23-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
प्रश्न:-
कोणते शब्द कर्म
संन्यासाला सिद्ध करतात, जे शब्द तुम्ही
उत्तर:-
‘ड्रामामध्ये असेल तर करू’, बाबा म्हणतात - हा तर कर्म संन्यास झाला. तुम्हाला कर्म
तर जरूर करायचे आहे. पुरुषार्था शिवाय तर पाणी देखील मिळू शकत नाही, त्यामुळे
‘ड्रामा’ असे म्हणून सोडून द्यायचे नाही. नवीन राजधानीमध्ये उच्च पद मिळवायचे असेल
तर भरपूर पुरुषार्थ करा.
ओम शांती।
सर्व प्रथम मुलांना सावधानी मिळते की, बाबांची आठवण करा आणि वारशाची आठवण करा. ‘मनमनाभव’.
हा शब्द देखील व्यासांनी लिहिला आहे. बाबांनी काही संस्कृतमध्ये सांगितलेले नाहीये.
बाबा तर हिंदी मध्येच सांगत आहेत. मुलांना म्हणतात - की बाबांची आणि वारशाची आठवण
करा. हे सोपे शब्द आहेत की, ‘माझ्या मुलांनो, मज आपल्या निराकार पित्याची आठवण करा’.
लौकिक पिता कधी असे म्हणणार नाहीत की, माझ्या मुलांनो, मज आपल्या पित्याची आठवण करा.
ही आहे नवीन गोष्ट. बाबा म्हणतात - माझ्या मुलांनो, मज आपल्या निराकार पित्याची
आठवण करा. मुले हे देखील समजतात की, रूहानी बाबा आम्हा आत्म्यांशी बोलत आहेत.
वारंवार मुलांना ‘बाबांची आठवण करा’, असे सांगणे शोभत नाही. कारण मुले जाणतात की,
रुहानी बाबांची आठवण करणे आपले कर्तव्य आहे आणि तेव्हाच विकर्म विनाश होतील. मुलांना
निरंतर आठवण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळी कोणीही निरंतर आठवण करू शकणार
नाही, वेळ लागतो. हे बाबा (ब्रह्मा बाबा) म्हणतात - ‘मी देखील निरंतर आठवण करू शकत
नाही’. ती अवस्था अगदी शेवटी स्थिर होईल. तुम्हा मुलांचा पहिला पुरुषार्थ बाबांची
आठवण करण्याचाच करायचा आहे. शिवबाबां कडून वारसा मिळतो. भारतवासीयांचीच गोष्ट आहे.
ही स्थापना होत आहे - दैवी राजधानीची; बाकीचे जे धर्म स्थापन करतात, त्यासाठी
त्यांना कोणत्याच अडचणी येत नाहीत, त्यांच्या मागोमाग येतच राहतात. इथे देवी-देवता
धर्माचे जे आहेत त्यांना ज्ञाना द्वारे जागे करावे लागते. मेहनत करावी लागते. गीता,
भागवत या शास्त्रांमध्ये हे काही नाही आहे की, बाबा संगमावर राजधानी स्थापन करतात.
गीतेमध्ये लिहिलेले आहे की, पांडव डोंगरावर निघून गेले, प्रलय झाला इत्यादी-इत्यादी
… वास्तविक अशी काही गोष्ट तर नाहीये. तुम्ही आता शिकत आहात भविष्य २१ जन्मांकरिता.
