23-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - मुख्य दोन गोष्टी सर्वांना समजावून सांगायच्या आहेत - एक तर बाबांची आठवण करा, दुसरी ८४ च्या फेऱ्याला जाणून घ्या म्हणजे मग सर्व प्रश्न समाप्त होतील”

प्रश्न:-
बाबांच्या महिमेमध्ये कोणते शब्द येतात जे श्रीकृष्णाच्या महिमेमध्ये नसतात?

उत्तर:-
वृक्षपती एक बाबाच आहेत, श्रीकृष्णाला वृक्षपती म्हणता येणार नाही. पित्यांचाही पिता किंवा पतींचाही पती एका निराकाराला म्हटले जाते, श्रीकृष्णाला नाही. दोघांचीही महिमा वेगवेगळी स्पष्ट करून सांगा.

प्रश्न:-
तुम्ही मुलांनी गावोगावी कोणती दवंडी पिटवली पाहिजे?

उत्तर:-
गावोगावी सर्वत्र ही दवंडी पिटा की मनुष्यापासून देवता, नरकवासी पासून स्वर्गवासी कसे बनू शकतो, हे येऊन समजून घ्या. स्थापना, विनाश कसा होतो, हे येऊन समजून घ्या.

गीत:-
तुम्हीं हो माता, पिता तुम्हीं हो...

ओम शांती।
या गाण्याच्या शेवटी जी लाईन येते - ‘तुम्हीं नईया, तुम्हीं खिवैया…’ हे चुकीचे आहे. जसे आपेही पूज्य, आपेही पुजारी म्हणतात - हे तसेच झाले. ज्ञानाचा प्रकाश असणारे जे असतील ते लगेच हे गाणे बंद करतील कारण हा बाबांचा अपमान होतो. आता तुम्हा मुलांना हे ज्ञान मिळाले आहे, इतर मनुष्यांना हे ज्ञान नाही. तुम्हाला देखील हे आताच मिळते. नंतर पुन्हा कधीही मिळत नाही. गीतेच्या भगवंताचे ज्ञान पुरुषोत्तम बनण्यासाठी मिळते, एवढे मात्र समजतात. परंतु केव्हा मिळते, कसे मिळते, हे विसरून गेले आहेत. गीता आहेच धर्म स्थापनेचे शास्त्र, दुसरे कुठलेही शास्त्र धर्मस्थापनेकरिता नसते. ‘शास्त्र’ हा शब्द सुद्धा भारतामध्येच वापरतात. सर्व शास्त्रमई शिरोमणी आहेच मुळी गीता. बाकी ते सर्व धर्म तर आहेतच नंतर येणारे. त्यांना शिरोमणी म्हणणार नाही. मुले जाणतात - वृक्षपती फक्त एक बाबाच आहेत. ते आमचे पिता आहेत, पती देखील आहेत तर सर्वांचे पिता सुद्धा आहेत. त्यांना पतींचाही पती, पित्यांचाही पिता.... म्हटले जाते. ही महिमा एका निराकाराचीच गायली जाते. श्रीकृष्णाची महिमा आणि निराकार बाबांची महिमा यांची तुलना केली जाते. श्रीकृष्ण तर आहेच नवीन दुनियेचा राजकुमार. तो मग जुन्या दुनियेमध्ये संगमयुगावर राजयोग कसा शिकवणार! आता मुले समजतात आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत. तुम्ही शिकून हे (देवी-देवता) बनतात. त्या नंतर मग हे ज्ञान अस्तित्वात रहात नाही. प्राय: लोप होते. बाकी पिठात मीठ म्हणजेच थोडीफार चित्रे बाकी राहतात. वास्तविक कोणाचेही यथार्थ चित्र काही नाही आहे. सर्वात पहिला बाबांचा परिचय मिळाला तर तुम्ही म्हणाल - ‘हे तर भगवान समजावून सांगत आहेत’. ते तर स्वतःच सांगतील. तुम्ही काय प्रश्न विचारणार! आधी बाबांना तर जाणून घ्या.

