22-10-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा तुम्हाला जे नॉलेज शिकवतात, त्यामध्ये रिद्धी-सिद्धीची गोष्ट नाही,
शिक्षणामध्ये कोणत्याही छू मंत्राने काम होत नाही”
प्रश्न:-
देवतांना
हुशार म्हणू शकतो, मनुष्यांना नाही - असे का?
उत्तर:-
कारण देवता आहेत सर्वगुण संपन्न आणि मनुष्यांमध्ये कोणताही गुण नाही आहे. देवता
हुशार आहेत तेव्हाच तर मनुष्य त्यांची पूजा करतात. त्यांची बॅटरी चार्ज आहे म्हणून
त्यांना वर्थ पाउंड (हिरे तुल्य) म्हटले जाते. जेव्हा बॅटरी डिस्चार्ज होते, वर्थ
पेनी (कवडी तुल्य) बनतात तेव्हा म्हटले जाते बेअक्कल.
ओम शांती।
बाबांनी मुलांना समजावून सांगितले आहे की, ही पाठशाळा आहे. हे शिक्षण आहे. या
शिक्षणामुळे हे पद प्राप्त होते, याला स्कूल अथवा विद्यापीठ समजले पाहिजे. इथे खूप
लांबून शिकण्यासाठी येतात. काय शिकण्यासाठी येतात? हे एम ऑब्जेक्ट बुद्धीमध्ये आहे.
आम्ही शिक्षण शिकण्यासाठी येतो, शिकवणाऱ्याला टीचर म्हटले जाते. भगवानुवाच आहे
देखील - गीता; दुसरी कोणतीही गोष्ट नाही. गीता शिकवणाऱ्याचे पुस्तक बनलेले आहे,
परंतु ते स्वतः काही पुस्तकातून वगैरे शिकवत नाहीत. गीता काही त्यांच्या हातामध्ये
नाही आहे. हे तर भगवानुवाच आहे. मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. भगवान उच्च ते
उच्च आहेत आणि ते एकच आहेत. मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूल वतन - हे आहे सारे विश्व.
खेळ काही सूक्ष्मवतन किंवा मूलवतनमध्ये चालत नाही, नाटक इथेच चालते. ८४ चे चक्र
देखील इथेच आहे. यालाच म्हटले जाते ८४ च्या फेऱ्याचे नाटक. हा पूर्व नियोजित खेळ आहे.
या अत्यंत महत्वाच्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत कारण उच्च ते उच्च भगवान
त्यांचे तुम्हाला मत मिळते. दुसरी तर कोणती गोष्ट नाही आहे. त्या एकालाच म्हटले जाते
सर्वशक्तिमान, वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी. ऑथॉरिटीचा अर्थ देखील ते स्वतः समजावून
सांगतात. हे मनुष्यांना समजत नाही कारण ते सर्व आहेत तमोप्रधान, याला म्हटलेच जाते
कलियुग. असे नाही की, कोणासाठी कलियुग आहे, कोणासाठी सतयुग आहे आणि कोणासाठी त्रेता
आहे. नाही, जसे की आत्ता आहेच नरक तर मग कोणताही मनुष्य असे म्हणू शकत नाही की
आमच्यासाठी स्वर्ग आहे कारण आमच्याकडे धन-दौलत भरपूर आहे. असे होऊ शकत नाही. हा तर
पूर्व नियोजित खेळ आहे. सतयुग भूतकाळ झाला, या वेळी तर असू देखील शकत नाही. या सर्व
समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा बसून सर्व गोष्टी समजावून सांगतात. सतयुगामध्ये
यांचे राज्य होते. भारतवासी त्या वेळी सतयुगी म्हणून संबोधले जात होते. आता तर जरूर
कलियुगी म्हटले जाणार. सतयुगी होते तर त्याला स्वर्ग म्हटले जात होते. असे नाही की
नरकाला सुद्धा स्वर्ग म्हणणार. मनुष्यांचे तर आपले-आपले मत आहे. धनाचे सुख आहे तर
स्वतःला स्वर्गामध्ये समजतात. माझ्याजवळ तर भरपूर संपत्ती आहे म्हणून मी
स्वर्गामध्ये आहे. परंतु विवेक सांगतो की नाही, हा तर आहेच नरक. भले कोणाजवळ १०-२०
लाख असतील परंतु ही आहेच रोगी दुनिया. सतयुगाला म्हणणार निरोगी दुनिया. दुनिया हीच
आहे. सतयुगामध्ये याला ‘योगी’ दुनिया म्हणणार, कलियुगाला ‘भोगी’ दुनिया म्हटले जाते.