इतर स्कूलमध्ये इथल्यासाठीच शिकवितात. साधु-संत इत्यादी जे पण आहेत ते भविष्यासाठीच
शिकवितात कारण ते समजतात आपण शरीर सोडून मुक्तिधाममध्ये निघून जाणार, ब्रह्ममध्ये
लीन होणार. आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होईल. तर ते देखील झाले भविष्याकरिता. परंतु
भविष्यासाठी शिकविणारे एक रूहानी बाबाच आहेत, दुसरे कोणीच नाही. गायले देखील गेले
आहे - ‘सर्वांचा सद्गती दाता एकच आहे’. बाकीचे सारे मग अयथार्थ ठरतात. हे बाबाच
येऊन समजावून सांगतात. ते (संन्यासी) तर साधना करत राहतात; ब्रह्ममध्ये लीन होण्याची
साधना तर अयथार्थ आहे. लीन तर कोणालाच व्हायचे नाहीये. ब्रह्म महतत्त्व काही भगवान
नाही आहे. हे सर्व चुकीचे आहे. झूठ खंडामध्ये सर्व आहेत खोटे बोलणारे. सचखंडामध्ये
सर्व आहेत सत्य बोलणारे. तुम्ही जाणता सचखंड भारतामध्ये होता, आता झूठखंड आहे. बाबा
देखील भारतामध्येच येतात. शिवजयंती साजरी करतात परंतु हे थोडेच जाणतात की शिवबाबांनी
येऊन भारताला सचखंड बनविले आहे. ते समजतात की, भगवान येतच नाहीत. ते नावा-रूपा
पासून न्यारे आहेत. महिमा फक्त गातात - पतित-पावन, ज्ञानाचा सागर… ते तर असेच पोपटा
प्रमाणे बोलतात. बाबाच येऊन समजावून सांगतात. श्रीकृष्ण जयंती साजरी करतात, गीता
जयंती देखील आहे. शिवजयंती विषयी देखील कोणालाच माहीत नाही आहे की, ‘शिव’ येऊन काय
करतात. आणि येतील तरी कसे? जेव्हा
की म्हणतात -
नावा-रुपा पासून न्यारा आहे. बाबा म्हणतात - मीच बसून मुलांना समजावून सांगतो आणि
नंतर मग हे ज्ञान प्राय: लोप होते. बाबा स्वतः सांगतात की मी येऊन भारताला पुन्हा
स्वर्ग बनवतो. कोणीतरी पतित-पावन असेलच ना. मुख्य तर भारताचीच गोष्ट आहे. भारतच
पतित आहे. पतित-पावनला देखील भारतामध्येच बोलावतात. स्वतः म्हणतात - विश्वामध्ये
सैतानाचे राज्य सुरू आहे. बॉम्ब्स इत्यादी बनवत राहतात. त्याद्वारे विनाश होणार आहे.
तयारी करत आहेत. जसे ते रावणा द्वारा प्रेरित झालेले आहेत. रावणाचे राज्य कधी नष्ट
होईल? भारतवासी म्हणतील - जेव्हा श्रीकृष्ण येईल तेव्हा. तुम्ही म्हणता - शिवबाबा
आलेले आहेत. तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत. बाबा म्हणतात माझी आठवण करा. हे शब्द
दुसरे कोणीही बोलू शकणार नाही. बाबाच म्हणतात - ‘माझी आठवण करा तर खाद निघेल’.
तुम्ही सतोप्रधान होता, आता तुमच्या आत्म्यामध्ये भेसळ पडलेली आहे. ती आठवणीनेच
निघेल, याला आठवणीची यात्रा म्हटले जाते. मीच पतित-पावन आहे. माझी आठवण केल्याने
तुमची विकर्म विनाश होतील, याला योग-अग्नी म्हटले जाते. सोन्याला आगीमध्ये घालून
त्यातील कचरा काढून टाकतात. तसेच मग सोन्यामध्ये भेसळ मिसळण्यासाठी देखील त्याला
आगीमध्ये टाकतात. बाबा म्हणतात - ती आहे काम-चिता. ही आहे ज्ञान-चिता. या योगअग्नी
द्वारे भेसळ निघेल आणि तुम्ही श्रीकृष्णपुरीमध्ये जाण्याकरिता लायक बनाल. श्रीकृष्ण
जयंतीला श्रीकृष्णाला बोलावतात. तुम्ही जाणता श्रीकृष्णाला देखील बाबांकडून वारसा
मिळतो. श्रीकृष्ण स्वर्गाचा मालक होता. बाबांनी श्रीकृष्णाला हे पद दिले.
राधा-कृष्णच मग लक्ष्मी-नारायण बनतात. राधे-कृष्णाचा जन्म दिवस साजरा करतात.
लक्ष्मी-नारायणा विषयी तर कोणालाच काही ठाऊक नाहीये. मनुष्य एकदम गोंधळलेले आहेत.
