24-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही एका बाबांच्याच डायरेक्शनवर चालत रहा तर बाबा तुमच्यासाठी जबाबदार
आहेत, बाबांचे डायरेक्शन आहे चालता-फिरता माझी आठवण करा”
प्रश्न:-
जी चांगली
गुणवान मुले आहेत त्यांची मुख्य लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
ते काट्यांना फूल बनविण्याची चांगली सेवा करतील. कोणालाही काटा लावणार नाहीत, कधीही
आपसामध्ये भांडणार नाहीत. कोणालाही दुःख देणार नाहीत. दुःख देणे हे देखील काटा लावणे
आहे.
गीत:-
यह वक्त जा रहा
है…
ओम शांती।
गोड-गोड सिकीलध्या रुहानी मुलांना नंबरवार पुरुषार्थानुसार या गाण्याचा अर्थ समजला
आहे. नंबरवार यासाठी म्हणतात कारण कोणाला तर फर्स्ट ग्रेडमध्ये समजते (चांगल्या
प्रकारे समजते), कोणाला सेकंड ग्रेडमध्ये (मध्यम समजते), काहींना तर थर्ड ग्रेडमध्ये
(फार थोडे समजते). समज देखील प्रत्येकाची आपापली आहे. निश्चय-बुद्धी देखील
प्रत्येकाची आपली आहे. बाबा तर समजावून सांगत राहतात की, नेहमी असेच समजा की शिवबाबा
यांच्याद्वारे (ब्रह्मा द्वारे) डायरेक्शन देतात. तुम्ही अर्धा कल्प आसुरी
डायरेक्शनवर चालत आले आहात, आता असा निश्चय करा की आम्ही ईश्वरीय डायरेक्शनवर चालतो
तर बेडा पार होऊ शकतो (जीवन रुपी नाव पार होऊ शकते). जर ईश्वरीय डायरेक्शन न समजता
मनुष्य डायरेक्शन समजाल तर गोंधळून जाल. बाबा म्हणतात - माझ्या डायरेक्शनवर चालाल
तर मग मी जबाबदार आहे ना. यांच्याद्वारे (ब्रह्माद्वारे) जे काही होते, त्यांच्या
प्रत्येक कृतीला मीच जबाबदार आहे, त्याला मी राईट करणार. तुम्ही केवळ माझ्या
डायरेक्शनवर चाला. जे चांगल्या प्रकारे आठवण करतील तेच डायरेक्शनवर चालतील.
पावलो-पावली ईश्वरीय डायरेक्शन समजून चालाल तर कधी घाटा होणार नाही. निश्चयामध्येच
विजय आहे. बरीच मुले या गोष्टींना समजत नाहीत. थोडे ज्ञान समजले की मग देह-अभिमान
येतो. योग खूपच कमी आहे. ज्ञान तर आहे इतिहास-भूगोलाला जाणणे, हे तर सोपे आहे. इथे
देखील मनुष्य किती सायन्स इत्यादी शिकतात. हे शिक्षण तर सोपे आहे, बाकी मेहनत आहे
योगाची.
कोणी म्हणेल की,
‘बाबा, आम्ही योगामध्ये खूप मग्न राहतो’; परंतु बाबा मानणार नाहीत. बाबा प्रत्येकाची
कृती बघत असतात. बाबांची आठवण करणारा तर मोस्ट लवली (सर्वात प्रिय) असेल. आठवण करत
नाहीत म्हणूनच उलटे-सुलटे काम होते. खूप रात्रं-दिवसाचा फरक आहे. आता तुम्ही या
शिडीच्या चित्रावर देखील चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. यावेळी आहे काट्यांचे
जंगल. हा बगीचा नाही. हे तर स्पष्ट करून सांगितले पाहिजे की, भारत फुलांचा बगीचा
होता. बगीच्यामध्ये कधी जंगली प्राणी राहतात का? तिथे तर देवी-देवता राहतात. बाबा
तर आहेतच हाइएस्ट ऑथॉरिटी आणि मग हे प्रजापिता ब्रह्मा देखील हाइएस्ट ऑथॉरिटी झाले.
हे दादा आहेत सर्वात मोठी ऑथॉरिटी. शिव आणि प्रजापिता ब्रह्मा. आत्मे आहेत
शिवबाबांची मुले आणि मग साकारमध्ये आपण भाऊ-बहिणी सर्व आहोत प्रजापिता ब्रह्माची
मुले. हे आहेत सर्वांचे ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. अशा हाइएस्ट ऑथॉरिटीसाठी आम्हाला
घर पाहिजे. असे तुम्ही लिहा आणि मग पहा बुद्धीमध्ये काही येते का.
