23-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही बाबांकडे येता रिफ्रेश होण्यासाठी, बाबांना भेटल्यावर भक्तिमार्गाची सर्व थकावट दूर होते”

प्रश्न:-
तुम्हा मुलांना बाबा कोणत्या विधीने रिफ्रेश करतात?

उत्तर:-
१. बाबा ज्ञान ऐकवून-ऐकवून तुम्हाला रिफ्रेश करतात. २. आठवणीने देखील तुम्ही मुले रिफ्रेश होता. वास्तविक सतयुग आहे खरी विश्राम पुरी. तिथे कोणतीही वस्तू अप्राप्त नाही, जिला प्राप्त करण्यासाठी परिश्रम करावे लागतील. ३. शिवबाबांच्या कुशीत येताच तुम्हा मुलांना विश्रांती मिळते. सर्व थकवा निघून जातो.

ओम शांती।
बाबा बसून समजावून सांगतात, सोबतच हे दादा (ब्रह्मा बाबा) देखील समजतात कारण बाबा या दादांद्वारे बसून समजावून सांगतात. जसे तुम्ही समजता, तसे हे दादा देखील समजतात. दादाला (ब्रह्माला) भगवान म्हटले जात नाही, हे आहे भगवानुवाच. बाबा काय समजावून सांगतात? देही-अभिमानी भव कारण स्वतःला आत्मा समजल्याशिवाय परमपिता परमात्म्याची आठवण करू शकणार नाही. यावेळी तर सर्व आत्मे पतित आहेत. पतित असणाऱ्यालाच मनुष्य म्हटले जाते, पावन असणाऱ्याला देवता म्हटले जाते. या समजून घेण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी अतिशय सोप्या गोष्टी आहेत. मनुष्यच बोलावतात - ‘हे पतितांना पावन बनविणारे या’. देवी-देवता असे कधीही म्हणणार नाहीत. पतित-पावन बाबा पतितांच्या बोलावण्यावरूनच येतात. आत्म्यांना पावन बनवून मग नवीन पावन दुनिया देखील स्थापन करतात. आत्माच बाबांना बोलावते. शरीर तर काही हाक मारणार नाही. पारलौकिक पिता जे सदा पावन आहेत, त्यांचीच सर्वजण आठवण करतात. ही आहे जुनी दुनिया. बाबा नवीन पावन दुनिया बनवतात. बरेचजण तर असेही आहेत जे म्हणतात - आम्हाला तर इथेच अपार सुख आहे, पुष्कळ धन-दौलत आहे. ते समजतात आपल्यासाठी तर हाच स्वर्ग आहे. ते तुमच्या गोष्टी कसे मान्य करतील? कलियुगी दुनियेला स्वर्ग समजणे - हा देखील मूर्खपणा आहे. किती जडजडीभूत (कष्टदायी) अवस्था झाली आहे. तरीही मनुष्य म्हणतात, आम्ही तर स्वर्गामध्ये बसलो आहोत. मुले समजावून सांगत नसतील तर बाबा म्हणतीलच ना - तू काय पत्थर-बुद्धी आहेस काय? इतरांना समजावून सांगू शकत नाहीस? जेव्हा स्वतः पारस-बुद्धी बनाल तेव्हाच तर दुसऱ्यांना सुद्धा बनवाल. पुरुषार्थ चांगला केला पाहिजे, यामध्ये लाज वाटण्याचा प्रश्नच नाही. परंतु मनुष्यांच्या बुद्धीमध्ये अर्ध्या कल्पाची जी उलटी मते भरलेली आहेत ती इतक्या लवकर कोणी विसरत नाहीत. जोपर्यंत बाबांना यथार्थ रीतीने ओळखत नाहीत तोपर्यंत ती ताकद येऊ शकत नाही. बाबा म्हणतात - या वेद-शास्त्र इत्यादींनी मनुष्य काही सुधारत नाहीत. दिवसेंदिवस अजूनच बिघडत आले आहेत. सतोप्रधानापासून तमोप्रधानच बनले आहेत. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे की, आम्हीच सतोप्रधान देवी-देवता होतो, कसे खाली घसरलो आहोत (पतन झाले आहे). हे जरा सुद्धा कोणाला माहित नाही आहे आणि मग ८४ जन्मांच्या ऐवजी ८४ लाख जन्म म्हटले आहे तर मग माहित तरी कसे होईल. बाबांशिवाय ज्ञानाचा प्रकाश देणारा कोणीच नाहीये. सर्वजण एकामागोमाग एक दारोदार भटकत राहतात. खाली उतरत-उतरत धारातीर्थी पडले आहेत, सर्व ताकद संपलेली आहे. बुद्धीमध्ये देखील ताकद राहिलेली नाही जे बाबांना यथार्थ जाणू शकतील. बाबाच येऊन सर्वांच्या बुद्धीचे कुलूप उघडतात; तर मग किती रिफ्रेश होतात. बाबांकडे मुले रिफ्रेश होण्यासाठी येतात. घरामध्ये विश्रांती मिळते ना. बाबांच्या भेटण्याने भक्तीमार्गातील सर्व थकवा दूर होतो. सतयुगाला देखील ‘विश्रामपुरी’ म्हटले जाते. तिथे तुम्हाला किती