23-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - रावणाने तुम्हाला खूप दुःखी केले आहे. आता तुम्हा भक्तांचे रक्षक भगवान तुमचे दुःख दूर करण्याकरिता आले आहेत”

प्रश्न:-
सपूत मुलांची मुख्य दोन लक्षणे सांगा?

उत्तर:-
१) सपूत मुले नेहमी माता-पित्याला फॉलो करून तख्तनशीन बनतील. भरपूर पुरुषार्थ करत राहतील. २) बाबांशी त्यांचे मन अतिशय सच्चे असेल. असे सच्च्या मनाचे नेहमी श्रीमतावर चालत राहतील. जर मनामध्ये सच्चाई नसेल तर आठवणीमध्ये राहू शकणार नाहीत.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती। गोड-गोड मुलांनी भक्तिमार्गाचे हे गाणे ऐकले. भक्त या गाण्याच्या अर्थाला जाणत नाहीत. तुम्ही भगवंताची संतान बनला आहात. भगवान रक्षक आहे - भक्तांचा. तुम्ही देखील रक्षक आहात - भक्तांचे. भक्तांची रक्षा करता. कोणते संकट आहे ज्यामुळे भक्त रक्षा करण्याकरिता भगवंताला बोलावतात? भक्तांना रावणामुळे खूप दुःख झाले आहे. रावण संप्रदाय दुःखाने पीडित झाला आहे. तर भोलेनाथची आठवण करतात. तो आहे - रावण संप्रदाय, हा आहे - राम संप्रदाय. भक्तांना हे ठाऊक सुद्धा नाहीये की, आपला रक्षक कोण आहे? भले गातात, भोलानाथ रक्षक आहे. परंतु कोणती रक्षा करतात, हे जाणत नाहीत. तुम्ही मुले आता समजता की, भोलेनाथ शिवबाबा बिगडीला बनविणारे आहेत (दुःखातून सुटका करणारे आहेत). दुनियेला तर माहीतच नाही की भगवान कोणाला म्हटले जाते. भगवंताचा परिचय असेल तर मग भगवंताच्या रचनेच्या आदि-मध्य-अंता विषयी देखील माहिती असेल. परंतु ना भगवंताला जाणतात, ना रचने विषयी माहिती आहे, त्यामुळे अशा मनुष्य संप्रदायाला ब्लाइंड (आंधळे) असे देखील म्हटले जाते. दुसरीकडे तुम्ही आहात, ज्यांना दिव्य दृष्टी मिळाली आहे. आता तुमचे नावच आहे ब्रह्माकुमार-कुमारी. बोर्डावर देखील नाव लिहिलेले आहे - ‘ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय. फक्त ब्रह्माकुमारीच असू शकत नाहीत. ‘प्रजापिता ब्रह्मा’ आहे ना. पित्याला मुलगे आणि मुली दोन्ही असतात. प्रजापिता ब्रह्मालाच इतकी असंख्य मुले असू शकतात. तर समजले पाहिजे हे बेहदचे पिता आहेत. हे देखील जाणतात ब्रह्मा-विष्णू-शंकराला रचणारे बाबाच आहेत, ज्यांना निराकार म्हटले जाते. हे झाले बेहदचे पिता. हे देखील जाणता - परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे रचना रचतात. यांची सारी रचना आहे, सर्व मनुष्य मात्र खरेतर शिववंशी आहेत. आता तुम्ही येऊन प्रजापिता ब्रह्माची संतान बनले आहात. ही आहे नवीन रचना. परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे