23-02-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
17.02.2004 ओम शान्ति
मधुबन
“सर्वांना सहयोग द्या
आणि सहयोगी बनवा, सदैव अखंड भंडारा चालत रहावा”
आज बापदादा स्वत:
आपल्या सोबत मुलांचा हिरेतुल्य जन्म दिवस शिवजयंती साजरी करण्यासाठी आले आहेत.
तुम्ही सर्व मुले आपल्या पारलौकिक, अलौकिक बाबांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आला
आहात तर बाबा मग तुमचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहेत. बाबा मुलांच्या भाग्याला
पाहून हर्षित होतात - ‘वाह! माझ्या श्रेष्ठ भाग्यवान मुलांनो वाह! जे विश्वाचा
अंध:कार नाहीसा करण्यासाठी बाबांसोबत अवतरीत झाला आहात’. सार्या कल्पामध्ये असा
बर्थ डे कोणाचाही असू शकत नाही, जो तुम्ही मुले परमात्म बाबांसोबत साजरा करत आहात.
हा अलौकिक अति विशेष, अतिशय सुंदर जन्मदिवस भक्त आत्मे देखील साजरा करतात परंतु
तुम्ही मुले मिलन साजरे करता आणि भक्त आत्मे फक्त महिमा गात राहतात. महिमा देखील
गातात, बोलावतात देखील, बापदादा भक्तांची महिमा आणि हाक ऐकून त्यांना देखील नंबरवार
भावनेचे फळ देतातच. परंतु भक्त आणि मुले दोघांमध्ये फार मोठे अंतर आहे. तुमच्या
केल्या गेलेल्या श्रेष्ठ कर्माची, श्रेष्ठ भाग्याची यादगार (आठवण) खूप चांगली साजरी
करतात म्हणून बापदादा भक्तांच्या भक्तीची लीला पाहून त्यांना देखील मुबारक देतात
कारण की तुमच्या सर्व यादगारची (आठवणीची) चांगल्या रीतीने कॉपी (नक्कल) केली आहे.
ते देखील याच दिवशी व्रत ठेवतात, ते व्रत ठेवतात थोड्या काळासाठी, अल्पकाळच्या
खानपान आणि शुद्धीसाठी. तुम्ही व्रत घेता संपूर्ण पवित्रतेचे, ज्यामध्ये
आहार-व्यवहार, वचन, कर्म, पूर्ण जन्मासाठी व्रत घेता. जोपर्यंत संगमातील जीवन जगायचे
आहे तोपर्यंत मन-वचन-कर्मामध्ये पवित्र बनायचेच आहे. ना केवळ बनायचे आहे परंतु
बनवायचे देखील आहे. तर बघा भक्तांची बुद्धी देखील काही कमी नाही आहे, यादगारची कॉपी
(स्मृतीरूपाची नक्कल) खूप चांगली केली आहे. तुम्ही सर्वजण सर्व व्यर्थ समर्पण करून
समर्थ बनला आहात अर्थात आपल्या अपवित्र जीवनाला समर्पण केले, तुमच्या समर्पणतेचे
यादगार (स्मृती म्हणून) ते बळी देतात परंतु स्वत:ला बळी देत नाहीत, बकर्याचा बळी
देतात. बघा किती छान कॉपी केली आहे, बकर्याला का बळी देतात? याची देखील कॉपी खूप
सुंदर केली आहे, बकरा काय करतो? में-में-में करतो ना! आणि तुम्ही काय समर्पण केले?
मैं, मैं, मैं. देह-भानाचा मी-पणा, कारण या ‘मी-पणा’मध्येच देह-अभिमान येतो. जो
देह-अभिमान सर्व विकारांचे बीज आहे.
बापदादांनी या अगोदर
सुद्धा सांगितले आहे की सर्व समर्पण होण्यामध्ये हा देह-भानाचा ‘मी-पणा’च अडथळा आणतो.
