23-09-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“ गोड मुलांनो - दिवस-रात्र आतल्याआत ‘बाबा-बाबा’ करत रहाल तर अपार आनंद होईल, बुद्धीमध्ये राहील बाबा आपल्याला कुबेराचा खजिना देण्यासाठी आले आहेत’’

प्रश्न:-
बाबा कोणत्या मुलांना ऑनेस्ट (इमानदार) फूल म्हणतात? त्यांची लक्षणे सांगा?

उत्तर:-
ऑनेस्ट फूल ते आहेत जे कधीही मायेच्या अधीन होत नाहीत. मायेच्या संघर्षामध्ये येत नाहीत. अशी ऑनेस्ट फूले लास्टला येऊन देखील फास्ट जाण्याचा पुरुषार्थ करतात. ते जुने असलेल्यांपेक्षा सुद्धा पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवतात. आपल्या अवगुणांना काढून टाकण्याच्या पुरुषार्थामध्ये व्यस्त राहतात. दुसऱ्यांच्या अवगुणांना पाहत नाहीत.

ओम शांती।
शिव भगवानुवाच. ते झाले रुहानी बाबा, कारण ‘शिव’ तर सुप्रीम रुह (सर्वोच्च आत्मा) आहे ना. बाबा तर रोज-रोज नवीन-नवीन गोष्टी समजावून सांगत राहतात. गीता ऐकविणारे संन्यासी इत्यादी भरपूर आहेत. परंतु ते बाबांची आठवण करू शकणार नाहीत. ‘बाबा’ शब्द त्यांच्या मुखावाटे कधीच निघू शकणार नाही. हा शब्द आहेच मुळी गृहस्थ मार्गवाल्यांसाठी. ते (संन्यासी) तर आहेत निवृत्ती मार्गवाले. ते ‘ब्रह्म’चीच आठवण करतात. मुखावाटे कधी ‘शिवबाबा’ म्हणणार नाहीत. भले तुम्ही तपासून पहा. समजा मोठ-मोठे विद्वान संन्याशी चिन्मयानंद इत्यादी गीता ऐकवतात; परंतु असे नाही की ते गीतेचा भगवान श्रीकृष्णाला समजून त्याच्याशी योग लावू शकतील. नाही. तरीही ते ‘ब्रह्म’सोबत योग लावणारे ब्रह्म ज्ञानी अथवा तत्त्व ज्ञानी आहेत. श्रीकृष्णाला कधी कोणी ‘बाबा’ म्हणेल, असे होऊ शकत नाही. तर श्रीकृष्ण गीता ऐकविणारा पिता तर झाला नाही ना. ‘शिव’नाच सर्वजण ‘बाबा' म्हणतात कारण ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. सर्व आत्मे त्यांना ‘परमपिता परमात्मा’ असे म्हणून बोलावतात. ते आहेत सुप्रीम, परम आहेत कारण परमधाममध्ये राहणारे आहेत. तुम्ही देखील सर्व परमधाममध्ये राहता परंतु त्यांना ‘परम-आत्मा’ म्हणतात. ते कधी पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. ते स्वतः म्हणतात - ‘माझा जन्म दिव्य आणि अलौकिक आहे’. असे कोणी रथामध्ये (परकाया) प्रवेश करून तुम्हाला विश्वाचा मालक बनण्याची युक्ती सांगेल असा दुसरा कोणी असू शकत नाही. म्हणूनच बाबा म्हणतात - ‘मी जो आहे, जसा आहे, मला कोणीही जाणत नाहीत. मी जेव्हा माझा परिचय देतो तेव्हाच तुम्ही मला ओळखू शकता’. ब्रह्मला अथवा तत्वाला मानणारे हे लोक श्रीकृष्णाला आपला पिता कसे मानतील? सर्व आत्मे तर मुले आहेत ना. श्रीकृष्णाला सर्वजण पिता कसे म्हणतील! असे थोडेच म्हणतील की, श्रीकृष्ण सर्वांचा पिता आहे. आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. असे देखील नाही की श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. सगळेच काही श्रीकृष्ण थोडेच होऊ शकतात. जर सर्वच श्रीकृष्ण असतील तर त्यांचा पिता देखील पाहिजे. मनुष्य सर्वकाही विसरून गेले आहेत. जाणत नाहीत तेव्हाच तर बाबा म्हणतात - ‘मला कोटींमध्ये कोणीच ओळखतात’. श्रीकृष्णाला तर कोणीही ओळखेल. सर्व परदेशी सुद्धा त्यांना जाणतात. ‘लॉर्ड कृष्णा’, म्हणतात ना. चित्र देखील आहे, खरे चित्र तर नाही आहे. भारतीयांकडून ऐकतात, यांची पूजा खूप केली जाते तर मग गीतेमध्ये असे लिहून ठेवले आहे - ‘श्रीकृष्ण भगवान’. आता भगवंताला कधी ‘लॉर्ड’ म्हटले जाते काय. ‘लॉर्ड कृष्णा’ म्हणतात ना. ‘लॉर्ड’ची उपाधी खरेतर मोठ्या व्यक्तीला दिली जाते. ते (दुनियावाले) तर सर्वांना देत राहतात, याला म्हटले जाते - ‘अन्धेर नगरी…’ कुठल्याही पतित मनुष्याला लॉर्ड म्हणतात. कुठे हे आजचे पतित मनुष्य, कुठे शिव आणि श्रीकृष्ण! बाबा म्हणतात - ‘मी जे तुम्हाला ज्ञान देतो ते मग नष्ट होते. मीच येऊन नवीन दुनियेची स्थापना करतो. ज्ञान देखील मी आताच देतो. मी जेव्हा ज्ञान देईन तेव्हाच तर मुले ऐकतील. माझ्याशिवाय कोणी ऐकवू शकणार नाही. माहितच नाही आहे’.