रचना रचतात तर तुम्हाला ब्रह्माकुमार-कुमारी म्हटले जाते. इतकी सारी बेहदची मुले आहेत जरूर बेहदचा वारसा घेत असतील. मुले जाणतात, आम्हा ब्रह्माकुमार-कुमारींना शिवबाबांनी ॲडॉप्ट केले आहे. शिवबाबा म्हणत आहेत - तुम्ही माझी संतान आहात. तुम्ही आत्मे देखील निराकार होता. परंतु ज्ञान तर साकारमध्ये पाहिजे. तुम्ही जाणता आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो, ब्रह्मा द्वारा रचना इथेच रचली जाते. शिव जयंती देखील इथेच साजरी केली जाते. इथे मगध देशामध्येच जन्म घेतला आहे. बाबा म्हणतात - हा देश अतिशय पवित्र स्वर्ग होता. आता याला नरक, मगध देश म्हटले जाते. नंतर मग स्वर्ग बनणार आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की, शिवबाबा आम्हाला पुन्हा राजयोग शिकवून पवित्र बनवत आहेत. गातात देखील - ‘पतित-पावन भक्तांचा रक्षक भगवान’. भक्तच बोलावतात. पतित असताना देखील स्वतःला कोणी पतित समजत नाहीत. बाबा म्हणतात - तुम्ही सर्वजण पतित आहात. पावन दुनिया सतयुगाला, पतित दुनिया कलियुगाला म्हटले जाते. बाबा तुम्हाला सर्व राईट गोष्टी सांगतात. लाखो वर्षांची तर कोणतीच वस्तू असत नाही. मनुष्य घोर अंधकारामध्ये आहेत; समजतात - कलियुग अजून छोटे बाळ आहे. आणि तुम्ही जाणता - मृत्यू तर समोर उभा आहे. अंधाराचे आणि प्रकाशाचे वर्णन संगमावरच केले जाते. आता तुम्ही लख्ख प्रकाशामध्ये आला आहात. सतयुगामध्ये तुम्ही हे वर्णन करू शकणार नाही. तिथे हे नॉलेजच राहत नाही. यावेळी बाबा बसून मुलांना समजावून सांगतात, तुम्ही सतयुगामध्ये सूर्यवंशी घराण्याचे होता आणि मग शेवटी येऊन शूद्रवंशी घराण्याचे बनले आहात. आता मग ब्राह्मण वंशी बनले आहात. आता तुम्ही आहात सर्वोत्तम ब्राह्मण कुळाचे, तुम्हीच उच्च ते उच्च आहात. हे ईश्वरीय कुळ आहे ना. बाबांकडे येतात तर बाबा त्यांना विचारतात - ‘कोणाकडे आला आहात?’ तर म्हणतात - ‘बाबांकडे’. पिता दोन आहेत - एक आहे लौकिक पिता, दुसरे आहेत पारलौकिक पिता. सर्व शाळीग्रामांचे पिता एक शिवबाबाच आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये हे टपकत राहते. आपण एका बाबांची मुले आहोत, ज्यांच्याकडून वारसा घेतो. निराकार, वारसा तर साकार द्वारेच देतील ना. बाबा स्वतः म्हणतात - मी साधारण तनामध्ये येऊन प्रवेश करतो. आता बाबा मुलांना म्हणतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी भव’. स्वतःला आत्मा समजा. हा देह विनाशी आहे, आत्मा अविनाशी आहे. आत्म्यालाच ८४ जन्म घ्यावे लागतात, ना की देहाला. शरीर तर बदलत राहते, मग दुसरे मित्र-नातलग मिळतात.

