22-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबांच्या श्रीमतावर चालणे म्हणजेच बाबांचा रिगार्ड ठेवणे आहे, मनमतावर
चालणारे डिसरिगार्ड करतात”
प्रश्न:-
गृहस्थ
व्यवहारामध्ये राहणाऱ्यांना बाबा कोणत्या एका गोष्टीसाठी मनाई करत नाहीत परंतु एक
डायरेक्शन जरूर देतात - ते कोणते?
उत्तर:-
बाबा म्हणतात - मुलांनो, भले तुम्ही सर्वांच्या संपर्कामध्ये या, कुठलीही नोकरी
वगैरे करा, संपर्कामध्ये यावेच लागते, रंगीत कपडे घालावे लागत असतील तर घाला,
बाबांची मनाई नाही. बाबा तर फक्त डायरेक्शन देतात - मुलांनो, देहा सहित देहाच्या
सर्व संबंधांमधून मोह काढून माझी आठवण करा.
ओम शांती।
शिवबाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत अर्थात आपसमान बनविण्याचा पुरुषार्थ करून
घेत आहेत. जसा मी ज्ञानाचा सागर आहे तसेच मुलांनी देखील बनावे. हे तर गोड मुले
जाणतात की, सर्वच काही एकसारखे तर बनणार नाहीत. पुरुषार्थ तर प्रत्येकाला आपला-आपला
करायचा असतो. शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिकतात परंतु सर्वच काही एकसमान पास विथ
ऑनर होत नाहीत. तरीदेखील टीचर तर पुरुषार्थ करून घेतात. तुम्ही मुले सुद्धा
पुरुषार्थ करता. बाबा विचारतात तुम्ही काय बनणार? सर्वजण म्हणतील - आम्ही आलो आहोत
नरा पासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनण्याकरिता. हे तर बरोबर आहे परंतु आपली ॲक्टिव्हिटीज
(कर्मसुद्धा) पहा ना. बाबा देखील सर्वोच्च आहेत. टीचर देखील आहेत, गुरु सुद्धा आहेत.
या पित्याला कोणीही जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता - शिवबाबा आमचे बाबा देखील आहेत,
टीचर देखील आहेत, सद्गुरु सुद्धा आहेत. परंतु ते जे जसे आहेत तसे त्यांना जाणणे
कठीण आहे. बाबांना जाणाल तर टीचरला विसरून जाल आणि मग गुरुला देखील विसरून जाल.
मुलांना बाबांचा आदर सुद्धा ठेवायचा असतो. आदर कशाला म्हटले जाते? बाबा जे शिकवतात
ते चांगल्या रीतीने शिकतात तर जणू आदर ठेवतात. बाबा तर खूप गोड आहेत. आतून आनंदाचा
पारा चढलेला असला पाहिजे. परम आनंद झाला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःला विचारा - मला
इतका आनंद होतो का? सर्वच काही एक समान राहू शकत नाहीत. अभ्यासामध्ये देखील खूप फरक
आहे. त्या (लौकिक) शाळांमध्ये सुद्धा किती फरक असतो. ते तर एक सामान्य टीचर शिकवतात,
हे तर आहेत असामान्य. असा कोणता टीचर असतही नाही. कोणालाच हे माहीत नाही आहे की,
निराकार पिता टीचर सुद्धा बनतात. भले श्रीकृष्णाचे नाव दिले आहे परंतु त्यांना (दुनियावाल्यांना)
माहितीच नाही आहे की, श्रीकृष्ण पिता कसा होऊ शकतो. श्रीकृष्ण तर देवता आहे ना. असे
तर पुष्कळजणांचे नाव देखील कृष्ण आहे. परंतु कृष्ण म्हणताच श्रीकृष्ण समोर येईल. ते
तर देहधारी आहेत ना. तुम्ही जाणता हे शरीर त्यांचे नाही. स्वतः सांगतात - मी लोन
घेतले आहे. हे (ब्रह्मा बाबा) आधी सुद्धा मनुष्य होते, आता देखील मनुष्य आहेत. हे
भगवान नाहीत. ते तर एकच निराकार आहेत. आता तुम्हा मुलांना किती रहस्ये समजावून
सांगतात. परंतु तरीदेखील त्यांना पूर्णतः पिता समजणे, टीचर समजणे हे तर आता होऊ
शकणार नाही, पुन्हा-पुन्हा विसरून जातील. देहधारींकडे बुद्धी जाते. शेवटी हेच बाबा,
पिता, टीचर, सद्गुरु आहेत - हा निश्चय, अजूनही बुद्धीमध्ये झालेला नाही. आता तर
विसरून जातात. स्टुडंट टीचरला कधी विसरतील का! जे हॉस्टेलमध्ये राहतात ते तर कधीच
विसरणार नाहीत. जे विद्यार्थी वसतीगृहामध्ये राहतात त्यांना तर हे पक्के असणार. इथे
तर तो देखील पक्का निश्चय नाही आहे. नंबरवार पुरुषार्थानुसार हॉस्टेलमध्ये बसले
आहात तर जरूर विद्यार्थी आहात परंतु हा पक्का निश्चय नाहीये, जाणतात सर्वजण आपापल्या
पुरुषार्थानुसार पद घेत आहेत. त्या शिक्षणाने तर कोणी बॅरिस्टर बनतात, इंजिनियर
बनतात, डॉक्टर बनतात. इथे तर तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात. तर मग अशा
विद्यार्थ्यांची बुद्धी कशी असायला हवी. वागणूक, संभाषण पद्धती किती चांगली असली
पाहिजे.
