24-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुम्हाला जे शिक्षण शिकवत आहेत, ते लक्षात ठेऊन सर्वांना शिकवायचे आहे. प्रत्येकाला बाबांचा आणि सृष्टीचक्राचा परिचय द्यायचा आहे”

प्रश्न:-
आत्मा सतयुगामध्ये देखील पार्ट बजावते आणि कलियुगातही पार्ट बजावते, परंतु फरक काय आहे?

उत्तर:-
सतयुगामध्ये जेव्हा आत्मा पार्ट बजावते, तेव्हा तिथे कोणतेही पाप-कर्म होत नाही. तिथे प्रत्येक कर्म अकर्म बनते, कारण तिथे रावणच नाहीये. परंतु कलियुगामध्ये जेव्हा आत्मा पार्ट बजावते, तेव्हा प्रत्येक कर्म विकर्म किंवा पाप बनते, कारण इथे विकार आहेत. आता तुम्ही संगमावर आहात. तुम्हाला संपूर्ण ज्ञान आहे.

ओम शांती।
आता हे तर मुले जाणतात की आम्ही बाबांसमोर बसलो आहोत. बाबा देखील जाणतात की, मुले माझ्या समोर बसलेली आहेत. तुम्ही हे देखील जाणता की बाबा आपल्याला शिकवत आहेत, जे मग इतरांना शिकवायचे आहे. सर्वात आधी तर बाबांचाच परिचय द्यायचा आहे, कारण सर्वजण बाबांना आणि बाबांच्या शिकवणीला विसरून गेले आहेत. बाबा आता जे काही शिकवत आहेत, तेच शिक्षण पुन्हा ५ हजार वर्षांनंतर मिळेल. हे ज्ञान इतर कोणालाच नाही आहे. मुख्य आहे बाबांचा परिचय. नंतर मग हे देखील समजावून सांगायचे आहे की, आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. साऱ्या दुनियेमध्ये जे काही आत्मे आहेत, ते सर्व आपसामध्ये भाऊ-भाऊ आहेत. सर्वजण आपला मिळालेला पार्ट या शरीराद्वारे बजावतात. आता तर बाबा नवीन दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरिता आलेले आहेत, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. परंतु आपण सर्व भाऊ पतित आहोत, एकही पावन नाही आहे. सर्व पतितांना पावन बनविणारे एक बाबाच आहेत. ही आहेच पतित, विकारी, भ्रष्टाचारी रावणाची दुनिया. रावणाचा अर्थच आहे ५ विकार स्त्रीमध्ये आणि ५ विकार पुरुषामध्ये आहेत. बाबा अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. तुम्ही देखील असे समजावून सांगू शकता. तर सर्वप्रथम हे समजावून सांगा की, आम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत. आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. आणि मग विचारा - हे पटते आहे का? मग आता लिहा - आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत आमचे पिता देखील एक आहेत, आम्हा सर्व आत्म्यांचे ते सुप्रीम सोल आहेत, त्यांना फादर म्हटले जाते. हे चांगले बुद्धीमध्ये पक्के बसवा तेव्हाच सर्वव्यापी इत्यादी अगोदरचे सर्व डोक्यातून निघून जाईल. सर्वात पहिले अल्फ विषयी शिकवायचे आहे. बोला - आता हे बसून व्यवस्थित लिहा. अगोदर सर्वव्यापी म्हणत होतो, आता समजते आहे की, ते सर्वव्यापी नाहीत. आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत, सर्व आत्मे म्हणतात - गॉडफादर परमपिता. पहिला तर त्यांचा हा निश्चय पक्का करायचा आहे की, आपण आत्मा आहोत परमात्मा नाही; आणि ना आमच्यामध्ये परमात्मा