23-07-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला वेळेत आपल्या घरी परत जायचे आहे म्हणून आठवणीचा वेग वाढवा, या
दुःखधामला विसरून शांतीधाम आणि सुखधामची आठवण करा”
प्रश्न:-
कोणते एक गूढ
रहस्य तुम्ही जेव्हा लोकांना सांगाल तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये खळबळ माजेल?
उत्तर:-
त्यांना हे गूढ रहस्य सांगा कि, आत्मा इतका छोटा बिंदू आहे, त्यामध्ये सदा काळासाठी
पार्ट भरलेला आहे, जो पार्ट बजावतच राहते. कधी थकत नाही. मोक्ष कोणाला मिळू शकत नाही.
माणसे, खूप दुःख पाहून म्हणतात - मोक्ष मिळाला तर चांगले आहे, परंतु अविनाशी आत्मा
पार्ट बजावल्या शिवाय राहू शकत नाही. या गोष्टीला ऐकून त्यांच्या आतमध्ये खळबळ
माजेल.
ओम शांती।
गोड-गोड आत्मिक मुलांना बाबा समजावून सांगत आहेत, इथे तर आहेत आत्मिक मुले. बाबा
दररोज समजावत आहेत - खरोखर या दुनियेमध्ये गरिबांना किती दुःख आहे, आता हे पूर
इत्यादी येतात तेव्हा गरिबांना दुःख होते, त्यांच्या सामान इत्यादींची काय हालत होते.
दुःख तर होते ना! अपार दुःख आहे. श्रीमंतांना सुख आहे परंतु ते देखील अल्पकाळासाठी.
श्रीमंत सुद्धा आजारी पडतात, मृत्यू सुद्धा खूप होतात - आज अमका मेला, आज हे झाले.
आज राष्ट्रपती आहे आणि उद्या खुर्ची सोडावी लागते. घेराव घालून त्यांना राजीनामा
द्यायला लावतात. हे देखील दुःखद आहे ना. बाबांनी सांगितले आहे दुःखांची सुद्धा
लिस्ट काढा, या दुःख धाममध्ये कोणत्या-कोणत्या प्रकारची दुःखे आहेत. तुम्ही मुले
सुखधामला देखील जाणता, दुनिया काहीच जाणत नाही. दुःखधाम आणि सुखधाम यांची तुलना ते
करू शकत नाहीत. बाबा म्हणतात - तुम्ही सर्वकाही जाणता, हे मान्य करतील कि बरोबर
सांगतात सत्य आहे. इथे ज्यांच्याकडे मोठ-मोठी घरे आहेत, विमाने इत्यादी आहेत, ते
समजतात कलियुग अजून ४० हजार वर्षे राहणार आहे. त्या नंतर सतयुग येणार. घोर
अंधारामध्ये आहेत ना. आता त्यांना जवळ आणायचे आहे. बाकी थोडा वेळ आहे. कुठे ते लाखो
वर्षे म्हणतात आणि कुठे तुम्ही ५ हजार वर्षे सिद्ध करून सांगता. हे चक्र ५ हजार
वर्षानंतर रिपीट होते. ड्रामा काही लाखो वर्षांचा थोडाच असणार. तुम्हाला समजले आहे,
जे काही होते ते ५ हजार वर्षांमध्ये होते. तर इथे दुःखधाममध्ये रोगराई इत्यादी सर्व
असते. तर तुम्ही मुख्य थोड्या गोष्टी लिहा. स्वर्गामध्ये दुःखाचे नाव सुद्धा नाही.
आता बाबा समजावून सांगत आहेत - ‘मृत्यू समोर उभा आहे, हा तोच गीतेचा एपिसोड चालू आहे’.
जरूर संगमयुगावरच सतयुगाची स्थापना होणार. बाबा म्हणतात कि, मी तुम्हाला राजांचाही
राजा बनवतो तर जरूर सतयुगाचाच बनवतील ना. बाबा व्यवस्थित समजावून सांगतात.
