24-05-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   28.02.2010  ओम शान्ति   मधुबन


देहभानाच्या ‘मी-मी’ पणाची होळी पेटवून, परमात्म संगाच्या रंगाची होळी साजरी करा


आज होलिएस्ट बाबा (परम पवित्र बाबा) आपल्या होली (पवित्र) मुलांसोबत होळी साजरी करण्यासाठी आले आहेत. चोहो बाजूंची मुले दूरदूरहून स्नेहाने हृदयामध्ये एकरूप होत आहेत. बापदादा चोहोबाजूंच्या मुलांच्या मस्तकावर भाग्याचा तारा चमकताना पाहत आहेत. इतके मोठे भाग्य संपूर्ण कल्पामध्ये इतर कोणाचेही नसते. या संगमयुगातील प्राप्तीच्या आधारावर तुम्ही मुलेच इतके श्रेष्ठ पवित्र बनता जे भविष्यामध्ये तुम्ही डबल पवित्र बनता. आत्मा देखील पवित्र आणि शरीर सुद्धा पवित्र. संपूर्ण कल्पामध्ये फेरी मारून बघा कोणी धर्मात्मा सुद्धा डबल पवित्र बनलेला नाही. तुम्ही मुले डबल पवित्र देखील बनता आणि डबल पवित्रतेची निशाणी डबल ताजधारी बनता.

आज सर्वजण होळी साजरी करतात परंतु तुम्ही यावेळी जे डबल होली अर्थात पवित्र बनता त्याची यादगार (आठवण) म्हणून उत्सवाच्या रूपामध्ये होळी साजरी करतात. तुमच्याच प्रत्येक पावला-पावलाचे, जीवनाचे महत्त्व उत्सवाच्या रूपामध्ये साजरे करतात. तुम्ही या संगमावर प्रत्येक दिवस, प्रत्येक पाऊल उमंग आणि उत्साहामध्ये राहता म्हणून तुमच्या उमंग-उत्साहाची आठवण या उत्सवाच्या रूपामध्ये साजरी करतात. कशामुळे उमंग-उत्साह राहतो? कारण तुम्ही परमात्म संगतीच्या रंगाची होळी साजरी करता. म्हणून तुमचे प्रत्येक पाऊल उत्सवाच्या रूपामध्ये साजरे करतात. आता होळीमध्ये अगोदर जाळतात आणि मग साजरी करतात. तुम्ही देखील संगमावर आता आपल्या जुन्या संस्कार-स्वभावाला योग-अग्नीमध्ये जाळून टाकता कारण आपल्या जुन्या संस्कारांना जाळल्याशिवाय परमात्म संगतीचा रंग लागू शकत नाही, परमात्म मिलन होऊ शकत नाही. तर तुम्ही योग-अग्नीमध्ये संस्कारांना जाळले आणि मग परमात्म संगतीच्या रंगामध्ये रंगलात. तर आजकाल जाळतात देखील आणि रंग सुद्धा लावतात परंतु तुमच्या अध्यात्मिक रूपाला स्थूल रूप दिले आहे. ते स्थूल अग्नी पेटवतात, स्थूल रंग लावतात कारण आता बॉडी-कॉन्शस वृत्ती आहे (देहभान वाली वृत्ती आहे). तुम्ही होली (पवित्र) बनता, ते होळी साजरी करतात. संपूर्ण कल्पामध्ये कोणीही अध्यात्मिक होळी साजरी करून डबल होली (डबल पवित्र) बनलेले नाहीत. तर तुम्ही सर्व जे पण, जिथून कोठून आला आहात ते परमात्म संगतीच्या होळीमध्ये आला आहात. परमात्म संगतीची होळी साजरी करण्यासाठी आला आहात. तुम्ही होळीसाठी म्हणता की, ‘हो ली’ अर्थात जे झाले ते होऊन गेले. तर ड्रामानुसार जे घडून गेले त्याला म्हणतात - ‘हो ली’, जे झाले ते झाले. कोणतीही व्यर्थ गोष्ट मनामध्ये आणत नाही, होऊन गेली, अशी होळी साजरी करत राहता ना. तुम्ही सर्वांनी होली अर्थात पवित्र बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करून पवित्रतेला धारण केले आहे तेव्हाच भविष्यामध्ये तुम्हाला डबल पवित्रतेची निशाणी म्हणून डबल ताज दाखवतात.