संन्यासी, शिवबाबांची आठवण करू शकतात का? ते म्हणू देखील शकणार नाहीत की निराकार गॉडची आठवण करा. कधी ऐकले आहे? भरपूर शिकले सवरलेले मनुष्य देखील समजत नाहीत. आता बाबा समजावून सांगतात - ‘श्रीकृष्ण काही भगवान नाही आहे’. मनुष्य तर त्यांनाच भगवान म्हणत राहतात. किती विपर्यास झाला आहे. बाबा तर मुलांना बसून शिकवतात. ते पिता, टीचर, गुरू देखील आहेत. शिवबाबा बसून सर्वांना समजावून सांगतात. समजत नसल्यामुळे त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये शिवाला दाखवतच नाहीत. ब्रह्माला दाखवतात, ज्याला ‘प्रजापिता ब्रह्मा’ म्हणतात. प्रजेला रचणारा. परंतु त्यांना भगवान म्हणणार नाही. भगवान प्रजा रचत नाही. सर्व आत्मे तर भगवंताची मुले आहेत. मग कोणाद्वारे प्रजा रचतात. तुम्हाला ॲडॉप्ट कोणी केले? ब्रह्माद्वारे बाबांनी ॲडॉप्ट केले. जेव्हा ब्राह्मण बनाल तेव्हाच तर देवता बनाल. ही गोष्ट तर तुम्ही कधी ऐकलेली नाही आहे. या प्रजापिताचा देखील जरूर पार्ट आहे. ॲक्ट पाहिजे ना. नाहीतर एवढी प्रजा येणार कुठून. कुख वंशावळी सुद्धा असू शकत नाही. ते कुख वंशावळी ब्राह्मण म्हणतील - ‘आमचे सरनेम आहे - ब्राह्मण’. नाव तर सर्वांचे वेग-वेगळे आहे. प्रजापिता ब्रह्मा तर तेव्हाच म्हणतात जेव्हा शिवबाबा यांच्यामध्ये प्रवेश करतील. या नवीन गोष्टी आहेत. बाबा स्वतः म्हणतात - ‘मला कोणीही जाणत नाही, सृष्टी चक्राला सुद्धा जाणत नाहीत’. तेव्हाच तर सर्व ऋषी-मुनी नेति-नेति (माहित नाही) म्हणतात ना. ना परमात्म्याला जाणत, आणि ना परमात्म्याच्या रचनेला जाणत. बाबा म्हणतात - ‘जेव्हा मी येऊन माझा परिचय देईन तेव्हाच माहीत होईल’. या देवतांना तिथे हे थोडेच कळते की आपण हे राज्य कसे प्राप्त केले? यांच्यामध्ये (देवतांमध्ये) तर हे ज्ञान राहतही नाही. पद प्राप्त केले की मग ज्ञानाची गरज नाही. ज्ञानाची गरज आहेच मुळी सद्गतीसाठी. यांना तर सद्गती मिळालेली आहे. या व्यवस्थित समजून घेण्यासारख्या गूढ गोष्टी आहेत. हुशार असणाराच समजेल. बाकी ज्या वृद्ध माता आहेत, त्यांना इतकी बुद्धी तर नाहीये, तो देखील ड्रामा प्लॅन अनुसार प्रत्येकाचा आपला-आपला पार्ट आहे. असे तर म्हणणार नाही - ‘हे ईश्वरा, बुद्धी दे’. सर्वांना एक सारखी बुद्धी दिली तर सगळेच नारायण बनतील. सर्व एकाच सिंहासनावर एकमेकांच्यावर बसणार का! हो, असे बनण्याचे एम ऑब्जेक्ट तर आहे. सर्व पुरुषार्थ करत आहेत नरा पासून नारायण बनण्याचा. परंतु बनतील तर पुरुषार्था नुसार ना. जर सर्वच हात उचलतील - आम्ही नारायण बनणार तर बाबांना आतून हसू येईल ना. सर्व एक सारखे कसे बनू शकतील! नंबरवार तर असतात ना. नारायण द फर्स्ट, सेकंड, थर्ड. ज्याप्रमाणे एडवर्ड द फर्स्ट सेकंड, थर्ड… असतात ना. भले