आता आपण सुखधामला जातो. बाबांना घेऊन जावे लागेल. जे निरंतर आठवण करतात तेच उच्च पद
प्राप्त करतील, त्यासाठी बाबा युक्त्या सांगत राहतात. आठवण करण्याचा वेग वाढवा.
कुंभमेळ्याला देखील ठरलेल्या वेळेवर जावे लागते. तुम्हाला देखील वेळेवर जायचे आहे.
असे नाही की आपण लवकर जाऊन पोहोचू. नाही, लवकर जाणे आपल्या हातात नाही आहे. हि तर
आहेच ड्रामाची नोंद. महिमा सर्व ड्रामाची आहे. इथे किती दुःख देणारे जीव-जंतू
इत्यादी आहेत. सतयुगामध्ये हे असत नाहीत. आतल्याआत विचार करायला हवा - तिथे हे-हे
असणार. सतयुगाची आठवण तर येते ना. सतयुगाची स्थापना बाबा करतात. संपूर्ण ज्ञान
थोडक्यात बुद्धीमध्ये शेवटी येते. जसे बीज किती छोटे आहे, झाड किती मोठे आहे. त्या
तर आहेत निर्जीव गोष्टी, या आहेत चैतन्य. या विषयी कोणालाच माहित नाहीये, कल्पाचा
कालावधी भलामोठा करून ठेवला आहे. जास्त सुख भारतालाच मिळते तर दुःख सुद्धा जास्त
भारतालाच मिळते. रोगराई इत्यादी सुद्धा भारतामध्ये जास्त आहेत. इथे मच्छरांसारखी
माणसे मरतात कारण आयुर्मान कमी आहे. इथले सफाई कामगार आणि विदेशातील सफाई कामगार
यांच्यामध्ये किती फरक आहे. सारे शोध परदेशातून इथे येतात. सतयुगाचे नावच पॅराडाईज
(स्वर्ग) आहे. तिथे सर्व सतोप्रधान आहे. तुम्हाला सर्व साक्षात्कार होणार. हे आहे
आता संगमयुग जेव्हा बाबा बसून समजावून सांगत आहेत, सांगत राहतील, नवनवीन गोष्टी
ऐकवत राहतील. बाबा म्हणतात - ‘दिवसेंदिवस अति गूढ गोष्टी ऐकवतो. अगोदर थोडेच माहित
होते, बाबा इतके छोटा बिंदू आहेत, त्यांच्यामध्ये संपूर्ण पार्ट भरलेला आहे फॉर
एव्हर. तुम्ही पार्ट बजावत आले आहात, तुम्ही कोणालाही सांगाल तर त्यांच्या
डोक्यामध्ये किती खळबळ निर्माण होईल कि हे काय म्हणत आहेत, इतक्या छोटयाशा
बिंदूमध्ये संपूर्ण पार्ट भरलेला आहे, जो बजावतच राहतात, कधी थकत नाहीत! हे कोणालाही
माहित नाही. आता तुम्हा मुलांना समजू लागले आहे कि अर्धाकल्प आहे सुख, अर्धा कल्प
आहे दुःख. अतोनात दुःख पाहूनच माणसे म्हणतात - यापेक्षा तर मोक्ष मिळावा. जेव्हा
तुम्ही सुखामध्ये, शांतीमध्ये असाल, तेव्हा थोडेच असे म्हणाल. हे सर्व नॉलेज आता
तुमच्या बुद्धीमध्ये आहे. जसे बाबा बीज असल्या कारणाने त्यांच्याकडे संपूर्ण झाडाचे
नॉलेज आहे. झाडाचे मॉडेल रूप दाखवले आहे. मोठे थोडेच दाखवू शकतो. बुद्धीमध्ये सर्व
नॉलेज येते. तर तुम्हा मुलांची किती विशाल बुद्धी असली पाहिजे. किती समजावून सांगावे
लागते की, अमुक-अमुक इतक्या वेळानंतर पुन्हा पार्ट बजावण्यासाठी येतात, हा किती
प्रचंड मोठा ड्रामा आहे. हा संपूर्ण ड्रामा तर कधी कोणी पाहू देखील शकणार नाही.