आता आत्म्याला बेहदच्या बाबांकडून वारसा घ्यायचा आहे - परमपिता परमात्म्याद्वारे. तुम्हीच ऐकून मग धारण करता. संस्कार तुमच्या आत्म्यामध्ये आहेत. आत्म्यामध्येच संस्कार असतात. असे नाही की शरीराचे संस्कार म्हटले जाईल. नाही, तुमच्या आत्म्याचे संस्कार तमोप्रधान झाले आहेत. त्यांना आता बदलायचे आहे. काया कल्पतरू म्हटले जाते. काया कल्पवृक्षा समान बनते. आयुष्य देखील जास्त असते. तुम्ही जाणता - इथे तर आयुष्य खूप थोडे असते. लहान वयातच बसल्या-बसल्या अकाली मृत्यू होतो. आता तुम्ही काळावर विजय प्राप्त करता. तिथे काळ कधी खात नाही. कधी अकाली शरीर सुटत नाही. तुम्ही जाणता - आता हे शरीर वृद्ध झाले आहे, याला सोडून नवीन घ्यायचे आहे. शरीर सोडत असताना देखील ढोल वाजतात, जन्म घेताना देखील वाजतात. तिथे रडण्याचा काही प्रश्नच नसतो. तुम्हाला भ्रामरीचे उदाहरण देखील सांगितले आहे. तुम्ही आहात ब्राह्मण-ब्राह्मणी. ‘ब्राह्मणी’ आणि ‘भ्रामरी’ची राशी जुळते. जे काम भ्रामरी करते तेच तुम्ही देखील करता. वंडर आहे ना. भ्रामरीचा दृष्टांत, कासवाचा दृष्टांत, सापाचा दृष्टांत हे सर्व शास्त्रांमध्ये आहेत. संन्यासी इत्यादी देखील हे उदाहरण देतात. आता तुम्हा मुलांना बाबांद्वारे हे सर्व काही समजत आहे. तो तर झाला भक्तिमार्ग. पास्टचे गायन करणे, याचे मग नंतरही गायन होईल. यावेळीच बाबा या तनामध्ये येतात, यांना (ब्रह्माला) काही भगवान म्हटले जात नाही. ती तर मग अंधश्रद्धा होते. असे देखील मनुष्य आहेत जे रामाला, कृष्णाला भगवान समजतात. कृष्णाला, रामाला देखील म्हणतात की, ते तर सर्वव्यापी आहेत. कोणी कृष्णपंथी, कोणी राधेपंथी असतात. राधेपंथी असणारे म्हणतील - ‘सर्वत्र राधेच राधे आहे’. कृष्णपंथी असणारे म्हणतील - ‘जिकडे पाहावे तिकडे कृष्णच कृष्ण आहे’. रामपंथी मग ‘रामच राम’ म्हणतील. समजतात राम कृष्णा पेक्षा मोठा आहे कारण रामाला त्रेतामध्ये आणि कृष्णाला द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत. किती अज्ञान आहे. आता बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत, किती असंख्य ब्रह्माकुमार-कुमारी आहेत, जरूर यांचे बेहदचे पिता असतील. तुम्ही कोणालाही विचारू शकता की, ‘प्रजापिता ब्रह्माचे कधी नाव ऐकले आहे काय?’ बाबांनी स्वर्गाची नवीन रचना रचली आहे. गायले देखील जाते - ब्रह्मा द्वारा ब्राह्मण. जोपर्यंत तुम्ही सर्व ब्राह्मण ब्रह्माची मुखवंशावळी बनत नाही तोपर्यंत दादेकडून (आजोबांकडून) वारसा घेऊ शकत नाहीत. बेहदची मुले बेहदचा वारसा बाबांकडूनच घेतात, खरोखर घेतला होता. खरोखर स्वर्गवासी होतो, आता नरकवासी बनलो आहोत. आता पुन्हा प्रजापिता ब्रह्मा द्वारे परमपिता परमात्मा विष्णुपुरी स्वर्ग रचत आहेत. किती सोपे आहे. शिवबाबा विचारतात - ‘या अगोदर तुम्हाला हे ज्ञान होते का’? यांची (ब्रह्माबाबांची) आत्माच म्हणते - ‘मला हे ज्ञान नव्हते. मी देखील विष्णूचा पुजारी होतो’. आपण जे पूज्य होतो तेच आता येऊन पुजारी बनलो आहोत. आता पुन्हा बाबा येऊन आम्हाला पुजारी पासून पूज्य देवता बनवत आहेत. तुम्हा मुलांना आतून आनंद झाला पाहिजे. परमपिता परमात्म्याने येऊन आपल्याला ॲडॉप्ट केले आहे. मनुष्य, मनुष्याला ॲडॉप्ट करतात ना. अशी पुष्कळ माणसे असतात, ज्यांना स्वत:ची मुले नसतात तर ते ॲडॉप्ट करतात. आता बाबा जाणतात - माझी सर्व मुले रावणाची बनली आहेत, म्हणून मलाच येऊन पुन्हा ॲडॉप्ट करावे लागते. ब्रह्मा द्वारे आपल्या मुलांना ॲडॉप्ट करतात. हे ॲडॉप्शन किती वंडरफुल आहे. तुम्हीच जाणता - शिवबाबांनी आपल्याला ब्रह्मा द्वारे ॲडॉप्ट केले आहे. शिवबाबा म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांना ॲडॉप्ट केले आहे, तुम्हाला बेहदच्या सुखाचा वारसा देण्याकरिता’. हे ब्रह्मा काही देऊ शकत नाहीत. हे देखील मनुष्य आहेत ना, प्रजापिता ब्रह्मा. मनुष्य काही हे ज्ञान देत नाहीत. ज्ञानाचा सागर, निराकार परमपिता परमात्माच बसून हे ज्ञान देतात. ब्रह्माला अथवा विष्णूला ज्ञान-सागर म्हटले जात नाही. या तिघांची महिमा वेगळी आहे. ज्ञान-सागर, पतित-पावन एक बाबाच आहेत. साऱ्या दुनियेतील मनुष्य मात्र त्यांना बोलावतात. इंग्रजीत देखील म्हटले जाते - ते लिबरेटर आहेत. ज्याच्याकडून दुःख मिळते, त्याच्या पासून लिबरेट केले जाते. बाबा देखील इथे येऊन रावणापासून लिबरेट करतात. रावण राज्य देखील इथेच झाले आहे. इथेच रावणाला जाळतात. जाळून झाल्या नंतर मग म्हणतात - सोन्याची लंका लुटण्यासाठी जातो. त्यांना तर काहीच माहित नाहीये. रावण काय चीज आहे, केव्हापासूनचा हा दुश्मन आहे. समजतात की, रामाची सीता चोरली गेली. हे समजत नाहीत की आपण सर्व सीता आहोत. आपण आता रावणाच्या जेलमध्ये अडकून पडलो आहोत. हे ज्ञान कोणालाच नाही आहे, फक्त कथा बसून ऐकवतात.

