23-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - देही-अभिमानी होऊन सेवा करा तर पावलोपावली सफलता मिळत राहील”

प्रश्न:-
कोणत्या आठवणीमध्ये राहिलात तर देह-अभिमान येणार नाही?

उत्तर:-
सदैव आठवण पाहिजे की आम्ही गॉडली सर्व्हंट (ईश्वरीय सेवाधारी) आहोत. सेवाधारीला कधीही देह-अभिमान येऊ शकत नाही. जितके-जितके योगामध्ये रहाल तितका देह-अभिमान नष्ट होत जाईल.

प्रश्न:-
देह-अभिमानी असणाऱ्यांना ड्रामा अनुसार कोणती सजा मिळते?

उत्तर:-
त्यांच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान रहातच नाही. श्रीमंत लोकांना पैशामुळे देह-अभिमान असतो त्यामुळे हे ज्ञान ते समजू शकत नाहीत, ही देखील सजा मिळते. गरीब सहज समजून घेतात.

ओम शांती।
रूहानी बाबा ब्रह्माद्वारे सल्ला देत आहेत. आठवण करा तर हे (लक्ष्मी-नारायण) बनाल. सतोप्रधान बनून आपल्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश कराल. हे फक्त तुम्हाला सांगत नाहीत, परंतु हा आवाज तर सर्व भारतातच काय पण परदेशातसुद्धा सर्वांपर्यंत जाईल. खूप जणांना साक्षात्कार सुद्धा होईल. कोणाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे? हे देखील बुद्धीने समजून घेतले पाहिजे. बाबा ब्रह्माद्वारेच साक्षात्कार करवून म्हणतात - ‘राजकुमार बनायचे असेल तर ब्रह्मा किंवा ब्राह्मणांकडे जा’. युरोपवासी देखील हे समजून घेऊ इच्छितात. भारत स्वर्ग होता तेव्हा कोणाचे राज्य होते? हे पूर्णपणे कोणीही जाणत नाहीत. भारतच हेवन स्वर्ग होता. आता तुम्ही सर्वांना समजावून सांगत आहात. हा सहज-राजयोग आहे, ज्यामुळे भारत स्वर्ग अथवा हेवन बनतो. परदेशी लोकांची बुद्धी तरीही थोडी चांगली आहे. ते पटकन समजतील. तर सेवायोग्य मुलांनी आता काय केले पाहिजे? त्यांनाच डायरेक्शन द्यावे लागते. मुलांनी प्राचीन राजयोग शिकवायचा आहे. तुमच्याकडे म्युझियम, प्रदर्शनी इत्यादी ठिकाणी भरपूर येतात. ओपिनियन लिहितात की, ‘हे खूप चांगले कार्य करत आहेत’. परंतु स्वतः समजत नाहीत. थोडी काहीतरी जाणीव होते तर येतात; तरी देखील गरीबच आपले चांगले भाग्य बनवतील आणि समजून घेण्याचा पुरुषार्थ करतील. श्रीमंतांना तर पुरुषार्थ करायचा नाहीये. देह-अभिमान खूप आहे ना. तर ड्रामा अनुसार जणू बाबांनी सजा दिलेली आहे. तरीही त्यांच्या माध्यमातून आवाज करावा लागतो. परदेशी लोकांना तर हे नॉलेज हवे आहे. ऐकून खूप खूष होतील. सरकारी आॉफिसर्सच्या मागे तुम्ही किती मेहनत घेता, परंतु त्यांना तर सवडच नाही आहे. त्यांना भले घरबसल्या साक्षात्कार जरी झाला तरीही बुद्धीमध्ये येणार नाही. तर बाबा मुलांना सल्ला देतात, चांगले-चांगले ओपिनियन एकत्र करून त्याचे एक चांगले पुस्तक बनवा. लोकांना मत सांगू शकता - बघा, हे सर्वांना किती चांगले वाटते. परदेशी किंवा भारतवासी देखील सहजयोग जाणून घेऊ इच्छितात. स्वर्गातील देवी-देवतांचे राज्य तर सहजयोगाने भारताला प्राप्त होते तर मग का नाही हे म्युझियम सरकारी बंगल्यामध्ये लावू नये, जिथे कॉन्फरन्स इत्यादी होत असतात. मुलांचे असे विचार चालले पाहिजेत. आता अजून वेळ लागेल. इतक्या लवकर बुद्धी कोमल होणार नाही. बुद्धीला गोदरेजचे कुलूप लागलेले आहे. आत्ता आवाज निघाला तर क्रांती होईल. हो, होणार तर नक्कीच आहे. सांगा, सरकारी बंगल्यातसुद्धा म्युझियम झाले तर पुष्कळ फॉरेनर्स देखील येऊन बघतील. मुलांचा विजय तर नक्की होणार आहे. तर विचार चालले पाहिजेत. देही-अभिमानी असणाऱ्यालाच अशा प्रकारचे विचार येतील की काय करायला पाहिजे. ज्यामुळे बिचाऱ्यांना माहिती होईल आणि बाबांकडून वारसा घेतील. आपण लिहितो देखील - ‘बिगर कवडी खर्च…’ तर जी चांगली-चांगली मुले येतात ती सल्ला देतात. उद्घाटन करण्याकरिता उपपंतप्रधान येतात; मग पंतप्रधान, राष्ट्रपतीसुद्धा येतील कारण त्यांना देखील जाऊन सांगायचे की, ‘हे तर अद्भुत नॉलेज आहे. खरी शांती तर अशी स्थापन होणार आहे’. म्हणतील - अगदी बरोबर वाटते. स्पष्टीकरण देखील असे आहे जे योग्य वाटते. आज पटले नाही तर उद्या बरोबर वाटेल. बाबा सांगत राहतात मोठ-मोठ्या व्यक्तींकडे जा. पुढे चालून त्यांना देखील समजेल. मनुष्यांची बुद्धी तमोप्रधान आहे त्यामुळे उलटीच कामे करत राहतात. दिवसेंदिवस अजूनच तमोप्रधान बनत जातात.

तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करता की हा विकारी धंदा बंद करा, स्वतःची उन्नती करा. बाबा आले आहेत पवित्र देवता बनविण्यासाठी. शेवटी तो दिवससुद्धा येईल जेव्हा सरकारी बंगल्यामध्ये आपली प्रदर्शनी असेल. सांगा, खर्च तर आम्ही आमचा करतो. सरकार तर कधी पैसा देणार नाही. तुम्ही मुले म्हणाल आम्ही आमच्या खर्चाने प्रत्येक सरकारी बंगल्यात हे म्युझियम लावू शकतो. एका मोठ्या सरकारी बंगल्यात झाले तर सर्व ठिकाणी होतील. चांगला समजावून सांगणारा सुद्धा जरूर पाहिजे. त्यांना सांगा - ‘तुमचा वेळ ठरवा, जेणेकरून त्या वेळी कोणीतरी येऊन तुम्हाला रस्ता सांगतील. बिना कवडी खर्चाचे जीवन बनवण्याचा मार्ग दाखवू’. हे नंतर होणारच आहे. परंतु बाबा मुलांद्वारेच सांगतात. चांगली-चांगली मुले जी स्वतःला महावीर समजतात त्यांनाच माया पकडते. खूप मोठे ध्येय आहे. खूप काळजी घ्यायची आहे. बॉक्सिंग काही कमी नाही. हे सर्वात शक्तिशाली बॉक्सिंग आहे. रावणाला जिंकण्याचे युद्धाचे मैदान आहे. जराही देहाचा अभिमान येऊ नये की, ‘मी अशी सेवा करतो, हे करतो…’ आपण तर ईश्वरीय सेवक आहोत. आपल्याला संदेश तर द्यायचाच आहे, यामध्ये गुप्त मेहनत भरपूर आहे. तुम्ही ज्ञान आणि योगबलाने स्वतःला तयार करता. यामध्ये गुप्त राहून विचार सागर मंथन कराल तर नशा चढेल. इतक्या प्रेमाने समजावून सांगाल, बेहदच्या बाबांचा वारसा प्रत्येक कल्पात भारतवासीयांना मिळतो. ५ हजार वर्षांपूर्वी या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. आता तर वेश्यालय म्हटले जाते. सतयुग आहे शिवालय. ती आहे बाबांनी केलेली स्थापना, ही आहे रावणाची स्थापना. दिवस-रात्री इतका फरक आहे. मुलांना जाणीव होते आपण काय बनलो होतो. बाबा आप समान बनवतात. मुख्य गोष्ट आहे - देही-अभिमानी बनायचे आहे. देही-अभिमानी बनून विचार करायचा असतो की, आज आम्हाला अमूक पंतप्रधानाला जाऊन समजवायचे आहे. त्यांना दृष्टी दिली तर साक्षात्कार होऊ शकतो. तुम्ही दृष्टी देऊ शकता. जर देही-अभिमानी बनून राहिलात तर तुमची बॅटरी भरत जाईल. देही-अभिमानी बनून बसा, स्वतःला आत्मा समजून बाबांसोबत योग लावा तेव्हा बॅटरी भरू शकेल. गरीब पटकन आपली बॅटरी भरू शकतात कारण बाबांची खूप आठवण करतात. ज्ञान भले चांगले आहे परंतु योग कमी आहे तर बॅटरी भरू शकणार नाही कारण देहाचा अहंकार खूप असतो. योग काहीच नाही, त्यामुळे ज्ञान-बाणामध्ये शक्ती भरत नाही. तलवारीला सुद्धा धार असते. तीच तलवार १० रूपयांना, तीच तलवार ५० रूपयांना. गुरू गोविंदसिंग यांच्या तलवारीचे गायन आहे, यामध्ये हिंसेचा काही प्रश्नच नाही. देवता आहेत डबल अहिंसक. आज भारत असा आहे, उद्या भारत असा बनेल. तर मुलांना किती आनंद व्हायला पाहिजे! काल आम्ही रावणराज्यात होतो तर भयंकर त्रास होता. आज आम्ही परमपिता परमात्म्यासोबत राहत आहोत.

