24-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - हे ज्ञान तुम्हाला शितल बनवते, या ज्ञानाद्वारेच काम-क्रोधाची आग नष्ट
होते, भक्तीने काही ही आग नष्ट होत नाही”
प्रश्न:-
आठवणीमध्ये
मुख्य मेहनत कोणती आहे?
उत्तर:-
बाबांच्या आठवणीमध्ये बसते वेळी देहाची सुद्धा आठवण येऊ नये. आत्म-अभिमानी बनून
बाबांची आठवण करा, हीच मेहनत आहे, यामध्येच विघ्न पडते कारण अर्धाकल्प देह-अभिमानी
राहिला आहात. भक्ती म्हणजेच देहाची आठवण.
ओम शांती।
तुम्ही मुले जाणता की, आठवणीकरिता एकांत अतिशय गरजेचा आहे. जितके तुम्ही एकांतामध्ये
किंवा शांतीमध्ये बाबांच्या आठवणीमध्ये राहू शकता तितके गर्दीमध्ये राहू शकत नाही.
शाळेमध्ये देखील मुले शिकतात तेव्हा एकांतामध्ये जाऊन अभ्यास करतात. यासाठीच देखील
एकांत पाहिजे. फिरायला जाता तेव्हा देखील आठवणीची यात्रा मुख्य आहे. शिक्षण तर एकदम
सोपे आहे कारण अर्धाकल्प मायेचे राज्य आल्यामुळेच तुम्ही देह-अभिमानी बनता. सर्वात
पहिला शत्रू आहे देह-अभिमान. बाबांची आठवण करण्याऐवजी देहाची आठवण करतात. याला
देहाचा अहंकार म्हटले जाते. इथे तुम्हा मुलांना म्हटले जाते आत्म-अभिमानी बना,
यामध्येच मेहनत करावी लागते. आता भक्ती तर सुटली. भक्ती केली जातेच मुळी शरीरासोबत.
तीर्थक्षेत्र इत्यादींवर शरीराला घेऊन जावे लागते. दर्शन करायचे आहे, हे करायचे आहे.
शरीराला जावे लागते. इथे तुम्हाला हेच चिंतन करायचे आहे की, ‘मी आत्मा आहे, मला
परमपिता परमात्मा बाबांची आठवण करायची आहे’. बस्स, जितकी आठवण कराल तितकी पापे नष्ट
होतील. भक्तीमार्गामध्ये तर पापे कधीच नष्ट होत नाहीत. कोणी वृद्ध इत्यादी जे असतात
तर त्यांना मनात हा संशय असतो - आपण भक्ती नाही केली तर नुकसान होईल, नास्तिक बनू.
भक्तीची जणूकाही आग लागलेली आहे आणि ज्ञानामध्ये आहे शीतलता. यामध्ये काम, क्रोधाची
आग संपते. भक्तीमार्गामध्ये मनुष्य किती भावना ठेवतात, मेहनत करतात. असे समजा
बद्रीनाथला गेलात, मूर्तीचा साक्षात्कार झाला पुढे काय! लगेच भावना तयार होते, मग
बद्रीनाथाशिवाय आणखी कोणाचीच आठवण बुद्धीमध्ये राहत नाही. पूर्वी तर पायी चालत जात
होते. बाबा म्हणतात मी अल्पकाळासाठी मनोकामना पूर्ण करतो, साक्षात्कार घडवतो. बाकी
मी या रीतीने भेटू शकत नाही. माझ्याशिवाय वारसा थोडाच मिळणार. वारसा तर तुम्हाला
माझ्याकडूनच मिळणार आहे ना. हे तर सर्व देहधारी आहेत. वारसा तर एकाच रचता बाबांकडून
मिळतो, बाकी जे कोणी आहेत जड अथवा चैतन्य ती सर्व आहे रचना. रचनेकडून कधीही वारसा
मिळू शकत नाही. पतित-पावन एक बाबाच आहेत. कुमारींनी तर संगदोषापासून खूप सावध रहायचे
आहे. बाबा म्हणतात - या पतितपणामुळेच तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःख मिळते. आता सर्व
आहेत पतित. तुम्हाला आता पावन बनायचे आहे. निराकार बाबाच येऊन तुम्हाला शिकवतात.