कॉमन मी-पणा, मी देह आहे, अथवा देहाच्या नात्यांचा मी-पणा, देहाच्या पदार्थांचे
समर्पण हे तर सोपे आहे. हे तर केले आहे ना की नाही? की हे सुद्धा झालेले नाही! जितके
पुढे जाता तितका ‘मी-पणा’ देखील अति सूक्ष्म महीन होत जातो. हा मोठा ‘मी-पणा’ तर
नष्ट होणे सोपे आहे. परंतु महीन ‘मी-पणा’ आहे - परमात्म जन्मसिद्ध अधिकाराद्वारे
ज्या विशेषता प्राप्त होतात, बुद्धीचे वरदान, ज्ञान स्वरूप बनण्याचे वरदान, सेवेचे
वरदान अथवा विशेषता, किंवा प्रभूची देणगी म्हणा, त्याचा जर ‘मी-पणा’ आला तर त्याला
म्हटले जाते - महिन ‘मी-पणा’. मी जे करतो, मी जे म्हणतो तेच योग्य आहे, तेच झाले
पाहिजे, हा रॉयल मी-पणा उडत्या कलेमध्ये जाण्यासाठी ओझे बनतो. तर बाबा म्हणतात - या
‘मी-पणा’चे देखील समर्पण, प्रभू देणगी मध्ये ‘मी-पणा’ असत नाही, ना ‘मी’ ना ‘माझे’.
प्रभू देणगी, प्रभू वरदान, प्रभू विशेषता आहे. तर तुम्हा सर्वांची समर्पणता किती
महिन आहे. तर चेक केले आहे का? साधारण ‘मी-पणा’ अथवा रॉयल ‘मी-पणा’ दोन्हीचे समर्पण
केले आहे? केले आहे की करत आहात? करावे तर लागेलच. तुम्ही लोक आपसामध्ये गमतीने
म्हणता ना, - ‘मरावे तर लागेलच’. परंतु हे मरणे भगवंताच्या गोदीमध्ये जगणे आहे. हे
मरणे, मरणे नाही आहे. २१ जन्म देव आत्म्यांच्या गोदीमध्ये जन्म घेणे आहे त्यामुळे
आनंदाने समर्पित होता ना! ओरडून तर होत नाही? नाही. भक्तिमध्ये देखील ओरडलेला बळी
स्वीकारला जात नाही. तर जे हदच्या ‘मी’ आणि ‘माझे’ यामध्ये आनंदाने समर्पित होतात,
ते जन्मो-जन्मी वारशाचे अधिकारी बनतात.
तर चेक करा - कोणतेही
व्यर्थ संकल्प, व्यर्थ बोल, व्यर्थ वर्तन याचे परिवर्तन करण्यामध्ये आनंदाने
परिवर्तन करता की लाचारीने? प्रेमाने परिवर्तन होता की मेहनतीने परिवर्तन होता?
जेव्हा तुम्ही सर्व मुलांनी जन्म घेताच आपल्या जीवनाचे ऑक्यूपेशनच (व्यवसायच) हे
बनवले आहे - विश्व परिवर्तन करणारे, विश्व परिवर्तक. तर हे तुम्हा सर्वांचे,
ब्राह्मण जन्माचे ऑक्यूपेशन आहे ना! पक्के आहे तर हात हलवा. झेंडा हलवत आहेत, खूप
छान. (सर्वांच्या हातामध्ये शिवबाबांचे झेंडे आहेत जे सर्वजण हलवत आहेत) आज
झेंड्यांचा दिवस आहे ना, खूप छान. परंतु असाच झेंडा हलवू नका. असा झेंडा हलवणे तर
खूप सोपे आहे, मनाला हलवायचे आहे. मनाला परिवर्तन करायचे आहे. हिंमतवान आहात ना.
हिंमत आहे? खूप हिंमत आहे, अच्छा.