शिवबाबा आणि प्रजापिता
ब्रह्मा, आत्म्यांचे पिता आणि सर्व मनुष्य मात्रांचे पिता. हा पॉइंट समजावून
सांगण्यासाठी खूप चांगला आहे. परंतु मुले पूर्ण रीतीने समजावून सांगत नाहीत, विसरून
जातात, ज्ञानाचा अहंकार चढतो. जणूकाही बापदादांवर देखील विजय प्राप्त केला आहे. हे
दादा (ब्रह्माबाबा) म्हणतात, भले माझे ऐकू नका. नेहमी समजा शिवबाबा समजावून सांगत
आहेत, त्यांच्या श्रीमतावर चाला. डायरेक्ट ईश्वर मत देतात की हे असे-असे करा, मी
जबाबदार आहे. ईश्वरीय मतावर चाला. हे (ब्रह्मा) ईश्वर थोडेच आहेत, तुम्हाला
ईश्वराकडून शिकायचे आहे ना. नेहमी समजा हे डायरेक्शन ईश्वर देत आहेत. हे
लक्ष्मी-नारायण देखील भारतातील मनुष्य होते. हे देखील सर्व मनुष्य आहेत. परंतु हे
शिवालयामध्ये राहणारे आहेत म्हणून सर्वजण नमस्ते करतात. परंतु मुले नीट समजावून
सांगत नाहीत, आपलाच नशा चढतो. दोष तर भरपूर जणांमध्ये आहे ना. जेव्हा पूर्ण योग
असेल तेव्हा विकर्म विनाश होतील. विश्वाचे मालक बनणे काही मावशीचे घर थोडेच आहे.
बाबा बघतात, माया एकदम नाकाला पकडून गटारामध्ये पाडते. बाबांच्या आठवणीमध्ये तर
अतिशय आनंदामध्ये प्रफुल्लीत राहिले पाहिजे. समोर एम ऑब्जेक्ट उभे आहे, आपण हे
लक्ष्मी-नारायण बनत आहोत. विसरल्याने आनंदाचा पारा चढत नाही. म्हणतात आम्हाला
नेष्ठामध्ये (योगामध्ये) बसवा, बाहेर आम्ही आठवण करू शकत नाही. आठवणीमध्ये रहात
नाहीत म्हणून बाबा देखील कधी-कधी प्रोग्राम पाठवतात परंतु आठवणीमध्ये बसतात थोडेच,
बुद्धी इकडे-तिकडे भटकत राहते. बाबा (ब्रह्मा बाबा) आपले उदाहरण सांगतात - नारायणाचा
किती पक्का भक्त होता, जिथे-तिथे नारायणाचे चित्र सोबत ठेवत होता. तरी देखील
पूजेच्या वेळी बुद्धी इकडे-तिकडे जात असे. यामध्ये देखील असे होते. बाबा म्हणतात -
चालता-फिरता बाबांची आठवण करा परंतु बरेचजण म्हणतात - बहिणीने नेष्ठा (योग) करून
घ्यावा. नेष्ठाला तर काही अर्थच नाहीये. बाबा नेहमी म्हणतात आठवणीमध्ये रहा, बरीच
मुले नेष्ठामध्ये बसल्या-बसल्या ध्यानामध्ये निघून जातात. ना ज्ञान, ना आठवण.
नाहीतर मग डुलक्या काढू लागतात, बऱ्याचजणांना सवय लागली आहे. ही तर अल्पकाळाची शांती
झाली. म्हणजे जणू बाकी संपूर्ण दिवस अशांती असते. चालता-फिरता बाबांची आठवण केली
नाहीत तर पापांचे ओझे उतरणार कसे? अर्ध्या कल्पाचे ओझे आहे. यामध्येच खूप मेहनत आहे.
स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. भले बाबांना अनेक मुले लिहून पाठवतात -
इतका वेळ आठवणीमध्ये राहिलो परंतु आठवण राहत नाही. चार्टला समजतच नाहीत. बाबा बेहदचे
पिता आहेत. पतित-पावन आहेत तर आनंदामध्ये राहिले पाहिजे. असे नाही की, आम्ही तर
शिवबाबांचे आहोत ना. असे देखील भरपूर आहेत, समजतात आम्ही तर बाबांचे आहोत परंतु
अजिबात आठवण करत नाहीत. जर आठवण करत असते तर मग पहिल्या नंबरमध्ये गेले पाहिजेत.
कोणालाही समजावून सांगण्यासाठी देखील खूप चांगली बुद्धी पाहिजे. आपण तर भारताची
महिमा करतो. नवीन दुनियेमध्ये आदि सनातन देवी-देवतांचे राज्य होते. आता आहे जुनी
दुनिया, आइरन एज. ते सुखधाम, हे दुःख धाम. भारत गोल्डन एज होता तर या देवतांचे
राज्य होते. म्हणतात - आम्ही कसे समजावे की यांचे राज्य होते? हे नॉलेज खूप वंडरफुल
आहे. ज्यांच्या भाग्यामध्ये जे आहे, जे जितका पुरुषार्थ करतात तो दिसून तर येतो ना.
