23-06-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   19.03.20  ओम शान्ति   मधुबन


“निर्माण आणि निर्मान यांचा बॅलन्स ठेवून आशीर्वादांचे खाते जमा करा”


आज बापदादा आपल्या होली हॅप्पी (पवित्र आनंदी) हंसांच्या सभेमध्ये आले आहेत. चोहो बाजूला होली हंस दिसत आहेत. होली हंसांच्या विशेषतेला सर्वजण चांगल्या रीतीने जाणता. सदैव होली हैप्पी हंस अर्थात स्वच्छ आणि साफ मन. अशा होली हंसांचे स्वच्छ आणि साफ हृदय असल्या कारणाने प्रत्येक शुभ आशा सहज पूर्ण होते. सदैव तृप्त आत्मा असतात. श्रेष्ठ संकल्प केला आणि पूर्ण झाला. मेहनत करावी लागत नाही. का? बापदादांना सर्वात प्रिय आणि सर्वात समीप, साफ अंतःकरण असलेले आवडतात. साफ अंतःकरण असणारे सदैव बापदादांचे दिल तख्तनशीन, सर्व श्रेष्ठ संकल्प पूर्ण झाल्या कारणाने वृत्तीमध्ये, दृष्टीमध्ये, बोलण्यामध्ये, संबंध-संपर्कामध्ये सरळ आणि स्पष्ट एकसमान दिसून येतात. सरलतेचे लक्षण आहे - मन, बुद्धी, बोल एक समान. मनामध्ये एक, बोलण्यामध्ये दुसरे - हे सरळपणाचे लक्षण नाही. सरळ स्वभाव असणारे सदैव निर्माणचित्त, निरहंकारी, नि:स्वार्थ असतात. होली हंसाची विशेषता - सरळ-चित्त, सरळ वाणी, सरळ वृत्ती, सरळ दृष्टी.

बापदादा या वर्षामध्ये सर्व मुलांमध्ये दोन विशेषता चलन आणि चेहऱ्यामध्ये पाहू इच्छितात. सगळे विचारतात ना - ‘पुढे काय करायचे आहे? या सीझनच्या विशेष समाप्ती नंतर काय करायचे आहे?’ सगळे विचार करता ना - पुढे काय होणार आहे! पुढे काय करायचे आहे! सेवेच्या क्षेत्रामध्ये तर यथाशक्ति मेजॉरिटींनी खूप छान प्रगती केली आहे, पुढे गेले आहेत. बापदादा या उन्नतीसाठी मुबारक सुद्धा देत आहेत - खूप छान, खूप छान, खूप छान. त्याचसोबत रिझल्टमध्ये एक गोष्ट दिसून आली, ती कोणती सांगू का? टीचर्स ऐकवू, डबल फॉरेनर्स ऐकवू का? पांडव ऐकवू का? हात वर करा तेव्हाच सांगणार, नाही तर नाही सांगणार. (सर्वानी हात वर केले) खूप छान. एक गोष्ट काय पाहिली? कारण आज वतनमध्ये बाप-दादांची आपसामध्ये रुहरिहान (आत्मिक बातचीत) चालू होती, रुहरिहान कसे करतील? दोघे आपसात कसे रुहरिहान करतील? जसे इथे या दुनियेमध्ये तुम्ही लोक मोनो-ॲक्टींग (मुका-अभिनय) करता ना! खूप सुंदर अभिनय करता. तर तुम्हा लोकांची साकारी दुनियेमध्ये तर एक आत्मा दोन पार्ट बजावते आणि बाप-दादा दोन आत्मे आणि एक शरीर आहे. फरक आहे ना! तर खूप मजेशीर गोष्ट आहे.