बाबा आत्म्यांना म्हणतात - माझी आठवण करा. बस्स, फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा. बाबा म्हणतात - माझी आठवण करा आणि ८४ च्या चक्राची आठवण करा, बस्स. या मुख्य दोन गोष्टीच समजावून सांगायच्या आहेत. बाबा म्हणतात - ‘तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही’. ब्राह्मण मुलांनाच म्हणतात, दुसरे तर कोणी समजू देखील शकणार नाही. प्रदर्शनीमध्ये बघा किती गर्दी होते. समजतात, इतके मनुष्य जातात तर जरूर काही पाहण्यासारखे आहे. गर्दी करतात. प्रत्येकाला समजावून सांगायला गेले तर तोंडच दुखेल. मग काय करायला हवे? प्रदर्शनी जर महिनाभर चालत असेल तर सांगू शकता - आज गर्दी आहे, उद्या, परवा या. ते देखील ज्यांना अभ्यासाची आवड आहे किंवा मनुष्यापासून देवता बनू इच्छितात, त्यांना समजावून सांगायचे आहे - ‘हे लक्ष्मी-नारायणाचे एकच चित्र किंवा बॅज दाखवला पाहिजे. बाबांद्वारे या विष्णुपुरीचे मालक बनू शकता, आता गर्दी आहे सेंटरवर या. पत्ता तर लिहिलेला आहेच’. परंतु असेच जर सांगाल की, हा स्वर्ग आहे, हा नरक आहे, तर लोकांना काय समजणार? वेळ वाया जातो. असे तर ओळखू सुद्धा शकत नाही, हा मोठा माणूस आहे, श्रीमंत आहे की गरीब आहे? आजकाल ड्रेस इत्यादी असा घालतात की काहीच समजू शकत नाही. सर्वप्रथम तर बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबा स्वर्गाची स्थापना करणारे आहेत. आता हे (लक्ष्मी-नारायण) बनायचे आहे. एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. बाबा म्हणतात - सर्वश्रेष्ठ मी आहे. माझी आठवण करा, हाच वशीकरण मंत्र आहे. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील आणि तुम्ही विष्णुपुरीमध्ये याल - एवढे तर जरूर समजावून सांगितले पाहिजे. प्रदर्शनी आठ-दहा दिवस तरी ठेवली पाहिजे. तुम्ही गावोगाव दवंडी पिटा की मनुष्यापासून देवता, नरकवासी पासून स्वर्गवासी कसे बनू शकतो ते येऊन समजून घ्या. स्थापना, विनाश कसा होतो, येऊन समजून घ्या. युक्त्या तर पुष्कळ आहेत.

