23-03-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   02.11.2004  ओम शान्ति   मधुबन


“स्व-उपकारी बनून अपकारीवर देखील उपकार करा, सर्व शक्ति, सर्व गुण संपन्न सन्मान दाता बना”


आज स्नेहाचे सागर आपल्या चोहो बाजूंच्या स्नेही मुलांना बघून हर्षित होत आहेत. भले साकार रूपामध्ये सन्मुख आहेत किंवा स्थूल रूपामध्ये दूर बसलेले आहेत परंतु सर्वांसाठी स्नेहाचा, बाबांच्या समीप बसलो आहोत - असा अनुभव करवत आहेत. प्रत्येक मुलाचा स्नेह, बाबा आपल्या समीप असल्याचा अनुभव करवत आहे. तुम्ही सर्व मुले देखील बाबांच्या स्नेहाने सन्मुख पोहोचला आहात. बापदादांनी पाहिले आहे की, प्रत्येक मुलाच्या हृदयामध्ये बापदादांचा स्नेह सामावलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये “मेरा बाबा” हेच स्नेहाचे गीत वाजत आहे. स्नेहच या देहापासून आणि देहाच्या संबंधांपासून न्यारा बनवत आहे. स्नेहच मायाजीत बनवत आहे. जिथे हृदयापासून स्नेह आहे तिथे माया दुरूनच पळून जाते. स्नेहाच्या सब्जेक्टमध्ये सर्व मुले पास आहेत. एक आहे स्नेह, दुसरे आहे सर्वशक्तिवान बाबांद्वारे सर्व शक्तींचा खजिना.

तर आज बापदादा एका बाजूला तर स्नेहाला बघत आहेत, दुसऱ्या बाजूला शक्तिसेनेच्या शक्तींना बघत आहेत. जितका स्नेह सामावलेला आहे तितक्याच सर्व शक्ती सुद्धा सामावलेल्या आहेत? बापदादांनी सर्व मुलांना सर्व शक्ति एकसारख्याच दिलेल्या आहेत, मास्टर सर्वशक्तिवान बनवले आहे. कोणाला सर्वशक्तिवान, कोणाला शक्तिवान बनवलेले नाही. तुम्ही सर्वजण आपला स्वमान ‘मास्टर सर्वशक्तिवान’ म्हणता ना. तर बापदादा चोहो बाजूंच्या मुलांना विचारत आहेत, की तुम्ही प्रत्येकजण आपल्यामध्ये सर्व शक्तींचा अनुभव करता का? सर्व शक्तींवर नेहमीच अधिकार असतो का? सर्व शक्ती बापदादांचा वारसा आहेत, तर आपल्या वारशावर अधिकार आहे? आहे अधिकार? टीचर्स बोला, अधिकार आहे? विचार करून बोला. पांडव अधिकार आहे? सदैव आहे की कधी-कधी आहे? तर तुम्हा शक्तीसेनेच्या ऑर्डरप्रमाणे ज्यावेळी ज्या शक्तीची आवश्यकता आहे ती शक्ती हजर होते का? वेळेवर ‘जी हजूर हाजिर’ करते का? विचार करा, बघा, अधिकारी ऑर्डर करेल आणि शक्ती जी हजूर हाजिर म्हणेल, ज्या कोणत्या शक्तीचे आवाहन कराल, जशी वेळ, जशी परिस्थिती तशी शक्ती कार्यामध्ये लावू शकाल. असे अधिकारी आत्मे बनला आहात? कारण की बाबांनी वारसा दिला आणि वारशाला तुम्ही आपला बनवलात, आपला बनवला आहे ना! तर जे आपले असते त्यावर अधिकार असतो. ज्यावेळी ज्या विधीने आवश्यकता असेल, त्या वेळी कार्यामध्ये लागावी. समजा, सामावण्याच्या शक्तीची तुम्हाला आवश्यकता असेल आणि ऑर्डर करता सामावण्याच्या शक्तीला, तर तुमची ऑर्डर मानून जी हाजिर होते का? होत असेल तर मान हलवा, हात हलवा. कधी-कधी होते की नेहमी होते? सामावण्याची शक्ती हजर होते, परंतु १० वेळा सामावून घेतले आणि ११ व्या वेळी थोडेसे वर-खाली होते का? नेहमी आणि सहज हजर व्हावी, वेळ निघून गेल्यानंतर येऊ नये; ‘इच्छा तर हेच करायची होती परंतु होऊन गेले’, हे असे होऊ नये. याला म्हटले जाते सर्व शक्तींचे अधिकारी. हा अधिकार बापदादांनी तर सर्वांना दिलेला आहे, परंतु असे दिसून येते की नेहमी अधिकारी बनण्यामध्ये नंबरवार होतात. कायम आणि सहज व्हावे, नॅचरल व्हावे, नेचर (स्वाभाविक) असावे; त्याची विधी आहे - जसे बाबांना ‘हजूर’ देखील म्हटले जाते, म्हणतात - हजूर हाजिर आहेत. हाजिर हजूर म्हणतात. तर जो मुलगा हजूरच्या (बाबांच्या) प्रत्येक श्रीमतावर हाजिर हजूर करून चालतो त्याच्या पुढे सर्व शक्ती देखील हजूर हाजिर करतात. प्रत्येक आज्ञेला जी हाजिर, प्रत्येक पावलाला जी हाजिर. जर प्रत्येक श्रीमतामध्ये जी हाजिर नसेल तर प्रत्येक शक्ती सुद्धा प्रत्येक वेळी हाजिर हजूर करू शकत नाही. जर बाबांच्या श्रीमताचे किंवा आज्ञेचे पालन कधी-कधी करत असाल, तर सर्व शक्ती सुद्धा हाजिर होण्याची तुमची ऑर्डर कधी-कधी पाळते. त्यावेळी अधिकारीच्या ऐवजी अधीन बनतात. तर बापदादांनी हा रिझल्ट चेक केला, तर काय बघितले? नंबरवार आहेत. सर्वजण नंबर वन नाही आहेत, नंबरवार आहेत आणि नेहमीच सहज नाही आहेत. कधी-कधी सहज इमर्ज होते, कधी थोडी मुश्किलीने शक्ती इमर्ज होते.