तर आज वतनमध्ये बाप-दादांची रुहरिहान झाली - कोणत्या गोष्टीवर? तुम्ही सर्व जाणता कि ब्रह्मा बाबांना कोणता उमंग असतो? चांगल्या प्रकारे जाणता ना? ब्रह्मा बाबांना उमंग होता - लवकरात लवकर व्हावे. तर शिवबाबांनी ब्रह्मा बाबांना म्हटले - विनाश किंवा परिवर्तन करणे तर एक टाळी सुद्धा नाही, चुटकी वाजवण्याची गोष्ट आहे. परंतु तुम्ही पहिले १०८ ची नाही, अर्धी माळा तर बनवून द्या. तर ब्रह्मा बाबांनी काय उत्तर दिले असेल? सांगा. (तयार होत आहेत) अच्छा - अर्धी माळा सुद्धा तयार झालेली नाही? संपूर्ण माळेची गोष्ट सोडा, अर्धी माळा तयार झाली आहे? (सर्वजण हसत आहेत) हसता म्हणजे काहीतरी आहे! जे म्हणतात अर्धी माळा तयार आहे, त्यांनी एक हात वर करा. तयार झाली आहे? खूप थोडे आहेत. जे समजतात कि होत आहे, त्यांनी हात वर करा. मेजॉरिटी म्हणत आहेत - ‘होत आहे’ आणि मायनॉरिटी म्हणत आहेत - ‘झाली आहे’. ज्यांनी हात वर केला आहे कि तयार झाली आहे, त्यांना बापदादा म्हणतात, तुम्ही नावे लिहून द्या. चांगली गोष्ट आहे ना! बापदादाच बघतील आणखी कोणीही बघणार नाही, बंद असेल. बापदादा बघतील की अशी चांगली उमेदवार रत्न कोण-कोण आहेत. बापदादा सुद्धा समजतात असायला हवेत. तर यांच्याकडून नावे घ्या, यांचा फोटो काढा.

तर ब्रह्मा बाबांनी काय उत्तर दिले? तुम्ही सर्वांनी तर चांगली-चांगली उत्तरे दिली. ब्रह्माबाबांनी म्हटले, तर मग बस्स, तुम्ही चुटकी वाजवण्याची खोटी, ते तयार होतील. तर चांगली गोष्ट झाली ना! तर शिवबाबा म्हणाले - अच्छा संपूर्ण माळा तयार आहे? अर्ध्या माळेचे तर उत्तर मिळाले, संपूर्ण माळेसाठी विचारले. त्यामध्ये म्हणाले, थोडा वेळ पाहिजे. ही रूहरिहान झाली. थोडा वेळ का पाहिजे? रूहरिहानमध्ये तर प्रश्नोत्तरेच असतात ना. कशासाठी थोडा वेळ हवा आहे? कोणती विशेष कमी आहे ज्यामुळे अर्धी माळा सुद्धा थांबली आहे? तर बाबा, चोहो बाजूंच्या प्रत्येक एरिया, एरियातील मुलांना इमर्ज करत गेले, जसे तुमचे झोन आहेत ना, असेच एक-एक झोन नाही, झोन तर खूप-खूप मोठे आहेत ना. तर एक-एक विशेष शहराला इमर्ज करत गेले आणि सर्वांचे चेहरे बघत गेले, बघता-बघता ब्रह्मा बाबा म्हणाले की, एक विशेषता आता लवकरात लवकर सर्व मुले धारण करतील तर माळा तयार होईल. कोणती विशेषता? तर हेच म्हणाले की जितकी सेवेमध्ये उन्नती केली आहे, सेवा करत पुढे गेले आहेत. छान पुढे गेले आहेत परंतु एका गोष्टीचा बॅलन्स कमी आहे. ती हीच गोष्ट आहे की निर्माण करण्यामध्ये तर चांगले पुढे गेले आहात परंतु ‘निर्माण’ सोबत ‘निर्मान’ (रचनात्मकते सोबत विनम्रता) - ते आहे ‘निर्माण’ आणि ते आहे ‘निर्मान’. एका अक्षराचा फरक आहे. परंतु ‘निर्माण’ आणि ‘निर्मान’ दोन्हीच्या बॅलन्समध्ये फरक आहे. सेवेच्या उन्नतीमध्ये निर्मानता (निरहंकारी) ऐवजी कुठे-कुठे, कधी-कधी स्व-अभिमान देखील मिक्स होतो. जितके सेवेमध्ये पुढे जाता, तितकेच वृत्तीमध्ये, दृष्टीमध्ये, बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये निर्मानता (विनम्रता) दिसावी, या बॅलन्सची आता खूप आवश्यकता आहे. अजून पर्यंत जी सर्व संबंध-संपर्कवाल्यांकडून ब्लेसिंग मिळायला हवी ती ब्लेसिंग मिळत नाही. आणि पुरुषार्थ कोणी कितीही करत असेल, चांगला आहे परंतु पुरुषार्थासोबत जर आशीर्वादांचे खाते जमा नसेल तर दाता-पणाची स्टेज, दयाळू बनण्याची स्टेज यांची अनुभूती होणार नाही. आवश्यक आहे - स्व पुरुषार्थ आणि त्यासोबत बापदादा आणि परिवारातील छोट्या-मोठ्यांचे आशीर्वाद. हे आशीर्वाद जे आहेत - हे पुण्याचे खाते जमा करणे आहे. हे मार्क्समध्ये वाढ करतात. कितीही सेवा करा, आपल्या सेवेच्या धूनमध्ये पुढे जात रहा, परंतु बापदादा सर्व मुलांमध्ये ही विशेषता पाहू इच्छितात की, सेवे सोबत निर्मानता (विनम्रता), मिलनसार (मिळून मिसळून राहणे) - हे पुण्याचे खाते जमा होणे खूप-खूप आवश्यक आहे. नंतर म्हणू नका मी खूप सेवा केली, मी तर हे केले, मी तर हे केले, मी तर हे केले, परंतु मग नंबर मागे का? म्हणून बापदादा अगोदरच इशारा देत आहेत की वर्तमान वेळी हे पुण्याचे खाते खूप-खूप जमा करा. असा विचार करू नका - हा तर असाच आहे, हा तर बदलणारच नाही. जर प्रकृतीला बदलू शकता, प्रकृतीला ॲडजेस्ट करणार ना? तर काय ब्राह्मण आत्म्याला ॲडजेस्ट करू शकत नाही काय? अगेन्स्टला (विरोधी असणाऱ्याला) ॲडजेस्ट करा - हा आहे निर्माण आणि निर्मानचा बॅलन्स. ऐकलेत!