कधीही असे समजू नका की ब्रह्मा शिकवत आहेत. सर्वांची बुद्धी शिवबाबांकडेच राहिली
पाहिजे. शिवबाबा यांच्याद्वारे शिकवत आहेत. तुम्हा दादींना शिकविणारे देखील शिवबाबा
आहेत. त्यांचे तुम्ही आदरातिथ्य ते काय करणार! तुम्ही शिवबाबांसाठी द्राक्षे, आंबे
घेऊन येता, शिवबाबा म्हणतात - मी तर अभोक्ता आहे. सर्व काही तुम्हा मुलांसाठीच आहे.
भक्तांनी भोग लावला आणि वाटून खाल्ला. मी थोडेच खातो. बाबा म्हणतात - ‘मी तर येतोच
तुम्हा मुलांना शिकवून पावन बनविण्यासाठी. पावन बनून तुम्ही इतके उच्च पद प्राप्त
कराल. माझा धंदाच हा आहे. म्हणतातच - ‘शिव भगवानुवाच’. ‘ब्रह्मा भगवानुवाच’ तर
म्हणत नाहीत. ‘ब्रह्मा वाच’ असे देखील म्हणत नाहीत. भले हे देखील मुरली चालवतात
परंतु नेहमी असे समजा शिवबाबा चालवत आहेत. कोणत्या मुलाला चांगला ज्ञानाचा बाण
मारायचा असेल तर स्वतः प्रवेश करतील. ज्ञानाचा बाण तीक्ष्ण असतो असे म्हटले जाते
ना. सायन्समध्ये देखील किती शक्ती आहे. बॉम्ब्स इत्यादीचा किती स्फोट होतो. तुम्ही
किती सायलेन्समध्ये राहता. सायन्सवर सायलेन्स विजय प्राप्त करतो.
तुम्ही या सृष्टीला
पावन बनवता. पहिले तर स्वतःला पावन बनवायचे आहे. ड्रामानुसार पावन देखील बनायचेच आहे,
त्यामुळे विनाश देखील निश्चित नोंदलेला आहे. ड्रामाला समजून घेऊन अतिशय आनंदात
राहिले पाहिजे. आता आपल्याला जायचे आहे शांतीधामला. बाबा म्हणतात - ते तुमचे घर आहे.
घरी तर आनंदाने गेले पाहिजे ना. यामध्ये देही-अभिमानी बनण्याची खूप मेहनत करायची आहे.
या आठवणीच्या यात्रेवरच बाबा खूप जोर देतात, यातच मेहनत आहे. बाबा विचारतात -
चालता-फिरता आठवण करणे सोपे आहे का एका ठिकाणी बसून आठवण करणे सोपे आहे? भक्ती
मार्गांमध्ये देखील किती माळा जपतात, राम-राम जपत राहतात. फायदा तर काहीच नाही. बाबा
तर तुम्हा मुलांना एकदम सोपी युक्ती सांगतात - भोजन बनवा, काहीही करा, बाबांची आठवण
करा. भक्तीमार्गामध्ये श्रीनाथद्वारेमध्ये भोग बनवतात, तोंडाला पट्टी बांधतात. जरा
सुद्धा आवाज होऊ नये. तो आहे भक्तिमार्ग. तुम्हाला तर बाबांची आठवण करायची आहे. ते
लोक इतका भोग लावतात मग तो कोणी खातात थोडेच. पंडे लोकांची कुटुंबे असतात, ते खातात.
इथे तुम्ही जाणता की, आपल्याला शिवबाबा शिकवतात. भक्तीमध्ये थोडेच असे समजतात की
आपल्याला शिवबाबा शिकवतात. भले शिव पुराण बनविले आहे परंतु त्यामध्ये शिव-पार्वती,
शिव-शंकर सर्वांना एकत्र केले आहेत, ते वाचण्याने काहीच फायदा होत नाही. प्रत्येकाने
स्वतःचे धर्मशास्त्र वाचले पाहिजे. भारतवासीयांची आहे एक गीता. ख्रिश्चनांचे एक
बायबल असते. देवी-देवता धर्माचे शास्त्र आहे - गीता. त्यामध्येच नॉलेज आहे. नॉलेजच
शिकले जाते. तुम्हाला नॉलेज शिकायचे आहे. युद्ध इत्यादीच्या गोष्टी ज्या
पुस्तकांमध्ये आहेत, त्यांच्याशी तुमचे काहीही काम नाही. आपण आहोत योगबलवाले मग
बाहुबळवाल्यांच्या कहाण्या कशासाठी ऐकायच्या! खरे पाहता तुमचे काही युद्ध नाही आहे.
