22-09-24 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.01.2002 ओम शान्ति
मधुबन
“स्नेहाच्या
शक्तीद्वारे समर्थ बना, सर्व आत्म्यांना सुख-शांतीची ओंजळ द्या”
आज समर्थ बाबा आपल्या
स्मृती स्वरूप, समर्थ स्वरूप मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. आज विशेष चोहो बाजूच्या
मुलांमध्ये स्नेहाची लाट पसरली आहे. विशेष ब्रह्मा बाबांच्या स्नेहाच्या आठवणीमध्ये
गढून गेले आहेत. हा स्नेह प्रत्येक मुलाला या जीवनातील वरदान आहे. परमात्म
स्नेहानेच तुम्हा सर्वांना नवीन जीवन दिले आहे. प्रत्येक मुलाला स्नेहाच्या
शक्तीनेच बाबांचे बनविले आहे. ही स्नेहाची शक्ती सर्वकाही सोपे करते. जेव्हा
स्नेहामध्ये सामावून जाता तेव्हा कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये हलकेपणा
अनुभव करता. बापदादा देखील म्हणतात कि सदैव स्नेहाच्या सागरामध्ये सामावलेले रहा.
स्नेह, छत्रछाया आहे, ज्या छत्रछायेच्या आत कधीही मायेची सावली सुद्धा पडू शकत नाही.
सहजच मायाजीत बनता. जो निरंतर स्नेहामध्ये राहतो त्याला कोणत्याही गोष्टीसाठी मेहनत
करावी लागत नाही. स्नेह, सहजपणे बाप समान बनवितो. स्नेहापुढे काहीही समर्पित करणे
सोपे असते.
तर आज देखील अमृतवेले
पासून प्रत्येक मुलाने बाबांना स्नेहाची माळा घातली आणि बाबांनी देखील स्नेही
मुलांना स्नेहाची माळा घातली. जसे या विशेष स्मृतीदिनाला अर्थात स्नेहाच्या दिवशी
स्नेहामध्ये सामावलेले राहिलात असेच कायमचे सामावून रहा, तर मेहनत करण्याचा
पुरुषार्थ करावा लागणार नाही. एक आहे स्नेहाच्या सागरामध्ये बुडून राहणे आणि दुसरे
आहे स्नेहाच्या सागरामध्ये थोड्या वेळासाठी डुबकी मारणे. तर बरीच मुले सामावून राहत
नाहीत, लवकर बाहेर निघून येतात त्यामुळे जे सोपे असते ते कठीण वाटू लागते. तर
सामावून जायला येते ना? सामावून जाण्यामध्येच मजा आहे. ब्रह्मा बाबांनी सदैव
पित्याचा स्नेह हृदयामध्ये सामावून ठेवला, याचे यादगार (प्रतीक) कलकत्त्यामध्ये
दाखवले आहे. (गंगा सागरामध्ये विलीन होते)
आता बापदादा सर्व
मुलांकडून हीच आशा ठेवतात कि बाबांवरील प्रेमाचा पुरावा म्हणून समान बनून दाखवा.
संकल्प नेहमी समर्थ असावेत, आता ‘व्यर्थ’चा समाप्ती समारोह साजरा करा कारण व्यर्थ
‘समर्थ’ बनू देणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही निमित्त बनलेली मुले कायमचे समर्थ बनत
नाही तर मग विश्वाच्या आत्म्यांना समर्थी (शक्ति) कसे देणार! सर्व आत्मे शक्तीहीन
होऊन, शक्तींच्या बाबतीत भिकारी बनले आहेत. अशा भिकारी आत्म्यांना हे समर्थ
आत्म्यांनो, या भिकारीपणामधून मुक्त करा. तुम्हा समर्थ आत्म्यांना हे आत्मे बोलावत
आहेत - ‘हे मुक्तीदात्याच्या मुलांनो, मास्टर मुक्तीदाता आम्हाला मुक्ती द्या’. हा
आवाज तुमच्या कानावर पडत नाही काय? ऐकू येत नाही का? अजून पर्यंत स्वतःलाच मुक्त
करण्यामध्ये बिझी आहात काय? विश्वातील आत्म्यांकरिता बेहद स्वरूपामध्ये मास्टर
मुक्तीदाता बनल्याने स्वतःच्या छोट्या-छोट्या गोष्टींपासून आपोआपच मुक्त व्हाल. आता
ती वेळ आली आहे, आत्म्यांची हाक ऐका. हाक ऐकू येते कि नाही? त्रस्त आत्म्यांना
सुख-शांतीची ओंजळ द्या. हेच आहे ब्रह्मा बाबांना फॉलो करणे.