शिवबाबा म्हणतात - मी दूर देशचा राहणारा या परक्या देशामध्ये आलो आहे. ही पतित, दुनिया जुनी आहे ना. ही आहे रावणाची दुनिया. बोलावतात देखील - ‘ओ बाबा, या, आम्ही पतित बनलो आहोत’. बाबा म्हणतात - ‘तुम्हाला पावन बनविण्या करिता मला या पतित दुनियेमध्ये यावे लागते. आणि मला यायचे देखील त्याच शरीरामध्ये आहे जो सर्वात पहिल्या नंबरचा पावन होता; जो सुंदर होता तोच आता श्याम बनला आहे’. किती वंडरफुल गोष्टी आहेत. श्रीकृष्णाला श्याम-सुंदर का म्हटले आहे, हे कोणालाच ठाऊक नाही. एकट्या कृष्णालाच साप डसला काय? सतयुगामध्ये थोडेच साप इत्यादी असतात. बाबा म्हणतात - हा अंतिम जन्म माझ्यासाठी पवित्र बना तर तुम्ही पवित्र दुनियेचे मालक बनाल. फक्त माझी आठवण करा आणि पवित्र बना. ‘अल्फ’ची (बाबांची) आठवण करा - तर बे बादशाही तुमचीच आहे. हा आहे सहज राजयोग, सहज राजाई. बाळ जन्माला आले आणि वारशाचा अधिकारी बनले. मुले हे देखील जाणतात की, आम्ही बाबांचे बनलो आहोत तर स्वर्गाच्या राजाईचे आम्ही अधिकारी आहोत. आता बाबा म्हणतात - तुम्ही सतोप्रधानाचे तमोप्रधान बनले आहात. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. योग आणि ज्ञान शिकविण्यासाठी एक सेकंद लागतो. बाळाचा जन्म झाला आणि वारस ठरला. तुम्ही बाबांचे बनला आहात तर राजधानीचा वारसा तुमचा आहे. परंतु सगळेच काही राजा-राणी बनणार नाहीत. हा आहे राजयोग. राजा-राणी, प्रजा, श्रीमंत, गरीब सर्व पाहिजेत; त्यामुळे ‘रुद्र माळा’ देखील बनलेली आहे, जिचा भक्तिमार्गामध्ये जप केला जातो. तुम्ही जाणता आपण राजयोग शिकण्याकरिता आलो आहोत. माता-पित्याला फॉलो करून सर्वात पहिले सूर्यवंशी, चंद्रवंशी बनणार. सपूत मुले ती जी माता-पित्याला फॉलो करून तख्तनशीन बनतील. भरपूर पुरुषार्थ केला पाहिजे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा, परंतु करतच नाहीत, श्रीमतावर चालत नाहीत. मनामध्ये सच्चाई नाही. मन सच्चे असेल तर श्रीमतावर चालतील. बाबांना आठवण करत राहतील. श्रीमताचे पालन केल्यानेच तुम्हाला आजोबांकडून वारसा मिळतो. ब्रह्मा काही स्वर्गाचा वारसा देऊ शकत नाही. आजोबांच्या कमाईवर नातवाचा हक्क असतो. पित्याच्या कमाईमध्ये मुले भागीदार बनतात त्यामुळे ते हक्कदार आहेत. इथे तुम्हाला शिवबाबांकडून वारसा मिळतो. ज्ञान-रत्ने बाबांकडूनच मिळतात.