व्यापक आहेत. सर्वांमध्ये आत्मा व्यापक आहे. आत्मा शरीराच्या आधारे पार्ट बजावते, हे पक्के करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर ते पिता सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देखील ऐकवतात. बाकीचे तर कोणीही हे जाणत नाहीत की या सृष्टीचक्राचे आयुर्मान किती आहे. बाबाच टीचरच्या रूपामध्ये बसून समजावून सांगतात. लाखो वर्षांची तर गोष्टच नाही. हे चक्र अनादि ॲक्युरेट पूर्वनियोजित आहे. याला जाणून घ्यावे लागेल. सतयुग-त्रेता पास्ट झाले, लिहून घ्या. त्याला म्हटले जाते स्वर्ग आणि सेमी स्वर्ग, जिथे देवी-देवतांचे राज्य चालते, ते आहेत १६ कला, हे आहेत १४ कला. हळू-हळू कला कमी होत जातात. दुनिया जुनी तर जरूर होईलच ना. सतयुगाचा प्रभाव खूप जबरदस्त आहे. नावच आहे स्वर्ग, हेवन, नवीन दुनिया… त्याचीच महिमा करायची आहे. नवीन दुनियेमध्ये आहेच एक आदि सनातन देवी-देवता धर्म. पहिला बाबांचा परिचय त्यानंतर चक्राचा परिचय दिला जातो. निश्चय पक्का करून घेण्यासाठी ही चित्रे देखील तुमच्याकडे आहेत. हे सृष्टीचे चक्र फिरत राहते. सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते, त्रेतामध्ये राम-सीतेचे राज्य होते. हे झाले अर्धे-कल्प, दोन युगे पास्ट झाली आहेत आणि आता आहे - द्वापर-कलियुग. द्वापरमध्ये आहे रावण राज्य. देवता वाममार्गामध्ये जातात तेव्हा मग विकाराची सिस्टम बनते. सतयुग-त्रेतामध्ये सर्व निर्विकारी असतात. एक आदि सनातन देवी-देवता धर्म असतो. चित्र देखील दाखवायचे आहे आणि तोंडी देखील समजावून सांगायचे आहे; बाबा टीचर बनून आम्हाला असे शिकवतात. बाबा आपला परिचय स्वतःच येऊन देतात. ते स्वतः सांगतात - ‘मी पतितांना पावन बनविण्याकरिता येतो तर मला शरीर जरूर पाहिजे. नाहीतर बोलू कसा. मी चैतन्य आहे, सत्य आहे, अमर आहे. आत्मा सतो, रजो, तमोमध्ये येते. आत्माच पतित आणि पावन बनते म्हणूनच म्हटले जाते - पतित-आत्मा आणि पावन-आत्मा. आत्म्यामध्येच सर्व संस्कार आहेत. पूर्व जन्मातील कर्म किंवा विकर्मांचा संस्कार आत्मा घेऊन येते. सतयुगामध्ये विकर्म होतच नाही. कर्म करतात, पार्ट बजावतात परंतु ते कर्म अकर्म होते. गीतेमध्ये देखील शब्द आहे, आता तुम्हाला हे प्रॅक्टिकलमध्ये समजत आहे. तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत जुन्या दुनियेला बदलण्यासाठी आणि नवीन दुनियेला तयार करण्यासाठी जिथे कर्म अकर्म होतात, त्यालाच सतयुग म्हटले जाते आणि मग जिथे सर्व कर्म, विकर्म होतात त्यालाच कलियुग म्हटले जाते. तुम्ही आता संगमावर आहात. बाबा दोन्ही बाजूच्या गोष्टी समजावून सांगतात. सतयुग-त्रेता तर आहे पवित्र दुनिया, तिथे कोणतेही पाप होत नाही. जेव्हा रावण राज्य सुरू होते तेव्हाच पापे होतात. तिथे विकाराचे नावच नसते. चित्र तर समोर आहे - रामराज्य आणि रावण राज्य. बाबा समजावून सांगत आहेत - हे शिक्षण आहे. बाबांशिवाय इतर कोणीही जाणत नाही. हे शिक्षण तर तुमच्या