तुम्ही योगबलाने पाच विकारांवर विजय प्राप्त करता. तुमचे युद्धच आहे पाच
विकारांसोबत. ते तर मनुष्य, मनुष्यासोबत युद्ध करतात. तुम्ही आपल्या विकारांसोबत
युद्ध करता. या गोष्टी संन्यासी इत्यादी समजावून सांगू शकत नाहीत. तुम्हाला कोणते
ड्रिल इत्यादी सुद्धा काही शिकवले जात नाही. तुमचे ड्रिल आहेच एक. तुमचे आहेच योगबळ.
आठवणीच्या बळाने ५ विकारांवर विजय प्राप्त करता. हे ५ विकार शत्रू आहेत. त्यामध्ये
देखील नंबर वन आहे देह-अभिमान. बाबा म्हणतात - तुम्ही तर आत्मा आहात ना. तुम्ही
आत्मा येता, येऊन गर्भामध्ये प्रवेश करता. मी तर या शरीरामध्ये विराजमान झालो आहे.
मी काही गर्भामध्ये थोडेच जातो. सतयुगामध्ये तुम्ही गर्भ महालामध्ये राहता. मग रावण
राज्यामध्ये गर्भ जेलमध्ये जाता. मी तर प्रवेश करतो. याला दिव्य जन्म म्हटले जाते.
ड्रामा अनुसार मला यांच्यामध्ये यावे लागते. यांचे नाव ब्रह्मा ठेवतो कारण माझा बनला
आहे ना. ॲडॉप्ट केले जातात तेव्हा किती चांगली-चांगली नावे ठेवतात. तुमची देखील खूप
चांगली-चांगली नावे ठेवली आहेत. संदेशी द्वारे खूप वंडरफुल लिस्ट आली होती. बाबांना
सर्व नावे थोडीच लक्षात आहेत. नावाशी तर काहीच काम नाही. नाव शरीराला दिले जाते ना.
आता तर बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजा, बाबांची आठवण करा’. बस्स. तुम्ही जाणता
आपण पूज्य देवता बनतो आणि मग राज्य करणार. नंतर भक्ती मार्गामध्ये आपलीच चित्रे (मुर्त्या)
बनवतील. देवींच्या खूप मुर्त्या बनवतात. आत्म्यांची देखील पूजा होते. मातीचे
शाळीग्राम बनवतात आणि मग रात्री तोडून टाकतात. देवींना देखील सजवून, पूजा करून मग
समुद्रामध्ये विसर्जित करतात. बाबा म्हणतात - माझे देखील रूप बनवून, खाऊ-पिऊ घालून
मग मला म्हणतात दगडा-धोंड्यामध्ये आहे. सर्वात दुर्दशा तर माझी करतात. तुम्ही किती
गरीब बनले आहात. गरीबच मग उच्चपद मिळवतात. श्रीमंत फार मुश्किलीने असे पद मिळवतात.
बाबा देखील श्रीमंतांकडून इतके घेऊन काय करतील! इथे तर मुलांच्या थेंबा-थेंबाने ही
घरे इत्यादी बनत आहेत. मुले म्हणतात - बाबा, आमची एक वीट लावा. असे समजतात की,
रिटर्नमध्ये आम्हाला सोन्या-चांदीचे महाल मिळतील. तिथे सोने तर भरपूर असते.
सोन्याच्या विटा असतील तेव्हाच तर घरे बनतील. तर बाबा खूप प्रेमाने म्हणतात -
गोड-गोड मुलांनो, आता माझी आठवण करा, आता नाटक पूर्ण होत आहे.