तिथे आहेत योगी कारण विकाराचा भोग-विलास असत नाही. तर हे स्कूल आहे यामध्ये शक्तिची
गोष्ट नाही. टीचर शक्ती दाखवतात काय? एम ऑब्जेक्ट असते, आम्ही अमुक बनणार. तुम्ही
या शिक्षणाद्वारे मनुष्यापासून देवता बनता. असे नाही की कोणती जादू, छू मंत्र अथवा
रिद्धी-सिद्धीची गोष्ट आहे. हे तर स्कूल आहे. स्कूलमध्ये रिद्धी-सिद्धीची गोष्ट असते
का? शिकून कोणी डॉक्टर, कोणी बॅरिस्टर बनतात. हे लक्ष्मी-नारायण सुद्धा मनुष्य होते,
परंतु पवित्र होते म्हणून त्यांना देवी-देवता म्हटले जाते. पवित्र जरूर बनायचे आहे.
ही आहेच पतित जुनी दुनिया.
मनुष्य तर समजतात की
दुनिया जुनी होण्यासाठी अजून लाखो वर्षे शिल्लक आहेत. कलियुगानंतरच सतयुग येणार. आता
तुम्ही आहात संगमावर. या संगमाबद्दल कोणालाच माहिती नाही. सतयुगाला लाखो वर्षे
देतात. या गोष्टी बाबा येऊन समजावून सांगतात. त्यांना म्हटले जाते सुप्रीम सोल.
आत्म्यांच्या पित्याला ‘बाबा’ म्हणतात. दुसरे कोणते नाव नसते. बाबांचे नाव आहे - ‘शिव’.
शिवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जातात. परमात्मा शिवालाच निराकार म्हटले जाते. त्यांचे
मनुष्य शरीर नाही आहे. तुम्ही आत्मे इथे पार्ट बजावण्यासाठी येता तेव्हा तुम्हाला
मनुष्य शरीर मिळते. ते आहेत शिव, तुम्ही आहात शाळीग्राम. शिव आणि शाळीग्रामांची पूजा
सुद्धा होते कारण चैतन्यामध्ये होऊन गेले आहेत, काहीतरी करून गेले आहेत तेव्हाच
त्यांच्या नावाचे गायन केले जाते किंवा पुजले जातात. अगोदरच्या जन्माविषयी तर
कोणालाही माहिती नाही. या जन्मामध्ये मग गायन करतात, देवी-देवतांची पूजा करतात. या
जन्मामध्ये तर खूप लीडर्स सुद्धा बनले आहेत. जे चांगले-चांगले साधू-संत इत्यादी
होऊन गेले आहेत, त्यांचे स्टॅम्प सुद्धा बनवतात नाव होण्यासाठी. इथे मग सर्वात मोठे
नाव कोणाचे गायले जाईल? सर्वात मोठ्यात मोठे कोण आहेत? उच्च ते उच्च एक भगवानच आहेत.
ते आहेत निराकार आणि त्यांची महिमा एकदम वेगळी आहे. देवतांची महिमा वेगळी आहे,
मनुष्यांची वेगळी आहे. मनुष्यांना देवता म्हणू शकत नाही. देवतांमध्ये सर्व गुण होते,
लक्ष्मी-नारायण होऊन गेले आहेत ना. ते पवित्र होते, विश्वाचे मालक होते, त्यांची
पूजा देखील करतात कारण पवित्र पूज्य आहेत, अपवित्र असणाऱ्याला पूज्य म्हणू शकत नाही,
अपवित्र नेहमी पवित्र असणाऱ्यांची पूजा करतात. कन्या पवित्र असते तर तिची पूजा केली
जाते, पतित बनली कि सर्वांच्या पाया पडायला लागते. या वेळी सर्व आहेत पतित,
सतयुगामध्ये सर्व पावन होते. ती आहेच पवित्र दुनिया, कलियुग आहे पतित दुनिया
तेव्हाच तर पतित-पावन बाबांना बोलावतात. जेव्हा पवित्र असतात तेव्हा बोलावत नाहीत.
बाबा स्वतः म्हणतात - ‘सुखामध्ये माझी कोणीही आठवण करत नाहीत’. भारताचीच गोष्ट आहे.
