राह्मण जीवनाचा जो आंतरिक वारसा - सदा सुख स्वरूप, शांत स्वरूप, मनाची संतुष्टता आहे, त्याचा अनुभव करण्यासाठी मनाची पवित्रता पाहिजे. जमा करण्याची विधी आहे - मनसा-वाचा-कर्मणामध्ये पवित्रता. फाऊंडेशन पवित्रता आहे. सेवेच्या सफलतेचा आधार देखील पवित्रता आहे. संकल्पामध्ये अथवा बोलण्यामध्ये कोणताही दुसरा भाव मिक्स होऊ नये. भावामध्ये देखील पवित्रता, भावनेमध्ये देखील पवित्रता असावी.