एम ऑब्जेक्ट हे आहे, परंतु स्वतःला समजू शकता ना - आपले वर्तन असे आहे तर काय पद प्राप्त करणार? पुरुषार्थ तर जरूर करायचा आहे. बाबा नंबरवार फूले घेऊन येतात, नंबरवार फूले देऊ देखील शकतात परंतु असे करत नाहीत. निराश होतील. बाबा जाणतात, पाहतात कोण जास्त सेवा करत आहे, हे चांगले फूल आहे. मागे तर नंबरवारच असतात ना. खूप जुने सुद्धा बसले आहेत परंतु त्यामध्ये नवीन-नवीन खूप चांगली फूले आहेत. म्हणतील हा नंबर वन ऑनेस्ट फूल आहे, यांच्यामध्ये कोणताही कलह, ईर्ष्या इत्यादी नाहीये. बऱ्याचजणांमध्ये काही ना काही त्रुटी जरूर आहेत. संपूर्ण तर कोणाला म्हणू शकत नाही. १६ कला संपूर्ण बनण्यासाठी खूप मेहनत केली पाहिजे. आता कोणी संपूर्ण बनू शकत नाही. आता तर चांगल्या-चांगल्या मुलांमध्ये देखील खूप इर्ष्या आहे. त्रुटी तर आहेत ना. बाबा जाणतात सर्वजण कोण-कोणत्या प्रकारचा पुरुषार्थ करत आहेत. दुनियावाल्यांना काय कळणार. ते तर काहीच समजत नाहीत. फार थोड्यांना समजते. गरीब लगेच समजतात. बेहदचे बाबा आलेले आहेत शिकविण्यासाठी. त्या बाबांची आठवण केल्याने आपली पापे भस्म होतील. मी बाबांकडे आलो आहे, बाबांकडून नवीन दुनियेचा वारसा नक्की मिळणार. नंबरवार तर असतातच - १०० पासून १ नंबर पर्यंत; परंतु बाबांना जाणले, थोडेजरी ऐकले तरी स्वर्गामध्ये जरुर येतील. २१ जन्मांसाठी स्वर्गामध्ये येणे काही कमी गोष्ट आहे काय! असे काही नाही की, कोणी मेला तर म्हणतील २१ जन्मांसाठी स्वर्गामध्ये गेला. स्वर्ग आहेच कुठे. किती गैरसमज करून ठेवले आहेत. चांगले-चांगले लोक देखील म्हणतात अमका स्वर्गवासी झाला. स्वर्ग म्हणतात कशाला? काहीच अर्थ समजत नाहीत. हे केवळ तुम्हीच जाणता. आहात तुम्ही देखील मनुष्य, परंतु तुम्ही ब्राह्मण बनले आहात. स्वतःला ब्राह्मणच संबोधता. तुम्हा ब्राह्मणांचे एक बापदादा आहेत. तर संन्याशांना देखील तुम्ही विचारू शकता की, हे जे महावाक्य किंवा भगवानुवाच आहे की ‘देहा सहीत देहाचे सर्व संबंध सोडून मामेकम् आठवण करा’; काय श्रीकृष्ण असे म्हणतात - ‘मज एकाची आठवण करा?’ तुम्ही श्रीकृष्णाची आठवण करता का? ते (संन्यासी) कधीही ‘हो’ म्हणणार नाहीत. नाहीतर तिथेच उघडकीस येईल. परंतु बिचाऱ्या अबला जातात, त्यांना काय माहित. ते आपल्या फॉलोअर्सवर क्रोधीत होतात. ‘दुर्वासा’चे नाव देखील आहे ना. त्यांच्यामध्ये अहंकार खूप असतो. फॉलोअर्स आहेत पुष्कळ. भक्तीचे राज्य आहे ना. त्यांना विचारण्याची कोणामध्ये हिम्मत नसते. नाही तर त्यांना म्हणू शकता, तुम्ही तर शिवबाबांची पूजा करता. आता भगवान कोणाला म्हणावे? काय दगड-धोंड्यामध्ये भगवान आहे? नंतर पुढे या सर्व गोष्टी समजतील. आता किती वृथा अभिमान आहे. आहेत सर्व पुजारी. पूज्य म्हणणार नाही.

