23-08-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.03.2011  ओम शान्ति   मधुबन


दृढ़ संकल्पाद्वारे ‘टेन्शन फ्री’ चे उदाहरण बनून सर्वांचे आधारमूर्त बना, मनसा शक्तीद्वारे दुःखी आत्म्यांना खुशीचे वरदान द्या


आज ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर आपल्या कोटींमध्ये कोणी, कोणी मध्ये देखील कोणी मुलांच्या भाग्याच्या रेषा पाहत आहेत. प्रत्येकाच्या मस्तकातून चमकणारी, चमकणाऱ्या दिव्य ताऱ्याचे तेज पाहत आहेत. डोळ्यांमध्ये स्नेहाची रेषा पाहत आहेत. मुखामध्ये ज्ञानाची रेषा पाहत आहेत. हृदयामध्ये दिलारामच्या प्रेमामध्ये एकरूप झाल्याची रेषा पाहत आहेत. हातामध्ये ज्ञानाच्या खजिन्यांची रेषा पाहत आहेत. पायामध्ये प्रत्येक पावलामध्ये पद्मची रेषा पाहत आहेत. प्रत्येक बच्चा या रेषांनी नंबरवार संपन्न आहे. असे भाग्य तुमच्याशिवाय इतर कोणाचेही नाही. तुमचे इतके श्रेष्ठ भाग्य प्रत्येक मुलामधून चमकताना दिसून येत आहे. आणि हे भाग्य अविनाशी बनते. असे का? कारण देणारे अविनाशी बाबा आहेत. या संगमयुगावरच असे श्रेष्ठ भाग्य प्राप्त होते, जे भविष्यामध्ये देखील चालत राहते. हे संगमयुग सर्व प्राप्तींचे युग आहे, जो जितके आपले भाग्य जमा करतो तितके अनेक जन्म भाग्याचे फळ प्राप्त होत राहते. या संगमयुगाची महिमा तुम्ही मुलेच जाणता. संगमयुगाच्या प्राप्ती संपूर्ण कल्पामध्ये श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहेत.