आता तुम्ही मुले समजता तर इतरांना देखील समजावून सांगायचे आहे. सर्व प्रथम तर हेच
विचारायचे आहे की, ‘गीतेमध्ये जे म्हटले आहे - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, हे कोणी
म्हटले आहे?’ ते समजतात की, श्रीकृष्णाने म्हटले आहे. तुम्ही समजता भगवान निराकार
आहेत. त्यांच्याकडूनच उच्च अर्थात श्रेष्ठ मत मिळते. उच्च ते उच्च परमपिता
परमात्माच आहेत. त्यांचेच जरूर श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहे. त्या एकाच्या
श्रीमताद्वारेच सर्वांची सद्गती होते. गीतेचा भगवान ब्रह्मा विष्णू शंकराला देखील
म्हणू शकत नाही. ते लोक तर शरीरधारी श्रीकृष्णाला गीतेचा भगवान म्हणतात. तर यावरून
हे सिद्ध होते की कुठेतरी चूक आहे जरूर. तुम्हाला समजते आहे की, ही लोकांची खूप मोठी
चूक आहे. राजयोग तर बाबांनी शिकविला आहे, तेच पतित-पावन आहेत. खूप मोठ्या-मोठ्या
ज्या चुका आहेत त्यावर जोर द्यायचा आहे. एक तर ईश्वराला सर्वव्यापी म्हणणे, दुसरे
मग गीतेचा भगवान कृष्णाला म्हणणे, कल्प लाखो वर्षांचे आहे असे म्हणणे या खूप मोठ्या
चुका आहेत. कल्प लाखो वर्षांचे असू शकत नाही, परमात्मा सर्वव्यापी असू शकत नाही.
म्हणतात की, ते प्रेरणेद्वारे सर्व काही करतात, परंतु नाही. प्रेरणेने थोडेच पावन
बनवतील. हे तर बाबा सन्मुख बसून समजावून सांगत आहेत - मामेकम् (मज एकाची) आठवण करा.
‘प्रेरणा’ शब्द चुकीचा आहे. भले म्हटले जाते - शंकराच्या प्रेरणेद्वारे बॉम्ब्स
इत्यादी बनवतात. परंतु हे तर सारे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. या यज्ञामधूनच विनाश
ज्वाळा निघाली आहे. प्रेरणा करत नाहीत. हे तर विनाशाकरिता निमित्त बनलेले आहेत.
ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सारा पार्ट शिवबाबांचाच आहे. त्यांच्या नंतर मग पार्ट आहे
- ब्रह्मा, विष्णू, शंकराचा. ब्रह्माच ब्राह्मण रचतात. तेच मग विष्णुपुरीचे मालक
बनतात. नंतर मग ८४ जन्मांचे चक्र फिरून येऊन तुम्ही ब्रह्मावंशी बनले आहात.
लक्ष्मी-नारायणा तेच मग येऊन ब्रह्मा-सरस्वती बनतात. हे देखील समजावून सांगितले आहे
की यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) ॲडॉप्ट करतात म्हणून यांना मोठी मम्मा
म्हटले जाते. आणि ती (मम्मा) निमित्त बनलेली आहे. कलश मातांना दिला जातो. सर्वात
मोठी वीणा सरस्वतीला दिली आहे. ती सर्वात बुद्धिवान आहे. बाकी वीणा किंवा कोणते
वाद्य इत्यादी असे काही नाहीये. सरस्वतीची ज्ञानाची मुरली चांगली होती. त्यांची खूप
चांगली महिमा होती. नावे तर अनेक दिलेली आहेत. देवींची पूजा होते. तुम्ही आता जाणता
आपणच इथे पूज्य बनत आहोत, नंतर मग पुजारी बनून आपलीच पूजा सुरू करणार. आता आपण
ब्राह्मण आहोत पुन्हा आपणच पूज्य देवी-देवता बनणार, यथा राजा-राणी तथा प्रजा.
देवींमध्ये ज्या उच्च पद प्राप्त करतात तर त्यांची बरीच मंदिरे देखील बनतात, नाव
प्रसिद्ध देखील त्यांचेच होते जे चांगल्या रीतीने शिकतात आणि शिकवितात. तर आता
तुम्ही जाणता पूज्य-पुजारी आपणच बनतो. शिवबाबा तर सदैव पूज्य आहेत. सूर्यवंशी
देवी-देवता जे होते तेच पुजारी आणि नंतर मग भक्त बनतात. आपेही पूज्य आपेही पुजारीची
शिडी खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात. चित्रा शिवाय सुद्धा तुम्ही कोणालाही हे
ज्ञान समजावून सांगू शकता. जे शिकून जातात त्यांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण नॉलेज आहे.