बापदादांनी एक
खुशखबरीची गोष्ट बघितली, कोणती, जाणता का? बापदादांनी या वर्षासाठी विशेष गिफ्ट दिली
होती की, “या वर्षी जर थोडी जरी हिंमत ठेवाल, कोणत्याही कार्यामध्ये, भले
स्व-परिवर्तनामध्ये, किंवा कार्यामध्ये, किंवा विश्व सेवेमध्ये, जर हिंमतीने केलेत
तर या वर्षाला एक्स्ट्रा मदत मिळण्याचे वरदान मिळालेले आहे.” तर बापदादांनी आनंदाची
बातमी अथवा दृश्य काय बघितले! की या वेळच्या शिवजयंतीच्या सेवेमध्ये चोहो बाजूला
खूप-खूप-खूप चांगली हिंमत आणि उमंग-उत्साहाने पुढे जात आहेत. (सर्वांनी टाळ्या
वाजवल्या) हां, टाळी भले वाजवा. नेहमी अशी टाळी वाजवाल की फक्त शिवरात्रीला? नेहमी
वाजवत रहा. अच्छा. चोहो बाजूने मधुबनमध्ये समाचार तर लिहितात आणि बापदादा तर
वतनमध्येच बघतात. उमंग चांगला आहे आणि प्लॅन सुद्धा चांगले बनवले आहेत. असाच
सेवेमध्ये उमंग आणि उत्साह विश्वाच्या आत्म्यांमध्ये उमंग-उत्साह वाढवेल. बघा
निमित्त दादींच्या लेखणीने कमाल तर केली आहे ना! चांगला रिझल्ट आहे. म्हणून बापदादा
आता प्रत्येक सेंटरचे नाव तर घेणार नाहीत परंतु विशेष सर्व बाजूंच्या सेवेच्या
रिझल्टची, बापदादा प्रत्येक सेवाधारी मुलाची विशेषता आणि नाव घेऊन पद्मगुणा मुबारक
देत आहेत. बघतही आहेत, मुले आपापल्या स्थानावर हे पाहून आनंदित होत आहेत.
विदेशामध्ये देखील आनंदित होत आहेत कारण तुम्ही सर्व तर तेच विश्वाच्या आत्म्यांसाठी
इष्ट देवी आणि देवता आहात ना. बापदादा जेव्हा मुलांच्या सभेला बघतात तेव्हा तीन
रूपांनी बघतात - १. वर्तमान स्वराज्य अधिकारी, आत्ता देखील राजे आहात. लौकिकमध्ये
देखील वडील मुलांना म्हणतात - ‘माझे राजा बच्चे’, ‘राजा बच्चा’. भले गरीब जरी असले
तरी देखील म्हणतात - ‘राजा बच्चा’. परंतु बाबा वर्तमान संगमावर देखील प्रत्येक
मुलाला ‘स्वराज्य अधिकारी राजा बच्चा' म्हणून बघतात. राजे आहात ना! स्वराज्य अधिकारी.
तर वर्तमान स्वराज्य अधिकारी. २. भविष्यामध्ये विश्व राज्य अधिकारी आणि ३. द्वापर
पासून कलियुग अंतापर्यंत पूज्य, पूजनाचे अधिकारी - या तिन्ही रूपामध्ये बापदादा
प्रत्येक मुलाला बघतात. साधारण रूपामध्ये बघत नाहीत. तुम्ही कसेही असाल परंतु
बापदादा प्रत्येक मुलाला ‘स्वराज्य अधिकारी राजा बच्चा’ म्हणून बघतात. राजयोगी आहात
ना! कोणी यामध्ये प्रजा योगी आहेत काय? प्रजा योगी आहेत? नाही. सर्व राजयोगी आहेत.
तर राजयोगी अर्थात राजा. अशा स्वराज्य अधिकारी मुलांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी
स्वत: बाबा आलेले आहेत. बघा, तुम्ही डबल विदेशी तर बर्थ डे साजरा करण्यासाठी
विदेशातून आला आहात. हात वर करा डबल विदेशी. तर जास्तीत जास्त दूरदेश कोणता आहे?