बापदादा पाहत आहेत प्रत्येक बच्चा या संगमयुगाच्या प्राप्तींनी किती संपन्न झाला आहे. तुम्ही देखील सर्वजण सर्व प्राप्तींच्या अनुभवामध्ये सदैव राहता की कधी-कधी राहता? अविनाशी बाबा आहेत तर प्राप्ती देखील अविनाशी आहेत, बापदादा प्रत्येक मुलाला कोणत्या रूपामध्ये पाहू इच्छित आहेत, जाणता ना! बापदादा हेच इच्छितात की, प्रत्येक मुलाने स्वराज्य अधिकारी राजा बनावे. स्वतःवर अर्थात कर्मेंद्रियांवर, मन-बुद्धी-संस्कारांवर राजा बनून राज्य करावे. भविष्यामध्ये तर राज्य अधिकारी बनाल, परंतु आता स्वराज्य अधिकारी राजा बनावा. कोणतीही कर्मेंद्रिये आपल्या कंट्रोलमध्ये असावीत कारण बाबांद्वारे सर्व शक्तींचा खजिना प्राप्त झाला आहे. तर बापदादा प्रत्येक मुलाला स्वराज्य अधिकारी राजाच्या रूपामध्ये पाहू इच्छित आहेत. तर तुम्ही सर्वजण स्वराज्य अधिकारी बनला आहात? मन-बुद्धीवर रूलिंग पॉवर, कंट्रोलिंग पॉवर आली आहे? अधीनता तर नाहीये ना? अधिकारी आहात. जेव्हा बापदादांना तुम्ही सोबत ठेवता, एकटे राहत नाही, बाबांना सदैव सोबती बनवून ठेवता तेव्हा या मन-बुद्धी-संस्कार कोणाचीही ताकद नाही जी कंट्रोलमध्ये राहणार नाही, म्हणून बापदादा शक्तींना सदैव म्हणतात की आपल्या कोणत्या स्वरूपाला लक्षात ठेवा ज्यामुळे बाबांची सोबत कधीही विसरली जाणार नाही? ते आहे - ‘आम्ही शिवशक्ती आहोत’. शिव आणि शक्ती सोबत आहेत. ही स्मृती मायाजीत, प्रकृतीजीत आपोआप बनवते कारण बापदादांनी सांगून टाकले आहे की वर्तमान वेळी प्रकृती आपले कार्य करत राहते कारण प्रकृतीला देखील मनुष्य आत्मे त्रास देतात तर प्रकृती देखील त्रास देते. आजकाल पाहता की प्रकृती कुठे ना कुठे आपले कार्य करत राहते परंतु तुम्ही प्रकृतीजीत बनून प्रकृतीला देखील सतोप्रधान बनवत आहात. लोक तर प्रकृतीची उलथापालथ पाहून घाबरतात की उद्या काय होईल! परंतु तुम्ही जाणता की चांगल्यात चांगले होईल कारण आता हे संगमयुग म्हणजे सृष्टी चक्राची अमृतवेला चालू आहे. तर अमृतवेले नंतर काय येते? सकाळ. अंधार संपून प्रकाश येतो, तर तुम्हाला आनंद होत आहे की आता आपले राज्य सुखमय संसार, जिथे प्रकृती देखील सुखमय आहे, ते राज्य आले की आले. आनंद आहे ना! ज्या राज्यामध्ये दुःख-अशांतीचे नामोनिशाणही असणार नाही कारण आता संगमावर तुम्ही प्रकृतीजीत बनत आहात. तर सर्वांना आनंद होत आहे ना! कशाचा आनंद? बोला, आमचे राज्य येणार आहे. हा आनंद आहे? जे या आनंदामध्ये राहतात त्यांनी हात वर करा. खूप छान. तुम्ही तर खुश राहता यासाठी मुबारक आहे, परंतु अशी खुशी, आपली खुशी आपले भाऊ-बहिणी जे दुःखी-अशांत आहेत त्यांना आपल्या बाबांकडून घेतलेल्या किरणांद्वारे खुशीची किरणे पोहोचवता का? बापदादांनी सांगितले होते की अशी मनसा सेवा करण्याची वेळ प्रत्येकाने आपल्या दिनचर्येमध्ये फिक्स करायची आहे. जसा इतर कामासाठी टाइम फिक्स केलेला आहे, तसे आपल्या खुशीच्या खुराका द्वारे दुःखी आत्म्यांना मनसा शक्तीद्वारे थोडे-फार वरदान देऊन त्यांना देखील खुश करा. तर ज्यांनी मनसा सेवेसाठी आपली वेळ निश्चित केली आहे, त्यांनी हात वर करा. अच्छा, ज्यांनी केलेली नाहीये, थोडेच आहेत; परंतु प्रत्येकाला यासाठी वेळ निश्चित करायची आहे कारण आपलेच भाऊ-बहिणी आहेत ना. तर दया येते ना! की दया येत नाही? येते ना! आणि बापदादा सर्वांना पाहू इच्छितात की संगमाच्या ज्या विशेष दोन गोष्टी आहेत ज्या अमूल्य आहेत - एक संकल्प शक्ती आणि दुसरी संगमाचा समय; कारण संगमाच्या काळामध्ये एका जन्मामध्ये अनेक जन्मांचे प्रारब्ध बनवायचे आहे. तर आजकाल बापदादांनी पाहिले आहे की, बऱ्याच जणांचे अशुद्ध संकल्प कमी चालतात परंतु व्यर्थ संकल्प येत-जात राहतात. तर या एका जन्माच्या मूल्यानुसार व्यर्थ संकल्प आता फिनिश झाले पाहिजेत. कारण संगमयुगाच्या महत्वाच्या हिशोबाने एक सेकंद कितीतरी मौल्यवान काळाचा अधिकार मिळवून देतो. त्यामुळे प्रत्येकाने या दोन्ही गोष्टींच्या, समय आणि संकल्प दोघांच्या मूल्याला जाणून समयाला आणि संकल्पाला सफल करा. जसे स्थूल खजिन्याला सफल करता, जाणता की एका जन्मामध्ये सफल केल्याने अनेक जन्म त्याची प्राप्ती जमा होते. तसेच या दोन्ही गोष्टींना लक्ष देऊन सफल करून सफलतामूर्त बना.