आता तुम्ही ईश्वरीय परिवारातील आहात. सतयुगामध्ये तुम्ही दैवी परिवारातील असाल. आता स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहेत, भगवंताचे आम्हाला किती प्रेम मिळते. अर्धा कल्प रावणाचे प्रेम मिळाल्यामुळे माकड बनले आहेत. आता बेहदच्या बाबांचे प्रेम मिळाल्यामुळे तुम्ही देवता बनता. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. त्यांनी लाखो वर्षे म्हटली आहेत. हे (ब्रह्मा बाबा) देखील तुमच्यासारखे पुजारी होते. झाडामध्ये सर्वात शेवटच्या नंबरवर उभे आहेत. सतयुगामध्ये तुमच्याकडे किती अथाह धन होते. आणि मग जी मंदिरे बनवली त्यामध्ये देखील इतके अथाह धन होते, जे येऊन लुटून नेले. मंदिरे तर अजूनही असतील. प्रजेची देखील मंदिरे असतील. प्रजा तर अजूनच श्रीमंत असते. राजे लोक प्रजेकडून कर्ज घेतात. ही खूप घाणेरडी दुनिया आहे. सर्वात घाणेरडा प्रांत आहे कलकत्ता. याला बदलण्यासाठी तुम्हा मुलांना मेहनत करायची आहे. ‘जो करेगा सो पायेगा’. देह-अभिमान आला तर कोसळला (पतन झाले). मनमनाभवचा अर्थ समजत नाहीत. फक्त श्लोक पाठ करतात. ज्ञान तर तुम्हा ब्राह्मणां व्यतिरिक्त त्यांना (साधू-संतांना) असू शकत नाही. कोणी मठ-पंथवाला देवता बनू शकत नाही. प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी ब्राह्मण बनल्याशिवाय देवता कसे बनू शकतील? जे कल्पापूर्वी बनले आहेत तेच बनतील. वेळ लागतो. झाड मोठे झाले कि मग त्याची वृद्धी होत राहील. मुंगीच्या मार्गाचा विहंग मार्ग होईल. बाबा समजावून सांगतात - ‘गोड मुलांनो, बाबांची आठवण करा, स्वदर्शनचक्र फिरवा’. तुमच्या बुद्धीमध्ये पूर्ण ८४ चे चक्र आहे. तुम्ही ब्राह्मणच मग देवता आणि क्षत्रिय घराण्याचे बनता. सूर्यवंशी-चंद्रवंशीचा देखील अर्थ कोणालाही समजत नाही. फार मेहनतीने समजावून सांगितले जाते तरी देखील समजत नाहीत तर वाटते अजून ती वेळ आलेली नाही. तरी देखील येतात. समजतात ब्रह्माकुमारींचे बाहेर इतके नाव आहे. आत येऊन बघितल्यावर म्हणतात - हे खूप चांगले काम करत आहेत. हे तर मनुष्यमात्राचे चारित्र्य सुधारतात. देवतांचे चारित्र्य बघा कसे आहे. संपूर्ण निर्विकारी… बाबा म्हणतात - ‘काम महाशत्रू आहे. या ५ भुतांमुळेच तुमचे चारित्र्य बिघडले गेले आहे. जेव्हा समजावून सांगतात तेव्हा चांगले बनतात. बाहेर गेल्यावर सर्व काही विसरून जातात. तेव्हा म्हणतात - ‘शंभर-शंभर करतात शृंगार…’ (शंभरवेळा शृंगार केला तरीही गाढव तो गाढवच राहिला) हे बाबा शिव्या देत नाहीत, समजावून सांगत आहेत. दैवी आचरण ठेवा, क्रोधीत होऊन भुंकता का बरे! स्वर्गामध्ये क्रोध असत नाही. बाबा जेव्हा समोरून काही समजावून सांगायचे तर त्याचा कधीही राग येत नसे. बाबा सर्व काही रिफाइन करून (सुधारून) समजावून सांगतात. नियमानुसार ड्रामा चालत राहतो. ड्रामामध्ये काहीही चुकीचे नाही. अनादि अविनाशी बनलेला आहे. जी कृती चांगली होते ती ५ हजार वर्षांनंतर पुन्हा होईल. बरेचजण म्हणतात ही टेकडी तुटली मग पुन्हा कशी बनणार. नाटक बघा, महाल कोसळतील आणि मग नाटकाची पुनरावृत्ती झाल्यावर पुन्हा तसेच बनवलेले महाल दिसतील. हे नाटक जसेच्या तसे रिपीट होत राहते. समजण्यासाठी देखील डोके पाहिजे. काहींच्या बुद्धीमध्ये शिरणेच फार अवघड असते. जगाचा इतिहास-भूगोल आहे ना. राम राज्यामध्ये या देवी-देवतांचे राज्य होते, त्यांची पूजा होत होती. बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्हीच पूज्य आणि तुम्हीच पुजारी बनता. ‘हम सो’ चा अर्थ देखील मुलांना समजावून सांगितला आहे. हम सो देवता, हम सो क्षत्रिय… बाजोली (कोलांट्या उड्यांचा खेळ) आहे ना. हे व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाबा असे म्हणत नाहीत की उद्योगधंदा सोडून द्या. नाही. फक्त सतोप्रधान बनायचे आहे. इतिहास-भूगोलाचे रहस्य समजून घेऊन मग समजावून सांगा. मुख्य गोष्ट आहे - मनमनाभव. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर सतोप्रधान बनाल. आठवणीची यात्रा आहे नंबर वन. बाबा म्हणतात - ‘मी सर्व मुलांना सोबत घेऊन जाणार’. सतयुगामध्ये किती थोडे मनुष्य आहेत. कलियुगामध्ये पुष्कळ मनुष्य आहेत. सर्वांना कोण परत घेऊन जाईल? इतक्या मोठ्या जंगलाची सफाई कोणी केली? बागवान, खिवैया (माळी, नावाडी) बाबांनाच म्हणतात. तेच दुःखातून सोडवून पैलतिरी घेऊन जातात. अभ्यास किती गोड वाटतो कारण नॉलेज उत्पन्नाचे साधन आहे. तुम्हाला कारूनचा खजिना (अतुलनीय असा खजिना) मिळतो. भक्तीमध्ये काहीच मिळत नाही. इथे पाया पडण्याचा प्रश्नच नाही. ते तर गुरूंच्या समोर लोटांगण घालतात, या पासून बाबा तुम्हाला मुक्त करतात. अशा बाबांची आठवण केली पाहिजे. ते आपले बाबा आहेत, हे समजले आहे ना. बाबांकडून वारसा जरूर मिळतो. त्याचा आनंद असतो. लिहितात - ‘आम्ही श्रीमंतांकडे गेल्यावर लाज वाटत असे की, आम्ही गरीब आहोत’. बाबा म्हणतात - गरीब आहात हे तर अजूनच चांगले आहे. श्रीमंत असता तर इथे आलाच नसता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव या आनंदामध्ये व नशेमध्ये रहायचे आहे की आता आपण ईश्वरीय परिवारातील आहोत, स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहेत, त्यांचे प्रेम आम्हाला मिळत आहे, ज्या प्रेमामुळे आम्ही देवता बनतो.

