23-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - तुम्ही
महान सौभाग्यशाली आहात कारण तुम्हाला स्वयं भगवान ते शिक्षण शिकवत आहेत जे
आतापर्यंत कोणत्याही ऋषी-मुनींनी देखील वाचलेले नाही”
प्रश्न:-
ड्रामाच्या
कोणत्या भावीला तुम्ही मुलेच जाणता, दुनियेतील मनुष्य जाणत नाहीत?
उत्तर:-
तुम्ही जाणता
- या रुद्र ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली आहे. आता संपूर्ण जुनी
दुनिया यामध्ये स्वाहा होईल. ही भावी कोणीही टाळू शकत नाही. हा असा अश्वमेध अविनाशी
रुद्र यज्ञ आहे ज्यामध्ये सर्व सामग्री स्वाहा होईल, त्यानंतर मग आपण या पतित
दुनियेमध्ये येणार नाही. याला ईश्वराची भावी नाही, परंतु ड्रामाची भावी म्हटले जाईल.
गीत:-
मुखड़ा देख ले
प्राणी…
ओम शांती।
तुम्ही मुले
देखील मनुष्य आहात. ही मनुष्यांची सृष्टी आहे. यावेळी तुम्ही ब्राह्मण धर्माचे
मनुष्य बनले आहात. बाबा शिकवण देतात आत्म्यांना. आत्म्याला आता आपल्या स्वधर्मा
विषयी माहीत झाले आहे की, मी आत्मा या शरीराला चालविणारी आहे. हे शरीर आत्म्याचा हा
रथ आहे. ज्याप्रमाणे बाबा या रथावर येऊन स्वार झाले आहेत, तुमची आत्मा देखील या
रथावर स्वार झालेली आहे. फक्त आत्मा हे ज्ञान विसरली आहे की, ‘मी आत्मा शांत स्वरूप
आहे. माझे राहण्याचे स्थान मूलवतन आहे. हे शरीर मला इथे मिळते’. अशा प्रकारे
स्वतःशीच गोष्टी करायच्या आहेत. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मा शांत स्वरूप आहात. जर
तुम्हाला वाटत असेल की आपण शांतीमध्ये बसावे तर स्वतःला आत्मा समजून शांतीधामचे
निवासी समजा. थोडा वेळ शांती मध्ये बसू शकता. मनुष्य शांतीच मागतात. मनाला शांती
पाहिजे - हे आत्म्याने म्हटले, परंतु मनुष्य हे जाणत नाहीत की मी आत्मा आहे. हे
विसरून गेले आहेत. एक कथा देखील आहे ना - हार राणीच्या गळ्यातच होता आणि शोधत होती
बाहेर. तर बाबा देखील समजावून सांगत आहेत - शांती तर तुमचा स्वधर्म आहे. मुलांना
समजले आहे - आपण आत्मे शांत स्वरूप आहोत. इथे आलो आहोत पार्ट बजावण्याकरिता. या
कर्मेंद्रियांपासून (शरीरापासून) डिटॅच होतो तेव्हा आत्मा शांत होते. आत्मा आपला
स्वधर्म शांतीमध्ये जितके पाहिजे तितका वेळ बसू शकते. जर आपल्याला या शरीराद्वारे
काम करायचे नसेल, तर शांतीमध्ये बसा. ही आहे खरी शांती, याला तुम्ही शोधत नाही;
परंतु तुमचा स्वधर्म शांत आहे. आता इथे पार्ट बजावत आहात. बाबांकडून माहित झाले आहे,
आपण ८४ जन्मांचा पार्ट बजावला आहे. या ८४ जन्मांच्या चक्रा विषयी कोणालाच ठाऊक
नाहीये. केवळ तुम्ही मुलेच हे समजता. पहिले आपण सूर्यवंशी राजा अथवा प्रजा होतो, मग
चंद्रवंशी सो वैश्य वंशी, सो शूद्र वंशी बनलो. आता पुन्हा आपल्याला सूर्यवंशी बनायचे
आहे.