बाबा समजावून सांगत
आहेत - मुलांनो, तुम्ही कधीही रडायचे नाही. तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात, ‘अरे
देवा’, करत आकांत माजवता कामा नये. आकांत माजवणे - हे आहे आक्रोश करून रडणे. बाबा
तर म्हणतात - ‘जिन रोया तिन खोया…’. विश्वाची सर्वश्रेष्ठ बादशाही तुम्ही गमावून
बसता. म्हणतात तर खरे आम्ही नरा पासून नारायण बनण्यासाठी आलो आहोत परंतु तसे वर्तन
कुठे आहे! नंबरवार पुरुषार्थानुसार सर्वजण पुरुषार्थ करत आहेत. काहीजण तर चांगल्या
रीतीने पास होऊन स्कॉलरशिप घेतात, कोणी नापास होतात. नंबरवार तर असतातच ना.
तुमच्यामध्ये देखील काहीजण अभ्यास करतात, काही अभ्यासच करत नाहीत. जसे गावंढळ
लोकांना शिकायला आवडत नाही. गवत कापायला सांगाल तर आनंदाने जातील. त्यालाच स्वतंत्र
जीवन समजतात. शिकणे म्हणजे बंधन समजतात, असे देखील खूप असतात. श्रीमंतांमध्ये
जमीनदार लोकं देखील काही कमी नसतात. स्वतःला स्वतंत्र एकदम आनंदात असल्याचे समजतात.
नोकरीचे तर नाव नाहीये ना. नोकरशाही वगैरे मध्ये मनुष्य नोकरी करतात ना. आता तुम्हा
मुलांना बाबा शिकवत आहेत विश्वाचा मालक बनविण्यासाठी. नोकरी करण्यासाठी शिकवत नाहीत.
तुम्ही तर या शिक्षणाने विश्वाचे मालक बनणार आहात ना. हे खूप उच्च शिक्षण आहे.
तुम्ही तर विश्वाचे मालक एकदम स्वतंत्र बनता. किती साधी गोष्ट आहे. एकच शिक्षण आहे
ज्यामुळे तुम्ही इतके उच्च महाराजा-महाराणी बनता ते देखील पवित्र. तुम्ही तर म्हणता
कोणत्याही धर्माचा असो, येऊन शिकावा. समजेल की हे शिक्षण तर खूप उच्च आहे. याने
विश्वाचे मालक बनता, हेच तर बाबा शिकवतात. आता तुमची बुद्धी किती प्रगल्भ बनली आहे.