इम्पॉसिबल आहे. दिव्य दृष्टीने तर चांगली वस्तू पाहिली जाते. गणेश, हनुमान हे सर्व
आहेत भक्ती मार्गाचे. परंतु माणसांची भावना बसली आहे तर सोडू शकत नाहीत. आता तुम्हा
मुलांना पुरुषार्थ करायचा आहे, कल्पापूर्वी प्रमाणे पद प्राप्त करण्यासाठी शिकायचे
आहे. तुम्ही जाणता पुनर्जन्म तर प्रत्येकाला घ्यायचाच आहे. शिडी कशी उतरलो आहोत, हे
तर मुलांनी जाणले आहे. जे स्वतः जाणतात ते इतरांना सुद्धा समजावून सांगायला सुरु
करतील. कल्पापूर्वी देखील हेच केले असणार. असेच म्युझियम बनवून कल्पापूर्वी सुद्धा
मुलांना शिकवले असणार. पुरुषार्थ करत राहतात आणि करत राहणार. ड्रामामध्ये नोंदलेले
आहे. असे तर पुष्कळ होतील. गल्ली-गल्ली घरा-घरात हे स्कुल असेल. आहे फक्त धारणा
करण्याची गोष्ट. बोला तुम्हाला दोन पिता आहेत, मोठे कोण असतील? त्यांनाच बोलावतात,
दया करा. कृपा करा. बाबा म्हणतात - मागितल्याने काहीही मिळणार नाही. मी रस्ता तर
सांगितला आहे. मी येतोच रस्ता सांगण्यासाठी. सारे झाड तुमच्या बुद्धीमध्ये आहे.
बाबा किती मेहनत करत राहतात. बाकी खूप थोडा वेळ राहिला आहे. मला सेवाभावी मुले
पाहिजेत. घरा-घरामध्ये गीता पाठशाळा पाहिजे. बाकी चित्र इत्यादी नका ठेवू फक्त
बाहेर लिहा. चित्र म्हणून तर हा बॅज सुद्धा पुरेसा आहे. शेवटी हा बॅजच तुमच्या कामी
येईल. इशाऱ्याची गोष्ट आहे. समजून येते बेहदचे बाबा जरूर स्वर्गच रचतील. तर बाबांची
आठवण कराल तेव्हाच तर स्वर्गामध्ये जाल ना. हे तर समजता आपण पतित आहोत, आठवण
केल्यानेच पावन बनणार दुसरा कोणताही उपाय नाही. स्वर्ग आहे पावन दुनिया, स्वर्गाचा
मालक बनायचे असेल तर पावन जरूर बनायचे आहे. स्वर्गामध्ये जाणारे मग नरकामध्ये
गटांगळ्या कसे खाणार; म्हणून म्हटले जाते - मनमनाभव. बेहदच्या बाबांची आठवण करा तर
अंत मती सो गति होईल. स्वर्गामध्ये जाणारे विकारामध्ये थोडेच जातील. भक्त लोक इतके
विकारामध्ये जात नाहीत. संन्यासी देखील असे म्हणणार नाहीत पवित्र बना कारण आपणच
लग्ने लावून देतात. ते गृहस्थीवाल्यांना म्हणतील - महिन्या-महिन्यातून विकारामध्ये
जा. ब्रह्मचारींना असे म्हणणार नाहीत कि तुम्हाला लग्न करायचे नाही आहे. तुमच्याकडे
गंधर्व विवाह करतात तरीही दुसऱ्या दिवशी खेळ खलास करतात. माया खूप आकर्षित करते. तरी
देखील पवित्र बनण्याचा पुरुषार्थ यावेळीच होतो, त्यानंतर मग आहे प्रारब्ध. तिथे तर
रावण राज्यच नाही. क्रिमिनल (विकारी) विचारच नसतात. विकारी रावण बनवतो. निर्विकारी
शिवबाबा बनवतात. हे देखील लक्षात ठेवायचे आहे. घरा-घरामध्ये क्लास (गीता-पाठशाळा)
सुरु होतील तर सर्वजण समजावून सांगणारे बनतील. घरा-घरामध्ये गीता-पाठशाळा बनवून
घरातल्यांना सुधारायचे (ज्ञानी बनवायचे) आहे. अशी वृद्धी होत राहील. साधारण आणि
गरीब, ते जसे हमजिन्स (बरोबरीचे) झाले. मोठ-मोठ्या व्यक्तींना सामान्य माणसांच्या
सत्संगामध्ये यायला देखील लाज वाटेल; कारण ऐकले आहे ना जादू आहे, भाऊ-बहीण बनवतात.