तुम्ही मुलांनी
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे, तुम्ही किती सौभाग्यशाली आहात. बाबा तर
यथार्थ गोष्ट समजावून सांगतात. हा आहेच सद्गतीचा मार्ग. हे समजावून सांगायचे आहे
की, सर्वांचा सद्गती दाता एकच आहे. तुम्हाला आता माहित आहे की, आपल्याला बाबा येऊन
२१ जन्मांकरिता सद्गती प्राप्त करून देत आहेत. बाहेरचे मनुष्य या गोष्टींना जाणत
नाहीत. तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारीच जाणता. कोणी विचारतात - ‘तुम्ही बी.के. कोणत्या
गोष्टींना जाणता?’ परीक्षा तर झालीच पाहिजे की ब्राह्मण अथवा ब्राह्मणी आहे की नाही.
जर तुम्ही ब्रह्माची मुले आहात तर सृष्टी चक्राला जरूर जाणत असाल. रचयिता बाबांना
जाणता? ऋषी-मुनी इत्यादी तर रचता आणि रचनेला जाणतच नाहीत, म्हणजे मग नास्तिक झाले.
तुम्ही देखील नास्तिक होता. तुम्ही देखील रचयिता बाबा आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला
जाणत नव्हता. स्कूलमध्ये अगोदर अशिक्षितच येतात. नंतर मग म्हणतील स्कूलमध्ये हे-हे
शिकलो आहे. आता तुम्ही आहात ईश्वरीय शिक्षणामध्ये. परमपिता परमात्मा तुम्हाला शिकवत
आहेत. हे बुद्धीमध्ये असले पाहिजे. रचयिता तर एक शिवबाबाच आहेत. रुद्र ने ज्ञान
यज्ञ रचला हे शास्त्रांमध्ये देखील आहे. आता रुद्र आणि शिव परमात्मा यांच्यामध्ये
फरक तर काहीच नाही. असे देखील आहे की, रुद्र ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाळा प्रकटली.
फक्त ‘रुद्र शिव’च्या ऐवजी ‘कृष्णा’चे नाव लिहिले आहे. आहे तर तीच गीता. म्हटले आहे
- या ज्ञान-यज्ञातून विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली. तर स्वराज्यासाठी हा ज्ञान-यज्ञ
आहे. यामध्ये जुनी दुनिया स्वाहा होणार आहे. सर्व आहुती अर्थात सामग्री यज्ञामध्ये
टाकतात. सर्व काही स्वाहा करतात. तर या रुद्रज्ञान-यज्ञामध्ये संपूर्ण जुनी दुनिया
स्वाहा होणार आहे. तुम्ही आता राजयोग शिकत आहात. तुम्ही आता या पतित दुनियेमध्ये
परत येणार नाही. ही दुनिया आता नष्ट होणार आहे. तुम्ही जाणता नैसर्गिक आपत्ती
इत्यादी सर्व काही होईल. हे सगळे नॉलेज तुमच्या बुद्धीमध्ये पक्के झाले पाहिजे.
शिवबाबा म्हणतात - माझ्या बुद्धीमध्येच सारे ज्ञान आहे. बाबा सत् आहेत, चैतन्य आहेत,
ज्ञानाचा सागर आहेत. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणतात. ऋषी-मुनी तर म्हणतात, आम्ही
रचयिता आणि रचनेला जाणत नाही. तुम्हाला जर कोणी विचारले की, ‘तुम्हाला इथे काय मिळते?’
तर बोला - ‘ज्या गोष्टीं बद्दल मोठ-मोठे ऋषी-मुनी इत्यादी म्हणत होते की आम्ही
रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाही ते आम्ही जाणतो’. रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे रहस्य रचयिता बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही स्पष्ट करून सांगू शकणार
नाही. रचयिताच समजावून सांगू शकतील. तुम्हाला ठाऊक आहे, मधमाशांची देखील एक राणी
असते. राणीसोबत तिच्या मागे-मागे सर्व मधमाशा जातात. राणी अर्थात आई सोबत त्यांचे
किती जवळचे नाते असते. बेहदचे बाबा देखील येतात तर सर्व मुलांना सोबत घेऊन जातात.
