24-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना कमलपुष्प समान पवित्र बनायचे
आहे, एका बाबांच्याच मतावर चालायचे आहे, कोणतीही डिससर्व्हिस करायची नाही”
प्रश्न:-
कोणत्या
मुलांना माया जोराने आपला पंजा मारते, मोठे ध्येय कोणते आहे?
उत्तर:-
जी मुले देह-अभिमानामध्ये राहतात त्यांना माया जोराने पंजा मारते, मग नावा-रूपामध्ये
फसतात. देह-अभिमान आला आणि थप्पड बसले, यामुळे पद भ्रष्ट होते. देह-अभिमान तोडणे
हेच मोठे ध्येय आहे. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी बना’. जसे बाबा
ओबिडिएंट सर्व्हंट (आज्ञाधारक सेवक) आहेत, किती निरहंकारी आहेत, असे निरहंकारी बना,
कसलाही अहंकार नसावा.
गीत:-
न वह हमसे जुदा
होंगे…
ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. मुले म्हणतात - आम्ही जेव्हा मूलवतनमध्ये होतो तेव्हा आम्ही
बाबांचे होतो आणि बाबा आमचे होते. तुम्हा मुलांना ज्ञान तर चांगल्या रीतीने मिळाले
आहे. तुम्ही जाणता आपण ८४ चे चक्र फिरलो आहोत. आता पुन्हा आम्ही त्यांचे बनलो आहोत.
ते आले आहेत राजयोग शिकवून स्वर्गाचे मालक बनविण्याकरिता. कल्पापूर्वी प्रमाणे
पुन्हा आले आहेत. आता बाबा म्हणतात - माझ्या मुलांनो, तर मुले बनून इथे मधुबन
मध्येच बसून रहायचे नाही. तुम्ही आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना देखील
कमलपुष्प समान पवित्र रहा. कमळाचे फूल पाण्यामध्ये असते परंतु पाण्याच्यावर राहते.
त्याला पाणी लागत नाही. बाबा म्हणतात - तुम्हाला राहायचे तर घरीच आहे फक्त पवित्र
बनायचे आहे. हा तुमचा अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे. जे काही मनुष्य मात्र आहेत
त्या सर्वांना पावन बनविण्याकरिता मी आलो आहे. पतित-पावन सर्वांचा सद्गती दाता एकच
आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणीही पावन बनवू शकत नाही. तुम्ही जाणता अर्ध्या
कल्पापासून आपण शिडी उतरत आलो आहोत. ८४ जन्म तुम्हाला जरूर पूर्ण करायचे आहेत आणि
८४ चे चक्र पूर्ण करून जेव्हा मग जडजडीभूत अवस्थेला प्राप्त करतात तेव्हा मला यावे
लागते. कल्पाच्या मधल्या काळात दुसरा कोणीही येऊन पतितापासून पावन बनवू शकत नाही.
कोणीही ना बाबांना जाणतात आणि ना रचनेला जाणतात. ड्रामा अनुसार सर्वांना
कलियुगामध्ये पतित तमोप्रधान बनायचेच आहे. बाबा येऊन सर्वांना पावन बनवून
शांतीधाममध्ये घेऊन जातात. आणि तुम्ही बाबांकडून सुखधामचा वारसा प्राप्त करता.
सतयुगामध्ये कोणतेही दुःख नसते. आता तुम्ही जिवंतपणी बाबांंचे बनले आहात. बाबा
म्हणतात - तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचे आहे. बाबा कधी कोणाला असे म्हणू
शकत नाहीत की तुम्ही घरदार सोडा. नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये राहात असताना फक्त
अंतिम जन्म पवित्र बनायचे आहे. बाबांनी कधी म्हटले का की तुम्ही घरदार सोडा. नाही.
तुम्हीच ईश्वरीय सेवेसाठी स्वतःहूनच घर सोडले आहे. कित्येक मुले अशी आहेत जी
घर-गृहस्थी मध्ये राहत असताना देखील ईश्वरीय सेवा करतात. घर सोडायला लावले जात नाही.
बाबा कोणालाही घर सोडायला लावत नाहीत. तुम्ही तर स्वेच्छेने सेवेसाठी निघून आला
आहात. बाबांनी कोणाला सोडायला लावलेले नाही. तुमचे लौकिक वडील तुमच्या लग्नासाठी
विचार करतात तेव्हा तुम्ही ‘नाही’ म्हणता, कारण तुम्ही जाणता की आता मृत्यूलोकचा
अंत आहे. लग्न केल्याने तर बरबादीच होईल, आणि मग आपण पावन कसे बनणार. तर का नाही
आपण भारताला स्वर्ग बनविण्याच्या सेवेला लागावे. मुलांना वाटते की रामराज्य असावे.