बाबा येतातच भारतामध्ये. भारतच या वेळी पतित बनला आहे, भारतच पावन होता. पावन
देवतांना बघायचे असेल तर मंदिरामध्ये जाऊन बघा. देवता सर्व आहेत पावन,
त्यांच्यामध्ये जे मुख्य-मुख्य हेड आहेत, त्यांना मंदिरामध्ये दाखवतात. या
लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये सर्व पावन होते, यथा राजा-राणी तथा प्रजा, या
वेळेला सर्व पतित आहेत. सर्व बोलावत राहतात - ‘हे पतित-पावन या’. संन्यासी कधी
श्रीकृष्णाला भगवान अथवा ब्रह्म मानणार नाहीत. ते समजतात भगवान तर निराकार आहेत,
त्यांचे चित्र देखील निराकार पद्धतीने पुजले जाते. त्यांचे एक्यूरेट नाव ‘शिव’ आहे.
तुम्ही आत्मे जेव्हा इथे येऊन शरीर धारण करता तेव्हा तुमचे नाव ठेवले जाते. आत्मा
अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. आत्मा एक शरीर सोडून जाऊन दुसरे घेते. ८४ जन्म तर
पाहिजेत ना. ८४ लाख नसतात. तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘हीच दुनिया सतयुगामध्ये
नविन होती, रायटियस (नीतिमान) होती. हीच दुनिया पुन्हा अनरायटियस (अनीतिमान) बनते.
तो आहे सचखंड, सर्व खरे बोलणारे असतात’. भारताला सचखंड म्हटले जाते. झुठखंडच नंतर
मग सचखंड बनतो. सच्चे बाबाच येऊन सचखंड बनवतात. त्यांना सच्चा पातशाह (खरा बादशहा),
ट्रूथ म्हटले जाते, हा आहेच झुठखंड. मनुष्य जे काही सांगतात ते आहे खोटे. देवता
आहेत बुद्धीमान, त्यांची मनुष्य पूजा करतात. बुद्धिवान आणि बुद्धिहीन म्हटले जाते.
बुद्धिवान कोण बनवतात आणि मग बुद्धिहीन कोण बनवतो? हे देखील बाबा सांगतात.
बुद्धिवान, सर्वगुण संपन्न बनविणारे आहेत बाबा. ते स्वतः येऊन आपला परिचय देतात. जसे
तुम्ही आत्मा आहात मग इथे शरीरामध्ये प्रवेश करून पार्ट बजावता. मी सुद्धा एकदाच
यांच्यामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) प्रवेश करतो. तुम्ही जाणता ते आहेतच एक. त्यांनाच
सर्वशक्तिमान म्हटले जाते. दुसरा कोणी मनुष्य नाही ज्याला आपण सर्वशक्तिमान म्हणू.
लक्ष्मी-नारायणाला सुद्धा म्हणू शकत नाही कारण त्यांना देखील शक्ती देणारा कोणी
दुसरा आहे. पतित मनुष्यामध्ये शक्ती असू शकत नाही. आत्म्यामध्ये जी शक्ती असते ती
मग हळू-हळू डिग्रेड (कमी-कमी) होत जाते अर्थात आत्म्यामध्ये जी सतोप्रधान शक्ती होती
ती शक्ती तमोप्रधान बनते. जसे मोटरमधील तेल संपले तर मोटर जागेवरच उभी राहते. ही
बॅटरी वारंवार डिस्चार्ज होत नाही, याला आपला पूर्ण वेळ मिळालेला आहे. कलियुगाच्या
अंताला बॅटरी थंड होते. अगोदर जे सतोप्रधान विश्वाचे मालक होते ते आता तमोप्रधान
आहेत तर ताकद कमी झाली आहे. शक्तीच राहिली नाही आहे. वर्थ नॉट पेनी (कवडी तुल्य)
बनतात. भारतामध्ये देवी-देवता धर्म होता तर वर्थ पाउंड (हिरे तुल्य) होते. रिलिजन
इज माइट (धर्म एक शक्ती आहे) असे म्हटले जाते. देवता धर्मामध्ये ताकद आहे. विश्वाचे
मालक आहेत. कोणती ताकद होती? त्यांची कोणती लढाई इत्यादी करण्याची ताकद नव्हती.
ताकद मिळते सर्व शक्तिमान बाबांकडून. ताकद काय चीज आहे?