तुम्ही जाणता - बाबा आलेले आहेत, आम्हा आत्म्यांना सोबत शांतीधाम मध्ये घेऊन जातील.
नंतर मग पुन्हा आपला सतयुगापासून पार्ट सुरू होईल. जो पार्ट बजावण्याकरिता तुम्ही
हे देवी-देवता पद प्राप्त करत आहात. इथे तुम्ही येताच मुळी मनुष्यापासून देवता पद
प्राप्त करण्यासाठी. सर्व गुण इथेच धारण करायचे आहेत. या लक्ष्मी-नारायणा सारखे
बनायचे आहे. यांना दिव्य दृष्टी शिवाय कोणीही पाहू शकत नाही. आता तुम्हीच जाणता आपण
सूर्यवंशी देवता बनणार. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की स्वर्गाची राजधानी कशी स्थापन
होते. सतयुगामध्ये तर देवी-देवतांचेच राज्य होते, परंतु देवतांच्या राज्यामध्ये मग
राक्षस इत्यादी दाखविले आहेत. हे कोणीच जाणत नाहीत की, भारत किती पवित्र होता, महिमा
देखील गातात - सर्वगुण संपन्न... त्यांच्यासमोर डोके देखील टेकवतात. मंदिरे देखील
भरपूर बांधलेली आहेत. परंतु हे माहीत नाही की, सतयुगातील आदि सनातन देवी-देवता धर्म
कधी आणि कसा स्थापन झाला? भारत जो इतका श्रेष्ठ होता, तो नीच कसा बनला? हे कोणालाही
माहीत नाही आहे. म्हणतात - ही भावी पूर्व-नियोजित आहे. कोणाची भावी आहे? ते देखील
समजत नाहीत. ड्रामाची भावी समजतील तर लक्षात येईल. ड्रामाचे रचयिता, क्रिएटर,
डायरेक्टर कोण आहेत? फक्त म्हणतात - ईश्वराची भावी. ड्रामा म्हटल्यावर ड्रामाच्या
आदि-मध्य-अंता विषयी माहित असले पाहिजे. जोपर्यंत कोणी जाऊन चित्रपट पाहणार नाही,
तोपर्यंत केवळ पुस्तक वाचून चित्रपटाविषयी काहीच समजू शकणार नाही. जसे
वर्तमानपत्रामध्ये देखील छापले होते - एक श्रीकृष्ण-चरित्राचा ड्रामा (चित्रपट)
बनलेला आहे. परंतु स्वतः बघितल्या शिवाय कोणाला थोडेच समजू शकेल. जेव्हा बघतील
तेव्हा समजतील की, ड्रामामध्ये (चित्रपटामध्ये) हे-हे सर्व घडणार आहे. तुम्हा
मुलांना देखील आता ड्रामा विषयी समजले आहे. मनुष्य म्हणतात - दुनियेच्या
इतिहास-भूगोलाचे हे चक्र फिरतच राहते. परंतु कसे फिरते, हे कोणालाच ठाऊक नाही. नावे
देखील लिहिलेली आहेत - सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग आणि मग संगमयुग. परंतु लोकांचा
असा समज आहे की - भगवान युगे-युगे येतात. सतयुग-त्रेताचा देखील संगम असतो. परंतु
त्या संगमाचे काहीच महत्त्व नाही. तिथे तर काहीच होत नाही. या गोष्टी तुम्हीच जाणता
- सतयुगी सूर्यवंशींनी मग चंद्रवंशींना राज्य कसे दिले? असे नाही की चंद्रवंशींनी
सूर्यवंशींवर विजय मिळवला. नाही, जो चंद्रवंशींचा राजा असतो त्याला सूर्यवंशी
राजा-राणी राज्य-भाग्याचा तिलक देऊन तख्तावर बसवतात. राजा राम, राणी सीता असे टायटल
मिळते. हे कोणी दिले? तर म्हणतील - सूर्यवंशींनी राज्य हस्तांतरित केले की, आता
तुम्ही राज्य करा. जो सीन तुम्ही मुलांनी साक्षात्कारामध्ये पाहिला आहे. बाकी युद्ध
इत्यादी काही होत नाही. जसे एखाद्याला राज्याधिकार प्रदान केले जातात, तसे देतात.