बोलावतात ना - ‘हे पतित-पावन सीताराम’. हे राम येऊन भारताला स्वर्ग बनवा. म्हणतात
देखील परंतु समजत काहीच नाहीत. संन्याशी लोक म्हणतात - यावेळचे सुख कागविष्ठे समान
आहे. आणि खरोखर आहे देखील असेच. इथे सुख तर नाहीच आहे. असे फक्त बोलत राहतात परंतु
कोणाच्याच बुद्धीमध्ये नाहीये. बाबा ही सृष्टी काही दुःखासाठी थोडीच रचतात. बाबा
म्हणतात - तुम्ही विसरला आहात काय, स्वर्गामध्ये दुःखाचे नामोनिशाण सुद्धा राहत नाही.
तिथे कंस इत्यादी कुठून येतील.
आता बेहदचे बाबा जे
ऐकवत आहेत त्यांच्या मतावर चालायचे आहे. आपल्या मनमतावर चालल्याने बरबादी करतात.
आश्चर्यवत सुनन्ती, कथन्ती, भागन्ती किंवा ट्रेटर बनन्ती. कितीतरी जण बाहेर जाऊन
डिससर्व्हिस करतात. त्यांचे मग काय होईल? हिऱ्या समान जीवन बनविण्या ऐवजी कवडी समान
बनवतात. अखेरीला तुम्हाला आपला सर्व साक्षात्कार होईल. अशा वर्तनामुळे आपल्याला हे
पद मिळाले आहे. इथे तर तुम्हाला कोणतेच पाप करायचे नाहीये कारण तुम्ही पुण्य आत्मा
बनत आहात. पाप केल्याने मग १०० पटीने दंड होईल. भले स्वर्गामध्ये तर येतील परंतु
अगदीच कमी दर्जाचे पद मिळेल. इथे तुम्ही राजयोग शिकण्याकरिता आला आहात आणि तरीही
प्रजा बनता. पद-प्रतिष्ठेमध्ये तर खूप फरक आहे ना. हे देखील समजावून सांगितले आहे -
यज्ञामध्ये काहीही देतात आणि मग परत घेऊन जातात तर चांडाळाचा जन्म मिळतो. कित्येक
मुलांचे तर वर्तन देखील असे असते, ज्यामुळे पदाचा दर्जा कमी होतो.
बाबा समजावून सांगतात
की, असे कर्म करू नका जे राजा-राणीच्या ऐवजी प्रजेमध्ये देखील कमी पद मिळेल.
यज्ञामध्ये स्वाहा होऊन भागन्ती होतात तर जाऊन काय बनतील. हे देखील बाबा समजावून
सांगतात की, ‘मुलांनो, कोणतेही विकर्म करू नका, नाही तर १०० पटीने सजा मिळेल. मग
नुकसान कशासाठी करायचे. इथे राहणाऱ्यांपेक्षाही जे घर गृहस्थीमध्ये राहतात,
सेवेमध्ये तत्पर राहतात तेच खूप चांगले उच्च पद प्राप्त करतात. असे बरेचजण गरीब
आहेत, ८ आणे किंवा रुपया पाठवतात आणि जे भले इथे हजार रुपये जरी देतात तरीही गरिबाचे
पद उच्च होते; कारण ते कोणतेच पाप कर्म करत नाहीत. पाप केल्याने ते १०० पट बनेल.
तुम्हाला पुण्य-आत्मा बनून सर्वांना सुख द्यायचे आहे. दुःख दिले तर मग ट्रिब्युनल
बसते. साक्षात्कार होतो की तू हे-हे केले आहेस, आता खा सजा. पद सुद्धा भ्रष्ट होईल.
ऐकतही असतात तरी देखील बरीच मुले उलटे वर्तन करत राहतात. बाबा म्हणतात - नेहमी
क्षीरखंड होऊन राहा. जर लूनपाणी होऊन राहत असाल तर खूप डीससर्व्हिस करता. कोणाच्या
नावा-रूपामध्ये अडकून पडतात तर हे देखील खूप मोठे पाप होते. माया जशी एक उंदीर आहे,
फुंकर देखील मारते, आणि चावत देखील राहते, रक्त देखील निघते परंतु कळत सुद्धा नाही.