बापदादा प्रत्येक मुलाला आज विशेष एक वरदान देत आहेत, प्रत्येक बच्चा आजपासून स्वतःला टेन्शन फ्री बनवू शकतो का? दृढ संकल्प करा की आजपासून अटेंशन, नो टेन्शन (आजपासून ‘लक्ष’ असेल ‘तणाव’ नाही). बापदादा मुलांना जेव्हा टेन्शनमध्ये पाहतात ना तेव्हा विचार करतात आता लगेच या मुलाचा फोटो काढून पाठवावा. म्हणजे मग स्वतःच समजून जाईल की मी काय बनलो आहे! बापदादा मनजीत, जगतजीत बनवू इच्छितात. टेन्शन कशामध्ये, मनातच तर येते ना! तर तुम्ही तर राजे आहात ना, स्वराज्य अधिकारी आहात ना! काय मन तुमचे आहे की मन मालक आहे? तुम्ही काय म्हणता? संपूर्ण दिवस ‘माझे मन’ म्हणता ना! मालक तर नाहीये ना! तर कोणामध्ये अशी हिंमत आहे? बाबांचे वरदान सहज मिळेल परंतु फक्त थोडेसे अटेंशन ठेवावे लागेल. बाबांच्या वरदानाच्या मदतीचा अनुभव करून पाहा. सर्वांचा चेहरा जेव्हापण पाहावा तेव्हा कसा दिसावा? टेन्शन फ्री, कमलपुष्प समान अथवा फुललेल्या गुलाबाच्या फुलासारखा.

बापदादांनी पाहिले की, यापूर्वी जे परसेंटेज लिहिण्याचे काम दिले होते, त्याचा सर्व ठिकाणांहून काही ना काही समाचार आला आहे. इथे देखील रिझल्ट काढला आहे. अटेंशन दिले त्याची मुबारक बापदादा देत आहेत. परंतु आता बापदादा हेच इच्छित आहेत की समयानुसार आता वाणी द्वारे ऐकण्यासाठी वेळही कमी मिळेल; त्यामुळे मनसाद्वारे तसेच आपला चेहरा आणि चलनद्वारे सेवा करा. आताचा अभ्यास पुढे येणाऱ्या काळामध्ये उपयोगात येईल. तर आजपासून ‘टेन्शन फ्री’ चा संकल्प करू शकता का? करू शकता तर हात वर करा. टेन्शन फ्री. अच्छा, सर्वांचा फोटो काढा. खूप छान. तर जे आत्मे परिस्थितीनुसार खूप टेन्शनमध्ये राहतात, आजकाल दुनियेमध्ये टेन्शन खूप वाढत चालले आहे, तर तुमचा टेन्शन फ्री चा अनुभव आणि टेन्शन फ्री चे वर्तन आणि चेहरा त्यांच्यासमोर एक आधारमूर्त बनेल. जर आज दुनियेमध्ये चक्कर मारली किंवा बातम्या ऐकल्या तर काय दिसून येते? स्वतःला आनंदी ठेवण्याचे तात्पुरते मार्ग शोधून काढत असतात. तर टेन्शन असलेल्यांना ‘टेन्शन फ्री’चे उदाहरण दाखवा म्हणजे मग त्यांना देखील आधार वाटू लागेल. तर संकल्प केला, आपल्या मनामध्ये संकल्प केला की टेन्शन फ्री राहणार? केला का? दृढ केला की साधारण केला? जिथे दृढता असते तिथे सफलता मिळाल्यातच जमा आहे. करणार नाही, करायचेच आहे. पसंत आहे? यामध्ये हात वर करा.