आजच्या दिवशी तुम्ही प्रत्येक जण काय जाळून जाणार? बापदादांनी पाहिले की जन्मदिनाच्या दिवशी बाबांनी जो होमवर्क दिला होता की, क्रोधाला जन्मदिनानिमित्त जन्मदिवसाची गिफ्ट म्हणून देऊन टाका. तर त्याचा रिझल्ट बापदादांकडे काही मुलांचा आज पोहोचला आहे. बापदादांनी पाहिले की, काही-काही मुलांनी अटेंशन दिले आहे. तुम्ही देखील सर्वांनी आपला रिझल्ट काढला असेल, तर जे पण आज इथे बसले आहेत, त्यांनी आपला स्वतःचा रिझल्ट काढला, ज्यांनी आपल्या रिझल्टमध्ये क्रोधावर कंट्रोल केला आणि सफलतेचा अनुभव केला त्यांनी हात वर करा. सफलतेला प्राप्त केले! उंच हात वर करा. टीचर्स हात वर करा, फॉरेनर्स हात वर करा. (सर्वांनी हात उंच केले) अच्छा. मुबारक असो. यावरून तुम्ही सर्वांनी स्वतःमध्ये हिंमत ठेवली आणि हिंमतीचे फळ प्राप्त होऊ शकते, याचा अनुभव केला. तर मग या अनुभवाला या पुढे देखील लक्ष्य ठेवून वारंवार चेकिंग करत अजून पुढे वाढवू इच्छित असाल तर तुम्हाला असे वाटते का की हे संभव आहे? संभव आहे? पुढे होऊ शकते? त्यांनी हात वर करा. अच्छा. होऊ शकते? टीचर्स होऊ शकते? पांडव होऊ शकते? अच्छा. संभव होऊ शकते, नाही, होणारच आहे, यासाठी टाळ्या वाजवा. अच्छा. आता तर जास्त दिवस झालेले नाहीत परंतु आता प्रत्येक तीन महिन्यानंतर आजपासून तीन महिने अटेन्शन ठेवून क्रोधाचे टेन्शन संपवू शकता का? करू शकता? त्यांनी हात वर करा. अच्छा. ही तर खुशखबर खूप चांगली आहे, का? क्रोधाचे कारण काय असते? क्रोधाचे बीज कोणते असते? तुम्ही सदैव आपले भविष्य स्वरूप समोर ठेवा, तुमचे भविष्य स्वरूप किती सजलेले हर्षित चेहऱ्याचे आहे आणि बापदादांना पाहा त्यामध्येही ब्रह्मा बाबांना समोर आणा, का? शिवबाबा तर आहेच निराकार, परंतु ब्रह्मा बाबा तुमच्यासारखे साकार रूपधारी, तुमच्यासारखे जबाबदारीचे ताजधारी, तरीही त्यांचा कायम हसतमुख, आनंदी चेहरा, कारण या विकारांवर विजय प्राप्त करून, शरीर असताना, कार्य करत असताना तुमच्यासमोर एक उदाहरण बनून राहिले. ब्रह्मा बाबांपेक्षा तुमची जबाबदारी जास्त आहे काय? ब्रह्मा बाबांच्या जबाबदारीपुढे तुमची जबाबदारी तर काहीच नाही. आणि शेवटपर्यंत पाहिले कर्मातीत व्हायब्रेशन मध्ये अव्यक्त फरिश्ता बनले. तर आता बापदादांना दिलेली सौगात परत तर घेणार नाही ना! बापदादा समजतात की, जेव्हा कार्यव्यवहारामध्ये येता तेव्हा कोठे-कोठे अशा घटना घडतात, बऱ्याचजणांनी रिझल्टमध्ये देखील लिहिले आहे की, आवाज मोठा होतो.