बाबा गरीब मुलांना
श्रीमंत बनण्याची युक्ती सांगतात - गोड मुलांनो, तुमच्याजवळ जे काही आहे ट्रान्सफर
करा. इथे तर काहीच राहणार नाही आहे. इथे जे ट्रान्सफर कराल ते नवीन दुनियेमध्ये
तुम्हाला शंभर पटीने मिळेल. बाबा काही मागत नाही आहेत. ते तर दाता आहेत, ही युक्ती
सांगितली जाते. इथे तर सर्व मातीमध्ये मिसळणार आहे. काही ट्रान्सफर कराल तर तुम्हाला
नवीन दुनियेमध्ये मिळेल. या जुन्या दुनियेच्या विनाशाची वेळ आहे. हे काहीच कामाला
येणार नाही; म्हणून बाबा म्हणतात घरोघरी युनिव्हर्सिटी कम हॉस्पिटल उघडा ज्यामुळे
हेल्थ आणि वेल्थ मिळेल. हेच आहे मुख्य. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
रात्री क्लास -
१२-०३-६८
यावेळी तुम्ही गरीब
साधारण माता पुरुषार्थ करून उच्चपद प्राप्त करता. यज्ञामध्ये मदत इत्यादी देखील माता
खूप करतात, पुरुष फार थोडे आहेत जे मदतगार बनतात. मातांना वारसदार असण्याचा नशा
राहत नाही. ती बीज पेरत राहते, आपले जीवन बनवत राहते. तुमचे ज्ञान आहे यथार्थ, बाकी
आहे भक्ती. रुहानी बाबाच येऊन ज्ञान देतात. बाबांना समजतील तर बाबांकडून वारसा जरूर
घेतील. तुमच्याकडून बाबा पुरुषार्थ करून घेतात, समजावून सांगत राहतात. वेळ वाया
घालवू नका. बाबा जाणतात कोणी चांगले पुरुषार्थी आहेत, कोणी मिडीयम, कोणी थर्ड.
बाबांना विचारले तर बाबा लगेच सांगतील - तुम्ही फर्स्ट आहात का सेकंड आहात का थर्ड
आहात. कोणाला ज्ञान देत नाही तर थर्ड क्लास झालात. पुरावा दिला नाही तर बाबा जरूर
असे म्हणतील ना. भगवान येऊन जे ज्ञान शिकवतात ते मग प्रायः लोप होते. हे कोणालाच
माहिती नाही आहे. ड्रामाच्या प्लॅन अनुसार हा भक्तिमार्ग आहे, याद्वारे मला कोणीही
प्राप्त करू शकत नाही. सतयुगामध्ये कोणीही जाऊ शकत नाही. आता तुम्ही मुले पुरुषार्थ
करत आहात. कल्पापूर्वीप्रमाणे ज्याने जितका पुरुषार्थ केला आहे, तितका करत राहतात.
बाबा समजू शकतात स्वतःचे कल्याण कोण करत आहेत. बाबा तर सांगतील रोज या
लक्ष्मी-नारायणाच्या चित्रासमोर येऊन बसा. बाबा, तुमच्या श्रीमतावर आम्ही हा वारसा
जरूर घेणार. आप समान बनविण्याच्या सेवेची आवड जरूर पाहिजे. सेंटर्सवाल्यांना सुद्धा
लिहितो, इतकी वर्षे शिकला आहात आणि कोणाला शिकवू शकत नसाल तर बाकी काय शिकलात!
मुलांनी उन्नती तर केली पाहिजे ना. बुद्धीमध्ये पूर्ण दिवस सेवेचे विचार चालले
पाहिजेत.
तुम्ही वानप्रस्थी
आहात ना. वानप्रस्थींचे देखील आश्रम असतात. वानप्रस्थींकडे गेले पाहिजे,
मरण्यापूर्वी लक्ष्य तर सांगा. वाणी पासून परे तुमची आत्मा जाईल कशी? पतित आत्मा
काही जाऊ शकत नाही. भगवानुवाच मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही वानप्रस्थमध्ये
निघून जाल. बनारसमध्ये देखील पुष्कळ सेवा आहे. भरपूर साधू लोक काशीवास करण्यासाठी
तिथे राहतात, पूर्ण दिवस म्हणत राहतात - ‘शिव काशी विश्वनाथ गंगा’. तुमच्या मनामध्ये
कायम आनंदाची टाळी वाजत राहिली पाहिजे. स्टुडंट्स आहात ना! सेवा देखील करता, शिकता
देखील. बाबांची आठवण करायची आहे, वारसा घ्यायचा आहे. आपण आता शिवबाबांकडे जात आहोत.