माया देखील रक्त काढते. असे कर्म करायला लावते जे कळत सुद्धा नाही. ५ विकार एकदम
तुमचे तोंडच फिरवतात. बाबा सावधानी तर देतील ना. असे होऊ नये जे ट्रिब्युनलच्या
समोर मग म्हणतील की आम्हाला थोडेच सावध केले होते. तुम्ही जाणता ईश्वर शिकवत आहेत.
स्वतः किती निरहंकारी आहेत. म्हणतात - मी ओबिडिएंट सर्व्हेंट (आज्ञाधारक सेवक) आहे.
काही-काही मुलांमध्ये किती अहंकार असतो. बाबांचे बनून मग अशी काही कर्म करतात काही
विचारू नका. यापेक्षा तर जे बाहेर गृहस्थ व्यवहारामध्ये राहतात ते खूप उच्च पदावर
निघून जातात. देह-अभिमान येताच माया जोराने पंजा मारते. देह-अभिमान तोडणे खूप मोठे
ध्येय आहे. देह-अभिमान आला आणि थप्पड बसली. तर मग देह-अभिमानामध्ये यायचेच कशाला
ज्यामुळे पद भ्रष्ट होईल. असे होऊ नये की तिथे जाऊन झाडू मारावा लागेल. आता जर
बाबांना कोणी विचारेल तर बाबा सांगू शकतात. स्वतः देखील समजू शकतात की, मी किती
चांगली सेवा करतो. मी किती जणांना सुख दिले आहे. बाबा, मम्मा सर्वांना सुख देतात.
सर्व जण किती आनंदीत होतात. बाबा बॉम्बे मध्ये किती ज्ञानाचा डान्स करत होते,
पुष्कळ चात्रक होते ना. बाबा म्हणतात पुष्कळ चात्रकांसमोर ज्ञानाचा डान्स करतो
तेव्हा चांगले-चांगले पॉईंट्स निघतात. चात्रक आकर्षित करतात. तुम्हाला देखील असे
बनायचे आहे तेव्हाच तर फॉलो कराल. श्रीमतावर चालायचे आहे. आपल्या मतावर चालून बदनामी
करतात तर खूप नुकसान होते. आता बाबा तुम्हाला हुशार बनवत आहेत. भारत स्वर्ग होता
ना. आत्ता असे कोणी थोडेच समजते आहे. भारता सारखा पावन कोणताच देश नाही. फक्त
म्हणतात परंतु समजत नाहीत की, आपण भारतवासी स्वर्गवासी होतो, तिथे अथाह सुख होते.
गुरुनानक ने भगवंताची महिमा गायलेली आहे की, ते येऊन मूत पलीती कपडे धुतात (पतित
झालेल्या आत्म्याला पावन बनवतात). ज्यांची ही महिमा आहे - ‘एक ओंकार…’ शिवलिंगा ऐवजी
अकालतख्त नाव ठेवले आहे. आता बाबा तुम्हाला साऱ्या सृष्टीचे रहस्य समजावून सांगत
आहेत. मुलांनो, एकही पाप करू नका, नाही तर शंभरपट होईल. माझी निंदा केलीत तर पद
भ्रष्ट होईल. खूप सांभाळून राहायचे आहे. आपले जीवन हिऱ्यासमान बनवा. नाहीतर खूप
पश्चाताप करावा लागेल. जे काही उलटे काम केले आहे ते मनामध्ये खात राहील. कल्प-कल्प
आपण असेच करणार काय ज्यामुळे नीच पद मिळेल. बाबा म्हणतात - माता-पित्याला फालो
करायचे असेल तर सच्चाईने सेवा करा. माया तर कुठून ना कुठून घुसून येणारच.