हदच्या बुद्धी मधून बेहदच्या बुद्धीमध्ये आला आहात नंबरवार पुरुषार्थानुसार. किती
आनंद होतो की, आपण सर्वांनी इतरांना विश्वाचा मालक बनवावे. वास्तविक नोकरी तर तिथे
(सतयुगामध्ये) सुद्धा असते, दास-दासी, नोकर इत्यादी तर पाहिजेत ना. शिकलेल्यांपुढे
अशिक्षित चाकरी करतील म्हणून बाबा म्हणतात व्यवस्थित शिका तर तुम्ही हे (देवी-देवता)
बनू शकता. म्हणता देखील आम्ही (देवी-देवता) बनणार. परंतु अभ्यासच केला नाहीत तर कसे
बनणार. अभ्यासच करत नाहीत त्यामुळे मग बाबांची इतक्या आदराने आठवण सुद्धा करू शकत
नाहीत. बाबा म्हणतात - जितकी तुम्ही आठवण कराल तितकी तुमची विकर्म विनाश होतील. मुले
म्हणतात - ‘बाबा, जसे तुम्ही चालवाल’; बाबा मत देखील यांच्याद्वारेच (ब्रह्मा
बाबांद्वारेच) देतील ना. परंतु यांचे सुद्धा मत घेत नाहीत, पुन्हा त्याच जुन्या
सडलेल्या मनुष्य मतावरच चालतात. बघतात देखील की शिवबाबा या रथाद्वारे (ब्रह्मातनाद्वारे)
श्रीमत देत आहेत तरी देखील आपल्या स्वतःच्या मतावर चालतात. ज्याला एकदम पाई-पैशाची
कवडीसमान मत म्हणता येईल, अशा मतावर चालतात. रावणाच्या मतावर चालता-चालता या समयी
कवडी समान बनले आहेत. आता राम शिवबाबा मत देत आहेत. निश्चयामध्येच तर विजय आहे,
यामध्ये कधीही नुकसान होणार नाही. नुकसान देखील बाबा फायद्यामध्ये बदलतील, परंतु
निश्चय बुद्धीवाल्यांचेच. संशय बुद्धीवाले आतल्या आत घुसमटत राहतील. निश्चय
बुद्धीवाल्यांना कधी त्रास, कधी तोटा होऊ शकत नाही. बाबा स्वतः गॅरंटी देतात -
श्रीमतावर चालल्याने कधीही अकल्याण होऊ शकत नाही. मनुष्य मतालाच देहधारीचे मत म्हटले
जाते. इथे तर आहेच मनुष्य मत. गायले देखील जाते - मनुष्य मत, ईश्वरीय मत, आणि दैवी
मत. आता तुम्हाला ईश्वरीय मत मिळाले आहे, ज्याद्वारे तुम्ही मनुष्यापासून देवता बनता.
मग तिथे स्वर्गामध्ये तर तुम्हाला सुखच मिळते. कोणतीही दुःखाची गोष्ट नाही. ते
देखील स्थायी सुख होते. यावेळी तुम्हाला जाणवले पाहिजे, भविष्याची अनुभूती होते.
आता हे आहे
पुरुषोत्तम संगमयुग, तर श्रीमत मिळते. बाबा म्हणतात मी कल्प-कल्प कल्पाच्या
संगमयुगावर येतो, हे तुम्ही जाणता. त्यांच्या मतावर तुम्ही चालता. बाबा म्हणतात -
‘मुलांनो, गृहस्थ व्यवहारामध्ये भले रहा, कोण म्हणते की तुम्ही युनिफॉर्म बदला. भले
काहीही घाला. भरपूरजणांच्या संपर्कामध्ये यावे लागते. रंगीत कपड्यांसाठी कोणीही मना
करत नाही. कुठलेही कपडे वापरा, त्याच्याशी काहीही संबंध नाही. बाबा म्हणतात - ‘देहा
सहित देहाचे सर्व संबंध सोडा, बाकी सर्व काही घाला. फक्त स्वतःला आत्मा समजून
बाबांची आठवण करा, हा पक्का निश्चय करा’. हे देखील जाणता की, आत्माच पतित आणि पावन
बनते, महात्म्याला देखील महान-आत्मा म्हणणार, महान परमात्मा म्हणणार नाही. असे
म्हणणे देखील शोभत नाही. समजावून सांगण्यासाठी किती छान पॉईंट आहे. सद्गुरु सर्वांना
सद्गती देणारे तर एक बाबाच आहेत. तिथे सतयुगामध्ये कधी अकाली मृत्यू होत नाही. आता
तुम्ही मुले समजता बाबा आम्हाला पुन्हा असे देवता बनवत आहेत. यापूर्वी हे काही
बुद्धीमध्ये नव्हते. कल्पाची आयु किती आहे, हे सुद्धा जाणत नव्हतो. आता तर सर्व