मूडमध्ये थोडा आवेश येतो. परंतु जेव्हा अशा परिस्थती समोर येतात, तेव्हाच तर विजयी बनण्याचा चान्स असतो. परिस्थतींचे काम आहे येणे परंतु तुमचे नॉलेज आहे परिस्थतींमधून पार जाऊन विजयी बनणे. तर पसंत आहे? क्रोधाला निरोप द्याल, कायमसाठी की तीन महिन्यांसाठी? किती काळासाठी हिंमत ठेवली आहे? ज्यांना वाटते की कायमसाठी क्रोध-जीत बनणे कठीण नाही, होणारच आहे, त्यांनी हात वर करा. होणारच आहे. अच्छा. बापदादा खुश आहेत, का? तुमच्या शेवटच्या जन्मातही तुमची महिमा काय गातात? तुमच्या देवता रूपासमोर तुमची महिमा ‘सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी’ अशी गातात. तर तुमचे असे बनण्याचा पार्ट आताच्या संगमयुगाचेच गायन आहे.

बापदादांच्या मनातील एक विशेष आशा आहे, सांगू? मान हलवा, सांगू का? बापदादा आतापासूनच, अगदी आतापासूनच प्रत्येक मुलाला सदैव उमललेल्या गुलाबाचे फुल पाहू इच्छितात. भाग्यशाली, मनोहारी. परिस्थितींचे काम आहे येणे, हे देखील समजून घ्या. परिस्थिती येतील परंतु आपले लक्ष्य लक्षणामध्ये (कृतीमध्ये) आणायचे आहे. घाबरायचे नाही. तर जसे आता म्हणतात की, ब्रह्माकुमारी पवित्रतेचा धडा खूप शिकवतात; तर आता असे प्रसिद्ध व्हा की, ब्रह्माकुमारी क्रोध-मुक्त बनवतात; कारण सर्वांनाच क्रोधातून मुक्त होण्याची इच्छा आहे. तणाव असतो ना! तर तणाव उत्पन्न होतो म्हणून सर्वांना हवे आहे, परंतु त्यांना ती विधी येत नाही. जसे पवित्र बनणे असंभव समजत होते; परंतु आता तुमच्या अनुभवाच्या आधारावर समजतात की, हे होऊ शकते. तसे आता या वर्षी ही लाट पसरवा की क्रोध-जीत बनणे; हे होऊ शकते, काहीच कठीण नाहीये. अशी अनुभवी उदाहरणे प्रत्यक्षात स्टेज वर आणा. बापदादांनी पाहिले आहे की, बरीच मुले कार्य करत असताना सुद्धा क्रोध-जीत बनली आहेत. अशी उदाहरणे आपल्या परिवारामध्ये, ब्राह्मण परिवारामध्ये बनली आहेत. तर या वर्षी काय कराल? होळी साजरी करण्यासाठी आला आहात ना! तर होळीमध्ये काय करतात? काहीतरी जाळतात, बरोबर ना! तर आजच्या होळीमध्ये तुम्ही काय जाळणार आहात? क्रोधाचा तर तुम्ही त्याग केला आहे, तर त्याला अजून पक्के कराल! परंतु बापदादांनी पाहिले की तणावामध्ये येण्याचे कारण देह-अभिमानाचा ‘मी’ हा शब्द आहे. देहभानाचा ‘मी’. एक आहे - ‘मी आत्मा आहे’ - हा ‘मी’ आहे, परंतु देहभानाचा ‘मी’ शब्द अभिमानाचा देखील असतो, अपमानाचा देखील असतो आणि दिलशिकस्तचा (निराशेचा) देखील ‘मी-मी’ खाली पाडणारा असतो. तर आज क्रोध जीत बनण्यामध्ये पुढे जाण्यासाठी बॉडी-कॉन्शस वाला ‘मी’, याला योग-अग्नीमध्ये जाळून टाका. अनेक प्रकारच्या ‘मी-मी’ पणाला जाळून टाका आणि फक्त एक ‘मी आत्मा आहे’ या ‘मी’ शब्दाला पक्के करा आणि आज जाण्यापूर्वी बाकीचे सर्व ‘मी’ या योग-अग्नीमध्ये जाळून टाका. अनेक प्रकारचे ‘मी’ आहेत ना! तर आज जाळण्याची होळी साजरी करूया! कारण क्रोधाचे कारण - तणाव खूप असतो. तर या ‘मी’ ला समाप्त करण्यासाठी आज आपल्या मनात संकल्प करा. जाळायचे आहे कारण हे देखील ओझेच आहे ना! तर ट्रेनने जा, प्लेनने जा, पण हे ओझे इथेच जाळून जा. जाळू शकता का? जे समजतात - हिंमत मुलांची तर मदत करणारे बाबा सोबत आहेतच, तर विजय सुद्धा सोबत आहेच. जे असा विचार करतात की, मला विजयी बनायचेच आहे, त्यांनी हात वर करा. बनायचेच आहे, छान. जे आज व्ही.आय.पी. आले आहेत, ते हात वर करत आहेत. जे व्ही.आय.पी. आले आहेत, त्यांनी उठा, उभे राहा. हात वर करत आहेत. टाळ्या तर वाजवा. विजयी बनणार? पहा, जे कोणी विजयी बनतील, त्या प्रत्येकाला माळ घालत आहेत. मुबारक असो, मुबारक असो. अच्छा. आता जे पण व्ही.आय.पी. आले आहेत, ते सर्व हिंमतवान आहेत म्हणून बापदादा वरदान देत आहेत. या वेळी तुम्ही जे पण एका जन्मासाठी कोणत्याही कार्यामध्ये व्ही.आय.पी. बनला आहात परंतु बापदादा तुम्हा ‘हिंमतवान मुलांना’, आता ‘व्ही.आय.पी.’ म्हणणार नाही, ‘मुले’ म्हणणार, बापदादा हे वरदान देत आहेत, गॅरंटी देत आहेत की, तुम्ही सर्वजण २१ जन्म व्ही.आय.पी. बनाल. हे इलेक्शन, सिलेक्शन तिथे असणार नाही. तर सर्वांनी फक्त एक गोष्ट सोडू नका, जसे आता संबंध-संपर्कात आला आहात तसे या ब्राह्मण परिवाराच्या कनेक्शनला सोडू नका. जितके कनेक्शन ठेवाल तितके रिलेशन (नाते) पक्के होईल आणि बाबांचे वरदान प्राप्त करालच कराल. तर मान्य आहे का? कनेक्शन ठेवणे मान्य आहे का? हात वर करा. अच्छा. (बापदादांनी फुलांचा हार उचलून पुढे केला) तुम्ही सर्वांनी हा हार घाला.