बापदादा प्रत्येक मुलाला बाप समान बघू इच्छितात. नंबरवार बघू इच्छित नाहीत आणि तुम्हा सर्वांचे लक्ष्य देखील आहे बाप समान बनण्याचे. समान बनण्याचे लक्ष्य आहे की नंबरवार बनण्याचे लक्ष्य आहे? जर विचारले तर सर्वजण म्हणतील समान बनायचे आहे. तर चेक करा - एक म्हणजे, सर्व शक्ति आहेत? ‘सर्व’वर अंडरलाईन करा. सर्व गुण आहेत? बाप समान स्थिती आहे? कधी स्वतःची स्थिती, कधी कोणती पर-स्थिती विजय तर प्राप्त करत नाही ना? जर पर-स्थिती विजय प्राप्त करत असेल तर त्याचे कारण जाणता ना? स्थिती कमजोर असेल तेव्हा परिस्थिती वार करू शकते. सदैव स्व-स्थिती विजयी व्हावी, त्याचे साधन आहे - सदैव स्वमान आणि सन्मान याचा बॅलन्स. स्वमानधारी आत्मा स्वतःच सन्मान देणारा दाता आहे. वास्तविक कोणालाही सन्मान देणे, देणे नसते, सन्मान देणे म्हणजे मान घेणे आहे. सन्मान देणारा सर्वांच्या हृदयामध्ये आपोआपच माननीय बनतो. ब्रह्मा बाबांना बघितले - आदि देव असतानाही, ड्रामाची पहिली आत्मा असतानाही नेहमी मुलांना सन्मान दिला. स्वतःपेक्षा देखील मुलांना जास्त मान आत्म्यांद्वारे दिला म्हणून प्रत्येक मुलाच्या हृदयामध्ये ब्रह्माबाबा माननीय बनले. तर मान दिला की मान घेतला? सन्मान देणे अर्थात दुसऱ्यांच्या हृदयामध्ये हृदयापासूनच्या स्नेहाचे बीज पेरणे. विश्वाच्या समोर देखील विश्व कल्याणकारी आत्मा आहे, हा अनुभव तेव्हा होतो जेव्हा आत्म्यांना स्नेहाने सन्मान देता.