आज विशेष ब्रह्मा
बाबांची आठवण जास्त केली ना! ब्रह्मा बाबांनी सुद्धा सर्व मुलांची स्मृती आणि समर्थी
स्वरूपामध्ये आठवण केली. बऱ्याच मुलांनी ब्रह्मा बाबांसोबत रुहरिहान करताना गोड-गोड
तक्रार सुद्धा केली कि, ‘तुम्ही इतक्या लवकर का निघून गेलात?’ आणि दुसरी तक्रार केली
कि, ‘आम्हा सर्व मुलांचा निरोप घेऊन का गेला नाहीत?’ तर ब्रह्मा बाबा म्हणाले कि,
‘मी सुद्धा शिवबाबांना विचारले कि मला अचानक का बोलावून घेतले?’ तर बाबा (शिवबाबा)
म्हणाले - ‘जर तुम्हाला म्हटले असते कि निरोप घेऊन या तर काय तुम्ही मुलांना सोडून
येऊ शकला असता, किंवा मुलांनी तुम्हाला जाऊ दिले असते का?’ तुम्हा अर्जुनाचे हेच तर
यादगार आहे कि शेवटी नष्टोमोहा स्मृती स्वरूपच राहिले. तर ब्रह्मा बाबा हसले आणि
म्हणाले की, ‘हि तर कमाल होती, जे मुलांना सुद्धा समजले नाही कि ब्रह्मा बाबा जात
आहेत आणि ब्रह्मा बाबांना सुद्धा समजले नाही मी जात आहे’. समोर असून देखील
दोन्हीकडील गप्प राहिले कारण समयानुसार ‘सन शोज फादर’ या पार्टची ड्रामामध्ये नोंद
होती, याला म्हटले जाते - ‘वाह ड्रामा वाह!’ सेवेचे परिवर्तन पूर्व नियोजित होते.
ब्रह्मा बाबांना मुलांचा बॅकबोन बनायचे होते. तर अव्यक्त रूपामध्ये फास्ट सेवेचा
पार्ट बजावायचाच होता.
विशेष आज डबल
विदेशींनी खूप गोड-गोड तक्रारी केल्या आहेत. डबल फॉरेनर्सनी तक्रारी केल्या? डबल
फॉरेनर्स ब्रह्मा बाबांना म्हणाले - ‘निदान दोन-तीन वर्ष तुम्ही थांबला असता तर
आम्ही बघितले तरी असते. तर ब्रह्मा बाबा हसत म्हणाले, थट्टा केली - ‘मग ड्रामाशी
बोला, ड्रामाने असे का केले?’ परंतु हे लास्ट सो फास्टचे उदाहरण बनणारच होते - भले
मग भारतामध्ये असो, किंवा विदेशामध्ये असो, त्यामुळे आता लास्ट सो फास्टचा
प्रत्यक्ष पुरावा दाखवा. जसा आज समर्थ दिवस साजरा केलात, आता असाच प्रत्येक दिवस
समर्थ दिवस असावा. कोणत्याही प्रकारची हलचल नसावी. ब्रह्मा बाबांनी आजच्या दिवशी जी
शिकवण दिली, (निराकारी, निर्विकारी आणि निरहंकारी) या तीन शब्दांच्या शिकवणीचे
मूर्त स्वरूप बना. मनसामध्ये निराकारी, वाचेमध्ये निरहंकारी, कर्मणामध्ये निर्विकारी.
सेकंदामध्ये साकार स्वरूपामध्ये या, सेकंदामध्ये निराकारी स्वरूपामध्ये स्थित व्हा.