८४ जन्मांची शिडी भारतवासीच चढतात आणि मग उतरतात. त्यांचे ८४ जन्म आहेत. पूज्य होतो
आणि मग आपणच पुजारी बनलो आहोत. ‘हम सो, सो हम’चा अर्थ देखील तुम्हाला खूप चांगल्या
रीतीने समजला आहे. आत्मा सो परमात्मा होऊ शकत नाही. बाबांनी ‘हम सो, सो हम’चा अर्थ
समजावून सांगितला आहे. हम सो देवता, सो क्षत्रिय… बनलो आहोत. ‘हम सो’चा अजून दुसरा
कोणताच अर्थ नाही आहे. पूज्य, पुजारी देखील भारतवासीच बनतात आणि इतर धर्मांमध्ये
कोणीही पुज्य आणि पुजारी बनत नाहीत. तुम्हीच सूर्यवंशी, चंद्रवंशी बनता. किती सुंदर
स्पष्टीकरण मिळाले आहे. हम सो देवी-देवता होतो. मी आत्मा निर्वाणधाम मध्ये राहणारी
आहे. हे चक्र फिरतच राहते. जेव्हा दुःखाला सामोरे जावे लागते तेव्हा बाबांची आठवण
करतात. बाबा म्हणतात - ‘मी दुःखाच्या वेळीच येऊन सृष्टीला बदलतो. असे नाही की नवीन
सृष्टीची रचना करतो. नाही, जुन्या दुनियेला नवीन बनविण्याकरिता मी येतो. बाबा
येतातच संगमावर आता नवीन दुनिया बनत आहे. जुनी नष्ट होणार आहे. ही आहे बेहदची गोष्ट.
तुम्ही तयार व्हाल
तेव्हा संपूर्ण राजधानी तयार होईल. कल्प-कल्प ज्यांनी जे पद प्राप्त केले आहे त्या
अनुसार पुरुषार्थ चालत राहतो. असे नाही ड्रामामध्ये जसा पुरुषार्थ केला असेल तसा
होईलच. पुरुषार्थ स्वतः करायचा असतो, तेव्हा मग म्हटले जाते कल्पापूर्वी देखील असाच
पुरुषार्थ केला होता. नेहमी पुरुषार्थालाच मोठे मानले जाते. प्रारब्धावर विसंबून
राहायचे नाहीये. पुरुषार्था शिवाय प्रारब्ध मिळू शकत नाही. पुरुषार्थ केल्या शिवाय
पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. ‘कर्म संन्यास’ शब्द चुकीचा आहे. बाबा म्हणतात - गृहस्थ
व्यवहारामध्ये देखील राहा. बाबा सर्वांनाच काही इथे बसवून ठेवणार नाहीत. शरणागती
गायली गेली आहे. भट्टी बनणार होती कारण त्यांना खूप त्रास दिला गेला होता. तर
त्यांनी बाबांकडे येऊन शरणागती पत्करली (आसरा घेतला). शरणागती तर द्यावीच लागेल ना.
शरणागती केवळ एका परमपिता परमात्म्याचीच घेतली जाते. गुरु इत्यादींकडे शरणागती घेतली
जात नाही. जेव्हा खूप दुःख होते तेव्हा हैराण होऊन शरणागती पत्करतात. गुरूंकडे काही
कोणी हैराण होऊन जात नाहीत. तिथे तर असेच जातात. तुम्ही रावणामुळे खूप हैराण झाले
आहात. आता राम आले आहेत रावणापासून सोडविण्याकरिता. ते तुम्हाला शरणागती देतात.
तुम्ही म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुमचे आहोत’. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना
देखील शिवबाबांकडे शरणागती घेतली आहे. बाबा आम्ही तुमच्याच मतावर चालणार.
बाबा श्रीमत देतात -
गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना माझी आठवण करा बाकी सर्वांची आठवण करणे सोडून द्या.
माझ्या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. फक्त शरण घेण्याची गोष्ट नाही आहे. सर्व
काही आठवणीवर अवलंबून आहे. बाबां व्यतिरिक्त असे कोणीही समजावून सांगू शकणार नाही.
मुले समजतात बाबांकडे इतके लाखो जण कसे येऊन राहतील. प्रजा देखील आपापल्या घरी राहते,
राजाकडे थोडीच राहते. तर तुम्हाला फक्त एवढेच सांगितले जाते की, त्या एकाची आठवण करा.