बाबा म्हणतात - ‘मला कोणी विरळेच जाणतात. मी जो आहे, जसा आहे - तुम्हा मुलांमध्ये देखील विरळे कोणी ॲक्युरेट जाणतात. त्यांना आतून खूप आनंद वाटत असतो. हे तर समजता ना - बाबाच आम्हाला स्वर्गाची बादशाही देतात. कुबेराचा खजिना मिळतो. अल्लाह अवलदीनचा खेळ सुद्धा दाखवतात ना. दिवा घासला आणि खजिना निघाला. बरेच खेळ दाखवतात - खुदा दोस्त बादशहा काय करत होते, त्याच्यावर देखील कथा आहे. पुलावर जो येत असे त्याला एका दिवसाचे राज्य देऊन पाठवून देत होता. या सर्व आहेत कथा. आता बाबा समजावून सांगत आहेत - खुदा (ईश्वर) तुम्हा मुलांचा दोस्त आहे, यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून तुमच्या सोबत खातात-पितात, खेळतात देखील. शिवबाबांचा आणि ब्रह्मा बाबांचा रथ एकच आहे, तर जरूर शिवबाबा सुद्धा खेळत असतील ना. बाबांची आठवण करत खेळतात तर दोघेही यांच्यामध्ये आहेत. आहेत तर दोघे ना - बाबा आणि दादा. परंतु कोणालाच कळत नाही, म्हणतात रथावर आले, तर त्यांनी मग घोडा-गाडीचा रथ बनवला आहे. असे देखील म्हणणार नाही की, श्रीकृष्णामध्ये शिवबाबा बसून ज्ञान देतात. ते (दुनियावाले) मग म्हणतात - ‘श्रीकृष्ण भगवानुवाच’. असे तर म्हणत नाहीत ‘ब्रह्मा भगवानुवाच’. नाही. हा आहे रथ. शिव भगवानुवाच. बाबा बसून तुम्हा मुलांना आपला आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचा परिचय आणि त्याचा कालावधी सांगतात. ज्या गोष्टी कोणीही जाणत नाहीत. जे हुशार असतील ते बुद्धीचा वापर करतील. संन्याशांना तर संन्यास करायचा आहे. तुम्ही देखील शरीरासहित सर्वांचा संन्यास करता, जाणता हे जुने शरीर आहे, आपल्याला तर आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. आपण आत्मे इथले रहिवासी नाही आहोत. इथे पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत. आपण परमधामाचे रहिवासी आहोत. हे देखील तुम्ही मुले जाणता तिथे कसे निराकारी झाड आहे. सर्व आत्मे तिथे राहतात, हा अनादि ड्रामा बनलेला आहे. किती करोडो जीवात्मे आहेत. इतके सर्व कुठे राहतात? निराकारी दुनियेमध्ये. बाकी हे तारे (आकाशातील तारे) काही आत्मे नाहीत. मानवाने तर या ताऱ्यांना देखील देवता म्हटले आहे. परंतु ते तारे काही देवता नाहीत. ज्ञान सूर्य तर आपण शिवबाबांना म्हणणार. तर मग त्यांना (आकाशातील ताऱ्यांना) देवता थोडेच म्हणणार. शास्त्रांमध्ये तर काय-काय गोष्टी लिहिल्या आहेत. ही सर्व आहे भक्तिमार्गाची सामग्री. ज्यामुळे तुमची अधोगतीच होत आली आहे. ८४ जन्म घ्याल तर नक्कीच खाली उतराल ना. आता ही आहे आइरन एजड (कलियुगी) दुनिया. सतयुगाला म्हटले जाते गोल्डन एजड दुनिया. तिथे कोण राहत होते? देवता. ते