अमेरिका की त्याहीपेक्षा दूर आहे? आणि बापदादा कुठून आले आहेत? बापदादा तर परमधाम
मधून आलेले आहेत. तर मुलांवर प्रेम आहे ना! तर जन्म दिवस किती श्रेष्ठ आहे, जे
भगवंताला देखील यावे लागते. (सर्व भाषांमध्ये बनवलेला एक बर्थ डे चा बॅनर दाखवून
बाबा म्हणतात) - हो, हा चांगला बनवला आहे, सर्व भाषांमध्ये लिहिला आहे. बापदादा
सर्व देशातील सर्व भाषेच्या मुलांना बर्थ डे ची मुबारक देत आहेत.
बघा, बाबांची शिव
जयंती साजरी करतात परंतु बाबा आहेत कोण? बिंदू. बिंदूची जयंती, अवतरण साजरे करत
आहेत. सर्वात हीरे तुल्य जयंती कोणाची आहे? बिंदूची, बिंदीची. तर बिंदीची महिमा किती
आहे! म्हणून बापदादा नेहमी म्हणतात की, तीन बिंदू कायम लक्षात ठेवा - आठ नंबर, सात
नंबर तर तरी देखील मेहनतीने लिहावा लागेल परंतु बिंदू किती इझी आहे. तीन बिंदू -
कायम लक्षात ठेवा. तिघांना चांगल्या प्रकारे जाणता ना. तुम्ही सुद्धा बिंदू, बाबा
सुद्धा बिंदू, बिंदूची मुले बिंदू आहात. आणि कर्मामध्ये जेव्हा येता तर या सृष्टी
मंचावर कर्म करण्यासाठी आलेले आहात, हा सृष्टी मंच ड्रामा आहे. तर ड्रामामध्ये जे
काही कर्म केले, होऊन गेले, त्याला फुलस्टॉप लावा. तर फुलस्टॉप सुद्धा काय आहे?
बिंदू. म्हणून तीन बिंदू कायम लक्षात ठेवा. सर्व कमाल बघा, आजकाल दुनियेमध्ये
सर्वात जास्ती महत्व कशाचे आहे? पैशाचे. पैशाचे महत्व आहे ना! आई-वडील देखील काहीच
नाहीत, पैसाच सर्व काही आहे. त्यामध्ये देखील बघा जर एकाच्या नंतर, एक बिंदू लावला
तर काय बनेल! दहा बनेल ना. दूसरा बिंदू लावला, १०० होतील. तिसरा लावा, १००० होतील.
तर बिंदूची कमाल आहे ना. पैशामध्ये देखील बिंदूची कमाल आहे आणि श्रेष्ठ आत्मा
बनण्यामध्ये देखील बिंदूची कमाल आहे. आणि करनकरावनहार देखील बिंदू आहे. तर सर्व
बाजूंनी कोणाचे महत्व झाले! बिंदूचे ना. बस बिंदू लक्षात ठेवा आणि विस्तारामध्ये
जाऊ नका, बिंदूची तर आठवण करू शकता. बिंदू बना, बिंदूची आठवण करा आणि बिंदू लावा,
बस्स. हा आहे पुरुषार्थ. मेहनत आहे? की सोपे आहे? जे समजतात सोपे आहे त्यांनी हात
वर करा. सोपे आहे तर बिंदू लावावा लागेल. जेव्हा कोणती समस्या येते तेव्हा बिंदू
लावता की क्वेश्चन मार्क? क्वेश्चन मार्क लावू नका, बिंदू लावा. क्वेश्चन मार्क किती
वाकडा असतो. बघा, क्वेश्चन मार्क लिहून पहा, किती वाकडा आहे आणि बिंदू किती सोपा आहे.
तर बिंदू बनायला येते का? येते? सर्व हुशार आहेत.