तुम्ही सर्व नवीन मुले अथवा रिअल गोल्ड मुले सदैव बाबांचे आज्ञाधारक आहात ना! तर आज या ‘मी’ ला जाळूनच जायचे. जे पहिल्यांदा आले आहेत ते उठा. अच्छा. बापदादा पहिल्यांदा येणाऱ्या मुलांना पहिल्यांदा आल्याबद्दल पदमपटीने मुबारक देत आहेत. परंतु जसे आता पहिल्यांदा आला आहात तसेच पहिला नंबर, फर्स्ट डिव्हिजनमध्ये या, पहिला नंबर तर फिक्स (निश्चित) आहे परंतु फर्स्ट डिव्हिजनमध्ये येणार, अशी हिंमत आहे? हात वर करा ज्यांच्यामध्ये हिंमत आहे. पहा, विचार करून हात वर करा. अच्छा. तर लक्ष्य ठेवा की आम्ही लास्ट आलो आहोत परंतु फास्ट जाणार कारण वेळेचा काहीच भरवसा नाही. आता जे करायचे आहे ते तीव्र पुरुषार्थी बनून करा कारण दीर्घकाळाचा पुरुषार्थ तुम्हा सर्वांना थोड्या वेळात पूर्ण करावा लागेल. तर हिंमत आहे का? आहे हिंमत? हात वर करा. पहा तुमचा फोटो निघत आहे. बापदादा अशा हिंमत असणाऱ्यांना मुबारक देत आहेत की, हिंमत तुमची आणि मदत बाबांची. परंतु हिंमत हारू नका. आपल्या भाग्याचा तारा सदा चमकवत राहा कारण या जन्माचा तीव्र पुरुषार्थ, ‘पुरुषार्थ’ नाही ‘तीव्र पुरुषार्थ’ अनेक जन्मांचे भाग्य बनविणारा आहे, त्यामुळे कधीही हिंमत हारू नका. गोष्टी येतील (परिस्थिती येतील) परंतु त्या परिस्थिती महावीर नाहीत, तुम्ही सर्वशक्तिवानची मुले आहात, तुमच्या समोर परिस्थिती काय आहे! परिस्थिती येते आणि निघूनही जाते. जी निघून जाणारी आहे तिच्यामागे आपले भाग्य गमावू नका. अच्छा, बसा. तर सर्वांना बापदादा प्रेमाने मुबारक देत आहेत, कोणत्या गोष्टीची? हिंमत ठेवली आहे आणि बापदादा प्रत्येक मुलाच्या हिंमतीच्या संकल्पावर खुश आहेत. तर होळी साजरी केली? जाळण्याची होळी तर साजरी केली आणि परमात्म संगतीच्या रंगाची होळी सुद्धा साजरी केली. जाळली देखील आणि साजरी देखील केली.