लास्टला होमवर्क तर देतील ना! थोडा तरी होमवर्क मिळणार ना! तर बापदादा येणार्या सीझनमध्ये येतील परंतु... एक कंडिशन (अट) घालणार. पहा साकारचा पार्ट देखील चालला, अव्यक्त पार्ट सुद्धा चालला, इतका वेळ अव्यक्त पार्ट चालेल असे स्वप्नात सुद्धा नव्हते. तर दोन्ही पार्ट ड्रामा नुसार चालले. आता काही तरी कंडिशन घालावी लागेल की नाही! काय मत आहे? काय असेच चालत राहणार? का? आज वतनमध्ये प्रोग्राम सुद्धा विचारला. तर बापदादांच्या रूहरिहानमध्ये हे सुद्धा होते की हा ड्रामाचा पार्ट कधी पर्यंत? काय कोणती डेट आहे? (देहेरादूनच्या प्रेम बेहेनजीला म्हणाले) जन्म-पत्री ऐकवा, कधी पर्यंत? आता हा प्रश्न पडला आहे, कधी पर्यंत? तर परंतु... यासाठी ६ महीने तर आहेतच ना! ६ महिन्यानंतरच दुसरा सीझन सुरू होणार. तर बापदादा रिझल्ट पाहू इच्छितात. स्वच्छ अंतःकरण, अंतःकरणामध्ये कोणताही जुन्या संस्काराचा, अभिमान-अपमानाच्या भावनेचा डाग नसावा.

बापदादांकडे सुद्धा हृदयाचा फोटो काढण्याचे मशीन आहे. इथल्या एक्सरेमध्ये हे स्थूल हृदय दिसून येते ना. तर वतनमध्ये हृदयाचे चित्र खूप स्पष्ट दिसून येते. अनेक प्रकारचे छोटे-मोठे डाग, ढीलेपणा स्पष्टपणे दिसून येतो.