बाबा समजावून सांगत
आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, तुमची आत्मा सतोप्रधान होती, आता तमोप्रधान आहे.
विश्वाच्या मालकाऐवजी विश्वाचे गुलाम बनले आहात’. बाबा समजावून सांगत आहेत - हा ५
विकार रुपी रावण तुमची सर्व ताकद हिरावून घेतो म्हणून भारतवासी कंगाल बनले आहेत. असे
समजू नका वैज्ञानिकांकडे खूप ताकद आहे. ती काही ताकद नाही, परंतु ही आत्मिक ताकद आहे.
जी सर्वशक्तिमान बाबांसोबत योग लावल्याने मिळते. सायन्स आणि सायलेन्स यांची यावेळी
जशी काही चुरस चालू आहे. तुम्ही सायलेन्समध्ये जाता, त्याचे तुम्हाला बळ मिळत आहे.
सायलेन्सचे बळ घेऊन तुम्ही सायलेन्सच्या दुनियेमध्ये निघून जाल. बाबांची आठवण करत
स्वतःला शरीरापासून डिटॅच करता. भक्तिमार्गामध्ये भगवंताकडे जाण्यासाठी तुम्ही खूप
डोकेफोड केली आहे. परंतु सर्वव्यापी म्हटल्या कारणाने रस्ताच मिळत नाही. तमोप्रधान
बनले आहात. तर हे शिक्षण आहे, शिक्षणाला शक्ती म्हणता येणार नाही. बाबा म्हणतात -
‘अगोदर पवित्र तर बना आणि नंतर सृष्टीचे चक्र कसे फिरते ते नॉलेज समजून घ्या’.
नॉलेजफूल तर बाबाच आहेत, यामध्ये काही शक्तीची गोष्ट नाही. मुलांना हे माहीत नाही
आहे की, सृष्टी चक्र कसे फिरते, तुम्ही ॲक्टर्स पार्टधारी आहात ना. हा बेहदचा ड्रामा
आहे. पूर्वीच्या काळात मनुष्य नाटक करत असत, त्यामध्ये अदला-बदली होऊ शकते. आता तर
चित्रपट बनले आहेत. बाबांना देखील चित्रपटाचे उदाहरण देऊन समजावून सांगणे सोपे होते.
तो (या दुनियेतील) आहे छोटा चित्रपट, हा आहे मोठा. नाटकामध्ये ॲक्टर्स इत्यादीमध्ये
बदल करू शकतात. हा तर अनादि ड्रामा आहे. एकदा जे शूटिंग झाले आहे ते पुन्हा बदलू
शकत नाही. ही संपूर्ण दुनिया बेहदचा चित्रपट आहे. कोणत्या शक्तीची गोष्टच नाही.
अंबामातेला शक्ती म्हणतात परंतु तरीही नाव तर आहे. तिला अंबा का म्हणतात? काय करून
गेली आहे? आता तुम्ही समजता की, उच्च ते उच्च आहेत अंबा आणि लक्ष्मी. अंबाच नंतर
लक्ष्मी बनते. हे देखील तुम्ही मुलेच समजता. तुम्ही नॉलेजफूल देखील बनता आणि
तुम्हाला पवित्रता देखील शिकवतात. ती पवित्रता मग अर्धा कल्प चालते. पुन्हा बाबाच
येऊन पवित्रतेचा मार्ग सांगतात. त्यांना बोलावतातच या वेळेला की येऊन मार्ग सांगा
आणि मग गाईड सुद्धा बना. ते आहेत परम आत्मा, सुप्रीमच्या शिकवणीने आत्मा सुप्रीम
बनते. सुप्रीम पवित्र असणाऱ्याला म्हटले जाते. आता तर पतित आहात, बाबा तर सदा पावन
आहेत. फरक आहे ना. ते सदा पावनच जेव्हा येऊन सर्वांना वारसा देतील आणि शिकवतील.
यांच्यामध्ये (ब्रह्माबाबांच्या तनामध्ये) स्वतः येऊन सांगतात की, ‘मी तुमचा पिता
आहे. मला रथ (शरीर) तर जरूर पाहिजे, नाहीतर आत्मा बोलेल कशी’. रथसुद्धा प्रसिद्ध आहे.
गायन आहे - ‘भाग्यशाली रथ’. तर भाग्यशाली रथ आहे मनुष्याचा, घोडा-गाडीची गोष्ट नाही.