बापदादांनी एक गोष्ट पाहिली आहे की, हात वर करून खूप खुश करतात. हात वर करून खुश तर केले परंतु आता काय करणार? दृढ संकल्प आणि साधारण संकल्प यामध्ये दिवस-रात्री इतका फरक आहे. करणार आणि करायचेच आहे. तर या वर्षाच्या या सीझनचा आज शेवटचा दिवस आहे परंतु पुढच्या सीझनमध्ये बापदादा प्रत्येक लहान-मोठे सेंटर, मधे भरपूर वेळ आहे, पुढच्या वर्षाच्या सीझनमध्ये, ‘कारण’ नाही परंतु ‘निवारण’ स्वरूप पाहू इच्छित आहेत. तर ब्राह्मण परिवारामध्ये टेन्शनचे नामोनिशाणही नसावे यासाठी किती हिंमत आणि उमंग आहे? होऊ शकते का? प्रत्येकाने स्वतःला विचारा, होऊ शकते? ही आनंदाची बातमी बापदादा ऐकू इच्छित आहेत.

बापदादांनी पाहिले की, इच्छा सर्वजण ठेवतात, करणार परंतु जेव्हा समस्या येते तेव्हा समस्या अधीन बनवते. आणि मग मुले खूप गोड गोष्टी करतात, ‘असे होते ना, असे तर होणार ना! असे तर चालते ना!’ बापदादांना खूप गोड-गोड गोष्टी ऐकवतात. या सर्वांवर उपाय आहे - राजा बनणे, बस्स. स्वराज्य अधिकारी बना. तर आज बापदादा सर्व मुलांना मग ते समोर बसलेले असोत, किंवा दूर बसून हृदयामध्ये बसलेले असोत. तुम्ही तर डोळ्यांसमोर आहात, परंतु बापदादा जे दूर बसले आहेत त्यांना आपल्या हृदयामध्ये पाहत आहेत.

बापदादांना माहीत आहे की आजच्या दिवशी मधुबनमध्ये देखील छोट्या-छोट्या गीता पाठशाला स्थापन झाल्या आहेत. मुले आली आहेत, बापदादा खाली बसणाऱ्यांना, कुठे जागा मिळेल तिथे बसणाऱ्यांना सर्वात आधी खूप-खूप-खूप अंतःकरणापासूनचे प्रेम आणि प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. (आज शांतीवनमध्ये २८ हजारांपेक्षाही अधिक भाऊ-बहिणी पोहोचलेले आहेत.) बापदादांनी पाहिले की मुलांना थोडा त्रास तर सहन करावा लागला आहे परंतु हा त्रास आनंदामध्ये जाणवत नाही. तरी देखील आरामात झोपण्यासाठी तीन पावले पृथ्वी तर मिळाली आहे ना ! जे पट-राणी बनले आहेत त्या मुलांना बापदादा विशेष प्रेमपूर्वक आठवण देत आहेत. अच्छा, जे आज पहिल्यांदा मधुबनमध्ये आले आहेत, अथवा बापदादांना भेटण्यासाठी आले आहेत, त्यांनी उभे राहा. आज पहिल्यांदा येणाऱ्या मुलांना बापदादा नवीन ब्राह्मण परिवारामध्ये येण्याची आपल्या वतीने आणि ब्राह्मण परिवाराच्या वतीने खूप-खूप अभिनंदन करत आहेत; कारण तरी देखील टू लेट आला आहात परंतु आलात तर खरे. बापदादा आणि परिवाराला पाहिले तर खरे. बापदादांना वाटते की, तुम्हाला हवे असेल तर आज येणाऱ्यांना विशेष वरदान आहे की जर मनापासून इच्छा असेल तर लास्ट सो फास्ट, फास्ट सो पुढे येऊ शकता. बापदादांचे आणि परिवाराचे तुम्हा सर्व आत्म्यांवर प्रेम आहे, सहयोगी बनतील, स्नेह देतील आणि तुम्हाला पुढे करतील. चान्स देतील, म्हणून आज येणाऱ्यांना पुढे जाण्याची खूप छान संधी ड्रामामध्ये मिळू शकते. संपूर्ण परिवार जिथून पण आला आहात तर तो परिवार तुमचा सहयोगी बनेल, तुम्ही सहजयोगी बना. अच्छा.