अरे, हे तर चांगले आहे ना. गृहस्थीमध्ये किती समस्या असतात आणि किती दुःखी होतात.
हि आहेच दुःखाची दुनिया. अपार दुःख आहे मग तिथे सुख सुद्धा अपार असेल. तुम्ही लिस्ट
बनवण्याचा प्रयत्न करा. २५-३० मुख्य-मुख्य दुःखाच्या गोष्टी लिहून काढा.
बेहदच्या बाबांकडून वारसा प्राप्त करण्यासाठी किती पुरुषार्थ केला पाहिजे. बाबा या
रथाद्वारे आम्हाला समजावून सांगत आहेत, हे दादा (ब्रह्मा बाबा) सुद्धा स्टुडंट आहेत.
सर्व देहधारी स्टुडंट आहेत. शिकवणारा टीचर आहे विदेही. तुम्हाला देखील विदेही
बनवतात, म्हणून बाबा म्हणतात - शरीराचे भान सोडत जा. हे घर इत्यादी काहीही राहणार
नाही. तिथे सर्व काही नवीन मिळणार आहे, शेवटी तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. हे
तर जाणता त्या बाजूला (विदेशामध्ये) जास्त विनाश होणार आहे ॲटॉमिक बॉम्ब्सद्वारे.
इथे आहेत रक्ताच्या नद्या, यामध्ये वेळ लागतो. इथले मरण खूप वाईट आहे. हा अविनाशी
खंड आहे, नकाशामध्ये पहाल हिंदुस्थान तर एक जसा काही कोपरा आहे. ड्रामा अनुसार इथे
त्याचा परिणाम होतच नाही. इथे रक्ताच्या नद्या वाहतात. आता तयारी करत आहेत. होऊ शकते
शेवटी याना बॉम्ब्स देखील उधारीवर देतील. बाकी ते बॉम्ब्स जे फेकताच दुनिया नष्ट
होणार, ते थोडेच उधारीवर देतील. हलक्या क्वालिटीचे देतील. कामाच्या वस्तू थोड्याच
कोणाला दिल्या जातात. विनाश तर कल्पापूर्वी प्रमाणे होणारच आहे. नवीन गोष्ट नाहीये.
अनेक धर्मांचा विनाश, एका धर्माची स्थापना. भारत खंडाचा कधी विनाश होत नाही. थोडे
तरी वाचणारच आहेत. सगळेच मरून जातील मग तर प्रलय होईल. दिवसेंदिवस तुमची बुद्धी
विशाल होत जाईल. तुमचा खूप आदर केला जाईल. आता इतका आदर थोडाच आहे म्हणून तर कमी
पास होतात. हे लक्षातही येत नाही की, किती शिक्षा भोगावी लागेल आणि मग येतील सुद्धा
उशिराने. कोसळतात (पतन होते) तर मग केलेली कमाई नष्ट होते. काळ्याचे काळेच होतील.