स्मृती आली आहे. मुले हे देखील समजतात आत्म्यालाच पाप-आत्मा, पुण्य-आत्मा म्हटले
जाते. कधीही पाप-परमात्मा म्हटले जात नाही. मग कोणी जर म्हणेल परमात्मा सर्वव्यापी
आहे तरी देखील किती अज्ञानीपणा आहे. हे बाबाच बसून समजावून सांगतात. आता तुम्ही
जाणता ५००० वर्षानंतर बाबाच येऊन पाप आत्म्यांना पुण्य आत्मा बनवतात. एकालाच नाही,
सर्व मुलांना बनवतात. बाबा म्हणतात - ‘तुम्हा मुलांना घडवणारा मीच एक बेहदचा पिता
आहे. तर नक्कीच मुलांना बेहदचे सुख देईन. सतयुगामध्ये असतातच पवित्र आत्मे. रावणावर
विजय मिळविल्यानेच तुम्ही पुण्य आत्मा बनता. तुम्ही अनुभव करता, माया किती विघ्न
आणत असते. एकदम नाकात दम आणते. तुम्ही समजता मायेसोबत युद्ध कसे चालते. त्यांनी (दुनियावाल्यांनी)
मग कौरव आणि पांडवांचे युद्ध, सैन्य इत्यादी काय-काय म्हणून दाखवले आहे. या युद्धा
विषयी कोणालाच माहित नाही. हे आहे गुप्त. याला तुम्हीच जाणता. आम्हा आत्म्यांना माये
सोबत युद्ध करायचे आहे. बाबा म्हणतात - ‘तुमचा सर्वात मोठा शत्रू आहेच मुळी काम
विकार. योगबलाने तुम्ही या कामविकारावर विजय प्राप्त करता. योगबलाचा अर्थ देखील
कोणाला समजत नाही. जे सतोप्रधान होते तेच तमोप्रधान बनतात. बाबा स्वतः म्हणतात -
‘अनेक जन्मांच्या शेवटी मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करतो. तोच
तमोप्रधान बनला आहे, ततत्वम्. बाबा फक्त एकाला थोडेच सांगतील. सर्वांना नंबरवार
सांगतात. नंबरवार कोण-कोण आहेत, इथे तुम्हाला समजले आहे. पुढे जाऊन तुम्हाला खूप
काही समजेल. माळेचा तुम्हाला साक्षात्कार घडवतील. शाळेमध्ये जेव्हा वरच्या वर्गात
ट्रान्सफर होतात तेव्हा सर्व माहीत होते ना. सर्व निकाल कळून येतो.
बाबांनी मुलीला
विचारले - तुमच्या परीक्षेचे पेपर कुठून येतात? तर म्हणाली लंडनवरून. आता तुमचे
पेपर्स कुठून निघणार? वरून. तुमचा पेपर वरून येईल. सर्व साक्षात्कार करतील. कसे
वंडरफुल शिक्षण आहे. कोण शिकवतात, कोणालाच माहित नाही आहे. श्रीकृष्ण भगवानुवाच
म्हणतात. अभ्यासामध्ये सर्वजण नंबरवार आहेत. तर मग आनंद सुद्धा नंबरवार होणार. हे
जे गायन आहे - ‘अतींद्रीय सुख गोप-गोपींना विचारा’, ही पूर्वीची गोष्ट आहे. बाबांनी
समजावून सांगितले आहे, भले जरी बाबा जाणतात की, ही मुले कधीही अधोगतीला जाणारी
नाहीत परंतु तरीदेखील माहित नाही काय होते. अभ्यासच करत नाहीत, नशिबातच नाही आहे.
त्यांना थोडे जरी सांगितले की जाऊन आपले घर बसवा, तर लगेच जातील. कुठून येऊन कुठे
जातात. त्यांचे वर्तन, बोलणे, करणे सुद्धा असेच असते. समजतात आम्हाला जर इतके मिळाले
तर आम्ही जाऊन वेगळे राहू. वर्तनावरून समजते. याचा अर्थ निश्चय नाही, नाईलाजास्तव
राहिले आहेत. असे बरेच आहेत जे ज्ञानाचा ‘ग’ सुद्धा जाणत नाहीत. कधी बसत सुद्धा
नाहीत. माया शिकू देत नाही. असे सर्व सेंटरवर आहेत. कधी शिकायला येत नाहीत. आश्चर्य
आहे ना. किती उच्च नॉलेज आहे. भगवान शिकवत आहेत. बाबा म्हणाले की हे काम करू नका,
तर ऐकणार नाहीत. जरूर उलटे काम करून दाखवतील. राजधानी स्थापन होत आहे, त्यामध्ये तर
सर्व प्रकारचे हवेत ना. वरपासून खालपर्यंत सर्व बनतात. पदामध्ये फरक तर असतोच ना.