तर बापदादांनी वर्तमान समयी हेच पाहिले की, एकमेकांना सन्मान देण्याची गरज आहे. सन्मान देणाराच विधाता आत्मा दिसून येतो. सन्मान देणारीच बापदादांचे श्रीमत (शुभ भावना, शुभ कामना) मानणारी आज्ञाधारक मुले आहेत. सन्मान देणेच ईश्वरीय परिवाराचे हृदयातील प्रेम आहे. सन्मान देणारा स्वमानामध्ये सहजच स्थिर होऊ शकतो. असे का? ज्या आत्म्यांना सन्मान देता त्या आत्म्यांद्वारे तुम्हाला जे हृदयापासूनचे आशीर्वाद मिळतात, ते आशीर्वादांचे भांडार तुमच्या स्वमानाला सहजच आणि आपोआपच आठवण करून देते म्हणून बापदादा चोहो बाजूच्या मुलांकडून विशेष अंडरलाईन करवून घेत आहेत - सन्मान दाता बना.

बापदादांपाशी जो कोणी मुलगा जसा म्हणून आला, कमजोर आला, संस्काराच्या अधीन असणारा आला, पापांचे ओझे घेऊन आला, कठोर संस्कार घेऊन आला, बापदादांनी प्रत्येक मुलाला कोणत्या नजरेने पाहिले! माझा सिकीलधा लाडका मुलगा आहे, ईश्वरीय परिवाराचा मुलगा आहे. तर सन्मान दिला आणि तुम्ही स्वमानधारी बनलात. तर फॉलो फादर. जर सहज सर्वगुण संपन्न बनू इच्छिता तर सन्मान दाता बना. समजले! सोपे आहे ना? सोपे आहे की कठीण आहे? टीचर्स काय समजता, सोपे आहे? काहींना देणे सोपे आहे, काहींना अवघड आहे की सर्वांना देणे सोपे आहे? तुमचे टायटल (उपाधी) आहे - सर्व उपकारी. अपकार करणाऱ्यावर देखील उपकार करणारे. तर चेक करा - सर्व उपकारी दृष्टी, वृत्ती, स्मृती असते का? दुसऱ्यावर उपकार करणे म्हणजे स्वतःवरच उपकार करणे आहे. तर काय करायचे आहे? सन्मान द्यायचा आहे ना? वेगवेगळ्या गोष्टींमध्ये धारणा करण्यासाठी जी मेहनत करता, त्यापासून सुटका होईल कारण बापदादा बघत आहेत, की वेळेची गती तीव्र होत आहे. वेळ प्रतीक्षा करत आहे, तर तुम्हा सर्वांना तयारी करायची आहे. वेळेची प्रतीक्षा समाप्त करायची आहे. काय तयारी करायची आहे? आपली संपूर्णता आणि समानता याचा वेग तीव्र करायचा आहे. करत आहोत नाही, तीव्र गतीला चेक करा - तीव्र गती आहे?

बाकी स्नेहाने नवीन-नवीन मुले देखील पोहोचली आहेत, बापदादा नवीन मुलांना पाहून आनंदित होत आहेत. जे पहिल्यांदा आले आहेत त्यांनी हात वर करा. भरपूर आहेत. जरूर या बाबांच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये, मुबारक असो. अच्छा.