विश्रांती मिळते. कोणती अप्राप्त वस्तू नाही ज्याच्यासाठी परिश्रम करावे लागतील. इथे बाबा देखील रिफ्रेश करतात तर दादा देखील करतात. शिवबाबांच्या गोदीमध्ये आल्यावर किती विश्रांती मिळते. विश्रांती अर्थात शांतता. मनुष्य देखील थकतात तेव्हा मग विश्रांती घेतात. कोणी कुठे, कोणी कुठे विश्रांतीसाठी जातात ना. परंतु त्या विश्रांतीमध्ये रिफ्रेशमेंट नसते. इथे तर बाबा तुम्हाला किती ज्ञान ऐकवून रिफ्रेश करतात. बाबांच्या आठवणीनेच किती रिफ्रेश होतात आणि तमोप्रधानापासून सतोप्रधान देखील बनत जाता. सतोप्रधान बनण्यासाठी इथे बाबांकडे येता. बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, बाबांची आठवण करा’. बाबांनी समजावून सांगितले आहे की, साऱ्या सृष्टीचे चक्र कसे फिरते, सर्व आत्म्यांना विश्रांती कशी आणि कुठे मिळते. तुम्हा मुलांचे कर्तव्य आहे - सर्वांना बाबांचा संदेश देणे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर या वारशाचे तुम्ही मालक बनाल’. बाबा या संगमयुगावर नवीन स्वर्गाची दुनिया रचतात. जिथे तुम्ही जाऊन मालक बनता. मग द्वापरमध्ये माया रावणाद्वारे तुम्हाला श्राप मिळतो त्यामुळे मग पवित्रता, सुख, शांती, धन इत्यादी सर्व काही नष्ट होते. कसे हळूहळू संपते ते देखील बाबांनी समजावून सांगितले आहे. दुःख धाममध्ये काही थोडीच विश्रांती असते. सुख धाममध्ये विश्रांतीच विश्रांती आहे. मनुष्यांना भक्ती किती थकवते. जन्म-जन्मांतर भक्ती करून किती थकून जातात. कसे एकदम गरीब बनले आहात, हे सारे रहस्य बाबा बसून समजावून सांगतात. नवे-नवे येतात तर त्यांना किती समजावून सांगावे लागते. प्रत्येक गोष्टीवर मनुष्य किती विचार करतात. समजतात कुठे जादू होऊ नये. अरे, तुम्हीच म्हणता भगवान जादूगार आहेत. तर बाबा म्हणतात - ‘होय, खरोखर मी जादूगार आहे. परंतु ती जादू नाही, ज्याने मनुष्य मेंढी-बकरी बनेल. हे बुद्धीने समजले जाते, हे तर जसे काही मेंढी आहेत. गायन देखील आहे - ‘सुरमण्डल के साज़ से…’ यावेळी तर जसे सारे मनुष्य शेळ्या-मेंढ्या आहेत. या साऱ्या गोष्टी इथल्याच आहेत. या वेळचेच गायन आहे. कल्पाच्या अंताला देखील मनुष्य समजू शकत नाहीत. चंडिकेचा किती मोठा मेळावा भरतो. ती कोण होती? म्हणतात ती एक देवी होती. असे नाव तर तिथे कोणते असतच नाही. सतयुगामध्ये किती चांगली सुंदर नावे असतात. सतयुगी संप्रदायाला श्रेष्ठाचारी म्हटले जाते. कलियुगी संप्रदायाला तर किती वाईट नावे देतात. आत्ताच्या मनुष्यांना श्रेष्ठ म्हणणार नाही. देवतांना श्रेष्ठ म्हटले जाते. गायन देखील आहे - ‘मनुष्य से देवता किये, करत न लागी वार’ . मनुष्यापासून देवता, देवता पासून मनुष्य कसे बनतात, हे रहस्य बाबांनी तुम्हाला समजावून सांगितले आहे. त्यांना डीटी वर्ल्ड (देवताई दुनिया), यांना ह्यूमन वर्ल्ड (मानवी दुनिया) म्हटले जाते. दिवसाला प्रकाश, रात्रीला अंधार म्हटले जाते. ज्ञान आहे - प्रकाश, भक्ती आहे - अंध:कार. ‘अज्ञान निद्रा’ म्हटले जाते ना. तुम्ही देखील समजता की, पूर्वी आम्ही काहीही जाणत नव्हतो तर नेती-नेती म्हणत होतो अर्थात आम्ही जाणत नाही. आता तुम्ही समजता - आम्ही सुद्धा तर आधी नास्तिक होतो. बेहदच्या बाबांनाच जाणत नव्हतो. ते आहेत खरे अविनाशी बाबा. त्यांना सर्व आत्म्यांचे पिता म्हटले जाते. तुम्ही मुले जाणता - आता आम्ही त्या बेहदच्या बाबांचे बनलो आहोत. बाबा मुलांना गुप्त ज्ञान देतात. हे ज्ञान मनुष्यांकडे कुठे मिळू शकणार नाही. आत्मा देखील गुप्त आहे, गुप्त ज्ञान आत्मा धारण करते. आत्माच मुखाद्वारे ज्ञान ऐकवते. आत्माच गुप्त पित्याची गुप्त आठवण करते.