त्यांचे चरण धुवून त्यांना राजतिलक देतात. तिथे कोणी गुरु-गोसावी तर नसतात. आता
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आपण दैवी स्वभावाचे बनतो. सूर्यवंशी, चंद्रवंशी
राज्यामध्ये आपण किती सुखी असणार. बाबा आपल्याला दुःखातून बाहेर काढून सुखामध्ये
घेऊन जातात, इतर कोणीही सुखी बनवू शकत नाही. स्वतः साधू लोकांना देखील वाटते - आपण
शांतीधाममध्ये जावे. बाबा म्हणतात - मी या साधू इत्यादींचा देखील उद्धार करून
सर्वांना शांतीधाममध्ये घेऊन जातो. संन्यासी तर येतातच मुळी द्वापर मध्ये.
स्वर्गामध्ये आपण देवताच असतो. तिथे देखील वेग-वेगळे सेक्शन आहेत. सूर्यवंशींचा
वेगळा सेक्शन, चंद्रवंशींचा वेगळा सेक्शन; त्यानंतर इस्लामी, बौद्धी, संन्याशी
इत्यादी जे पण येतात, सर्वांचा सेक्शन वेग-वेगळा बनलेला आहे . जेव्हा आपण राज्य करत
होतो तेव्हा दुसरे कोणीच नव्हते. मूलवतनमध्ये देखील अशी नंबरवार माळा बनलेली आहे.
आदि सनातन देवी-देवता धर्मवाल्यांची आहे पहिली बिरादरी (समुदाय). नंतर मग अजून
समुदाय अस्तित्वात येतात. मोठ्यातमोठी बिरादरी ही देवी-देवतांची आहे; आणि बाकीचे जे
धर्म स्थापक येतात - ते सर्व यांच्या बिरादरीमधून (समुदायातून) निर्माण झाले आहेत.
तुम्ही म्हणाल - इस्लामींची आहे सेकंड नंबर बिरादरी. मग बौद्धांची बिरादरी आहे थर्ड
नंबर. आपण फर्स्ट आहोत; बाकी हदच्या अजून छोट्या-छोट्या बिरादरी (समुदाय) तर लाखो
असतील. इथे तर मुख्य चार समुदाय आहेत. सर्वप्रथम आपण येतो, त्यानंतर इस्लामी, बौद्धि,
ख्रिश्चन इत्यादी येतात. आता आपण खाली घसरलो आहोत (आपली अधोगती झाली आहे).
आपल्यालाच ८४ जन्म घेऊन पार्ट बजावावा लागतो. जे आता शेवटी आहेत, तेच मग सुरुवातीला
असतील. देवी-देवता आता पतित असल्या कारणाने स्वतःला देवी-देवता म्हणू शकत नाहीत.
देवतांची तर पूजा करतात यावरून सिद्ध आहे - त्यांच्या बिरादरीचे (समुदायाचे) आहेत.