बापदादांनी विशेष
सेवेच्या उमंग-उत्साहाची मुबारक तर दिली, खूप छान करत आहेत आणि करत राहतील; परंतु
पुढील काळासाठी प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी ‘विश्व सेवाधारी आहे’, हे लक्षात
ठेवा. तुम्हाला लक्षात आहे - ब्रह्माबाबा सही काय करत होते? वर्ल्ड सर्व्हेंट (विश्व
सेवाधारी). तर विश्व सेवाधारी आहात, तर फक्त शिवरात्रीच्या सेवेने विश्वाची सेवा
संपणार नाही. लक्ष्य ठेवा की मी विश्व सेवाधारी आहे, तर विश्वाची सेवा प्रत्येक
श्वासागणिक, प्रत्येक सेकंदाला करायची आहे. जो कोणी येईल, ज्या कोणाशी संपर्क होईल,
त्याला दाता बनून काही ना काही द्यायचेच आहे. कोणीही खाली हात जायला नको. अखंड
भंडारा निरंतर खुला रहावा. कमीत कमी प्रत्येका प्रति शुभ भाव आणि शुभ भावना, हे
अवश्य द्या. शुभ भाव ठेवून पहा, ऐका, संपर्कामध्ये या आणि शुभ भावनेने त्या
आत्म्याला सहयोग द्या. आता सर्व आत्म्यांना तुमच्या सहयोगाची खूप-खूप आवश्यकता आहे.
तर सहयोग द्या आणि सहयोगी बनवा. कोणता ना कोणता सहयोग भले मग मानसिक किंवा शाब्दिक
काहीतरी सहयोग द्या, नाहीतर संबंध-संपर्काने सहयोग द्या, तर या शिवरात्री जन्म
उत्सवाचे विशेष स्लोगन लक्षात ठेवा - “सहयोग द्या आणि सहयोगी बनवा”. कमीत-कमी जो
कोणी संबंध-संपर्कमध्ये येईल त्याला सहयोग द्या, सहयोगी बनवा. कोणी ना कोणी
संबंधामध्ये तर येतातच, त्यांचा भले इतर कोणता पाहुणचार करू नका परंतु प्रत्येकाला
दिलखुश मिठाई जरूर खाऊ घाला. ही जी इथे भंडार्यामध्ये बनते ती दिलखुश मिठाई नाही.
दिल खुश करा. तर दिल खुश करणे म्हणजे दिलखुश मिठाई खाऊ घालणे. खाऊ घालणार ना!
त्यामध्ये तर कोणती मेहनत नाही. ना जास्त वेळ द्यायचा आहे, ना मेहनत आहे. शुभ
भावनेने दिलखुश मिठाई खाऊ घाला. तुम्ही देखील खुश, ते देखील खुश अजून काय पाहिजे.
तर खुश रहाणार आणि खुशी देणार, कधीही तुम्हा सर्वांचा चेहरा जास्त गंभीर होता कामा
नये. टू मच गंभीर (अति गंभीर) सुद्धा चांगले वाटत नाही. हसरेपणा तर असायला हवा ना.
गंभीर बनणे चांगले आहे, परंतु जे टू मच गंभीर असतात ना, तर ते असे असतात जसे माहीत
नाही कुठे हरवून गेले आहेत. बघतही आहेत परंतु हरवले आहेत. बोलत देखील आहेत परंतु
हरवल्यासारखे बोलत आहेत. तर असा चेहरा चांगला नाही. चेहरा नेहमी हसरा असावा. चेहरा
गंभीर करू नका. काय करू, कसे करू आणि मग गंभीर होतात. ‘खूप मेहनत आहे, खूप काम आहे…’
असे म्हणून गंभीर होतात; परंतु जितके खूप काम तितके जास्त हसा. हसता येते ना? येते?