मनुष्याचाच रथ (शरीर) पाहिजे, ज्यामध्ये बसून मनुष्यांना समजावून सांगितले जाईल.
त्यांनी मग घोडा-गाडी दाखवली आहे. भाग्यशाली रथ मनुष्याला म्हटले जाते. इथे तर
काही-काही प्राण्यांची सुद्धा खूप चांगली सेवा करतात, जेवढी मनुष्यांची सुद्धा केली
जात नाही. कुत्र्यावर किती प्रेम करतात. घोड्यावर, गायीवर सुद्धा प्रेम करतात.
कुत्र्यांचे प्रदर्शन भरते. हे सर्व तिथे (सतयुगामध्ये) असत नाही. लक्ष्मी-नारायण
कुत्रे पाळत असतील का?
आता तुम्ही मुले जाणता
की यावेळचे सर्व मनुष्य तमोप्रधान-बुद्धी आहेत, त्यांना सतोप्रधान बनवायचे आहे. तिथे
(सतयुगामध्ये) तर घोडे इत्यादी असे नसतात ज्यामुळे मनुष्याला त्यांची कोणती सेवा
करावी लागेल. तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुमची हालत बघा काय झाली आहे. रावणाने
अशी हालत केली आहे, हा तुमचा शत्रू आहे. परंतु तुम्हाला माहीत नाही आहे की या
शत्रूचा जन्म कधी होतो’. शिवबाबांच्या जन्माविषयी देखील माहिती नाही तर रावणाच्या
जन्माविषयी देखील माहिती नाही. बाबा सांगतात त्रेताचा अंत आणि द्वापरची सुरुवात या
कालावधीमध्ये रावण येतो. त्याला १० तोंडे का दाखविली आहेत? दरवर्षी का जाळले जाते?
हे देखील कोणाला माहिती नाही. आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनण्यासाठी शिकत आहात,
जे शिकत नाहीत ते देवता बनू शकणार नाहीत. ते तर मग येतीलही तेव्हाच जेव्हा
रावणराज्य सुरु होईल. आता तुम्ही जाणता आपण देवता धर्माचे होतो आता पुन्हा सैपलिंग
(कलम) लावले जात आहे. बाबा म्हणतात - ‘मी दर ५ हजार वर्षानंतर येऊन तुम्हाला शिकवतो.
यावेळी सारे सृष्टीरुपी झाड जुने झाले आहे. नवीन जेव्हा होते तर एकच देवता धर्म होता
आणि मग हळू-हळू खाली उतरतात. बाबा तुम्हाला ८४ जन्मांचा हिशोब सांगतात कारण बाबा
नॉलेजफूल आहेत ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सायलेन्सचे
बळ जमा करायचे आहे. सायलेन्सच्या बळाने सायलेन्सच्या दुनियेमध्ये जायचे आहे.
बाबांच्या आठवणीद्वारे ताकद भरून घेऊन गुलामगिरी पासून मुक्त व्हायचे आहे, मालक
बनायचे आहे.
२) सुप्रीमकडून
शिक्षण घेऊन आत्म्याला सुप्रीम बनवायचे आहे. पवित्रतेच्याच मार्गावर चालून पवित्र
बनून दुसऱ्यांना बनवायचे आहे. गाईड बनायचे आहे.
वरदान:-
अल्फला जाणणारे
आणि पवित्रतेच्या स्वधर्माला अंगीकारणारे विशेष आत्मा भव
बापदादांना आनंद होतो
की, माझे एक-एक मूल विशेष आत्मा आहे, भले मग वयस्कर आहे, अडाणी आहे, लहान आहे, युवक
आहे नाहीतर प्रवृत्तीवाले आहे परंतु विश्वासमोर विशेष आहे. दुनियेमध्ये मग कोणी
कितीही मोठा नेता असेल, अभिनेता असेल, वैज्ञानिक असेल परंतु अल्फला जाणले नाही तर
काय जाणले! तुम्ही निश्चय बुद्धी आहात अभिमानाने म्हणता की तुम्ही शोधत रहा, आम्ही
तर प्राप्त केले. प्रवृत्तीमध्ये राहून पवित्रतेच्या स्वधर्माला अंगीकारले (धारण
केले) तर पवित्र आत्मा विशेष आत्मा बनलात.
बोधवाक्य:-
जे सदैव आनंदी
राहतात तेच स्वतःला आणि सर्वांना प्रिय वाटतात.