शीख लोक गुरुनानक यांना मानतात, त्यांच्या बिरादरीचे आहेत. सतयुगामध्ये पहिल्या
नंबरवर आपली बिरादरी आहे. त्यांच्यापेक्षा उच्च बिरादरी कोणतीच नाही. आपण उच्च ते
उच्च बिरादरीचे आहोत. सर्वात जास्त सुख आपण भोगतो, नंतर तेच गरीब बनतात. सर्वात
जास्त दुःखी हेच आहेत. कर्ज देखील हेच घेत राहतात. किती श्रीमंत होते, आता किती
गरीब आहेत. सर्व काही गमावून बसले आहेत. हे आहेच दुःख-धाम. आता बाबा पुन्हा तुम्हाला
शांतीधामचा मालक बनवत आहेत. बाकी सर्व निघून जातील शांतीधामला. अर्धाकल्प तुम्ही
सुख भोगता, बाकीचे सर्व शांतीमध्ये राहतात. सर्वांना वाटते देखील - आपण मुक्तीमध्ये
जावे. सुखाला कागविष्ठा समान समजतात. त्यांना सुखधामचा अनुभवच नाही आहे. तुम्हाला
अनुभव आहे. महिमा देखील गातात परंतु पतित असल्या कारणाने विसरले आहेत. आता बाबा
आठवण करून देत आहेत - ‘हे भारतवासी, तुम्ही देवी-देवता धर्माचे आहात’. द्वापर पासून
नाव बदलले आहे. देवता धर्माचेच पतित बनले आहेत. गात देखील राहतात - ‘हे पतित पावन
या’. बाबांनी सांगितले आहे - तुम्ही किती जन्म पावन दुनियेमध्ये होता. किती जन्म
पतित दुनियेमध्ये आहात. आता पुन्हा पावन दुनियेमध्ये जायचे आहे. ही पाठशाळांची
पाठशाळा आहे, यज्ञांचा यज्ञ आहे. सारी जुनी दुनिया यामध्ये नष्ट होणार आहे. गवत,
लाकडे इत्यादींची होळी पेटवतात - हे सर्व उत्सव आताचे आहेत. आत्मा निघून जाईल, बाकी
शरीरे नष्ट होतील. हे ज्ञान कोणी संन्याशी इत्यादी देऊ शकणार नाही. गीतेमध्ये
थोडे-फार आहे परंतु पिठात मिठा प्रमाणे. हे ज्ञान प्राय: लोप होते. शिवबाबा म्हणतात
- ‘मी हा यज्ञ रचला आहे, यामध्ये तुम्ही तन-मन-धन सर्व स्वाहा करता, जिवंतपणी मरता’.
हे ज्ञान तुम्हाला आताच मिळत आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सुखधाममध्ये
जाण्याकरिता आपला दैवी स्वभाव बनवायचा आहे. ड्रामाच्या आदि-मध्य-अंताच्या रहस्याला
बुद्धीमध्ये ठेवून हर्षित राहायचे आहे. सर्वांना हेच रहस्य सांगायचे आहे.
२) स्वराज्य
घेण्याकरिता या बेहदच्या यज्ञामध्ये जिवंतपणी आपले तन-मन-धन स्वाहा करायचे आहे.
सर्व काही नवीन दुनियेसाठी ट्रान्सफर करायचे आहे.
वरदान:-
आपल्या मस्तका
द्वारे तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडविणारे सच्चे योगी भव
यादगारमध्ये योगीच्या
मस्तकावर तिसरा नेत्र दाखवतात. तुम्ही सच्चे योगी मुले देखील आपल्या मस्तका द्वारे
तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडविण्या करिता नेहमी बुद्धी द्वारे एका बाबांच्या
संगतीमध्ये राहा. एक बाबा आणि दुसरा मी, तिसरा कोणीही नाही; जेव्हा अशी स्थिती होईल
तेव्हा तिसऱ्या नेत्राचा साक्षात्कार घडेल. जर बुद्धीमध्ये कोणी तिसरा आला तर मग
तिसरा नेत्र बंद होईल म्हणून तिसरा नेत्र नेहमी उघडा राहावा - यासाठी लक्षात ठेवा
की, तिसरा कोणीही नाही.
बोधवाक्य:-
प्रश्नचित्त
बनणे अर्थात चिंतित होणे आणि चिंतित करणे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
जो जसे कर्म करतो
त्यावरून त्याचे नाव देखील पडते. कर्म जर श्रेष्ठ असेल तर त्याला नाव पडेल -
श्रेष्ठमणी. श्रेष्ठमणी बनण्याकरिता मन, वाणी, कर्मामध्ये सरळता आणि सहनशीलता हे
दोन्ही गुण आवश्यक आहेत. जर सरळता असेल आणि सहनशीलता नसेल तरी देखील श्रेष्ठ नाही
त्यामुळे सरळता आणि सहनशीलता दोन्ही एकत्रितपणे असावी.