तुम्ही कृतीवरून जाणता, आहेत तर कलियुगी देखील मनुष्यच, तर सतयुगी देखील मनुष्यच.
मग त्यांच्यासमोर जाऊन डोके का टेकवतात? यांना (लक्ष्मी-नारायणाला) स्वर्गाचे मालक
म्हणतात ना. कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात अमका स्वर्गवासी झाला, हे देखील समजत
नाहीत. यावेळी तर सर्व नरकवासी आहेत. तर जरूर पुनर्जन्म देखील इथेच घेतील. बाबा
प्रत्येकाच्या वर्तनावरून बघत असतात. बाबांना किती साधारण रीतीने कोणा-कोणाशी बोलावे
लागते. सांभाळावे लागते. बाबा किती स्पष्ट करून सांगतात. समजतात देखील की, गोष्ट
अगदी बरोबर आहे. तरी देखील का मोठ-मोठे काटे बनतात. एकमेकांना दुःख दिल्याने काटे
बनतात. सवय सोडतच नाहीत. आता बागवान बाबा फुलांचा बगीचा लावतात. काट्यांना फूल बनवत
राहतात. त्यांचा धंदाच हा आहे. जो स्वतःच काटा असेल तर तो फूल कसे बनवेल?
प्रदर्शनीमध्ये देखील खूप खबरदारीने कोणाला पाठवावे लागते.
चांगली गुणवान मुले
ती जी काट्यांना फूल बनविण्याची सेवा करतात. कोणालाही काटा लावत नाहीत अर्थात
कोणालाही दुःख देत नाहीत. कधीही आपसामध्ये भांडत नाहीत. तुम्ही मुले अगदी ॲक्युरेट
समजावून सांगता. यामध्ये कोणाचाही अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही. आता शिवजयंती
देखील येत आहे. तुम्ही जास्तीत-जास्त प्रदर्शनी करत रहा. छोट्या-छोट्या प्रदर्शनीवर
देखील समजावून सांगू शकता. एका सेकंदामध्ये स्वर्गवासी बना अथवा पतित भ्रष्टाचारी
पासून पावन श्रेष्ठाचारी बना. एका सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करा. जीवनमुक्तीचा
देखील अर्थ समजत नाहीत. तुम्ही देखील आता समजता. बाबांद्वारे सर्वांना
मुक्ती-जीवनमुक्ती मिळते. परंतु ड्रामाला देखील जाणून घ्यायचे आहे. सर्वच धर्म काही
स्वर्गामध्ये येणार नाहीत. ते मग आपापल्या सेक्शनमध्ये निघून जातील. मग आपापल्या
वेळेवर येऊन स्थापना करतील. झाडाच्या चित्रामध्ये किती क्लियर आहे. एका
सद्गुरुशिवाय दुसरा कोणीही सद्गतीदाता असू शकत नाही. बाकी भक्ती शिकविणारे तर
पुष्कळ गुरु आहेत. सद्गतीसाठी मनुष्य गुरु होऊ शकत नाही. परंतु समजावून सांगण्यासाठी
देखील डोके पाहिजे, यामध्ये बुद्धीचा वापर करायचा असतो. ड्रामाचा कसा वंडरफुल खेळ
आहे. तुमच्यामध्ये देखील फार थोडे आहेत जे या नशेमध्ये राहतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
रात्री क्लास
१८-३-१९६८
वास्तविक तुम्हाला
शास्त्रांवर वाद-विवाद करण्याची काहीच गरज नाही. मुख्य गोष्ट आहेच आठवणीची, आणि
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला समजून घ्यायचे आहे. चक्रवर्ती राजा बनायचे आहे. फक्त या
चक्रालाच समजून घ्यायचे आहे, याचेच गायन आहे - सेकंदामध्ये जीवनमुक्ती. तुम्हा
मुलांना आश्चर्य वाटत असेल अर्धाकल्प भक्ती चालते. ज्ञान जरा सुद्धा नाही. ज्ञान
आहेच मुळी बाबांकडे. बाबांकडूनच जाणून घ्यायचे आहे. हे बाबा किती असाधारण आहेत
म्हणून कोटीं मधून कोणी निघतात. ते टीचर असे थोडेच म्हणतील. हे (शिवबाबा) तर
म्हणतात - मीच पिता, टिचर गुरु आहे. तर लोक ऐकून आश्चर्यचकित होतील. भारताला मदर
कंट्री (मातृभूमी) म्हटले जाते कारण अंबेचे नाव खूप प्रसिद्ध आहे. अंबेच्या यात्रा
देखील खूप भरतात, ‘अंबा’, खूप गोड शब्द आहे. छोटी मुले देखील आईवर प्रेम करतात ना
कारण आई खाऊ-पिऊ घालते, सांभाळते. आता अंबेचे पिता देखील पाहिजेत ना. ही तर मुलगी
आहे ॲडॉप्टेड. पती काही नाही आहे. ही नवीन गोष्ट आहे ना. प्रजापिता ब्रह्मा तर जरूर
ॲडॉप्ट करत असतील. या सर्व गोष्टी बाबाच येऊन तुम्हा मुलांना समजावून सांगतात.