मग ते उभे राहू शकणार नाहीत. किती जातात, किती जाणार सुद्धा आहेत. स्वतः सुद्धा समजू
शकतात की या स्थितीमध्ये जर शरीर सुटले तर आपली काय गती होईल. समजून घेण्याची गोष्ट
आहे ना. बाबा म्हणतात - ‘तुम्ही मुले आहात शांती स्थापन करणारे, तुमच्यामध्येच जर
अशांती असेल तर पद भ्रष्ट होईल’. कोणालाही दुःख देण्याची गरज नाही. बाबा किती
प्रेमाने सर्वांना ‘मुलांनो-मुलांनो’ म्हणत बोलतात. बेहदचे बाबा आहेत ना. साऱ्या
दुनियेचे नॉलेज यांच्यामध्ये आहे तेव्हाच तर समजावून सांगतात. या दुनियेमध्ये किती
प्रकारची दुःखे आहेत. पुष्कळ दुःखाच्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. जेव्हा तुम्ही हे
सिद्ध करून सांगाल तेव्हा समजतील की ही गोष्ट तर एकदम बरोबर आहे. हे अपार दुःख तर
एका बाबांशिवाय इतर कोणीही दूर करू शकत नाही. दुःखांची लिस्ट असेल तर काही ना काही
बुद्धीमध्ये बसेल. बाकी तर ऐकून न ऐकल्यासारखे करतील, त्यांच्या साठीच गायन आहे -
‘रिढ क्या जाने साज से…’. बाबा समजावून सांगत आहेत तुम्हा मुलांना असे गुल-गुल (फूल)
बनायचे आहे. कोणती अशांती, घाण असता कामा नये. अशांती पसरविणारे देह-अभिमानी झाले,
त्यांच्यापासून दूर रहायचे आहे. स्पर्श सुद्धा करायचा नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) शिकवणारे
टीचर जसे विदेही आहेत, त्यांना देहाचे भान नाही, तसे विदेही बनायचे आहे. शरीराचे
भान सोडायचे आहे. क्रिमिनल आय (विकारी दृष्टीला) बदलून सिव्हिल आय (पवित्र दृष्टी)
बनवायची आहे.
२) आपल्या बुद्धीला
विशाल बनवायचे आहे. शिक्षेपासून सुटण्यासाठी बाबांचा आणि शिक्षणाचा आदर बाळगायचा आहे.
कधीही दुःख द्यायचे नाही. अशांती पसरवायची नाही.
वरदान:-
ब्राह्मण
जीवनाच्या नॅचरल नेचर द्वारे दगडाला सुद्धा पाणी बनविणारे मास्टर प्रेमाचे सागर भव
से दुनियेवाले
म्हणतात कि प्रेम दगडाला सुद्धा पाणी बनवते, तसे तुम्हा ब्राह्मणांची नॅचरल नेचर
‘मास्टर प्रेमाचा सागर’ आहे. तुमच्याकडे आत्मिक प्रेम, परमात्म प्रेमाची अशी शक्ती
आहे, ज्याने वेगवेगळ्या नेचरला (स्वभावाला) परिवर्तन करू शकता. जसे प्रेमाच्या
सागराने आपल्या प्रेम स्वरूपाच्या अनादि नेचरद्वारे तुम्हा मुलांना आपले बनवले. तसे
तुम्ही देखील मास्टर प्रेमाचे सागर बनून विश्वाच्या आत्म्यांना सत्य, निःस्वार्थ
आत्मिक प्रेम द्या तर त्यांचे नेचर परिवर्तन होईल.
बोधवाक्य:-
आपल्या
विशेषतांना स्मृतीमध्ये ठेवून त्यांना सेवेमध्ये लावा तेव्हा उडत्या कलेमध्ये उडत
रहाल.