आज होळी साजरी करण्यासाठी आला आहात ना! लास्ट टर्न असल्या कारणाने आधी होमवर्क सांगितला; परंतु होळीचा अर्थ तुम्ही इतरांना सुद्धा ऐकवता की होळी साजरी करणे म्हणजे बीती सो बीती करणे (भूतकाळाला बिंदु लावणे). होळी साजरी करणे अर्थात मनामध्ये कोणताही छोटा-मोठा डाग राहू नये, एकदम स्वच्छ हृदय (मन), सर्व प्राप्ती संपन्न. बापदादांनी या अगोदर देखील सांगितले आहे की बापदादांचे मुलांवर प्रेम असल्या कारणाने एक गोष्ट चांगली वाटत नाही. ती आहे - मुले मेहनत खूप करतात. जर हृदय स्वच्छ होईल तर मेहनत करावी लागणार नाही, दिलाराम हृदयामध्ये सामावलेला असेल आणि तुम्ही दिलारामच्या हृदयामध्ये सामावलेले रहाल. हृदयामध्ये बाबा सामावलेले आहेत. कोणत्याही रूपातील माया, मग सूक्ष्म असो किंवा रॉयल रूपातील असो, नाहीतर मोठे रूप असो, कोणत्याही रूपाने माया येऊ शकत नाही. स्वप्नमात्र, संकल्प मात्र देखील माया येऊ शकत नाही. तर मेहनत मुक्त व्हाल ना! बापदादा मनसामध्ये सुद्धा मेहनत मुक्त पाहू इच्छितात. मेहनत मुक्त असलेलेच जीवनमुक्त असल्याचा अनुभव करू शकतात. होळी साजरी करणे म्हणजे मेहनत मुक्त, जीवनमुक्त अनुभूतीमध्ये राहणे. आता बापदादा मनसा शक्तीद्वारे सेवेला शक्तीशाली बनवू इच्छितात. वाणीद्वारे सेवा होत आली आहे, होत राहील, परंतु यामध्ये वेळ जातो. वेळ कमी आहे, सेवा अजूनही खूप आहे. रिझल्ट तुम्ही सर्वांनी ऐकवला. अजून पर्यंत १०८ ची माळा देखील बनू शकत नाही. १६ हजार, ९ लाख - हे तर दूरच राहिले. यासाठी फास्ट विधी हवी. पहिले आपल्या मनसाला (संकल्पाला) श्रेष्ठ, स्वच्छ बनवा, एक सेकंद सुद्धा व्यर्थ जावू नये. अजून पर्यंत मेजॉरिटींची वेस्ट संकल्पांची पर्सेंटेज राहिली आहे. अशुद्ध नाहीत परंतु वेस्ट आहेत म्हणून मनसा सेवा फास्ट गतीने होऊ शकत नाही. आता होळी साजरी करणे अर्थात मनसाला व्यर्थ पासून देखील होली बनवणे (मुक्त करणे).

होळी साजरी केली का? साजरी करणे अर्थात बनणे. दुनियावाले तर वेग-वेगळ्या रंगांनी होळी साजरी करतात परंतु बापदादा सर्व मुलांवर दिव्य गुणांचा, दिव्य शक्तींचा, ज्ञान गुलाबचा रंग टाकत आहेत.