बुद्धीमध्ये राहिले पाहिजे, बाबांची देखील आठवण येते आणि चक्र देखील बुद्धीमध्ये येते. सेकंदामध्ये सर्व आठवते. वर्णन करून सांगण्यासाठी वेळ लागतो. याचे तीन फाउंटन आहेत. झाड असे तयार होते, बीज आणि झाड सेकंदामध्ये लक्षात येईल. हे बीज अमक्या झाडाचे आहे, त्यातून अशा प्रकारचे फळ तयार होते. हे बेहदचे मनुष्य सृष्टीरुपी झाड कसे आहे, त्याचे रहस्य तुम्ही समजावून सांगता. मुलांना सर्व काही सांगितले आहे - अर्धे कल्प डिनायस्टी कशी चालते आणि मग रावण राज्य होते. तर जे सतयुग-त्रेतावासी आहेत, तेच द्वापरवासी बनतात. झाडाची वृद्धी होत राहते. अर्ध्या कल्पानंतर रावण राज्य बनते, विकारी बनतात. बाबांकडून जो वारसा मिळाला तो अर्धाकल्प चालला. नॉलेज ऐकवून वारसा दिला, ते प्रारब्ध भोगले अर्थात सतयुग-त्रेतामध्ये सुख प्राप्त झाले. त्याला सुखधाम, सतयुग म्हटले जाते तिथे दुःखच असत नाही. किती सोप्या रीतीने समजावून सांगतात. एकाला समजावून सांगता किंवा खूप जणांना सांगता - तर याकडे लक्ष द्यायचे आहे की, समोरच्याला समजत आहे की फक्त हा-हा म्हणत आहे? तुम्ही त्याला सांगा - लिहून घेत जा. कोणती शंका असेल तर विचारा. जी गोष्ट कोणीही जाणत नाही ती आम्ही समजावून सांगतो. तुम्ही काहीही जाणत नाही आहात; तर विचारतील - ‘पुढे मग काय झाले?’

बाबा तर या बेहदच्या झाडाचे रहस्य समजावून सांगतात. हे नॉलेज आता तुम्हाला समजते. बाबांनी समजावून सांगितले आहे की, तुम्ही ८४ च्या चक्रामध्ये कसे येता. हे व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर मग यावर विचार करायचा आहे. जसे टीचर निबंध देतात आणि घरी जाऊन उजळणी करून येतात ना. तुम्ही देखील हे नॉलेज देता मग बघा काय होते ते. विचारत रहा. एक-एक गोष्ट चांगल्या रीतीने समजावून सांगा. पिता-टीचरचे कर्तव्य समजावून सांगून नंतर मग गुरुचे कर्तव्य समजावून सांगा. त्यांना बोलावलेच आहे की येऊन पतितांना पावन बनवा. आत्मा पावन बनते तर मग शरीर देखील पावन मिळते. जसे सोने तसा दागिना बनतो. २४ कॅरेटचे सोने जर घेतले, भेसळ घातली नाहीत तर दागिना देखील तसाच सतोप्रधान बनेल. एलॉय (भेसळ) टाकल्यामुळे तमोप्रधान बनले आहेत. सर्वात पहिला भारत २४ कॅरेट पक्का सोन्याची चिमणी होता अर्थात सतोप्रधान नवीन दुनिया होती नंतर मग तमोप्रधान बनली आहे. हे बाबाच समजावून सांगतात, दुसरा कोणताही मनुष्य, गुरु लोक सुद्धा जाणत नाहीत. बोलावतात येऊन पावन बनवा. ते तर गुरुचे काम आहे. वानप्रस्थ अवस्थेमध्ये मनुष्य गुरु करतात. वाणीपासून परे स्थान तर इनकारपोरिअल वर्ल्ड (निराकारी दुनिया) आहे, जिथे आत्मे राहतात. हे आहे कारपोरिअल वर्ल्ड (आकारी दुनिया). दोन्हीचा हा मध्य आहे. तिथे तर शरीरच नाहीये. तिथे कोणतेही कर्म केले जात नाही. बाबांमध्ये तर सर्व नॉलेज आहे. ड्रामा प्लॅन अनुसार त्यांना म्हटलेच जाते नॉलेजफुल. ते चैतन्य सत-चित-आनंद स्वरूप असल्याकारणाने त्यांना नॉलेजफुल म्हटले जाते. बोलावतात देखील हे - पतित-पावन, नॉलेजफुल शिवबाबा, त्यांचे नाव सदैव ‘शिव’च आहे. बाकी सर्व आत्मे पार्ट बजावण्यासाठी येतात. तर भिन्न-भिन्न नावे धारण करतात. बाबांना बोलावतात परंतु त्यांना कोणतीही समज नसते. जरूर भाग्यशाली रथ देखील असेल, ज्यामध्ये बाबा प्रवेश करून तुम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन जातील. तर बाबा समजावून सांगतात - गोड-गोड मुलांनो, मी त्यांच्या तनामध्ये येतो जे अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये आहेत. पूर्ण ८४ जन्म घेतात. भाग्यशाली रथावर यावे लागते. पहिल्या नंबर मध्ये तर आहे श्रीकृष्ण. तो आहे नवीन दुनियेचा मालक. नंतर मग तेच खाली उतरतात (पतन होते). गोल्डन पासून सिल्व्हर, कॉपर, आयरन एज्डमध्ये येऊन पडतात. आता पुन्हा तुम्ही आयरन पासून गोल्डन बनत आहात. बाबा म्हणतात - ‘फक्त माझी आपल्या पित्याची आठवण करा.’ ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या आत्म्यामध्ये तर जरा देखील नॉलेज नव्हते. यांच्यामध्ये मी प्रवेश करतो म्हणून याला भाग्यशाली रथ म्हटले जाते. नाहीतर सर्वात श्रेष्ठ तर हे लक्ष्मी-नारायण आहेत, यांच्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. परंतु यांच्यामध्ये परमात्मा प्रवेश करत नाहीत म्हणून त्यांना भाग्यशाली रथ म्हटले जात नाही. रथामध्ये येऊन पतितांना पावन बनवायचे आहे, तर जरूर कलियुगी तमोप्रधान असेल ना. स्वतः म्हणतात - मी अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये येतो. गीतेमध्ये देखील अचूक शब्द आहे. गीतेलाच सर्व शास्त्रमई शिरोमणी म्हटले जाते. या संगमयुगावरच बाबा येऊन ब्राह्मण कुळाची आणि देवता कुळाची स्थापना करतात. अनेक जन्मांच्या अंतामध्ये अर्थात संगमयुगावरच बाबा येतात. बाबा म्हणतात - मी बीजरूप आहे. श्रीकृष्ण तर आहे सतयुगाचा रहिवासी. त्याला दुसऱ्या ठिकाणी तर कोणी पाहू देखील शकणार नाही. पुनर्जन्मामध्ये तर नाव, देश, काळ, सर्वकाही बदलते. फीचर्स (चेहरा-मोहराच) बदलून जातो. अगोदर छोटा सुंदर बाळ असतो नंतर मोठा होतो आणि मग ते शरीर सोडून दुसरे छोटे शरीर घेतो. हा पूर्वनियोजित खेळ ड्रामामध्ये फिक्स आहे. दुसरे शरीर घेतले की मग त्याला श्रीकृष्ण म्हणणार नाही. त्या दुसऱ्या शरीरावर नाव इत्यादी मग दुसरे असेल. वेळ, फीचर्स, तिथी-तारीख इत्यादी सर्वकाही बदलते. म्हटले जाते - जगाचा इतिहास-भूगोल हुबेहूब रिपीट. तर हा ड्रामा रिपीट होत राहतो. सतो, रजो, तमोमध्ये यायचेच आहे. सृष्टीचे नाव, युगाचे नाव सर्व काही बदलत राहते. आता हे आहे संगमयुग. मी येतोच संगमावर. मी तुम्हाला साऱ्या दुनियेचा खरा इतिहास-भूगोल सांगतो. याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतर कोणीही जाणत नाही. सतयुगाचा कालावधी किती होता, हे माहित नसल्याकारणाने लाखो वर्षे म्हणतात. आता तुमच्या बुद्धीमध्ये सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला हे आतून पक्के करायचे आहे