हा अभ्यास पूर्ण दिवसभरामध्ये वारंवार करा. असे नाही कि फक्त योग करायला बसले असताना
निराकारी स्टेजमध्ये स्थित रहा; परंतु मधून-मधून वेळ काढून या देहभानापासून न्यारे
निराकारी आत्मा स्वरूपामध्ये स्थित होण्याचा अभ्यास करा. कोणतेही कार्य करा, कार्य
करत असताना सुद्धा हा अभ्यास करा कि, ‘मी निराकार आत्मा या साकार कर्मेंद्रियांच्या
आधारे कर्म करत आहे’. निराकारी स्थिती करावनहार स्थिती आहे. कर्मेंद्रिये करनहार
आहेत, आत्मा करावनहार आहे. तर निराकारी आत्मस्थिती द्वारे निराकारी बाबांची आठवण
आपोआपच येते. जसे बाबा करावनहार आहेत तशी मी आत्मा देखील करावनहार आहे, त्यामुळे
कर्माच्या बंधनामध्ये बांधले जाणार नाही, न्यारे राहाल कारण कर्माच्या बंधनामध्ये
फसल्यानेच समस्या येतात. संपूर्ण दिवसभरामध्ये चेक करा - ‘करावनहार आत्मा बनून कर्म
करून घेत आहे?’ अच्छा! आता मुक्ती देणारी मशीनरी वेगवान करा.
अच्छा - यावेळी जे या
कल्पामध्ये पहिल्यांदा आले आहेत, त्यांनी हात वर करा. तर नवीन येणाऱ्या मुलांना
बापदादा विशेष प्रेमपूर्वक आठवण देत आहेत कि वेळेवर बाबांना ओळखून बाबांकडून
मिळालेल्या वारशाचे अधिकारी बनले आहेत. कायम आपल्या या भाग्याला लक्षात ठेवा कि,
‘आम्ही बाबांना ओळखले आहे’.
अच्छा - डबल फॉरेनर्स
हात वर करा. खूप छान. डबल फॉरेनर्सना बापदादा म्हणत आहेत की ब्रह्माच्या
संकल्पाद्वारे जन्मले आहात. एक आहे डायरेक्ट मुखाद्वारे वंशावळी आणि दुसरी आहे
संकल्पाद्वारे वंशावळी. तर संकल्प शक्ती खूप महान असते. जशी संकल्प शक्ती फास्ट आहे,
तशीच तुमची रचना डबल फॉरेनर्स फास्ट पुरुषार्थ आणि फास्ट प्रारब्ध अनुभव करणारे
आहेत त्यामुळे पूर्ण ब्राह्मण परिवारामध्ये तुम्ही डबल फॉरेनर्स डबल सिकीलधे आहात.
भारतातील भाऊ-बहीणी तुम्हाला पाहून खुश होतात, वाह डबल फॉरेनर्स वाह! डबल फॉरेनर्सना
आनंद होतो ना? किती आनंद होतो? भरपूर आनंद होतो? अशी कोणती वस्तूच नाही ज्याच्याशी
तुलना करू शकतो. डबल फॉरेनमध्ये देखील ऐकत आहेत, बघत सुद्धा आहेत. चांगले आहे, हि
विज्ञानाची साधने तुम्हाला बेहदची सेवा करण्यासाठी खूप मदत करतील आणि सेवा सुलभ
करून देतील. तुमच्या स्थापनेच्या कार्यामध्ये हातभार म्हणूनच या विज्ञानाची देखील
अतिवेगाने प्रगती झाली आहे.
अच्छा - सर्व पांडव
समर्थ आहेत ना? कमजोर तर नाहीत ना, सगळे समर्थ आहेत? आणि शक्ती, पित्या समान आहेत?
शक्ती सेना आहात. शक्तींची शक्ती मायाजीत बनविणारी आहे. अच्छा.
आज विशेष सजावट करणारे
देखील आले आहेत (कलकत्त्याचे भाऊ-बहीणी फुले घेऊन आली आहेत, सर्वत्र फुलांची खूप
छान सजावट केली आहे) ही देखील स्नेहाची निशाणी आहे. चांगले आहे आपल्या स्नेहाचा
पुरावा दिला. अच्छा. टीचर्स हात वर करा. प्रत्येक ग्रुपमध्ये टीचर्स खूप येतात.
टीचर्सना चांगला चान्स मिळतो. सेवेचे प्रत्यक्ष फळ मिळते. चांगले आहे, आता आपल्या
फीचर्सद्वारे सर्वांना फ्युचरचा साक्षात्कार घडवा. ऐकले, काय करायचे आहे? अच्छा.