आज वतनमध्ये अजूनही समाचार होता. एक तर रूहरिहान विषयी सांगितले. दूसरी गोष्ट हि होती की, जे काही तुमचे चांगले-चांगले सेवेचे साथीदार ॲडव्हान्स पार्टीमध्ये गेले आहेत, त्यांचा आज वतनमध्ये होळी साजरी करण्याचा दिवस होता. तुम्हा सर्वांना देखील जेव्हा काही विशेष असते तेव्हा आठवण तर येते ना. आपल्या दादींची, मैत्रीणींची, पांडवांची आठवण तर येते ना! खूप मोठा ग्रुप झाला आहे ॲडव्हान्स पार्टीचा. जर नावे घेतली तर खूप आहेत. तर वतनमध्ये आज सर्व प्रकारचे आत्मे होळी साजरी करण्यासाठी आले होते. सर्वजण आपल्या-आपल्या पुरुषार्थाच्या प्रारब्धा प्रमाणे भिन्न-भिन्न पार्ट बजावत आहेत. ॲडव्हान्स पार्टीचा पार्ट अजून पर्यंत गुप्त आहे. तुम्ही विचार करता ना - काय करत आहेत? ते तुम्हा लोकांचे आवाहन करत आहेत की संपूर्ण बनून दिव्य जन्माद्वारे नवीन सृष्टीचे निमित्त बना. सर्व आपल्या पार्टमध्ये खुश आहेत. ही स्मृती नाहीये की आपण संगमयुगातून आलो आहोत. दिव्यता आहे, पवित्रता आहे, परमात्म प्रेम आहे, परंतु ज्ञान स्पष्टपणे इमर्ज नाहीये. न्यारेपणा आहे, परंतु जर ज्ञान इमर्ज झाले तर सर्व धावत मधुबनमध्ये तर येतील ना! परंतु यांचा पार्ट न्यारा आहे, ज्ञानाची शक्ती आहे. शक्ती कमी झालेली नाहीये. निरंतर मर्यादा पूर्वक घराचे वातावरण, आई-वडिलांची संतुष्टता आणि स्थूल साधन सुद्धा सर्व प्राप्त आहेत. मर्यादांमध्ये खूप पक्के आहेत. नंबरवार तर आहेत परंतु विशेष आत्मे पक्के आहेत. जाणीव होते की आमचा पूर्व जन्म आणि पुनर्जन्म महान होता आणि राहणार. सर्वांची फीचर्स (वैशिष्ट्ये) देखील मैजॉरिटी एक रॉयल फॅमिलीचे तृप्त आत्मे, भरपूर आत्मे, हर्षित आत्मे आणि दिव्य गुण संपन्न आत्मे असल्याचे दिसून येतात. ही तर झाली यांची हिस्ट्री, परंतु वतनमध्ये काय झाले? होळी कशी साजरी केली? तुम्ही लोकांनी पाहिले असेल की होळीमध्ये विविध रंगांच्या, सुके रंग, थाळ्या भरून ठेवतात. तर वतनमध्ये सुद्धा जसा सुका रंग असतो ना - तसे खूप महिन चमकणारे हीरे होते परंतु जड (वजनवाले) नव्हते, जसे रंग हातामध्ये घ्याल तर हलका असतो ना! तशा विविध रंगांच्या हिऱ्यांच्या थाळ्या भरलेल्या होत्या. तर जेव्हा सर्वजण आले, तर वतनमध्ये स्वरूप कोणते असते, जाणता ना? लाइटचेच असते ना! पाहिले आहे ना! तर लाइटची प्रकाशमय काया तर आधीच चमकत असते. तर बापदादांनी सर्वांना आपल्या संगमयुगी शरीरामध्ये इमर्ज केले. जेव्हा संगमयुगी शरीरामध्ये इमर्ज झाले तर एकमेकांना खूप भेटायला लागले. ॲडव्हान्स पार्टीच्या जन्मातील गोष्टी विसरून गेले आणि संगमच्या गोष्टी इमर्ज झाल्या. तर तुम्ही समजता की संगमयुगाच्या गोष्टी जेव्हा एकमेकांमध्ये करता तेव्हा किती आनंदीत होता. खूप आनंदामध्ये एकमेकांशी देवाण-घेवाण करत होते. बापदादांनी सुद्धा पाहिले - हे मस्त मजेत आले आहेत तर भेटू दे यांना. आपसात आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी एकेकांना ऐकवत होते, बाबांनी असे म्हटले, बाबांनी असे मला प्रेम दिले, शिकवण दिली. बाबा असे म्हणतात, बाबा-बाबा, बाबा-बाबा हेच होते. थोड्या वेळाने काय झाले? सर्वांच्या संस्कारांविषयी तर तुम्हाला माहित आहे. तर सर्वात रमणिक कोण होती या ग्रुप मध्ये? (दीदी आणि चंद्रमणी दादी) तर दीदी अगोदर उठल्या, चंद्रमणी दादीचा हात पकडला आणि रास खेळायला सुरूवात केली. आणि दीदी इथे जशी नशेमध्ये मश्गुल होत असे, तशी नशेमध्ये खूप रास केली. मम्माला मधे उभे केले आणि गोल केला, एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावले, खूप खेळले आणि बापदादा सुद्धा बघून खूप हसत होते. होळी साजरी करण्यासाठी आले आहेत तर खेळू देत. काही वेळानंतर सर्वजण बापदादांच्या मिठीत सामावले आणि एकदम लवलीन झाले आणि त्यानंतर मग बापदादांनी सर्वांवर वेग-वेगळ्या रंगांचे जे हीरे होते, खूप महीन होते, जसे कोणत्याही वस्तूची बारीक पावडर असते ना, तसे होते. परंतु चमक खूप होती तर बापदादांनी सर्वांवर घातले. तर चमकणारी बॉडी होती ना तर त्यावर हे वेग-वेगळ्या रंगाचे हीरे पडल्याने सर्वजण खूपच जणू काही सजले. लाल, पिवळा, हिरवा... जे सात रंग म्हणतात ना. तर सातही रंग होते. तर सर्वजण असे खूप चमकत होते जे सतयुगामध्ये सुद्धा असा ड्रेस नसणार. सर्वजण मजेमध्ये तर होतेच. मग एकमेकांवर सुद्धा रंग टाकू लागले. रमणिक बहिणी सुद्धा खूप होत्या ना. खूप-खूप मजा केली. मजे नंतर काय असते? बापदादांनी इनॲडव्हान्स सर्वांना भोग खाऊ घातला, तुम्ही तर उद्या भोग लावणार ना परंतु बापदादांनी मधुबनचा, संगमयुगाचा वेग-वेगळा भोग सर्वांना खाऊ घातला आणि त्यामध्ये विशेष होळीचा भोग कोणता आहे? (घेवर-जिलेबी) तुम्ही लोक गुलाबाचे फूल सुद्धा तळता ना. तर वैरायटी संगमयुगाचेच भोग खाऊ घातले. तुमच्या अगोदर त्यांनी भोग घेतला, तुम्हाला उद्या मिळेल. अच्छा. तर खूप साजरा केला, नाचले, गायले. सर्वांनी मिळून ‘वाह बाबा, मेरा बाबा, मीठा बाबा’चे गाणे म्हटले. तर नाचले, गाणी म्हटली, खाल्ले आणि मग शेवटी काय करतात? शुभेच्छा आणि निरोप. तर तुम्ही देखील होळी साजरी केलीत की फक्त ऐकले? परंतु आधी आता फरीश्ता बनून प्रकाशमय कायावाले बना. बनू शकता की नाही? मोठे शरीर आहे? नाही. सेकंदामध्ये चमकणारे डबल लाइटचे स्वरूप बना. बनू शकता का? एकदम फरीश्ता. (बापदादांनी सर्वांकडून ड्रिल करून घेतली)