२) या पूर्व नियोजित ड्रामाला अचूकपणे समजून घ्यायचे आहे, यामध्ये कोणतीही चूक होऊ शकत नाही. जी कृती झाली ती पुन्हा रिपीट होणार. या गोष्टीला चांगल्या मनाने समजून घेऊन चाला तर कधीही राग येणार नाही.

वरदान:-
तुफानाला तोहफा समजून सहजपणे पार करणारे संपूर्ण आणि संपन्न भव

जेव्हा सर्वांचे लक्ष्य संपूर्ण आणि संपन्न बनण्याचे आहे तर छोट्या-छोट्या गोष्टींना घाबरू नका. मूर्ती बनत आहात तर थोडे ठोके तर बसणारच. जो जितका पुढे असतो त्याला वादळे देखील सर्वात जास्त पार करावी लागतात; परंतु ती वादळे त्यांना तुफान वाटत नाहीत तर तोहफा (भेटवस्तू) वाटतात. ही वादळे देखील अनुभवी बनविणारा एक नजराणा बनतात त्यामुळे विघ्नांचे स्वागत करा आणि अनुभवी बनून पुढे जात रहा.

बोधवाक्य:-
निष्काळजीपणा नाहीसा करायचा असेल तर स्वचिंतनामध्ये राहून स्वतःची तपासणी करा.