सेवेचा टर्न कर्नाटकचा आहे:- कर्नाटकवाले उठा. सेवेच्या गोल्डन चान्सची मुबारक असो. बघा पहिला नंबर घेतला आहे तर पहिल्या नंबरवरच रहायचे आहे ना! पुरुषार्थामध्ये, विजयी बनण्यामध्ये सर्वामध्ये पहिला नंबर घेणारे. दुसरा नंबर घ्यायचा नाही, पहिला नंबर. आहे हिंमत! हिंमत आहे? तर हिंमत तुमची आणि हजार पटीने मदत बाबांची. छान चान्स घेतला आहे. आपले पुण्याचे खाते पुष्कळ जमा केले आहे. अच्छा कर्नाटकने मेगा प्रोग्राम केला? नाही केला, का? का नाही केला? कर्नाटकला सर्वांमध्ये पहिला नंबर घ्यायला हवा. (बेंगलोरमध्ये करणार) अच्छा, ज्यांनी कोणी मोठा प्रोग्राम केला आहे त्यांनी उभे रहा. किती प्रोग्राम झाले आहेत? (८-१० झाले आहेत) तर बापदादा मोठ्या प्रोग्रॅमची मोठी मुबारक देत आहेत. झोन किती आहेत! प्रत्येक झोनने मोठा प्रोग्राम करायला हवा कारण तुमच्या शहरामध्ये तक्रार करणारे तक्रार करणार नाहीत. मोठ्या प्रोग्रॅममध्ये तुम्ही ॲडव्हरटाईज देखील मोठी करता ना, भले मग मीडिया द्वारे असो, किंवा पोस्टर द्वारे असो होर्डिंग इत्यादी वेगवेगळी साधने वापरता तर तक्रार कमी होईल. बापदादांना ही सेवा पसंद आहे परंतु… परंतु आहे. प्रोग्राम तर मोठे केलेत त्याची तर मुबारक आहेच परंतु प्रत्येक प्रोग्राम मधून कमीत कमी १०८ ची तरी माळा तयार व्हायला हवी. ती कुठे झाली आहे? कमीतकमी १०८, जास्तीतजास्त १६ हजार. परंतु इतकी जी एनर्जी लावलीत, इतके धन लावलेत, त्याचा रिझल्ट कमीतकमी १०८ तरी तयार व्हावेत. सर्वांचे ॲड्रेस तरी तुमच्याकडे असायला हवेत. मोठ्या प्रोग्राममध्ये जे कोणी घेऊन येणारे आहेत, त्यांच्याशी त्यांचा परिचय तर असतोच तर त्यांना पुन्हा एकत्र आणले पाहिजे. असे नाही की आम्ही केले, परंतु जे काही कार्य केले जाते त्याचे फळ तर निघाले पाहिजे ना. तर प्रत्येक मोठा प्रोग्राम करणाऱ्यांनी हा रिझल्ट बापदादांना द्यायचा आहे. भले मग विविध सेंटर्स वर होईल, कोणत्या शहरासाठी देखील होईल, परंतु रिजल्ट निघायला हवा. ठीक आहे ना, होऊ तर शकते ना! थोडे अटेंशन द्याल तर निघून येतील, १०८ तर काहीच नाहीत. परंतु रिजल्ट बापदादा पाहू इच्छितात, कमीतकमी स्टुडंट तरी बनावेत. सहयोग देण्यामध्ये पुढे यावेत, कोण-कोण किती काढतात, ते बापदादा या सिझनमध्ये रिजल्ट पाहू इच्छितात. ठीक आहे ना? पांडव ठीक आहे? तर बघणार नंबरवन कोण आहे? कितीही काढा, परंतु काढा जरूर. काय आहे प्रोग्राम होतात परंतु पुढचा संपर्क ठेवणे ते अटेंशन थोडे कमी होते आणि काढणे काही अवघड नाही आहे. बाकी बापदादा मुलांची हिंमत पाहून खुश आहेत. समजले! अच्छा.

अच्छा - आता सर्वजण एका सेकंदामध्ये, एक सेकंद एक मिनिट नाही, एका सेकंदामध्ये “मी फरिश्ता सो देवता आहे” - ही मनसा ड्रिल सेकंदामध्ये अनुभव करा. अशी ड्रिल दिवसभरामध्ये एक सेकंदामध्ये पुन्हा-पुन्हा करा. जसे शारीरिक ड्रिल शरीराला शक्तिशाली बनवते, तसे ही मनाची ड्रिल मनाला शक्तिशाली बनविणारी आहे. मी फरिश्ता आहे, ही जुनी दुनिया, जुना देह, जुन्या देहाच्या संस्कारापासून न्यारी फरिश्ता आत्मा आहे. अच्छा!

चोहो बाजूंच्या अति स्नेही, सदैव स्नेहाच्या सागरामध्ये लवलीन आत्म्यांना, सदैव सर्व शक्तींचे अधिकारी श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव बाप समान बनणाऱ्या बाबांच्या प्रिय आत्म्यांना, सदैव स्वमानामध्ये राहणाऱ्या प्रत्येक आत्म्याला सन्मान देणाऱ्या, सर्वांचे माननीय बनणाऱ्या आत्म्यांना, सदैव सर्व उपकारी आत्म्यांना बापदादांची हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण आणि हृदयापासून आशीर्वाद स्वीकार होवो. आणि त्याच सोबत विश्वाच्या मालक आत्म्यांना नमस्ते.