आता आपल्यावर वेग-वेगळ्या रंगाचे चमकणारे हीरे सूक्ष्म शरीरावर टाका आणि सदैव असे दिव्य गुणांचे रंग, शक्तींचे रंग, ज्ञानाच्या रंगांनी स्वत:ला रंगवत रहा. आणि सर्वात मोठा रंग बापदादांच्या संगतीच्या रंगामध्ये सदैव रंगून रहा. असे अमर भव. अच्छा.

असे देश-विदेशच्या फरीश्ता स्वरूप मुलांना, सदैव साफ हृदय, प्राप्ती संपन्न मुलांना, खरी होळी साजरी करणे अर्थात अर्थसहित चित्र प्रत्यक्ष रुपामध्ये आणणार्या मुलांना, सदैव निर्माण आणि निर्मान यांचा बॅलन्स ठेवणार्या मुलांना, सदैव आशीर्वादांच्या पुण्याचे खाते जमा करणार्या मुलांना खूप-खूप पद्मगुणा प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
मधुरतेद्वारे बाबांच्या समीपतेचा साक्षात्कार करविणारे महान आत्मा भव

ज्या मुलांच्या संकल्पामध्ये सुद्धा मधुरता, बोलण्यामध्ये देखील मधुरता आणि कर्मामध्ये सुद्धा मधुरता आहे तेच बाबांच्या समीप आहेत. म्हणून बाबा देखील त्यांना रोज म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो’ आणि मुले देखील प्रतिसाद देतात - ‘गोड-गोड बाबा’. तर हे रोजचे मधुर बोल मधुरता संपन्न बनवतात. असे मधुरतेला प्रत्यक्ष करणारे श्रेष्ठ आत्मेच महान आहेत. मधुरताच महानता आहे. मधुरता नाही तर महानतेचा अनुभव होत नाही.

सुविचार:-
कोणतेही कार्य डबल लाइट बनून करा तर मनोरंजनाचा अनुभव कराल.