तुमची जड मूर्ती पहा कधी अशी गंभीर दाखवतात का! जर गंभीर दाखवली तर म्हणतात
आर्टिस्ट चांगला नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर गंभीर रहात असाल तर म्हटले जाईल -
‘याला जगण्याची कला येत नाही’. त्यामुळे काय कराल? टीचर्स काय कराल? अच्छा भरपूर
टीचर्स आहेत, टीचर्स मुबारक असो. सेवेची मुबारक असो. अच्छा.
एका सेकंदामध्ये तुमचे
पूर्वज आणि पूज्य स्वरूप इमर्ज करू शकता? त्याच देवी आणि देवतांच्या स्वरूपाच्या
स्मृतीमध्ये स्वत:ला पाहू शकता का? कोणतीही देवी किंवा देवता. मी पूर्वज आहे,
संगमयुगामध्ये पूर्वज आहे आणि द्वापर पासून पूज्य आहे. सतयुग, त्रेता मध्ये राज्य
अधिकारी आहे. तर एका सेकंदामध्ये बाकी सर्व संकल्प संपवून आपल्या पूर्वज आणि पूज्य
स्वरूपामध्ये स्थित व्हा. अच्छा.
चोहो बाजूच्या अलौकिक
दिव्य अवतरण करणार्या मुलांना बाबांच्या जन्म दिवसाची आणि मुलांच्या जन्म दिवसाचे
आशीर्वाद आणि प्रेमपूर्वक आठवण, दिलाराम बाबांच्या हृदयामध्ये राइट हँड सेवाधारी
मुले सदैव सामावलेली आहेत. तर अशा दिलतख्तनशीन श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव बिंदुचे
महत्व जाणणार्या श्रेष्ठ बिंदु स्वरूप मुलांना, सदैव आपल्या स्वमानामध्ये स्थित
राहून सर्वांना आत्मिक सन्मान देणार्या स्वमानधारी आत्म्यांना, सदैव दात्याची मुले
मास्टर दाता बनून प्रत्येकाला आपल्या अखंड भंडार्यामधून काही ना काही देणार्या
मास्टर दाता मुलांना बापदादांची खूप-खूप पद्मगुणा, कोहिनूर हिर्यापेक्षाही जास्त
प्रभू नूर मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
प्रत्येक
शक्तीला ऑर्डर प्रमाणे चालविणारे मास्टर रचयिता भव कर्म सुरू करण्यापूर्वी जसे कर्म
तशा शक्तीचे आवाहन करा. मालक बनून ऑर्डर करा कारण या सर्व शक्ती तुमच्या भुजेप्रमाणे
आहेत, तुमच्या भुजा तुमच्या ऑर्डर शिवाय काहीही करू शकत नाहीत. तुम्ही ऑर्डर करा -
‘सहनशक्ती कार्य सफल कर’ आणि पहा सफलता मिळाल्यातच जमा आहे. परंतु ऑर्डर करण्याऐवजी
घाबरता - करू शकेन की नाही करू शकणार. या प्रकारची भीती असेल तर ऑर्डर कार्य करू
शकत नाही; त्यामुळे मास्टर रचयिता बनून प्रत्येक शक्तीला ऑर्डर प्रमाणे
चालविण्यासाठी निर्भय बना.
सुविचार:-
सहारा-दाता बाबांना
प्रत्यक्ष करून सर्वांना किनाऱ्याला लावा.
अव्यक्त इशारे -
एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- जसे बरेच संशोधक कोणतेही संशोधन
करण्यासाठी एकांतामध्ये राहतात. तर इथला एकांत अर्थात एकाच्या अंतामध्ये हरवून जाणे
आहे, तर बाहेरच्या आकर्षणापासून एकांत हवा. असे नाही की, फक्त रूममध्ये बसण्याचा
एकांत हवा, परंतु मन एकांतामध्ये असावे. मनाची एकाग्रता अर्थात एकाच्या आठवणीमध्ये
रहाणे, एकाग्र होणे हाच एकांत आहे.