अंबेची केवढी जत्रा भरते, पूजा होते, कारण मुलीने खूप सेवा केली आहे. मम्मा ने
जितक्या जणांना शिकवले असेल तितके इतर कोणी शिकवू शकत नाही. मम्माचा नामाचार खूप आहे,
जत्रा देखील खूप मोठी भरते. आता तुम्ही मुले जाणता बाबांनीच येऊन रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे सारे रहस्य तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे. तुम्हाला
बाबांच्या घराविषयी देखील माहित झाले आहे. बाबांवर प्रेम आहे तर घरावर देखील प्रेम
आहे. हे ज्ञान तुम्हाला आता मिळत आहे. या शिक्षणाने किती कमाई होते. तर आनंद झाला
पाहिजे ना. आणि तुम्ही आहात एकदम साधारण. दुनियेला माहीतच नाही आहे की, बाबा येऊन
हे ज्ञान ऐकवतात. बाबाच येऊन सर्व नवीन-नवीन गोष्टी मुलांना ऐकवतात. नवीन दुनिया
बनते बेहदच्या शिक्षणाद्वारे. जुन्या दुनियेचे वैराग्य येते. तुम्हा मुलांना
ज्ञानाचा आनंद होत असतो. बाबांची आणि घराची आठवण करायची आहे. घरी तर सर्वांना
जायचेच आहे. बाबा तर सर्वांना म्हणतील ना - मुलांनो, मी तुम्हाला
मुक्ती-जीवनमुक्तीचा वारसा देण्यासाठी आलो आहे. मग विसरता कशाला. मी तुमचा बेहदचा
पिता आहे, राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे. तर काय तुम्ही श्रीमतावर चालणार नाही! मग
तर खूप नुकसान होईल. हे आहे बेहदचे नुकसान. बाबांचा हात सोडला तर कमाई मध्ये नुकसान
होईल. अच्छा. गुड नाईट. ओम् शांती.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) एका
बाबांच्या आठवणी द्वारे मोस्ट लवली (परम प्रिय) बनायचे आहे. चालता-फिरता, कर्म
करताना आठवणीमध्ये राहण्याची प्रॅक्टिस करायची आहे. बाबांच्या आठवणीमध्ये आणि
आनंदामध्ये प्रफुल्लित रहायचे आहे.
२) पावलो-पावली
ईश्वरीय डायरेक्शनवर चालून प्रत्येक कार्य करायचे आहे. आपली मगरुरी (देह-अभिमानाचा)
नशा दाखवायचा नाही. कोणतेही उलटे-सुलटे काम करायचे नाही. गोंधळून जायचे नाही.
वरदान:-
साधारण कर्म
करत असताना देखील उच्च स्थितीमध्ये स्थित राहणारे नेहमी डबल लाईट भव
ज्याप्रमाणे बाबा
साधारण शरीर घेतात, जसे तुम्ही बोलता तसेच बोलतात, तसेच चालतात, तर कर्म भले साधारण
आहे, परंतु स्थिती उच्च असते. असेच तुम्हा मुलांची देखील स्थिती नेहमी उच्च असावी.
डबल लाईट बनून उच्च स्थितीमध्ये स्थित होऊन कोणतेही साधारण कर्म करा. नेहमी हेच
स्मृतीमध्ये रहावे की अवतरीत होऊन अवतार बनून श्रेष्ठ कर्म करण्यासाठी आलो आहोत. तर
साधारण कर्म अलौकिक कर्मामध्ये बदलून जातील.
बोधवाक्य:-
आत्मिक
दृष्टी-वृत्तीचा अभ्यास करणारे पवित्रतेला सहज धारण करू शकतात.
आपल्या शक्तिशाली
मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
जितके स्वतःला मनसा
सेवेमध्ये बिझी ठेवाल तितके सहजच मायाजीत बनाल. फक्त स्वतः पुरते भावूक बनू नका
परंतु इतरांना देखील शुभ भावना आणि शुभकामनेद्वारे परिवर्तित करण्याची सेवा करा.
भावना आणि ज्ञान, स्नेह आणि योग दोघांचा बॅलन्स असावा. कल्याणकारी तर बनले आहात आता
बेहद विश्व कल्याणकारी बना.