तुम्ही मुले जाणता सतयुग आणि कलियुगामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र म्हटले जाते. ब्रह्माचा दिवस सो विष्णूचा, विष्णूचा सो ब्रह्माचा. गोष्ट एकच आहे. ब्रह्माचे देखील ८४ जन्म, विष्णूचे देखील ८४ जन्म. फक्त या लीप जन्माचा फरक असतो. या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये पक्क्या करायच्या आहेत. धारणा नसेल तर मग कोणाला समजावून सांगणार कसे? हे समजून सांगणे खूप सोपे आहे. फक्त लक्ष्मी-नारायणाच्या चित्रासमोरच हे मुद्दे ऐकवा. बाबांद्वारे हे पद प्राप्त करायचे आहे, नरकाचा विनाश तर समोर उभा आहे. ते लोक (दुनियावाले) तर आपले मानवी मतच ऐकवतील. इथे तर आहे ईश्वरीय मत, जे आम्हा आत्म्यांना ईश्वराकडून मिळते. निराकार आत्म्यांना निराकार परमात्म्याचे मत मिळते. बाकी सर्व आहेत मानवी मते. रात्रं-दिवसाचा फरक आहे ना. संन्यासी, उदासी इत्यादी कोणीही देऊ शकत नाही. ईश्वरीय मत फक्त एकदाच मिळते. जेव्हा ईश्वर येतात तेव्हा त्यांच्या मतावर चालून आम्ही हे बनतो. ते (शिवबाबा) येतातच देवी-देवता धर्म स्थापन करण्यासाठी. हा पॉईंट सुद्धा धारण केला पाहिजे, जो वेळेवर कामी येईल. मुख्य गोष्ट थोडक्यात समजावून सांगितली तरी पुरेसे आहे. एका लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावर समजावून सांगणे देखील पुरेसे आहे. हे आहे एम ऑब्जेक्टचे चित्र, भगवंताने ही नवीन दुनिया रचली आहे. भगवंतानेच पुरुषोत्तम संगमयुगावर यांना शिकवले होते. या पुरुषोत्तम युगाबद्दल कोणालाही माहीत नाही. तर मुलांना या सर्व गोष्टी ऐकून किती आनंद झाला पाहिजे. ऐकून मग पुन्हा ऐकविण्यामध्ये अजून जास्तच आनंद होतो. सेवा करणाऱ्यांनाच ब्राह्मण म्हणणार. तुमच्या काखोटीला खरी गीता आहे. ब्राह्मणांमध्ये देखील नंबरवार असतात. काही ब्राह्मण तर खूप प्रसिद्ध असतात, खूप कमाई करतात. कोणाला तर खायला देखील खूप मुश्किलीने मिळेल. काही ब्राह्मण लखपती असतात. खूप आनंदाने, नशेमध्ये सांगतात - आम्ही ब्राह्मण कुळाचे आहोत. खऱ्या ब्राह्मण कुळाची तर माहीतीच नाहीये. ब्राह्मण उत्तम मानले जातात, म्हणून तर ब्राह्मणांना भोजन खाऊ घालतात. देवता, क्षत्रिय किंवा वैश्य, शूद्र धर्मवाल्यांना कधी खाऊ घालणार नाहीत. ब्राह्मणांनाच खाऊ घालतात म्हणून बाबा म्हणतात - तुम्ही ब्राह्मणांना चांगल्या रीतीने समजावून सांगा. ब्राह्मणांचीही संघटना असते, त्याची माहिती घेऊन मग गेले पाहिजे. ब्राह्मण तर प्रजापिता ब्रह्माची मुले असली पाहिजेत, आम्ही त्यांची संतान आहोत. ब्रह्मा कोणाचा मुलगा आहे, ते देखील समजावून सांगितले पाहिजे. माहिती काढली पाहिजे, की कुठे-कुठे त्यांच्या संघटना असतात. तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकता. वानप्रस्थ महिलांच्या देखील सभा असतात. बाबांना कोणी समाचार थोडेच देतात की, आम्ही कुठे-कुठे गेलो? संपूर्ण जंगल (जग) भरलेले आहे, कुठेही गेला तरी शिकार करून (ज्ञान देऊन) याल, प्रजा बनवून याल, राजा सुद्धा बनवू शकता. सेवा तर भरपूर आहेत. संध्याकाळी पाच वाजता रजा मिळते, लिस्टमध्ये लिहून ठेवले पाहिजे - आज या-या ठिकाणी जायचे आहे. बाबा युक्त्या तर खूप सांगतात. बाबा मुलांसोबतच गोष्टी करतात. हा पक्का निश्चय पाहिजे की मी आत्मा आहे. बाबा (परम-आत्मा) आम्हाला शिकवतात, धारण आम्हाला करायचे आहे. जसे शास्त्राचा अभ्यास करतात तर मग ते संस्कार घेऊन जातात आणि मग दुसऱ्या जन्मामध्ये देखील ते संस्कार इमर्ज होतात. म्हटले जाते - संस्कार घेऊन आले आहेत. जे शास्त्रांचा खूप अभ्यास करतात त्यांना ऑथॉरिटी म्हटले जाते. ते स्वतःला ऑलमाइटी (सर्वशक्तिमान) समजत नाहीत. हा खेळ आहे, जो बाबाच समजावून सांगतात, काही नवीन गोष्ट नाहीये. ड्रामा तर बनलेलाच आहे, जो समजून घ्यायचा आहे. मनुष्य हे समजत नाहीत की, ही जुनी दुनिया आहे. बाबा म्हणतात मी आलेलो आहे. महाभारताची लढाई समोर उभी आहे. मनुष्य अज्ञानाच्या अंधारामध्ये झोपून राहिले आहेत. अज्ञान भक्तीला म्हटले जाते. ज्ञानाचा सागर तर एक बाबाच आहेत. जे भरपूर भक्ती करतात, ते भक्तीचे सागर आहेत. ‘भक्त माळा’ सुद्धा आहे ना. भक्त माळेतील सुद्धा नावे एकत्र केली पाहिजेत. भक्तांची माळा द्वापर पासून कलियुगापर्यंतच असेल. मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. खूप आनंद त्यांनाच होईल जे संपूर्ण दिवस सेवा करत राहतील.