सेवेचा टर्न राजस्थान आणि भोपाळ झोनचा आहे:- राजस्थानची धरती ब्रह्मा बाबांना खूप आवडली, ज्यामुळे राजस्थानमध्येच मधुबन बनवले आहे. राजस्थानच्या सेवेमध्ये बापदादांनी पाहिले की प्रत्येक ठिकाणी आता चांगली वृद्धी होत आहे. नवीन-नवीन आत्म्यांना बाबांचा संदेश देण्याचे कार्यक्रम देखील चांगले होत आहेत. परंतु बापदादा सर्वांना हेच सांगत आहेत की, प्रत्येक सेवाकेंद्राने यज्ञ स्नेही, वारसदार, असा ग्रुप बनवावा जो स्वतः देखील पुढे जात राहील, इतरांना देखील यज्ञ स्नेही बनवेल. मागच्या वेळी देखील बापदादांनी हे सांगितले होते की यज्ञ स्नेही, सेवा स्नेही आणि सफल करण्यामध्ये सदैव पुढे-पुढे जाणारे या सर्वांची वृद्धी होत आहे; चांगले आहे, संदेश देण्याच्या कार्यामध्ये प्रत्येकजण उमंग-उत्साहामध्ये आहे. आता बापदादा हेच पाहू इच्छित आहेत की, प्रत्येक सेंटरवरून ‘स्व’ आणि ‘सेवा’ या दोन्हीचा बॅलन्स करणारे जास्तीत-जास्त पुढे आले पाहिजेत. फक्त सेवा नको, ‘स्व’ आणि ‘सेवा’; कारण आता स्व परिवर्तन करण्याची वेळ इतकी जास्त उरलेली नाहीये, त्यामुळे आधी ‘स्व’ आणि सोबतच ‘सेवा’. प्रत्येक सेवाकेंद्र निर्विघ्न, सर्व साथीदार निर्विघ्न, केवळ टीचरच नाहीत परंतु संपूर्ण क्लास निर्विघ्न आणि स्व परिवर्तनावर अटेंशन ठेवणारे असावेत. तर यामध्ये वृद्धी करा. एका-एकाच्या गोष्टी ऐका आणि त्यांना उमंग-उत्साहाचे पंख लावा, ज्यामुळे बापदादांना ‘निर्विघ्न सेंटर’चा समाचार देऊ शकाल. बाकी बापदादांनी पाहिले आहे - राजस्थान देखील पुढे जात आहे, पुढे जात राहील. बापदादा प्रत्येक मुलाला पुढे जाण्याची मुबारक देत आहेत. अच्छा.

भोपाळ झोन:- अच्छा, हा झोन देखील आपले परिवर्तन आणि सेवेच्या वृद्धीमध्ये चांगला पुढे जात आहे. बापदादांना आनंद आहे की प्रत्येक बच्चा स्वयं प्रति देखील प्लॅन बनवत आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये देखील आणत आहे. आणि बाबांची शुभ आशा आहे की सदैव पुढे जात राहतील. प्रत्येक झोनमध्ये पाहायला मिळते की आता उमंग-उत्साह आहे म्हणून सेवेमध्ये आपापल्या ठिकाणी वृद्धी करत आहेत. बापदादा पुढील काळासाठी देखील मुबारक देत आहेत, पुढे जात राहा, उडत राहा, उडवत राहा. अच्छा.