तुम्ही जाणता आपण ब्राह्मणच मग देवी-देवता बनणार आहोत. जगत-अंबा कोण आहे? बाबा म्हणतात - ही ब्राह्मणी होती, ज्ञान-ज्ञानेश्वरी होती, मग राज-राजेश्वरी बनते. तुम्ही देखील असेच बनता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आत्म्यामध्ये जे तमोप्रधानतेचे संस्कार आहेत, त्या संस्कारांना आठवणीच्या बळाद्वारे परिवर्तन करायचे आहे. सतोप्रधान बनायचे आहे.

२) बाबांकडून राजाईचा वारसा घेण्याकरिता नेहमी सपूत बच्चा बनून श्रीमतावर चालायचे आहे. सच्च्या बाबांशी सच्चे होऊन राहायचे आहे. माता-पित्याला पूर्णपणे फॉलो करायचे आहे. ज्ञान-रत्नांचे दान करायचे आहे.

वरदान:-
स्व परिवर्तना द्वारे निरंतर विजयाची अनुभूती करणारे सच्चे सेवाधारी भव

जसे निरंतर योगी बनले आहात असेच निरंतर विजयी बना, तेव्हाच सच्चे सेवाधारी बनाल. कारण विजयी आत्मा, जेव्हा प्रत्येक संकल्प, प्रत्येक पावलामध्ये विजयाचा अनुभव करते तर त्यांचे असे परिवर्तन पाहून अनेक आत्म्यांची सेवा स्वतःच होते. त्यांची दृष्टी रुहानियतचा अनुभव करविते, वर्तन बाबांच्या चरित्रांचा साक्षात्कार घडविते, मस्तकामधून मस्तकमणीचा साक्षात्कार होतो. असे आपल्या अव्यक्त चेहऱ्या द्वारे सेवा करणाऱ्या विशेष आत्म्यांनाच सच्चे सेवाधारी म्हटले जाते.

बोधवाक्य:-
विशेषता किंवा गुण ही दात्याची देणगी आहे, त्या दात्याला पहा, व्यक्तीला पाहू नका.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

आत्मिक स्थितीच्या अभ्यासाद्वारे वायुमंडळाला रूहानी बनवा म्हणजे मग इतर सर्व गोष्टी स्वतःच ठीक होतील; सर्व जण एकमत आणि एकरस होतील आणि मग माया देखील येणार नाही, कारण वायुमंडळ शक्तिशाली होईल. वायुमंडळाला शक्तिशाली बनविण्याकरिता आठवणीचे कार्यक्रम आयोजित करा आणि आपसामध्ये उन्नती करण्याकरिता रुह-रुहानचे क्लासेस करा, स्नेह मिलन करा. धारणेचे क्लासेस ठेवा तर सफलता मिळेल.