आता बापदादा सर्व मुलांची एक ड्रिल करून घेऊ इच्छित आहेत कारण चोहोबाजूला परिस्थिती आहेत, कुठे कोणती परिस्थिती आहे, तर कुठे कोणती परिस्थिती आहे, अशा चोहोबाजूंच्या परिस्थितींमध्ये तुम्ही एका सेकंदामध्ये एकाग्र होऊ शकता का? अशी प्रॅक्टिस स्वतःमध्ये अनुभव करता का? किंवा समजा ज्यावेळी तुम्हाला कारणे-अकारणे एखाद्या गोष्टीबद्दल व्यर्थ संकल्पांचे वादळ आले आहे, अशा वेळी तुम्ही तुमच्या मन-बुद्धीला एकाग्र करू शकता का? ही एकाग्रतेच्या शक्तीची ड्रिल वेळेला (परिस्थितीच्या वेळी) करून पाहिली आहे का? जर अशा वेळी एका सेकंदामधे एकाग्रतेची शक्ती वापरता आली नाही तर पुढे जाऊन अशा परिस्थिती वारंवार येतील. तर आज बापदादा सेकंदामध्ये फुलस्टॉप अर्थात एकाग्र स्थितीच्या अभ्यासावर तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छित आहेत कारण प्रकृतीने आपले विविध रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. चोहोबाजूला काय-काय घडत आहे, ते तुम्ही सर्वजण जास्त चांगले जाणता. तर अशा मन-बुद्धीला विचलित करणाऱ्या गोष्टी येणारच आहेत, त्यामुळे आता अशी प्रॅक्टिस करा की, तुम्ही आपल्या मनाला आणि बुद्धीला एका सेकंदामध्ये परमधाममध्ये स्थिर करू शकता! आता स्वतःला फरिश्ता रूपात स्थित करा. आता मी ब्राह्मण मास्टर सर्वशक्तिवान स्थितीमध्ये आहे, या मास्टर सर्वशक्तिवान स्थितीमध्ये स्थित व्हा. (बापदादांनी ड्रिल करून घेतली). अशी प्रॅक्टिस दिवसभरामध्ये जेव्हा पण वेळ मिळेल, वारंवार मनाला एकाग्र करून पहा. जसे पाहिजे, जिथे पाहिजे, तिथे मन एकाग्र व्हावे. हा पुरुषार्थ करायला एक मिनिट लागेल, एका सेकंदात फुलस्टॉप; कारण असा हादरवून टाकणारा काळ आता तयारी करत आहे. त्यामुळे माईंड कंट्रोल - मन माझे आहे, मी मन नाही, माझे मन आहे, तर ‘माझे’पणा वर माझा कंट्रोल आहे का? ही ड्रिल अत्यंत आवश्यक आहे.

सगळे जे पण आले आहेत, बापदादांना प्रत्येक बच्चा प्रिय आहे. का? कसाही आहे परंतु बापदादा प्रत्येक मुलाला कोटींमध्ये कोणी आत्मा म्हणून पाहतात. भले पुरुषार्थामध्ये कमजोर आहे परंतु बाबांचा लाडका बनला आहे. हृदयापासून म्हणतात - ‘माझे बाबा’, म्हणून बाबांचे देखील अतिशय लाडके आहेत. बापदादा फक्त एक गोष्ट पुन्हा आठवण करून देत आहेत की, आपला चेहरा सदा खुशनुमा (प्रफुल्लित), आनंदाने चमकत राहावा. गोष्टी निघून जातील परंतु आनंद जाऊ नये. संगमयुगातील आनंद परमात्म गिफ्ट आहे. तर होली अर्थात अशा काही गोष्टी आल्या तर याची आठवण करा की, आपण होळी साजरी करून आलो आहोत, जे झाले ते हो ली (होऊन गेले), आनंद जाता कामा नये. आनंद ही परमात्म सौगात आहे, परमात्म खजिना आहे.