बाबा आम्ही तुमचे आहोत. तुम्हीच सेकंदामध्ये सद्गतीचा वारसा देणारे आहात. राजयोग
शिकवून राजांचाही राजा बनवता. बाबा म्हणतात - ज्यांनी कल्पा पूर्वी बाबांकडून वारसा
घेतला आहे तेच येऊन घेतील. अंतापर्यंत सर्वांना येऊन बाबांकडून वारसा घ्यायचा आहे.
आता तुम्ही पतित असल्या कारणाने स्वतःला देवता म्हणू शकत नाही. बाबा सर्व गोष्टी
समजावून सांगतात. म्हणतात - माझ्या नूरे रत्न (तेजस्वी रत्नांनो), जेव्हा तुम्ही
सतयुगामध्ये येता तेव्हा तुम्ही एक-एक तारखेपासून राजाई सुरु करता. इतरांची तर
जेव्हा वृद्धी होईल, लाखोच्या अंदाजामध्ये होतील तेव्हा त्यांची राजाई सुरु होईल.
तुम्हाला युद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही योगबळाद्वारे बाबांकडून वारसा घेता. शांत
राहून फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करा. अखेरीला तुम्ही शांत रहाल मग ही चित्रे
इत्यादी काहीच उपयोगाला येणार नाहीत. तुम्ही हुशार बनाल. बाबा म्हणतात - फक्त माझी
आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तर तुम्ही करा किंवा नका करू तुमची मर्जी.
कोणत्याही देहधारीच्या नावा-रूपामध्ये अडकायचे नाही. बाबांची आठवण कराल तर अंत मती
सो गती होईल. तुम्ही माझ्याकडे याल. फुल पास होणाऱ्याला राजाई मिळेल. सारा आधार
आठवणीच्या यात्रेवर आहे. पुढे चालून नवीन देखील खूप पुढे निघून जातील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणत्याही
देहधारीच्या नावा-रूपामध्ये अडकायचे नाही. एका बाबांच्या श्रीमतावर चालून सद्गतीला
प्राप्त करायचे आहे. शांत राहायचे आहे.
२) भविष्य २१
जन्मांकरिता चांगल्या रीतीने शिकायचे आहे आणि इतरांना शिकवायचे आहे. शिकल्याने आणि
शिकविल्यानेच नाव प्रसिद्ध होईल.
वरदान:-
मनमताला आणि
परमताला नष्ट करून श्रीमतावर पद्मांची कमाई जमा करणारे पद्मा-पदम भाग्यशाली भव
श्रीमतावर चालणारे
कधीही मनमतावर अथवा परमतावर एक संकल्प देखील करू शकत नाहीत. स्थितीची गती जर वेगवान
होत नसेल तर जरूर काही ना काही श्रीमतामध्ये मनमत किंवा परमत मिक्स आहे. मनमत
अर्थात अल्पज्ञ आत्म्याच्या संस्कारानुसार जो संकल्प उत्पन्न होतो तो स्थितीला
डळमळीत करतो; त्यामुळे हे चेक करा आणि इतरांकडूनही करवून घ्या, एकही पाऊल श्रीमता
शिवाय नसावे तेव्हाच पद्मांची कमाई जमा करून पद्मा-पदम भाग्यशाली बनू शकाल.
बोधवाक्य:-
मनामध्ये
सर्वांप्रती कल्याणाची भावना कायम राहावी - हेच विश्व कल्याणकारी आत्म्याचे कर्तव्य
आहे.
हे अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
परिस्थिती भले कशीही
असेल परंतु निश्चयबुद्धी मुले परिस्थितीमध्ये आपल्या स्वस्थितीच्या शक्तीद्वारे
नेहमी विजयी अनुभव करतील. भले दुनियेतील लोक अथवा ब्राह्मण परिवाराच्या
संबंध-संपर्कामधील एखाद्याला असे वाटेल किंवा असे समजेल की, हा हरला - परंतु ती हार
नाही तर जीत आहे. कोणत्याही सेवेची, संघटनची, प्रकृतीची परिस्थिती स्वस्थितीला किंवा
श्रेष्ठ स्थितीला डळमळीत करत असेल तर ही देखील बंधनमुक्त स्थिती नाही. या बंधनातून
सुद्धा मुक्त बना.