मधुबनवाले हात वर करा
- खूप छान. मधुबनवाल्यांना चान्स खूप मिळतात म्हणून बापदादा म्हणतात मधुबनवाले
रुहानी चान्सलर्स आहेत. चान्सलर आहात ना? सेवा करावी लागेल. तरीही मधुबन निवासी
सर्वांना संतुष्ट तर करतात ना! म्हणून बापदादा मधुबनवाल्यांना कधी विसरत नाहीत.
मधुबन निवासींना विशेष आठवण करतात. मधुबनवाल्यांची का आठवण काढतात? कारण मधुबनवाले
बाबांच्या प्रेमामध्ये मेजॉरिटी पास आहेत. मेजॉरिटी, बाबांवर अतूट प्रेम आहे.
मधुबनवाले कमी नाहीत, अतिशय चांगले आहेत.
इंदोर झोनचे सेवाधारी
आले आहेत -
इंदोर झोनवाले हात वर करा. भरपूर आहेत, चांगले आहे. सेवा करणे अर्थात जवळ येण्याचे
फळ खाणे. सेवेचा चान्स घेणे अर्थात पुण्य जमा करणे. आशीर्वाद जमा करणे. तर सर्व
सेवाधारींनी आपले पुण्याचे खाते जमा केले. हे आशीर्वाद अथवा पुण्य एक्स्ट्रा लिफ्टचे
काम करते.
अच्छा - देश आणि
विदेश जे दूर बसून देखील जवळ आहेत, सर्व मुलांना बापदादा स्नेहाच्या दिवसाच्या
रिटर्नमध्ये पद्मगुणा स्नेहाची प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. बापदादा बघतात कि कुठे
किती वाजले, कुठे काय टाइम असतो परंतु जागती ज्योती अथक बनून ऐकत आहेत आणि खुश होत
आहेत. बापदादा मुलांची खुशी बघत आहेत. बोला, सर्व खुशीमध्ये नाचत आहात ना? सर्व मान
हलवत आहेत, होय बाबा. जनक बच्ची सुद्धा खूप गोड-गोड हसत आहे. तसे तर सर्वजण
बाबांच्या लक्षात आहेत परंतु किती जणांचे नाव घेऊ. पुष्कळ मुले आहेत म्हणून बापदादा
म्हणतात प्रत्येक मुल आपल्या नावाने पर्सनल प्रेमपूर्वक आठवण स्वीकार करत आहे आणि
करत रहा. अच्छा - आता एका सेकंदामध्ये निराकारी स्थितीमध्ये स्थित व्हा. (बापदादांनी
ड्रिल करून घेतले)
लिव्हींग व्हॅल्यूजचे
(जीवन मूल्यांचे) ट्रेनिंग चालू आहे - चांगले सेवेचे साधन आहे. लिव्हींग व्हॅल्यू
शिकवता-शिकवता आपल्या लव्हली लिव्हींगचा सुंदर जीवनाचा) अभ्यास वाढवत रहा.
अच्छा - आज बापदादा
एक गोष्ट गुलज़ार बच्चीला सांगत होते, विशेष मुबारक देत होते कि ब्रह्मातनाची सेवा
जशी या रथाने देखील ३३ वर्षे पूर्ण केली. हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. बाबांची
मदत आणि मुलीची हिम्मत, दोन्ही मिळून पार्ट बजावतात. अच्छा!