बाबांनी समजावून सांगितले आहे माळा तर खूप मोठी असते, हजारोंच्या संख्येमध्ये. जिला कोणी कुठून, कोणी कुठून ओढत असतात (जपत असतात). काहीतरी कारण असेल ना, ज्यामुळे एवढी मोठी माळा बनवली आहे. मुखावाटे ‘राम-राम’ म्हणत असतात, हे देखील विचारावे लागेल - तुम्ही ‘राम-राम’ म्हणून कोणाची आठवण करता? तुम्ही कुठेही सत्संग इत्यादी ठिकाणी जाऊन त्यांच्यातलेच असल्याप्रमाणे बसू शकता. हनुमानाचे उदाहरण आहे ना - जिथे सत्संग असायचा, तिथे पादत्राणांमध्ये जाऊन बसायचा. तुम्हाला देखील चान्स घेतला पाहिजे. तुम्ही खूप सेवा करू शकता. सेवेमध्ये सफलता तेव्हा मिळेल जेव्हा ज्ञानाचे पॉईंट्स बुद्धीमध्ये असतील, ज्ञानामध्ये एकदम तल्लीन झालेले असाल. सेवेच्या अनेक युक्त्या आहेत, रामायण, भागवत इत्यादींच्या देखील पुष्कळ गोष्टी आहेत, ज्यावर तुम्ही प्रकाश टाकू शकता. फक्त अंधश्रद्धेने बसून सत्संग थोडाच करायचा आहे. तुम्ही बोला - ‘आम्ही तर तुमचे कल्याण करू इच्छितो’. ती भक्ती एकदम वेगळी आहे, आणि हे ज्ञान वेगळे आहे. ज्ञान तर एक ज्ञानेश्वर बाबाच देतात. सेवा तर खूप आहे, फक्त हे सांगा की, सर्वोच्च कोण आहे? सर्वोच्च तर एक भगवंतच असतात. वारसा देखील त्यांच्याकडूनच प्राप्त होतो. बाकी तर आहे रचना. मुलांना सेवेची आवड असली पाहिजे. तुम्हाला राजाई करायची असेल तर प्रजा देखील बनवायची आहे. ‘बाबांची आठवण करा तर अन्त मती सो गति होईल’, हा महामंत्र काही कमी थोडाच आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांनी जो वशीकरण मंत्र दिला आहे, त्याची सर्वांना आठवण करून द्यायची आहे. सेवेच्या वेगवेगळ्या युक्त्या करायच्या आहेत. गर्दीमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही.

२) ज्ञानाचे पॉईंट्स बुद्धीमध्ये ठेवून ज्ञानामध्ये तल्लीन होऊन रहायचे आहे. हनुमानाप्रमाणे सत्संगामध्ये जाऊन बसायचे आहे आणि मग त्यांची सेवा करायची आहे. आनंदात राहण्यासाठी संपूर्ण दिवस सेवा करायची आहे.

वरदान:-
‘मी’ आणि ‘माझेपणा’ या गोष्टींना बळी चढविणारे संपूर्ण महाबली भव

हदच्या कोणत्याही व्यक्तीचे अथवा वैभवाचे आकर्षण असणे - हाच ‘माझेपणा’ आहे. या ‘माझेपणा’ला आणि ‘मीच करतो, मी केले…’ या ‘मी पणाला’ संपूर्ण समर्पण करणारे अर्थात बळी चढणारेच महाबली आहेत. जेव्हा हदचा ‘मी-मी’ पणा समर्पण होईल तेव्हाच संपूर्ण अथवा बाप समान बनाल. ‘मी करत आहे’, नाही. बाबा करवून घेत आहेत, बाबा चालवत आहेत. कोणत्याही गोष्टीमध्ये ‘मी’ च्या ऐवजी नेहमी नैसर्गिकपणे बोलण्यामध्ये ‘बाबा’च शब्द यावा, ‘मी’ शब्द नाही.

बोधवाक्य:-
संकल्पांमध्ये अशी दृढता धारण करा ज्यामुळे विचार करणे आणि कर्म एक समान होईल.

आपल्या शक्तिशाली मन्सा द्वारा सकाश द्यायची सेवा करा:-

समयानुसार आता मन्सा आणि वाणीची सेवा एकत्र करा. परंतु वाचा सेवा सोपी आहे, मनसा सेवा ही अटेंशन देण्याची गोष्ट आहे त्यामुळे सर्व आत्म्यांप्रती मनसामध्ये शुभ भावना, शुभकामनेचेच संकल्प असावेत. वाणीमध्ये मधुरता, संतुष्टता, साधेपणाची नवीनता असावी तर सहज सफलता मिळत राहील.