की, बाबा, पिता-टीचर-सद्गुरु आहेत, जे पुन्हा सतोप्रधान बनवण्यासाठी खूप चांगली युक्ती सांगतात. गीतेमध्ये देखील आहे - ‘देहा सहित देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजा’. आपल्या घरी परत जरूर जायचे आहे. भगवंताकडे जाण्यासाठी भक्तीमार्गामध्ये किती मेहनत करतात. ते आहे मुक्तीधाम, कर्मापासून मुक्त. आपण इनकारपोरियल दुनियेमध्ये (निराकारी दुनियेमध्ये) जाऊन बसतो. पार्टधारी घरी गेला तर पार्ट पासून मुक्त झाला. सर्वांना वाटते आपल्याला मुक्ती मिळावी. मोक्ष तर कोणाला मिळू शकत नाही. हा ड्रामा अनादि-अविनाशी आहे. कोणी जर म्हणेल की, हा येण्या-जाण्याचा पार्ट आपल्याला पसंत नाही, परंतु यामध्ये काहीच करू शकत नाही. हा अनादि ड्रामा पूर्वनियोजित आहे. एकही मोक्षाला प्राप्त करू शकत नाही. ती (ग्रंथ-शास्त्रांमधील) सर्व आहेत अनेक प्रकारची मनुष्य मते. हे आहे - श्रीमत, श्रेष्ठ बनविण्यासाठी. मनुष्याला श्रेष्ठ म्हणता येणार नाही. देवतांना श्रेष्ठ म्हटले जाते. सर्वजण त्यांच्यासमोर नमन करतात. तर ते श्रेष्ठ झाले ना. श्रीकृष्ण देवता आहे वैकुंठाचा प्रिन्स. तो इथे कसा येईल. ना काही त्याने गीता ऐकवली. शिवाच्या समोर जाऊन म्हणतात - आम्हाला मुक्ती द्या. ते स्वतः तर कधी जीवनमुक्त, जीवनबंधमध्ये येतही नाहीत म्हणून त्यांना बोलावतात - मुक्ती द्या. जीवनमुक्ती देखील तेच देतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपण सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहोत, हा पाठ पक्का करायचा आहे आणि करवून घ्यायचा आहे. आपल्या संस्कारांना आठवणीद्वारे संपूर्ण पावन बनवायचे आहे.

२) २४ कॅरेट खरे सोने (सतोप्रधान) बनण्यासाठी कर्म-अकर्म-विकर्माच्या गुह्य गतीला बुद्धीमध्ये ठेऊन आता कोणतेही विकर्म करायचे नाही.

वरदान:-
घाबरण्याच्या डान्सला सोडून सदैव आनंदाचा डान्स करणारे मास्टर नॉलेजफुल भव

जी मुले मास्टर नॉलेजफुल आहेत ते कधीही घाबरण्याचा डान्स करू शकत नाहीत. सेकंदामध्ये शिडी खाली, सेकंदामध्ये वर, आता हे संस्कार चेंज करा म्हणजे मग खूप वेगाने पुढे जाल. फक्त मिळालेल्या ऑथॉरिटीला, नॉलेजला, परिवाराच्या सहयोगाचा वापर करा, बाबांच्या हातामध्ये हात देऊन चालत रहा तर आनंदाचा डान्स करत रहाल, घाबरण्याचा डान्स होऊ शकत नाही. परंतु जेव्हा मायेचा हात पकडता तर तो डान्स होतो.

बोधवाक्य:-
ज्यांचे संकल्प आणि कर्म महान आहेत तेच मास्टर सर्वशक्तिमान आहेत.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. मास्टर त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म, प्रत्येक संकल्प किंवा वचन बोला, तर कोणतेही कर्म व्यर्थ किंवा अनर्थ असणारे होऊ शकत नाही. त्रिकालदर्शी अर्थात साक्षीपणाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन या कर्मेंद्रियांद्वारे कर्म कराल तर कर्माच्या वशीभूत होणार नाही. सदैव कर्म आणि कर्माच्या बंधनापासून मुक्त बनून आपल्या उच्च स्टेजला प्राप्त कराल.