सर्व सदैव स्नेहाच्या
सागरामध्ये सामावलेले, सदैव प्रेमामध्ये लीन राहणारे, सदैव करावनहार आत्मा
स्वरूपामध्ये स्थित राहणारे, सदैव तीन शब्दांच्या “शिव-मंत्रा”ला प्रत्यक्ष
जीवनामध्ये आणणारे, सदैव बाबांसारखे मास्टर मुक्तिदाता बनून विश्वातील आत्म्यांना
मुक्ती देणारे अशा सर्व श्रेष्ठ आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
दादीजीं सोबत संवाद -
आजच्या दिवशी बाबांनी
मुलांना विशेष विश्वाच्या समोर प्रत्यक्ष केले. बाबा करावनहार बनले आणि मुलांना
करनहार बनविले. चांगले आहे, ही स्नेहाची लाट सर्वांना सामावून घेते. अच्छा - शरीराला
चालविण्याची विधी आली आहे ना! चालता-चालता बाप समान अव्यक्त बनाल. सोपा पुरुषार्थ
आहे - आशीर्वाद. पूर्ण दिवसभरामध्ये कोणीही नाराज होऊ नये, आशीर्वाद मिळावा - हा आहे
फर्स्टक्लास पुरुषार्थ. सोपा देखील आहे आणि फर्स्ट सुद्धा आहे. बरोबर आहे ना! शरीर
कसेही असो परंतु आत्मा तर शक्तिशाली आहे ना! तर तुम्ही सर्व मुलांनी जी १४ वर्षे
तपस्या केली, ते तपस्येचे बळ सेवा करवून घेत आहे. आता तर तुमचे भरपूर साथीदार बनले
आहेत. चांगले-चांगले सेवेचे साथीदार आहेत. बस तुम्हाला पाहून खुश होतात, हेच खूप आहे.
ठीक आहे.
वरिष्ठ मोठ्या
भावांसोबत संवाद -
ड्रामा अनुसार जे
सेवेचे प्लॅन बनतात, ते चांगले बनत आहेत आणि प्रत्येकजण नेहमी संघटनमध्ये स्नेह अथवा
आशीर्वाद घेण्यासाठी ‘बालक सो मालक’चा पाठ पक्का करून एकमेकांना पुढे करत,
एकमेकांच्या विचारांना देखील सन्मान देत पुढे जात आहात तर यशच यश आहे. यश तर
मिळणारच आहे. परंतु आता जे निमित्त आत्मे आहेत त्यांना विशेष स्नेहाच्या संबंधामध्ये
आणा; सर्वांच्या या पुरुषार्थाला वेगवान बनवायचे आहे. स्नेह, निःस्वार्थ स्नेह, जिथे
निःस्वार्थ स्नेह आहे ते सन्मान देतील सुद्धा आणि घेतील सुद्धा. वर्तमान वेळी
स्नेहाच्या माळेमध्ये सर्वांना ओवणे, हेच विशेष आत्म्यांचे कार्य आहे आणि याद्वारेच
स्नेह संस्कारांना परिवर्तन सुद्धा करू शकतो. ज्ञान प्रत्येकाकडे आहे परंतु स्नेह
कसेही संस्कार असणाऱ्याला जवळ आणू शकतो. स्नेहाचे फक्त दोन शब्द कायमसाठी त्यांच्या
जीवनाचा सहारा बनू शकतात. नि:स्वार्थ स्नेह लवकरात लवकर माळा तयार करेल.
ब्रह्माबाबांनी काय केले? स्नेहाद्वारे आपले बनविले. तर आज याची आवश्यकता आहे. असे
आहे ना!
(आत्म-अनुभूति
करविण्यासाठी साधनांचा उपयोग कसा करावा यावर सोनीपतसाठी मिटिंग होत आहे) ते तर
प्लॅन बनवत आहेत, प्रत्येकाचे संकल्प, विचारांना जे विशेष मेजॉरिटी स्वीकार करतील,
ते बनवा. अनुभूति तेव्हा करवू शकाल जेव्हा अनुभूति स्वरूप बनाल. अच्छा.
वरदान:-
दृढतेच्या
शक्तीद्वारे सफलता प्राप्त करणारे त्रिकालदर्शी आसनधारी भव
दृढतेची शक्ति
श्रेष्ठ शक्ति आहे जी निष्काळजीपणाच्या शक्तिला सहजच परिवर्तन करते. बापदादांचे
वरदान आहे - जिथे दृढता आहे तिथे सफलता आहेच. फक्त जशी वेळ, तशा विधीद्वारे सिद्धी
स्वरूप बना. कोणतेही कर्म करण्यापूर्वी त्याच्या आदि-मध्य-अंताचा विचार करून कार्य
करा आणि करवून घ्या अर्थात त्रिकालदर्शी आसनधारी बना तेव्हा निष्काळजीपणा नाहीसा
होईल. संकल्प रुपी बीज शक्तिशाली दृढता संपन्न असेल तर वाणी आणि कर्मामध्ये सहज
सफलता आहेच.
सुविचार:-
सदैव संतुष्ट राहून
सर्वांना संतुष्ट करणारेच संतुष्टमणी आहेत.