बाबा म्हणतात - ‘मुलांनो, देह-अभिमानी बनू नका’. देह-अभिमानाने आत्म्याची ताकद नष्ट होते. आत्म-अभिमानी बनल्याने आत्म्यामध्ये ताकद जमा होते. बाबा म्हणतात - ड्रामाच्या रहस्याला चांगल्या रीतीने समजून घेऊन त्याप्रमाणे चालायचे आहे. या अविनाशी ड्रामाच्या रहस्याला जे चांगल्या रीतीने जाणतात, ते कायम हर्षित राहतात. यावेळी मनुष्य वर (ग्रहांवर) जाण्यासाठी किती प्रयत्न करतात, समजतात वरती दुनिया आहे. शास्त्रांमधून ऐकले आहे वरती दुनिया आहे तर तिथे जाऊन पहावे. तिथे दुनिया स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. दुनिया तर खूप वसवली आहे ना. भारतामध्ये फक्त एकच आदि सनातन देवी-देवता धर्म होता इतर कोणताही खंड इत्यादी नव्हता. नंतर मग वसाहत किती मोठया प्रमाणात वाढली आहे. तुम्ही विचार करा भारतामध्ये किती छोट्याशा भूखंडावर देवता होते. यमुनेच्या काठावरच परिस्थान होते, जिथे हे लक्ष्मी-नारायण राज्य करत होते. किती सुंदर शोभिवंत, सतोप्रधान दुनिया होती. नॅच्युरल ब्युटी होती. सर्व चमत्कार आत्म्यामध्येच असतो. मुलांना दाखवले होते श्रीकृष्णाचा जन्म कसा होतो. संपूर्ण खोली प्रकाशाने जशी उजळून निघते. तर बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत - आता तुम्ही परिस्थानमध्ये जाण्याकरिता पुरुषार्थ करत आहात. बाकी असे नाही - तलावामध्ये डुबकी मारल्याने पऱ्या बनाल. ही सारी खोटी नावे ठेवली आहेत. लाखो वर्षे म्हटल्याने अगदीच सर्व काही विसरून गेले आहेत. आता तुम्ही अभूल (निर्दोष) बनत आहात नंबरवार पुरुषार्थानुसार. विचार केला जातो - इतकी छोटीशी आत्मा किती मोठा पार्ट शरीराद्वारे बजावते, आणि मग शरीरातून आत्मा जेव्हा निघून जाते तर शरीराचे बघा काय हाल होतात. आत्माच पार्ट बजावते. किती मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. साऱ्या दुनियेतील ॲक्टर्स (आत्मे) आपल्या ॲक्टनुसारच पार्ट बजावतात. काहीही फरक पडू शकत नाही. हुबेहूब सर्व ॲक्ट (कृती) पुन्हा रिपीट होत आहे. यामध्ये संशय घेऊ शकत नाही. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये फरक पडू शकतो कारण आत्मा तर मन-बुद्धी सहित आहे ना. मुलांना ठाऊक आहे की, आपल्याला स्कॉलरशिप घ्यायची आहे तर मनातल्या मनात आनंद होतो. इथे (हिस्ट्री हॉलमध्ये) देखील आतमध्ये येताच एम ऑब्जेक्ट समोर पाहिल्यावर आनंद तर जरूर होईल. आता तुम्ही जाणता आपण हे (देवी-देवता) बनण्यासाठी इथे शिकत आहोत. अशी कोणती शाळा नाही जिथे दुसऱ्या जन्माचे एम ऑब्जेक्ट पाहू शकतो. तुम्ही पाहता की आम्ही लक्ष्मी-नारायणासारखे बनत आहोत. आता आपण संगमयुगावर आहोत जे भविष्यामध्ये यांच्यासारखे लक्ष्मी-नारायण बनण्याचे शिक्षण शिकत आहोत. किती गुप्त शिक्षण आहे. एम ऑब्जेक्टला पाहून किती आनंद झाला पाहिजे. आनंदाचा पारावार नाही. शाळा किंवा पाठशाळा असावी तर अशी. आहे किती गुप्त, परंतु जबरदस्त पाठशाला आहे. जितके मोठे शिक्षण तितक्या सुविधा असतात. परंतु इथे तुम्ही जमिनीवर बसून शिकता. आत्म्याला शिकायचे असते, मग हवे तर जमिनीवर बसा, नाहीतर तख्तावर, परंतु आनंदाने उड्या मारत रहा की, हे शिक्षण घेऊन पास झाल्यानंतर जाऊन हे बनणार. आता तुम्हा मुलांना बाबांनी येऊन आपला परिचय दिला आहे की, मी यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) कसा प्रवेश करून तुम्हाला शिकवतो. बाबा काही देवतांना तर शिकवणार नाहीत. देवतांना हे ज्ञान कुठे आहे. मनुष्य तर गोंधळतात काय देवतांमध्ये ज्ञान नाही आहे! देवताच या ज्ञानाद्वारे देवता बनतात. देवता बनल्यानंतर मग ज्ञानाची काय गरज आहे. लौकिक शिक्षणाने बॅरिस्टर बनला, कमाई करू लागला मग नंतर परत बॅरिस्टरी शिकतील का? अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अविनाशी ड्रामाच्या रहस्याला यथार्थरित्या समजून घेऊन हर्षित रहायचे आहे. या ड्रामामध्ये प्रत्येक ॲक्टरचा पार्ट आपला-आपला आहे, जो हुबेहूब बजावत आहेत.