डबल विदेशी भाऊ -बहिणींसोबत:- फॉरेनच्या लोकांकडे पेपर्स तर येतात परंतु त्यांची एक विशेषता आहे की ते खऱ्या मनाने बोलून टाकतात. आत ठेवत नाहीत आणि त्याचे समाधान खऱ्या मनाने करत राहतात. याचा बापदादांना आनंद आहे की साफ मन असेल तर हजूर हजर होतो. चांगला रिझल्ट पाहून बापदादा मुबारक सुद्धा देत आहेत आणि वरदान सुद्धा देत आहेत की सदैव पुढे जात राहाल. टीचर्स देखील चांगली मेहनत करत आहेत. बापदादांना आनंद होतो की मधुबनचा फायदा सर्वात जास्त फॉरेनचे लोक घेत आहेत. तर बापदादा पाहतात की फॉरेनच्या छोट्या-छोट्या ठिकाणांवर देखील बुलंद आवाज करण्याची सेवा करण्यास सुरूवात केली आहे. तर सेवेसाठी मुबारक असो, स्व-परिवर्तनाची मुबारक असो. उडत राहा आणि उडवत राहा. अच्छा.

चोहो बाजूच्या देश-विदेशातील मुलांना बापदादा पुरुषार्थामध्ये सहज पुढे जाण्यासाठी आणि वाढविण्यासाठी विशेष मुबारक देत आहेत. आता जी वेळ येणार आहे, त्याबद्दल बापदादांनी डायरेक्शन दिले आहे की, तीव्र पुरुषार्थी बनून सेकंदामध्ये बिंदू लावण्याचा, फुलस्टॉप लावण्याचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टीला हलके घेऊ नका. अचानक काही ना काही होणारच आहे; त्यामुळे बाबांची शुभ आशा आहे की प्रत्येक बच्चा सोबत आहे, सोबत येणार, ब्रह्मा बाबांसोबत राज्य करणार, शिवबाबा साक्षी होतील. साथीदार बनणारे आहात तर बापदादांसारखे बनलेच पाहिजे. अच्छा - प्रत्येक मुलाला बापदादांकडून या वर्षाची मुबारक असो आणि पुढील वर्षाची देखील मुबारक असो की सदैव पित्या समान बनायचेच आहे. अच्छा.

वरदान:-
मनन शक्तीद्वारे शक्तिशाली बनून विघ्नांच्या फोर्सला नष्ट करणारे सर्व आकर्षणमुक्त भव

वर्तमान समय मनन शक्तीद्वारे आत्म्यामध्ये सर्व शक्ती भरण्याची आवश्यकता आहे. यासाठी अंतर्मुखी बनून प्रत्येक पॉईंटवर मनन करा तेव्हाच लोणी निघेल आणि शक्तिशाली बनाल. असे शक्तिशाली आत्मे अतींद्रिय सुखाच्या प्राप्तीचा अनुभव करतात, त्यांना अल्पकालीन कोणतीही वस्तू आपल्याकडे आकर्षित करू शकत नाही. त्यांच्या मगन अवस्थेद्वारे जी रूहानियतची शक्तिशाली स्थिती बनते त्याने विघ्नांचा फोर्स नष्ट होतो.

सुविचार:-
ब्राह्मण संसारामध्ये सर्वांचा सन्मान प्राप्त करणारेच तख्तनशीन बनतात.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

ब्रह्मा बाबा आणि शिवबाबांची विशेष पसंती आहेच मुळी पवित्रता. परंतु पवित्रतेची परिभाषा अतिशय श्रेष्ठ आणि गूढ आहे. जिथे पवित्रता असेल तिथे निश्चय, सत्यता-स्वच्छता, हे सर्व येतेच. संपूर्ण पवित्रतेचा अर्थच हा आहे - स्वप्नमात्रही अपवित्रता मन आणि बुद्धीला टच करणार नाही, यालाच म्हटले जाते - खरे वैष्णव.