सेंटर्सच्या हेड्सना (मुख्य आहेत) त्यांनी तर एकदम निरहंकारी होऊन राहायचे आहे. बाबा
बघा किती निरहंकारी आहेत. बरीच मुले दुसऱ्यांकडून सेवा करवून घेतात. बाबा किती
निरहंकारी आहेत. कधीही कोणावर रागवत नाहीत. मुले जर नाफरमानबरदार (अवज्ञा करणारी)
असतील तर बाबा त्यांना समजावून सांगू तर शकतात ना. तुम्ही काय करता, हे तर बेहदचे
बाबाच जाणतात. सर्वच मुले एकसारखी सपूत नसतात, कपूत देखील असतात. बाबा इशारा
देतात.पुष्कळ मुले आहेत. यांची तर वृद्धी होत हजारोच्या अंदाजामध्ये होतील. तर बाबा
मुलांना सावधानी देखील देतात, कोणतीही चूक करू नका. इथे पतितापासून पावन बनण्याकरिता
आला आहात तर कोणतेही पतित काम करू नका. नावा-रूपामध्ये अडकायचे नाही आणि ना
देह-अभिमानामध्ये यायचे आहे. देही अभिमानी बनून बाबांची आठवण करत राहा. श्रीमतावर
चालत राहा. माया खूप प्रबळ आहे. बाबा सर्व काही समजावून सांगतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांसारखे
निरहंकारी बनायचे आहे. कोणाकडून सेवा करून घ्यायची नाही. कोणालाही दुःख द्यायचे नाही.
असे कोणते पाप कर्म होऊ नये, ज्याची सजा खावी लागेल. आपसामध्ये क्षीरखंड होऊन
राहायचे आहे.
२)एका बाबांच्याच
श्रीमतावर चालायचे आहे, आपल्या मतावर नाही.
वरदान:-
सेकंदामध्ये
देह रुपी वस्त्रा पासून न्यारे बनून कर्म भोगावर विजय प्राप्त करणारे सर्व शक्ती
संपन्न भव
जेव्हा कर्मभोगाचा
जोर असतो, कर्मेंद्रिया कर्म भोगाच्या अधीन होऊन आपल्याकडे आकर्षित करतात अर्थात
जेव्हा खूप वेदना होत असतात, अशा वेळी कर्मभोगाला कर्मयोगामध्ये परिवर्तन करणारे
साक्षी होऊन कर्मेंद्रियांद्वारे भोगणारेच सर्व शक्ती संपन्न अष्ट रत्न विजयी म्हटले
जातात. याकरिता प्रदीर्घ काळाचा देह रुपी वस्त्रापासून न्यारे बनण्याचा अभ्यास असावा.
हे वस्त्र (शरीर), दुनियेच्या किंवा मायेच्या आकर्षणामध्ये टाईट अर्थात ताणलेले
नसावे तेव्हाच ते सहज उतरू शकेल.
बोधवाक्य:-
सर्वांचा मान
प्राप्त करण्याकरिता निर्माणचित्त बना - निर्माणता ही महानतेची निशाणी आहे.
मातेश्वरीजींची अनमोल
महावाक्ये:-
१) “ईश्वर सर्वव्यापी
नाहीत, त्याचे प्रमाण काय आहे?”
शिरोमणी गीतेमध्ये जे
भगवानुवाच आहे - ‘मुलांनो, जिथे विजय आहे तिथे मी आहे’. हे देखील परमात्म्याचे
महावाक्य आहे - ‘पर्वतांमध्ये जो हिमालय पर्वत आहे त्यामध्ये मी आहे आणि सापांमध्ये
काली नाग मी आहे म्हणून पर्वतांमध्ये उंच पर्वत कैलास पर्वत दाखवतात आणि सापांमध्ये
मोठा काली नाग दाखवतात, तर यावरून हे सिद्ध होते की, परमात्मा जर सर्व सापांमध्ये
केवळ काळ्या नागामध्येच आहे, तर सर्वच सापांमध्ये त्याचा वास झाला नाही ना. जर
परमात्मा उंचात उंच पर्वतामध्ये आहेत तर जणू लहान पर्वतांमध्ये नाहीत आणि मग
म्हणतात - जिथे जीत तिथे माझा जन्म, अर्थात पराजयामध्ये मी नाहीये. आता या सर्व
गोष्टी सिद्ध करतात की परमात्मा सर्वव्यापी नाहीत. एकीकडे असे देखील म्हणतात आणि
दुसरीकडे असेही म्हणतात की परमात्मा अनेक रूपामध्ये येतात. जसे परमात्म्याला २४
अवतारांमध्ये दाखवले आहे, म्हणतात कच्छ-मच्छ इत्यादी सर्व रूपे परमात्म्याची आहेत.
आता हे आहे त्यांचे मिथ्या ज्ञान, असेच परमात्म्याला सर्वत्र आहे असे समजून बसले
आहेत; जेव्हा की यावेळी कलियुगामध्ये सर्वत्र मायाच व्यापलेली आहे तर परमात्मा
व्यापक कसे झाले? गीतेमध्ये देखील म्हणतात की, मी काही मायेमध्ये व्यापक नाहीये,
यावरून हे सिद्ध होते की परमात्मा सर्वत्र नाही.