इथे (जुन्या दुनियेमध्ये) देखील नंबरवार पदे आहेत. फक्त फरक काय आहे? तिथे आयुष्य
मोठे आणि सुख असते. इथे आयुष्य कमी आणि दुःख आहे. मुलांच्या बुद्धीमध्ये या सर्व
वंडरफुल गोष्टी आहेत. कसा हा ड्रामा बनलेला आहे. मग कल्प-कल्प आम्ही तोच पार्ट
बजावणार. कल्प-कल्प बजावत राहतात. इतक्या सूक्ष्म आत्म्यामध्ये किती पार्ट भरलेला
आहे. तीच वैशिष्ट्ये, त्याच कृती... हे सृष्टी चक्र फिरतच राहते. ‘बनी बनाई बन रही…’
हे चक्र पुन्हा रिपीट होणार. सतोप्रधान, सतो, रजो, तमोमध्ये याल. यामध्ये गोंधळून
जाण्याचा प्रश्नच नाही. अच्छा, स्वतःला आत्मा समजता? आत्म्याचे पिता शिवबाबा आहेत
हे तर समजतात ना. जे सतोप्रधान बनतात तेच पुन्हा तमोप्रधान बनतात मग पुन्हा बाबांची
आठवण करा तर सतोप्रधान बनाल. हे तर चांगलेच आहे ना. बस इथपर्यंतच थांबायचे आहे. बोला,
बेहदचे बाबा हा स्वर्गाचा वारसा देतात. तेच पतित-पावन आहेत. बाबा नॉलेज देतात,
यामध्ये शास्त्र इत्यादीची गोष्टच नाही. शास्त्र सुरुवातीलाच कुठून येतील. हे तर
जेव्हा पुष्कळ मनुष्य होतात तेव्हा नंतर मग बसून शास्त्र बनवतात. सतयुगामध्ये तर
शास्त्र असतही नाहीत. परंपरा नावाची काही गोष्टच नसते. नाव-रूप तर बदलत जाणार. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कधीही ‘अरे
देवा’, असे म्हणून आकांत माजवायचा नाही. बुद्धीमध्ये रहावे की, आम्ही विश्वाचे मालक
बनणार आहोत, आमचे वर्तन, संभाषण पद्धती खूप चांगली असली पाहिजे. कधीही रडायचे नाही.
२) निश्चयबुद्धी बनून
एका बाबांच्याच मतावर चालत रहायचे आहे. कधीही गोंधळून किंवा घुसमटत रहायचे नाही.
निश्चयामध्येच विजय आहे, त्यामुळे आपले पै-पैशाचे मत चालवायचे नाही.
वरदान:-
कुठल्याही
परिस्थितीमध्ये फुल स्टॉप लावून स्वतःला परिवर्तन करणारे सर्वांच्या आशीर्वादांचे
पात्र भव
कुठल्याही
परिस्थितीमध्ये फुल स्टॉप तेव्हाच लावू शकता जेव्हा बिंदू स्वरूप बाबा आणि बिंदू
स्वरूप आत्मा दोघांचीही स्मृति असेल. कंट्रोलिंग पॉवर असेल. जी मुले कुठल्याही
परिस्थितीमध्ये स्वतःला परिवर्तन करून फुल स्टॉप लावण्यासाठी आधी स्वतःला पुढे
करतात, तेच आशीर्वादांचे पात्र बनतात. त्यांना स्वतःलाच स्वतःचे आशीर्वाद अर्थात
खुशी मिळते, बाबांद्वारे आणि ब्राह्मण परिवाराद्वारे देखील आशीर्वाद मिळतात.
बोधवाक्य:-
जो काही
संकल्प करता त्याच्यावर मधून-मधून दृढतेचा शिक्का मारा तर विजयी बनाल.