२) एम ऑब्जेक्टला समोर ठेवून आनंदाने उड्या मारायच्या आहेत. बुद्धीमध्ये असावे आम्ही या शिक्षणाने असे लक्ष्मी-नारायण बनणार.

वरदान:-
आठवण आणि सेवेच्या शक्तिशाली आधाराद्वारे तीव्रगतीने पुढे जाणारे मायाजीत भव

ब्राह्मण जीवनाचा आधार आठवण आणि सेवा आहे, हे दोन्ही आधार कायम शक्तिशाली असतील तर तीव्र गतीने पुढे जात रहाल. जर सेवा खूप आहे, आठवण कमजोर आहे किंवा आठवण खूप चांगली आहे, सेवा कमजोर आहे तरी देखील तीव्रगती होऊ शकत नाही. आठवण आणि सेवा दोघांमध्ये तीव्रगती पाहिजे. आठवण आणि नि:स्वार्थ सेवा दोन्ही सोबत असेल तेव्हाच मायाजीत बनणे सोपे आहे. प्रत्येक कर्मामध्ये, कर्माची समाप्ती होण्यापूर्वीच नेहमी विजयी झाल्याचे दिसून येईल.

बोधवाक्य:-
या संसाराला अलौकिक खेळ आणि परिस्थितींना अलौकिक खेळणी समजा.