२) निराकारी दुनिया -
आत्मा आणि परमात्म्याचे राहण्याचे ठिकाण.
आता हे तर आपण जाणतो
की जेव्हा आपण निराकारी दुनिया म्हणतो तर ‘निराकार’ याचा अर्थ असा नाही की त्याला
कोणता आकारच नाही, जसे आपण निराकारी दुनिया म्हणतो तर याचा अर्थ आहे जरूर कोणती तरी
दुनिया आहे, परंतु त्याला स्थूल सृष्टीप्रमाणे आकार नाही आहे, अगदी तसेच परमात्मा
निराकार आहेत परंतु त्यांचे आपले सूक्ष्म रूप अवश्य आहे. तर आम्हा आत्म्यांचे आणि
परमात्म्याचे धाम निराकारी दुनिया आहे. तर जेव्हा आपण ‘दुनिया’ हा शब्द म्हणतो, तर
यावरून हे सिद्ध होते की, ती दुनिया आहे आणि तिथे राहतात; तेव्हाच तर ‘दुनिया’ नाव
पडले आहे. आता दुनियावी लोक तर समजतात की, परमात्म्याचे रूप देखील अखंड ज्योती
तत्त्व आहे; ते तर झाले परमात्म्याच्या राहण्याचे ठिकाण, ज्याला रिटायर्ड होम म्हटले
जाते. तर आपण परमात्म्याच्या घराला कधीही ‘परमात्मा’ असे म्हणू शकत नाही. आता दुसरी
आहे आकारी दुनिया, जिथे ब्रह्मा, विष्णू, शंकर या देवता आकारी रूपामध्ये राहतात आणि
ही आहे साकारी दुनिया, जिचे दोन भाग आहेत - एक आहे निर्विकारी स्वर्गाची दुनिया जिथे
अर्धा कल्प सदैव सुख आहे, पवित्रता आणि शांती आहे. दुसरी आहे विकारी कलियुगी दुःख
आणि अशांतीची दुनिया. आता त्या दोन दुनिया आहेत असे का म्हटले जाते? कारण हे जे
मनुष्य म्हणतात की, स्वर्ग आणि नरक दोन्ही परमात्म्याने रचलेली दुनिया आहे. यावर
परमात्म्याचे महावाक्य आहे - ‘मुलांनो, मी काही दुःखाची दुनिया रचलेली नाही, मी जी
दुनिया रचलेली आहे ती सुखाची रचली आहे’. आता ही जी दुःखाची आणि अशांतीची दुनिया आहे
ती मनुष्य आत्मे आपल्या स्वतःला आणि मज परमात्म्याला विसरल्यामुळे हा हिशोब भोगत
आहेत. बाकी असे नाही की ज्यावेळी सुख आणि पुण्याची दुनिया आहे तिथे काही सृष्टी
चालत नाही. होय, तर जरूर आपण जेव्हा असे म्हणतो की, तिथे देवतांचे निवासस्थान होते,
तर तिथे सर्व प्रवृत्ती चालत होती परंतु एवढे जरूर होते की, तिथे विकाराद्वारे जन्म
होत नव्हते ज्या कारणामुळे इतके कर्मबंधन नव्हते. त्या दुनियेला कर्मबंधन रहित
स्वर्गाची दुनिया म्हटले जाते. तर एक आहे - निराकारी दुनिया, दुसरी आहे - आकारी
दुनिया, तिसरी आहे - साकारी दुनिया अच्छा - ओम् शांती.
हे अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
साकारमध्ये जर कोणी
निमित्त श्रेष्ठ आत्मा सोबत असेल तर त्यांच्याकडून कोणतीही गोष्ट व्हेरिफाय करून (पडताळणी
करून) नंतर मग कराल तर ती निश्चयबुद्धी होऊन कराल. निर्भयता आणि निश्चय दोन्ही
गुणांना समोर ठेवून कराल. तर जिथे नेहमी निश्चय आणि निर्भयता आहे तिथे सदैव श्रेष्ठ
संकल्पांचा विजय आहे. जे काही संकल्प करता, जर नेहमी निराकारची आणि साकारची सोबत
असेल अथवा सन्मुख आहेत, तर व्हेरिफाय केल्यानंतर निश्चयाने आणि निर्भयतेने करा,
यामुळे वेळ सुद्धा वाया जाणार नाही.