कुठे गेले - हे कोणालाच माहित नाही. समजतात देखील की पुनर्जन्म घेतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - आम्ही पुनर्जन्म घेत-घेत देवतांपासून हिंदू बनलो आहोत. पतित बनला आहात ना. दुसऱ्या कोणाचाही धर्म बदलत नाही. यांचाच धर्म का बदलतो - हे कोणालाच माहित नाही. बाबा म्हणतात - ‘धर्म भ्रष्ट, कर्म भ्रष्ट झाले आहात. जेव्हा तुम्ही देवी-देवता होता तेव्हा पवित्र जोडपे होता. नंतर रावण राज्यामध्ये तुम्ही अपवित्र बनले आहात. तर तुम्हाला देवी-देवता म्हणू शकत नाही त्यामुळे हिंदू नाव पडले आहे’. देवी-देवता धर्म काही श्रीकृष्ण भगवानाने स्थापन केलेला नाही. जरूर शिवबाबांनीच येऊन केला असेल. शिवजयंती शिवरात्री देखील साजरी केली जाते परंतु त्यांनी येऊन काय केले हे कोणालाच माहीत नाही. एक शिव पुराण देखील आहे. खरेतर शिवाची एक गीताच आहे, जी शिवबाबांनी ऐकवली आहे, दुसरे कोणतेही शास्त्र नाही. तुम्ही कोणतीही हिंसा करत नाही. तुमचे असे कोणते शास्त्र तर बनत नाही. तुम्ही नवीन दुनियेमध्ये निघून जाता. सतयुगामध्ये कोणतेही शास्त्र गीता इत्यादी असत नाही. तिथे कोण वाचणार. ते तर म्हणतात ही वेद-शास्त्रे इत्यादी परंपरेने चालत आली आहेत. त्यांना काहीच माहित नाही आहे. स्वर्गामध्ये कोणतेही शास्त्र इत्यादी नसते. बाबांनी तर देवता बनवले, सर्वांची सद्गती झाली मग पुन्हा शास्त्र वाचण्याची काय गरज आहे. तिथे शास्त्र असत नाहीत. आता बाबांनी तुम्हाला ज्ञानाची चावी दिली आहे, ज्याद्वारे बुद्धीचे कुलूप उघडले आहे. आधी कुलूप एकदम बंद होते, तुम्हाला काहीच समजत नव्हते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणाशीही ईर्ष्या इत्यादी करायची नाही. आपल्यातील त्रुटींना काढून टाकून संपूर्ण बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. शिक्षणा द्वारे उच्च पद प्राप्त करायचे आहे.

२) शरीरा सहित सर्व गोष्टींचा संन्यास करायचा आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही. अहंकार राहता कामा नये.

वरदान:-
अविनाशी आणि बेहदच्या अधिकाराची खुशी अथवा नशेद्वारे सदैव निश्चिंत भव

दुनियेमध्ये भरपूर मेहनत करून अधिकार मिळवतात, तुम्हाला मेहनत न करताच अधिकार मिळाला. संतान बनणे अर्थात अधिकार घेणे. “वाह मी श्रेष्ठ अधिकारी आत्मा’’, या बेहदच्या अधिकाराच्या नशेमध्ये आणि खुशीमध्ये रहा तर सदैव निश्चिंत रहाल. हा अविनाशी अधिकार निश्चित आहे. जिथे निश्चित असते तिथे निश्चिंत असतात. आपल्या सर्व जबाबदाऱ्या बाबांच्या हवाली करा तेव्हा सर्व चिंतांपासून मुक्त व्हाल.

बोधवाक्य:-
जे उदारचित्त, विशाल हृदयाचे (मोठ्या मनाचे) आहेत तेच एकतेचा पाया आहेत.