बापदादा नेहमी म्हणतात - हे स्लोगन नेहमी लक्षात ठेवा - आनंदी राहायचे आहे आणि आनंद वाटायचा आहे. जितका वाटाल तितका वाढेल आणि चालता-फिरता प्रफुल्लित चेहरा आपोआप सेवा करत राहील. जो कोणी बघेल तो हाच विचार करेल - यांना काय मिळाले आहे. तर आज होळीची दिलखुश मिठाई आहे - आनंद. सर्वांनी खाल्ली? नेहमी खात राहा. यामुळे कोणताही आजार होणार नाही. अच्छा.

बापदादा पुन्हा इशारा देत आहेत की स्व-पुरुषार्थ, स्व-पुरुषार्थाने स्व-उन्नती आणि सेवेची उन्नती दोन्हीकडे अटेंशन देत राहा, पुढे जात राहा आणि सदैव उडत राहा, उडवत राहा. अच्छा.

चोहोबाजूंच्या बापदादांच्या स्नेहामध्ये सामावलेले, आठवण आणि सेवेमध्ये प्रगती करत पुढे जाणारे आणि घेऊन जाणारे, अमृतवेला सर्वात चांगली पॉवरफुल बनविणारे आणि मन्सा सेवेद्वारे रहमदिल, दयाळू, कृपाळू बनून आत्म्यांना काही ना काही ओंजळ देणारे, आपल्या या विधीला पुढे वाढवत राहा. बापदादा पाहतात की प्रत्येक बच्चा उमंग-उत्साहामध्ये असतो, परंतु आता ॲडिशन काय कराल? ‘सदा’ शब्दाचे ॲडिशन करा. ‘कधी-कधी’ शब्द डिक्शनरीमधून काढून टाका. तर चोहोबाजूंच्या मुलांनी होळी साजरी देखील केली, जाळली सुद्धा आणि संगतीचा रंगही लावला, बीती सो बीती (जे झाले ते झाले) याची होळी सुद्धा साजरी केली, म्हणून बापदादा चोहोबाजूंच्या मुलांना सन्मुख हृदयामध्ये पाहत आहेत. बापदादांची पद्म-पद्मपटीने प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
सदैव आदेश पालनाचा तिलक धारण करून फर्स्ट प्राइज घेणारे फरमानबरदार भव

ज्या मुलांच्या मस्तकावर फरमानबरदारच्या (आज्ञाधारकतेच्या) स्मृतीचा तिलक लागलेला आहे, एक संकल्प देखील आदेशा शिवाय करत नाहीत त्यांना फर्स्ट प्राइज प्राप्त होते. जसे सीतेला रेषेच्या आत बसण्याचा आदेश होता, तसे प्रत्येक पाऊल उचलताना, प्रत्येक संकल्प करताना बाबांच्या आदेशाच्या रेषेच्या आत राहा म्हणजे नेहमी सेफ राहाल. कोणत्याही प्रकारचे रावणाचे संस्कार वार करणार नाहीत आणि वेळही व्यर्थ जाणार नाही .

सुविचार:-
कोणाही विषयी जर आकर्षण असेल तर ते आकर्षण पुरुषार्थामध्ये अवश्य निष्काळजी बनवेल.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

नेहमी एकाच्याच आठवणीत राहून एकरस अवस्था बनवा तर वन-वन आणि वन मध्ये याल. बाहेर राहूनही हाच धडा पक्का करा - “सी फादर, फॉलो फादर”, तर कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगणार नाही, ब्रह्मा बाबांसमोर कितीही गोष्टी आल्या परंतु त्यांनी गोष्टींकडे न पाहता एका बाबांनाच पाहिले त्यामुळे नंबरवन बनले. तर फॉलो फादर.