हे मनमनाभव आहे. परंतु खूप जणांना आठवण राहत नाही. झरमुई झगमुई (व्यर्थ गोष्टी) करत
राहतात. मुख्य गोष्ट आहे आठवणीची. आठवणच आनंदामध्ये घेऊन येईल. सर्वांना वाटते की
विश्वामध्ये शांती व्हावी. बाबा देखील म्हणतात - त्यांना समजावून सांगा की
विश्वामध्ये शांती आता स्थापन होत आहे; म्हणून बाबा लक्ष्मी-नारायणाच्या चित्राला
जास्त महत्त्व देतात. बोला, ही दुनिया स्थापन होत आहे, जिथे सुख-शांती, पवित्रता
सर्व होते. सर्वजण म्हणतात - विश्वामध्ये शांती व्हावी. अनेकांना प्राईज देखील मिळत
असते. वर्ल्डमध्ये पीस स्थापन करणारा तर मालक असेल ना. यांच्या (लक्ष्मी-नारायणाच्या)
राज्यामध्ये विश्वामध्ये शांती होती. एक भाषा, एक राज्य, एक धर्म होता. बाकी सर्व
आत्मे निराकारी दुनियेमध्ये होते. अशी दुनिया कोणी स्थापन केली होती! शांती कोणी
स्थापन केली होती! फॉरेनर्स देखील समजतील हा पॅराडाईज (स्वर्ग) होता, यांचे राज्य
होते. विश्वामध्ये शांती तर आता स्थापन होत आहे. बाबांनी समजावून सांगितले होते की,
प्रभात फेरीमध्ये देखील हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र घेऊन जा. ज्यामुळे सर्वांच्या
कानामध्ये आवाज पडेल की हे राज्य स्थापन होत आहे. नरकाचा विनाश समोर उभा आहे. हे तर
जाणता ड्रामानुसार बहुतेक उशीर आहे. मोठ्या-मोठ्यांच्या भाग्यामध्ये आता नाही आहे.
तरी देखील बाबा पुरुषार्थ करवून घेत राहतात. ड्रामा अनुसार सेवा होत आहे. अच्छा!
गुड नाईट.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) संग
दोषापासून आपली खूप काळजी घ्यायची आहे. कधीही पतितांच्या संगती मध्ये यायचे नाही.
सायलेन्सच्या बळाद्वारे या सृष्टीला पावन बनविण्याची सेवा करायची आहे.
२) ड्रामाला
व्यवस्थित समजून घेऊन हर्षित रहायचे आहे. आपले सर्व काही नवीन दुनियेसाठी ट्रान्सफर
करायचे आहे.
वरदान:-
बाबांद्वारे
सफलतेचा तिलक प्राप्त करणारे सदा आज्ञाकारी दिलतख्तनशीन भव
भाग्यविधाता बाबा रोज
अमृतवेलेला आपल्या आज्ञाकारी मुलांना सफलतेचा तिलक लावतात. आज्ञाकारी ब्राह्मण मुले
कधीही ‘मेहनत’ किंवा ‘अवघड’ हा शब्द मुखातूनच काय परंतु संकल्पामध्ये देखील आणू शकत
नाहीत. ते सहजयोगी बनतात त्यामुळे कधीही हताश होऊ नका परंतु सदैव दिलतख्तनशीन बना,
दयाळू बना. अहम भाव आणि वहम भाव (अहंकार आणि संशय) नाहीसा करा.
बोधवाक्य:-
विश्व
परिवर्तनाच्या तारखेचा विचार करू नका, आपल्या परिवर्तनाची वेळ निश्चित करा.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-
जे प्युरीटीच्या
पर्सनॅलीटिने संपन्न रॉयल आत्मे आहेत त्यांना सभ्यतेची देवी म्हटले जाते.
त्यांच्यामध्ये क्रोध रुपी विकाराची अपवित्रता सुद्धा असू शकत नाही. क्रोधाचे
सूक्ष्म रूप इर्षा, द्वेष, घृणा जरी आतमध्ये असेल तर तो देखील अग्नी आहे जो आतल्या
आत जाळत राहतो. बाहेरून लाल, पिवळा नसतो, परंतु काळा असतो. तर आता या काळेपणाला
नाहीसे करून खरे आणि स्वच्छ बना.