दादीजींसोबत संवाद:- सन्मान देण्यामध्ये नंबरवन पास आहे. चांगले आहे, सर्व दादींमुळे मधुबनची रौनक (छाप) आहे. (सभे सोबत) या सर्वांना दादींची रौनक (छाप) चांगली वाटते ना. जसे दादींच्या रौनकमुळे मधुबनमध्ये रौनक होते, तसे तुम्ही सर्व दादी नाही, दीदी आणि दादे तर आहात. तर सर्व दीदी आणि सर्व दादे, सर्वांनी हा विचार करायचा आहे आणि करायचे आहे, जिथे कुठे राहत असाल त्या स्थानामध्ये रौनक असावी. जशी दादींमुळे रौनक आहे, तशी प्रत्येक स्थानावर रौनक असावी कारण की दादींच्या मागे दीदी तर आहात ना, कमी नाही आहे. दादे देखील आहेत, दीदी देखील आहेत. तर कोणत्याही सेंटरवर रुक्षपणा असता कामा नये, रौनक असायला पाहिजे. तुम्ही प्रत्येकजण विश्वामध्ये रौनक करणारे (प्रकाश पसरविणारे) आत्मे आहात. तर ज्या पण कोणत्या स्थानावर आहात ते रौनकचे स्थान (छाप टाकणारे स्थान) म्हणून नजरेस यावे. ठीक आहे ना? कारण की दुनियेमध्ये हदची रौनक आहे आणि तुम्हा एका-एका मुळे बेहदची रौनक आहे. स्वतः खुशी, शांती आणि अतींद्रिय सुखाच्या रौनकमध्ये असाल तर स्थान देखील रौनकमध्ये येईल कारण की स्थितीमुळे स्थानावर वायुमंडळ पसरते. तर सर्वांनी चेक करायचे आहे की जिथे आम्ही राहतो, तिथे रौनक आहे? उदासी तर नाही आहे? सर्वजण आनंदामध्ये नाचत आहात? असे आहे ना! तुम्हा दादींचे तर हेच काम आहे ना! फॉलो दीदी आणि दादे. अच्छा.

सर्व बाजूंकडून जी काही स्नेही मुले बापदादांना हृदयापासून आठवण करत आहेत आणि पत्र, ईमेल द्वारे आठवण पाठवली आहे, त्या चोहो बाजूंच्या मुलांना बापदादा दूर पहात नाही आहेत परंतु हृदयाच्या तख्तावर पहात आहेत. सर्वात जवळ हृदय आहे. तर बापदादा हृदयापासून आठवण पाठवणाऱ्या आणि आठवण पाठवली नाही परंतु आठवणीमध्ये आहेत, त्या सर्वांनाही दिलतख्तनशीन असल्याचे बघत आहेत. प्रतिसाद देत आहेत. दूर बसून सुद्धा नंबरवन तीव्र पुरुषार्थी भव.

वरदान:-
अलबेलेपणाच्या झोपेला सोडचिठ्ठी देणारे निद्राजीत, चक्रवर्ती भव

साक्षात्कार मूर्त बनून भक्तांना साक्षात्कार करण्यासाठी अथवा चक्रवर्ती बनण्यासाठी निद्राजीत बना. जेव्हा विनाशकाळ विसरायला होतो तेव्हा निष्काळजीपणाने झोप येते. भक्तांची हाक ऐका, दुःखी आत्म्यांच्या दुःखाची हाक ऐका, तहानलेल्या आत्म्यांच्या प्रार्थनेचा आवाज ऐका तर कधीही निष्काळजीपणाची झोप येणार नाही. तर आता सदैव जागती ज्योत बनून निष्काळजीपणाच्या झोपेला सोडचिठ्ठी द्या आणि साक्षात्कार मूर्त बना.

सुविचार:-
तन-मन-धन, मन-वाणी-कर्म कोणत्याही प्रकाराने बाबांच्या कर्तव्यामध्ये सहयोगी बना तर सहजयोगी बनाल.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

जसे बाबांना “गॉड इज ट्रुथ” म्हणतात, बाबांना सत्यताच प्रिय आहे. सच्च्या दिलावर साहेब राजी आहेत. तर दिलतख्तनशीन सर्व्हिसएबुल (सेवाभावी) मुलांना संबंध-संपर्कामध्ये, प्रत्येक संकल्प आणि बोलमध्ये सच्चाई आणि सफाई दिसून येईल. त्यांचा प्रत्येक संकल्प, प्रत्येक वचन सत्य होईल.